Skip to main content

चूक नाही

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 08/09/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
जरी सुखाची आस असणे चूक नाही हाव आहे ही आता, ही भूक नाही ओरडूनी सांग अथवा बस कुढत तेच आहे सत्य की जे मूक नाही बुद्धीची तलवार तू चालव स्वतःवर जातीची तुझियाकडे बंदूक नाही आमुचे ते वेगळेपण प्रिय आम्हा एक बिक होणे मुळी ठाऊक नाही कारणाविण काही येथे होत नाही अचानक हसणे कुणी हा फ्लूक नाही वाटते ते हो करूनी मोकळा तू धाकधूक नाही आणि रुखरुख नाही शेवटी पैसाच देतो चार घास भावनांनी भागणारी भूक नाही आरशाला दोष देणे चूक आहे आरशावर प्रेम करणे चूक नाही एक माझे वेगळेपण वर्ज्य त्यांना यापरी माझी अपूर्व चूक नाही - अपूर्व ओक ब्लॉग दुव
काव्यरस

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

...घे जगून !

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 08/09/2015 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीचा फेब्रुवारी महिना. लेकाची दहावीची परीक्षा पंधरा दिवसांनी सुरु व्हायची होती. एका रविवारच्या सु-प्रभाती मी आणि मुलगा पुस्तकं आणि इतर शालेय साहित्य आवरत होतो. आठ दिवसापूर्वी शाळेतून मुलाचं परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं होतं ते मी बंदोबस्तात कपाटात ठेवलं होतं. त्याला लॅमिनेशन करायचे होते म्हणून लॉकरचा कप्पा उघडला. सगळे कागद बाहेर काढले. हॉल तिकीट त्यात सापडेना. कपाट पालथं घातलं, सगळ्या वस्तू, कपडे बाहेर काढून शोधलं, लॉफ्टवरच्या सगळ्या जिनसा खाली आल्या, कागद अन कागद विंचरून काढला. पण हॉल तिकीट मिळालं नाही. हॉल तिकीट म्हणजे परीक्षेचा प्रवेश परवाना. महत्वाचा कागद ! ...

एकाच या जन्मी जणू - आशाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

लेखक शीतल जोशी यांनी मंगळवार, 08/09/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
एकाच या जन्मी जणू !!!! सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशाताई. तुमचा कितवा वाढदिवस, हे लिहिण्यात काहीच अर्थ नाही, नाही का !!! घनरानी साजणा, म्हणताना तुमचा आवाज अगदी, अल्लड वयाच्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडष वर्षीय तरुणी सारखाच वाटतो. तुम्ही तुमच्या चिरतरुण आवाजाने तर, तरुण आहातच, पण तुम्हाला पाहणे हा हि एक प्रसन्न करणारा अनुभवच आहे . चेहऱ्यावरचे खट्याळ हसू, अगदी गालावरच्या खळी सहित. नेमकी पण सुरेख वेशभूषा, केसात माळलेले एखादे फूल. गळ्यात एखदी सर, आणि मनमोकळे सूर, तुम्ही वर्षानुवर्षे तश्याच उभ्या राहता डोळ्यापुढे .

बाळूकाकांचं गाई-वासरातलं वास्तव्य.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/09/2015 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
“पहाटे खळ्यात पडलेला पौर्णिमेच्या मावळत्या चंद्राचा लख्ख प्रकाश पाहून माझा थकवा पार निघून गेला.” आज बर्‍याच दिवसानी मी माझ्या आजोळी गेलो होतो.आता आमच्या वयाचे लोक बरेच कमी झालेले दिसत होते.सहजच हिंडत मी आमच्या शेजार्‍यांकडे गेलो होतो.त्यांच्या कडून कळलं की,बाळूकाका,आमचे दुसरे शेजारी, अजून हयात आहेत.ते हल्ली जास्त हिंडत फिरत नाहीत.त्यांच्या घरी गेल्यावर ते मला खचित भेटतील असं समजून मी त्यांच्या घरी गेलो होतो.कुतूहल म्हणून मी बाळूकाकाना भेटायला गेलो.

बंधन बँक

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 07/09/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा आर्थिक मदतीची गरज भासते. काही वेळा आपण ही मदत नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून घेतो तर काही वेळा कर्ज पुरवठा करणा-या वित्त संस्थांकडून. जर आर्थिक साहाय्याची मागणी करणारी व्यक्ती सधन वर्तुळातील असेल किंवा पगारदार नोकर असेल किंवा त्या व्यक्तीचा चांगले उत्पन्न असणारा व्यवसाय असेल तर आर्थिक मदत मिळण्यास शक्यतो अडचण येत नाही. मात्र ही व्यक्ती जर का आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील असेल किंवा जर गरीब असेल तर मात्र अशी मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. बरेचदा नातेवाईकही या व्यक्तीसारखेच गरीब असतात. वित्त संस्था परतीची हमी नसल्याने कर्ज देत नाहीत.

सकाळ - त्यांच्या नजरेतुन

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 07/09/2015 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
(थोडा वेगळा प्रयोग करायचा प्रयत्न करतोय, गोड मानुन घ्या. चु.भु.द्या.घ्या) ललित- सकाळची कोवळी किरणे हळुचकन अंगाला चिटकली. नयनरम्य स्वप्नांचे बाण इंद्रधनुष्य ऊधळत गेले. किलकिल्या डोळ्यांना खिडकीबाहेरची हिरवाई खुणावत होती. ऊफाळत्या चहाचा कप घेऊन सौभाग्यवती बाजुलाच ऊभी होती. टक्क जागा झालो. ग्राम्य- रामाधरमाच्या पाऱ्याला आंग घाम्याजलं हुतं. उनाचं कवुडसं डोळ्यावर आलं. मक्याची कणसं छटायला खळ्यावर जावं लागणार.

अन्नदाता सुखी भव भाग २ - डॉ नॉर्मन बोरलॉग, डॉ स्वामिनाथन आणि इतर चेले

लेखक शेखरमोघे यांनी सोमवार, 07/09/2015 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
अन्नदाता सुखी भव भाग १ - PL 480 (मागील भागाच्या सुरवातीला थोडीशी छपाईची गल्लत झाल्याने "अन्न दाता सुखी भव" या नंतर दिसणारा विसर्ग असा दिला गेला की "भव" हा शब्द "…सुखी भव : भाग १" असा दिसण्याऐवजी "…. सुखी भवः भाग १" असा दिसत होता. त्यांत आता योग्य ती सुधारणा केली आहे. सध्याच्या काळांत संस्कृत भाषेचा असा अजाणता देखील केलेला चुकीचा वापर अक्षम्य ठरेल. तरीही क्षमस्व!) काळाच्या गरजेनुसार लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. हे उत्सव लोकांना एकत्र जमवून जनजागृती करण्याकरता केंद्र बिंदू ठरावेत हे अपेक्षा होती.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

बनलो असतो दादा, मज साहेब भेटला नाही

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 07/09/2015 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा सांगायलाच पाहिजे का? चहु दिशांत असे दु:कीर्ती, महाराष्ट्र टाचे खालती, तो , बारामती रहीवासी, मज साहेब भेटला नाही ....... किती निवडणुका झाल्या येड्या , निवडूनी येई परी हाची, ....... जरी मतदारसंघ बदलले त्याचे, तो साहेब पडला नाही तो परतून आला राज्यात, भुक न संपली त्याची जाहले अनेक घोटाळे , पण साहेब अडकला नाही ....... उमगता मोल जीवाचे, गेलेला झक मारत येई .......