नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
10 Sep 2025 - 8:43 am

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र
================

-- राजीव उपाध्ये

डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती).
मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला.

खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते. फिल्म सोसायटी ही बॉलीवुड आणि हॉलिवुडचे लोकप्रिय चित्रपट दाखवायची तर फिल्मक्लब चे चित्रपट ’कलात्मक’ (वास्तवाचे यथार्थदर्शन करणारे) असत. बहुतेक चित्रपट युरोपात तयार झालेले असल्यामुळे त्यात मंचकदृष्ये, मैथुन, नग्नता याची रेलचेल असे. पण ते अतिरंजित नसत. फिल्मक्लब मध्ये १८+ वयाच्या व्यक्तीनाच प्रवेश मिळत असे.

मी (अर्थातच) फिल्मक्लबचा सभासद होतो.

एकदा आमच्या फिल्मक्लबमध्ये एक जर्मन चित्रपट आला होता. ते एक नृत्यनाट्य होते. या चित्रपटात ३०-४० कलाकार प्रथमपासून शेवटपर्यंत पूर्ण नग्न होते. पण त्यात कुठे ही विकृत उत्तेजकपणा नव्हता. या चित्रपटाने माझ्या सोवळ्या (आणि कोवळ्या) मानसिकतेला धक्का बसून फ्यूज उडाला.

माझ्या संस्कृतीने निषिद्ध ठरवलेलं आचरण/वर्तन दुसर्‍या एका, विशेषत: पुढारलेल्या, संस्कृतीत नॉर्मल असू शकतं ही जाणीव मोठी मानसिक उलथापालथ घडविणा्री होती. कारण भारतीय संस्कृती नग्नतेच्या बाबतीत अतिशय दुटप्पी आहे. धार्मिकतेच्या वेष्टनातील नग्नता भारतीय स्वीकारतात, तिच्यापुढे लोटांगण घालतात. तर खजुराहो सारख्या ऐतिहासिक वारशातील नग्नता अभिमानाने चघळतात. पण उर्फी जावेदला मात्र ते स्वीकारू शकत नाहीत.

जगभरच्या नग्नतेचा निरीक्षणात्मक अभ्यास चालू केल्यावर काही ठळक गोष्टी लक्षात आल्या. जगात किमान डझनभर नग्नतेशी संबंधीत ’उत्सव’ आहेत. भारतात फक्त कुंभमेळ्यात अशी उत्सवी-नग्नता दिसते. पण ती नागासाधुंपर्यंतच मर्यादित आहे. नागासाधू "विकारांवर विजय मिळविण्यासाठी" अघोरी उपायांचा अवलंब का करतात, असा एक मला पडलेला प्रश्न आहे. याचं कारण असं की जगात अनेक समुद्र किनार्‍यावर विशेषत: न्यूडबीचेसवर समुद्रस्नानाचा आनंद घेणारे लोक बघितले की एक प्रश्न पडतो - नग्नतेने लैंगिक भावना/विकार उद्दीपित होत असतील तर न्यूडबीचवर सर्वात जास्त बलात्कार व्हायला हवेत. पण तसं होताना दिसत नाही. अगदी फ्रान्स मधल्या कॅप द’आग्द सारख्या मुक्त नग्नसंस्कृती जपणार्‍या शहरात पण राजरोस बलात्कार झाल्याचे ऐकायला मिळालेले नाही. पण जिथे स्त्रिला आजन्म बुरख्यात, नखशिखांत शालिनतेच्या ओझ्याखाली दबून ठेवलं जातं तिथे बलात्कार जास्त होतात. तात्पर्य असे की विकारांवर विजय मिळविण्यासाठी अघोरी मार्ग अवलंबायची गरज नसते. कदाचित एखादी गोष्ट मुबलकपणे उपलब्ध झाली की त्याती्ल नावीन्य संपते आणि आपोआप विकारांवर विजय मिळतो. सतत रक्तपात/मृत्यू बघणार्‍यांना मरणाची भीति उरत नाही, तसेच. त्यामुळे नग्नतेने लैंगिक गुन्ह्यांना उत्तेजन मिळते हे मला मान्य नाही.

