फोकाचे वळ

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
10 Jul 2009 - 11:17 am

"मास्तर, खुर्चीत बसवत नाहीय्ये".- एक सन्माननिय मिपासद्स्य फोन वर म्हणाले.
ढेकुण झालेत की काय?
"नाही हो, फोकाचे वळ उठलेत. आय शप्पथ सांगतो आता परत कधी १८०+ शिट्टी घरात वाजवणार नाही. गाडाव झालो होतो. आता परत माणुस झालो.आतापर्यंत झाले ते साल्वेज कसे करायचे ते विचार करतोय."
घरी जा. जाताना एखादी भेट घेउन जा. डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवा. बस्स. आणि ह्या पुढे तीला आवडणार्‍या विषयात गप्पा मारुन जमेल तेवढे खीखीखीखी खी करा. ती अगदी योग्य मार्गावर आहे. काहीही काळजी करु नका. तीला जे हवे आहे ते ती मिळवेलच ह्याची मला खात्री आहे. ह्या बाबत माझा अंदाज सहसा चुकत नाही. तुम्ही फक्त आई, बाबा व्हा. एज्युकेशनीस्ट होउ नका.
"फोकाचे वळ नुसते मलाच नाही, बर्‍याच ठीकाणी उठलेत"
चालायचेच.
_________________________________________________________________

रात्री साडे आठ वाजता तो येणार होता.
नशीबाने घरी कुणीही नव्हते.
सहसा मी धक्का तंत्राचा वापर करत नाही. पण आज ते करायचे ठरवले होते.
बेल वाजली. समोर तो उभा होता.
मी 'सुरक्षा दरवाजा' न उघडताच त्याच्या हातात पाकीटात घातलेला फोटो त्याला दिला.
"सर, जरा बोलायचे पण होते"
माझ्या घरात फक्त माणसाना परवानगी आहे.
"सर, प्ली़ज"
ठीक आहे असे म्हणुन मी दरवाजा उघडला.
४ माळे चढून आला होता. पाणी द्यायचा विचार आवरता घेतला.
"सर, माझी बाजु मांडायची होती"
हे बघा, शिक्षणावरुन आपल्या जन्माला घातलेल्या मुलांचा मानसिक, शारिरीक छळ करणार्‍याबद्दल मला अत्यंत घृणा आहे. त्यामुळे काय बोलायचे आहे ते बोला आणि सुटा.
आणि काय बोलणार हो तुम्ही. तीच जुनी कहाणी असणार.
" मिसेस ने सांगितली काय"( लगेच बायकोवर संशय)
नाही. त्या साठी वेळच नव्हता. काय वेगळी नसणार. कुठले तरी ३० वर्षापुर्वीचे मढे खांद्यावर बाळगलेले असणार. आई किंवा बाबानी वयाच्या १५ व्या वर्षी शिक्षणावरुन केलेल्या छळाचा बदला घ्यायला मुलीचा वापर याहुन दुसरे काय सांगणार आहात.
तो आश्चर्यचकित झाला.
आणि तेच होते. बाप आय. आय. टीयन. आई एम. फिल.
आणि हे ' तारे जमीन पर'
सतत टोमणे खाउन वयात आलेला. आई बाबाबद्दल विलक्षण तिरस्कार. कुठल्या तरी कंपनीत कारकुन. सर्व आशा आकांक्षा मुलीवर केंद्रीत.
आणि मग मी फोकाचे वळ सुरु केले.
काय हो, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामामधे कधीही चूक करत नाही. साहेबाची बोलणी खात नाही. आणि तोच साहेब तुमच्या अडीअडचणी सांभाळतो की नाही. का हाकलुन देतो.
आणि घरी काय हो. घरी पेपर अर्धवट लिहीला किंवा नापास झालात म्हणुन बायको बोलायचे सोडते काय?
तीथे पण ए.टी.के.टी मिळतेच ना?
नशिब समजा मुलगी आजोबा, आणि आजीच्या प्रतीचे डोके घेउन आली आहे. तुमच्या दोघांचे नाही. ते असते तर काय केले असते.;
४८ तासाचा युफोरिया असतो तो बुके, बक्षिससमारंभ वगैरे चा.
नंतर सर्व जण एकाच पीच वर.
काहीही फरक नाही. टॉपर मधे आणि तिच्यामधे.
उलट ह्या सहा मार्कांच्या फरकाने पेटुन उठेल आणि टॉपर ला मागे टाकेल. ते फक्त तुम्ही ही नौटंकी सोडून माणुस झाला तरच शक्य आहे. असेच चालु ठेवले तर आणखी ३० वर्षाने आणखी एक डीसफंक्शनल आई तयार होईल आपल्या मुलांवर बदला घेणारी.
गाडा ती ३० वर्ष जुनी'ममी.' आंघोळ करा स्वच्छ. नव्याने सुरुवात करा. मुलगी आपला बाप आजही आपल्यावर तेवढेच प्रेम करतो हे कळाले तर नक्कीच
पुढे जाईल. बाकी तुमची जी सर्व मध्यम वर्गियांची असते तशी शैक्षणिक गुणवत्ता आणि आयुष्यातले यश '
गणित सुत्राबद्दल मी काही ही बोलणार नाही.
तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल टीका करणारा मी कोण?
मुली बद्दल खात्री आहे म्हणुन बोललो.
बाकी तुमची इच्छा.
डुकरासारखे त्याच घाणीत लडबडायचे का माणुस व्हायचे.
तो काहीही बोलला नाही.
ह्स्तांदोलन केले आणि निघुन गेला.
जाता जाता: फोटो टी पॉय वरच ठेउन गेला.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Jul 2009 - 11:29 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

लवंगी's picture

10 Jul 2009 - 5:03 pm | लवंगी

अगदि मस्त

सहज's picture

10 Jul 2009 - 12:06 pm | सहज

समुपदेशनाची गरज नाही कोण म्हणतो रे!

