मास्तरांचा जालिंदर जलालाबादी ह्याच्या वरील माहीती पर लेख काय आला मिपा जगतात खळबळ उडाली, एका सामान्य प्रतीच्या लेखकाला मिपावर येवढी प्रसिध्दी मिळाली की दगडफोड्या, कावलिया व रेवा ह्यांना जालिंदर जलालाबादीच्या माहीतीपुर्ण लेखामुळे त्याच्यावर लेखन करावेसे वाटले व कावलिया तर सरळ त्यांना भेटायला गेला हे पाहून मनात आग धुसमसत होती, काय ती पुस्तके काय ती त्यांची नावे कधीच वाचायचे नाही असे ठरवले होते पण "चालते व्हा" चा उल्लेख झाला व जराशी खटपट करताच आमच्या गुप्त सुत्राद्वारे ते पुस्तक भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये मला उपलब्ध झाले, व प्रस्थापित लेखकांच्या वर खास करु महाजालावरील काही महान (माझ्या सारख्या) लेखकांना त्यांनी खोचकपणे दिलेले सल्ले वाचले व त्यांनी १७०८ साली साहित्य समेलनामध्ये केलेला ओपन गोळीबार आठवला ज्यामध्ये काही शे विरोधकांना ह्यांनी वर पाठवले होते... मग काय आग तळपायाची मस्तकाला जाऊन भिडली, काही विचार न करता सरळ डाबुद भाईला फोन लावला व सुपारी घेता काय विचारले तर तो डाबुद जालिंदर जलालाबादी ह्यांचे नाव मी उच्चारताच बेशुध्द पडला असे त्याच्या गुर्ग्याने मला सांगितले, तो पर्याय बाद झाला, मग मी मलेशियामध्ये छोटा मंजन ला फोन लावला पण तो तर जालिंदर जलालाबादी हे नाव कानावर पडताच मलेशिया सोडून परांगत झाला, पुन्हा कुणालाच दिसला नाही, शेवटचा पर्याय म्हणून मी आलू ला फोन लावला बिहार मध्ये व एके-४७ / ५६ मधील काही मिळेल का विचारल्यावर हो म्हणाला. लगेच मी त्यांच्याकडे गेलो व मी जन्म भरात कधी एके-४७ बघीतली नव्हती हे पाहून त्यांनी मला देशी कट्टाच एके-४७ म्हणून १५०० रु. ला दिला. मी तेथेच गोळ्या कश्या भराव्यात व कट्टा कसा चालवावा हे शिकुन घेतले व काही हजार गोळ्या घेऊन मी परत आलो.
काही हजार गोळ्यामधील हजारो गोळ्या प्राक्टिससाठी खर्ची घातल्या पण निशाना काय व्यवस्थीत झाला नाही तरी ही मी हार न मानता शिल्लक गोळ्या जपून ठेवल्या व एका जालिंदर जलालाबादी च्या भल्या मोठ्या पुस्तकामध्ये मधील पानं कट्टाच्या आकारामध्ये कापून त्यात कट्टा ठेवला व ते पुस्तक मी एका कपड्यात गुंडाळून आपल्या बरोबर बाळगू लागलो.
काही किलोचे ते पुस्तक व मी काही ग्रॅमचा तरी ही मी हिंमत न हारता ते पुस्तक घेऊन हिमालयात आलो जालिंदर जलालाबादी च्या गुफेच्या आसपास राहून त्यांच्या बद्दल माहीती शोधू लागलो, माझा एक मित्र जेम्स बॅन्ड आहे तो स्वतःला ००६ समजतो त्याची देखील सेवा घेतली त्यांने जालिंदर जलालाबादी ह्यांच्या दिनचर्चेची माहीती, काही त्यांची एकांतवासाच्या जागा व लफडी ह्या बद्द्ल माहीती गोळा केलीच व बरोबर ते लिहीत असलेल्या "कुडबूड तेथे लुडबुड " ह्या न छापलेल्या पुस्तकाची काही पानं देखील घेऊन आला, पण त्या मुर्खाने ती पाने वाचली व जय जालिंदर जलालाबादी !!! जय जालिंदर जलालाबादी !!! असे ओरडत आपले कपडे फाडत गायब झाला तो परत आलाच नाही.