तात्पर्य आपण भारतीय लोक नग्नतेबद्दलच्या दुटप्पी भूमिकेमुळे पूर्णपणे गंडलेलो आहोत. मला तर आजकाल नग्नतेमध्ये ’सवस्त्र’ आणि विवस्त्र असे दोन भेद करावेत असे वाटते. होय "सवस्त्र" नग्नता असू शकते. यात लाजेकाजेस्तव किंवा श्लील-अश्लीलतेच्या कल्पनांमुळे कपडे टाकून तर देता येत नाहीत. पण अंगसौष्ठ्वाचे प्रदर्शन करायची उर्मी/खुमखुमी जबरदस्त असते. कातडे पूर्ण झाकले तरी तंग कपड्यांनी सौष्ठव "नागडे" पडल्याने ही "सवस्त्र नग्नता" ठरते. विवस्त्र नग्नता स्वयंस्पष्ट आहे. त्यामुळे मला वाटते की सवस्त्र नग्नता, विवस्त्र नग्नतेपेक्षा जास्त उद्दीपक ठरू शकते.

समकालीन नग्नतेबद्दल आणखी बरेच लिहीण्यासारखे आहे. संधी मिळाली की लिहीनच...

मांडणीविचार

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2025 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषय चांगला. अजून समकालीन नग्नता
सवस्त्र, विवस्त्र सविस्तर चर्चा वाचायला आवडेल.

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

10 Sep 2025 - 10:29 am | युयुत्सु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद! नक्की लिहीन - सध्या सगळीकडे कपडे घालून पोहोण्याचा ट्रेण्ड बळावला आहे, मंदिरात घालायच्या पोषाखावरील निर्बंध असे अनेक विषय आहेत. या विषयावर लिहीताना उदा० किंवा पुरावे देण्यावर प्रचंड मर्यादा येतात. सध्या अर्धवट्/मंदबुद्धी लोकांची डोकी केव्हाही बिथरतात. आपण ज्या दृष्टीकोनातून एखाद्या विषयाकडे बघतो त्याकडे इतर व्यक्ती बघतीलच असे नाही. कारण ती क्षमता सर्वांच्यात विकसित होत नाही.

सध्या एक इण्ट्रेस्टींग पुस्तक वाचत आहे. त्यातले एक वाक्य मला खुप आवडले - "कम्युनिकेशन हॅपन्स ऑन लिसनर्स टर्म्स". विवेकी लोकांचा पराभव कशामुळे होतो हे यामुळे समजते.

युयुत्सु's picture

10 Sep 2025 - 11:03 am | युयुत्सु

Hadaka Matsuri,"Japan (multiple cities, main in Okayama)","Annual ""naked festival"" where thousands of men in loincloths compete for sacred sticks in a Shinto ritual for good luck."

Oblation Run,Philippines (university campuses),"Fraternity-run naked sprint to promote social issues, with participants masked and handing out roses."

Kumbh Mela,India (rotating sites),Massive religious gathering where holy men (sadhus) practice nudity as part of ascetic traditions during mass bathing rituals.

NATCON,Thailand,Naturist convention with social nudity activities at resorts.

World Naked Bike Ride (WNBR),Worldwide (multiple cities),"Global protest ride promoting body positivity, cycling, and environmental causes, with full or partial nudity encouraged."

Running of the Nudes,Spain (Pamplona),"PETA-organized naked run protesting bullfighting, held before the Running of the Bulls."

World Bodypainting Festival,Austria,"Week-long event with artists painting nude models, music, and workshops celebrating body art."

Blootgewoon! Festival,Netherlands,"Nudist festival with activities, music, and social nudity at a naturist park."

Naked Snow Sledding Championship,Germany, Annual competition where participants sled nearly nude in winter for prizes.

Nudefest,UK,"Week-long nudist festival with sports, entertainment, and camping."

