आमची पहिली परदेशवारी....२

विलासराव's picture
विलासराव in जनातलं, मनातलं
30 Jul 2010 - 3:06 am



नमस्कार
मंडळी ,

विमानातळा बाहेर आलो चहा घेतला......हॉटेल शोधले ......११ वाजता रुममध्ये प्रवेश केला......आंघोळ केली ........फ्रिजमधुन बीयर घेतली ...चकना बरोबर होताच......३-४ बीयर ओढ्ल्या....अन???? झोपी गेलो.....सकाळी उठुण साओ पावलो बघायचे होते.....

सकाळी ९ च्या सुमारास जाग आली. एडी टीव्ही पाहत होती .एडी: गुड मोर्निंग माय इंडियन ......मी :गुड मोर्निंग .......मी : edy i wants to talk with adesh .तिने मोबाईलवर आदेशचा नंबर लावला .फोन लागला नाही. २-३ वेळा असेच झाले मी: what happened edy? ..edy: i don't know...मी रागानेच तिच्याकडून मोबाईल घेतला ..रिडायल केला. फोन लागला नाही. ती बाई फोनवर पोर्तुगीज मध्ये बोलत होती. काय प्रोब्लेम आहे ते काही कळत नव्हते. एडीशी बोलण्याचा निष्फळ प्रयन्त केला...उपयोग झाला नाही....कारण एडीच इंग्रजी फारच बाल्या अवस्तेथ होते. मी काहीही विचारले तरी ती ( i don't know, sorry , i fargot, i like , my lunch ,your dinner ) अशा १-२ शब्दात उत्तर द्यायची.. तिला फारच कमी इंग्रजी येत होते आणि माझे उच्चारही तिला समजत नव्हते... मी खिडकीच्या काचा सरकवल्या आणि बाहेर नजर टाकली. शहर पूर्णपणे जागे झालेले होते. रस्त्यावर गाड्या वेगाने धावताना दिसत होत्या. एका बाजूला उंचच उंच इमारती ......मधेच छोटे छोटे बंगले....बरयापैकी हिरवी झाडेही दिसत होती. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तिथली स्वच्छता....फटाफट आवरून रात्री एडीच्या नकळत लपवून ठेवलेले पाकीट घेतले (कुठलीही रिस्क नको म्हणून) आणि खाली आलो नाष्टा करण्यासाठी...त्यांनी वेळ संपली असे सांगितले......रात्र चकना खाऊन काढली होती.....पोटात कावकाव चालू झालेली होतीच...

.तसेच बाहेर पडलो. मला साओला पोहोचून १५ तास झाले तरी मी आदेशला फक्त हे सांगू शकत नव्हतो कि मी सुखरूप पोहोचलो आणि एडी भेटलीय.....रस्त्याने चालत चालत निघालो ....रहदारी भरपूर होती.... काही माणसे मुले मुली चालताना दिसत होत्या .......एकंदरीत खात्यापित्या घरचे लोक दिसत होते.....अगदी गुबगुबीत..........काही आफ्क्रीकन लोकही होते.......आणि मी STD बूथ शोधत होतो....एकही बूथ दिसला नाही ..........कुणाशीही बोलण्याची सोय नव्हती.......तिथे फक्त आणि फक्त पोर्तुगीजच भाषा चालते......कुणी बरा माणूस दिसला कि त्याच्याशी मी इंग्रजीत बोलायचो आणि तो मख्ख पणे माझ्याकडे पहायचा .....मग एडी त्याला काहीतरी सांगायची .....माझ्याकडे रागाने बघायची..........तिला माझा हे वागणे आवडत नव्हते आणि मला तर फोन करायचा होता.....मग तिने एका दुकानातून फोन कार्ड घेतले आणि पिसिओवरून आदेशला फोन लावला.......फोन लागेना............तिने दुकानदाराला विचारले .......तरीही फोन लागेना ........मी तिला रस्त्यावरच्या लोकांना विचारायला सांगितले आणि तिने २-३ लोकांना विचारले ..ते ट्राय करायचे पण उपयोग झाला नाही.....मी पाहत होतो ........प्रत्येक जन सुरवातीचा कोड वेगळा डायल करायचा ,०००० ९१ ९८२००-----डायल करायचा कुणी ००११ ९८२००------ , पण फोन काही लागेना..........मला तर वाटले हि एडी नावाप्रमाणेच वेडी दिसतेय .... मी तिला फक्त मला टेलिफोन ऑफिसला घेऊन चल अस सांगितले......आणि ती कशी मूर्ख आहे तेही सांगितले .........माझा पार चढला होता......तिच उत्तर होतं मी कधीच ISd कॉल केलेला नाही.........आम्ही टेलिफोन ऑफिस शोधत २० मिनिट तरी चाललो असू आणि एकदाचे सापडले.....मी पुढे होऊन रिसेप्शन ला बसलेल्या मुलीला विचारले .......तीला काहीच समजले नाही......परत एडीला पुढे केले ......त्या मुलीने ००१५ ९८२००------ असा फोन लावा असे सांगितले ..बाजूच्याच पिसिओ वरून काल लावला आणि चक्क फोन लागला ........

