जे न देखे रवी...
चंद्रायण..!
ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!
पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!
मुसाफिर..
मुसाफिर...
अवचित एका मुसाफिरानं,
जीवनात पाऊल टाकलं..
भूतकाळाच्या क्षणांचं पान,
त्यानं अलगद पुसून टाकलं..
परीस स्पर्शानं त्याच्या,
मनाला मोहरुन टाकलं..
आभार कसे मानू त्या योगेश्वराचे,
ज्यानं माझं आयुष्यच उजळून टाकलं....!!
जयगंधा..
३०-११-२०२०.
कुणीतरी...
कुणीतरी..
कुणीतरी माझच मला,
नव्यानं ओळखायला शिकवलं..
आरशाचं स्थान जनात नसून,
मनात असलेलं दाखवलं..
विचारांच्या पसारा-याला,
मनातच आवरायला शिकवलं..
बावरलेल्या मनालाही,
आशाकिरणांनी सावरलं..
सैरभैर चित्ताला त्यानं,
विवेक देऊन स्थिरावलं..
कोमेजलेलं चैतन्य,
एका आशीर्वादानं फुलवलं..
बारमास - हायकू
लाॅकडाउनमध्ये लागलेल्या छंदाने आता थोडं बाळसं धरलंय म्हणायला हरकत नाही. काही लेख आणि थोड्याफार कविता एवढी मोजकीच शिदोरी गाठीशी असताना असं म्हणणं धाडसाचंच आहे, पण मूळ मुद्दा हा की नाविन्याची ओढ बऱ्याचदा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे काव्याचे वेगवेगळे प्रकार करून पाहावेसे वाटले.
मजसी भेटवा...
मजसी भेटवा....
कुणी असो सोवळा,
कुणी तो बावळा,
विठ्ठल सावळा,
सर्वांना प्रिय..
कृपेची साऊली,
उभी असे राऊळी,
ती विठू माऊली,
सर्वांना प्रिय..
क्षण जाई वाया,
निरवी "तो" माया,
ऐसा विठुराया,
सर्वांना प्रिय..
वाजवू मृदुंग,
गाउनी अभंग,
मनी पांडुरंग,
सर्वांना प्रिय..
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
शुभेच्छा देतो की मस्करी करतो? : नागपुरी तडका
सुख-समृद्धीच्या देतो शुभेच्छा
की तू करतो मस्करी?
कुठून येईन रे भाऊ धन
आम्हा शेतकऱ्याच्या घरी?
नीरव
असंख्य काजव्यांच रान
अंधाराला लावला टित
सरू नये उरू नये गाणं
मर्मभेदी घुसलाय मान
तरंगावर पहूडली कात
अशी ही नीरव कवनं
सहजच...
सहज त्या दिवशी तू
फोटोसाठी पोज़ काय दिलीस,
नकळत माझ्या ह्रदयाची
तार छेडुन गेलीस..
कस् सांगू तुला काय
झक्कास दिसलीस तेव्हा,
असाच मला छळायचा
तुझा छद जगावेग.ळा..
काढलेस जरी असले फोटो तर
प्लीज़ दाखवू नकोस मला,
ते क्षण मिस केल्याचा
त्रास होतोय मनाला..
एका सैनिकाची परीक्षा.. मातृभूमीच्या प्रेमासाठी...
तुला कसँ सांगू आई, आज माझी परीक्षा आहे
या रणागणावर उरलेला मी शेवटचा सैनिक आहे,
आत्मारामाची दीपावली..!!
आत्मारामाची दीपावली..!!
अंधारातून प्रकाशाकडे,
जाणारी ती वाट,
जीवनात आली,
मंगलमयी पहाट..
किती काळ आसूसून,
पाहतेय मी वाट,
अंतरीच्या गाभाऱ्यात "त्याला",
माझ्या शरणागतीचा पाट..
समर्पणाचा स्नेह,
सद् भावनांची उटी..
अभ्यंगसमयी अशी,
"त्याच्या" चरणी मिठी..
