नवीन दोस्त

तुडतुडी's picture
तुडतुडी in जनातलं, मनातलं
15 Jul 2015 - 5:12 pm

लहानगा चिंटू खूप खुष होता . किती दिवसांनी त्याला नवीन दोस्त मिळाला होता . आजीलाही ह्या पोराला खेळायला कोणी मिळालं म्हणून बरं वाटलं . नाहीतर किती दिवस नुसत्या त्याच त्याच गोष्टी सांगून त्याला रमवणार. पण गोष्टी त्याच त्याच असल्या तरी आजीची सांगण्याची हातोटीच अशी होती कि चिंटूला त्या पुन्हा पुन्हा ऐकायला आवडत. चिंटू झोपायला त्रास देवू लागला कि मात्र आजी स्वताच्या मनानेच काहीतरी नवीन गोष्ट तयार करून त्याला ऐकवी .गोष्ट सांगितल्यावर मुकाट झोपण्याच्या अटीवर .
चव्हाण कुटुंब त्या घरात राहायला आलं . घर बैठ्या पद्धतीच होतं . आजूबाजूची घरंही बैठीच . मिस्टर आणि मिसेस चव्हाण खुश होते . कमी भाड्यात ऐसपैस , हवा खेळती असलेलं घर मिळालं म्हणून मिस्टर चव्हाण . तर आजूबाजूला मोकळी जागा आहे म्हणून मिसेस चव्हाण. त्यांना बागेची आवड होति. आता सुगंधी फुलांची झाडं लावता येतील म्हणून त्यांना बरं वाटलं. चव्हाण दाम्पत्याला दीपक नावाचा छोटा मुलगा होता . साधारण चिंटू च्याच वयाचा . नुकतीच दीपक च्या शाळेला उन्हाळ्याची मोठी सुट्टी लागली होती .
चिंटू आणि दीपक ची छान मैत्री जमली . आई कामात गढलेली असली कि हे दोघेही खेळण्यात गढून जात . आई झोपलेली असली कि दीपक चिंटूला खेळायला बोलवे .चिंटू त्याला बाहेर हि घेवून जावू लागला. कसल्या कसल्या लपण्याच्या जागा दाखवू लागला . कसली कसली खेळणी दाखवू लागला. आईने दीपकला जेवायला खायला बोलावले कि चिंटू जायला निघे. दीपक ने आग्रह केला तरी थांबत नसे. आजीने सांगितलाय कोणाच्या घरी काही खवू नये म्हणून .तुझी आई माझ्याशी खेळताना बघून तुला रागवेन म्हणून चिंटू आईचं लक्ष नसताना खेळायला येई .
हल्ली आजीला जरा काळजीच वाटू लागली होती . हे पोरगं वेळी अवेळी खेळायला पळतंय म्हणून. दीपक च्या आईला संशय येवू लागला होता. आई ने दीपकच्या बाबांकडे बोलूनही दाखवले . बाबांनी तिलाच वेड्यात काढले . चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं. आपण दीपक ला आपल्याकडे आणूया म्हणू लागला . आजीने समजावून आणि थोडं दटाहूनही पाहिलं .पण चिंटू हल्ली हट्ट करू लागला.
दीपक थोडा आजारी पडल्यासारखा झाला . औषधपाणी चालू होतं पण ताप वाढूच लागला . दीपक च विचित्र वागणं आईला अस्वस्थ करतच होतं . आताशा बाबांनाही करू लागलं होतं . आता मात्र आजीला काजळी वाटू लागली आणि चिंटूला आनंद.
आजीने निर्णय घेतला . नवीन गोष्ट तयार केली . मुकाट झोपण्याच्या बोलीवर चिंटूला ती रंगवून सांगितली . पोरगं कधी पेंगुळलं आणि झोपी गेलं त्याचं त्यालाच कळलं नाही . पहाटेचे ४. ३० वाजले असावेत . आजीने दीपकच्या आई बाबांना हलवून जागं केलं .आपली ओळख सांगितली .आमचा मृत्यू ह्याच घरात झाला होता . गेल्या १५ वर्षांपासून इथंच राहतोय आम्ही. अनेक आले आणि गेले. त्यात लहान मुल कोणीच नवतं . १५ वर्षांपासून खेळायला आसुसलेला माझा नातू आता दीपक ला सोडायला तयार नाही . आपल्याकडे आणूया त्याला असं म्हणतोय .दिपकला वाचवायचं असेल तर लगेच घर सोडून जा म्हणून सांगायला आलेय . एवढं बोलून आजी अदृश्य झाली . असल्या गोष्टींवर विश्वास न ठेवणारे बाबा सुधा चपापले . चिंटू उठायच्या आताच आवरा आवरी करून ते कुटुंब घर सोडून गेलेलं बघून आजीला आनंद हि झाला आणि आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.

