बुडता आवरी मज (ऐसी अक्षरे...मेळवीन -३)

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
3 Jun 2021 - 3:23 pm

पुस्तक :बुडता आवरी मज
लेखक:सुरेंद्र दरेकर
.

जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते.आणि खरोखरच बुडता आवरी मज हे पुस्तक माझ्या वाचनाला समृद्ध करणारे खासच ठरले .निर्मोही अध्यात्म,तत्वज्ञान,विज्ञान,मानवी संवेदना व अनुभवांची कथेद्वारे सांगड या माझ्या आवडत्या सर्वच बिंदुना हे पुस्तक लिलया स्पर्शून जाते.

पुस्तकामध्ये ‘बुडता आवरी मज’ आणि 'पॉईज’ या दोन दीर्घकथा समाविष्ट आहेत.दोन्ही कथांमध्ये भाषा सौंदर्य ,मानवी जीवनातील विविध घटनांचे संवेदनशीलतेने आकलन व सादरीकरण उत्तम ही जमेची बाजू आहे.तसेच झोक्यावर हिंदोळे घेताना क्षणात मागे क्षणात पुढे जात असता सृष्टीही गिरक्या घेत असते पण आपण तेच असतो त्याच प्रमाणे दोन्ही कथेतील मुख्य नायक ,त्यांच्याभोवती फिरणारे घटनाक्रम झोक्याप्रमाणे कधी भूतकाळ तर कधी वर्तमान काळात हिंदोळ्यावर झुलवत राहतात.

‘बुडता आवरी मज’ या कथेमध्ये एखाद्याच्या जाण्याने निर्माण पोकळी भरून निघणे अशक्यच असते. पण त्याच्या अस्तित्वाच्या खुणा असलेल्या घराचे कोपरे बाबा व त्यांचे कुटुंब पुन्हा उजळून टाकत आहेत आणि त्यादरम्यान संपर्कात आलेल्या विविध व्यक्तिरेखांद्वारे कथा सरकत राहते. बाबांच्या आणि मित्रांच्या तत्त्वज्ञान बैठीकीने रूढ गोष्टींना टाळत तटस्थ दृष्टिकोनाचे दर्शन घडते.पण तरीही संवेदनाचा गाभा प्रत्येक व्यक्तिरेखेत खळखळतच राहतो.

‘पॉईज’ या दुसऱ्या दीर्घकथेमध्ये विज्ञान संशोधनभोवती कथा फिरत आहे.महेश हा कथेचा सूत्रधार असून त्याच्या आंतरिक प्रेरणेने कार्यभाव या वृत्तीचा प्रवास वेगवेळ्या घटनांनी कसा घडला हे वाचतांना उत्सुकता निर्माण होते.अनुभव हे या कथेचे मुख्य सूत्र आहे हे भासते.सजगता प्रत्येकाच्या ठायी असतेच पण त्याचा समतोल ठेवावा लागतं नाही तर तो घडत असतोच.तेव्हा काही गोष्टी अलक्ष करणेच योग्य असते.त्यालाच पॉईजला पोहोचणे असे मानावे असे संकेत देत राहतात.या कथेतील जीवशास्त्र,रसायनशास्त्र यातील लेखकांनी दिलेली आधुनिक उदाहरणे ,दाखले कथेचा भाग म्हणून दिले आहेत.परंतु त्या वाचकांमध्ये नक्कीच कुतुहूल जागृती करतात.

आशयपूर्ण शब्दरचना,पारंपारिक आणि आधुनिक जीवनमानाचा संगम याची मांडणी करतांना लिखाण कमालीचे खुलले आहे.

हे पुस्तक केवळ कथारंजन नाही तर स्व-जाणीव तपासून पाहण्याचे आगळे रुपकच आहे.

-भक्ती
०३/०६/२०२१

पुस्तकातील एक प्रसंग वाचन खालील तू नळी दुव्यामध्ये ऐकता येईल.

साहित्यिकप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

3 Jun 2021 - 3:38 pm | कुमार१

छान परिचय !

जेव्हा दस्तुरखुद्द लेखकांनी आपल्याला त्यांच्या स्वाक्षरीचे पुस्तक अभिप्रायासाठी दिले असेल तर नक्कीच ते पुस्तक खास असते

>>>
अगदी !
मलाही ‘चिअर्स’ हे वपुन्चे पुस्तक त्यांच्याकडून मिळालेले आहे.
त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख !

Bhakti's picture

3 Jun 2021 - 4:08 pm | Bhakti

वाह !क्या बात!!

गॉडजिला's picture

3 Jun 2021 - 5:48 pm | गॉडजिला

ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

Bhakti's picture

3 Jun 2021 - 9:17 pm | Bhakti

हो !