साहित्यः
- ४-५ बटन मश्रुम (मध्यम चिरुन)
- १ पिवळी झुकिनी (मध्यम चिरुन)
- ४-५ काड्या अस्पॅरॅगस (१" तुकडे करुन)
- १ वाटि मटारचे दाणे
- १ मध्यम आकाराचा कांदा (मध्यम चिरुन)
- ३-४ पाकळ्या लसणाच्या (बारिक चिरुन)
- १-२ काड्या इटालियन बेसिल
- ४-५ मोठे चमचे एक्स्ट्रॉ वर्जिन ऑलिव्ह ऑईल
- १ वाटि तांदुळ
- ६-८ वाटया वेजिटेबल स्टॉक
- २ चमचे कुकिंग बटर
- ५ मोठे चमचे व्हाईट वाईन (ऐच्छिक)
कृती:
- एका भांड्यात (२ मोठे चमचे) तेल गरम करुन त्यात लसुण थोडा परतुन घ्यावा
- लसुण परतल्यावर सगळ्या भाज्या (कांदा वगळुन) मध्यम आचेवर परतुन द्याव्या
- आच मंद करुन १० मिनीटे (अथवा भाज्या मऊ होउ पर्यंत) भांडे झाकुन ठेवावे
- परतलेल्या भाज्या बाजुला काढुन ठेवाव्या
- दुसर्या भांड्यात (३ मोठे चमचे) तेल गरम करुन त्यात कांदा परतुन घ्यावा
- कांदा मऊ होत आला कि त्यात तांदुळ टाकुन पारदर्शी होउ पर्यंत परतुन घ्यावा
- व्हाईट वाईन घालुन भात हलवुन घ्यावा (व्हाईट वाईन वापरणार असल्यास)
- तांदुळ पारदर्शी झाल्यावर, एक एक डाव असा वेजीटेबल स्टॉक घालावा आणि भात हलवत राहावे
- घातलेला वेजीटेबल स्टॉक मुरला कि अजुन एक डाव स्टॉक घालावा (भात होउ पर्यंत हि कृती चालु ठेवावी)
- भात होत आला कि, परतलेल्या भाज्या, कुकिंग बटर, बेसिलची पाने घालुन भात नीट हलवुन घ्यावा
हा भात गरमा गरमच छान लागतो. सर्व्ह करतांना, वरुन काळी मिरी आणि बेसिलची पाने घालुन द्यावा.
प्रतिक्रिया
29 Dec 2009 - 1:47 am | चिरोटा
मस्तच. करुन बघायला पाहिजे.झुकिनी/बेसिल नसले तर चवीत खूप फरक पडतो का?
भेंडी
P = NP
29 Dec 2009 - 1:55 am | पांथस्थ
विशेष फरक पडत नाहि. सगळि गम्मत स्टॉकच्या चवीवर आणि पेशंटली भात हलवण्यावर आहे :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 Dec 2009 - 2:03 am | स्वाती२
झुकिनी ऐवजी बेल पेपर वगैरे वापरु शकता. बेसिल शिवाय मजा नाही पण मिंटही छान लागते. तांदूळ मात्र या साठी वेगळा मिळतो तो वापरावा.
29 Dec 2009 - 2:51 pm | पांथस्थ
कालच बेल पेप्पर वाला रिसॉटो पण केला होता...अर्थात झुकिनी पण घातली होती :)
हे मात्र खरे...बेसिलचा सुगंध दरवळला म्हणजे भुक पण जरा चाळवतेच!
अर्बोरिओ का अश्याच काहिश्या नावाचा तांदुळ वापरतात...पण मला बेंगळूर मधे नाहि मिळाला...छोट्या आकाराचा कोणताहि तांदुळ वापरु शकता
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 Dec 2009 - 1:50 am | स्वाती२
मस्त दिसतोय. तुमचा पेशन्स कौतुकास्पद.
सारखा भात हलवणे प्रकार मला कंटाळवाणा वाटतो त्यामुळे मी कधी घरी करत नाही.
