ती विलासींनी मदालसा,
ती विलासीने मदालसा,मिठीत कैद होती
अनंग कथा ऐकण्यात, ति जरा गुंग झाली असावी
चुंबीत अधर लाल,लागता हात उरोजास
कोवळी लावण्य कळी ,ती जरा लाजली असावी
घुसता आरपार तो मदन शर हृदयात
रतीसम सुंदरी ,ती जरा घायाळ झाली असावी
कुरवाळीता ,त्या मोकळ्या रेशीम कुंतलास
त्या काम गंधाने, ती जरा बेभान झाली असावी
मधाळ हसून,टाकता कटाक्ष त्या दर्पणात
तो भंगला पाहून,ती जरा चकित झाली असावी
अर्पीता कोवळी कोरी तनू, ह्या पौरुषाला
ती कोमलांगी ,पौरुषा पुढे हरली असावी
Avinash