मंडळी नमस्कार.
व्हय ही बात्मीच हाय
नव्या वर्सात काय करायचं त्ये म्या ठरीवलच नव्हतं.
डायरी बियरी ल्हिनं काय आपल्या जमत न्हायी.
आन रोज काय ल्हायचं त्या डायरीत. सकाळी पोट साफझालं आज तीन विड्या ओडल्या. आज नानाची उधारी दिलप्या पडून पैशे उसने घीऊन भागवली
आसं कायतरी पुळकाट ल्हिऊ?
का...आज कारभारीन एकदम मस्त हासत हुती. तिने तिच्या भैनीचा इसारलेला झंपार न्येस्ला हुता. आस्लं ल्ह्यायचं
आपल्याला न्हाय जमत आस्लं.
रस्त्याने चालत रहाव चिच्चच्या झाडाला एकदम गाभुळलेल्या लै चिच्चा लागलेल्या दिसाव्यात. खीशात मिठाची पुडी अचानाक हाताला लागावी तसे काहीसे झालं.
नव्या वरसाच्या सुर्वातीलाच आमच्या हापिसान एकदम बंगळुर ला जा आसं फर्मान काढ्लं आन हातात इमानाच तीकीट ठीवलं. म्या बी एकदम मज्जेत म्हनालो जातु की. आपल्याला काय तुमी म्हनाला हिकडम जा हिकड जाईन तिकड जा म्हन्ला तिकडं जाईन बंगळूर का हितच हाय की. आन आप्ल्या मराठा गड्याला बंगळूर काय नवं हाय का?
थोरल्या आबासाहेबाचे बाबा बंगळूराताच होते. आपन बी तसच जाऊ की.
म्या आसाच म्हनून शाजीराजांचं उदाहरन दिलं. त्ये ऐकलं आन कारभारीन आली की वरडत्....तुमी कुटं जायाचं तिकडम जावा पर शाजीराजावानी काय करु नका.
का ग ? त्ये केवड्ये मोठे मानूस ..त्यांचा आदर्श ठीवायचा तर तु नकु म्हन्तीस व्हय.
ती म्हन्ली त्यानी जिजाबाइ ला आन शिवाजी राजाला हिते ठीवला आन तेकदे बंगळुरात दुसरा घरोबा क्येला व्हता...... बम्गळूरला जातान त्यांचा ना नग घीउसा.
आगं तसं न्हाय ग तू आस्ताना माज्या डोक्यात तरी आस येईला का कदी?
येवड्म बोललु तवा कुटं कारबारीन जराशी शांत झाल्ली. पन म्हन्ली की जाताना तुमाला सोडाय्ला श्टॅन्डावर येते म्हनून.
म्या म्हन्लु की आग म्या काय यश्टीनं न्हाय काय जानार. म्या इमानाना जानार.
तवा ती एकदम खुललीच . फस्सकन हासली. आन म्हनाली मंग म्या येतेच इमानाच्या श्टॅन्डाव्ल. तेवढीच इमान बगायला मिळल.
म्या बी कबूल झालु....आपल काय जातय हो म्हनायला.
जायचा दिव्चस आला. तीने वकटीची बंदाबांद सुरु केली. तहानलाडु भूक लाडु आन काय काय दिलं पान्यासाटी फिरकीचा तांब्या शेजारच्या स्वातीकाकुंकडून मागून आन्ला.
म्या म्हन्लु आग तांब्या कशाला म्या पान्याची बाट्ली घीन की.
कशाला भायेरचं पानी पिताय. आन पैशे वाय घालवताय आप्ला फिरकीचा तांब्या एकदम ब्येस. घरचं पानी.
सक्काल झाली सक्काळी साडे सा च इमान. रीजर्वेशन हुतं न्हनून निवान्त हुतो. पर आमच्या सायबान तिकडे साडेपाचाला य म्हनून सांगितला. आता इतक्या सकाळी सकाळी इमानाच्या श्टॅन्डावर जाऊन काय इमानाच्या काचा साफ करायच्या हुत्या काय कुनास ठाव.
