सदैव उघडे मज दुःखाचे दार नको
फक्त वेदना आयुष्याचे सार नको
कोण खेळला कैसा येथे पाहून घे,
मला कुणाची जीत नको वा हार नको!!!
का विसरावी प्रीत माणसा मनातली
जगात कोणी इतकाही लाचार नको
मला झेलता यावे इतके पदरी दे,
मला पाहिजे ते ही काही फार नको
माझा व्हावा मीच दिलासा कायमचा,
कोणाचाही खांदा वा आधार नको.
--स्नेहदर्शन
प्रतिक्रिया
1 Nov 2013 - 1:54 pm | सुमीत भातखंडे
.
1 Nov 2013 - 1:56 pm | ऋषिकेश
हिच कविता ऐसीच्या दिवाळी अंकातही आहे. दोन्ही अंकांना पाठवलीत की काय? :)
1 Nov 2013 - 2:06 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हे मस्तचं!