शिद्दत-आणखिन एक अभागी मज्नू

Primary tabs

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
3 Oct 2021 - 10:17 pm

शिद्दत याचा ट्रेलर मला वाटतं मागच्या महिन्यात पाहिला होता. आवडला होता. परवा सध्याची स्टार गायिका योहानीचं ‘शिद्दत’ गाणं ऐकलं, मस्तच आहे. (थोडी उच्चाराचा खडा जाणवतो पण चालतंय). झालं. मग पाहायचा ठरवला.
जग्गी एक स्वप्नाळू मुलगा! उत्साही ,उर्जेने भरलेला. गौतम आणि इराच्या लग्नात गौतमच्या प्रेमाने भरलेल्या स्पीचने भारावून जातो. आणि लवकरच त्याला त्याची जलपरी कार्तिका भेटते. ९० च्या सिनेमाप्रमाणे कार्तिका बड्या घराची आणि जग्गी कफल्लक आणि थोडासा सरफिरा. लवकरच दोघांचं मेतकुट जमलंय, या अंदाजापर्यंत आपण येऊन पोहचतो. तोच कार्तिकाचं काही दिवसांत लंडनला लग्न आहे, ही छोटीशी कलाटणी मिळते. जग्गी आपला बाहेरून कुल आहे असे भासवतो, पण कार्तिकामध्ये तो आत पूर्ण गुंतलेला असतो. आणि हे तिला तो पटवून द्यायचं प्रयत्न करतोय.
कार्तिका मूव्ह ऑन होते. पण जग्गी फुल्ल मजनू झालाय. कसंही करून त्याला तिच्या लग्नाच्या दिवशी लंडनला पोहचायचं आहे. त्यासाठी तो इल्लीगल बॉर्डर पार करत करत फ्रांसला पोहचतो. पण पुढचा सिनेमा थोडा जलद आणि अनाकलनीय होत जातो. जग्गी पकडला जातो पण त्याला गौतम पुन्हा भेटतो. तो आणि कार्तिका लंडनहून त्याला परत जा अशी विनवणी करत आहेत. पण पठ्ठा मानत नाही. इंग्लिश खाडी पोहणे, विमानातला तो थरारक प्रवास अशा अनेक प्रसंगाने त्याची प्रेमाची धग अखेर कार्तिकापर्यंत पोहचते. पण या कथेचा शेवट म्हणजे हृदयच हातात येतं. आणि वाटतं आणखी एक अभागी मजनू!!!
थोडी सिली प्रेमकथा वाटेल, पण बऱ्याच दिवसांनी एखादी प्रेमकथा पाहण्यासाठी चांगली आहे.
तांत्रिक बाबी : विकी कौशिकाचा भाऊ सनी कौशिक यात नायक आहे आणि राधिका मदान नावाची उमदी नायिका आहे.
सर्वच गाणी म्हणजे अगदीच श्रवणीय आहेत.
Hotstar वर हा सिनेमा पाहता येईल.
-भक्ती
योहानीचं शिद्दत गाणं -

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

4 Oct 2021 - 9:37 am | कुमार१

निदान गाणी ऐकावीत म्हणतो...

इतकी शिद्दत नाहीं पचणार...

बहूतेक गाणी ऐकूनच समाधान मानेन.

धन्यवाद.

कुमारजी सिनेमा पाहण्यासाठी वर्थी आहे ,थोडा थोडा पळायचा.
गॉडजिला असे वाटू शकतं, सिनेमाच्या शेवट यातून बाहेर पडायला एक दिवस लागू शकतो.माझे रडणं थांबायला एक तास लागला :(

Bhakti's picture

4 Oct 2021 - 11:50 am | Bhakti

*पळवायचा

अपूर्व कात्रे's picture

10 Oct 2021 - 12:06 am | अपूर्व कात्रे

हिंदी मातृभाषा/बोलीभाषा नसतानाही योहानीने हिंदीतून गायलंय हे भारीच... पण चुकीचे हिंदी उच्चार खुपतात.
भारतातील इतर अनेक गायिका (ज्या दिसायलाही सुंदर आणि नखरेल आहेत) सोडून या गायिकेकडून हे गाणं गाऊन घ्यायचं कारण कळलं नाही.

सध्या तीची क्रेझ आहे, पब्लिसिटी गिमिक,तिचा गाणं ऐकूनच मी सिनेमा पाहिला,तर अजून दोन चार लोकही पाहतील नाही :)

चौथा कोनाडा's picture

10 Oct 2021 - 6:05 pm | चौथा कोनाडा

रोचक ओळख, बघू कसा योग येतोय शिद्दत बघायचा !

Bhakti's picture

10 Oct 2021 - 9:50 pm | Bhakti

:)