असू दे

गवि's picture
गवि in दिवाळी अंक
30 Oct 2013 - 1:01 pm

दिवाळीत फार फार प्रदूषण होतं.

पण वात पेटवून दोन्ही कान गच्च दाबत जीव खाऊन दूर पळणारं पोरगं.. वळून वळून पाहात राहतं..

धम्माड स्फोट होतो.. पण आपल्याला काही होत नाही.. या जाणिवेत खूप सुख असतं..

मनगटात बळाच्या मनगट्या चढतात.. पुढे कधीच न चढणार्‍या..

म्हणून असूदेत थोडे फटाके..!!

..

तेल तूप बेसन नेहमी महागच होत असतं.. स्वस्त नव्हे..

कितीही काहीही महाग झालं तरी फराळाचे डबे फळीवर चढतातच..

आणि गेल्यावर्षीचे दमट फटाके उन्हात वाळत पडतातच..

पण दिवाळीच्या तोंडावर महाग झालं म्हणून हेडलाईन्स तरी येतात..

अन मध्यमवर्गाचे हाल पुराव्याने शाबीत होतात.

म्हणून असू दे थोडी महागाई..!!

...

सगळा फराळ तेलातला..आरोग्याला बाधक म्हणतात..

पण शेजारच्या चकल्या हसतात तेव्हा बायाही हसतात..

विकट का होईना पण हसतात तर..

आईच्या शिकवणीचं आपलं मोहन मात्र कसं कडकडीत आणि बरोब्बर...

बाया सुखावतात..

म्हणून असू दे थोडा तळकट फराळ..!!

...

दिवाळीच्या संध्याकाळी

चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं..

"बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं..

आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा..

पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो..

धुतल्या मनाला दिवाळीच्या दुपारी मनातल्या मनात बांधायला एक तरी किल्ला मिळतो..

म्हणून पुढच्या दिवाळीच्या ओढीसाठी..

असू दे थोडा सुट्ट्यांचा दुष्काळ..!!

- गवि

दिवाळी अंक २०१३

प्रतिक्रिया

मस्त ! दिपावलिच्या मंगलमयी शुभेच्छा :)

प्रभाकर पेठकर's picture

1 Nov 2013 - 1:47 pm | प्रभाकर पेठकर

व्वा दिवाळी सणाचं छान आणि चपखल वर्णन. अभिनंदन.

चिगो's picture

1 Nov 2013 - 1:48 pm | चिगो

गविराज, जबरदस्त.. दिवाळी शुभ करणार तुम्ही, नक्कीच.. :-)दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..

सुमीत भातखंडे's picture

1 Nov 2013 - 1:49 pm | सुमीत भातखंडे

चाकरमानी मन सुट्ट्यांच्या दुष्काळाला तोंड देण्यासाठी खंतावून तयार होतं..
खर आहे राव.
बाकी लेख मस्त

ऋषिकेश's picture

1 Nov 2013 - 1:54 pm | ऋषिकेश

छानच..
आता आमच्याकडून दिवाळीच्या गवि तुम्हाला व सर्व मिपाकरांना शुभेच्छाही असू दे म्हणतो ;)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Nov 2013 - 2:01 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्तच गवि...
सर्वांना दिपावलिच्या मंगलमयी शुभेच्छा :)

चित्रगुप्त's picture

1 Nov 2013 - 2:03 pm | चित्रगुप्त

साधु साधु
अगदी असेच वाटते दर दिवाळीला.

मुक्त विहारि's picture

1 Nov 2013 - 2:12 pm | मुक्त विहारि

झक्कास...

सोत्रि's picture

1 Nov 2013 - 2:19 pm | सोत्रि

झक्कास!

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक आणि मंगलमयी शुभेच्छा!

- (दर दिवाळीत 'दिवाळं' निघणारा) सोकाजी

यशोधरा's picture

1 Nov 2013 - 2:19 pm | यशोधरा

छान मुक्तक!

मदनबाण's picture

1 Nov 2013 - 2:28 pm | मदनबाण

मस्त ! :)

नित्य नुतन's picture

1 Nov 2013 - 2:45 pm | नित्य नुतन

एक नंबर गवि साहेब ....
खूपच छान

तुषार काळभोर's picture

1 Nov 2013 - 2:45 pm | तुषार काळभोर

नेहमीसारखंच!!
आमच्या मनातलं.. जे आम्हाला बोलताही येत नाही, ते तुम्ही इथे उतरवलंत...

बहुगुणी's picture

1 Nov 2013 - 2:58 pm | बहुगुणी

प्रासंगिक आहेच, गवि-टच देखील आहे. "आंघोळ तर रोजच करतात लोक.. काहीतर दोनदोनदा..पण दिवाळीच्या पहाटे पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो.." हे खासच!

चतुरंग's picture

2 Nov 2013 - 9:43 am | चतुरंग

खास गवि टच ओळी....

मेघवेडा's picture

3 Nov 2013 - 1:14 am | मेघवेडा

पेश्शल गविटच. :)

मस्तच गवि शेट!

याप्पी दिवाली. :)

किसन शिंदे's picture

1 Nov 2013 - 3:03 pm | किसन शिंदे

खास गवि'टच' मुक्तक!

दुसर्‍याच वाक्याला बालपणातल्या दिवाळीच्या सगळ्या आठवणी क्षणात नजरेसमोर आल्या. :)

सुधीर's picture

1 Nov 2013 - 4:09 pm | सुधीर

असेच नेहमीप्रमाणे दिवाळीचे क्षण मस्त असू दे!. सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!

पैसा's picture

1 Nov 2013 - 4:49 pm | पैसा

तंतोतंत!!

"व्हय देवा म्हाराजा!!"