कथाkathaa

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

15 Jul 2015 - 5:15 pm | पगला गजोधर

?

जडभरत's picture

15 Jul 2015 - 5:18 pm | जडभरत

खूप मस्त आहे कथा! असा एक प्रकार मी स्वतः पाहिलेला आहे. म्हणून विश्वास बसतो.

आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.

भयानकच!!!

थोडी विस्त्रुत लिहायला हवी होतीत! कारण भयकथा हळूहळूच जास्त रंगत जाते. असो. आपापले मत!
-भयकथांचा पंखा

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2015 - 5:22 pm | टवाळ कार्टा

स्वतः पाहिलेला??? डिट्टेलमध्ये लिहा की

नाही हो भाऊ, काही अनुभव असे पब्लिकली शेयर करता येत नाहीत. कधी भेट झाली प्रत्यक्ष तर गप्पा मारू, तुमचाबी गैरसमज जाईल की आमी ड्वैयडी आहोत.

होय . पहिलीच कथा आहे सांभाळून घ्या . आणि ती अवतरण चिन्ह , उद्गार वाचक चिन्ह पण द्यायची रहिलि. पुढच्या वेळेस प्रयत्न करेन

पगला गजोधर's picture

15 Jul 2015 - 5:27 pm | पगला गजोधर

पण ती 'काव्य' विभागात डकवली तुम्ही, हे म्हणजे साखर समजून चुकून मीठ हाताला आल्यासारखं वाटते नं.

तुडतुडी's picture

15 Jul 2015 - 5:40 pm | तुडतुडी

ओह . ते कसं कुठं डकवायचं माहित नाही . पहिलाच लेख आहे माझा मी पा वर.

उगा काहितरीच's picture

15 Jul 2015 - 8:44 pm | उगा काहितरीच

पहिल्या प्रयत्नाच्या मानाने छान जमली आहे कथा, थोडी अजून फुलवायला हवी होती. मिपाकर स्पा यांच्या भयकथा वाचा दिवसा , चार पाच माणसे आसपास असताना

एक एकटा एकटाच's picture

15 Jul 2015 - 11:48 pm | एक एकटा एकटाच

सहमत
+१०१

रातराणी's picture

15 Jul 2015 - 11:53 pm | रातराणी

गोष्ट आवडली.

एक एकटा एकटाच's picture

15 Jul 2015 - 11:53 pm | एक एकटा एकटाच

वरील प्रतिसादांत सुचवल्याप्रमाणे खरच भयकथा किंवा गुढकथा थोड्या फ़ुलवल्या की अजुन गडद होतात.

तरी पहिला प्रयत्न तो ही भयकथेचा. त्याबद्दल कौतुक.

आणि पुढील लिखाणास शुभेच्छा.

मास्टरमाईन्ड's picture

16 Jul 2015 - 12:06 am | मास्टरमाईन्ड

भयानकरित्या छान.

पैसा's picture

16 Jul 2015 - 9:27 am | पैसा

कथा आवडली. शेवटची कलाटणी मस्त!

ऋतुराज चित्रे's picture

16 Jul 2015 - 10:24 am | ऋतुराज चित्रे

हि भयकथा असेल तर मी घाबरतो.
कथेत संदर्भ लागत नाहीत.
चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं
चिंटू दिपकच्या आईला घाबरतो हे समजले.परंतू त्याच्या बाबांना का घाबरत होता. त्यांना चिंटूचा संशय येतो असे कथेत कुठेही आढळले नाही.
आजी व चिंटूच्या म्रुत्यु कशामुळे किवा कोणत्या परिस्थितीत झाला झाला हे सांगितले असते तर चिंटूचे व त्याच्या आजीच्या वागण्याचा संदर्भ लागला असता.
आपला पहिलाच लेख असल्यामुळे फार काही मनाला लावुन घेउ नका. सतत लिहित रहा.

