घ्या कविता...
'कॅश'वंत वर्मा,
भोग आता कर्मा,
महाभियोगधर्मा
सामोरी जा ||
जर दिला राजीनामा,
तर नाही काजीनामा,
सांग तुझा कारनामा,
निवृत्ती जा ||
न्यायाधीशाच्या घरी रोकड,
आता तो शोधतो बोकड,
जो घेईल खांद्यावर जोखड,
वाचवण्या ||
संसदेत घेराव,
मांडला ठराव,
तरी हे राव,
ढिम्म नाही ||
न्यायाधीश यशवंत
पकडला गेला 'कॅश'वंत
आता करणार बस वंत
घरातच ||
प्रतिक्रिया
9 Jun 2025 - 11:52 am | बाजीगर
न्यायदानाची शपथ,
धरला याने भ्रष्ट पथ,
खचाखच नोटांचा रथ,
न्यायविक्या ||
न्यायाचा सडला तराजू ,
बघून कायद्याची बाजू
मंत्री किरेन रिजीजू,
सरन्यायाधीश खन्ना संजू
म्हणाले हटवा नका लाजू
तात्काळच ||
9 Jun 2025 - 12:25 pm | कर्नलतपस्वी
हाय काय नाय काय.
13 Jun 2025 - 10:31 am | विवेकपटाईत
काहीही होणार नाही. कोंग्रेस पार्टी महाभियोग खटल्याचा विरोध करणार. रामास्वामी प्रमाणे हा पण शेवटच्या दिवसापर्यंत काम करेल. संसदेने भ्रष्ट न्यायाधीशांच्या बाबतीत ही कायदा करणे गरजेचे आहे. न्यायालय विरोध करेल तर संविधान संशोधन केले पाहिजे. बाकी मनुस्मृती प्रमाणे जर लाच घेणार्या क्लार्क किंवा सिपायला 4 वर्षाचा दंड होत असेल तर त्याच्या 16 पट अर्थात 64 वर्षाची जेल न्यायाधीशाला झाली पाहिजे.