पंढरीचा विठोबा..ओबामा, माझा प्रेसिडेन्ट. भाग दुसरा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
16 Oct 2009 - 6:49 am

"आज ओबामाने व्हाईट हाऊसवर दिवाळी साजरी करायला दिवे, पणत्या लावल्या आहेत."

सत्तरी ओलांडलेला बुड्डा जॉन मेकेन यापूर्वी दोनदा प्रेसिडेन्ट होण्यासाठी असफल प्रयत्न करून थकला होता. रिपब्लिकन पार्टीच्या उमेदवारीच्या चढाओढीत मेकेन अगदी नगणतीत होता.पण निवडणुकीचे वारे कसे फिरतील हे सांगणं कठीण.व्हीएटनाम युद्धात ऍट्याक पायलटचं काम करीत असता युद्धकैदी म्हणून पाच एक वर्षव्हीऍटनाममधे तुरंगात होता.कैद्याला टॉर्चर कसं करतात ते त्याने चांगलंच अनुभवलं होतं.त्याचे वडील अमेरिकन नेव्हिच्या इस्टर्न फ्लिटचे ऍडमिरल होते.त्यासाठी शत्रुपक्षाकडून त्याला शिक्षेत मुभा मिळाली असती. नव्हेतर तसा प्रस्ताव आला ही होता पण ह्या बच्चम जीने तो प्रस्ताव धुडकावून लावला होता.त्यावेळी त्याचा छ्ळ करून कम्युनीस्टानी त्याचे दोन्ही हात वांकडे करून ठेवले होते.
आदल्या निवडणुकीत बुशबरोबर निवडणूक-डिबेटमधे त्या दोघांचे खटके उडाले होते.बुश अगदी खालच्या थराला गेला होता.
बंगलादेशमधून एका काळ्या अनऔरस मुलीला मेकेनने दत्तक म्हणून बाळगलं होतं.बुश त्याच्या फाल्तु विनोदाच्या पद्धतीत त्याबद्दल मेकेनला म्हणाला होता की,
"ही तुझी काळ्याबाईशी तुझ्या लफड्यातून झालेली मुलगी आहे"
असं ह्या शब्दात अगदी स्पष्ट बोलला. आणि ते खोटं आहे हे माहित असून सुद्धा तो असं बोलला.हे सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळी मेकन बुशवर खूपच चिडला होता.कुणीही चिडला असता म्हणा.परंतु चिडखोरपणा हा मेकनेच्या हाडांमासांत भिनला होता.
"ओबामासारखा पोरकट माझ्याशी लढत तरी कशी देतो?"
ह्याचा त्याला खूप राग यायचा.माझा अनुभव, माझं वय, माझा त्याग, अमेरिकन लोक नक्कीच लक्षात घेतील असा त्याला भ्रम झाला होता.एका डिबेटमधे त्याने ओबामाकडे अंगुली निदर्शन करून "द्याट " असं म्हणून त्याला फाल्तु माणूस आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता.पण ओबामाने हे ऐकून त्याच्या इश्यु न करता नेहमी प्रमाणे दोन्ही हाताने आपले खांदे झटकले.

ह्या विठोबाने सुरवाती पासून निरनीराळे अवतार घेतले होते.
ओबामाचा शांत स्वभाव त्याच्या आईकडून आणि त्याच्या गोर्‍या आजोबाकडून आला आहे असं तो म्हणतो. हा गोर्‍या देवकीचा सावळाकृष्ण देवकीनेच आपल्या आईवडीलांकडे वाढायला ठेवला होता.
हवाई ह्या अमेरिकेच्या पन्नासाव्या राज्यात गोकुळात हा मनमोहन आजीआजोबांच्या छायेखाली वाढत होता.हे राज्य अमेरिके़च्या मेनलॅन्डपासून सहा हजार मैलावर आहे.तिथे वाढत असताना अधून मधून त्याला "गवळ्याचं पोर" म्हणून हिणवण्यात काही गोरे लोक भाग घ्यायचे असं तो म्हणतो.आणि त्याची गोरी आजी त्या लोकांना रागाने प्रत्युत्तर द्यायची.आजी बरोबर बाजारात किंवा पार्कवर गेल्यावर लोक त्याला हिणवून म्हणायचे.पण लहान असूनही ओबामा आपल्या आजीला समजावून सांगायचा.
"आजी,त्यांना म्हणू देत.माझ्या अंगाला काही खड्डे पडत नाहीत आणि तुझ्या अंगाला पण. आजोबा कसे शांतपणे सहन करतात,ते मला आवडतं.त्यांना प्रत्युत्तर देऊन तुझ्याकडून त्यांना उगाच महत्व मिळतं.
"मौनम सर्वार्थ साधनम" असं येशू म्हणतो असं तूच ना मला सांगतेस?"
आजी त्याला हृदयाजवळ कवटाळून घ्यायची.
"लहान असून तू किती रे विचारी आहेस.?"
असं म्हणून ती डोळे ओले करायची.असं ओबामाबद्दल,
"फ्रॉम प्रॉमिझ टू पॉवर"
ह्या त्याच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकात म्हटलं आहे.
निवडणुक लढाईत तो मेकेनचा पुरेपूर सन्मान करायचा.पण कधी कधी त्याचा मान ठेवून खिल्ली उडवायचा.
अमेरिकेची सांपत्तिक परिस्थिती जेव्हा कोसळली,तेव्हा मेकेनला पत्रकारानी विचारलं होतं,
"तू ह्यावर काय उपाय सुचवतोस?"
"मला तेव्हडं एकॉनॉमित फारसं कळत नाही" असं मेकेनने आपलं प्रांजाळ मत दिलं होतं.
"जॉन(मेकेन) अनुभवी आहे,हुशार आहे,युद्धात खूप त्याने दुःख सहन केलं आहे.पण आता जे काय तो एकॉनॉमीबद्दल म्हणतोय ते त्याला कळत नाहीय."
असं त्याला उद्देशून म्हणायचा.

मेकेन हे ऐकून त्याच्यावर गोरामोरा व्हायचा पण निरुत्तर व्हायचा.
एक वेळ अशी आली होती की मेकेनच्या सभेला शेपाचशे लोक जमायचे आणि ह्या "गवळ्याच्या पोराची" प्रचंड सभा व्हायची.
"विठ्ठल,विठ्ठल,जय हरी विठ्ठल म्हणत"
त्याचे वारकरी लांब लांबच्या गावातून आदल्या दिवसापासून सभेला जमायचे.त्यांच्या रंगीबेरंगी बावट्यावर लिहिलेलं असायचं,
"यस वीई क्यान","
"नो मोअर बुश फॉर नेक्स्ट फोर इयर्स"
हा मेकेनला टोमणा असायचा.
तो सभेत आल्यावर पुढल्या पाच मिनटात लोकं उभे राहून टाळ्यांचा गजर करायचे.
"थॅन्क्स,थॅन्क्स,थॅन्क्यु व्हेरी मच" असं त्याला तेव्हडाच वेळ ओरडून सांगावं लागायचं.काही वेळाने लोक खाली बसायचे.
हे सर्व मेकेन आणि त्याच्या पार्टीचे लोक पेपरात वाचायचे आणि टीव्हीवर बघायचे.
हा "फ्लुट पायपर"- "कान्हा" -आपली फ्लुट-बांसरी- वाजवीत लोकांना आपल्या जवळ खेचून घ्यायचा.
शेवटी मेकेनने एक आयडीया शोधून काढली.
त्याबद्दल तिसर्‍या भागात.

खास.....आज ओबामाने व्हाईट हाऊसवर दिवाळी साजरी करायला दिवे, पणत्या लावल्या आहेत.आणि यात खास बात अशी की,हा पहिलाच प्रेसिडेन्ट ज्याने व्हाईटहाऊस दिवाळीसाठी सजवलं आहे.
बुश-४३ने बाजूच्या बिल्डिंगमधे दिवे लावून दवाळीसाठी सजावट केली होती.बूश आपण स्वतः कधीच प्रत्यक्ष हजर राहिला नाही.आपलं भाषण वाचायला देत होता.
आज ओबामाने स्वतः मेणबत्ती घेऊन समई उज्वलीत केली.भटजींशी हस्तान्दोलन केलं.आणि भारतीय पाहूण्यात मिसळून लाडू,करंज्याचा आस्वाद घेत होता.

क्रमशः...

अमेरिकन श्रीकृष्ण.

कथालेख

प्रतिक्रिया

विकास's picture

16 Oct 2009 - 6:53 am | विकास
सहज's picture

16 Oct 2009 - 7:06 am | सहज

क्या बात है! एकदम प्रवीण दवणे स्टाईल लेख!!!

काडेपेटी, आइक्रीम स्टिक्स वगैरे मधे विठ्ठल मुर्ती करुन त्याचा चेहरा ओबामाचा करुन पाठवावासा वाटतोय हो पांढरपूरला आपलं व्हाईट हाउस हो!