अनन्न्या's picture

1 Nov 2013 - 4:53 pm | अनन्न्या

दिवाळीचे अगदी जसेच्यातसे वर्णन! दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

परिंदा's picture

1 Nov 2013 - 5:00 pm | परिंदा

मस्तच!!

दिवाळी अंक आल्याशिवाय दिवाळी आली असे वाटतच नाही :)

धन्या's picture

1 Nov 2013 - 5:38 pm | धन्या

मस्त !!!

वेल्लाभट's picture

1 Nov 2013 - 7:54 pm | वेल्लाभट

क्या बात है गवि साहेब.... मस्तच!!!! वाह.

चाफा's picture

1 Nov 2013 - 10:49 pm | चाफा

मान गये उस्ताद..

"बेंदूर बेंदूर सणाचं लेंढूर".. ने सुरु झालेलं ते सगळं "दिवाळी दिवाळी सणांना ओवाळी".. ने संपतं..

खरयं, एरव्ही बजेट बजेट करताना दिवाळीत बॅलन्सकडे पार दुर्लक्ष होतं :)

फार आवडली कविता. वाचताना नंतर मनातल्या मनात गप्प बसावसं वाटलं.

शिद's picture

2 Nov 2013 - 1:12 am | शिद

आजच्या जमान्याच्या दिवाळीचे एकदम चपलख वर्णन…

सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा!!!

राघवेंद्र's picture

2 Nov 2013 - 1:54 am | राघवेंद्र

एकदम छान वर्णन..........

सर्व मिपाकरांना दीपावलीच्या शुभेच्छा!!!

राघवेंद्र

प्रचेतस's picture

2 Nov 2013 - 6:57 am | प्रचेतस

क्या बात है..!!!!!
एकदम सुरेख.

चतुरंग's picture

2 Nov 2013 - 9:42 am | चतुरंग

खूपच आवडली. काही काळ काहीच सुचलं नाही. सगळं हातात धरलेल्या वाळूसारखं निसटंत चाल्लंय की काय असं वाटत होत पण "असू दे" असं पुन्हा पुन्हा वाचल्यावर खरंच वाटलं असू दे, सगळीच मजा काही संपलेली नाही.

(पुन्हा एकदा आनंदी) रंगा

सुहास झेले's picture

2 Nov 2013 - 12:32 pm | सुहास झेले

मस्तच...... :) :)

ब्रिज's picture

2 Nov 2013 - 12:59 pm | ब्रिज

गविशेठ, भारी लिहिता राव !

दिपक.कुवेत's picture

2 Nov 2013 - 1:00 pm | दिपक.कुवेत

आवडलं. नेमक्या शब्दात व्यतीत झालयं.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Nov 2013 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

मुक्त केलेला प्रत्येक क अवडला. :)

गवि's picture

2 Nov 2013 - 2:44 pm | गवि

धन्यवाद हो बुवा.

पण आमच्या शाब्दिक बुडबुड्यांपेक्षा तुमची खर्याखुर्या फुलांनी बनवलेली रांगोळी सर्वार्थाने सुंदर आहे.

पहाटे उठून तुम्ही ती ज्या निगुतीने बनवली आहे त्याचा जवाब नाही.

एक आकार वेडावाकडा नाही की कुठे अंशभर ढोबळपणा नाही. आणि त्यात मिपाप्रेमाखेरीज लाभ किंवा फळाची काही अपेक्षा नसताना.

टोपी काढली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Nov 2013 - 2:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सरस मुक्तक !

दु:खातही सुख शोधायची प्रवृत्ती भावली... म्हणतात ना की "हवं असलेलं मिळण्यात नाही तर मिळालेलं हवं असण्यात सुख असतं."

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2013 - 1:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुक्तक आवडलं. आजूबाजूला पाहिल्यावर लक्षात येतं की दिवाळीचा उत्साह अजिबात कमी नाही.
थोडी महागाई, थोडा फराळ, थोडे दमट आणि नवे फटाके, आणि असं सर्व सर्व मुक्तातून स्सहीच पोहचलं.

>>>> पायाच्या बोटांमधल्या बेचक्यालाही साबण मिळतो
खासच.

-दिलीप बिरुटे

-दिलीप बिरुटे

सुधीर मुतालीक's picture

3 Nov 2013 - 8:52 pm | सुधीर मुतालीक

मजा आली, छान लिहीलंय.

मन१'s picture

4 Nov 2013 - 3:49 pm | मन१

बहुत खूब.

वर तिमा म्हणतात त्यच्यशि सहमत.

चंबा मुतनाळ's picture

4 Nov 2013 - 8:13 pm | चंबा मुतनाळ

झक्कास मुक्तक. सर्वाना दिवाळीच्या शुभेछा.

स्पंदना's picture

6 Nov 2013 - 6:14 am | स्पंदना

असु दे! असु दे!
किती मनापासून उतरलय वास्तव अन सणाची ओढ!
काय रोजचा कामाचा धबडगा असतोच, पण दिवाळीचा म्हंटल्यावर कसा हाताला जरा वेग येतो.
तोच फराळाचा जिन्नस वर्षात कधी केलातरी असा चविला लागत नाही. चारच म्हणता म्हणता सहासात पदार्थ अस्सेच बनवले जातात. पैसा नाही म्हणता म्हणता चार कपडे खरेदी होतातच.
फार छान लिहीलं गवि!

रुमानी's picture

8 Nov 2013 - 11:23 am | रुमानी

दिवाळीचे वास्तव अगदी तंतोतंत उतरलय लिखानातुन. :)

कवितानागेश's picture

11 Nov 2013 - 12:57 am | कवितानागेश

पुन्हा वाचलं... :)

पाषाणभेद's picture

11 Nov 2013 - 1:33 am | पाषाणभेद

छान आहे.