तुडतुडी's picture

16 Jul 2015 - 12:31 pm | तुडतुडी

कथेत संदर्भ लागत नाहीत.
चिंटू आजीच्या मागे लागू लागला . सारखं दीपक च्या आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं.
चिंटू दिपकच्या आईला घाबरतो हे समजले. >>>
आई बाबांची नजर चुकवून खेळावं लागतं कारण चिंटू भूत आहे . हे पोरगं घरात कुठून आलं हा प्रश्न त्यांच्या आई बाबांना पडणार नाही का? चिंटू दिपकच्या आईला नाही घाबरत . तर दीपक भूताबरोबर खेळताना बघून तीच घाबरेल .मग ते इथून कदाचित निघून जातील म्हणून चिंटू आई बाबांच्या समोर येत नाही

तुडतुडी's picture

16 Jul 2015 - 12:36 pm | तुडतुडी

स्पा ह्यां ची 'ते' हि मालिका वाचली . अगदीच काल्पनिक आहे . त्यामुळे भीती नाही वाटली .
हि कथा सुधा काल्पनिक असली तरी जडभरत ह्यांनी म्हणल्याप्रमाणे ती खरोखर घडूहि शकते . त्यामुळे हि मला जास्त भीतीदायक वाटते . बघा बरं तुमच्या घरात असा कोणी चिंटू किवा आजी किवा आणिक दुसरा कोणी नाही ना . :-D

स्नेहल महेश's picture

16 Jul 2015 - 12:59 pm | स्नेहल महेश

शेवट मस्त केलाय

मृत्युन्जय's picture

16 Jul 2015 - 1:17 pm | मृत्युन्जय

कथा जमलीये. अजुन फुलवता आली असती.

अवांतरः स्पाच्या "ते " वरच्या कमेंटचे प्रयोजन नाही समजु शकले. त्याच्याशी तुलना करुन स्वतःची प्रौढी मिरवायचे कारण तर अजुनच नाही समजले. "ते" ही एक उत्कृष्ट भयकथा आहे.

अतिअवांतर: स्पावड्या माझा डु आयडी नाही. तो आणी मी एका कंपुत नाही. किंबहुना मी कुठल्याच कंपुत नाही. स्पावड्या कुठल्या कंपुत आहे की नाही ते माहिती नाही.

अमृत's picture

16 Jul 2015 - 1:36 pm | अमृत

मलापण खटकलं ते.

प्रयोजनः त्यांना वर कुणीतरी कथा बरी आहे, जरा स्पा च्या कथा वाचा अस सल्ला दिलाय. त्या संदर्भात बोलल्या असाव्यात. बाकी तुमचं आणि आमचं अवांतर सेम, त्यात मी तुडतुडी चा डु आयडी अस मी लिहिलंय ;)

अति अवांतरः नवीन लेखकांना अजुन बारकावे वाढवा, अजुन सब्स्टन्स येऊ द्या वगैरे सांगणं वेगळं आणि इथल्याच लोकांची उदाहरणं देऊन जरा बघा, असे सल्ले देणं योग्य वाटत नाही. नवीन लेखकांचा आत्मसन्मान उगाचच दुखावल्यासारखं होतं. सकारात्मक सुचना , सुधारणा द्याव्यात पण असं सांगु नये हे माझं वैयक्तिक मत.

अमृत's picture

16 Jul 2015 - 1:34 pm | अमृत

इतरांनी म्हटल्याप्रमाणेच अजुन फुलविता आली असती. अजुन येऊ द्या.

तुडतुडी's picture

16 Jul 2015 - 2:37 pm | तुडतुडी

नाही हो .आत्मप्रौढी वगेरे काही नाही . माझी कथा स्पा च्या भयकथा पुढे काहीच नाहीये हे मला माहित आहे . मी फक्त प्रामाणिकपणे सांगितलं कि काल्पनिक विषयावर असल्यामुळे मला भीती वाटली नहि. ते उत्कृष्ट कथा लिहितात ह्यात वादच नहि. मी त्यांच्या कथा शोध्तेय. पण मला फट 'ते' सापडलं . बाकीच्यांची लिंक असेल तर करा शेअर

Jack_Bauer's picture

17 Jul 2015 - 12:52 am | Jack_Bauer

आवडली पण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अजून थोडी मोठी झाली असती तर अजून मजा आली असती वाचताना.

आता माझं लेकरू पुन्हा नवीन दोस्ताची किती वर्षे वाट पाहणार ह्याचा विचार मनात येवून दुखःही.

हा शेवट मात्र खतरनाक

पद्मावति's picture

17 Jul 2015 - 2:59 pm | पद्मावति

छान आहे कथा. आवडली. कॉन्सेप्ट मस्तच आहे. मुख्य म्हणजे भयकथा असूनही शेवटी थोडं त्या आजीविषयी ( म्हणजे त्यांच्या आत्म्याविषयी) सहानुभूतीपण वाटते. ही कल्पना जरा वेगळी आणि मस्तं वाटली.

अगदी ! भुताची पण घुसमट भावली.. कथा कॉन्सेप्ट म्हणुन खुप आवडली.