१. एका क्षणात विदेहत्व ! : निर्विचारता

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
16 Nov 2020 - 11:20 pm

आर्ट ऑफ डाइंग - मृत्यूवर प्रेम करण्याची कला हा सोत्रींचा दिवाळी अंकातला लेख वाचून; जनमानसात अप्रिय असणार्‍या पण वास्तविकात अत्यंत मोहक अशा या विषयावर लिहिण्याचा मोह आवरला नाही. ही घ्या दिवाळी निमित्त सर्वांना एक अनमोल भेट !

१. मृत्यू ही काही फार भारी घटना नाही. पूर्वीच्या सिद्ध लोकांनी या गोष्टीचा उगीच मोठा लफडा करुन ठेवला आहे. संजीवन समाधी, (सोत्रींच्या लेखात वर्णन केलेली) जन्मभर करायची साधना, पुष्पक विमान, झालंच तर यम अँड रेडा वगैरे कल्पनांनी लोकांच्या मनात मृत्यूविषयी दहशत निर्माण करुन ठेवली आहे. वास्तविकात सिद्धाचा मृत्यू आणि सामान्याचा मृत्यू यात काहीएक फरक नाही कारण दोन्ही बाबतीत मृत्यू ही समान दैहिक घटना आहे.

इतर उत्सर्गांसारखाच मृत्यू हा संपूर्ण शरीराचा होणारा उत्सर्ग आहे इतकी साधी गोष्ट लक्षात आली की मग मरण्याची मौज काही और आहे. संभोगाची परमोच्चता उत्सर्गात आहे आणि ती केवळ इंद्रियाच्या दायर्‍यात होणारी घटना आहे. त्यामुळे (अजून मेलो नसलो तरी) संपूर्ण शरीराचाच उत्सर्ग होणं ही काय कमाल घटना असेल याची कल्पना कुणीही करु शकेल.

२. मुद्दा फक्त असा आहे की मृत्यूपूर्वी आपण देहापेक्षा वेगळे आहोत हा अनुभव यायला हवा. अज्ञानी लोकांनी याबाबतीत पण अध्यात्मात अनंत लफडी करुन ठेवली आहेत.

मुळात आपण देहापासून वेगळे आहोत ही वस्तुस्थिती आहे. थोडक्यात, देहापासून वेगळं होण्यासाठी साधना करायची करायची गरज नाही, विदेहत्व ही स्थिती ऑलरेडी आहेच. आपण देह झालेलो नाही आणि कदापि होऊ शकत नाही; आपल्याला फक्त देहाची जाणीव आहे. म्हणजे आपल्याला देह नाही तर 'देह आहे' ही जाणीव आहे. देहाला आपण आपला मानतो म्हणून आपण देहात आहोत, किंबहुना आपण देहच आहोत असा आपला गैरसमज झाला आहे. त्यामुळे देहाचा मृत्यू म्हणजे आपण संपलो असं वाटतं आणि ही मृत्यूची दहशत आहे.

दूर एक तारा आहे, आपल्याला तो दिसतोय, तो आहे याची जाणीव आहे, समजा तो निखळला तर आपल्याला आपण संपलो असं वाटत नाही, कारण त्या तार्‍याकडे आपण देहातून पाहतोय आणि तो देहापेक्षा वेगळा आहे याची आपल्याला कल्पना आहे. तद्वत, आपल्याला देहातून देहाची जाणीव होत असली तरी तारा आणि देह या एकसारख्याच जाणीवा आहेत, फरक फक्त अंतराचा आहे ! थोडक्यात, जशी तार्‍याची जाणीव होतेय अगदी तशीच (संपूर्ण) देहाची जाणीव झाली की तारा निखळला काय की देह उन्मळला काय दोन्ही एकच !

३. यासाठी एक अत्यंत सोपी साधना आहे. कोणत्याही निवांत वेळी, शांतपणे पाठ टेकून, बेड किंवा तुमच्या दिवाणावर बसा. एक कुशन मांडीवर ठेवा (त्यामुळे तुमचे खांदे स्क्वेअर राहतील) आणि त्यावर दोन्ही हात रेस्ट करा. फोटोतल्या सारख्या दोन्ही हाताच्या तर्जन्या अंगठ्याला जुळवून, त्या दोन्ही मुद्रा एकमेकात गुंफा. दोन्ही हाताची तिन्ही बोटं सहजपणे सरळ ठेवा; तर्जनी आणि अंगठ्याचे एकमेकात गुंफलेले गोल एकमेकांना स्पर्श करणार नाहीत याचं भान ठेवा.

आता शांतपणे समोर पाहा : तत्क्षणी तुमचे सगळे विचार थांबतील ! लोकांना ही निर्विचार स्थिती यायला तीस-पस्तीस वर्ष कायकाय साधना करावी लागते !

आता शांतपणे डोळे मिटा. तुमच्या लक्षात येईल की देह बसला आहे आणि आपल्याला संपूर्ण देहाची जाणीव होते आहे. यू आर ऑलमोस्ट डन !

४. आता ही साधना तुम्ही कधीही आणि कितीही वेळ करु शकता. जोपर्यंत तर्जनी आणि अंगठ्याचे गोल एकमेकांना टेकत नाहीत तोपर्यंत मनात कोणताही विचार उमटू शकत नाही. पहाटेच्या निवांत वेळी, कधी रात्री झोपण्यापूर्वी ही साधना करुन त्या निर्विचार अवस्थेची मजा घ्या. दरवेळी तुम्हाला संपूर्ण शरीराची जाणीव होईल, म्हणजे देह बसलाय आणि आपल्याला कळतंय हा अनुभव येईल.

तुम्ही या साधनेत रमायला लागलात आणि मन दीर्घकाल निर्विचार अवस्थेत राहायला लागलं की एक दिवस तुम्हाला एक भन्नाट अनुभव येईल : देह म्हणजे फक्त स्केलेटन आणि फ्लेश आहे, आत कुणीही नाही ! मेंदूत चाललेल्या मनाच्या अविरत बडबडी मुळे आणि दृश्य प्रक्षेपणामुळे आपल्याला आपण आत आहोत असा भास होत होता. वास्तविकात आत कुणीही नाही !

हा उलगडा एकदम अफलातून आहे; कारण आत मरायला कुणीही नाही ! आणि हा अनुभव आणखी सघन झाला की तुम्हाला कळेल, कुणाच्याही आत कुणीही नाही ! यालाच बुद्ध शून्यता म्हणतो. `शून्यवाद' असं काही नाही. ते बुद्धाचं आर्ग्युमंट नाही, तर शून्यता ही वास्तविकता आहे.

ही सार्वभौम शून्यता कळली की तुम्हाला मृत्यू म्हणजे संपूर्ण देहाचा उत्सर्ग आहे हे लक्षात येईल. आणि मग एका मृत्यूत हजार संभोगांची उत्कटता आहे असं का म्हटलंय ते कळेल !
_________________________________________

हा लेखाचा विषय नाही पण साधनेतून डायवर्शन होऊ नाही म्हणून लिहितो. बुद्धाला हा उलगडा आयुष्यभर साधना करुन सरते शेवटी आलेल्या हताशेत अचानकपणे झाला. त्यामुळे त्याला वास्तविकता कळली पण त्याप्रत पोहोचण्याचा मार्ग कळला नाही. त्यानं विपश्यना ही साधना शोधली आणि प्रचलित केली. याचा दुहेरी तोटा झाला; एकतर विपश्यनेतून शून्याचा उलगडा असंभव आहे कारण त्यात अनेक पायर्‍या आहेत आणि गेल्या अडीच हजार वर्षात कुणीही त्या साधनेनं सिद्ध झाला नाही. किमान मी जितक्या उघडपणे आणि सहजतेनं शून्यता मांडली आहे तितकी बुद्धाचा (किंवा विपश्यनेचा) कुणीही साधक मांडू शकला नाही. दुसरा तोटा असा झाला की शून्यता हा शून्यवाद (आर्ग्युमंट ) समजला गेला आणि तो निरिश्वर वादाशी जोडला जाऊन नैराश्यवाद मानला गेला. मग त्याविरोधात पूर्णवाद मांडला गेला. अशाप्रकारे अनूभवशून्य आणि आकलनहीन लोकांना विवादाशिवाय काहीही जमत नसल्यानं, एका सुरेख वस्तुस्थिचा अनुभव घेण्याऐवजी, गेली हजारो वर्ष तो केवळ वैचारिक मैथुनाचा विषय झाला.

इथले सदस्य विवादापूर्वी अनुभव घेतील अशी अपेक्षा करतो कारण अनुभवानंतर विवादाची गरज उरत नाही.

काही भाग संपादित
- मिपा व्यवस्थापन

जीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

कानडाऊ योगेशु's picture

25 Nov 2020 - 11:10 pm | कानडाऊ योगेशु

इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे.

ह्या निमित्ताने तुम्हीही मारुतीच्या बेंबीत बोट घातले म्हणा कि डॉक्टरसाहेब! (ह.घ्या)

ती इतके दिवस `विविध मार्गानी केली ' याचा अत्यंत तर्कशुद्ध निष्कर्ष असा की त्यांनी सांगितलेली साधना केलीच नाही असा होतो. पण सध्या इतके स्पष्ट लिहिण्याला आम्ही आवर घातला आहे आणि अत्यंत नम्रपणे त्यांना सविस्तर प्रतिसाद दिला आहे हे आपल्याही लक्षात आले असेल.

आपण साधना केलीत याबद्दल प्रथम अभिनंदन !

१. इतके दिवस या साधनेचा मी विविध मार्गानी प्रयोग केल्यावर मला असे लक्षात येते आहे.

साधनेत विविध मार्ग नाहीत ती एकमार्गी आहे. एखाद्यानं स्वतःचा नवा मार्ग शोधला तर तो त्याचा मार्ग असेल, माझा नाही असे नमूद करतो. त्यामुळे निर्विचार स्थिती आली नाही तर तो दोष साधनेला देता येणार नाही असे वाटते.

२.

जे होतं ते फक्त तुमचा मन विचलित झाल्यामुळे मनात चालू असलेले विचार हे सबकॉन्शस होतात (जाणिवेच्या पातळीपर्यंत पोचत नाहीत.)

हे आपले नवे स्वयंशोधित संशोधन आहे असे नम्रपणे नमूद करतो. मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबल्यावर मन विचलित होण्याचा प्रश्नच येत नाही. थोडक्यात, शांततेचा अर्थच नो-माईंड असा होतो, जे उरतच नाही ते विचलित होऊ शकत नाही.

३. तुम्ही त्याकडे पाहणे सोडले कि विचार परत जाणिवेच्या पातळीवर येतातच ?

तुम्ही कशाकडे पाहात होतात ? त्याच्याकडे म्हणजे नक्की कुठे ? कारण नजर समोर असल्यावर जे काही समोर आहे ते (मनानी दृष्य-प्रक्षेपण थांबवल्यामुळे) स्पष्ट दिसायला लागतं . नॉर्मली आपलं पाहणं हे मनातून होणार्‍या दृष्य-प्रक्षेपणामुळे अच्छादित झालेलं असतं. समोरचं क्रिस्टल क्लिअर दिसणं हा एक अपूर्व अनुभव आहे.