Body and Freedom Festival,Switzerland, Urban nude art performances and interactions in public spaces.

Naturalis,Portugal, Nudist gathering with activities at a naturist site.

Roskilde Festival Naked Run,Denmark, "Nude race during a major music festival, with clothing-optional camping."

Nakukymppi,Finland,10km naked run event promoting naturism.

Yatan Rumi Naked Run,Argentina, Annual nudist marathon at a camping site.

Pilwarren Maslin Beach Nude Olympics,Australia, "Beach games and contests with nude participants, including ""best bum"" awards."

Zipolite Nudist Festival,Mexico," Multi-day event on a nude beach with music, yoga, and body-positive activities."

Ngatuhoa Naturist Annual Summer Camp,New Zealand, Week-long naturist camp with outdoor activities.

Burning Man,USA (Nevada), Radical self-expression festival in the desert where nudity is common.

Folsom Street Fair,USA (San Francisco), Leather and kink festival with public nudity and BDSM themes.

Fremont Solstice Parade,USA (Seattle), Summer solstice parade featuring painted naked cyclists.

Bay to Breakers,USA (San Francisco), Footrace with costumes and public nudity traditions.

Fantasy Fest,USA (Key West), "Street party with body paint, minimal clothing, and parades."

Heartland Naturist Festival,USA (Kansas City),Multi-day nudist event with workshops and social activities.

Noodstock,USA (Florida), Nudist music and activity festival at a resort.

Sentient Festival,USA (New York), Nudist park event with music and wellness themes.

Naked Pumpkin Run,USA (multiple locations), Halloween-themed naked run with carved pumpkins on heads.

No Pants Subway Ride,Worldwide (multiple cities), Annual prank event where participants ride public transit without pants.

International Skinny Dip Day,Worldwide, Global day for nude swimming to promote body acceptance.

Naked Gardening Day,Worldwide, Annual day encouraging nude gardening for naturism awareness.

गामा पैलवान's picture

10 Sep 2025 - 11:10 am | गामा पैलवान

युयुत्सु,

तात्पर्य आपण भारतीय लोक नग्नतेबद्दलच्या दुटप्पी भूमिकेमुळे पूर्णपणे गंडलेलो आहोत.

मी गंडलेलो नाही. खजुराहोचे नग्नता सूचक आहे. याउलट उर्फीचा नागडेपणा उद्दीपक आहे.

ठिणगी ( = उद्दीपन ) एकीकडे पडते आणि आग ( = बलात्कार ) दुसरीकडे लागते. हे टाळण्यासाठी बायकांनी सार्वजनिक ठिकाणी उत्तान कपडे परिधान करू नयेत.

आ.न.,
-गा.पै.

युयुत्सु's picture

10 Sep 2025 - 11:23 am | युयुत्सु

तुमची "सूचक" या शब्दाची व्याख्या कळायला मार्ग नाही. वर सविस्तरपणे चित्रित केलेला समूह-मैथून "सूचक" कसा मानायचा?

नग्नता वागवून नाट्य कसं काय साध्य होतं?

युयुत्सु's picture

10 Sep 2025 - 11:31 am | युयुत्सु

पुरावे देण्याला मर्यादा आहेत, ही घोषणा वर केलेली आहे.

विवेकपटाईत's picture

10 Sep 2025 - 5:11 pm | विवेकपटाईत

मुस्लिम आक्रांता येण्याआधी भारतात सुंदरता आणि नग्नता सामान्य बाब होती. चतुर्भाणी वाचल्यावर कळले भारतातील शहरी जीवन आजच्या युरोप सारखे होते.
आजचे म्हणाल तर स्विमिंग पूल मध्ये बिकनी घालून पोहणे नग्नता नाही.

