✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"

श
शशिकांत ओक यांनी
Mon, 06/02/2025 - 22:04  ·  लेख
लेख

वायुसेनेतील आठवणी – भाग ४

"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे" "सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?" (“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”) "यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!" (“तुम्ही हे पुण्यात असताना कधी सांगितलंच नाही! आता ठरलं – मी त्यांना भेटायला, त्यांना सॅल्युट करायला नक्की जाणार!”) ...आणि खरंच, तो माझ्या मेसच्या खोलीत भेटायला आला — ९ विंग, एअरफोर्स स्टेशन, थेट तुघलकाबाद दिल्लीहून! "सर, आय वॉज विथ युवर अंकल व्हेन आय वेंट टु पुणे ऑन माय नेक्स्ट ट्रिप टू अटेंड द लास्ट ऑफ द एग्झॅम्स. व्हेन आय टच्ड द फीट ऑफ कॅप्टन सर, आय फेल्ट अ‍ॅज इफ आय वॉज मीटिंग नेताजी सुभाष!" (“सर, जेव्हा मी कॅप्टन सरांच्या पाया पडलो, तेव्हा मला असं वाटलं की मी नेताजींनाच भेटतोय…”) "आय सॅल्युटेड हिम बिफोर लिव्हिंग १० ग्रीन पार्क सोसायटी, ऑफ बाणेर रोड. आय वॉज लकी टु मीट मॅडम साधना ओक – अ व्हेरी मदरली लेडी." त्याने काही पुस्तके विकत घेतली. कॅप्टन ओक यांनी त्याला नेताजींबरोबरचे दिवस सांगितले. "व्हेन आय वॉज अ लॉ स्टुडंट, आय अटेंडेड अ पब्लिक मीटिंग ऑफ नेताजी. आय नेव्हर थॉट आय वुड लेटर जॉइन हिम अब्रॉड." (“जेव्हा मी कायद्याचा विद्यार्थी होतो, तेव्हा पुण्यात नेताजींचं भाषण ऐकलं होतं. तेव्हा वाटलं नव्हतं की पुढे कधीतरी त्यांच्या जवळच्या चमूत सहभागी होईन!”) "आय वॉज पोस्टेड टू सायगॉन – नाऊ हो ची मिन्ह. अ कॉल केम – 'वूड यू लाईक टू जॉइन आझाद हिंद फौज?' आय अ‍ॅक्सेप्टेड. आणि काही महिन्यांनी नेताजी सिंगापूरला आले!" ते पुढे म्हणाले: "विमान अपघाताच्या वेळी मी ले. कर्नल हबीबुर रहमान यांच्याकडून थेट माहिती मिळाली. नेताजी त्याच हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला." काही वर्षांनी माझं काम होतं AFCAO सुब्रोतो पार्क नवी दिल्लीमध्ये. त्याला पत्र लिहिलं. आम्ही भेटलो – कॅन्टीनजवळ, अर्जुन सिनेमा हॉल शेजारी. "सर, आय नो आय ऍम अ कॉपल. बट दॅट शुड नॉट बी अ बॅरियर बिटवीन यू अँड मी!" मी निवृत्त झालो, २००३ मध्ये. पुण्यात स्थायिक झालो. एकदा पांडे माझ्या नव्या घरी आला — पण माझ्या अनुपस्थितीत फारसं स्वागत झालं नाही. नंतर काही काळ पत्रव्यवहार झाला. तो फ्लाईट लेफ्टनंट झाला होता — लॉजिस्टिक ब्रँचमध्ये. पण माझ्यासाठी तो… "कॉपल पांडे – अ गुड फेलो!" एका दिवशी त्याचं सुंदर हँडरिटन पत्र आलं — जणू छापील वाटावं इतकं नितळ अक्षर! GS Pandey 7 BRD Air Force Station, Tughlakabad 28 Aug 03 "रेस्पेक्टेड सर, प्लीज अ‍ॅक्सेप्ट माय रिगार्ड्स अँड सॅल्युट्स…" "सर, आय ऍम टू इनसिग्निफिकंट अँड अ जुनियर पर्सन टु अ‍ॅक्सेप्ट युवर सॅल्युट – ‘प्रणाम’!" (“सर, मी फार छोटा माणूस आहे. ‘प्रणाम’सारखा मान मला स्वीकारायला लायक नाही.”) "यू कन्सिडर मी अ फ्रेंड – आय कन्सिडर धिस द फायनेस्ट ऑनर!" (“तुम्ही मला मित्र मानता — माझ्यासाठी हा आयुष्यातला सर्वोच्च सन्मान आहे!”) "यू सेड – 'आमच्यात पुन्हा कदाचित भेट होणार नाही' – दॅट वॉज जस्ट अ सेंटन्स. बट आय अंडरस्टुड एव्हरीथिंग." "युअर विशेस आर माय कमांड्स!" "आय थँकफुली रिमेंबर युवर काइंड सपोर्ट ड्युरिंग मोमेंट्स ऑफ पेन, अँड वुड बी ग्लॅड टु वॉश युवर प्लेट्स!" असा होता पांडे – शब्दांपलीकडचा सैनिक, संवेदनशील मनाचा सहकारी आणि माझ्या आयुष्यातला एक अजरामर अध्याय. “ही कथा पुन्हा उलगडताना, २० वर्षांनंतर कॉपल पांडेचं स्मरण झालं. त्याच्या धडपडीला आणि ऋणानुबंधाला आजही ताजेपणा आहे. कदाचित तो आता निवृत्त झाला असेल... पण त्याचं ते रूप – सैनिक, कलाकार, सेवाभावी मित्र – कायम मनात कोरलं गेलं आहे.” समाप्त
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
795 वाचन

💬 प्रतिसाद

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा