मश्रुम अॅन्ड झुकिनी रिसॉटो
साहित्यः
- ४-५ बटन मश्रुम (मध्यम चिरुन)
- १ पिवळी झुकिनी (मध्यम चिरुन)
- ४-५ काड्या अस्पॅरॅगस (१" तुकडे करुन)
- १ वाटि मटारचे दाणे
- १ मध्यम आकाराचा कांदा (मध्यम चिरुन)
- ३-४ पाकळ्या लसणाच्या (बारिक चिरुन)
- १-२ काड्या इटालियन बेसिल
- ४-५ मोठे चमचे एक्स्ट्रॉ वर्जिन ऑलिव्ह ऑईल
- १ वाटि तांदुळ
- ६-८ वाटया वेजिटेबल स्टॉक
- २ चमचे कुकिंग बटर
- ५ मोठे चमचे व्हाईट वाईन (ऐच्छिक)
- एका भांड्यात (२ मोठे चमचे) तेल गरम करुन त्यात लसुण थोडा परतुन घ्यावा
- लसुण परतल्यावर सगळ्या भाज्या (कांदा वगळुन) मध्यम आचेवर परतुन द्याव्या
- आच मंद करुन १० मिनीटे (अथवा भाज्या मऊ होउ पर्यंत) भांडे झाकुन ठेवावे
- परतलेल्या भाज्या बाजुला काढुन ठेवाव्या
- दुसर्या भांड्यात (३ मोठे चमचे) तेल गरम करुन त्यात कांदा परतुन घ्यावा
- कांदा मऊ होत आला कि त्यात तांदुळ टाकुन पारदर्शी होउ पर्यंत परतुन घ्यावा
- व्हाईट वाईन घालुन भात हलवुन घ्यावा (व्हाईट वाईन वापरणार असल्यास)
- तांदुळ पारदर्शी झाल्यावर, एक एक डाव असा वेजीटेबल स्टॉक घालावा आणि भात हलवत राहावे
- घातलेला वेजीटेबल स्टॉक मुरला कि अजुन एक डाव स्टॉक घालावा (भात होउ पर्यंत हि कृती चालु ठेवावी)
- भात होत आला कि, परतलेल्या भाज्या, कुकिंग बटर, बेसिलची पाने घालुन भात नीट हलवुन घ्यावा
वाचने
8613
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
मस्तच
मस्तच. करुन बघायला पाहिजे.झुकिनी/बेसिल नसले तर चवीत खूप फरक पडतो का?
भेंडी
P = NP
In reply to मस्तच by चिरोटा
नाहि...
विशेष फरक पडत नाहि. सगळि गम्मत स्टॉकच्या चवीवर आणि पेशंटली भात हलवण्यावर आहे :)
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
In reply to मस्तच by चिरोटा
झुकिनी
झुकिनी ऐवजी बेल पेपर वगैरे वापरु शकता. बेसिल शिवाय मजा नाही पण मिंटही छान लागते. तांदूळ मात्र या साठी वेगळा मिळतो तो वापरावा.
In reply to झुकिनी by स्वाती२
झुकिनी
झुकिनी ऐवजी बेल पेपर वगैरे वापरु शकता.कालच बेल पेप्पर वाला रिसॉटो पण केला होता...अर्थात झुकिनी पण घातली होती :)
बेसिल शिवाय मजा नाही पण मिंटही छान लागते.हे मात्र खरे...बेसिलचा सुगंध दरवळला म्हणजे भुक पण जरा चाळवतेच!
तांदूळ मात्र या साठी वेगळा मिळतो तो वापरावा.अर्बोरिओ का अश्याच काहिश्या नावाचा तांदुळ वापरतात...पण मला बेंगळूर मधे नाहि मिळाला...छोट्या आकाराचा कोणताहि तांदुळ वापरु शकता - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
मस्त
मस्त दिसतोय. तुमचा पेशन्स कौतुकास्पद.
सारखा भात हलवणे प्रकार मला कंटाळवाणा वाटतो त्यामुळे मी कधी घरी करत नाही.
मस्त पाकक्रूती
बरेच दिवसांनी तुमची रेसीपी आली... नक्की करून पाहिन
पाकृती तर
पाकृती तर मस्तच आहे.
बाकी ते झुकिनी बिकिनी काय असते ते लगोलग सांगून टाका बॉ. ताटकळत ठेवू नका.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करीIn reply to पाकृती तर by पाषाणभेद
ही घ्या
ही घ्या झुकिनी
आणि बिकीनी...हॅ हॅ हॅ. त्यासाठीचे दुवे माहिती असतीलच ;-)
पाककृतीबद्दल पांथस्थांचे आभार..लवकरच अशा स्वरुपाची डीश हाटेलात खाल्ली जाईल :-D
आणि बिकीनी...हॅ हॅ हॅ. त्यासाठीचे दुवे माहिती असतीलच ;-)
पाककृतीबद्दल पांथस्थांचे आभार..लवकरच अशा स्वरुपाची डीश हाटेलात खाल्ली जाईल :-Dमस्त
आणि समयोचित पाककृती. हिवाळ्यातल्या संध्याकाळी रिसोटो आणि सोबतीला तिलापियासारखा मासा हे तर परफेक्ट समीकरण.
In reply to मस्त by नंदन
+१
एकदम बरोबर.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
welcome back ....
नेहमी प्रमाणेच उत्तम पाकृ...
---वल्लरी
मस्त...
मस्त दिसते आहे, करुन पाहिन.
स्वाती
थँक्यू बरं का!
बा पांथस्था
या चवदार पा.कृ. बद्दल अगदी थँक्यू म्हणजे अगदी थँक्यूच! :)
लय भारी!
एकुणातच मश्रुम मला फारसं आवडत नाही पण पाकृ. लय भारी दिसतीये.....
मश्रुम घालायचं नसेल तर त्याबदली काय घालावे लागेल?
अवांतर: ह्यासोबत कोणती वाईन चांगली लागेल ह्याचा विचार करतोय! :)
In reply to लय भारी! by धमाल मुलगा
मश्रुम
मश्रुम ऐवजी ढोबळी मिरची, मटार, घेवडा पण वापरता येईल...
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
पाकृ झक्कास दिसते आहे.
खायला देखील मस्तच लागत असणार.वाईन वापरावीच लागते का?
वेताळ
In reply to पाकृ झक्कास दिसते आहे. by वेताळ
>> ५ मोठे
>> ५ मोठे चमचे व्हाईट वाईन (ऐच्छिक)
बाय द वे...काळानुसार वाईनची चव आणि किंमत दोन्ही वाढतात त्यामुळे वाईन न वापरता तशीच ठेवली तर नंतर किंमतहि जास्त येइल =))
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
झुकिनी पिवळी???????????
8| झुकिनी पिवळी पण असते हे प्रथम ऐकते आहे. वर फोटोत दाखव्ल्या प्रमाणे हिरवी असते हे माहीत आहे पण पिवळी झुकिनी नाही कुठे पाहीली, अगदी युरोप मधे ही.
In reply to झुकिनी पिवळी??????????? by मिना भास्कर
काय बोलता?
झुकिनी पिवळी पण असते हे प्रथम ऐकते आहे. वर फोटोत दाखव्ल्या प्रमाणे हिरवी असते हे माहीत आहे पण पिवळी झुकिनी नाही कुठे पाहीली,इथे अनेक बघायला मिळतील
अगदी युरोप मधे ही.भारतात मिळते बुवा. बघायलाहि आणि खायलाही...मेरा भारत महान :) -(पिवळी झुकिनी प्रेमी) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश... माझी छायाचित्रे - फ्लिकर
अल्टिमेट
इथे वाचून मी केला हा राईस.
अल्टिमेट झाला.
खाण्याशिवाय राहवेना. म्हणून सुरू केला खायला आणि संपला देखिल.
फोटो नेक्स टाईम.
मीनल.
मस्तच
In reply to मस्तच by चिरोटा
नाहि...
In reply to मस्तच by चिरोटा
झुकिनी
In reply to झुकिनी by स्वाती२
झुकिनी
मस्त
मस्त पाकक्रूती
पाकृती तर
In reply to पाकृती तर by पाषाणभेद
ही घ्या
In reply to ही घ्या by शाहरुख
हि तर
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
+१
welcome back ....
मस्त...
थँक्यू बरं का!
लय भारी!
In reply to लय भारी! by धमाल मुलगा
मश्रुम
In reply to मश्रुम by पांथस्थ
वा वा...
In reply to वा वा... by धमाल मुलगा
शक्यतो
पाकृ झक्कास दिसते आहे.
In reply to पाकृ झक्कास दिसते आहे. by वेताळ
>> ५ मोठे
झुकिनी पिवळी???????????
In reply to झुकिनी पिवळी??????????? by मिना भास्कर
काय बोलता?
अल्टिमेट