मास्तरांचा अजुन एक भारी लेख.

टारझन's picture

10 Jul 2009 - 1:13 pm | टारझन

वा !! छाण !!!

असो !!!

अवांतर :
दोन्ही लेख एकत्र लिहीले असते तर सलग वाचले असते :) तरी पण असो !!! आता जरा एखादा क्रिप्टिक लेख टाका .. बरेच दिवस झाले तुम्ही फक्त समुपदेशन प्रसवताय .. तरीही असो !! आणि हो , क्रिप्ट लेखांची प्रसव फ्रिक्वेंसी कमी झाल्याने मास्तरचा टेंपो बिघडला आहे , तरी पण असो !!!

(तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच
- अचानक पाठलाग
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......

वेताळ's picture

10 Jul 2009 - 2:27 pm | वेताळ

अजुन येवु द्या.

वेताळ

वेताळ's picture

10 Jul 2009 - 2:37 pm | वेताळ

अजुन येवु द्या.

वेताळ

काँपिटिशन्-काँपिटिशन करीत लहानग्यांची बालपणं चिरडणारे लोक जागोजागी आहेत! एकाला तरी फुटवून दुसर्‍या लायनीला उभा केलात त्याबद्दल अभिनंदन! :)

(लायनीतला)चतुरंग

स्वाती२'s picture

10 Jul 2009 - 5:25 pm | स्वाती२

हम्म
सतत टोमणे खाउन वयात आलेला बाप आपल्या मुलीशी खरेतर अधिकच समंजसपणे वागायला हवा. आपण भोगले ते मुलांच्या वाट्याला येवू नये या विचारानेतरी त्याचे वागणे वेगळे असायला हवे होते.

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 5:38 pm | चतुरंग

हा सबकॉन्शस इफेक्ट असतो. आपल्याला जे भोगायला लागलं आहे त्याची मुळं आपल्या बालपणात आहेत हेच लक्षात येत नाही, त्यामुळे आपण जे करतो आहोत ते मुलांच्या 'भल्यासाठीच' आहे असं वाटत रहातं!

(सबकॉन्शस)चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

10 Jul 2009 - 5:43 pm | परिकथेतील राजकुमार

फोकलवलेल्या माणसाची बातमी आवडली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2009 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते

चांगले केलेत. पण एक दोन फोक खरोखरच मारले असते तरी चालले असते हो.

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

10 Jul 2009 - 6:39 pm | टारझन

बरं झालं तुम्ही समुपदेशनात नाहीत

- झोपिन चादर्कर्ते

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 6:56 pm | चतुरंग

अरबस्तानात राहून राहून तुमच्या नजरेत 'समुपदेशन = फोकोपदेशन' झाले आहे असे दिसते! ;)

(फोकडान्सर)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jul 2009 - 9:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आता नवीन चळवळ सुरू करा मास्तर, 'फुकाची वळवळ', या असल्या पालकांसाठी!

आमचं नशीबच म्हणायचं, "आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलांनातरी मिळालं पाहिजे" असं म्हणणारे पालक मिळाल ते!

चतुरंग's picture

10 Jul 2009 - 9:28 pm | चतुरंग

'फोकाची वळवळ'

चतुरंग

अनामिक's picture

10 Jul 2009 - 6:30 pm | अनामिक

मला एक प्रश्न पडला आहे... वर दिलेल्या उदाहरणातल्या प्रमाणे वागणार्‍या पालकांचं एका समुपदेशाने खरंच परिवर्तन होतं का? की काही दिवसांनी पहिले पाढे पंच्चावन्न?

-अनामिक

रेवती's picture

10 Jul 2009 - 7:29 pm | रेवती

बरं झालं यावेळी धक्का तंत्र वापरलत!
जरा कळू दे या महान माणसाला......आपण किती त्रास देतोय मुलीला!

रेवती

संजय अभ्यंकर's picture

10 Jul 2009 - 10:45 pm | संजय अभ्यंकर

मास्तर मरेस्तोर मारणार, ह्याची त्याला नक्की कल्पना असावी!
तरीही तो आला.
मनात कोठेतरी अपराधीपणाची भावना असावी!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

टारझन's picture

10 Jul 2009 - 10:51 pm | टारझन

तरीही तो आला.

आणि हो , हे वाक्य डायरेक्ट हृदयाला भिडलं !

अवलिया's picture

10 Jul 2009 - 10:53 pm | अवलिया

सहमत आहे.

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

दशानन's picture

11 Jul 2009 - 2:31 pm | दशानन

प्रचंड सहमत.

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

ऋषिकेश's picture

10 Jul 2009 - 11:29 pm | ऋषिकेश

हं! फारच काँप्लेक्स आहे सगळं

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

क्रान्ति's picture

11 Jul 2009 - 8:49 am | क्रान्ति

हे समुपदेशन लई भारी! =D> =D> =D>

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

रूह की शायरी