श्री० मोहन भागवत यांच्या २०२१ पासून आजपर्यंतच्या भाषणांचा ए०आय० च्या मदतीने सारांश काढायचा प्रयत्न केला. उद्देश असा की त्यातून विश्वगुरु, म्हासत्ता इ० गाजरांपर्यंत पोचण्यासाठी काहीतरी ठोस मार्ग किंवा कार्यक्रम मिळावा. पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत. वर दिलेल्या शब्दढगामध्ये "राम" हा शब्द ठळकपणे दिसतोय पण पेटंट हा शब्द अजिबात सापडत नाहीये (तुम्हाला दिसला तर मला नक्की सांगा).
मार्च २०११ मध्ये केलेल्या भाषणात ते म्हणतात की Sanatan Dharma is the only force that can save rhe world from vagaries, catastrophes and disasters, Dr Mohan Bhagwat said.......
Read more at: https://organiser.org/2021/03/11/134581/bharat/only-sanatan-dharma-can-h...
पण मग प्रश्न पडला की हे नक्की कसे साधणार? काळाची चाके उलटी फिरवून? कॉर्पोरेट जगात अॅक्शनप्लॅन नावाची संकल्पना असते. तसा पण इथे काही दिसत नाही.
प्रतिक्रिया
27 Aug 2025 - 1:00 pm | कंजूस
होणार होणार धीर धरा. भारताचे स्वतःचे ट्विटर, गूगल येणार. सर्वर येणार .
27 Aug 2025 - 6:38 pm | अमरेंद्र बाहुबली
पण तरूणांची उत्पादकता, कल्पकता आणि नोकर्यांची निर्मिती याविषयी ते काहीही बोलत नाहीत.
त्यांचा उद्देश वेगळा आहे, संघातील लोक आपली मूले विदेशात पाठवतात नी इतरांच्या मुलाना इथे देशसेवेच्या नावाखाली नको टू उद्योग करायला लावतात ज्यात देशाचे काडीचेही हित नसते!
1 Sep 2025 - 10:31 am | माईसाहेब कुरसूंदीकर
ही ढोंगबाजी अनेक वर्षे चालु आहे. गेल्या १५/२० वर्षात स्व्तःच्या मुलांना बारावीनंतरच बाहेर(अमेरिका/ब्रितन)ला शिकायला पाठवण्यात भाजपाचे नेते आघाडीवर आहेत.
मध्यप्रदेशचे माजी मुख्य्मंत्री 'मामाजी' शिवराज सिंग चौहान ह्यांचा एक पुत्र बारावी नंतरच शिक्षणसाठी बाहेर.
जयशंकर ह्यांना तीन मुले. एक जण वॉशिंग्टनमध्ये तर एक लॉस एंजेलिसमध्ये.
गुजरातचे एक दिवंगत मुख्यमंत्री- एक मुलगी लंडनमध्ये स्थायिक , मुलगा सॅन डिएगोमध्ये.
अजित दोवालांचे दोन्ही पुत्र भारताबाहेरच आहेत.
गेल्यावर्षी पंकजा मुंडे ह्यांनीही स्थानिकांना 'जय श्रीराम' करायला लावुन स्व्तःच्या मुलाला बारावी नंतर अमेरिकेत शिकायला पाठवले.. असे वाचले होते.
मोहनरावांनी आधी न्यु जर्सी/लंडन्/बे एरिया येथे जावे आणि तेथील परिवारातील लोकांना भारतात आणावे.
1 Sep 2025 - 2:17 pm | अमरेंद्र बाहुबली
माई इतक्या दूर कशाला जायचे? अनेक लोक आहेत विदेशात बसून देशात हिंदुनी काय करायला हवे ह्याचे पो टाकत असतात! इतकेच देशप्रेम नी हिंदुत्व उतू चाललेय तर ये की म्हणा इकडे!
3 Sep 2025 - 9:14 am | युयुत्सु
मोदी-शहांवर सतत खोटं बोलण्याचा आरोप होत असतो. त्यातील तथ्य मी कधी तपासले नाही. पण अलिकडे लक्षात आलेली एक ठळक गोष्ट म्ह० हा आरोप जर खरा असेल तर त्याची मुळे त्यांच्या संघ-संस्कारात आहेत याची आता खात्री पटली आहे.
संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात. खोटं उघडं पडलं सतत गोलपोस्ट हलवत राहायचे इतकंच त्यांना येतं. अलिकडे पंचाहत्तरीच्या निवृत्तीवर घेतलेला यु-टर्न हे असंच एक हलवलेलं गोलपोस्ट...
