जेवणा..शा

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
18 May 2009 - 5:03 pm

माझी प्रेरणा कारुण्याशा... http://misalpav.com/node/7791

एका वरण भाताच्या थाळीसमोरचा तो मत्त भुकेला
चॅपॅक चॅपॅक जिभल्या चाटीत भुरके मारी
भुर्र भुर्र भुर्र भुर्र

लोणच्याच्या फोडीच्या तहवैभवाने टाकलेले गारूड
अन तोंडात डाविकडून उजविकडे खळाळणारा अन्नप्रवाह
चॅपॅक चॅपॅक चॅपॅक चॅपॅक

भाताच्या दलदलीत ओरपणारा स्निग्ध हात
गुलगुलीत स्पर्षाने आणि सात्वीक चवीन जिवाचा खुळखुळा
खुळा रे खुळा, खुळा रे खुळा...

एका जेवणपानावरून पुनश्व हरि ओम
क्षीण नळाखाली अनुमानात कडाडबूम मेघवर्षा
धो धो धो...

अन मग सारंच शांत..
पुढच्या जेवणपानापर्यंत...

कविताअनुभव

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2009 - 5:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे एवढ ओरपल्यावर कसलं डोंबलाचं वजन कमी होणार हो विजु शा?

चिरोटा's picture

18 May 2009 - 5:09 pm | चिरोटा

विडंबन.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

राजा's picture

18 May 2009 - 5:09 pm | राजा

चालुकेश्या,कारुण्याशा
निरिक्षणाशा ... अजून किति येणार?????????
डोक्याच पार भुस्काट झाल राव!

राजा's picture

18 May 2009 - 5:12 pm | राजा

बलबिरपाशा वर होऊन जाऊ दे काहितरि

अवलिया's picture

18 May 2009 - 5:16 pm | अवलिया

=))

--अवलिया

यशोधरा's picture

18 May 2009 - 5:28 pm | यशोधरा

>>लोणच्याच्या फोडीच्या तहवैभवाने टाकलेले गारूड

अगदी, अगदी!! :) आजच मी हापिसच्या कॅंटीनमध्ये मस्त कैरीचं लोणचं खाल्लं! झकास होतं! :)

विजुभाऊ's picture

19 May 2009 - 11:03 am | विजुभाऊ

प्रतिसाद दिल्यांचे सर्वांचे आभार

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

परिकथेतील राजकुमार's picture

19 May 2009 - 11:16 am | परिकथेतील राजकुमार

वाह चांगले जो..शा त केले आहे की इडंबन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य