बलुतं

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जे न देखे रवी...
29 Oct 2009 - 12:39 pm

तसा अनेकांनी प्रयत्न केला
माझ्या हिंस्त्र मनाला आवर घालण्याचा,
नसलेल्या हाडाचा फायदा उचलणार्‍या
जिभेला वळण लावण्याचा,
षडरिपूंनी पोखरलेल्या देहाला
चांगुलपणाचा छंद लावण्याचा,
पण वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग
जन्मसिद्ध अधिकारासारखाच...

या प्रवृत्तीचे मूळ शोधण्यासाठी
ग्रंथसंपदा चाळण्याची गरज नाही....

जन्मदात्रीला असह्य वेदना देऊनच
जन्माला आलोय मी...

तुमच्यासारखाच...

म्हणून तर ....
वेदनांची बलुतं वाटण्याचा उद्योग
जन्मसिद्ध अधिकारासारखाच...
जसा माझा तसाच तुमचाही..........

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Oct 2009 - 12:47 pm | अवलिया

जियो ! कौतुकशेट जियो *!!

* जियो हा शब्द खुप जुना असला तरी श्री तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांनी आंतरजालावर पहिल्यांदा वापरला असे त्यांचे म्हणणे आहे. आमचे सदस्यत्व रद्द होवु नये म्हणुन आम्ही "जियो" या शब्दाला त्यांचा प्रताधिकार असल्याचे मान्य करुन त्यांना श्रेय देत आहोत. नोंद घ्यावी !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

29 Oct 2009 - 2:33 pm | प्रभो

मस्त रे..
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रावण मोडक's picture

29 Oct 2009 - 12:51 pm | श्रावण मोडक

चांगली कविता!

मदनबाण's picture

29 Oct 2009 - 1:30 pm | मदनबाण

छान कविता...

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

sneharani's picture

29 Oct 2009 - 1:42 pm | sneharani

असेच म्हणते
छान कविता...!

विशाल कुलकर्णी's picture

29 Oct 2009 - 1:46 pm | विशाल कुलकर्णी

जियो कौतुकशेट.....

अवांतर : कृपया नानांचे डिस्क्लेमर पुन्हा एकदा वाचावे. आम्हाला लिहायचा कंटाळा. दुसरे काय! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Oct 2009 - 4:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

कौतुक राव,
तुमचे मनापासुन कौतुक,
आपल्या जवळच्या व्यक्तीला वेदनांचा आहेर देण्याचा माणसाचा छंद तसा जुनाच आहे. जितक्या जवळचा माणुस तितक्या आधिक वेदना आपण त्याला देत असतो.

वेदनासुर
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

नंदन's picture

29 Oct 2009 - 4:17 pm | नंदन

वेगळी चमकदार कल्पना.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

फ्रॅक्चर बंड्या's picture

30 Oct 2009 - 9:22 am | फ्रॅक्चर बंड्या

फारच छान कविता