एकांतात काही नाही घातले तरी चालू शकते. पण सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन फिरणे निश्चितच मानसिक विकृती आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये आधुनिक मुली अत्यंत तोडके कपडे घालून प्रवास करतात. किंवा अनेक जागेहून फाटकी जीन घालतात. आता भारी भीड मध्ये चढता उतरताना धक्के लागणार या शिवाय पर्स, बॅग इत्यादींचे कॉर्नर लागून शारीरिक इजा ही होते. फाटकी जीन मध्ये एकीची बॅग अटकली आणि तिच्या सोबत तीन-चार मुली ही उतरताना जमिनीवर पडल्या.

धार्मिक स्थळांची मर्यादा असते. त्यामुळे तिथे ड्रेस कोड पाहिजे.

याशिवाय स्कीन टाईट कपडे घालणार्‍यांनी त्यांच्या शरीर यष्टीचा विचार केला पाहिजे. मग लोक विचित्र नजरेने पाहणारच (स्त्री पुरुष दोन्ही ही). कपडे शारीरिक सुंदरता वाढविण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे.
कुठे किती कपडे घातले पाहीजे. हे ही कळले पाहिजे. बाकी उर्फी जावेद कमी कपडे घालून रील टाकून पैसा कमविते. त्यात काही ही गैर नाही.

एकांतात काही नाही घातले तरी चालू शकते. पण सार्वजनिक ठिकाणी नग्न होऊन फिरणे निश्चितच मानसिक विकृती आहे.
दिंगबर जैन साधू आणि नागा हिंदू साधू
यांना आपण वरील व्याख्ये पासून कसे दूर ठेवाल
हे पाहणे मनोरंजक ठरेल.

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2025 - 5:45 pm | चौथा कोनाडा

घट्ट घट्ट, फिट्ट फिट्ट
चर्चे साठी विषय
हिट्ट, हिट्ट

yrytu

अभ्या..'s picture

10 Sep 2025 - 6:01 pm | अभ्या..

नका ना असे फोटो टाकू.
ग्यानेश कुमारांना काय वाटेल?
क्या अपनी माताओं बेटियों सहित किसी भी मतदाता की फोटो को साझा करनी चाहिए क्या?

कृपया वैयक्तिक बदनामी/मानहानी होईल असा मजकूर टाकू नये ही विनंती...

नैसर्गिक काम इच्छेचे Suppression दमन हे स्प्रिंग सारखे काम.करते. जेवढे अनैसर्गिक दमन जास्त तितके विकृत रीतीने ते व्यक्त होण्याची धडपड नेणीव पातळीवर होत असते.
दमन केलेला काम हा सहजतेने सुंदरतेने व्यक्त होऊ शकत नाही. तो हिंसक,विकृत रीतीने अभिव्यक्त होत असतो.
उदाहरणार्थ
जे धार्मिक क्षेत्रातील cult मधील पुरुष ज्यांनी असे दमन केलेले आहे iskon आणि brahmakumari उदा. त्यांचे वर्तन abnormal झालेले असते. अतीव रागीट होणे अतीव प्रेमाचा पान्हा फुटणे अशा cycles मधून ते सतत फिरत असतात. एक कामेच्छा अतृप्त राहिल्याने आणिंत्याहून वाईट suppressed झाल्याने ते बिचारे एका सतत 24 तास 365 दिवस व्याकुळ desperate अवस्थेत जगत असतात. त्यांच्या शरीराच्या अस्वस्थ हालचाली ,बोलण्यात संताप,राग हा "सात्विक संताप" या नावाखाली निघत असतो. नैसर्गिक लैंगिकतेचे दमन केल्याने अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधी आणि हार्मोन्स मध्ये अनैसर्गिक बदल होत असतात. जे खूप वाईट असते. भारतात महिला स्वतःचे suppression मोठ्या प्रमाणात अनेक कारणांनी करत असतात. अनेक जण तर आपल्या शरीराला अशी काही गरजच नाही असे मानून जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. कुठेतरी accidentally मग अचानक त्यांना अरे आपल्या शरीरात इतक्या संवेदना होत्या,आहेत याची जाणीव होऊन चक्रावून जातात.
नैसर्गिक कामवासनेने ही दमन अतिशय चुकीचे घातक आहे.
एकूण सर्वच धर्मांचा काम भावनेकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत अनैसर्गिक, भयावह,विकृत असा आहे.
यामागे अजून एक कारण असे की काम हा मुक्त स्वयंपूर्ण अभिव्यक्ती आहे. स्वतंत्र मानवाचे धर्मांना वावडे असते.
दोन मानवांमधील संभोग काम ही एकमात्र मानवी कृती अस्सल अशी शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे आपले सार्वजनिक जगातले बोलणे, हसणे, व्यक्त होणे हे प्रत्येक कृती जितकी अधिकाधिक नकली कृत्रिम होत चाललेली आहे त्या पार्श्वभूमीवर संभोग ही एकमात्र कृती दोन माणसांमधील authentic action म्हणून शिल्लक राहिलेली आहे. ती अर्थातच जपली पाहिजे.