आणी हो, ओबामाला लाडू आवडला की करंजी?

मिसळभोक्ता's picture

16 Oct 2009 - 10:44 pm | मिसळभोक्ता

सहजराव,

हे तुमचं पांढरपूर लय आवडलं बघा.

(सामंत आजोबांची मालिका सहजरावांना समर्पित करण्यात यावी, ही विठोबाला प्रार्थना.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मदनबाण's picture

16 Oct 2009 - 7:23 am | मदनबाण

काय पण ओबामा सरकारचे हिंदुस्थान प्रेम आहे ते तर पहा ना... आपल्या विरुद्ध सतत कारस्थाने करणार्‍यांना तो मदत वाटतच सुटला आहे !!! ही मदत या दिवाळी साजरी करणार्‍या माणसाला थांबवता आली नसती काय ???
http://www.pegasusnews.com/news/2009/oct/14/lockheed-martin-gives-first-...
चीन आणि अमेरिका दोघेही आपापल्या पद्धतीने पाकड्यांना मदतच करत राहणार आहेत आणि आपण फक्त बघतच बसणार !!!

मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

चिरोटा's picture

16 Oct 2009 - 10:03 am | चिरोटा

सत्तरी ओलांडलेला बुड्डा

हा उल्लेख खटकला.ओबामांना मखरात बसवताना दुसर्‍या व्यक्तीला बुढ्ढा वगैरे विशेषण लावणे खटकले.आणखी वीस वर्षानी ओबामा ७० वर्षाचा बुढ्ढा होणारच आहेत.!!

आज ओबामाने स्वतः मेणबत्ती घेऊन समई उज्वलीत केली.भटजींशी हस्तान्दोलन केलं.आणि भारतीय पाहूण्यात मिसळून लाडू,करंज्याचा आस्वाद घेत होता

ह्यात विशेष ते काय्?उद्या ईद आली तर शेरवानी घालुन तो शीर कुर्माही खाऊन दाखवेल.ह्याचा अर्थ ओबामा भारताला मदत करेल आणि पाकिस्तानला पळता भुई थोडी होईल असे वाटत असेल तर तो गैरसमज आहे.समोर गोड गोड बोलायचे आणी मागून खंजीर खुपसायचा ही जुनी अमेरिकन चाल आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Oct 2009 - 5:56 pm | श्रीकृष्ण सामंत

जो तो आपलंच बघत असतो.
कुणीही ह्याला अपवाद नाही.मग तो भारत असो,पाकिस्तान असो वा अमेरिका असो.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

खरं तर मॅकेन हा अतीशय सज्जन व न्याय्य स्वभावाचा (fair-minded) माणूस आहे. निवडणुकीचा दिवस जवळ आल्यावर ओबामाला पाण्यात पहाणार्‍या गोर्‍या सनातनी मतदारसंघांत जेंव्हा मॅकेनने घेतलेल्या सभांमध्ये लोक ओबामाविरुद्ध खोटे-नाटे आरोप करायचे तेंव्हा हा पठ्ठ्या आपल्या मतपेटीकडे न पहाता "ओबामा तसा नाहींय" असे सांगायला मागे-पुढे पहायचा नाहीं. तो हरला कारण बुश-४३ च्या ८ वर्षांच्या कारकीर्दीनंतर प्रत्यक्ष भगवान परमेश्वरही रिपब्लिकन पार्टीच्या तिकिटावर उभा राहिला असता तरी हरला असता.
तरी ओबामाची भलावण करताना त्याच्या प्रतिस्पर्ध्याची टर उडवायच्या आधी सत्यता पडताळून पाहावी.
ओबामाचा खरा विजय त्याने हिलरीला हरवले तिथे झाला, कारण माझ्या एका अमेरिकन मित्राने म्हटल्याप्रमाणे "This election is for democrats to lose" अशीच होती. पूर्वी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांबद्दल होते तसे.
तरी "आहिस्ते कदम, सरकार"!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सहज's picture

16 Oct 2009 - 1:17 pm | सहज


गोष्ट ऐका तर खरं याआधी कधी ऐकले नव्हते का तुम्ही?

एक कृष्ण तर दुसरा कंसच असतो, एक राम तर दुसरा रावणं....