मी सायबाला सांगितलं की रीजर्वेशन हाय की. जागा पकडायला यवड्या लवकर जायची काय गरज हाय. पर त्ये ऐकनाच.
पर आपल्या काय ....... धू म्हन्लं की ध्वायचं....सक्काळीच पाय रात्रीच इमानाच्या श्टॅन्डावर जा म्हन्ला तरी गेलु अस्तो.
आसो.
तर म्या फाटचंच इमानाच्या श्टॅन्डावर ग्येलु. त्या श्टॅन्डाला येरपुर्ट म्हन्त्यात. इमान हवेत उडत्म म्हनून त्ये येर पोर्ट. मंग बस जिमीनीवरच चाल्ते मंग बशीच्या श्टॅन्डाला कस्लं पुर्ट म्हनायचं?
असो. मला भ्या हुतं की हवेत असनार्या इमानात चढायचं कसं?
माझी कारभारीन लै हुशार ती म्हनाली की बशीत चढताना घुसाघुशी करताना लोकांच्या आंगा खांद्यावर पोआय देताच की तसच करा नायतर बगा आपुन दहीहान्डी कशी फोडतो तसं लोकंच्या टकुर्यावर हुबं र्हा. आन इमानात चडा. न्हायतर आसं करा बाकीची मान्सं कशी चडत्यात त्ये अगुदर बगा आन तुमी बी तसच करा. रीजरवेशन हाय त्यामुऴं कायबी काळ्जी नाय. कुनी आपल्या शीटवर बस्ले की त्याला रीजरवेशन दावायचं आन उट हीत्नं सांगून पळवून लावायच.
म्या ठरीवलं की ज्ये काय हुईल त्ये बगायचं आन लोक करतील तसं करायचं दहीहान्डीची आयडीया भारी हुती...पन दहीहाडीला ढोली बाजा आसल तरच वर चडायला मज्जा येतीय. त्यो ढोलीबाज्या कुट्नं आनायचा.
म्या बायली बरुबर इमानाच्या श्टॅन्डावं येरपुर्टावर ग्येलु.
यका हाता गटूडं आन येका हातात फिरकीचा तांब्या. माझ्याकड बघून लोक काय बाय हासत हुती. येक जन तर माज्या पायाबी पड्ला. म्या त्येला कोन्तातरी टीवी वरचा बाबा वाट्लु.
आसो.
इमानात बसायच्या अगुदर वळकटी येका बाईने मागून घेत्ली. आन घेतली वळकटी ती परत द्यायची सोडून तीने ती एका गिरणीच्या पट्ट्यावर ठेऊन दिली. अचानक गिरणी चालू झाली आन ती वळकटी आत मशीनीत गेल्यी..... त्या वळकटीत माजी गायछाप ची पुडी हुती ती जर कोन्च्या पिठात मिक्स झाली तर काय खर नाय गिरणीवाल्यांचं खातय मार गिर्हाईकाचा.....
म्या म्हन्लं आरं अर आरं.... ती बाय म्हन्ली मिळल हो वळकटी तुमाला इमानात. चांगली शिकल्याली मान्स आस कसं वागत्या काय ठाव.
पर यवड्या शिकलेल्या बाईअवर इस्वास दावायचा नाय तर मग गावच्या सरपंचावर दावायचा काय?
म्या इमान पकडायला म्हनून आत ग्येलो. बगतु तर काय मला एका बशीत बसवलं. म्या म्हन्लो बी की म्या इमानाची तिकटी काढल्यात बशीची नाय.
मला कोनतरी म्हन्लं की ही बस इमानाजवळ घीऊन जाती आन तितं ग्येल्यावर इमानात बसायच.
रस्त्यात विमानातून शरीराचा कुठलाही भाग बाहेर काढू नये. अशी एक पाटी बी हुती.
बशीत बस्ल्यावर लै धम्माल आली. इमानात आम्हाला वाहून नेणार्या बशीचा डायवर इमान कुठे लावल हेच विसरला होता.
