Skip to main content

पण लक्षात कोण घेतो ??

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 10/09/2015 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
तो आला पण नेहमीप्रमाणे घुश्शातच होता …. तोंडाने नेहमीची बडबड चालली होती, हातवारे चालले होते …. आमचं भेटायचं ठरतं नेहमी… मी वेळेवर पोचतो पण ह्याचा उशीर कायम ठरलेला…कारण ह्याचे समाजकार्य ! त्याला काहीच वेळ काळ नसतो…सदानकदा कुठेतरी वाहिलेलाच…. जिथे कुठे काही चुकीचं चाललं असेल तिथे हा बरोब्बर पोचतो …. मला नेहमी कुतूहल वाटतं ह्याचं पण त्यावर त्याचं ठरलेलं उत्तर …"अरे, सध्या वेळच अशी आहे की कुठेतरी काहीतरी चाललेलं असतंच… इतरांनी झापडं लावून घेतली आहेत , फक्त माझे डोळे उघडे असतात !" अरे पण तू कशाला तुझा जीव धोक्यात घालतोस नाहक ?? आपण बरं आणि आपलं काम बरं….

चावडीवरच्या गप्पा – अकलेचा दुष्काळ

लेखक सोत्रि यांनी गुरुवार, 10/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee "आयजीच्या जीवावर बायजी कशी उदार झालीय बघितलेत का?”, भुजबळकाका हसत चावडीवर प्रवेश करत. “अहो बहुजनहृदयसम्राट, कोण आयजी कोण बायजी, काही स्पष्ट बोलाल का?”, नारुतात्या प्रश्नार्थक सुरात. “अहो नारूतात्या, पेपर वाचायला घेता की सुरनळ्या करायला?”, बारामतीकर खोचकपणे. "बारामातीकर आणि भुजबळकाका, तुम्ही नुसते टीकाच करा”, चिंतोपंत हताशपणे. "अहो तो राज आणि त्याची मनसे काही करते आहे तर ते कोणालाही बघवत नाहीयेय!”, घारुअण्णा

विसराळू नाना

लेखक सत्य धर्म यांनी गुरुवार, 10/09/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
विसराळू .. वा काय शब्द आहे ना, याचे किस्से पण खूप आहेत बर तर असेच काही किस्से इथे सांगतो.......... आमच्या गावचे नाना म्हणजे एक नंबर विसराळू माणूस. बाजारात गेला तर मोकळी पिशवी घरी आणि बायको बाजारात एवढा विसराळू. बरं असं पण नाही की हा काम करत नाही. चांगला साखर कारखान्यात कामाला आहे, पण कसल हो! कामावर जाताना डबा घेऊन बस थांब्यावर आला तर जेवणाचा डबा हलवून लक्षात ठेवतो, कामावरून आलो आहे की जायचं आहे ते; आणि हो, कारखान्याकडे जाणा-या आणि येणाऱ्या दोन्ही गाड्यांना हात करतात.

सारेगमप मपधनिसा- एक आठवण

लेखक कहर यांनी गुरुवार, 10/09/2015 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सवात हल्ली गणपतीची सिनेमाच्या तालावरची फुटकळ गाणी ऐकली कि मला अजूनही तिच्या त्या गाण्याची आठवण येते. २५ वर्षे झाली तरी अज्जिबात पुसट न झालेल्या त्या सुरात काय जादू होती काय माहित. प्राथमिक शाळेचा वर्ग भरलेला असायचा. १० ते ५ ची शाळेची वेळ असायची. अभ्यासाचे विषय ४ पर्यंत संपवून एक तासात बाई अभ्यासेतर गोष्टी करून घ्यायच्या. (त्यावेळी madam म्हणायची पद्धत निदान मराठी शाळांमध्ये तरी चालू व्हायची होती.) त्यात प्रामुख्याने अथर्वशीर्ष , रामरक्षा, मनाचे श्लोक असायचे. उरलेल्या वेळात गोष्टी, विनोद, कोडी, सामुहिक कविता, वक्तृत्व किंवा गाणी असायची.

ताज़ी जिल्बी:- स्कार्फ आणि डोळे! ;-)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 10/09/2015 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्कार्फ आडून चमकती डोळे खुणवून काही बोलताती मनी आमुच्या काही पक्षी हलकेच हळूच उडताती तरंग येतात मनी मग जोवर ती असते पुढे स्वप्न-रंजनाचा पारवा ऊंsssच आकाशी उडे ओढणि ती सँक ती ही डोकावे वॉटर बॉटली सुंदर किती रूप हे भावना मनात साठली हॉर्न मागून वाजताही किल killले तो आरसा निबरल्या आमुच्या मनी फरक न पडे फारसा!

हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 10/09/2015 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...

माणूस

लेखक सुमित_सौन्देकर यांनी गुरुवार, 10/09/2015 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
बराच अवधि गेल्यावर्ती हर्ष मनी दाटला हरवलेला माणूस पुन्हा रस्त्यावरती भेटला कसलीही ना चाहुल देता पाठलाग त्याचा केला थोड़े अंतर राखून तेव्हा नवा प्रवास झाला भुकेलेल्या जिवास पाहून पानी डोळ्यात दाटल होत न्हवत शिदोरितल सार त्याने वाटल हतबल उभ्या रस्त्यालगत अंधाकड़े पाहता पळत जाऊन पुसल त्याने सांग कुठे राहता? दमून भागून शेवटी बसता रोजच्या गाडीत जाऊन वृद्ध दिसले उभे कुणी उठला जागा देऊन पाहून सार ओशाळल्याने मनी विचार आला कधी काळचा आपल्यातला तो माणुस कुठे गेला
काव्यरस

तू ग

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 10/09/2015 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ असूनही अबला तू सबल मनाची कोमला तू नभोवनीचा शीतल चंद्र अन्... तप्त सूर्याची आभा तू मनमोकळा निर्झर तू ग हृदयस्थ गंभीर डोह ही तू स्वर गंगेचे आरोह कधी तू कधी दबलेली आर्तता तू सर्वात असूनही.. एकटीच तू ग तुझ्या मनीचा आधार तू
काव्यरस

प्रणयपंचमी

लेखक शैलेन्द्र यांनी गुरुवार, 10/09/2015 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
हळूच मंद मालवे, कालचा नवा शशी, हळूच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी... विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती, फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती, तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधुपिशी.. प्रहर शुक्र चढतसे, बहर प्रणय पंचमी , झरत झरत येतसे, मदन कैफ लोचनी , धुसर कुंद मधुरसे, सहजतृप्त भावनिशी निवांत सौख्य रमतसे, सुगंध रक्त चंदनी, परत परत जातसे, भ्रमित गात्र कोंदणी, सुखद मंद शारिरसे, अमृतमय यौनरशी.. (या कवितेचे धृवपद व पहिले कडवे वेगळ्या नावाने व वेगळ्या अर्थाने पूर्वप्रकाशित )
काव्यरस