छ्या क्लासीक्स वाचत जा हो नुस्ते कॉमिक्स असते तुमचे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Oct 2009 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजकाका, फारच हिंदी पिच्चर पहाता ब्वॉ तुम्ही! आपले संत बिपिनमहाराज सांगून गेले आहेत ना, संपूर्ण काळं किंवा पांढरं काहीच नसतं, असतात त्या करड्याच्या विविध छटा! आणि चुकली असेल एखाद्याची एखाद दुसरी गाडी, काय फरक पडतो? इष्टस्थळी पोहोचल्याशी मतलब की नाही? तुम्हीतर लगेच करीयर गायडन्सचा क्लास सुरू केलात! ;-)

असो. सहजकाकांशी एका बाबतीत एकदम सहमत. लेख अगदी दवणे स्टाईल आहे या अजिबात शंका नाही. किती वेचावं (अजाणतेपणी झालेले विनोद) आणि किती सोडावं प्रश्नच पडला!

अदिती (चावणे)

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Oct 2009 - 5:49 pm | श्रीकृष्ण सामंत

"तरी ओबामाची भलावण करताना त्याच्या प्रतिस्पर्ध्याची टर उडवायच्या आधी सत्यता पडताळून पाहावी"

अमेरिकन जनतेने ह्यावेळी प्रतिस्पर्ध्याची सत्यता पडताळून पाहिलीच की.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

स्वाती२'s picture

16 Oct 2009 - 6:12 pm | स्वाती२

अमेरिकन जनतेने फक्त इकॉनॉमी पाहिली.

सुधीर काळे's picture

16 Oct 2009 - 10:10 pm | सुधीर काळे

खरं तर अमेरिकन मतदात्यांनी बुश-४३च्या विरुद्ध मतं दिली. त्याची लोकप्रियता इतकी रसातळाला गेली होती कीं बुश-४३ला कुणीही रिपब्लिकन उमेदवार स्वतःच्या प्रचारालाही बोलावत नव्हते. तरी या निवडणुकीत मॅकेनला ओबामाने हरवले नाहीं तर बुश-४३ने! ओबामाचा खरा विजय होता हिलरीवर प्रायमरीजमध्ये!
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

श्रीकृष्ण सामंत's picture

16 Oct 2009 - 11:38 pm | श्रीकृष्ण सामंत

अहो काळेसाहेब,
"खरं तर अमेरिकन मतदात्यांनी बुश-४३च्या विरुद्ध मतं दिली."
हे "खरं तर" प्रत्येकाच्या विचारान्वये दाखवता येतं.खरं "खरं" त्या जनताजनार्दनालाच माहित.

स्वाती२'s picture

16 Oct 2009 - 6:09 pm | स्वाती२

+१

ते अगदी खरं हो! पण दुर्योधन-कर्ण, रावण-बिभीषण यांना एकाच मापाने तोलू नये!
आणि अलीकडे आम्ही क्लासिक्स "लिहितो". "वाचायचं" वय नाहीं राहिलं आता!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

सखाराम_गटणे™'s picture

16 Oct 2009 - 6:12 pm | सखाराम_गटणे™

ओबामा डावखुरा आहे काय?
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.

विश्वजीत's picture

17 Oct 2009 - 12:22 am | विश्वजीत

दवणा झकास आहे. हहपुवा अगदी.

वाटाड्या...'s picture

17 Oct 2009 - 2:41 am | वाटाड्या...

माफ करा..
कार्यबाहुल्याने मागच्या भागात नंतर प्रतिक्रिया देऊ शकलो नाही.
तुम्ही (आणि कोणी कोणी) म्हणतात की आमचे पेपर्स नीट असतील तर आम्हाला त्रास होणार नाही..हा विनोदाचा अतिरेक आहे...

एक गंमत सांगतो..नुकतीच आम्ही एक नविन गाडी घेतली.(होंडा अथवा टोयोटा नाही ;) ) योगायोगानं आमच्या एका अस्सल गोर्‍या मित्रानही घेतली. बिचार्‍या अमेरिकनचं क्रेडिट रेटींग कमी असावं..त्याला ७.५% व्याजानं कर्ज घ्यावं लागलं तर आम्हाला ३.२४% टक्क्यांन मिळालं. आता बोला हे तुमचे जे ओबामा सरकार आहे ना ते असं आहे की जी तुम्ही लोकं त्याच तुणतुणं कधीपासुन वाजवुन राहिला आहात ना, ते खोटं आणि ढोंगी आहे. त्यांच्या स्वता:च्या लोकांविषयी जर इतका पुळका आहे तर मग आम्हाला ३.२४% टक्के आणि त्यांच्या जन्मानं, खानदानानं आणि कशाकशानं अमेरीकन असलेल्या नागरीकाला जास्त व्याजदरानं असं कसं? भलेही त्याचं क्रेडिट रेटींग कमी असु दे पण अमेरीकन म्हणुन त्याला आमच्यापेक्षा सहज आणि स्वस्त कर्ज मिळायला हवं होतं. शितावरुन भाताची परिक्षा...
तुमच्या ह्या विठुरायाला त्याच्यामागे काय चालतं हे तरी कळतं का? तो काढ्तो एक एक नियम आणि बाकीची नकोनकोती जनता हात धुवुन घेतेय आणि मरतय आम आदमी, काका...

