माझे घर
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मझ्या घराचा तुम्हा काय सांगू थाट ?
रुबाबदार रस्त्यातून एक डौलदार पायवाट!
स्वागता असे उभी जाई जुई ची कमान
वृंदावनातील तुळशीला असे मोठा मान
भवतालीचा बगीचा पशू पक्षांना आसरा
कुंपण सभोवती करी काटेरी पहारा
दारासमोरील प्राजक्ताचे निर्मळ असे मन
विहीरीतील गोड पाणी भागवीते तहान.
टांगता कोहाळ दूर ठेवी अरिष्ठ
काळी सान बाहुली काढी घराची दृष्ट.
ओटीवरला झोपाळा झुलतो झोकात
उंबरठ्यावर लक्ष्मी, पावलांच्या रुपात.
घरात नाद घुमतो दुडदुडणार्या पैजणांचा
माझ्या बाळाच्या बोबड्या ओठांचाही चाळा.
थोरा-लहानांची माया जसे माठातले पाणी
एकत्र कुटुंबाचे, घर कौतूके गातो गाणी.
वाचने
4185
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अप्रतिम
आयला
In reply to आयला by आंबोळी
काय झेपलं नाय
गोड
धन्यवाद
सुंदर
छानच!
वाह
खूप छान!
In reply to खूप छान! by क्रान्ति
हेच म्हणते
छान आहे ग कविता
छान
धन्यवाद.