श्री० मारवा

उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि महत्त्वाच्या बाजूवर प्रकाश टाकल्याबद्दल अभिनंदन!

तुमच्याशी मी ९९.९९% सहमत आहे पण ०.०१% नाही याचे कारण "व्यक्त होणे हे प्रत्येक कृती जितकी अधिकाधिक नकली कृत्रिम होत चाललेली आहे त्या पार्श्वभूमीवर संभोग ही एकमात्र कृती दोन माणसांमधील authentic action म्हणून शिल्लक राहिलेली आहे. " या विधानाशी मी तितकासा सहमत नाही.

आधुनिक मानवाचे कामजीवन (वि० संभोग) मोठ्या प्रमाणात "देवाणघेवाणीशी" निगडीत आहे, त्यातून लैंगिक शोषणाचा जन्म झाला आहे. आधुनिक मानव कितीही पुढारला असला तरी लैंगिक-गरजा/तृप्तीचे प्रश्न तो अजुनही सोडवू शकत नाही.

दोन दिवसांपूर्वी नेटवर झळकलेली बातमी - "कॅब-चालकाचे चालत्या गाडीत तरूणी समोर अश्लील कृत्य." ही बातमी अलिकडे वारंवार वाचायला मिळते. या बातमीच्या मुळाशी जाऊन विचार केला तर अनेक प्रश्न गंभीर असल्याचे जाणवते.

- मुळात हस्तमैथून अश्लील आहे का? त्या व्यक्तीला आपल्या लैंगिक उर्जेचा निचरा करण्यासाठी पुरेसा एकांत आणि संधी मिळतात का? कॅबचालकाचे कृत्य "लज्जाजनक" असू शकते. पण हस्तमैथुनाला " अश्लील ठरवल्याने समाजात चुकीचा संदेश जातो आणि अडाणी लोकांचा कोंडमारा अधिक वाढतो. तसेच संप्रेरकांच्या प्रभावाखाली माणसाचा योग्य्/अयोग्य काय हे ठरविण्याचे केंद्र (उपाग्रखण्ड) निष्प्रभ होते. त्या तरूणीच्या मेक-अप मुळे, लावलेल्या पर्फ्यूममुळे तसेच कदाचित कॅबमधल्या एसी/एकांतामुळे, कदाचित तिच्या फोनवरील संभाषणामुळे त्या माणसाची "लिम्बिक सिस्टीम" उद्दीपित झाली असणार हे नक्की. "लिम्बिक सिस्टीम" वर उपाग्रखण्डाचे नियंत्रण सर्वांमध्ये समान असू शकत नाही.

निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत. तो त्याच्या नियमांनी पुढे जातो.

सांगायचे तात्पर्य - स्त्रीवर निर्बंध घालणे चुकीचे आहे, पण त्याच बरोबर जे पूर्णपणे निसर्ग नियमाने घडलेल्या कृतीला अश्लील संबोधणे योग्य आहे का? माझा प्रश्न बोचरा आहे, याची मला कल्पना आहे.