४. यामुळेच या साधनेचा सुरुवातीला ज्यांना फायदा होतो असे जाणवते त्यांना हा फायदा काही दिवसांनी अजिबात होत नाही असे लक्षात येईल.

एकदा तुम्ही म्हणता की सुरुवातीला सुद्धा विचार थांबले नाहीत आणि नंतर म्हणता की काही दिवसांनी अजिबात फायदा होणार नाही. या विधानात अंतर्विरोध आहे असे आपल्याला जाणवले नाही का ? एकदा निर्विचार स्थिती आली की ती कायम पुन्हा-पुन्हा येत जाणार आणि दिवसेंदिवस व्यक्ती जास्त सजग आणि बुद्धीमान होत जाणार कारण अविरत चाललेली मेंटल अ‍ॅक्टीविटीच मेंदूला विश्रांती मिळू देत नाही.

५. मनात विचार न येणे आणि मन विचलित झाल्याने विचाराची जाणीव न होणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

मन विचलित न झाल्याने विचाराची जाणीव न होणे ? हा आपला कमालीचा स्वयंशोध आहे असे नम्रपणे नमूद करतो. जिथे विचारच नाहीत तिथे मन कसे येईल ? जर मनच नसेल तर विचलित काय होणार ?

थोडक्यात, आपण स्वतःची काही तरी शक्कल लढवून वेगळाच प्रयोग केला आहे त्यामुळे आपल्याला ` मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं ' या तत्क्षणी येणार्‍या प्रचितीचा अनुभव आला नाही. जो इथे इतरांना आला आहे त्यामुळे ती ध्यानपद्धती पूर्णपणे वेरिफाय झाली आहे.

________________________________

असो, बाकी आपण सवयी प्रमाणे व्यक्तिगत शेरेबाजी केली आहे त्याकडे आम्ही नेहेमीप्रमाणे दुर्लक्ष करत आहोत.

सुबोध खरे's picture

26 Nov 2020 - 9:29 am | सुबोध खरे

मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं

हे आपणच ठरवलेले कुभांड आहे. त्याचा आपल्याकडे काही तरी पुरावा आहे का?

f MRI हे एक आधुनिक तंत्र आहे जे मेंदूची (मनाची) सक्रियता दाखवते. सिद्ध लोक जेंव्हा समाधी अवस्थेत जातात तेंव्हा त्यांच्या मेंदूची अवस्था काय असते ते या तंत्राने दिसू शकते.

असलं काहीही न करता मेंटल ऍक्टिव्हिटी थांबवली असण्याच्या फुकटच्या थापा मारू नका

आयला हा विषय गुंतागुंतीचा आहे.

भावातीत ध्यानाची स्थिती गॅमा वगैरे किरणांच्या मदतीने मोजता येते असे म्हणतात.
तसा काही अभ्यास लेखकाने केला आहे का?

गॅमा किरणे? हे राम. अहो आयनायझिंग रेडिएशन आहे की ते.. दूरच बरे.

सॉरी गॅमा नव्हे, काहीतरी बीटा थिटा वेव्ह अभ्यास करता येतो असे म्हणतात.
निरंजन घाटे यांचे संभव असंभव या बाबतीत बरेच काही सांगते.
त्यांनी भावातीत ध्यान करणाऱ्या अनेक लोकांच्या मेंदूचा अभ्यास केला गेला आहे असे लिहिले होते.

डॅनी ओशन's picture

26 Nov 2020 - 11:48 am | डॅनी ओशन

आमच्या अपूर्ण म्याग्नम ओपसची आठवण झाली.

सूक्ष्म कण असो, अतिनील किरण असो, हे तर आमचे अस्त्र असे,
शब्दांच्या गर्तेत खोलवर, पाहाता काहीही दडले नसे !

संजय क्षीरसागर's picture

26 Nov 2020 - 11:14 pm | संजय क्षीरसागर

आपण शोधक नजरेने वाचले तर मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबल्याची ग्वाही इथे आठ जणांनी दिली आहे (गवि, शविकु, टर्मिनेटर, डिबी, चित्रगुप्त, स्त्री सदस्या व त्यांची आई आणि त्यांची अबोध कन्या). त्यामुळे आपली मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली नाही याचा अर्थ आपण सांगितलेली साधना केली न करता स्वयंशोधित साधना केली हा आमचा कयास आता खरा ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही.

अर्थात, आपल्याला ताप आला आहे हे पेशंटला डॉक्टरच्या आधी कळते, हा आमचा बाळबोध दावा आपल्यासारख्या सुबोध व्यक्तीला कळण्यात काही दुर्बोधता नसावी असे आम्हाला वाटते. तद्वत, मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली की नाही यासाठी आपण जी अत्याधुनिक तांत्रिक चाचणी नमूद केली आहे त्याची आमच्या मते तरी गरज नाही. भूक लागली आहे हे आपल्याला कळल्यावर जेवून घेणे श्रेयस आहे, अशा वेळी यंत्राने तपासणी करुन खातरजमा करुन घेणे या कामात एकतर निष्कारण खर्च वाढेल आणि `यंत्राने जेवू नका' असे सांगितले तर `जेवू की नको ' ? असा फुकटचा संभ्रम होईल , असे आमच्या अल्पमतीला वाटते.

संजय क्षीरसागर's picture

26 Nov 2020 - 11:53 pm | संजय क्षीरसागर

* आपली मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली नाही याचा अर्थ आपण सांगितलेली साधना न करता स्वयंशोधित साधना केली हा आमचा कयास आता खरा ठरला आहे असे म्हणायला हरकत नाही

शा वि कु's picture

26 Nov 2020 - 10:53 am | शा वि कु

एफ एमआरआय मशिनद्वारे इतर कोणत्या ध्यानपद्धतीची टेस्ट झाली आहे काय ? त्यातून काय निष्पन्न झाले आहे ? नसेल झाली तर हा निकष सर्वठिकाणी लावायला हवा का ?

(तुम्ही पण एकूणच अध्यात्म या विषयाबद्दलच साशंक आहात का (माझ्यासारखे) का फक्त संक्षिच्या अध्यात्माबाबत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.)

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 10:58 am | शाम भागवत

जग्गी वासुदेव यांची झाली आहे. कुठल्यातरी व्हिडिओमध्ये ऐकल्याचे आठवते

शा वि कु's picture

26 Nov 2020 - 11:07 am | शा वि कु

ती झाली असल्यास, जग्गी वासुदेव या व्यक्तीची झाली का त्यांनी शिकवलेल्या ध्यान पद्धतीची इतरांवर झाली यावर स्पष्टीकरण गरजेचे आहे.

अवांतर- जग्गी वासुदेवांचा ग्रहणातल्या खराब होणाऱ्या खाण्याचा "प्रयोग" (म्हणे. आम्हाला काय त्यात प्रयोगासदृश्य काहीही वाटले नाही.) पाहून त्यांच्या बद्दल असलेला साशंक भाव बळकट झाला.

शाम भागवत's picture

26 Nov 2020 - 3:56 pm | शाम भागवत

मी फक्त माहिती टेबलावर आणली. ज्याला रस असेल तो शोधेल अशा अपेक्षेत. 😀

अवांतरांत तर मला बिलकूल रस नाही.
परत एकदा 😀

शा वि कु's picture

26 Nov 2020 - 11:10 am | शा वि कु

ते मिळाल्यास डॉक्टर साहेबांनी ते पेपर्स मिळाल्यास योग्य प्रकारे निष्कर्ष काढलेत का हे जमल्यास सांगावे.

सुबोध खरे's picture

26 Nov 2020 - 11:30 am | सुबोध खरे

जालावर भरपूर दुवे उपलब्ध आहेत. ज्यांना हवंय त्यांनी जरूर शोधावे.

मी दुवे अजिबात देणार नाही.

संक्षीनि सज्जड पुरावे दाखवावेत कि माणूस विचारशून्य होतो. फुकटची थापेबाजी फार झाली.

शा वि कु's picture

26 Nov 2020 - 11:40 am | शा वि कु

अस आहे होय. ब्वर.

सुबोध खरे's picture

26 Nov 2020 - 11:51 am | सुबोध खरे

The Meditative Mind: A Comprehensive Meta-Analysis of MRI Studies
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4471247/

4 weeks of pranayama significantly reduce the levels of anxiety and negative affect, and that these changes are associated with the modulation of activity and connectivity in brain areas involved in emotion processing, attention, and awareness.

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7253694/

हे घ्या आयते दुवे.

जिज्ञासूंनी आत्मनिर्भर व्हावे अशी विनंती

निरंजन घाटे यांचे संभव असंभव वाचा. त्यात त्यांनी या सगळ्याचा सुबदर मागोवा घेतला आहे.

१.

एफ एमआरआय मशिनद्वारे इतर कोणत्या ध्यानपद्धतीची टेस्ट झाली आहे काय ? त्यातून काय निष्पन्न झाले आहे ? नसेल झाली तर हा निकष सर्वठिकाणी लावायला हवा का ?

आपलं विदेहत्त्व समजणं म्हणजे सिद्धत्व आहे त्यामुळे देहाची किंवा त्याच्या कोणत्याही अवयवाची चाचणी करणारे आणि करवून घेणारे दोघेही निर्बुद्ध प्रयास करत आहेत ही उघड गोष्ट उपरोक्त लेख वाचून आपल्या लक्षात यायला काही हरकत, नाही असे आम्हास वाटते.

२.

तुम्ही पण एकूणच अध्यात्म या विषयाबद्दलच साशंक आहात का (माझ्यासारखे) का फक्त संक्षिच्या अध्यात्माबाबत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय

`स्वतःचा स्वतःला बोध नसणे ' या दुर्बोध अवस्थेलाच अध्यात्मात मूढता म्हटले आहे असे आमचे अल्प आकलन सांगते. यावर ओशोंचे हे विधान आपल्याला पटेल असे वाटते :

मूढ का वास्तविक अर्थ मूर्ख नही है | मूढ भी समझता तो है लेकिन तब तक वक्त हाथसे निकल गया होता है |

थोडक्यात, आपण सत्य आहोत हे मूढाला समजत नाही असे नाही कारण सत्यच चराचर व्यापून आहे त्यामुळे तो ही सत्यच आहे, पण तो स्वतःला व्यक्ती समजतो आणि त्याच्या धरणा इतक्या मूर्खपणाच्या असतात की आपण सत्य आहोत की नाही हे तो मशीनला विचारतो ! आणि त्याला इतकी साधी गोष्ट समजेपर्यंत मृत्यू समीप येऊन ठेपलेला असतो. मृत्यूची दहशत मग त्याला मृत्यू देहाचा झाला तरी `देहात कुणीही नाही ' हा उलगडा होण्यापासून वंचित ठेवते, असे आमचे अवलोकन आहे.

