एक हलके फुलके गाणे.

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
28 Jun 2009 - 3:57 pm

काही महीन्यांपूर्वी रोहीत राऊत या बालकलाकाराचे गाणे ऐकले होते तेव्हा असे वाटले की या (रोहीतच्या)पिढीसाठी गेय कविता लिहायची तर कशी लिहावी लागेल ?
मग लक्षात आलं की यांच्या साठी गेय असं काही लिहायचं झालं तर यांचा रीदम अनुभवून मग लिहावं लागेल.संगीताची समज कमी आहे तरी एक प्रयत्न करून पाहीला .तुमच्या पुढे ठेवतो आहे.
कल्पना अशी आहे की नोकरी नसलेला एखादा तरुण मुलगा आसपासच्या मुलीकडे रोज बघतो .
त्याला ती ज्याम आवडतेय, पण नोकरीचा पत्ता नाही विचारायचं कसं ?

कोरस :
टफ लूकींग गाय
पण डेरींगच नाय
गूड लूकींग गाय
पण नोकरीच नाय.

चेहेरा
गोरामोरा
का झाला
सांग ना.

गजरा
चुरगळला
का गळल्या
पाकळ्या

का साखर
विरघळली
ओठांची
सांग ना

तो काळा
मदरासी
की गोरा
पंजाबी

कोरस :लाजते कशाला नाव सांग ना.

संगीतकविता

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Jun 2009 - 3:59 pm | श्रावण मोडक

लय भारी!!!

अवलिया's picture

28 Jun 2009 - 4:01 pm | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

पर्नल नेने मराठे's picture

28 Jun 2009 - 4:03 pm | पर्नल नेने मराठे

गूड लूकींग गाय
पण नोकरीच नाय
मग काय फाय्दा :D
चुचु

>:)
वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

28 Jun 2009 - 4:14 pm | पर्नल नेने मराठे

L) गोरी ;) :P
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

28 Jun 2009 - 4:16 pm | पर्नल नेने मराठे

वेताळ जाम्भ्ळा :D
चुचु

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Jun 2009 - 4:14 pm | बिपिन कार्यकर्ते

एकदम भारी.

बिपिन कार्यकर्ते

लवंगी's picture

28 Jun 2009 - 4:19 pm | लवंगी

:)

सुनील's picture

28 Jun 2009 - 4:29 pm | सुनील

मस्त गाणं. चाल लावून बघायला पाहिजे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पोलिसकाका_जयहिन्द's picture

28 Jun 2009 - 4:57 pm | पोलिसकाका_जयहिन्द

मजा आली...

"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."

My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

28 Jun 2009 - 6:58 pm | विसोबा खेचर

गजरा
चुरगळला
का गळल्या
पाकळ्या

सुंदर!

अवांतर : का हो रामदासभाऊ, तुम्हाला बघावं तेव्हा 'गजरा चुरगळणे', 'पाकळ्या गळणे', या शिवाय दुसरं काही दिसत नाही का हो? बघावं तेव्हा आपले नाजूक नाजूक फुलांच्या जिवावर उठलेले असता?! :)

तात्या.

विजुभाऊ's picture

29 Jun 2009 - 11:55 am | विजुभाऊ

रामदासकाका
गजरा
चुरगळला
का गळल्या
पाकळ्या

या ऐवजी
मुरगळला
का पाय ,
करवदल्या गुडघ्याच्या
वाट्या"
कोरस : लावतो वाट .....संधीवात संधीवात संधीवात
हे असे लिहायला लागा. तात्याना तेवढेच समाधान वाटेल ;)

विनायक प्रभू's picture

28 Jun 2009 - 7:46 pm | विनायक प्रभू

खडूस म्हातारा.
आणि बघा ना बैलाला ' गाय' म्हणतो.

घाटावरचे भट's picture

29 Jun 2009 - 12:24 am | घाटावरचे भट

वा! मस्तच.

प्रमोद देव's picture

29 Jun 2009 - 9:41 am | प्रमोद देव

स्वामी,मजा नाय आली. :(
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

धनंजय's picture

29 Jun 2009 - 7:48 pm | धनंजय

अंतर्‍यांना माझ्या मनात आपोआप चाल लागत नाही आहे :-(
कोरसला सोपी चाल सहज लागते आहे.

रामदासांच्या मनात नेमका काय रिदम आहे कोणास ठाऊक.

(माझ्या पद्धतीने) बोलण्यातल्या टाळ्या आणि ओळींमधल्या टाळ्या वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्यामुळे माझी त्रेधा उडत असावी. माझ्या टाळ्या ठळक ठशात.

चेह्-रा
गोरामोरा
का झाला
सांग् ना.

ज्-रा
चुर्-गळ्-ला
का ळ्-ल्या (??)
पाक्-ळ्या

का साखर् ( (की "का साखर्" म्हणायचे?))
विर्-ळ्-ली (की "विर्-घळ्-ली" म्हणायचे?)
ठांची (की "ओठांची" म्हणायचे?)
सांग ना

तो काळा
द्-रासी (की "-द-रा-सि" म्हणायचे?)
की गोरा
पंजाबी

- - -
मला तरी कित्येक ओळींमध्ये तोंडी आघात दुसर्‍या अक्षरावर द्यावासा वाटतो. पहिल्या अक्षरावर बळेच आघात दिला तर? - एक तर वाक्याचा अर्थ बदलतो, नाहीतर मला मुळी अर्थच लागत नाही. हाताने टाळ्या लयीत द्यायच्या म्हणजे कुठे, हा प्रश्न मग फारच धांदल उडवतो.

रामदासांची लयीची जाण उच्च दर्जाची आहे, हे त्यांच्या पूर्वीच्या कवितांमधून जाणवतेच. त्यामुळे तालाबद्दल (त्यांच्या मनातल्या टाळ्यांच्या जागांबद्दल) इथे त्यांनी मला अधिक मार्गदर्शन करावे.

- - -
आघात पहिल्याच अक्षरावर आला पाहिजे असे मी म्हणत नाही. कोरसमध्ये मला काहीच त्रास होत नाही -
फ लूकींग गा
पण डेरींगच ना
गूड लूकींग गा
पण नोकरीच नाय.

त्यामुळे अंतर्‍यांमध्ये नेमका काय त्रास होतो आहे, ते सांगणे मला कठिण जाते आहे.

चाल ऐकली तर सगळेच सोपे होईल असे वाटते.

(बाकी रामदास यांनीच सुरुवातीला रिदमचा विषय काढला. नाहीतर माझे रिदमच्या बाबतीतले हे व्यंग्य दाखवायचे इतके धाडस मला झाले नसते.)

हे लिहीलं .टाळ्यांची जागा तुम्ही म्हणताय तशीच आहे पण माझ्या मते हे गाणं अपूर्ण आहे.एक प्रयोग केला एव्हढंच.
तुमच्या अभ्यासाची दाद द्यावी तेव्हढी कमीच.

मदनबाण's picture

29 Jun 2009 - 8:25 pm | मदनबाण

मी तुमच्या त्या दुसर्‍या कवितेची वाट बघतोय !!! :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka