मानवतेचं कलेवर
पुनश्च पेटवा मशाली जाळून टाका विषवल्ली बनू आता विश्वगुरू , नरसंहाराने विश्व शांतीची सुरवात करू......पहेलगाम मधे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व परिवारातील सर्व सदस्यांना सहसंवेदना. समयोचित रचना !
In reply to छान लिहलय कर्नल साहेब, by अमरेंद्र बाहुबली
In reply to कधी निघताय मग तुम्ही बदला by प्रसाद गोडबोले
In reply to कधी निघताय मग तुम्ही बदला by प्रसाद गोडबोले
In reply to आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई by अमरेंद्र बाहुबली
In reply to आम्ही तर लगेच जाऊ हो, आमचाई by अमरेंद्र बाहुबली
पण नेते असे पडलेत देशाच्या गळ्यात की काय सांगावे?बरं मग थोडा दम धरा, 2029 मध्ये निवडणुकीत त्या नेत्यांना सत्तेतून बाहेर खेचा, मग घ्या बदला बिदला. 2029 पर्यंत थोडी तरी कळ काढाल की नाही ? की 2029 पर्यंत मिसळपाव ह्या वेबसाईटवर, कोठल्याही लेखनवर स्वतःला वैचारिक अतिसार लागल्याचे प्रदर्शन करत राहणार आहात ? राजकारण , मोदी, भाजप, ह्यापलीकडे ही आयुष्य आहे , आणि ते सुंदर आहे . एन्जॉय करा राव . नाहीतर मग काय अयोध्या काशी वगैरे तीर्थाटन देखील अतिसार लागलेल्या अवस्थेत केल्यास त्यातून आनंद, समाधान लाभणार नाहीये.
In reply to पण नेते असे पडलेत देशाच्या by प्रसाद गोडबोले
In reply to अरे व्वा.. by मुक्त विहारि
In reply to व्यक्तिद्वेष करू देत, काही by प्रसाद गोडबोले
In reply to तूमची इच्छा पूर्ण होणार नाही by अमरेंद्र बाहुबली
In reply to तूमची इच्छा पूर्ण होणार नाही by अमरेंद्र बाहुबली
In reply to पण नेते असे पडलेत देशाच्या by प्रसाद गोडबोले
In reply to कोणत्याही विषयावर धागा असूदे, by श्रीगुरुजी
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
ज्याप्रमाणे संजय राऊतला उबाठासेनेत त्यांच्या हितशत्रूंनी पेरले आहे असे वाटते त्याप्रमाणेच या सदस्यालाही मिपाच्या हितशत्रूंनी इथे पेरले आहे की काय ही शंका नेहमी येते.
नाही मला ज्याप्रमाणे भाजपची वाट लावायला नी भ्रष्टाना अभय द्यायला मोदी शहा हितशत्रुनी पेरलेत त्याप्रमाणे हितशत्रुनी पेरलेय. :)In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
In reply to कालच्या हत्याकांडाचे अत्यंत by श्रीगुरुजी
In reply to कालच्या हत्याकांडाचे अत्यंत by श्रीगुरुजी
आता लष्कराला व्यवस्थित योजना आखण्यास सांगून त्यानुसार हल्ला करून पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग, काही महत्त्वाची शिखरे जिंकून घ्यावी.पण त्यापूर्वी तिकडच्या सगळ्या लोकांना हाकलून द्यावे आणि मगच पाकव्याप्त काश्मीरचा काही (किंवा सगळा) भाग ताब्यात घ्यावा. बांगलादेशात झाले त्याप्रमाणे आतापुरते तिकडचे लोक पाकड्यांच्या जोखडापासून मुक्तता केली म्हणून आपले आभार मानतील पण काही काळातच परत धर्माच्या नावावर एक होऊन आपली डोकेदुखी वाढवतील. स्वतः शेख मुजीबूर रेहमान जर पाकिस्तान या मुस्लिम देशाचा अणुकार्यक्रम सुरू झाला म्हणून आनंद व्यक्त करू शकत असतील आणि ज्याला बुचर ऑफ बांगलादेश म्हणायचे त्या टिक्काखानबरोबर हातमिळवणी करू शकत असतील तर पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांची काय कथा?