उपरोक्त लेख आपण नजरेखालून घातल्यास लेखाचा विषय आणि कंटेंट हाच संदेश देतो हे आपल्या चाणाक्ष बुद्धीला समजणे अवघड नाही, असे आम्हास वाटते.

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 9:25 am | सुबोध खरे

कशाला फुकट फोका मारताय परत परत .

आपले मन विचारशून्य झाले आहे याचा एकतरी पुरावा आहे का आपल्याकडे ?

तो पुरावा दाखवा नाही तर भंपक वाद घालणं थांबवा

उगाच शब्दांचे डोंगर रचून लोकांना कायम शेंडी लावता येणार नाही लक्षात ठेवा.

शा वि कु's picture

27 Nov 2020 - 10:47 am | शा वि कु

आपलं विदेहत्त्व समजणं म्हणजे सिद्धत्व आहे त्यामुळे देहाची किंवा त्याच्या कोणत्याही अवयवाची चाचणी करणारे आणि करवून घेणारे दोघेही निर्बुद्ध प्रयास करत आहेत ही उघड गोष्ट उपरोक्त लेख वाचून आपल्या लक्षात यायला काही हरकत, नाही असे आम्हास वाटते.

या लेखात तुम्ही एक प्रयोग दिला आहे, ज्याचे दोन परिणाम होतात असं तुमचं म्हणणं आहे-
१) विचारांचा कोलाहल थांबतो.
२) विदेहत्वाचा अनुभव येतो.
यातील १) चा अनुभव मला आला. त्याबाबत आभारी आहे. २) चा अनुभव नाही आला. या प्रयोगपलीकडे अदेहत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न या लेखात मला नाही दिसला. त्यामुळे हा लेख वाचून अदेहत्व किंवा सिद्धत्व पटणे शक्य नाही, जर २) चा अनुभव नाही आला तर.

अदेहत्व आहे, सिद्धत्व हे संपूर्ण सत्य आहे वैगेरे मला पटत नाही. केवळ तुम्हाला पटते म्हणून आणि वारंवार ते सत्यच आहे म्हणल्याने माझ्या मतात फरक पडणे शक्य नाही. अवयवांची चाचणी करणारे निर्बुद्ध, हे म्हणून तुम्ही कोणताही नवा युक्तिवाद करत नाही आहात. शरीराशिवाय अस्तित्व असते ह्या गोष्टीची स्क्रुटीनि "देव असतो की नाही" या पायावर करा, तर तुम्हाला माझा मुद्दा लक्षात येऊ शकतो. तिथे ज्या प्रकारच्या empirical पुराव्यांवर तुमचा जोर होता, तो इथे नावालाही दिसत नाही, उलटपक्षी धुडकावलेला दिसत आहे. केवळ देवतेची अनुभूती झाली, दत्तगुरु स्वप्नात आले, असल्या दृष्टांताने तुमचा जितका देवावर विश्वास बसणार नाही तसाच कोणत्याही अनुभवाने माझा विदेहत्वावर विश्वास बसणार नाही, जोवर देहाशिवाय कोणत्याही प्रकारचे अस्तित्व किंवा अनुभव शक्य आहेत हे पटत नाही तोवर.

आपण सत्य आहोत हे मूढाला समजत नाही असे नाही कारण सत्यच चराचर व्यापून आहे त्यामुळे तो ही सत्यच आहे, पण तो स्वतःला व्यक्ती समजतो आणि त्याच्या धरणा इतक्या मूर्खपणाच्या असतात की आपण सत्य आहोत की नाही हे तो मशीनला विचारतो ! आणि त्याला इतकी साधी गोष्ट समजेपर्यंत मृत्यू समीप येऊन ठेपलेला असतो. मृत्यूची दहशत मग त्याला मृत्यू देहाचा झाला तरी `देहात कुणीही नाही ' हा उलगडा होण्यापासून वंचित ठेवते, असे आमचे अवलोकन आहे.

कोणत्याही तर्कांशिवाय आणि पुराव्यांशीवाय कितीही रिपिटेशन केली तरी या मुढाला तरी काही पटणार नाही. उलटं या मूढाचा तिसराच विश्वास बळावत चाललाय, कि कोणत्याही कारणाशिवाय आणि अत्यंत सीमित काळामधल्या अस्तित्वाला उद्देश्य आणि अमरत्वाची झालरं लावून स्वतःला गंडवण्याचा प्रकार म्हणजे अध्यात्म होय.

उपरोक्त लेख आपण नजरेखालून घातल्यास लेखाचा विषय आणि कंटेंट हाच संदेश देतो हे आपल्या चाणाक्ष बुद्धीला समजणे अवघड नाही, असे आम्हास वाटते.

खरे आहे. पण स्वतःला आणि इतर काही सदस्यांना झालेल्या अतार्किक अनुभवांमुळे त्याहून अतार्किक निष्कर्ष काढला गेला आहे असे अस्मादिकांचे मत पडले.

धागालेखक इतर लोकांना त्यांच्या देवविषयक, अतिंद्रीय शक्तीविषयक श्रद्धा बाळगण्यासाठी मुर्खात काढतात. या लोकांच्या श्रद्धा त्यांना "अनुभव आला" याच मतावर आधारीत असतात. तिथे लेखक रिचर्ड डॉकिन्सचे काका असल्याच्या अविर्भावात तुटून पडतात.

आणि स्वतः मात्र त्यांनी जे सांगितले त्याचा चार लोकांना "अनुभव आला" तर वैज्ञानिक सत्य पुढे आणल्याची बोंब ठोकतात. नियंत्रीत चाचणी हा प्रकार या विज्ञानवादी लेखकाच्या गावीच नाही. त्यामुळे चार मिपाकरांना "अनुभव आला" हे इतकेच त्यांच्या दाव्याच्या वैज्ञानिक सत्य असण्यासाठी पुरेसे आहे. अतिशय हास्यास्पद प्रकार आहे हा. लोकांच्या श्रद्धांना अंधश्रद्धा म्हणून हीणवताना आपण स्वतःच एक श्रद्धा पसरवून तिची कसलीही चाचणी न करता केवळ "लोकांना अनुभव आला" म्हणून ती वैज्ञानिक सत्याचे निकष पुर्ण करते म्हणून बोंब ठोकत आहेत.

भोंदू बाबांबद्दल ऐकले होते, आता भोंदू विज्ञाननिष्ठ व्यक्तीबद्दलही वाचायला मिळत आहे. आनंद आहे.

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 11:51 am | सुबोध खरे

भोंदू विज्ञाननिष्ठ

याला आक्षेप आहे

भोंदू स्वनिष्ठ हे खरं रूपक

संजय क्षीरसागर's picture

27 Nov 2020 - 3:48 pm | संजय क्षीरसागर

१.

अदेहत्व आहे, सिद्धत्व हे संपूर्ण सत्य आहे वैगेरे मला पटत नाही. ....तुमचा जितका देवावर विश्वास बसणार नाही तसाच कोणत्याही अनुभवाने माझा विदेहत्वावर विश्वास बसणार नाही, जोवर देहाशिवाय कोणत्याही प्रकारचे अस्तित्व किंवा अनुभव शक्य आहेत हे पटत नाही तोवर.

ज्यात देह वावरतो आहे, ज्यात करोडो ग्रहमाला, चंद्र-सूर्य-तारे फिरतायंत ते काय आहे ? हा प्रश्न स्वतःला शांतवेळी विचारुन पाहा. त्या अथांग आणि अंतर्बाह्य व्यापणार्‍या पोकळी शिवाय अस्तित्त्वाची निर्मिती-चलन-आणि लय शक्य आहे काय ? या साध्या गोष्टीचं उत्तर शोधा. म्हणजे देहापलिकडे अस्तित्त्व आहे हे तुम्हाला कळेल . वास्तविकात सत्य आता, या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर आहे पण तुम्हाला ते मान्य नाही कारण विचारांचं प्रोजेक्शन त्यावर झाल्यामुळे इतकी उघड गोष्ट दिसत नाही हा खरा प्रश्न आहे.

माझी साधनापद्धती फक्त एकच काम करते, मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबवणं ! त्यामुळे तुमची नजर समोरचं सत्य पाहते आणि तुम्हाला विदेहत्त्वाचाही अनुभव येतो.

२.

कोणत्याही तर्कांशिवाय आणि पुराव्यांशीवाय कितीही रिपिटेशन केली तरी या मुढाला तरी काही पटणार नाही. उलटं या मूढाचा तिसराच विश्वास बळावत चाललाय, कि कोणत्याही कारणाशिवाय आणि अत्यंत सीमित काळामधल्या अस्तित्वाला उद्देश्य आणि अमरत्वाची झालरं लावून स्वतःला गंडवण्याचा प्रकार म्हणजे अध्यात्म होय.

नेमका हाच इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स आहे ! लेखमालेतला दुसरा लेख वाचलात तर ते तुमच्या सहज लक्षात येईल.

३.

खरे आहे. पण स्वतःला आणि इतर काही सदस्यांना झालेल्या अतार्किक अनुभवांमुळे त्याहून अतार्किक निष्कर्ष काढला गेला आहे असे अस्मादिकांचे मत पडले.

मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबली हा तुमचा अनुभव आहे, तर्क नाही ! काही काळ साधना केलीत तर 'आपण मूढ नसून सत्य आहोत ' हा उलगडा होणं अवघड नाही.

कानडाऊ योगेशु's picture

26 Nov 2020 - 11:54 am | कानडाऊ योगेशु

मेंटल अ‍ॅक्टीविटी थांबणं ' या तत्क्षणी येणार्‍या प्रचितीचा अनुभव आला नाही. जो इथे इतरांना आला आहे त्यामुळे ती ध्यानपद्धती पूर्णपणे वेरिफाय झाली आहे.

माझ्यामते इथे अनुमान काढायला घाई होते आहे असे वाटते. मिपाकरांनी कुतुहल म्हणुन प्रयोग केला असावा. हे म्हणजे जिम लावल्यानंतर काही दिवस वाटणार्या उत्साहासारखे आहे. ह्याचे सातत्य किती दिवस राहते हे पाहणे योग्य ठरेल. योगायोगाने आपल्या मातोश्रीच आपल्या पध्दतीचे अनुकरण करताहेत तेव्हा त्यांचा अनुभवसातत्यच योग्य ते अनुमान काढायला उचित ठरेल.

`पेशंटने औषध घेतले की नाही ? ' याची तो रोज सकाळी उठून चवकशी करतांना आमच्या तरी पाहण्यात नाही. आपलाही तसा अनुभव नसावा, असे आम्हास वाटते.

याच रितीने औषध न घेतल्याने जर पेशंट दगावला तर डॉक्टरच्या नांवाने शंख करता येईल का ? हा प्रश्न आपण स्वतःला विचारुन पाहावा, असे आपणास सुचवेन.

