आला पाउस पाऊस
आल्या सरींवर सरी
त्यात न्हाऊन न्हाऊन
सुखावली धरती सारी
आला पाउस पाऊस
आकाशात ढग काळे
एक मल्हाराची धून
नभ आज हे आळवे
आला पाउस पाऊस
त्यात वा-याची ही मस्ती
धरणे, नद्या, नाले सारे
दुथडी भरुन वाहती
आला पाउस पाऊस
झाडे झाली ओली चिंब
हिरवा शालू पांघरुन
पाहतात प्रतिबिंब
आला पाउस पाऊस
डोंगर हिरवे नटले
सजणाला भेटायाला
मन प्रियेचे आतुरले
आला पाउस पाऊस
रस्ते पाण्याचेच झाले
धावपळीचे जीवन
दोन क्षण थांबलेले
आला पाऊस पाऊस
मुले काढतात खोड्या
कुणी डुंबती पाण्यात
कुणी सोडतात होड्या
आला पाउस पाऊस
ओले चिंब झाले पक्षी
तारेवरती विजेच्या
दिसे सुंदर ही नक्षी
आला पाउस पाऊस
माझ्या आवडीचा सण
धुंद बरसता तो
तृप्त झाले माझे मन
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 5:45 pm | सुवर्णमयी
मस्त. कविता आवडली.
15 Jul 2009 - 4:34 am | पक्या
साधी , सरळ सोपी कविता. फारच आवडली.
15 Jul 2009 - 7:54 am | सुबक ठेंगणी
अर्थाची कोडी न घालणारी साधी कविता!
अवांतर
आला पाऊस पाऊस
मुले काढतात खोड्या
कुणी डुंबती पाण्यात
कुणी सोडतात पुड्या
पण यमकात बसतंय! ;)
15 Jul 2009 - 1:31 pm | क्रान्ति
मस्त कविता.
आला पाउस पाऊस
माझ्या आवडीचा सण
धुंद बरसता तो
तृप्त झाले माझे मन
वा!
क्रान्ति![]()
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
15 Jul 2009 - 1:38 pm | जागु
छान.
15 Jul 2009 - 10:42 pm | प्राजु
चिंब कविता!! आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Jul 2009 - 8:57 pm | अनिरुध्द
आपल्या प्रतिक्रियांबद्दल.