जालिंदर जलालाबादी ला "साहित्य जगताचा पितामहा" अशी पदवी देण्याचा घाट काही लोक घालत होती असे कानावर आलेच होते व येथे बेमालूमपणे वेश बद्लून येत असलेल्या मिपावरील काही लेखकांना मी पाहीले तेव्हाच लक्ष्यात आले की घाट घातला नाही आहे त्यांना घाटावर बसवून पदवी देण्याचे पक्के झाले आहे, हे पाहून पुन्हा माझ्या सर्वांगामध्ये आग पसरली व रागाने ते पुस्तक झटक्यात उचलले पण त्याच्या वजनामुळे माझी कंबर लचकली, नाही तर सर्व राहीलेल्या त्या गोळ्या मी कट्टाद्वारे जालिंदर जलालाबादी च्या शरीरामध्ये उतरवल्या अस त्या त्याच क्षणी.. ! पण काळ आला होता वेळ आली नव्हती जालिंदर जलालाबादी साठी.
जालिंदर जलालाबादी ची दिनचर्चा एकदम साधी होती सकाळी सकाळी दहा वाजता ते उठतात, आपला काळा चष्मा चढवतात, त्यानंतर दोन एक तास ते स्वच्छतागृहामध्ये गहन चिंतन करतात, दुपारी जेवण करतात व संध्याकाळ पर्यंत फॅशन टिव्ही बघतात व नवीन संकृती बद्दल निषेध व्यक्त करतात, मग संध्याकाळी आचमन करतात (शक्यतो वॅट ६९ असावी दुरुन बघत असल्यामुळे बाटली कुठली हे दिसले नाही) व आठच्या सुमारास आपल्या पाळलेल्या शेळीचे दुध काढतात व नेहमी शेळीच्या जखमेवर पाला लावून येतो असे सांगून अचानक गायब होतात, त्यावेळी त्यांचे अंगरक्षक तथा समर्थक त्यांच्या बरोबर नसतात हे पाहून हीच वेळ योग्य आहे असे मी ठरवले व ३० फेब्रुवारीचा दिवस मी पक्का केला. थोडीशी छाबीन करताच जी माहीती मिळाली ते बघून मला झटकाच बसला, शेळीच्या नावाखाली गायब होणारे जालिंदर जलालाबादी हे दुरवर असलेल्या आपल्या मैत्रीणीला भेटायला जातात व तीच्या हातून आपले लेखन करुन घेतात हे कळाले तेव्हा तर मी रागाने सैरावैरा झालो, छे ! छे हे काय चरित्र झाले, एका स्त्री कडून आपले लेखन करुन घेणे ? आम्ही मिपावर शेकडो ने क्रमशः लेख लिहले, एक-दोन लेखमाला सोडून कुठलीच लेखमाला पुर्ण केली नाही पण आमच्या वर अशी वेळ कधीच आली नाही की स्त्री कडून आपले लेखन करुन घ्यावे लागेल, हा तर आपल्या बुध्दीचा अपमान. जालिंदर जलालाबादीला उडवण्याचे एक कारण मला पुन्हा मिळाले.
दुरवर रानात जाऊन कट्टाने पुन्हा गोळी मारण्याची प्रॅक्टिस केली व ह्या वेळी मी मारलेली चिमणीवरील गोळी कावळ्याला लागली हे पाहून मला परमहर्ष झाला म्हणजे आता मी जर त्यांच्या छातीवर गोळी मारली तर डोक्याला गोळी लागण्याचे चान्स वाढले होते. मी आपला कट्टा संभाळून परत आपल्या गुप्त जागेवर आलो. आता मी संध्याकाळ होण्याची आतुरतेने वाट पाहत होतो, कधी संध्याकाळ होते कधी जालिंदर जलालाबादी शेळीच्या नावाखाली आपल्या मैत्रीणीला भेटायला जातात, व मी कधी त्यांच्या छातीवर गोळी मारतो व कधी जालिंदर जलालाबादी आपल्या कपाळावर हात लावून हे राम म्हणत वर जातात असे वाटत होते.
