छायाचित्रण

काळा घोडा महोत्सव कट्टा - वृत्तांत (२)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 9:58 pm

प्रत्यक्ष कट्टाकारांनी अनुमोदन दिल्याने शिर्षकात आवश्यक तो बदल करण्यात आला आहे :)

कलाछायाचित्रणआस्वादविरंगुळा

काळा घोडा फेस्टिवल कट्टा - वृत्तांत (१)

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 12:10 am

या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्‍या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो.

कलामौजमजाछायाचित्रणआस्वादविरंगुळा

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

आयुर्हित's picture
आयुर्हित in जनातलं, मनातलं
27 Jan 2014 - 3:58 pm

रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :

संस्कृतीइतिहासऔषधोपचारभूगोलछायाचित्रणप्रकटनमाध्यमवेधमाहितीविरंगुळा

रंगीत, रसरशीत मिर्च्या

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
26 Jan 2014 - 11:26 pm

मला या रंगीबेरंगी रसरशीत मिर्च्या फार आवडल्या म्हणुन टिपल्या. गणपाशेठ, पेठकरसाहेब, स्वाती यांसारखे चविष्ट मिपकर त्यांना न्याय देतीलच.

m1a

m1

m2

छायाचित्रणविरंगुळा

हिमालय..

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
24 Jan 2014 - 7:42 pm

हिमालय. त्याचं वेड लागतं.

नशीबाची साथ असेल तर नेहमीचं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना कधीतरी तुम्हांला हिमालयाच्या परिसरात चलण्याची संधी मिळते. ट्रेकसाठी. सोबत कोणी असेल की नाही, आपल्याला जमेल की नाही, सुट्ट्या मिळतील की नाही, बाकी घरी आपण नसताना काही अडचण तर होणार नाही, हे आणि असे अनंत व्यर्थ प्रश्न मनात उभे राहतात. खरं तर कोणाचंच काहीच अडत नसतं, पण तरीही हिमालयापेक्षाही अडचणींचे पहाड पार करुन जाणं कठीण वाटायला लागतं.. तरीही अखेरीला सर्व काही जमून येतं आणि हिमालयाचं प्रथम दर्शन होतं! आणि मग हिमालयाचं वेड लागतं.

प्रवासछायाचित्रणअनुभव

शिव: मूर्तीशास्त्र

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
19 Jan 2014 - 6:04 pm

भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.

लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या.

कलाधर्मइतिहासकथाछायाचित्रणमाहितीसंदर्भ

श्री. अजित कडकडे

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
14 Jan 2014 - 10:12 pm
छायाचित्रण

श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली. :) त्या कार्यक्रमाच्या वेळी मी काही क्षणचित्रे टिपली ती आपल्यासाठी इथे देत आहे.

a1

गॉड पार्टीकल्स, समर्थ रामदास आणि गुगल ग्लास

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
12 Jan 2014 - 7:04 pm

दृश्य १:
कुठे आहे तुझा तो देव/जगदीश्वर? जर तो सर्वत्र आहे तर मला ह्या खांबात का दिसत नाही? असे म्हणत ज्यावेळेला हिरण्यकश्यपुने(भक्त प्रल्हाद च्या वडिलांनी) खांबावर गदेने वार केला व खरोखर त्यातून भगवान "नृसिंह अवतारात" प्रगट झाले. पुढे काय झाले ते सर्वश्रुत आहेच. संदर्भ :श्रीमद भागवत कथा

काय भक्त प्रल्हाद एक शास्त्रज्ञ होता गॉड पार्टीकल्स शोधणारा? कि हिरण्यकश्यपु?
ही निव्वळ साहित्यकथा समजायची कि काही गूढ लपले आहे त्यात?
"नृसिंहपुराण" यात काही मुलतत्वे सापडतील का?

एक सुखाचा रविवार

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
12 Jan 2014 - 3:45 pm

एखादा रविवार मोठा सुलक्षणी निपजतो. कधी नव्हे ती मुंबईत बर्‍यापैकी थंडी पडलेली असते. रजई घेता यावी म्हणुन ती पंखा लावुन थोडी वाढवलेली असते. सूर्य कसलही विघ्न न येता निवांत उगवतो. सकाळी सकाळी मोबाईल बोंबलत नाही. तात्पर्य म्हणजे गुलाबी थंडीत आठ वाजेपर्यंत लोळायची चैन होते. उठल्यावर मनसोक्त चहा होतो. पेपर चाळुन होतात. बायको हटकत नाही. पहिला चहा, दुसरा चहा, नाश्ता पुन्हा चहा असे करता करता अकरा वाजतात. अजुन अंघोळीचे फर्मान निघालेले नसते. सोसायटीची मिटिंग नसते. कुठे लग्न समारंभ नसतो. बघता बघता कोचावर रेलण्यात तिनेक तास जातात. मग जरा मी पाय मोकळे करायला हलतो.

पाकक्रियाछायाचित्रणआस्वादविरंगुळा