3 Sep 2025 - 1:25 pm | अमरेंद्र बाहुबली
संघाचे अनेक तळागाळातले कार्यकर्ते अत्यंत निखालस खोटं बोलत असतात.
+1
त्यांना स्वातंत्र्यलढावेळी संघ किथे होता विचारले की पळ काढतात! :)
3 Sep 2025 - 5:03 pm | स्वधर्म
ही मुलाखत पहा. संघ, त्यांची ध्येयं, त्यांचे लोक... या विषयावरच आहे.
RSS 100 Years : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्व आणि विवेकानंदांच्या विचारांवर डॉ. दाभोळकर म्हणतात
3 Sep 2025 - 5:36 pm | अमरेंद्र बाहुबली
बोलाचीच कढी नी बोलाचाच भात!
3 Sep 2025 - 6:29 pm | युयुत्सु
अत्यंत मर्मभेदक! विवेकानंदांची ही बाजू कधीच कळली नव्हती. धन्यवाद!
12 Sep 2025 - 6:19 pm | मारवा
विवेकानंद दांभिक होते.
अमेरिकेने विवेकानंदां वर मोठा प्रभाव पाडला.
अमेरिकन संस्कृती ने विवेकानंदाना फार प्रभावित केले.
मात्र अस्सल भारतीय दांभिकता ते सोडू शकले नाही.
3 Sep 2025 - 2:04 pm | राजेंद्र मेहेंदळे
"जाणकारांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत"
3 Sep 2025 - 3:40 pm | नावातकायआहे
गायछाप चूना पुडी घेउन, एक बार लावून बसलो आहे.
उडवा धुराळा!
3 Sep 2025 - 3:48 pm | अभ्या..
थुंकून टाका,
काय होणार नाही.
.
5 Sep 2025 - 12:52 pm | विवेकपटाईत
एक मस्त विनोदी लेख आणि प्रतिसाद वाचताना मजा आली.
6 Sep 2025 - 6:19 pm | युयुत्सु
श्री० पटाईत,
मुद्देसूद प्रतिवाद केला असता तर जास्त आवडले असते. पण तुमच्याकडे मुद्दे नसावेत असे वाटते.
12 Sep 2025 - 7:54 am | युयुत्सु
परत गोलपोस्ट हलवलेले आहे. पण या व्यक्तव्यात बिट्विन द लाईन्स बरेच काही आहे.
आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने बुधवार को कहा कि भारत का चरित्र सेवा या निस्वार्थ सेवा में निहित है।भारत की यही भावना आज की महाशक्तियों की तरह बनने के बजाय तटस्थता से विश्व की सेवा करने में विश्वास रखता है।उन्होंने इस बात पर खेद व्यक्त किया कि विज्ञान और ज्ञानके अन्य क्षेत्रों में प्रगति और मानव के पास सब कुछ होने के बावजूद दुनिया में अभी भी झगड़े जारी हैं।
https://www.jagran.com/news/national-india-will-not-become-like-today-su...
रघुवंशाच्या २ र्या सर्गात 'प्रसाद चिन्हानि पुरः फलानि' असं एक वचन आहे. पुढे काय घडणार आहे याची चिन्हे अगोदरच दिसू लागतात. संघाला अभिप्रेत असलेली भारतीय समाजावरील पकड घेता आली नसल्याने हे वैफल्योद्गार बाहेर पडले आहेत. कालबाह्य सिंद्धातांची पुनःर्स्थापना करायचे प्रयत्न फसले आहेत आणि फसणार आहेत.
नुकताच ३ हिंदू धर्मांचार्यांमधला (रामभद्राचार्य, प्रेमानंद, अविमुक्तेश्वरानंद) पातळी सोडून केलेल्या टिपण्यामुळे निर्माण झालेला वाद याचा पुरेस्स निदर्शक आहे.
12 Sep 2025 - 12:08 pm | सोहम७
मी काही तज्ञ नाही
पण 2025 मध्ये भारत सरकारने विकसित भारत 2047 (विकसित भारत@2047) या दृष्टीसाठी महत्त्वाचे पावले उचलली आहेत. या योजनांचा उद्देश 2047 मध्ये स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षी भारताला विकसित राष्ट्र बनवणे आहे.