.मी : आदेश मी वेळेत पोहोचलो ,एडी आलेली होती ,काळजी करू नकोस.मी एडीच्या घरी गेल्यावर स्काइप वर बोलू ओके .....

आदेश : ठीक आहे ......एक वाईट बातमी आहे तुझा मित्र सुरेश ऑफ झालाय......

मी : कसा काय? .....फोन कट झाला.....

मी परत ट्राय केला ......फोन लागला नाही ..........एडी ने प्रयत्न केला आणि तिने कार्ड संपले असे सांगितले.......१ मिनिटाच्या आत....मला काहीच बोध झाला नाही .पण माझे महत्वाचे काम झाले होते आणि एक वाईट बातमी समजली होती......मी एडीला जेवायचे असे खुणेनेच सांगितले आणि सुरेशचा विचार करत तिच्यामागे चालू लागलो......मला फक्त एक फोन करायला ३ तास लागले......थोडे विषयांतर झालेय पण एवढे सर्व विस्ताराने सांगण्याचा उद्देश एवढाच कि तुम्हाला माझ्यापुढील समस्यांचा अंदाज यावा ......पुढेही असे बरेच प्रसंग आले पण आता त्याची चर्चा येथे करणार नाही............

एका हॉटेलपाशी एडी उभी राहिली .......मी मानेनेच माझा होकार दिला .....आतमध्ये एसी असल्याने बरे वाटले ......समोरच प्लेट होत्या ......मी एडीच्या मदतीने भरपूर पदार्थ घेतले ........पुढे प्लेटचे वजन केले .......आणि एक कोपर्यातल्या टेबलावर आम्ही बसलो ......माझ्यासाठी बीयर मागवली......बियरची टेस्ट मस्तच होती.......पण जेवणातला मला भात आणि वालाची उसळ (वरणा ऐवजी ) सोडून एकही पदार्थ आवडला नाही.....बाकी सर्व सोडून मी भात आणि वालाची उसळ परत घेतली......तिखट किंवा मिरची कशातही नव्हती ...पूर्ण जेवण बेचव.........प्यायला पाणी विकत .फुकटच पाणी नाही......बिल आले ७५ रियाल ......७५*२७= २०२५ रुपये .........त्यात पाण्याचे ८ रियाल ..८*२७= २१६ रुपये .........मला माझे पैसे ८ दिवसातच संपतील असे वाटले.......हे सर्व लिहिले कारण मी एक मध्यमवर्गीय आहे ........बीयर आणि कोल्ड ड्रिंक एकच भाव.........एक ना दोन गोष्टी.......अनंत समस्या.असो

