तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात(ईडंबनात) नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
31 Jul 2009 - 11:18 pm

माझ्या त्या (अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.
मुळ कवितेतल्या पहिल्या ओळीत
"कोसळणारा तो धुंद पाऊस"
ह्यातला "पाऊस" ह्या शब्दाचा उपयोग मी "ऊसा" साठी विडंबनात केला आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं,चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या मनात ओघा ओघाने आलं.आणि कविता लिहिली गेली.

ऊसाच्या रानात काम करणार्‍या शेतकर्‍याच्या परिचयाचे वरील बरेचसे शब्द कवितेत मी वापरले आहेत.माझ्या मामीचं माहेर घाटावर आहे.माझ्या लहानपणी मी तिच्याबरोबर तिच्या माहेरी जायचो.कोल्हापूर जवळ गडहिंग्लज हे ते गांव.मामीचे ऊसाचे मळेच्या मळे आहेत.मामीची आई मुद्दाम एखाद्या गड्याबरोबर आम्हाला पाठवून शेतातला उच्चतम ऊस उपटून आम्हाला त्याचे करवे काढून खायाला देण्याची त्या गड्याला ताकीद-कम-आज्ञा करायची.कविततले बरेचसे शब्द त्या गड्याच्या तोंडचेच आहेत.आणि ते शब्द ऊसाचं पिक काढणार्‍या सर्वसाधारण शेतकर्‍याच्या तोंडचेच आहेत.

ऊस जरी रसाने भरलेला असला तरी त्याचा गोडवा त्याला उपटण्यापूर्वी-उचकण्यापूर्वी - जागीच चीर काढून रस चाखला जाऊन कळायचा. त्या ऊसाला चीर काढणार्‍या आयुधाला "आर" म्हणायचे.रस जर गोड वाटला तर तो ऊस पुष्टावला आहे असं म्हणतात.ऊसाच्या रसात साखर असल्याने साखरेचा चिकटपणा त्याला येतो.चिकट झालेले हात नंतर आम्ही थंड पाण्याने धुवायचो.ऊस उपटताना तो हळूवार उपटावा लागायचा कारण जवळ जवळ अंतरावर पेरणी झाल्याने बाजूच्या ऊसाला बाधा होता नये ह्याची काळजी घ्यावी लागायची. आरीच्या आघाताबरोबर रस थेंब थेंब थेंब थेंब पडायचा.मुळ कवितेतल्या बर्‍याचश्या ओळी मला ऊसाच्या संबंधाने विडंबनात उपयोगी वाटल्या.

हे विडंबन मी कोणत्याही द्विअर्थाने लिहिलेलं नाही.नव्हे तर काही वाचकानी त्यातून द्विअर्थ काढला आणि काही वाचकानी विडंबन आवडल्याचा प्रतिसाद ही दिला. एका मागून एक प्रतिक्रिया द्विअर्थ संबंधाने येऊ लागल्यावर त्या प्रतिक्रिया वाचून माझी मलाच कीव आली.कारण द्विअर्थाने कसं घ्यायचं हा प्रत्येकाच्या संस्काराचा प्रश्न आहे.दादा कोंडके पैसे मिळवण्यासाठी द्विअर्थी संवाद व गाणी लिहून उपजीविका करायचे.एव्हडंच काय तर पुलं आपल्या सर्व साहित्यात जागो जागी विनोद करायचे आणि द्विअर्थी लिहायचे पण त्यांच्या लेखाला एक प्रकारची ग्रेस असायाची.लेखाची पातळी त्यांनी कधीच खालच्या दर्जाला आणू दिली नाही.कारण त्यांचे संस्कार त्यांना आपला दर्जा ठेवायाला प्रोत्साहीत करायचे असं मला वाटतं.जो ज्या पातळीवर जातो ते त्याला मिळालेल्या संस्कारावर अवलंबून असावं असं मला वाटतं.काही लोक "भुरकटून"-crazy होऊन त्यांना वाटेल ते प्रतिसाद देतात.नव्हे तर तसं करण्यात एकमेकाची चढाओढ लागलेली असते.हे माझं अवलोकन मी वर्षापेक्षा जास्त दिवस मिपाचा सभासद असल्याने केलं आहे.आणि तसं जे करतात ते करायला त्यांना हव्या असलेल्या स्वातंत्र्याचा मी आदर करतो.ते प्रतिसाद "व्हल्गर" आहेत का नाहीत ह्या वादात मला जायचं नाही.तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
काही वाचकांच्या मनात काय काय आलं ते मला प्रतिसादातून कळलंच.आणि ते तसं त्यांच्या मनात येणं ह्याला सहाजीकच मी काही करू शकत नाही,हे उघड आहे.