कदाचित सेक्स टॉईज राजरोस उपलब्ध झाली तर काही प्रमाणात ही समस्या सुटू शकते. तरी पण सेक्स टॉईज साठी एकांत हवाच. पण भारतात सध्या तरी वेगळा विचार करायची क्षमता खालपासून वरपर्यंत पुढची अनेक वर्षे विकसित होईल असे वाटत नाही.

जाताजाता - आजकालच्या सिनेमात संभोग-दृष्यांमध्ये पण अंगावर पूर्ण कपडे दाखवले जातात तेव्हा हसू अनावर होते.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2025 - 8:48 pm | प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2025 - 10:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्वच धर्मांचा काम भावनेकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत अनैसर्गिक, भयावह,विकृत असा आहे.

सहमत. महत्वाचा मुद्दा.

-दिलीप बिरुटे

Bhakti's picture

11 Sep 2025 - 10:50 am | Bhakti

म्हणजे आपले सार्वजनिक जगातले बोलणे, हसणे, व्यक्त होणे हे प्रत्येक कृती जितकी अधिकाधिक नकली कृत्रिम होत चाललेली आहे त्या पार्श्वभूमीवर संभोग ही एकमात्र कृती दोन माणसांमधील authentic action म्हणून शिल्लक राहिलेली आहे. ती अर्थातच जपली पाहिजे.

अवांतर एक आठवलं.
ते मध्यंतरी कुठल्यातरी हॉटेलमध्ये दोन युगलांचे खाजगी क्षण खिडकीतून दिसू लागले.त्यांना माहितीच नव्हतं की त्या खिडक्या ब्लॅक फिल्म प्रूफ नव्हत्या.बावळट पब्लिकने त्याचे व्हिडिओ काढून सर्वत्र व्हायरल केले.पण खूपशी जनता याबाबत असंवेदनशील आहे.

व्हेनिसमध्ये ते उघड्यावर करण्यासाठी काही युगुले जातात असं ऐकून आहे. पण वेनिसला पैयशे मिळतात ना. (Dw tv channel doc)

युयुत्सु's picture

11 Sep 2025 - 3:58 pm | युयुत्सु

आनंदाची उपासना युरोपमध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक रित्या करता येते. कॅप द'आग्द चे समुद्र किनारे यासाठी प्रसिद्ध आहेत.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2025 - 8:47 pm | प्रकाश घाटपांडे

+१

युयुत्सु's picture

11 Sep 2025 - 10:04 am | युयुत्सु

एकूण सर्वच धर्मांचा काम भावनेकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत अनैसर्गिक, भयावह,विकृत असा आहे.

धर्मांची निर्मिती झाली तेव्हा जीवशास्त्र विकसित झाले नव्हते. त्यामुळे अनौरस प्रजेच्या भीतिमुळे लैंगिक आचरणावर बंधने आली, हे विसरता कामा नये.

युयुत्सु's picture

11 Sep 2025 - 10:18 am | युयुत्सु

अहो लिंबिक सिस्टीमवरच कंट्रोल करून माणूस शहाणा झालाय.सर्व शक्ती लिंबिक सिस्टीमला खुश करण्यात घालवली तर चिपांझी सारखं राहावं लागेल.

अहो लिंबिक सिस्टीमवरच कंट्रोल करून माणूस शहाणा झालाय.

अत्यंत खेदाने तुम्हाला जीवशास्त्र कळले नाही असे म्हणावे लागेल. लिंबिक सिस्टीम सिस्टीमवर नियंत्रण निर्माण होण्याला अनेक मर्यादा असतात -जनुकीय भाग्य, वाढीच्या वयात आजुबाजूचे वातावरण, पोषणद्रव्याचा अभाव इ०

हा विषय सुलभ करण्यासाठी एक अति सुलभ उदा देतो. समजा उपाग्रखण्डाच्या लिम्बिक सिस्टीम वर नियंत्रणासाठी १ लक्ष चेतापेशींच्या जोडण्या आवश्यक आहेत, पण त्या ५० हजारच निर्माण झाल्या असतील तर लिम्बिक सिस्टीम वर नियंत्रण निर्माण होणार कसे? याशिवाय उपाग्रखण्ड नि:ष्प्रभ करणा-या संप्रेरकांचे/चेतारसायनांचे स्रवण प्रमाणाबाहेर झाले (जी अनैच्छिक क्रिया आहे) तर लिंबिक सिस्टीमवरील नियंत्रण नाहीसे होते. समजा जन्मतः १ लक्ष जोडण्या जन्मतः मिळाल्या तरी पुढे जगण्याच्या ताणामुळे त्यांचा नाश होऊ शकतो.