ह्यांच्या लुटालुटीच्या एक एक कथा सांगायला सुरुवात केली तर....दिवसरात्र पुरणार नाहीत...राहता राहीली दिवाळी आणि दिव्यांची गोष्ट...हा चक्क डिप्लोमसी आणि पॉलिटीकल स्टंट आहे ...त्यांच्या ख्रिस्तमस साजरा करण्यामधे तुम्हाला किती आनंद मिळतो...?? समजा तुमच्या जवळच्या मित्रांमधे एखादा ख्रिस्ती आहे तर त्याच्याशी सलोख्याचे संबध राहावेत म्हणुन तुम्ही जे कराल तेवढच...एक नक्कीच आहे की तो कोणावर वैयक्तीक टीका करत नाही. रि.प. वाले तसे नाहीत...पण ते इतर ठीकाणी मार खातात..

बाकीचे लोक म्हणतात तसे आपणही एककल्ली न होता व अमेरीकेत राहुन रंग-वर्ण द्वेष पसरेल अथवा आपलं चिंतन असं आहे असे चुकुनसुद्धा दाखवणारे शब्द लिहु नयेत ही विनंती.

असो...आपल्यावर (कोणावरच) वैयक्तीक राग नाही, नव्हता आणि नसणार...

धन्यवाद...

- वा

लंबूटांग's picture

17 Oct 2009 - 8:50 am | लंबूटांग

=)) =)) =))

काय राव, विनोदाचा अतिरेक तर तुम्हीच करता आहात.

कुठून कुठे नेता गोष्ट.. कार लोन कुठे आणि एच १ कुठे आणि सगळ्यात महत्वाचे ह्यात ओबामाचा संबंध कुठे...

ओबामा लोन sanction करायला बसणार आहे का. काहीच्या काही.

सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी काही कट्टर ओबामा समर्थक नाही अथवा त्याचा तिरस्कारही करत नाही. उगाच च्या उगाच त्याला विठ्ठल म्हणणे जसे खटकते त्याहून कैक पटीने अधिक कार लोन च्या interest rate अथवा APR साठी ओबामा ला जबाबदार ठरवणे प्रचंड म्हणजे प्रचंड हास्यास्पद वाटते. बाकी बिचार्‍या अमेरिकनचं क्रेडिट रेटींग कमी असावं ह्यात तुम्ही स्वत:च उत्तर दिले आहे व्याजदरामधील तफावतीचे. आता व्याजदरात अमेरिकन्स ना सवलत देऊन अर्थव्यवस्था सुधारेल असे म्हणणे असेल तर मग घरासाठी अव्वाच्या सव्वा कर्जे देऊनच आज ही अर्थव्यवस्थेची स्थिती झाली आहे हे आपणास माहित असेलच.

बाकीचे लोक म्हणतात तसे आपणही एककल्ली न होता व अमेरीकेत राहुन रंग-वर्ण द्वेष पसरेल अथवा आपलं चिंतन असं आहे असे चुकुनसुद्धा दाखवणारे शब्द लिहु नयेत ही विनंती.

हे देखील तुम्हीच लिहीता आणि होंडा अथवा टोयोटा नाही ;) आणि एका अस्सल गोर्‍या मित्रान हे देखील तुम्हीच लिहीता.

असो. गाडीबद्दल (कुठलीही असू देत) आणि चांगला APR मिळाल्याबद्दल अभिनंदन.

माझाही कोणावरच वैयक्तीक राग नाही, नव्हता आणि नसणार...

-(Used Toyota वर ७.९९ % व्याजदराने कर्ज मिळालेला गरीब बापडा) लंबूटांग

एकलव्य's picture

18 Oct 2009 - 8:16 pm | एकलव्य

-(Used Toyota वर ७.९९ % व्याजदराने कर्ज मिळालेला गरीब बापडा) लंबूटांग

आम्हाला तर Used Toyota वर १४.४९ % व्याजदराने कर्ज मिळाले होते... आम्ही ते झीरो % बॅलन्स ट्रान्सफर मिळवून एका महिन्यात फिटवले ती गोष्ट वेगळी... चीअर्स!!