सर्व काही प्लान नुसार होत होते, बरोबर ८ वाजता आचमन संपवून जालिंदर जलालाबादी शेळीच्या नावाखाली आपल्या गुफेतून बाहेर पडले व माझ्या आजवरच्या योग्य व १००% फुलप्रुफ माहीती नुसार त्यांच्या मागे कोणीच अंगरक्षक आला नाही व प्लॅन ५०% पुर्ण होत आहे हे पाहून माझे बाहू आनंदाने उड्या मारु लागले... थोड्याच वेळात जालिंदर जलालाबादी हे आपल्या त्या गुप्त मैत्रीणीच्या गुफेजवळ पोहचले व हलकेच मागे पाहून कोणी पाठलाग तर करत नाही हे पाहीले पण एकदम काळ्या गुप्प अंधारामध्ये एक काळा माणूस काळा कट्टा घेऊन त्याच्या मागे काही मिटर वर उभा आहे हे त्यांना कसे दिसणार.. त्यात ते नेहमीच काळा चष्मापण वापरतात.. !
योजनेनुसार मी त्याच्या मागोमाग कट्टा छातीशी धरुन आत गेलो व ते माझ्या अंदाजाप्रमाणे त्या स्त्री मैत्रीणीच्या खांद्यावर हात टाकुन लिखाणाच्या खोली कडे चालले होते, मी त्वेशाने त्यांच्या कडे निघालो तोच काही शब्द कानावर पडले व ते शेवटे काय बोलत आहे ते तर आपल्या कानावर पडू दे म्हणून मी काही मिनिटे त्यांना जिवनदान देण्याचे ठरवले...
जालिंदर जलालाबादी - " आज काल लोकांना लिहण्याचा खुप कंटाळा"
ती स्त्री - हो, बघा ना माझ्या अमुक-तमुक कवितेवर फक्त ४२० प्रतिसाद आले"
जालिंदर जलालाबादी - " लोकांना लिहते करावे ह्यासाठीच मी लिहते व्हा हे पुस्तक लिहले"
ती- स्त्री - हो खुप छान आहे ते पुस्तक, ते वाचूनच तर मी लिहती झाले व तुमची लेखनीक बनली"
जालिंदर जलालाबादी हसत म्हणाले " पण चालते व्हा ह्या पुस्तकामुळे मी नवलेखकांच्या मनातून उतरलो आहे, ह्याची खंत वाटत आहे, हे नवलेखक भराभर दोन-चार ओळी लिहतात व प्रतिसादाची चातकासाठी वाट बघतात, काही नमुने तर भराभर क्रमशः लेखांचे रतिब घालतात व आजारी पडतात.... त्यांना लेखन कसे करावे, कसे प्रतिसाद मिळवावे व कसे प्रसिध्द व्हावे, आपले क्रमशः लेखन कसे संपवावे व आपल्या अवगुणांना कसे चालते व्हा म्हणावे हे कळावे म्हनून मी ते पुस्तक लिहले पण ह्या नवयुवकांना हे कळत नाही आहे, आता काही जण मला पितामहा ही पदवी देत आहेत मी त्यांना निक्षून सांगितले की मला ही पदवी नको, मी त्या लायकीचा नाही आहे, मी काय केले आहे असे ? फक्त ८४० पुस्तके, ४२० कविता संग्रह, साहित्य समेलंनामध्ये थोडासा गोळीबार.. हा माहीत आहे त्यागोळीबारामध्ये काही शे मेले पण ती साहित्य सेवा होती, देवाने मला त्यासाठी निर्माण केले आहे ! साहित्य सेवेसाठी मी शे काय हजारो प्राण घेईन पण माझे प्राण जाऊ देणार नाही.. ही माझी शपथ मी पुर्ण करुन दाखवली... जो पर्यंत माझ्यामध्ये प्राण आहेत तो पर्यंत मी लेखन सांगणारच व तु लिहणारच, ह्याच साठी तर माझा अवतार झाला आहे."
त्यांचे हे बोल माझ्या कानात जणू अमृतासारखे पडले व माझ्या डोळ्यातून निरंतर आश्रु वाहू लागले व माझ्या हातातील ते काही किलो वजनाचे पुस्तक खाली पडले व त्यातून कट्टा देखील. पुस्तक पडल्याच्या आवाजामुळे जालिंदर जलालाबादी भुकंप भुकंप असे ओरडत पळू लागले व मी चटकन त्यांचे पाय पकडले, पण ते पळण्याच्या वेगात होते व मी अचानक पाय पकडल्यामुळे ते उताणे खाली पडले व त्यांची कवळी दुरवर जाऊन दात दाखवू लागली... !
