कालचक्र
कोण्या एका काळी एका दुरदेशी एक महान तपस्वी एका निबिड अरण्यात एकाकी भटकत होता.
त्याची गृहस्थी सर्वदुर प्रदेशात एका कुटित आपल्या मुलांना घेऊन त्याची वाट पाहत अश्रुंचे ताटवे फुलवत राहीली.
दऱ्या डोंगरे चिखल दलदल आणि ऊष्ण वाळवंट तुडवणारा तपस्वी आता या दिशाहीन प्रवासाला थकला होता.
एके दिवशी एका चवदार तळयाकाठी त्याला एक बंदिस्त शुभ्र मडके सापडले.
वैफल्याने ग्रासलेल्या आपल्या मळकट झोळीत त्याने ते ठेऊन दिले.
एका अवाढव्य शिळेवर चढुन त्याने ते खोलुन पाहिले.
मिसळपाव