बाया (मयगुढकथा)

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
4 Aug 2015 - 4:00 pm

* संपूर्णपणे काल्पनिक
** कमकुवत मनाच्या लोकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
*** आमची प्रेर्ना

रविवारच्या दुपारी मस्त मटण चापून, वाँकिंगडेड मँरेथॉन पाहता पाहता साधारणपणे मला अर्ध्याएक तासाने सोफ्यावरच अमळसा डोळा लागला तोच, कोणितरी मला धरल्यासारखे जाणवू लागले. मला माझे डोळे बंद असताना पण सर्व दिसत होते. पण तरीही अंगात उठण्याची ताकद नव्हती, हालचाल करू शकत नव्हतो ...ओरडावस वाटलं पण तोंडातुन शब्दच फुटत नव्हते. कोणितरी माझा गळा आवळल्या सारखे वाटत होते. जी भिती, जी काळीज गोठवणारी थंडगार भिती मी एवढी वर्षे मनाच्या जुनाट सांदीकोपर्‍यात गाडून टाकली होती, ती प्रचंड वेगाने सळसळत वर आली आहे. सर्वांगाला कंप सुटतोय,हातपाय लुळावलेत आणि घशाला कोरड पडली आहे असे वाटून शेवटी मी भीमरूपी पुटपूटण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी मला जाणवत होतं की माझ्या डोक्याजवळ कोणितरी उभे आहे. हिंमत करून, मोठ्या मुश्किलीनं मी वर पाहण्याचा प्रयत्न केला, तर सगळंच ब्लर दिसत होतं, मला एक पुसटशी पांढरी आकृती दिसली हातभर अंतरावरून तिचे ते हिरवे डोळे रोखून ती माझ्याकडेच पहात होती. एकाएकी तिची गालफाडं ताणली गेली, घशातली घरघर वाढली आणि तिचे डोळे लकाकू लागले. गालावर उमटण्यास असमर्थ असणारं हसू तिच्या डोळ्यांतून ओसंडत होतं, पण त्याला हसू तरी म्हणता आलं असतं का ? तो आनंद होता. तिच्या डोळ्यातल्या त्या आनंदात क्रौर्य आणि खुनशीपणा होता; आणि त्या पलीकडलंही काहीतरी होतं. त्या आनंदात एक आधाशीपणा होता. तो चेहरा मी कधीही विसरलो नसतो. माझ्या शरीरावरचा केस नं केस ताठ झाला. तिच अतिपरिचीत भीतीची थंड जाणीव पूर्ण त्वेषाने शरीरभर पसरली. पाय लटपटू लागले. आकृती इथवर कशी पोहोचली मला कळलंही नव्हतं. आणि मग आकृतीच्या घशातली ती घरघर मला ऐकू येऊ लागली. जातं दळावी तशी. घरघर..घरघर…स्पष्ट काही कानावर पडत नव्हतं माझ्या, पण त्या भेसूर स्वराला आसमंताने साथ द्यायला सुरुवात केली होती. त्यांच्या किरट्या, कर्कश आवाजाने सभोवताल भारला गेला. एके प्रकारचा शब्दभ्रम होता. तो स्वर भूल पाडत होता. आजुबाजुच्या निर्जीवाला, अचैतन्याला अवाहन करीत होता. माजघरात काहीतरी जिवंत होऊ लागलं. आजवर मृत असणारं, किंवा कधीच जिवंत नसणारं असं काहीतरी त्या सूरात सूर मिसळून बोलू लागलं. "कितीवेळचा पडणार आहेस तू सोफ्यावर ? तरी म्हणत होते 'एकच' घे म्हणून…उठ रे … आपल्याला जायचं नं मॉलमधे ? ५ मिनिटात हा फेसपँक काढते, चहा टाकलाय, उठ आणि घे आवरून आता ? श्शी बाई किती ते वेंधळं असावं माणसाने ?? " माझी धर्मपत्नी माझ्या नावांन शंख करत म्हणाली…… स्साला या बाया म्हणजे नं ….