सगळा इमानतळ इथून तिथून पालथा घातला तेंव्हा कुठे एका कोपर्यात ते बोइंग इमान लपून बसलेले सापडले.
त्या इमानात आमची शीट वरच्या मजल्यावर हुती. सामान वगेरे खालच्या मज्ल्यावर हुतं
ह्ये मंजे यश्टीच्या आगदी उलटच. तिथे टपावर सामान ठीवत्या आन मान्सं खाली बसत्यात हितं उल्टच हुतं
वरच्या माळ्यावर जायाला इमानाला स्वतःचे जिने नव्हते. त्यामुळे आगीच्या बंबाच्या शिडी वापारली हुती.
आमी वर ग्येलो. आत सगळ वोल्वो बशीसारखच हुतं फक्त कोणी घुसाघुशी करत नव्हतं यवडच. आख्खं इमान फुल्ल रीजरवीशन केल्याल्या लोकांचच हुतं
येक बी प्याशींजर उबा नव्हता की दारात पेपरच्या घडीवर बस्ल्याला नव्हता
आत बसल्यावर तर आणखी मज्जा आली . इमानाच्या डायवरने इतक्या जोर्रात बुंगाट इमान चालवले की एका स्पीडब्रेकरवरून ते एकदम ते ढगातच उडाले.
आपण गाडीत बसतो तेंव्हा डायवर आन त्येच्या शेजारचाच फक्त कंबरेला पट्टे बांधतात. हिते सगळ्या प्याशींजराना पट्टे बांदायला सांगितले. माझ्या शेजार्याने तर लै भारी पट्टा बांधला त्या मावशीने तर शेजारी बसलेल्या माणसाच्या पांटीच्या पट्ट्याचे एक टोक पलीकडच्या माणसाच्या शीटबेल्टाच्या बकलात खुपसले.
दोघे बी सगळा प्रवासभर पाठवाकवून बसले होते. त्या दोघाना बी सरळ होता येत नव्हते.
......
पोष्टाच्या कार्डावर किती ल्हिनार.....
फुडचा र्हायल्याला प्रवास फुडच्या कार्डावर......
तुमचाच इजुभाऊ सातारकर.
ता. क. ल्हिनाराचा वाचनारास णमस्कार.
विजुभाऊ गुर्जी.
( वर्गशिक्षक दुसरी ब.
सा ए सो ची पूर्व माध्यमीक परशाला०)
प्रतिक्रिया
5 Jan 2010 - 11:31 pm | मी-सौरभ
इमानात बसायच्या अगुदर वळकटी येका बाईने मागून घेत्ली. आन घेतली वळकटी ती परत द्यायची सोडून तीने ती एका गिरणीच्या पट्ट्यावर ठेऊन दिली. अचानक गिरणी चालू झाली आन ती वळकटी आत मशीनीत गेल्यी..... त्या वळकटीत माजी गायछाप ची पुडी हुती ती जर कोन्च्या पिठात मिक्स झाली तर काय खर नाय गिरणीवाल्यांचं खातय मार गिर्हाईकाचा.....
=)) =)) =)) =)) =))
-----
सौरभ :)
5 Jan 2010 - 11:31 pm | मी-सौरभ
इमानात बसायच्या अगुदर वळकटी येका बाईने मागून घेत्ली. आन घेतली वळकटी ती परत द्यायची सोडून तीने ती एका गिरणीच्या पट्ट्यावर ठेऊन दिली. अचानक गिरणी चालू झाली आन ती वळकटी आत मशीनीत गेल्यी..... त्या वळकटीत माजी गायछाप ची पुडी हुती ती जर कोन्च्या पिठात मिक्स झाली तर काय खर नाय गिरणीवाल्यांचं खातय मार गिर्हाईकाचा.....
=)) =)) =)) =)) =))
-----
सौरभ :)
5 Jan 2010 - 11:42 pm | jaypal
बुंग दिसतया. झोपल्यावर बुंग अन उठल्यावरबी बुंग दिसतया.