पहिल्या प्रतिसादापासून ते श्री.ज्ञानेश यांचा प्रतिसाद येई पर्यंत सर्व प्रतिसाद "चढ्या आलेखात " आहेत,हे सहज लक्षात येईल. एक दोन प्रतिसाद तर एव्हड्या पातळीवर गेले आहेत की वाचून कुणाला उलटी येईल,वाचून लाजेने मान खाली घालावी असं कुणालाही-विशेषतः स्त्रीवाचकांना- वाटेल.पण प्रतिसाद देणार्‍याने "चीप पॉप्युल्यारीटी" साठी जनाची नाही तरी स्वतःच्या मनाची आणि स्त्री वाचकांची पण कदर केली नाही.असं माझं प्रांजाळ मत आहे.

ह्या वरून मला एक आठवण आली.
हा अत्र्यांच्या एका सभेतला किस्सा सर्वश्रुत आहे.
अत्र्यांना म्हणे लेंग्याच्या किंवा पॅन्ट्च्या खिशात हात घालून बोलायची -भाषणं द्यायची-संवय होती.त्यांची ती पोझ बघून एका सभेत पुढे बसलेले लोक जरा "कुत्सीत" हंसत होते.ते त्या लोकांच हंसणं अत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणीत होतं.
त्यांना गप्प करण्यासाठी अत्रे म्हणाले,
"मंडळी तुम्ही हंसता आहा.पण तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात नाही.एव्हडं लक्षात ठेवा."
अत्र्यांसारख्या नांवाजलेल्या साहित्यकाला प्रसिद्धीच्या उच्चतम शिखरावर आल्यावर असं बोलणं शोभूनही दिसलं तर नवल नाही.कारण विनोदाच्या पातळीपेक्षा त्यांच्या समयसुचकतेचं लोक कौतूक करीत असत.माझ्या सारख्या सर्वसाधारण व्यक्तिने "चीप पब्लिसीटी"साठी त्यांचं अनुकरण करणं हे शोभून दिसणार नाही असं मला वाटतं.

आणखी,एक किस्सा सांगतो.
तुकारामबुवानी,एका अभंगात म्हटलं आहे,
"पाण्या निघाली सुंदरी
मन ठेवी दो घागरी
चाले मोकळ्या पदरी
परि लक्ष तेथे"
आता तिचं लक्ष डोक्यावरच्या घागरीकडे होतं असं बुवांच्या मनात होतं असं जाणकार सांगतात. त्या अभंगात व्यभिचारावरही तुकारामबुबानी पुढे लिहिलं आहे.तो अभंग वाचणार्‍यांच्या मनात काय काय आलं असेलही पण त्याला तुकारामबुवा काय करणार.?

आणखी एक किस्सा सांगतो.
बाळू लगबगीने सावीत्रीकाकूंच्या घरी आला.काकू त्याला जेवून जा म्हणून सांगत होत्या.तो घाई करतो असं पाहून काकूंना वाटलं त्याने पिठलं भात तरी खाऊन जावं म्हणून काकू त्याला म्हणाल्या,
"अरें बाळूं,अंमळ थांब.काल आजीनें पिठलें केलें होतें.
शौंचाला जाऊन येतें आणि तेंच तुला देतें."
आता सावीत्रीकाकूंच्या मनात काय होतं आणि बाळूच्या मनात काय आलं हे तुम्हीच ठरवा.आणि हो! तुमच्या मनात काय आलं ते ही पडताळून पहा.ही तिन्ही उदाहरणं ह्या लेखाच्या विषयाच्या वस्तविकतेशी संदर्भ म्हणून द्यावी लागली आहे हे कृपया ध्यानात घ्यावं.

श्री.ज्ञानेश म्हणतात,
"मुळात लोकांना जो अर्थ काढून इतक्या गुदगुल्या होताहेत, लेखकाने हे त्याच अर्थाने लिहिले आहे का?"
माझं उत्तर-"मुळीच नाही." असं आहे.
श्री.ज्ञानेश यांच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्या ह्या लेखाच्या पहिल्या भागात विस्ताराने देऊन मी स्पष्ट केलं आहेच.