ध्यानपद्धती निर्विचारतेकडे नेते हे सिद्ध झाले आहे आता लोकांनी रोज ध्यान करुन `देहात कुणीही नाही ' याची प्रचिती घेतली का ? हे पाहणे म्हणजे त्यांच्या सारासार बुद्धीवर संशय घेणे होईल असे आम्हास वाटते आणि आमच्या भिडस्त स्वभावामुळे आम्हास तसे करण्यात स्वतःचे आयुष्य खर्ची घालावे असे वाटत नाही हे सुद्धा तितक्याच नम्रपणे सांगावेसे वाटते.

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 9:33 am | सुबोध खरे

ध्यानपद्धती निर्विचारतेकडे नेते हे सिद्ध झाले आहे

कुठे झालंय? कुणी केलंय? काही दुवा पुरावा ?

एकीकडे अशी विधाने करायची आणि मग पुरावा द्या सांगितलंय तर भंपक वाद घालत राहायचं.

इतका दांभिकपणा पुरे झाला

साधं सरळ आहे-- नुसतं बोटाला बोट लावून आपले मन विचाररहित होते याचा सज्जड पुरावा द्या

नाही तर

थापा मारताय म्हणून मान्य करा.

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 9:36 am | सुबोध खरे

आमच्या भिडस्त स्वभावामुळे

ह ह पु वा

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 10:33 am | सुबोध खरे

`पेशंटने औषध घेतले की नाही ?

रुग्णाने औषध घेतले कि नाही हे चाचणी करून पाहणे एकदम सोपे असते. उदा मधुमेहाचे औषध घेतले कि रक्तातील साखर कमी झालेली चाचणीत दिसतेच.

किंवा रक्तदाब कमी झाला आहे कि नाही हे तो मोजल्यास दिसून येते.

आमचं म्हणणं एवढंच आहे कि अशी काही चाचणी तुम्ही करून पाहिली आहे का किंवा अशी काही चाचणी आपल्याला माहिती आहे का?

f MRI हि अशी एक चाचणी आहे ज्यात मेंदूच्या विविध भागाचे कार्य तपासले जाते. हे कार्य "ध्यान करत असताना, झोपलेले असताना, भयपट पाहत असताना, उत्तान शृंगारिक चित्रपट पाहताना अशा अनेक वेळेस कसे चालते हे तपासता येते

कोणतेही काम करताना किंवा समाधी लावलेली असताना झोपलेले असताना मेंदूचे कोणते ना कोणते भाग चालू असतातच आणि विचारशून्यता येत नाही असे सहज सिद्ध झालेले आहे. जालावर याबद्दल विपुल माहिती उपलब्ध आहे.

असा एक प्रश्न आम्हाला कायम पडतो. इन्शुलीन घेतल्यावर शुगर कमी होते हा सार्वत्रिक अनुभव आहे पण डॉक्टर प्रत्येक पेशंटकडे जाऊन त्यानं औषध घेतलं का ? असं विचारत नाही असा मुद्दा होता अर्थात, आपण तसे करत असाल तर ते अपवादात्मक होईल, असे आम्हास वाटते. तद्वत, आम्हाला कोण साधना करतो हे रोज उठून विचारणे शक्य नाही असे आमचे म्हणणे आहे.

२.

f MRI हि अशी एक चाचणी आहे ज्यात मेंदूच्या विविध भागाचे कार्य तपासले जाते. हे कार्य "ध्यान करत असताना, झोपलेले असताना, भयपट पाहत असताना, उत्तान शृंगारिक चित्रपट पाहताना अशा अनेक वेळेस कसे चालते हे तपासता येते

बाळबोध विचारांची मालिका संपण्याचे नांव नाही असे आता आम्हाला वाटू लागले आहे. लोकांचे विचारचक्र थांबले हे त्यांना कळल्यावर पुन्हा हा खर्च ते कशापायी करतील ? असे आम्हास वाटते. म्हणजे एखाद्याने धडधाकट असतांना डॉक्टरकडे जाऊन `माझी संपूर्ण तपासणी करा' म्हणण्यासारखे आहे हे तरी आपल्याला पटेल अशी अपेक्षा करतो.

३.

कोणतेही काम करताना किंवा समाधी लावलेली असताना झोपलेले असताना मेंदूचे कोणते ना कोणते भाग चालू असतातच आणि विचारशून्यता येत नाही असे सहज सिद्ध झालेले आहे.

आपल्याला मेंदू आणि विचार यातला फरक सांगण्याची वेळ आमच्यावर यावी हे आमचे सुदैव की आपले दुर्दैव ? असा प्रश्न आता पडला आहे. साधना मेंदूचे कार्य थांबवत नाही तर विचारचक्र थांबवते असा मुद्दा आहे.

सुबोध खरे's picture

27 Nov 2020 - 6:09 pm | सुबोध खरे

कशाला फुकट फोका मारताय परत परत .

आपले मन विचारशून्य झाले आहे याचा

एकतरी पुरावा
आहे का आपल्याकडे ?

तो पुरावा दाखवा नाही तर भंपक वाद घालणं थांबवा

उगाच शब्दांचे डोंगर रचून लोकांना कायम शेंडी लावता येणार नाही लक्षात ठेवा.

संजय क्षीरसागर's picture

27 Nov 2020 - 8:16 pm | संजय क्षीरसागर

`दुर्बोध ' स्थिती असे म्हणतात म्हणजे साधक वाचत नाही असे नाही पण त्याला अर्थच कळत नाही ! असे आमचे आकलन आहे.

१.

आपले मन विचारशून्य झाले आहे याचा एकतरी पुरावा आहे का आपल्याकडे ?

आपल्याला आठ जणांना विचार थांबल्याची प्रचिती आली हे त्यांच्या नांवासकट पहिल्याच प्रतिसादात सांगितले होते, अर्थात आपल्यासारख्या कुशाग्र बुद्धीच्या व्यक्तीने ते वाचले नसेल असे नाही पण सदस्याचे प्रतिसादच त्याचे आकलन दर्शवतात, असे आम्हास वाटते. तरी आपण आपल्याला दिलेला पहिला प्रतिसाद पुन्हा वाचावा असे सुचवेन. कारण आमच्यावर जरी अशी वेळ कधी आली नाही तरी शाळेत एखाद्या विद्यार्थ्याला समजले नाही तर गुरुजी ती गोष्ट त्याला आणखी दहा वेळा करायला लावत असे आम्हाला पक्के आठवते.

२.

उगाच शब्दांचे डोंगर रचून लोकांना कायम शेंडी लावता येणार नाही लक्षात ठेवा.

साधना न करताच बिनधास्तपणे, आपण सदस्यांना 'विचार थांबत नाहीत' असे ठोकून देण्याचे जे औधृत्य केले आणि त्यांची दिशाभूल करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला, त्याला `शेंडी लावणे' असे म्हणतात, असे शब्दकोष सांगतो. अर्थात, आमच्या चाणाक्षपणामुळे आपल्याला शेंडीवर आपटण्याचा अनुभव काय असेल याची आम्ही प्रचिती दिली, हे आपल्या लक्षात आले असेलच.

आपल्याला आठ जणांना विचार थांबल्याची प्रचिती आली हे त्यांच्या नांवासकट पहिल्याच प्रतिसादात सांगितले होते

मी भूत पाहीले आहे किंवा मला अतिंद्रीय शक्तींचा अनुभव आला आहे असं मानणारी दहा माणसं मी तुमच्यासमोर उभी केली तर तुम्ही भूते असतात किंवा अतिंद्रीय शक्ती अस्तित्वात असतात हे मान्य करणार का?

कुठलेही पाल्हाळ न लावता, कोणताही प्रतिप्रश्न न करता हो की नाही एव्हढंच उत्तर द्या.

उपरोक्त साधना केल्यावर आठ वेगवेगळ्या व्यक्तींना, वेगवेगळ्या ठिकाणी एकच अनुभव आला असा त्याचा अर्थ होतो.

भूत पाहिलेल्या व्यक्तींना `ते दिसेल 'अशी कोणती `साधना 'आपल्या दिव्य ज्ञानानी आपण सांगितली आणि तसे घडले ?

त्यांनी रात्री रानात जाण्याची, पडक्या वाड्यात जाण्याची, पडक्या विहीरीच्या कडेने जाण्याची साधना केली होती. बाकी तुम्ही बोटांचे लोलक बनवून त्याकडे पाहण्याला साधना हा भारी शब्द शोधला आहे. :)

संजय क्षीरसागर's picture

28 Nov 2020 - 11:59 pm | संजय क्षीरसागर

त्यांनी रात्री रानात जाण्याची, पडक्या वाड्यात जाण्याची, पडक्या विहीरीच्या कडेने जाण्याची साधना केली होती

ती साधना तुम्ही शिकवली होती का ? आणि कुठे प्राप्त केलं ते दिव्य ज्ञान ? तुमची अध्यात्मिक समज शून्य. प्रतिसाद कळत नाहीत. पिंका टाकण्यापलिकडे काहीही करता येत नाही. स्वतःचं लेखन शून्य ! दरवेळी अशी शोभा करुन घेऊ नका.

संगणकनंद's picture

29 Nov 2020 - 2:04 pm | संगणकनंद

तुम्ही जी माझी साधना माझी साधना म्हणून टीमकी वाजवत आहात, ती केवळ एक शारीरीक क्रिया आहे. इथले अभ्यासू सदस्य अर्धवटराव यांनी तुमची व्यवस्थित पोल खोलली आहे. तिथे मात्र तुमची बोलती बंद आहे.

आणि चार लोक "अनुभव आला" म्हणतात म्हटलं तर तुम्ही वेज्ञानिक निकषाच्या गोष्टी करत आहात. अर्थात विज्ञान कशाशी खातात हे तुमच्या गावीही नाही म्हणा.

कानडाऊ योगेशु's picture

27 Nov 2020 - 7:08 pm | कानडाऊ योगेशु

अहो सर साध्या सर्दी पडशाची गोष्ट नाही आहे हो ही.. नव्हे जरी असलीच तरी सध्याची करोनाची लसचाचणीबद्दल तुम्ही अनभिज्ञ आहात काय?
इथे एखादा दुसरा डॉक्टरच काय तर चक्क सरकारी यंत्रणाच स्वैच्छिक रुग्णांना एखाद दिवसच नव्हे तर महिनोनमहिने देखरेखीखाली ठेवत आहेत.
बाकी आदरणीय सोत्रि गुरुंजीनी जिथे मौन राहणे पसंत केले तिथे मी ह्याउप्पर काय बोलणार.

अर्धवटराव's picture

25 Nov 2020 - 6:25 pm | अर्धवटराव

शरीराला जड न ठेवता पाण्यासारखं वाहतं ठेवा असं ब्रुसली सांगयचा. एक्सेपशनल एक्सलन्स प्राप्त करायचं असेल साधारण मर्यादांच्या बाहेर शरीराला न्यावेच लागते. व्ययाम करताना, त्यातल्या त्यात दंड-बैठका मारताना आमचे वस्ताद हिच पद्धत शिकवायचे. दृष्टी एका ठिकाणी स्थीर ठेऊन बैठका मारणं सुरु केलं कि काहि वेळात बैठका मारणार्‍या शरीराप्रती एकप्रकारचा साक्षीभाव तयार करायचा. त्यामुळे शरीर दुखायला जरी लागलं तरी व्यायाम पूर्ण व्हायचा, वाढवता यायचा. तोच परिणाम विचार 'बघण्याच्या' ध्यान प्रॅक्टीसचा . थोडी तयारी झाली कि राग, भिती.. कुठलिही भावना साक्षीभावाने बघता यायची.