हवा डोळ्याला डोळा, गोळीला गोळीआपल्या लेखनातल्या भावना पोहचल्या. आपल्यापैकी अनेक भावनिक झालेल्या भारतीयांना वाटतं की थेट पाकिस्तानवर आक्रमण केलं पाहिजे. पाकिस्तान अतिरेक्यांना पोसतो, त्यामुळे आता धाडसी कार्यवाही झाली पाहिजे. एकीकडे भारतीय मतदारांचा दबाव आणि दुसरीकडे जागतिक राजकारण त्याचे पडसाद कसे उमटतील या सर्वांचा अभ्यास करुन सरकार हळुहळु निर्णय घेईल. घटनेचा बदला म्हणून थेट आक्रमणाची शक्यता तशी अगदीच कमी आहे. भारताने पाच जे निर्णय घेतले त्यातले बरेच भविष्यात पुन्हा बदलावे लागतील असे वाटते. सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ स्थगीत केला आहे. आपण ते सर्व पाणी कसे अडवू शकतो त्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. उपनद्या अडवता येतील त्यालाही किती वेळ लागेल सांगता येत नाही. पण, पाकचं नाक दाबणे हाही उपाय आहेच. भविष्यातील युद्ध हे पाणीबाणीवरुन अजून वाढू शकेल पण, सामान्य भारतीयांचा उद्वेग जो आहे तो उद्वेग अडवण्याचे हे निर्णय आहेत असे सध्या वाटते. पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवणे, अटारी बॉर्डर बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवास करण्याची सूट, तो व्हीसा रद्द करणे, उच्च आयुक्तालयातील अधिका-यांची संख्या कमी करणे वगैरे हे सर्व भारत सरकारने घेतलेले तात्पुरते उपाय आहेत असे वाटते. कारण त्या सर्व निर्णयांना पाक सरकारनेही प्रत्युत्तर दिलेले दिसते. भारताच्या विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद, व्यापार बंद, वाघा बॉर्डर बंद वगैरे. आपण सर्व घटनाक्रम पाहिले तर, भारत सरकार जपून पावलं उचलतांना दिसत आहे. अतिरेक्यांची नाकेबंदी, संशयीत आणि पाठींबा देणा-या आणि संबंधितांची घरे उद्ध्वस्त करणे आणि त्यांचा खातमा करणे हे हळुहळु सुरु आहे असे दिसते. दुसरं अशा कोणत्याही घटनांचे चित्रण, माहिती-प्रसारणावर बंदी आणली आहे, त्यामुळे दहशतवाद्यांना कोणत्याही कार्यवाहीची माहिती होऊ नये. सध्या सर्व भारतीय सीमा सुरक्षा आवळणे आणि आत घुसलेल्या अतिरेक्यांचा खात्मा करणे हे पहिलं काम प्राधान्याने सुरु आहे असे दिसते. दुसरी एक शक्यता वाटते, बलुचिस्तानला स्वतंत्र होण्यास मदत करणे. पाकिस्तानची डोकेदुखी वाढवणे. बॉर्डरवरची सर्व अतिरेकी तळ बेचीराख करणे हाच सर्वात सोपा मार्ग दिसतो आहे. काश्मीर जनतेचं पोट ज्या पर्यटनावर आहे, त्यामुळे त्यांची सहानुभूती पहिल्यांदा दिसत आहे, ही चांगली गोष्ट वाटली. अजूनही पाकिस्तानला सपोर्ट करणारे नसतील असे म्हणायचे आणि समजायचे कारण नाही, अशांची पाठवणी होईलच. पक्षराजकारण वेगवेगळं असलं तरी राष्ट्रीय संकटाला एकजूट होणे ही भारताची खासियत आहे. भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत. दहशतवादात बळी पडलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. -दिलीप बिरुटे
In reply to भावना पोहचल्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुनश्च पेटवा मशाली