जेवण करून बाहेर आलो. एडीने माहिती काढली तीही या शहरात प्रथमच आली होती..........एका बसमध्ये बसलो ..........तिकीट ६ रियाल ....कुठेही उतरा पुढच्या स्टोपला नाहीतर शेवटच्या ...तिकीट एकच ........अशा बर्याच गोष्टी मला हळूहळू समजल्या .......एके ठिकाणी उतरलो .......जवळच पार्क होते .तिथे थोडा वेळ फिरलो ........सर्व आखीव रेखीव .......नंतर लोकल ट्रेन पकडून बस डेपोला गेलो ..........वीटोरिया ची २ तिकिटे आरक्षित केली ....कुठल्याशा मॉलमध्ये भटकलो .........आणि संध्याकाळी जेवण करून ८ वाजताच हॉटेलवर आलो.....कारण एडी म्हणाली बाहेर रात्री फिरणे धोक्याचे आहे ...........टीवी लावला ........सर्व पोर्तुगीज ..........लवकरच झोपून घेतले.......सकाळी हॉटेलचे बिल भरले .......६८० रियाल .....दोन दिवसाचे ६०० आणि जे फ्रीजमधील बियर आणि पाणी प्यायलो ते ८० ............२ दिवसात १००० रियाल खर्च झाले म्हणजे २७००० रुपये .......कुठलीही ऐश केली नाही.वायफळ खर्च केला नाही .........माझ्याकडे सगळे १२५००० रुपये होते .......त्यातले २७००० खर्च झाले २ दिवसात ........९८००० मध्ये मला ६८ दिवस राहायचे होते ........माझ्या चेहऱ्यावरून एडीने माझी चिंता ओळखली .............एडी: don't worry love ...in vitoria .my money ......जीवात जीव आला .........बस डेपोला आलो ...........१ नंबरला गेलो तर १.५ रियाल म्हणजे ४० रुपये .....इलाज नव्हता दिले ............बस स्टेशन एखाद्या मॉल सारखेच होते ......इथे तिकिटाशिवाय कुणालाही बस प्लाटफोरमवर जायला परवानगी नाही .............बसमध्ये बसताना प्रत्येकाचे ओळखपत्र तपासतात ..माझा पासपोर्ट तपासला ..........आणि मगच आतमध्ये प्रवेश मिळाला.......उभा एकही प्रवासी नव्हता ......१६ तासाचा प्रवास करून वीटोरिया ला पोहोचलो .........आता पुढील भागात थोडक्यात प्रवास वर्णन आणि काही फोटो............हा भाग काहीसा कंटाळवाणा वाटेल तुम्हाला ....पण एका अनोळखी देशात (खंडात म्हणाना) ...........कुणाचीही कुठलीही मदत होण्याची शक्यता नसताना ........मी केलेले हे धाडस आणि त्याचा मनावर येणारा ताण तुमच्या लक्षात यावा म्हणून केलेला हा प्रपंच .........

क्रमश:...............

प्रवासदेशांतरअनुभव

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

30 Jul 2010 - 3:37 am | बहुगुणी

...वाचतोय.
हिंमतीची नक्कीच दाद द्यावी लागेल. आणि परत येऊन चक्क अनुभव फोटोसकट लिहिता आहात म्हणजे बर्‍यापैकी सुखरूप आहात असं म्हणायला हरकत नसावी. ९८००० मध्ये ६८ दिवस कसे काढले ते वाचायलाच हवं. येऊ द्यात.

Nile's picture

30 Jul 2010 - 3:46 am | Nile

वाचतोय,

केशवसुमार's picture

30 Jul 2010 - 4:02 am | केशवसुमार

वाचतोय..
(वाचक)केशवसुमार

प्रभो's picture

30 Jul 2010 - 5:36 am | प्रभो

आता विंटरेस्ट येतोय...पुढे काय???

आवडाबाई's picture

31 Jul 2010 - 2:17 pm | आवडाबाई

फोटो काही दिसले नाहीत
कुठे आहेत ते ?
आधीच्या भागांच्या लिंका देत जा हो लेखात !

विलासराव's picture

31 Jul 2010 - 3:08 pm | विलासराव

फोटो काही दिसले नाहीत
कुणाला दिसतात कुणाला नाही.(मि पन मिपावर नविन आहे)
आधीच्या भागांच्या लिंका देत जा हो लेखात !
कशा द्यायच्या ते कळवा

मीनल's picture

30 Jul 2010 - 3:43 am | मीनल

बापरे काय हिम्मत आहे तुमची! पण कौतुक वाटते आहे.

अडगळ's picture

30 Jul 2010 - 3:44 am | अडगळ

सीएम साहेब,

त्या मधल्या मधल्या गाळलेल्या जागा आमाला भरायच्या आहेत काय ?
एक दोन भरून बघितल्या ..लै मजा आली.

रेवती's picture

30 Jul 2010 - 3:56 am | रेवती

वि. रा.
हा भागही छान झालाय!
तुम्ही नविन आहात पण पुढचे लेखनही असेच झटपट होवू द्या!
आता काय होणार? उत्सुकता आहे.