पण हे सर्व शरीर आणि मनाच्या पातळीवरच होतं. आपण ज्याला मन/शरीर म्हणतो त्यातले १०% सुद्धा आपल्याला नित्य परिचयात येत नाहि. काहि विशिष्ट उपचार केले कि हे पदर उलगडायला लागतात. पण त्याला उगाच भलत्या वेष्टणात लपेटायची काहि गरज नाहि.

उन्मेष दिक्षीत's picture

25 Nov 2020 - 11:12 pm | उन्मेष दिक्षीत

ने डेवलप केलेल्या जि-कुन-दो वर जे कृष्णमूर्ती आणि अ‍ॅलन वॉट्स च्या आध्यात्मिक शिकवणुकीचा प्रॅक्टिकल प्रभाव होता.

तुमच्या लेखी फक्त शरिर आहे आपण नाही, तर साक्षीभाव कुठुन आला ? ध्यान कशाला करायचं मग ? ब्रुस ली ला काही गरजच वाटली नसती त्या पुस्तकांची.

तसं तर हज्जारो लोक्स कोणाना कोणाच्या अध्यात्मीक शिकवणुकीच्या प्रभावाखाली असतात.

तुमच्या लेखी फक्त शरिर आहे आपण नाही,

कृपया अर्थाचे अनर्थ करुन माझ्या तोंडी चुकीचे वाक्य टाकु नका.

तर साक्षीभाव कुठुन आला ?

तेच सांगितय वर. परत सांगतो.
पण हे सर्व शरीर आणि मनाच्या पातळीवरच होतं. आपण ज्याला मन/शरीर म्हणतो त्यातले १०% सुद्धा आपल्याला नित्य परिचयात येत नाहि. काहि विशिष्ट उपचार केले कि हे पदर उलगडायला लागतात.

ध्यान कशाला करायचं मग ?

त्याचिही बरीचं कारण आहेत. सदर धाग्यात त्याविषयी थोडी चर्चा झालेली आहे.

ब्रुस ली ला काही गरजच वाटली नसती त्या पुस्तकांची.

हे इथे आपण कसं ठरवणार?

मुद्दा सोपा आहे. शरीर/मानसशास्त्राला अध्यात्माच्या नावाने विकायला काढु नये.

उन्मेष दिक्षीत's picture

26 Nov 2020 - 2:53 pm | उन्मेष दिक्षीत

म्हणजे ब्रुस ली फुस्स ली झाला की !

सगळं फक्त शरीर आणि मानशास्त्र आहे, अध्यात्म वगैरे काही नसतं हे त्याच्यासारख्या इनोसंट बालकाला कळलेच नाही !

तो जेव्हा म्हणतो, बी वॉटर माय फ्रेंड, इफ यु पुट इट इन अ कप, इट बिकम्स अ कप, इफ इफ यु पुट इट इन अ बॉटल, इट बिकम्स अ बॉटल;
असे म्हणताना त्याला कल्पनाच नव्हती कि शरीर (तुम्ही म्हणता तसे जडत्व) असा कुठलाही इतर फॉर्म कधीही घेऊच शकत नाही !; आणि शरीर आणि मानशास्त्र हे जेके आणि वॉट्स अध्यात्माच्या नावाखाली विकतायत हे कळणे तर त्याच्यासाठी फारच लांबची गोष्ट !

-- तुमच्या लेखी फक्त शरिर आहे आपण नाही,

>> कृपया अर्थाचे अनर्थ करुन माझ्या तोंडी चुकीचे वाक्य टाकु नका.

अनर्थ तुम्ही करताय. शरीर /मानशास्त्राच्या ९०% न उलगडलेल्या पैलूंबद्दल, जे फक्त १०% नित्यपरिचयाचे आहे असे एक अब्स्ट्रॅक्ट स्टेटमेंट मांडून.

खालील प्रश्नांची उत्तरे द्याल अशी आशा करतो,
आपण आहोत कि नाही ? शरीर आणि बाकिच्या गोष्टी जाणवतात कुणाला ? अध्यात्माबद्दल तुमचे वैयक्तीक मत काय आहे ? आत्मा म्हणजे काय?

अर्धवटराव's picture

26 Nov 2020 - 10:45 pm | अर्धवटराव

म्हणजे ब्रुस ली फुस्स ली झाला की !
अपेक्षेप्रमाणे वाण नाहि पण गुण लागलाच शेवटी.

सगळं फक्त शरीर आणि मानशास्त्र आहे, अध्यात्म वगैरे काही नसतं हे त्याच्यासारख्या इनोसंट बालकाला कळलेच नाही !
"सगळच शरीर आणि मानसशास्त्र असतं, अध्यात्म वगैरे काहि नसतं" आणि "अध्यात्माच्या नावाने जे खपवलं जातय ते शरीरशास्त्र/मानसशास्त्र असणे" या दोन बाबींमधला फरक खरच कळत नाहि हि तुम्ही पण पेडगाववासी झाला आहात...

तो जेव्हा म्हणतो, बी वॉटर माय फ्रेंड, इफ यु पुट इट इन अ कप, इट बिकम्स अ कप, इफ इफ यु पुट इट इन अ बॉटल, इट बिकम्स अ बॉटल;
असे म्हणताना त्याला कल्पनाच नव्हती कि शरीर (तुम्ही म्हणता तसे जडत्व) असा कुठलाही इतर फॉर्म कधीही घेऊच शकत नाही !;

अच्छा... म्हणजे ब्रुसलीची बॉडी शरीरशास्त्राच्य कक्षेत न येणार दुसराच कुठला तरी फॉर्म घ्यायची? हा नवीन फॉर्म घेतल्यावर ते मग शरीर नसायचं? जर ते शरीर नसते तर मग त्याला शरीराचा बदललेला फॉर्म तरी का म्हणायचं ? काहिच विरोधाभास जाणवत नाहि ? नसेल जाणवत म्हणा.

अनर्थ तुम्ही करताय.

त्यापेक्षा मी या संपूर्ण चर्चेत फक्त शरीर आहे, आपण नाहि असा दावा कुठे केला हे तरी दाखवुन द्यायचं असतं. अन्यथा हा असला दावा तुम्ही माझ्या तोंडी कोंबताय हे स्वच्छ कबुल तरी करा.

शरीर /मानशास्त्राच्या ९०% न उलगडलेल्या पैलूंबद्दल, जे फक्त १०% नित्यपरिचयाचे आहे असे एक अब्स्ट्रॅक्ट स्टेटमेंट मांडून

आक्षेप कशावर आहे? १०% या नंबरवर? कि आपल्याला शरीर/मनाचे बहुतांश पैलु कळलेले नसतात या तथ्यावर? कि अजुन काहि? नंबर तर मोघम आहेच ना.. ति एक जनरल टर्मिनॉलॉजी आहे. राहिला मुद्दा पैलु न कळण्याचा... तर तो हि सामान्यच आहे. तुमच्या बघण्यात आला आहे का कोणि ज्याच्या बाबतीत हे खरं नाहि ?

खालील प्रश्नांची उत्तरे द्याल अशी आशा करतो,
आपण आहोत कि नाही ? शरीर आणि बाकिच्या गोष्टी जाणवतात कुणाला ? अध्यात्माबद्दल तुमचे वैयक्तीक मत काय आहे ? आत्मा म्हणजे काय?

उत्तरे अवष्य देऊ. फक्त एक करा.
हे सगळं विचारण्यामागे आपली भुमीका काय हे प्रामाणीकपणे स्पष्ट करा. गुरुदेवांच्या दाव्यांना खोटं पाडणारा हा कोण टिकोजीराव, अशी भुमीका आहे का? तसं असल्यास चर्चा फारच टाईमपास मुड असेल तेंव्हाच करता येईल... कारण त्याचं आउटपुट काहिच नसणार

तुम्हाला स्वतःला शरीर आणि बाकिच्या गोष्टी कोणा अन्य एण्टीटीला जाणवतात असा तुमचा अनुभव/तर्क/अभ्यास/समज आहे का? बाकिच्या गोष्टी जाणवणे आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत असं म्हणायचं आहे का? उदा. तुम्हाला हवेचा स्पर्ष जाणवतो आणि शरीर जाणवतं, ध्वनीचा अनुभव येतो आणि शरीराराचा अनुभव येतो, असं काहि होतं का? हवेचा स्पर्ष तर शरीराची कातडी आणि नर्व्हस सिस्टीम या मेकॅनिक्सचा मामला आहे. त्यापलिकडे आणखी कुठली यंत्रणा आहे जि या स्पर्षाला पुढे घेऊन जाते ? हवेचा स्पर्ष वेगळ्या चॅनलनी आणि शरीराचा अनुभव वेगळ्या चॅनलनी ? तशी भुमीका असल्यास सर्वप्रथम या यंत्रणेचा मागोवा घेऊयात का ? त्या यंत्रणेचे धागेदोरे पकडुन आपल्याला हे सगळं कुणाला जाणवतय याच्या मुळाशी जाता येईल. शरीराची यंत्रणा तर भौतीक आहे आणि भौतीक नियमांनी चालणारी आहे. हि नवीन कुठली यंत्रणा सुद्ध भौतीकच असेल तर तो ही शरीराशास्त्राचाच भाग झाला... वर जे ९०% न उलगडलेल्या पैलुंबद्दल म्हटलय, त्यातलच हे एक. पण जर ति नॉन भौतीक असेल तर त्यकरता सर्वप्रथम त्याबद्दल आपण चर्चा करुयात. पण प्रामाणीकपणे नक्की सांगा काय ते.
अध्यात्माबद्दल तुमचे वैयक्तीक मत काय आहे ? आत्मा म्हणजे काय?
प्रथमतः वरील प्रश्नाची तड लावुयात का? उगाच अजीर्ण होत पर्यंत खाण्यात काहि पॉइण्ट नाहि.

उन्मेष दिक्षीत's picture

27 Nov 2020 - 12:20 am | उन्मेष दिक्षीत

चांगल्या गोष्टीची बाजू घ्यायचीच नाही का माणसाने ? मला जसे संक्षी, तसेच तुम्ही आणि मिपा (गवी स्टाईल).
एकवेळ ते शरीर मानशास्त्र किंवा अध्यात्म राहू दे, पण (स्पष्ट बोललं कि) होणारे वाद नकोत.