आणि बेसन लाडू लिहितात,
"बरं ते ठीक पण या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा आहे का आणि असल्यास का, असा प्रश्न पडला आहे"
माझ्या लेखाच्या दुसर्‍या भागात अत्र्यांच्या, तुकारामबुवाच्या,आणि सावीत्रीकाकूंच्या किस्स्यांची उदाहरणं देऊन मी एव्हडंच सांगेन की एखाद्या व्यक्तिच्या बोललेल्या वाक्याचा,एखाद्या व्यक्तिच्या कविता/अभंगाचा आणि एखाद्या व्यक्तिच्या निवेदनाचा द्विअर्थ काढून "गुदगुदल्या" करून घेऊन आनंदी होण्याच्या प्रक्रीयेत कोण कोणाला थोपवूं शकणार? तर मग माझ्याच काय कुणाच्याही कवितेचा द्विअर्थ काढून गुदगुदल्या करून घेणार्‍यांकडून उत्तरं कसली मिळणार? आणि हवीत कशाला उत्तरं हेही खरं आहे.
गुदगुदल्या करून घ्यायचं एक वंय असतं.वयोमाना पलिकडे जाऊन पण काही लोकांना गुदगुदल्या करून घ्याव्याश्या वाटतात.आणि गुदगुदल्या करून घेण्यात काही लोक कोणत्याही वयात "आदतसे मजबूर असतात."
अधिक चर्विचरण करायला कुरण मोकळे सापडेलं जाऊं नये हीच माझीपण इच्छा.
"दिलपे मत ले यार" असंच म्हणावं लागेल.
तात्पर्य काय?
"मन जे सोची ते वैरी ना सोचे"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

31 Jul 2009 - 11:28 pm | बेसनलाडू

मूळ मुद्दा हाच की तुम्ही शेवटला म्हटल्यानुसार
गुदगुदल्या करून घ्यायचं एक वंय असतं.वयोमाना पलिकडे जाऊन पण काही लोकांना गुदगुदल्या करून घ्याव्याश्या वाटतात.आणि गुदगुदल्या करून घेण्यात काही लोक कोणत्याही वयात "आदतसे मजबूर असतात."
अधिक चर्विचरण करायला कुरण मोकळे सापडेलं जाऊं नये हीच माझीपण इच्छा.
हे असे आहे, तर अशा स्पष्टीकरणांचीही गरज पडू नये नाही का? तुमच्या स्पष्टीकरणामागच्या तसंच या लेखनामागच्या किंवा 'त्या' विडंबनामागच्या हेतूबाबत माझ्या (किंवा येथील इतरही कोणा सभासदाच्या) मनात यत्किंचितही शंका नाही; पण कशातून कसा अर्थ काढायचा वगैरे आपल्या हाती नसताना काहींच्या वात्रटपणाला (तसंच गंभीरपणाला) चीप पब्लिसिटी स्टंट म्हणणे किंवा लई भारी प्रतिसाद म्हणणे हे दोन्ही (मला तरी) व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि किंचित टोकाचे मुद्दे वाटतात.
रचना व प्रतिसाद दोन्ही दोन अंगाने वाचावेत (निदान मी तरी वाचतो) - १. रचना/प्रतिसाद म्हणून २. त्यामागची विचारप्रक्रिया समजावी म्हणून. मते त्यानुसार बनवावीत असे वाटते. जेव्हा हे सगळे व्यक्तिस्वातंत्र्य नि व्यक्तिगत मतांचा मुद्दा यांवर येऊन थांबते तेव्हा कोठे किती ताणावे नि कोठे कधी किती सोडून द्यावे, याची जाण असली म्हणजे झाले.
अधिक काय बोलावे?
(व्यक्तिशः)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

1 Aug 2009 - 12:28 am | विसोबा खेचर

ह्यातला "पाऊस" ह्या शब्दाचा उपयोग मी "ऊसा" साठी विडंबनात केला आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं,चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या मनात ओघा ओघाने आलं.आणि कविता लिहिली गेली.

बरं बुवा! :)

तात्या.

विनायक प्रभू's picture

1 Aug 2009 - 3:34 pm | विनायक प्रभू

बर बुवा.
तात्याशी सहमत.
एवढे तुम्ही म्हणता तसे चढत्या पातळीतले प्रतिसाद असुनसुद्धा कवितचे विडंबन उडाले नाही ह्यातच सर्व काही आले सामंत काका.

विजुभाऊ's picture

2 Aug 2009 - 12:49 pm | विजुभाऊ

परबु भाईंशी सहमत.
असो.......

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे