मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माणूस

सुमित_सौन्देकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बराच अवधि गेल्यावर्ती हर्ष मनी दाटला हरवलेला माणूस पुन्हा रस्त्यावरती भेटला कसलीही ना चाहुल देता पाठलाग त्याचा केला थोड़े अंतर राखून तेव्हा नवा प्रवास झाला भुकेलेल्या जिवास पाहून पानी डोळ्यात दाटल होत न्हवत शिदोरितल सार त्याने वाटल हतबल उभ्या रस्त्यालगत अंधाकड़े पाहता पळत जाऊन पुसल त्याने सांग कुठे राहता? दमून भागून शेवटी बसता रोजच्या गाडीत जाऊन वृद्ध दिसले उभे कुणी उठला जागा देऊन पाहून सार ओशाळल्याने मनी विचार आला कधी काळचा आपल्यातला तो माणुस कुठे गेला

वाचने 1612 वाचनखूण प्रतिक्रिया 5

चाणक्य गुरुवार, 09/10/2015 - 06:36
चांगली आहे. शुद्धलेखनाच्या चुका टाळल्या असत्या तर बरं झालं असतं.