आता तुम्हाला हे जीवशास्त्रीय सत्यच मान्य करायचे नसेल तर मात्र मी हतबल आहे. तरी पण प्रतिसादाबद्दल आभार! कारण समाजमन त्यामुळे समजायला मदत होते.

पूर्ण कंट्रोल नाही कारण अति तिथे माती होऊन माणूस नैसर्गिक भावना दाबल्याने 'वेडा'(मला हाच शब्द आवडतो)होतो असं माझं तर म्हणणंच आहे.
पण अंशतः कंट्रोल फलदायी आहे.यामुळेच माणूस प्राण्यांपेक्षा जास्त क्रीटिव्हिटी एन्जॉय करतो.

लिंबिक सिस्टीमवर नियंत्रण ठेवल्यास फ्रंटल कॉर्टेक्सच्या विकासाला चालना मिळू शकते, परंतु हे प्रक्रियेच्या जटिलतेवर आणि अनेक घटकांवर अवलंबून आहे. लिंबिक सिस्टीम, जी भावना, स्मृती आणि प्रेरणा यांच्याशी संबंधित आहे, आणि फ्रंटल कॉर्टेक्स, जे तर्क, निर्णय घेणे आणि आत्म-नियंत्रण यासाठी जबाबदार आहे, यांच्यात परस्परसंबंध आहे. खाली याचा तपशील देत आहे:
1. लिंबिक सिस्टीम आणि फ्रंटल कॉर्टेक्स यांचा संबंध
लिंबिक सिस्टीम (जसे की अमिग्डाला, हिप्पोकॅम्पस) भावनिक प्रतिसाद निर्माण करते, तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (फ्रंटल कॉर्टेक्सचा भाग) या भावनांवर नियंत्रण ठेवते आणि तर्कसंगत विचारांना प्रोत्साहन देते.
जर लिंबिक सिस्टीमवर नियंत्रण ठेवले (उदा., भावनिक प्रतिक्रिया संतुलित केल्या), तर प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला जास्त संसाधने (मेंदूची ऊर्जा) मिळतात, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता आणि विकासाला चालना मिळू शकते.
-इति AI

रच्याकने तुम्हाला खेद झाला हे वाचून उगाच जीवशास्त्राची प्राध्यापक झाले असे वाटलं ;)

ब्रह्मचर्य आणि संन्यास यावरच अवलंबून आहेत. अन्यथा सगळेच झाले असते संन्यासी.

सुबोध खरे's picture

16 Sep 2025 - 9:36 am | सुबोध खरे

भक्तीताई

"त्यांना" सोडून बाकी कुणालाच जीवशास्त्र "समजत" नाही हे तुम्ही "समजून" घ्या .

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Sep 2025 - 10:58 am | राजेंद्र मेहेंदळे

आणि त्यावरचे अभ्यासू प्रतिसाद वाचतो आहे. हे लिंबिक सिस्टमचे पहिल्यांदाच कळले. अधिक जवळचे म्हणजे डोक्याने निर्णय घेणे आणि र्‍हदयाने निर्णय घेणे यातील फरक.

याचे सोपे रोजच्या जगण्यातले उदाहरण म्हणजे तट्ट जेवल्यावर झोप येते (मेंदुला कमी रक्त पुरवठा झाल्याने) हे असावे काय? असा गमतीशीर विचार मनात आला. (च्यायला आज रविवार असल्याने झोपेचेच विचार येताहेत.)