मी त्यांना उचलले व पळत जाउन त्यांची कवळी त्याच्या हातात दिली व मी येथे का व कसा आलो व काय करणार होतो व का केले नाही ह्याचे सर्व विवेचन केले व त्यांच्या डोळ्यातून देखील काही आश्रु आले व मला म्हणाले " तु सुधरलास हे पाहून मला आनंद झाला, चल तो कट्टा उचल व आमच्या शस्त्रागृहमध्ये जमा कर, आपल्याला खुप साहित्यसेवा करायची आहे.... व चालते व्हा हे पुस्तक जगाच्या कानापोक-यापर्यंत पोहचवायचे आहे... चल तुला नंतर भेटेन माझ्या गुफे मध्ये आता माझ्या लेखनाची वेळ झाली..." असे म्हणत माझ्या कडे हसत पाहत ते आपल्या स्त्री मैत्रीणीच्या खांद्यावर हात टाकून निघून गेले... !
मी ते खाली पडलेले पुस्तक उचलले व भगवत गिते प्रमाणे आपल्या माथ्यावर लावले व पुस्तकाला छातीशी लावून मी मागे वळलो.... !
**************
हे राम ! हा चित्रपट कमल हसन चा आहे व त्यामध्ये कमल हसन गांधीची हत्या करण्यासाठी गेला असतो व तो गांधीच्या काही गोष्टीमुळे बदलतो व अहिंसेच्या रस्त्यावर येतो ! व ज्यावेळी नथुराम गोंडसे हे हत्या करतात तेव्हा तो तेथेच असतो असे त्या चित्रपटाचे कथाकथन होते... !
प्रतिक्रिया
9 Apr 2009 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार
वाह !
आपल्याला पण जलिंदरमेनीया झाला का ?
कोणाकोणाला पछाडणार आहे अजुन हे भुत ते एका भडकमकर मांत्रीकालाच ठाउक.
परा वेताळ
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
9 Apr 2009 - 5:59 pm | निखिल देशपांडे
आपल्याला पण जलिंदरमेनीया झाला का ?
असेच विचारतो...
बाकी असेच लेख पाडत रहा ...... जालिंदर बांबांचा कृपे ने प्रतिसाद येत राहतिल
जालिंदर बाबा की जय
9 Apr 2009 - 6:06 pm | पाषाणभेद
आता मला कळले की आपण इतके लिखाळ कसे झालात. एकदा का जालिंदर बाबा प्रसन्न झाले की मिळवले. छान. आता तुम्हाला जालिंदरांची दिनचर्या माहीत झाली आहे. जरा जोर लावुन मला 'लिहीते व्हा ' हे लागणारे पुस्तक मागाहून द्या. म्हणजे आम्ही पण लिहीते होवु.
||जय जालिंदर ||
- पाषाणभेद
10 Apr 2009 - 1:02 pm | दशानन
>>जरा जोर लावुन मला 'लिहीते व्हा ' हे लागणारे पुस्तक मागाहून द्या
प्रयत्न करतो पण मुळात त्यांचा स्वभाव तापट, देतील का नाही माहीत नाही ;)
10 Apr 2009 - 4:12 pm | अदित्य
माझ्या मान्यवर गुरुदेवानवर होउ शकणारे असे हल्ले - निषेध असो. असो. आज पासुन मि सु़क्श्म रुपात त्यान्चा अन्गरक्शक आहे हे ध्यानात ठेवा.
त्यान्चि गादि मिच चालवणार आहे. जय हो.
9 Apr 2009 - 6:09 pm | निखिल देशपांडे
जरा जोर लावुन मला 'लिहीते व्हा ' हे लागणारे पुस्तक मागाहून द्या
असेच म्हणतो रे......साला मला पण हे पुस्तक वाचुन लिहिते व्हायला पाहिजे
9 Apr 2009 - 6:32 pm | गणा मास्तर
असे म्हणत माझ्या कडे हसत पाहत ते आपल्या स्त्री मैत्रीणीच्या खांद्यावर हात टाकून निघून गेले... !
काय हो राजे पुरुष मैत्रिण पण असते की काय?
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
10 Apr 2009 - 7:10 am | दशानन
>>>काय हो राजे पुरुष मैत्रिण पण असते की काय?