महत्त्वाचे टप्पे आणि उपाय
पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर), तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, आणि शाश्वत विकास यावर केंद्रित गुंतवणूक
आर्थिक वाढीसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी सर्व विभागांमध्ये धोरणात्मक सुधारणा
ऊर्जा सुरक्षा, हरित ऊर्जा (ग्रीन एनर्जी), आणि शहरी–ग्रामीण विकास यावर भर
युवक, महिलावर्ग, शेतकरी आणि गरीब घटक यांचा उत्थान हे केंद्रस्थानी
नागरिकांची सक्रिय भागीदारी वाढवण्यासाठी ‘मायगव्ह’सारखे उपक्रम
उद्दिष्टे
2047 पर्यंत $30 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था साध्य करणे
100% स्वच्छ ऊर्जा आणि स्वयंपूर्णता (आत्मनिर्भर भारत) साध्य करणे
अगस्त 2025 मध्ये पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर राजीव गौबा व. टी. व्ही. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली दोन उच्चस्तरीय सुधारणा समित्या स्थापन केल्या गेल्या आहेत. या समित्यांनी विकसित भारत 2047 योजनेसाठी पुढील पिढीच्या सुधारणांवर अंतर्गत बैठका सुरू केल्या आहेत
प्राथमिकतेने सुधारणा आवश्यक असलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत
- सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या चुका किंवा गैरव्यवहारांसाठी जबाबदार ठरविण्याच्या यंत्रणांना अधिक मजबूत करणे हे पारदर्शक आणि परिणामकारक शासनासाठी अत्यंत आवश्यक आहे.उदा. मुंबईत नवीन रस्ते केवळ २-३ दिवसांमध्येच वापरण्यासयोग्य राहत नाहीत. हे मुद्दे नक्कीच सोडवावे लागतील.
न्यायिक सुधारणा: प्रणालीगत विलंब, न्यायिक क्षमतेत वाढ, प्रक्रियांना आधुनिक स्वरूप देणे आणि प्रकरणांची प्रतीक्षा कमी करून वेळोवेळी न्याय मिळवून देणे ही महत्त्वाची चालू आव्हाने आहेत.
मी कट्टर भाजप समर्थक नाही, पण शेवटी केवळ भाजपच या सुधारणा करण्यास सक्षम आहेत्यांना त्या साठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल.
12 Sep 2025 - 12:22 pm | अमरेंद्र बाहुबली
सरकार १०० स्मार्ट सिटी देखील बनवणार होते, काय झाले त्याचे? त्या योजनेची तिरडी उठली. जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे.
12 Sep 2025 - 6:47 pm | अभ्या..
स्मार्ट सिटी... वॉव
आमचे सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत येते बरं का. परवाच मुख्यमंत्र्यानी शब्द दिलाय की सोलापुरात आयटी हब चालू करु. प्रशासनाकडून जागेचा शोध चालू आहे. सोलापुरातूनच ६९०० इंजिनिअर दरवर्षी बाहेर पडतात मग आयटी हब होणारच सोलापुरात.
ह्या हबात नोकर्यांचा सुकाळ असणार आहे. इच्छुकांनी तयारी ठेवावी बरं का.
.
काय तयारी करताल?
कमीत कामी १० निळे बॅरल्स प्लास्टीकचे (सोलापुरात पाणी दर ५ दिवसांनी येते बरं का. आणि हे गेले १० वर्षे सलग. उन्हाळा पावसाळा असो की कीहीही आणि सर्व शहरात)
.
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक?
12 Sep 2025 - 10:50 pm | अमरेंद्र बाहुबली
ओह! देवाभाऊ अश्या नावाचे काही ब्यानार लागले आहेत का सोलापुरात? त्याच्याकडे पाहून दिवस ढकला. :)
13 Sep 2025 - 9:17 am | युयुत्सु
ह्या हबापेक्षा टब द्या म्हणाव.....काय कॉम्प्युटरातून पाणी काढणातरेत का कुणास ठाऊक?
सोलापुरात कोकणातली भाषा बघून आनंद झाला!!
13 Sep 2025 - 9:23 am | युयुत्सु
जो पर्यंत सुशिक्षित लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हा देश विकसित होणे अशक्य आहे.
सुशिक्षित लोक सत्तेत येऊन फार चमत्कार होईल असे वाटत नाही. कारण अडाणी जनता सुशिक्षित, विवेकी जनतेला संख्येच्या जोरावर पराभूत करते. कडवट सत्य असे आहे की जो पर्यंत अडाणी जनता मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन करत आहे तो पर्यंत हे दुष्टचक्र असेच चालू राहणार! त्यात सुशिक्षित, विवेकी लोकांमध्ये लग्न नको आणि मुले नकोत हा ट्रेण्ड वाढत आहे. हे सर्वात जास्त गंभीर आहे. पण हे समजून घ्यायची क्षमता आहे कुणाकडे?