मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(तू मतदार माझा)

नाखु ·
प्रेर्ना - विळखा पाहू तू मतदार माझा भोट, भोंगळ अजीजी तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा मस्तवाल नेता मी .... घेऊन जमेस तुला निव्वळ उगी तुंबडी भरावी बोभाटा करावा मी एव्हढा की लाभावी मज(समोरची) वाटणी सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित. वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

कितीसा पुरोगामी आहेस ?

माहितगार ·
(* कविता जेंडर न्यूट्रल वाचावी) कमिटेड टू हूम कमिटेड टू व्हॉट पुरोगामी पुरोगामी कितीसा पुरोगामी आहेस ? तुझ्यासाठी आपले कुणीच नाही तूला तू त्यांचा आहेस असे वाटते तेही फसवे नसते का ? आपल्यातल्या आपल्यांचा होऊ शकला नाहीस त्यांचाही होऊन रहाणे खरेच जमेल का तूला ? आणि तूही कुणाचाच नाहीस हेच खरे नसते का ? त्यागी आहेस हे बरे आहे एका अर्थाने आपल्या अंगच्या वस्त्रांचाही त्यागकरुन त्या तपस्वी मुनींप्रमाणे जंगलात जाऊन कायमचा एकांतवास अनुभवून पहाशील का ? पूरोगामीत्व निवांतपणे अनुभवण्याचा आणि अनुभवू देण्याचा तो सर्वोत्कृष्ट पुरोगामी मार्ग आहे ना स्वतःस पुरोगामी सिद्ध करण्याचा तोच

पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

माहितगार ·
लेखनविषय:
तरूस लगडली सुवासिक आम्रफळे परी कोयी अन बीया मोजतो हा बळे पाण्यात मासे उसळतात रेतीच्या खोप्यास हसतात तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे जळात उतरू कसा प्रश्न हा पडे आर्जवी पाणिते अवीट परी कृष्णास दिसे का मीठ खेळती कधी लहर कधी लाट प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

कविता

संदीप-लेले ·
आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी आज वाटते ... अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी आज वाटते ... मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

ट्रिंग ट्रिंग !!!!!

बटाटा चिवडा ·
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

(डोलकरांचे मनोगत)

ज्ञानोबाचे पैजार ·
(डोलकरांचे मनोगत) पेरणा अर्थातच शतदा भरला एक प्याला शेवटचा मी तृप्त पाहुनी खंबा हा टिचर्सचा रिचवले हजारो पेग मी उदरात सदैव राहो, दरवळ हा गोल्ड फ्लेकचा चखण्याची देउन आहुती पोटाला मी किंचित पिळले अलगद त्या लिंबाला नसता जेवण व्यर्थ मानले असते मज आहे कारण आज घरी जाण्याला धडपडत लटपटत रिक्षात पाय ठेवियले कुठे जायचे ते अडखळत सांगितले जरी घरी आल्यावर पडली उपेक्षा पदरी निळकंठा सम ते अमृत मानूनी प्राशीयले !! हे विजय मल्या थोर तुझे उपकार तू दिली आम्हाला रम व्हिस्की बीयर गायबला जरी तू बँकांना देउन तुरी सदैव राहिल तुझी

त्याची आठवण,

ज्ञानोबाचे पैजार ·
त्याची केव्हाही आठवण आली तरी, सर्वांगावर सरकन् काटा येतो, डोक्यावरचा केस न केस उभा रहातो, आणि थंडीच्या दिवसातही दरदरुन घाम फुटतो, अंधारलेल्या डोळ्या समोर, नाचतात आकृत्या भेसुर, जिभेला पडते कोरड आणि काना मधून निघतो धुर, कित्येकांना याने लाचार बनवले, भिकारी बनवले, याच्या दहशती मूळे कित्येक पापभिरु दूराचारी झाले, तो आहेच असा भितीदायक, आता पर्यंत भेटलेला सर्वात मोठा खलनायक, मी मी म्हणणा-यांची त्याच्या पुढे टरकायची, नुसत्या आठवणीने कित्येकांची बोलती बंद व्हायची, वर्ष सहा महिन्यातुन तो एकदा कधीतरी यायचा, पण त्याचा बोलबाला मात्र वर्षभर असायचा, किती उपाय झाले, नवस झाले सायास झाले, पण याच्या समोर

गेले मोदी कुणीकडे

anilchembur ·
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....