मैत्रिण = समवयस्कर ;)
स्त्री मैत्रिण = खुप मोठी / खुप लहान वयाने अशी मैत्रीण :D
***
मी बोललेलेच बरोबर असं कसे बिंबवावे दुस-याच्या मनात, हे राजे ला विचारा =))
10 Apr 2009 - 7:43 am | अवलिया
खुप लहान वयाने अशी मैत्रीण
खुप लहान म्हणजे २० च्या ऐवजी १० च्या दोन नाही ना रे ?
नाही; विचारुन घेतलेले बरे ! कसे ?
--अवलिया
9 Apr 2009 - 6:32 pm | अवलिया
मस्त रे :)
--अवलिया
9 Apr 2009 - 6:50 pm | सूहास (not verified)
वाह !
आपल्याला पण जलिंदरमेनीया झाला का ?
हेच म्हणतो...
सुहास
9 Apr 2009 - 6:56 pm | रेवती
धन्य आहात राजेसाहेब!
रेवती
9 Apr 2009 - 7:19 pm | अबोल
राजे काय करुन बसलात हे !!
आता जलिंदरचा शिष्य म्हणून लोक तुम्हा॑ला राजि॑दर उर्फ सरदारजी म्हणायला लागले तर काय करणार ?
10 Apr 2009 - 4:55 pm | धमाल मुलगा
=)) ओय राजिंद्दर्र..... ओये प्रा मेरे....ये तुने की कर दित्ता सी???
राजे, हे वागणं बरं न्हवं!
जालिंदरजींसारख्या साहित्यपीत्याला माफ करा, पितामहाला जीवे मारण्यासारखे नीच विचार तुमच्या डोक्यात तरी कसे आले? त्यांच्यासारख्या महापुरुषाला ज्यानं हिंदुस्तानातली सर्व जनता एका ध्येयानं एका वेडानं भारली होती, त्या जालींदरजींना मारण्यासाठी तुमच्या हाताना पिस्तुलाला स्पर्श करण्याचा धीरही कसा झाला म्हणतो मी?
एका परीने झाले ते बरेच म्हणा. जालिंदरजी म्हणायचे, "विरोधक मारु नका, त्याने उपयोग होत नसतो..मारायचाच तर तो विरोध मारा, विरोधक आपोआप तुमचा होऊन जाईल."
तुमच्या ह्या लेखाने जालिंदरजींच्या त्या वाक्याचा अर्थ आज मला उमगला :)
किती थोर आहे तुमचं नशीब की अशा व्यक्तीचा सहवास तुम्हाला लाभला!!
जय हो जालींदरबाबा की!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
9 Apr 2009 - 7:37 pm | मदनबाण
हा.हा.हा...राजे आपण पण ?
मैत्रीणीच्या खांद्यावर हात टाकून निघून गेले... !
ती मैनावती होती काय ?
(उपरीचर वसु)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
10 Apr 2009 - 6:14 am | भडकमकर मास्तर
माझ्या एका विरोधकाला झालेली उपरती ...
अशा काहीशा गोष्टीचा जालिंदरजींनी उल्लेख केल्याचे स्मरते....
ती गोष्ट आपण लै डीटेलमध्ये सांगितलीत, मन भरून आले.
....
स्वतःच्या उपरतीची कथा चारचौघांत सांगायला मोठे धैर्य लागते... आपण ते दाखवून दिलेत राजे, धन्यवाद.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Apr 2009 - 1:04 pm | दशानन
>>>स्वतःच्या उपरतीची कथा चारचौघांत सांगायला मोठे धैर्य लागते... आपण ते दाखवून दिलेत राजे, धन्यवाद.
तुमच्याकडून प्रतिसाद आला म्हणजे आम्ही भरभरुन पावलो !
अती आनंद झाला.... तुमची खुशाली कळवतो जालिंदरजींना ;)
10 Apr 2009 - 10:17 am | बिपिन कार्यकर्ते
जालिंदरजींना एवढी प्रसिद्धि मिळत आहे... वा!!! मन कसं अगदी भरून आलं.
"कुडबूड तेथे लुडबुड"
=))
बिपिन कार्यकर्ते
10 Apr 2009 - 3:08 pm | विनायक प्रभू
काय भानगड आहे ते मागे जाउन वाचायला पाहीजे.
14 Apr 2009 - 11:03 am | सँडी
>>हो, बघा ना माझ्या अमुक-तमुक कवितेवर फक्त ४२० प्रतिसाद आले"
:)) राजे तुम्हीपण एक (स्त्री)लेखनीक 'ठेवा'च...
-सँडी
एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.