Skip to main content

आयटीची गोष्ट

लेखक यमन यांनी सोमवार, 14/09/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीची गोष्ट I ऐका मायबाप II पुण्ण्याची गणना III येथे नाही IIII पैश्यांचे डोंगर I सोनियाच्या राशी II वाढता डॉलर III दिसो लागे IIII गळ्यामध्ये कार्ड I बडविती बोर्ड II जीवनाची आस III विझवुनी IIII मेल देती घेती I रिलीज भोवती II सुष्ट आणि दुष्ट III एक झाले IIII नाही जात पात I सगळेच एक II ढाळती पदर III युरो साठी IIII लाल लाल ओठ I रंगविती सर्व II गोऱ्या साहेबाचे III चाटू पाय IIII मिळूनिया सर्व I सोडुनिया सत्व II चराचर जणू III रांड वाडा IIII लेकुरवाळी माय I गेली परदेशा II पान्ह्या वीना पोर III सुकलेले IIII कशासाठी सर्व I उर फाटी धाव II खोल गेले डोळे III जिवलगा IIII पुरुषार्थ व्यर्थ I विझे बा
काव्यरस

गणपती बाप्पा मोरया!

लेखक इन्ना यांनी सोमवार, 14/09/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती बाप्पा मोरया! गेल्या वर्षी गणपतीला जाता आल नाही अन रुखरुख वाटत राहिली म्हणून मनातल्यामनात कोकणात गणपतीला जाउन आले. तेव्हा लिहिलेली ही भटकंती. या वर्षीपण मनातली सैरच आहे नशिबात. काल गप्पांच्या पानावर सहज कोकणातल्या गणेशोत्सवाचा विषय निघाला , आणि मी एक सैर करून आले मनातल्या मनातच. ह्या वेळी घरच्या गणापतीला कोकणात हजेरी लावता येणार नाहीये ह्याचा सल होताच मनात , तो ह्या सफरीनी जरा हलका झाला. कोकणातल्या गणपती बद्दल ऐकल बरच होतं पण अनुभवल ते लग्न करून मालवणकरीण झाल्यावरच .

एक प्रेमपत्र

लेखक मार्गी यांनी सोमवार, 14/09/2015 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
मला तुझ्याशी खूप खूप बोलायचं आहे! तुला पत्र लिहिताना प्रचंड आनंद होतोय. अक्षरश: शब्द सुचत नाहीत. काय लिहू, किती लिहू आणि कसं लिहू अशी अवस्था होतेय! खूप भरून येतंय. तू! तुझ्याबद्दल काय लिहू? लिहून व बोलून जे सांगता येईल ते फार फार थोडं आहे. कणभर आहे. पण तू, तुझं व माझं नातं, तू माझ्या आयुष्यात आलीस तो काळ व तिथून बदललेलं आयुष्य... काय काय आणि कसं सांगू! तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण मनावर कोरले गेले आहेत! अगदी पहिल्या दिवसापासून. तुला भेटण्याआधीच्या आयुष्यामध्ये अनेक वेळेस सौंदर्य बघितलं होतं; सुंदर चेहरे बघितले होते; पण तू त्या सर्वांहून अगदी वेगळी! नितांत सुंदर!

आवर्त

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/09/2015 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चरचरीत पंज्याला सुखावणारा तुझा चिमुकला मऊसूत तळवा तुला भान देखील नाही बोचऱ्या स्पर्शाचे गाढ झोपेत मंद हसरा तुझा चेहरा इकडे प्रेम आणि तिकडे आधार यांच्या आश्वासक सोबतीत विसावलाय, दिवसभराचे उनाडणे विसरून तुझ्या निर्व्याज निजेची गुंगी मलाही चढू लागली आहे हळूहळू खूप वर्षापूर्वी माझ्या शेजारी अशीच होती शांत निजलेली दोन छोटी पाउले. मला टक्क जागे ठेवून माझी शर्यत सुरू झाली होती त्यांना जिंकविण्याची ती कोमल पाउले, हजारो मैलांचा प्रवास समोर होता त्यांच्या त्यांना बळ देऊ शकणार कां मी? दिशा कशी दाखविणार? कुठे भरकटणार नाहीत नां ती? बिन उत्तराचे प्रश्न पांघरून मी तळमळत, चिमुकली दोन पाउले अ
काव्यरस

रंगल्या रात्री अश्या

लेखक भैड्या यांनी रविवार, 13/09/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

चला अंताक्षरी खेळूया....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 13/09/2015 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
जुनाच पण सदाबहार खेळ !! इच्छुकांनी सहभागी व्हावे...... मेरे मेहबूब कयामत होगी.... आज रुसवा तेरी गलियोमे मोहब्बत होगी... मे री न ज रे तो गि ला क र ती है.... तेरे दिल को भी सनम तुझसे शिकायत होगी.... पुढचे अक्षर "ग"....
काव्यरस

लखलाभ!

लेखक रातराणी यांनी रविवार, 13/09/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
तू ये वाचली आणि त्यातला आव्हानाचा टोन भयंकर आवडला. त्यात आज आमच्या राशीत जिलबी पाडू योग आलेला दिसत असल्याने आम्ही लगेच वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. चू. भू. द्या. घ्या. रानोमाळ भटकणारे तुझे निर्णय, आणि जर तरच्या लाटांवर हेलकावे खाणारी तुझी नौका, तुझा किनारा असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे! माझी नौका तारून न्यायला क्षितीजाच्याही पार! पेन्सील वापरायची तुझी जुनी सवय, कारण झालेल्या चुका खोडता येतात, बरोबर उत्तर लिहण्यासाठी तुझी कोरी वही असो तुलाच लखलाभ! मी समर्थ आहे!
काव्यरस

शिंदळ : आक्रमकांची नवी फळी

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 13/09/2015 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
( १.यल्लम्माच्या आवारातल्या कथा आता 'शिंदळ' याच नावानं टंकत जाईन, प्रत्येक कथा स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न असेल, अर्थात वाचकांना आवडले तरचं, उगाच मिपाची बँडविड्थ खर्ची नको- आभार २. केवळ एक पार्श्वभुमी म्हणुन 'शिंदळ' ही कथा वाचा. www.misalpav.com/node/32762 ) शिंदळ : आक्रमकांची नवी फळी यल्लम्माचं देऊळ गर्द अंधारात उभं होतं. देवळाच्या चहुबाजुंनी प्रदक्षिणेसाठी कठडा होता. देवळासारखाच लहान. त्यावरच दत्ता पहुडला होता. देवीची ओवाळणी लुटणारे इतर लहानगे चोर कधीच घरी परतले होते.

चाय पे चर्चा/ आवळ्याचे तेल देशी/ विदेशी

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 13/09/2015 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन जवानीच्या दिवसांत 'मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है' हे गाणे कैकदा ऐकले होते. पण अस्मादिकांचे दुर्भाग्य, कुठल्या हि सुंदर पोरीच्या आईने आम्हाला चाय पे बोलविले नाही. एका सरकारी बाबूची पत 'पोरींच्या आईच्या दरबारी किती आहे, हे हि कळले. गुपचूप माँ साहेबानी पसंत केलेल्या मुलीच्या गळ्यात वधूमाला घातली. चहा म्हंटले कि चर्चा तर होणारच. चहा पिता पिता आपण एका दुसर्याचे पितळ उघडे करतोच. चहा पिता पिता पीठ के पीछे दुसर्याची निंदा कण्याचा आनंद काही औरच असतो. पंत प्रधान मोदी साहेबांनी तर चाय पे चर्चा करत लोकांची मते आपली खिश्यात घातली.