Skip to main content

आला पाऊस पाऊस.....

लेखक अनिरुध्द यांनी मंगळवार, 14/07/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
आला पाउस पाऊस आल्या सरींवर सरी त्यात न्हाऊन न्हाऊन सुखावली धरती सारी आला पाउस पाऊस आकाशात ढग काळे एक मल्हाराची धून नभ आज हे आळवे आला पाउस पाऊस त्यात वा-याची ही मस्ती धरणे, नद्या, नाले सारे दुथडी भरुन वाहती आला पाउस पाऊस झाडे झाली ओली चिंब हिरवा शालू पांघरुन पाहतात प्रतिबिंब आला पाउस पाऊस डोंगर हिरवे नटले सजणाला भेटायाला मन प्रियेचे आतुरले आला पाउस पाऊस रस्ते पाण्याचेच झाले धावपळीचे जीवन दोन क्षण थांबलेले आला पाऊस पाऊस मुले काढतात खोड्या कुणी डुंबती पाण्यात कुणी सोडतात होड्या आला पाउस पाऊस ओले चिंब झाले पक्षी तारेवरती विजेच्या दिसे सुंदर ही नक्षी आला पाउस पाऊस माझ्या आवडीचा सण धुंद बरसता तो तृप्त झाले माझे मन
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3487
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

मस्त. कविता आवडली.

साधी , सरळ सोपी कविता. फारच आवडली.

In reply to by पक्या

अर्थाची कोडी न घालणारी साधी कविता! अवांतर आला पाऊस पाऊस मुले काढतात खोड्या कुणी डुंबती पाण्यात कुणी सोडतात पुड्या पण यमकात बसतंय! ;)

मस्त कविता. आला पाउस पाऊस माझ्या आवडीचा सण धुंद बरसता तो तृप्त झाले माझे मन वा! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा रूह की शायरी

आपल्या प्रतिक्रियांबद्दल.