तुम्ही म्हणालात कि ब्रूस ली म्हणतो ,'शरीराला पाण्यासारखे वाहते ठेवा', 'हे सर्व शरीर आणि मनाच्या पातळीवरच होतं, १०% सुद्धा नित्य परिचयात येत नाही' वगैरे अबस्ट्रॅक्शन केलं , मग म्हटलं अध्यात्म या विषयाबद्दल तुमचे काय मत आहे, ध्यानाची गरज काय ?
कुठलाही अनर्थ न करता आणि वाक्ये तुमच्या तोंडी न घालता विचारलेलं आहे.

अर्धवटराव's picture

27 Nov 2020 - 1:25 am | अर्धवटराव

कोणि कुठली बाजु घ्यावी हे ज्याचं तोच ठरवणार... त्याला कोणाचा आक्षेप आहे?

आध्यात्म वगैरे विषयाची पूर्वपिठीका म्हणुनच तुम्हाला अगोदर काहि प्रश्न विचारले होते. शरीर, मन इत्यादी त्यामानाने जास्त प्रचलीत बाबींचा उहापोह करतानाच जिथे ऑफ द ट्रॅक दिसतोय तिथे आणखी एक वेगळ्या विषय बोर्डावर घेऊन काय फायदा ? सर्वप्रथम एका कॉण्टेक्स्टवर यायला नको? उदा. ध्यानाची गरज... आता गरजेवर बोलण्यापूर्वी मूळात ध्यान काय असतं यावर एकवाक्यता नको?

आता मी कहिही टंकलं कि अध्यात्म हा काळ आणि अवकाश यांच्या सृजनकर्त्या स्थितीचा अभ्यास आहे. आणि त्या स्थितीची अनुभूती घ्यायला लागणार्‍या शक्ती प्रखर करण्याची एक पद्धत म्हणजे ध्यान.
काहि शब्दांची रचना, या पलिकडे काय अर्थ आहे या वाक्याला ?

उन्मेष दिक्षीत's picture

27 Nov 2020 - 2:31 pm | उन्मेष दिक्षीत

सर्वप्रथम एका कॉण्टेक्स्टवर यायला नको?

तुम्हाला स्वतःला शरीर आणि बाकिच्या गोष्टी कोणा अन्य एण्टीटीला जाणवतात असा तुमचा अनुभव/तर्क/अभ्यास/समज आहे का?

>> अन्य एंटिटी नाही, आपल्याला जाणवतं, ज्याला जाणवतं तो कायम वेगळा पाहीजे. हे लॉजिक मान्य आहे का ? तिथुन पुढे ध्यानाची सुरुवात आहे किंवा ध्यान करायला लागल्यावर जाणवू लागेल तुम्हाला ते.

तोच परिणाम विचार 'बघण्याच्या' ध्यान प्रॅक्टीसचा , थोडी तयारी झाली कि राग, भिती.. कुठलिही भावना साक्षीभावाने बघता यायची.

>> हाच जो साक्षीभाव कुणाला यायचा ? तुम्हाला कि शरीर/मनाला ? शरीराला साक्षीभाव वगैरे काही कळू शकत नाही, ऑल इट इज इंटरेस्टेड इन मेंटेनन्स सस्टेनंस आणि रिप्रॉडक्शन बिकॉज इट कम्स अंडर नेचर.

हे सगळं विचारण्यामागे आपली भुमीका काय हे प्रामाणीकपणे स्पष्ट करा.

>> 'बी वॉटर' याचा तुम्ही काढलेला अर्थ शरीराला जड न ठेवता पाण्यासारखं वाहतं ठेवा असं ब्रुसली सांगायचा.आणि सगळं फक्त शाररीक आणि मानसीक पातळीवरच होतं या दोन वाक्यातला विरोधाभास दाखवणे. तुम्हाला शरीरावेगळे आपण आहोत हे माहीत नाही कारण तो स्विफ्टनेस अनुभवला नाही आणि लॉजिक तर तुम्हाला बिलकुलच मान्य नाही.

अर्धवटराव's picture

27 Nov 2020 - 11:14 pm | अर्धवटराव

तुम्हाला स्वतःला शरीर आणि बाकिच्या गोष्टी कोणा अन्य एण्टीटीला जाणवतात असा तुमचा अनुभव/तर्क/अभ्यास/समज आहे का?
अन्य एंटिटी नाही
अन्य एण्टीटी नाहि असं जेंव्हा तुम्ही म्हणता तेंव्हा मग शरीराव्यतिरिक्त काय उरतं ?

आपल्याला जाणवतं, ज्याला जाणवतं तो कायम वेगळा पाहीजे. हे लॉजिक मान्य आहे का ?

जर अन्य एण्टीटी नसेल आणि ज्याला जाणवतोय तो कायम वेगळा असेल तर ते मेंदुचच, पण अदरवाईज प्रकट न होणारं फिचर आहे असा त्याचा अर्थ होत नाहि का?

तिथुन पुढे ध्यानाची सुरुवात आहे किंवा ध्यान करायला लागल्यावर जाणवू लागेल तुम्हाला ते.

या लेखात उल्लेखीत ध्यानपद्धतीने जे काहि निर्वीचार होणे, हवेत तरंगणे वगैरे अनुभव सांगितले आहेत ते जर अन्य कोण्या एण्टीटीला जाणवलं नसेल तर अल्टीमेटली ते मेंदुच्याच कक्षेत येतय असा अर्थ काढावा का ?

>> हाच जो साक्षीभाव कुणाला यायचा ? तुम्हाला कि शरीर/मनाला ?

वर उल्लेखीत अन्य एण्टीटी आणि मेंदुची उपपत्ती इथे पण लागु व्हावी का?

शरीराला साक्षीभाव वगैरे काही कळू शकत नाही, ऑल इट इज इंटरेस्टेड इन मेंटेनन्स सस्टेनंस आणि रिप्रॉडक्शन बिकॉज इट कम्स अंडर नेचर.

नाऊ धिस इज व्हेरी बिग स्टेटमेण्ट. तुम्हाला खरच असं वाटतं कि शरीर आणि मनाचा संपूर्ण आवाका तुमच्या लक्षात आला आहे? साक्षीभाव रीड करणारी, मेंदु व्यतीरीक्त एक वेगळीच यंत्रणा आपल्याकडे असते ? जर अशी काहि यंत्रणा असेल तर मग ते पण एक शरीरच झालं. म्हणजे एका शरीर दुसर्‍या शरीराकडे साक्षीभाव ठेऊन असतं ? आता अशी दुसरी कुठली यंत्रणा नसेल तर मग आपण तो साक्षीभाव कसा रीड करतो ? त्याला इण्टरप्रीट कसं करतो? इथे काहि काँट्रॅडीक्शन नाहि जाणवत ?
आणि ऑल इट इज इंटरेस्टेड इन मेंटेनन्स सस्टेनंस आणि रिप्रॉडक्शन बिकॉज इट कम्स अंडर नेचर. ... फक्त शरीर निसर्गांतर्ग येतं ? अशी कुठली गोष्ट आहे दॅट डजण्ट कम अंडर नेचर ?
या सर्व प्रकारात आपण शरीर, मन, निसर्ग.. या सर्वांचा आवाका आक्रसतोय असं नाहि वाटत ?

>> 'बी वॉटर' याचा तुम्ही काढलेला अर्थ शरीराला जड न ठेवता पाण्यासारखं वाहतं ठेवा असं ब्रुसली सांगायचा.आणि सगळं फक्त शाररीक आणि मानसीक पातळीवरच होतं या दोन वाक्यातला विरोधाभास दाखवणे. तुम्हाला शरीरावेगळे आपण आहोत हे माहीत नाही कारण तो स्विफ्टनेस अनुभवला नाही आणि लॉजिक तर तुम्हाला बिलकुलच मान्य नाही.

जर ब्रुसलीचं शरीर नियंत्रण करणारी अन्य एन्टीटी नाहि तर मग ते काम त्याचा मेंदुच करत होता असा अर्थ नाहि निघत? कि ब्रुसलीच्या "आत" एक ज्युनिअर ब्रुसली होता जो बाहेरच्या ब्रुसलीला कंट्रोल करायचा?
अवांतरः
तुम्हाला तुमच्या गुरुदेवांच्याच स्टाईलने बोलायचं आहे? कोणाला काय माहित आहे, कुणी काय अनुभवलय वगैरे सगळं आपलं आपणच ठरवायचं? पहिले मला वाटायचं कि फक्त गुण लागलाय.. पण वाण देखील लागलाय का?

उन्मेष दिक्षीत's picture

28 Nov 2020 - 1:22 am | उन्मेष दिक्षीत

असं जेंव्हा तुम्ही म्हणता तेंव्हा मग शरीराव्यतिरिक्त काय उरतं ?

>> मी म्हणालो, कोणी अन्य एंटिटी नाही, आपण.
तुमचे वस्ताद म्हणाले, बैठका काढा, समोर बघा, तुम्ही ऐकले आणि बैठका काढल्या, हालचाल शरीर आणि मन या पातळीवर झाली आणि साक्षीभाव तुम्हाला कळला.

-- नाऊ धिस इज व्हेरी बिग स्टेटमेण्ट. तुम्हाला खरच असं वाटतं कि शरीर आणि मनाचा संपूर्ण आवाका तुमच्या लक्षात आला आहे?

>> तुम्ही ठरवले असते नाही काढणार उठाबशा तर ? निर्णय कुणाचा कि वस्तादांचं ऐकायचं कि नाही ? शरीराचा, मनाचा कि तुमचा ?

डेटाबेस सॉफ्ट्वेअर मधे एक पॅकेज नावाचा प्रकार असतो. आणि त्याच्या पॅकेज हेडर आणि पॅकेज बॉडी अशा डिविजन्स असतात. आपल्याला हेड (चेहरा म्हणू) वेगळं आणि रेस्ट ऑफ द बॉडी वेगळी असं शिकवलं जातं. प्रत्यक्षात मेंदू आणि बाकीचे शरीर अशी डिविजन नाही, सगळं मिळून शरीर आहे ! सगळा गोंधळ हा आहे, मेंदूलाच किंवा चेहर्‍यालाच मी म्हणणे. संक्षीचं वाक्य आहे, आपण चेहरा रहीत अस्तित्व आहोत. तेव्हा ते म्हणतात आपण आणि आपण समजतो तो चेहरा म्हणजे स्वतःला मानतो ती 'व्यक्ती' यामधे फार मोठा फरक आहे.

-- जर ब्रुसलीचं शरीर नियंत्रण करणारी अन्य एन्टीटी नाहि तर मग ..

>> आता जरा आणखी डीप. ब्रुस ली चं शरीर असं नाही. शरीर आहे पण 'ब्रुस ली' असं कोण नाही त्यात ! वेगळा असा ब्रुस ली बनतो जेव्हा जाणिवेवर संस्कार ( हेड ट्रेनिंग ) होतात पॅरेन्ट्स आणि सोसायटी कडून. सेपरेट व्यक्ती बनवली जाते, अँड दॅट इज फाईन ! पण ती व्यक्ती म्हणजे त्याचा मेंदू नव्हे.
तुम्हाला जाणिवेची अजून जाणीव नाही, म्हणूनच तुम्ही सगळं शरीर मनाच्या पातळीवर आणू पाहताय. ध्यान करा मग समजेल. मग कळेल कि संक्षी का म्हणतात 'मन तुम्हाला फसवतंय ' 'चेहरा फसवा होता, शांतता वास्तवीक होती'.