विजुभाऊ's picture

30 Jul 2010 - 9:38 am | विजुभाऊ

३-४ बीयर ओढ्ल्या
हा काय प्रकार आहे?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2010 - 10:03 am | बिपिन कार्यकर्ते

उत्सुकता वाढते आहे. एकंदरीत तुम्ही आंतरराष्ट्रिय प्रवासाला अजिबात तयार नव्हता हे कळतंय आणि तशातही तुम्ही तब्बल ७० दिवस राहून आलात हे नक्कीच थ्रिलिंग आहे.

बाकी, तुमच्याकडे येऊन तुमच्य कीबोर्डावरील '.' ची कळ व्यक्तिशः डिसेबल करायची इच्छा होते आहे. किती ठिकाणी ती टिंबं दिली आहेत, काही गणनाच नाही. तुम्ही अजून नीट आणि खुलवून लिहू शकाल.

पुढचे भाग टाका पटापट.

विलासराव's picture

30 Jul 2010 - 11:04 am | विलासराव

उत्सुकता वाढते आहे. एकंदरीत तुम्ही आंतरराष्ट्रिय प्रवासाला अजिबात तयार नव्हता हे कळतंय
माझ्या बाजुने मि १०१% तयरि केली होति.तरी फजिती झालिच
बाकी, तुमच्याकडे येऊन तुमच्य कीबोर्डावरील '.' ची कळ व्यक्तिशः डिसेबल करायची इच्छा होते आहे
'.' मिच डिसेबल केलीय .सबब परत दिसणार नाही
तुम्ही अजून नीट आणि खुलवून लिहू शकाल.
मला तरी हे जमेल असे वाट्त नाही. माफी असावी

अभिरत भिरभि-या's picture

30 Jul 2010 - 11:40 am | अभिरत भिरभि-या

वेगळे आणि थरारक प्रवासवर्णन !

एवढे सर्व विस्ताराने सांगण्याचा उद्देश एवढाच कि तुम्हाला माझ्यापुढील समस्यांचा अंदाज यावा ......पुढेही असे बरेच प्रसंग आले पण आता त्याची चर्चा येथे करणार नाही..........

अहो विस्ताराचे भय नाही. नि:शंक मनाने लिहा. किंबहुना या समस्या आणि प्रसंगच तुमच्या वर्णनाची खुमारी वाढवत आहेत आणि तुमच्या धाडसाची कल्पना देत आहेत.

(सविस्तर) अभिरत

पाषाणभेद's picture

30 Jul 2010 - 11:43 am | पाषाणभेद

छान अनुभव लेखन. लेखनातले जास्तीचे विरामचिन्हे काढून लिहीत चला.

गणपा's picture

30 Jul 2010 - 1:02 pm | गणपा

वरील सर्वांशी सहमत.

योगी९००'s picture

30 Jul 2010 - 1:38 pm | योगी९००

मा.मु.

तू लई डेअरिंगबाज माणूस......

नुसत्या विंटरनेटओळखीवर तू सातासमुद्रापल्याड गेलास..बापरे...(सत्य कथा आहे का?)

आळश्यांचा राजा's picture

30 Jul 2010 - 1:57 pm | आळश्यांचा राजा

धाडसाचं कौतुक! आवडलं. आवडतंय.

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jul 2010 - 6:04 pm | llपुण्याचे पेशवेll

धाडसाचं कौतुक आहे.

पुष्करिणी's picture

30 Jul 2010 - 7:54 pm | पुष्करिणी

एकदम धाडसी प्लॅन आणि तो अंमलात आणणारे तुम्हीही...कौतुक आहे.

>>फटाफट आवरून रात्री एडीच्या नकळत लपवून ठेवलेले पाकीट घेतले (कुठलीही रिस्क नको म्हणून)

म्हणजे तुम्ही तसे तयारी करून गेला होता ..:)

विलासराव's picture

30 Jul 2010 - 8:14 pm | विलासराव

फटाफट आवरून रात्री एडीच्या नकळत लपवून ठेवलेले पाकीट घेतले
काय करनार अजुनहि गंडला जाऊ शकतो हि भिती दुसरं काय. मनाचे खेळ सारे

विलासराव. लै भन्नाट.
येउंद्या आजुन.

अशोक राणे.

दुसरा भागही भन्नाट. जिगरबाज व्यक्तीच करू शकतात असे धाडस. पुढील भागाविषयी उत्सुकता वाढवणारे अनुभवकथन आवडले.