शब्द आणि सूर
कदाचित शब्द निरर्थक ठरले नसतील
पण ते पोचले नाहीत त्या अंतापर्यंत
काही ओळी ओसाड पडल्या खऱ्या
पण त्यांना तर वाटाच नाही सापडल्या
म्हणूनच तर मनातल्या पर्णरेखांना
डायरी जवळची वाटली
कारण त्यांना माहित आहे
मनातून उमटलेल्या सुरांचा प्रवास
चालू असतो निरंतर .....
मी आणि तू
मला प्रत्यक्ष एकदाही न भेटता
तुला माझ्या मनाचा गाभारा गवसला
आणि मी
मी मात्र तुला माझ्यात शोधायचं सोडून
इतरत्रच भटकत राहिले ...
कोणत्याच नळ्यात
- डॉ. सुधीर रा. देवरे
अनादी काळापासून
सरपटत चाललोय मी
प्रचंड अस्ताव्यस्त पसारा घेऊन
माझी लांबी रुंदी उंची
मोजता येत नाही मलाच
अंगाखांद्यांवर वाढणार्या
असंख्य जीव जंतूंचं
संगोपन करत
कुठून निघालो
नि कुठं संपणार
हा आदिम चिंतनाचा प्रवास
माहीत नाही
दिवाळी इथली आणि तिथली
*दिवाळी इथली आणि तिथली*
बंगल्यामधे सगळीकडे विजेची रोषणाई
गिफ्ट बाॅक्सेसमधून ओसंडते मेवे मिठाई
खातील तरी किती..अर्धे वायाच जाई
कशाचीच तमा इथल्या कोणालाच नाही !!
झगमगाटात वाहतो पैशांचा महापूर,
आसमानात पसरे हजारो फटाक्यांचा धूर !
तिजोरी भरून वाहिली तरी 'अजून' चा सूर,
कोण करेल भस्मसात हा लालसेचा असुर !!
दोघे आपण...!!
दोघे आपण...!!
परिणय आपुला, हे नवजीवन,
त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण,
जगा वेगळा वाटे साजण,
तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण..
मनी बांधते मखमली तोरण,
छोटे घरकुल, मोठे अंगण,
अनुरागाचे त्या, मधुर शिंपण,
पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण..
नको सत्ता
(गैरमुरद्दफ गझल)
नको सत्ता, नको दौलत
हवी केवळ तुझी सोबत
पुरे ती रोजची कामे
चहा घेऊ, बसू बोलत
कुणालाही नको सांगू
तुझ्यामाझ्यातली गंमत
कधी होणार तू माझी
कळू दे ना तुझेही मत
सभोती रंग मुबलक पण
निराळी ही तुझी रंगत
(समाप्त)
ओळख!
संदर्भः
लहान मुलांकडे असलेल्या निरागसतेमुळे मी नेहमीच प्रभावित अन् अचंबित होत असतो. आणि खरंतर ते अत्यंत आनंददायी असतं!
"अरे खरंच.. आपण असा साधा विचार का नाही करू शकलो?" असं स्वतःला अक्षरशः अनेकदा विचारण्याची वेळ येते !
त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन फार साधा आणि कुतुहलाचा असतो. सरळ स्वभाव असल्यामुळे केमिकल लोचा कमी असतो!
शहाणी मुलगी....
तुझ्या समोर मी नेहमीच शहाण्यासारखं वागायचं ठरवते.
खूप वाटंत असतं तुझ्याकड अनिमिष नेत्रांनी पहावं..
तुझ्या कपाळावर येणारी चुकार बट, तुझे भुरभुरणारे केस,
तुझ्या गालावरची खळी, बोलताना हलणारे लोभस ओठ..
पण मी अगदी शहाण्या मुलीसारखी बसते, डोळे झुकवून.
मिसळ पाव मिसळ पाव
मिसळ पाव मिसळ पाव
खा रे खा मिसळ पाव मिसळ पाव
मटकीची उसळ तिची करा मिसळ
उसळीत घातला शेव कांदा
त्यात पिळला लिंबू अर्धा
रस्सा टाका त्यात चांगला
पावाबरोबर खाऊन टाका
मिसळ पाव मिसळ पाव
- ‹ previous
- 2 of 436
- next ›