-- तुम्हाला तुमच्या गुरुदेवांच्याच स्टाईलने बोलायचं आहे?

>> अध्यात्मात कॉपी पेस्ट चालतच नाही. तुम्हाला समजलं तरच तुम्ही असं बोलू शकता नाहीतर असं बोलायची सुद्धा हिंमतच होत नाही ! ट्रस्ट मी, अधिकार वगैरे म्हणत नाही . अगदी सुरुवातीला मी जेव्हा संक्षीचं एकदम कॉन्फिडंटली म्हटलेलं 'आपण !' असं म्हणून बावरायचो, कि आपण ?? हाउ इज इट पॉसिबल, तेव्हा ते 'आपण' म्हणजे स्वतःला मानत आलेलो व्यक्ती नाही, तर 'अव्यक्त निराकार इंपर्सनल सेल्फ-कॉन्फिडंट जाणीव' ( निराकाराचे सर्व पैलू वाचा ) हे कळायचं होतं मला. आणि हे सगळे एकामागोमाग आणि अचानक होणारे उलगडे आहेत लिटरली, जोर का झटका धीरे से लगा ! तसे.

अर्धवटराव's picture

28 Nov 2020 - 4:11 am | अर्धवटराव

>> मी म्हणालो, कोणी अन्य एंटिटी नाही, आपण.

पण हे आपण म्हणजे शरीरापेक्षा वेगळी एण्टीटीच ना? कुठली यंत्रणा वापरतो 'आपण' ? हि यंत्रणा फिजीकल आहे कि व्हर्च्युअल ? 'आपल्याला' कुठली यंत्रणा वगैरे लागत नाहि, ते निसर्गाचं रहस्य आहे.. असलं काहि टंकु नका प्लीज.

तुमचे वस्ताद म्हणाले, बैठका काढा, समोर बघा, तुम्ही ऐकले आणि बैठका काढल्या, हालचाल शरीर आणि मन या पातळीवर झाली आणि साक्षीभाव तुम्हाला कळला

हे सगळं शरीर/मनाच्या पातळीवरच घडतं. त्या अशरीरी असं काहि नाहि. मेंदुच्या वेगवेगळ्या भागांचं ते कॉर्डीनेशन आहे.

>> तुम्ही ठरवले असते नाही काढणार उठाबशा तर ? निर्णय कुणाचा कि वस्तादांचं ऐकायचं कि नाही ? शरीराचा, मनाचा कि तुमचा ?

म्हणजे शरीर, मन आणि आपण असे तीन वेगळे आहेत निर्णाय घेणारे?
कशाच्या भरोशावर ठरवतो हे 'आपण'? सेम प्रश्न... त्याकरता काय मेकॅनीझम वापरल्या जातं 'आपल्याकडुन'? काय कण्टेण्ट्स् आहे या मेकॅनीझमचे ? शरीर, मन एक यंत्रणा वापरतो आणि 'आपण' अशरीरी अशी वेगळीच काहि ? समजा मनाने एक निर्णाय घेतला. आता हा निर्णय 'आपण' बदलतो? त्याकरता प्रायोरीटी ठरवणारा एक वेगळाच मेंदु 'आपल्याकडे' असतो ? हे सगळं शरीर लेव्हलला नाहि होत?

तेव्हा ते म्हणतात आपण आणि आपण समजतो तो चेहरा म्हणजे स्वतःला मानतो ती 'व्यक्ती' यामधे फार मोठा फरक आहे.

हा फरक कोण समजुन घेतो ? त्याकरता कोणाती शरीर विरहीत यंत्रणा वापरली जाते ?

तुम्हाला जाणिवेची अजून जाणीव नाही, म्हणूनच तुम्ही सगळं शरीर मनाच्या पातळीवर आणू पाहताय. ध्यान करा मग समजेल. मग कळेल कि संक्षी का म्हणतात 'मन तुम्हाला फसवतंय ' 'चेहरा फसवा होता, शांतता वास्तवीक होती'.

जाणिवेची जाणीव व्हायला कुठलं मॅकॅनीक्स वापरलं जातं ? अमुक एक गोष्ट फसवणुकीची आहे, तमुक एक गोष्ट वास्तवीक आहे हि कंपॅरीझन कोण करतं? त्या करता कुठली मशीनरी वापरली जाते?

आणि हे सगळे एकामागोमाग आणि अचानक होणारे उलगडे आहेत लिटरली, जोर का झटका धीरे से लगा ! तसे.

हे सगळे उलगडे होताना काय मशीनरी एक्झीक्युट झाली ?

तुम्ही जे काहि 'आपण' या संज्ञेअंतर्गत अनुभवलं, उलगडे वगैरे झाले, एखादी गोष्ट खरी आहे, अमुक एक खोटं आहे.... या ज्या सगळ्या घडामोडी झाल्या त्या निश्चीत शारीरीक/मानसीक नव्हत्या, बरोबर? म्हणजे त्या शरीर/मनाबाहेर कुठेतरी घडाल्या. मग या सगळ्या प्रोसेस एक्झीक्युशन व्हायला कुठली मशीनरी वापरली गेली? 'आपला' हा वावर मेंदु व्यतीरीक्त इतरत्र कोठे होता?

इथे मेंदुच्याच दोन प्रतलांबद्दल बोलणं चाललय असं म्हणणं वावगं ठरेल का?

'आपला' वावर अशी कुठली सिस्टीम

'आपला' वावर अशी कुठली सिस्टीम नोट करते असते?

कशाच्या भरोशावर ठरवतो हे 'आपण'? सेम प्रश्न... त्याकरता काय मेकॅनीझम वापरल्या जातं 'आपल्याकडुन'? काय कण्टेण्ट्स् आहे या मेकॅनीझमचे ? शरीर, मन एक यंत्रणा वापरतो आणि 'आपण' अशरीरी अशी वेगळीच काहि ? समजा मनाने एक निर्णाय घेतला. आता हा निर्णय 'आपण' बदलतो? त्याकरता प्रायोरीटी ठरवणारा एक वेगळाच मेंदु 'आपल्याकडे' असतो ? हे सगळं शरीर लेव्हलला नाहि होत?

>> जेव्हा मी आधीच म्हणालो,

तुमच्या लेखी फक्त शरिर आहे आपण नाही

तर तुम्ही म्हणालात

कृपया अर्थाचे अनर्थ करुन माझ्या तोंडी चुकीचे वाक्य टाकु नका.

आणि अत्ता तेच म्हणताय तुम्ही आता हा निर्णय 'आपण' बदलतो? त्याकरता प्रायोरीटी ठरवणारा एक वेगळाच मेंदु 'आपल्याकडे' असतो ? हे सगळं शरीर लेव्हलला नाहि होत?

अर्धवटराव's picture

28 Nov 2020 - 9:27 pm | अर्धवटराव

तुम्हाला खरच कळत नाहिए प्रश्न?
या लेखातल्या उदाहरणाअवरुन एकद्म सोपा करुन विचारतो...

१) शरीराची एक विशिष्ट स्थिती, सेण्टर ऑफ ग्रॅव्हिटीच्या अ‍ॅडजट्मेण्ट्स, त्यानुसार शरीर तरंगल्यासारखे वाटणे वगैरे अनुभव हे सर्व मेंदुच्याच वेगवेगळ्या यंत्रणांचं कार्य आहे म्हणुन ते शरीरीक / मानसीक आहे
२) शरीराची एक विशिष्ट स्थिती, सेण्टर ऑफ ग्रॅव्हिटीच्या अ‍ॅडजट्मेण्ट्स, त्यानुसार शरीर तरंगल्यासारखे वाटणे वगैरे अनुभव हे सर्व मेंदुच्या नव्हे तर वेगळ्याच यंत्रणेचं कार्य आहे म्हणुन ते अशारीक/विदेही व्यवस्थेचं कार्य आहे

या दोन पैकी तुम्हाला काय म्हणायचं आहे? कि तिसराच कुठला तरी ऑप्शन आहे?

उन्मेष दिक्षीत's picture

29 Nov 2020 - 2:12 am | उन्मेष दिक्षीत

मला हे प्रश्न विचारण्याऐवजी या लेखातली साधना करून बघितली, बसलात थोडा वेळ तर तुम्हाला पण ती जाणीव होईल. पण बसलो कि लगेच उठलो असं नाही, थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. एक १० सेकंद बसलं कि विचार थांबायला लागतील आणि बरं वाटायला लागेल, आणखी एक २०-३० सेकंदानी त्या मुद्रा गुंफल्यात असं न वाटता फक्त टच जाणवू लागेल, आणखी बरं वाटू लागेल. बसा उठावसं वाटत नाही तोपर्यंत. हा माझा सल्ला.
कारण तुमच्या डोक्यात हजार प्रश्न असले तरी फॅक्ट रिमेन्स द फॅक्ट. म्हणून सांगितले करुन बघा. आता नुसती चर्चा करण्यात काहीही पॉइंट नाही.

अर्धवटराव's picture

29 Nov 2020 - 3:02 am | अर्धवटराव

हि प्रोसेस येणारे अनुभव हे शारीरेक आहेत हा साधा मुद्दा होता. ते प्रामाणीकपणे मान्य न करता तुम्ही याच वळणावर याल याची खात्री होतीच.
तेच सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.

आनन्दा's picture

28 Nov 2020 - 9:12 am | आनन्दा

उन्मेषजी,

देहात कोणिही नाही पेक्षा, जो "मी" या देहात आहे, तोच "मी" सर्व देहात आहे ही अनुभूती जाणीवेची परमोच्च अनुभूती मानली जाते.
त्याचा अनुभव आपल्याला आला आहे का?

आला असेल तर उत्तम, पण तो अनुभव आला असेल तर मग तुम्ही विकाररहित व्हायला हवे, कारण तुम्ही आणि आम्ही वेगळे नाहीच आहोत :) जे तुमच्या आत आहे तेच माझ्या आत देखील आहे.
आला नसेल, तर मग सांगतो, आम्ही त्या अनुभूतीसाठी प्रयत्न करत आहोत, आणि पुर्वी ज्या ज्या लोकांनी या अनुभूती घेतल्या आहेत, त्यांनी काही पायर्‍या किंवा रस्ते सांगितले आहेत, ते मैलाचे दगड प्रमाण मानून आम्ही मार्गक्रमणा करत आहोत. जर आम्हाला ते मैलाचे दगड मिळत आहेत तर मग तसला मार्ग अस्तित्वातच नाही हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला कशाच्या आधारावर मिळाला?

अर्धवटराव's picture

28 Nov 2020 - 10:01 am | अर्धवटराव

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले |
अवघेची झाले देह ब्रह्म ||

देह, मन, मी, सूर्य, ब्लॅक होल, समुद्र तळाशी बुडलेली टायटॅनीक, मिपा... सर्वच एक तत्व.

बोटांचे गोल गुंफुन तरंगता देह जाणवणं ही एक शारीरीक अवस्था... एक शारीरीक/मानसीक फिनॉमीनॉन.
कुठल्याच प्रकारचं द्वैत न जाणवण... त्याचं वर्णन करायाला आमच्या कडे शब्द नाहि _/\_

उन्मेष दिक्षीत's picture

28 Nov 2020 - 5:08 pm | उन्मेष दिक्षीत

तुम्ही तुमच्या मार्गावर आनन्दाने मार्गक्रमणा करा, माझे काहीही म्हणणे नाही. विषय ब्रुसली विषयी माझ्या एका इनोसंट प्रतिसादाने चालू झाला आणि अर्धवटराव एकदम शरीराला पाण्यासारखे वाहते ठेवा म्हणजे 'ठेवणारा कोण' असं मान्य नसताना म्हणाले, लॉजिकच गंडलं म्हणून दिला प्रतिसाद.

उन्मेष दिक्षीत's picture

28 Nov 2020 - 4:13 pm | उन्मेष दिक्षीत

'आपल्याला' कुठली यंत्रणा वगैरे लागत नाहि, ते निसर्गाचं रहस्य आहे.. असलं काहि टंकु नका प्लीज.

>> राहू दे, आपली यावर चर्चा होऊ शकत नाही. पण टंकू नका वगैरे सांगु नका. ते निसर्गाचं रहस्य आहे वगैरे तुमची मतेच म्हणू शकतो, बरीच आहेत त्याला मी काही करु शकत नाही , पण असले काही टंकू नका असे मात्र म्हणणार नाही.

अर्धवटराव's picture

28 Nov 2020 - 9:31 pm | अर्धवटराव

तुम्ही स्वतः या चर्चेत नेचर आणलात म्हणुन त्या कॉण्टेक्स्टवर चर्चा जाऊ नये याची प्रिकॉशन घ्यायला हे सांगणं झालं.
मूळ प्रश्नांना अजुनही तसेच आहेत. शरीराव्यतीरीक्त कोणती यंत्रणा अनुभवली तुम्ही?

संगणकनंद's picture

25 Nov 2020 - 7:13 pm | संगणकनंद

पोटाला तडस लागली असेल आणि काही कारणाने शौचास होत नसेल तर जेव्हा शौचास होते तेव्हाही मोकळं झाल्यानंतर विदेहत्व अवस्था प्राप्त होते.

याचं सुरेख वर्णन एका मिपाकरांने सुख म्हंजे नक्की काय आसत या अजरामर धाग्यात केलं आहे:

रात झालीवती. शेवटी शिर्‍यान बॅटरी झेतली मना म्हनला चल. तेच्या पाटोपाट नींगालो पोट धरून. जीना ऊतरलो बिल्डिंगच्या पाटीमागे गेलो. नाला लागला. अंदार व्हता. शिर्‍या म्हनला बस हीत आन कर. बसलो.
दोन मीन्टात फॉककन आवाज आला न मी मोकला झालू.
तूमाला सांगतो स्वर्गसुख, आत्मशांती वगैरे कायकाय म्हन्तात ना ते सगल मना येकाच टायमाला झाल. सगल मानन्यावर हाय की.

कोणीतरी कणभर तथ्य व मणभर अचरटपणा मिसळून लेखाचा पाया उभारायचा. त्याच्यावर चार दोन लोक सोडून इतरांनी तू अधिक अचरट कि मी अधिक अचरट अशी स्पर्धा करत प्रतिसादांचा कळस उभा करायचा. चांगल्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी चालवलेला हा अचरटपणा बघून वाचकांनी हताश व्हायच. त्यावर कडी म्हणजे अशा उद्योगात गुतलेल्यांनी संपादकांना मिपाचे अधःपतन थांबवायचे आवाहन करायचे. भारी चालू आहे सगळा तमाशा. शुभेच्छा.

उन्मेष दिक्षीत's picture

26 Nov 2020 - 2:51 pm | उन्मेष दिक्षीत

>> त्यावर कडी म्हणजे अशा उद्योगात गुतलेल्यांनी संपादकांना मिपाचे अधःपतन थांबवायचे आवाहन करायचे

त्याचू सपोर्टर दिसताय ? जरा वाचून बघा काय काय उद्योग चालवलेत त्यांनी.

कोणीतरी कणभर तथ्य व मणभर अचरटपणा मिसळून लेखाचा पाया उभारायचा

तुम्हाला माझा मिपा धोरणाचा प्रतिसाद कळलेला दिसत नाही असं वाटतंय. ४ आणि ५ हे वैयक्तीक होणे , आचरट वगैरे म्हणणे ( असांसदीय भाषा ), असंबंधीत प्रतिसाद देणे, डायरेक्ट लेखकावरच घसरणे ( वरती जसे म्हणालात तसं ) अशा सगळ्यासाठी आहेत, हे कळलंय का तुम्हाला ?

रंगीला रतन's picture

26 Nov 2020 - 3:43 pm | रंगीला रतन

दुरुस्ती:-
कणभर तथ्य खोटे पाडायला त्याच्यावर चार दोन लोक सोडून इतरांनी तू अधिक अचरट कि मी अधिक अचरट अशी स्पर्धा करत प्रतिसादांचा कळस उभा करायचा.
असे टायपायचे होते. त्यातून रोख दोनही बाजूंवर असल्याचे लक्षात येईल. अर्ध्यावाक्याने गैरसमज झाला त्यासाठी दिलगीर आहे.

कोणीतरी कणभर तथ्य व मणभर अचरटपणा मिसळून लेखाचा पाया उभारायचा
कणभर तथ्य खोटे पाडायला त्याच्यावर चार दोन लोक सोडून इतरांनी तू अधिक अचरट कि मी अधिक अचरट अशी स्पर्धा करत प्रतिसादांचा कळस उभा करायचा.

तुमची दोन्ही विधाने वस्तूस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवतात.

यातील दुसरे वाक्य ज्यांच्यासंदर्भात आहे त्यात मी येतो याची जाणीव मला आहे. तरीही एक निदर्शनास आणू ईच्छीतो की दुसरी परिस्थिती ही पहील्या परिस्थितीची प्रतिक्रिया आहे. पहीली परिस्थिती उद्भवली नाही तर दुसरी उद्भवणारच नाही आणि पहीली परिस्थिती उद्भवल्यानंतर दुसरी परिस्थिती उद्भवली नाही तर पहीली परिस्थिती अजून चेकाळेल अशी परिस्थिती आहे.

सारखे कारवाईसदृश अश्या मार्गांची अपेक्षा करण्यापेक्षा / धोरणातील कलमांची गरज पडण्यापेक्षा सर्वांनीच एकूण समतोल ठेवला आणि सर्व बाजूंच्या मतांबद्दल आदर बाळगला तर मिपासाठी सुखद काळ येईल असे वाटत नाही का?

वादावादी, थोडी लठ्ठालठ्ठी, किंचित खेचाखेची हे मिपाला नवीन नाही. उलट त्याने धागे रंगत असत. त्यात परस्परांच्या मतांबद्दल एक किमान आदर असणे अपेक्षित आहे. आणखी काय बोलावे?

उन्मेष दिक्षीत's picture

26 Nov 2020 - 3:39 pm | उन्मेष दिक्षीत

सारखे कारवाईसदृश अश्या मार्गांची अपेक्षा करण्यापेक्षा >>

मला वादावादी , लठ्ठालठ्ठी किंवा खेचाखेची म्हणजे कळतं असं वाटतं. अती झाल्यावरच मी कारवाई सदृश मागणी केलेली आहे.

मिपाचेच धोरण आहे ना , स्कोर सेटलिंग, असांसदीय भाषा, असंबद्ध प्रतिसाद, वैयक्तीक टीका करणारे प्रतिसाद काढून टाकण्याचे हक्क मिपा संपादक राखून आहेत ? मी नाही बनवली धोरणे.

सर्वांनीच एकूण समतोल ठेवला
सर्व बाजूंच्या मतांबद्दल आदर बाळगला

-- हे मी ज्यांची तक्रार केली आहे त्यांना सांगितले असते तर बरे झाले असते. सर्वांनीच समतोल ठेवला, आदर बाळगला तर भारीच , पण अशी विनोबा भावे ,साने गुरुजी सदृश अपेक्षा ठेवली तरी तसं होत नाही आणि अती झालं म्हणून धोरणे दाखवावी लागली.

आता तुमचेच असे म्हणणे असेल, तर प्रश्नच मिटला. थँक्यु ! त्याचू वैलपान लगे रहो !

हे मी ज्यांची तक्रार केली आहे त्यांना सांगितले असते तर बरे झाले असते.

एकूण सर्वांना उद्देशून आहे. मते मांडणे, युक्तिवाद कोणीही करावा. पण एकमेकांच्या भूमिकांचा आदर ठेवावा.

मी कशाला कोणा एकालाच सांगायला जाऊ? मला जसे संक्षी तसेच आनंदा आणि तसेच अर्धवटराव आणि तसेच सुबोध खरे आणि अन्य सर्व सदस्य.

पण कारवाईपेक्षा सर्वांनीच इतर विचारपंथांबद्दल तुच्छता न बाळगता जरा मैत्रीपूर्ण अप्रोच ठेवणे अशक्य आहे का? अगदी आपल्याला अजिबात पटत नसले तरी.

डॅनी ओशन's picture

29 Nov 2020 - 3:23 pm | डॅनी ओशन

त्याचू भाव पिंक मारत असन. त्ये त्यांचे व्यक्तिस्वातंत्र है. तुम्ही ड्राप करा की, तुमि का क्याच करायला धावताय ? शेवटचा बॉल आपुनच फिकायचा ह्यो हट्ट कशापायी ? क्वेरत्युईओपासड्फगजकल्झक्ससावबानं हा मंत्र कीबोर्डावर हात ठिवण्याअगोदर तीन वेळा दिर्ग शास घेउन म्हणत जावा. त्याच्याने तुम्हाला त्रास देणाऱ्या ट्रोलांचा उपद्रव कमी हुईल, ग्यारंटी. हा, पण हा बी सदनेचा इशय हाय.

संगणकनंद's picture

29 Nov 2020 - 4:03 pm | संगणकनंद

संपादित.

अजून वाचली नाही का ?

संपादित. व्यक्तिगत टीका टाळावी

का वाचून ही `प्रतिसाद उडवला जाण्याचा अर्थ' न कळून अजून त्याचूपणा चालूच ठेवणार ?

संगणकनंद's picture

29 Nov 2020 - 4:35 pm | संगणकनंद

संपादित.

संजय क्षीरसागर's picture

29 Nov 2020 - 5:05 pm | संजय क्षीरसागर

संपादित.

व्यक्तिगत रोखाचे प्रतिसाद टाळावेत. धागा वाचनमात्र करीत आहोत.