)

अन काय वो, हावेत वळसा मरताना डायवर हात भइर काडीत व्हता की इंडीकेटर व्हता बुंगाला? (वर हावतल्या हावत टायर पंक्चर झाल तर काय वो?
लै भारी लिवता राव तुमी. म्होरल्या टायमाला फोटु काढाया बोलवा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
6 Jan 2010 - 4:10 am | पाषाणभेद
इजूभौ, लय दिसानी आपल्या गाववाला भेट्ला. लय आनंद झाला पगा. गाववाल्या मान्सान परगती केल्यान लय भारी वाटूं र्हायलय. म्होरल्या टायमाला आंत्रदेशी पत्रच लिवा. डायरेक आमालाच लिवा. मास्तर लय बाराच हाय. निट वाचत तर नाय, पन त्याच्या मनाचच वाचून सांगत.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
6 Jan 2010 - 10:37 am | पर्नल नेने मराठे
बगतु तर काय मला एका बशीत बसवलं. म्या म्हन्लो बी की म्या इमानाची तिकटी काढल्यात बशीची नाय.
=)) =)) =)) =))
चुचु
6 Jan 2010 - 10:46 am | विनायक प्रभू
पुढच्या भागात बंगळुरू च्या 'दहीहंडी" चे पण वर्णन येउ द्या.
कारभारणीला सांगुन दगा फटका होणार नाही ह्याची खात्री बाळगा.
6 Jan 2010 - 12:13 pm | sneharani
इमान फुल्ल रीजरवीशन केल्याल्या लोकांचच हुतं
येक बी प्याशींजर उबा नव्हता की दारात पेपरच्या घडीवर बस्ल्याला नव्हता.
=)) =)) =))
=)) =))
=))
6 Jan 2010 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हहपुवा झाली. :)
>>तहानलाडु भूक लाडु आन काय काय दिलं
धम्मक लाडू, बेसनलाडू न्यायचे होते ना बांधून... ;)
विजुभौ, आमाला काय योग नाय आला अजून इमानात बसाचा.
येईन तव्हा आमीबी तुमच्यासारखाच अनुबव लिवू. :)
-दिलीप बिरुटे
7 Jan 2010 - 12:51 pm | सुमीत भातखंडे
हा हा हा!
मस्त.
7 Jan 2010 - 6:03 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्तच.
7 Jan 2010 - 9:24 pm | प्रकाश घाटपांडे
आमाला बी ईमायनात बस्ल्याची स्वप्न पडायची! ईमायनीत मान्स कुट थुकत आसतीन! यष्टीवानी खिडकी वर करुन थुकत आसतीन तर मंग खालच्या मान्सांना पाउस पल्ड्यावानी ! हागाया मुताया लाग्ल्याव कुट जात आसतीन! का वरुनच ! प्यायला पानी कुट भेटत आसन अशे प्रश्न आमाल पडायच. दोन महिन्या पुर्वी पैल्या छुट ईमायनात बस्लो ब्वॉ तवा समाजल कि यकदम कोंबडीच्या पिसावानी हवेत जातुया समदी सोय अस्तीया! वाईन बी देत्यान म्हने परदेशात जाताना
अजुन बी एक स्वप्न आमाला कायम पडायच की डोंगरावरुन पळत पळत जाउन यकदम हवेत उडी घेतली कि आकाशात भुर्रर्र विहार. स्विमिंग मधली ब्रेस्ट स्ट्रोक मारले कि फुड फुड जातोय. खाली हात मारला की वरती जातोय. यकदम हनुमानावानी अज्जुक बी पडतय कवा कवा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
7 Jan 2010 - 9:34 pm | jaypal
"अजुन बी एक स्वप्न आमाला कायम पडायच की डोंगरावरुन पळत पळत जाउन यकदम हवेत उडी घेतली कि आकाशात भुर्रर्र विहार."
आपल स्वप्न ईथे पुरे होउ शकते http://www.flynirvana.com/
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
7 Jan 2010 - 9:58 pm | स्वाती२
=)) =)) =))