kathaaविरंगुळा

प्रतिक्रिया

होबासराव's picture

4 Aug 2015 - 4:04 pm | होबासराव

शिर्षक वाचुनच पहिलि प्रतिक्रिया __/\__ :)

चिगो's picture

4 Aug 2015 - 4:23 pm | चिगो

अरे देवा..
=)) =))

आपल्याला जायचं नं मॉलमधे ? ५ मिनिटात हा फेसपँक काढते, चहा टाकलाय, उठ आणि घे आवरून आता ? शशी बाई किती ते वेंधळं असावं माणसाने ?? " माझी धर्मपत्नी माझ्या नावांन शंख करत म्हणाली…… स्साला या बाया म्हणजे नं ….

गतप्राण.. गचकलो हसून हसून..

जडभरत's picture

4 Aug 2015 - 4:36 pm | जडभरत

मस्त रे पगल्या भाऊ!!!
उत्कृष्ट विडंबन. आयला दिल जीत लिया तूने!!!
शशी बाई किती ते वेंधळं असावं माणसाने ?? इथं फक्त श्शी बाई असं पाहिजे होतं.

मुक्त विहारि's picture

4 Aug 2015 - 4:51 pm | मुक्त विहारि

राहिलेच की...

ब़जरबट्टू's picture

4 Aug 2015 - 4:57 pm | ब़जरबट्टू

कचरा केला राव पार.. बेक्कार फुटलो बघा...
+10 घ्या... ( १०० शब्द = +१, १००० शब्द = +१० ) :)

तुडतुडी's picture

4 Aug 2015 - 5:01 pm | तुडतुडी

हि हि हि . पण त्या मुळ प्रेरणेच विडंबन म्हणता येईल का हो ?

पगला गजोधर's picture

4 Aug 2015 - 5:05 pm | पगला गजोधर

तुम्हाला (वाचकांना) आवडतं नं घाबरायला, घ्या, पोट भरून घाबरा…

टवाळ कार्टा's picture

4 Aug 2015 - 5:10 pm | टवाळ कार्टा

+१

मृत्युन्जय's picture

4 Aug 2015 - 6:01 pm | मृत्युन्जय

हाहाहा, मस्त जमलीये कथा

मितान's picture

4 Aug 2015 - 6:04 pm | मितान

=)) =))

पाटील हो's picture

5 Aug 2015 - 9:18 am | पाटील हो

हा हा

संजय पाटिल's picture

5 Aug 2015 - 12:47 pm | संजय पाटिल

… स्साला या बाया म्हणजे नं ….
च्या ऐवजी ....स्साला या बायका म्हणजे नं ... असावं का?

स्साला या बायका म्हणजे नं ... असावं का?

शीर्षकाशी जुळेल असं होणार नाही मग ते वाक्य
म्हनुन … स्साला या बाया म्हणजे नं …. हे टन्कले

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Aug 2015 - 3:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

माम्लेदारचा पन्खा's picture

7 Aug 2015 - 2:42 pm | माम्लेदारचा पन्खा

सुबेच्चा....

पगला गजोधर's picture

7 Aug 2015 - 3:16 pm | पगला गजोधर

तुमचं जर मी ऐकलं तर, बिल्डींगच्या जिन्या खाली पथारी टाकून झोपावं लागेल मग मला …

प्यारे१'s picture

7 Aug 2015 - 3:38 pm | प्यारे१

खिक्क्!

रातराणी's picture

8 Aug 2015 - 10:33 am | रातराणी

वा वा
खतरा लिहलय!

Pain6's picture

11 Aug 2015 - 10:53 am | Pain6

हाहाहा

तीरूपुत्र's picture

11 Aug 2015 - 11:29 am | तीरूपुत्र

घाबरलो ना राव....छान कथा.

उगा काहितरीच's picture

11 Aug 2015 - 12:48 pm | उगा काहितरीच

मस्त...