29 Dec 2009 - 1:58 am | लवंगी
बरेच दिवसांनी तुमची रेसीपी आली... नक्की करून पाहिन
29 Dec 2009 - 2:27 am | पाषाणभेद
पाकृती तर मस्तच आहे.
बाकी ते झुकिनी बिकिनी काय असते ते लगोलग सांगून टाका बॉ. ताटकळत ठेवू नका.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
29 Dec 2009 - 10:04 am | शाहरुख
ही घ्या झुकिनी
आणि बिकीनी...हॅ हॅ हॅ. त्यासाठीचे दुवे माहिती असतीलच ;-)
पाककृतीबद्दल पांथस्थांचे आभार..लवकरच अशा स्वरुपाची डीश हाटेलात खाल्ली जाईल :-D
29 Dec 2009 - 10:29 am | पर्नल नेने मराठे
8| हि तर काकडीची जुळी बहिण वाटतेय
चुचु
29 Dec 2009 - 7:24 am | नंदन
आणि समयोचित पाककृती. हिवाळ्यातल्या संध्याकाळी रिसोटो आणि सोबतीला तिलापियासारखा मासा हे तर परफेक्ट समीकरण.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
29 Dec 2009 - 2:56 pm | पांथस्थ
एकदम बरोबर.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 Dec 2009 - 10:27 am | वल्लरी
नेहमी प्रमाणेच उत्तम पाकृ...
---वल्लरी
29 Dec 2009 - 2:27 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसते आहे, करुन पाहिन.
स्वाती
29 Dec 2009 - 6:48 pm | अनंत छंदी
बा पांथस्था
या चवदार पा.कृ. बद्दल अगदी थँक्यू म्हणजे अगदी थँक्यूच! :)
29 Dec 2009 - 7:02 pm | धमाल मुलगा
एकुणातच मश्रुम मला फारसं आवडत नाही पण पाकृ. लय भारी दिसतीये.....
मश्रुम घालायचं नसेल तर त्याबदली काय घालावे लागेल?
अवांतर: ह्यासोबत कोणती वाईन चांगली लागेल ह्याचा विचार करतोय! :)
29 Dec 2009 - 9:49 pm | पांथस्थ
मश्रुम ऐवजी ढोबळी मिरची, मटार, घेवडा पण वापरता येईल...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 Dec 2009 - 9:58 pm | धमाल मुलगा
मग जमलं :)
मटार ढोबळी मिरची लै बेश्ट :)
आता वाईन कोंची चांगली लागेल तेही सांगा ना :)
29 Dec 2009 - 10:48 pm | पांथस्थ
शक्यतो व्हाईट वाईन...पण असा काहि नियम नाहि....
(इंडीयन मधे सुला वाईनरीजची 'सातोरी' (रेड) एकदम A1 आहे....)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
30 Dec 2009 - 6:22 pm | वेताळ
खायला देखील मस्तच लागत असणार.वाईन वापरावीच लागते का?
वेताळ
31 Dec 2009 - 12:38 am | पांथस्थ
>> ५ मोठे चमचे व्हाईट वाईन (ऐच्छिक)
बाय द वे...काळानुसार वाईनची चव आणि किंमत दोन्ही वाढतात त्यामुळे वाईन न वापरता तशीच ठेवली तर नंतर किंमतहि जास्त येइल =))
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
3 Jan 2010 - 10:00 pm | मिना भास्कर
8| झुकिनी पिवळी पण असते हे प्रथम ऐकते आहे. वर फोटोत दाखव्ल्या प्रमाणे हिरवी असते हे माहीत आहे पण पिवळी झुकिनी नाही कुठे पाहीली, अगदी युरोप मधे ही.
4 Jan 2010 - 10:10 pm | पांथस्थ
इथे अनेक बघायला मिळतील
भारतात मिळते बुवा. बघायलाहि आणि खायलाही...मेरा भारत महान :)
-(पिवळी झुकिनी प्रेमी) पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
14 Jan 2010 - 9:33 pm | मीनल
इथे वाचून मी केला हा राईस.
अल्टिमेट झाला.
खाण्याशिवाय राहवेना. म्हणून सुरू केला खायला आणि संपला देखिल.
फोटो नेक्स टाईम.
मीनल.