पुण्याहून - काश्मीर टूर (मदत करा)

नजदीककुमार जवळकर's picture
नजदीककुमार जवळकर in भटकंती
6 Mar 2023 - 4:14 pm

नमस्कार मंडळी !

पुण्याहून - काश्मीर टूर करायचं ठरत आहे.
प्रवासी : मी,बायको, मुलगी (१३), मुलगा (७)
मार्च शेवटी किंव्हा मे, शक्यतो मार्च

ग्रुप टूर चालेल
वीणा वर्ल्ड फार महाग वाटतं आहे साधारण ५९,०००/- (एकाचे), मुलगा लहान म्हणून ४८,०००
ह्यात विमान - हॉटेल - फिरणे -खाणे सर्व आले. साधारण ६ दिवसाचा टूर
ठिकाणं - श्रीनगर, पेहेलगाम , गुलमर्ग, सोनमर्ग

कृपया मार्गदर्शन करा. बरेच मिपाकर गेले असतील.
काही links, tour operator असतील तर कळवा.
इतरत्र माहिती असेल तर अवश्य कळवा.

भटकंती मध्ये Access Deny येत आहे म्हणून इथे पोस्ट करतोय.
धन्यवाद !

प्रतिक्रिया

अमर विश्वास's picture

6 Mar 2023 - 5:49 pm | अमर विश्वास

स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग करा .... किंवा हिमालयन होम स्टे या फेसबुक ग्रुप वर उत्तम होम स्टे ऑपशन्स आहेत (मी हिमाचल टुर साठी वापरले आहेत.

श्रीनगर पर्यंत फ्लाईटने जाता येते (दिल्ली वरून) .. किंवा जम्मू पर्यंत ट्रेन आणि तिथून पुढे टॅक्सी (जम्मू टॅक्सी स्टॅन्ड वरून सॅन्डर्ड सेवा उपलब्ध)

लोकल ट्रान्सपोर्ट साठी श्रीनगरमधे टॅक्सी सेवा उपलब्ध

श्रीनगर मध्यवर्ती आहे .. सोनमर्ग, गुलमर्ग. पहेलगाम ३ दिशांना आहे ... श्रीनगर मधूनच जावे लागते ...

तुमची आवड / गरज माहित नसल्याने प्रत्यक्ष नावे सांगणे अवघड आहे .. पण शिकारा स्टे मस्त ... तसेच युथ हॉस्टेल हा उत्तम पर्याय आहे

बाकी प्रत्येक ठिकाणी काय पाहायचे हे सर्वांना माहित आहेच

पण काही स्पेकिफिक प्रश्न असतील तर जरूर विचारा

नजदीककुमार जवळकर's picture

9 Mar 2023 - 12:26 pm | नजदीककुमार जवळकर

माहिती बद्दल धन्यवाद ! हिमालयन होम स्टे या फेसबुक ग्रुप चा उपयोग झाला शिमला/हिमाचल ला गेलो तेव्हा.

केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास!

नजदीककुमार जवळकर's picture

9 Mar 2023 - 12:33 pm | नजदीककुमार जवळकर

ह्या वर काय प्रतिक्रिया द्यावी ह्याची कल्पना नाही करवत !
त्यामुळे माझा ...पास :)

१)त्यांचे पुअर प्लान चेक करा.
२) irctc tour plan rs 21000/-26000
Ex jammu/Srinagar/Chandigarh

https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NCH16

नजदीककुमार जवळकर's picture

9 Mar 2023 - 12:37 pm | नजदीककुमार जवळकर

सर धन्यवाद ! IRCTC ची offer पाहिली विजयवाडा/चंदीगड पासून आहे.
youtube वर review पण आहेत.
बघतोय ..

सरिता बांदेकर's picture

6 Mar 2023 - 7:24 pm | सरिता बांदेकर

एक्सीपीडिआ ट्राय करून बघा. फ्लाईट+ हॅाटेल टाकायचं आणी पुणे ते श्रीनगर .
श्रीनगरवरून डे टूर करायच्या.
कितीचं पॅकेज देतात बघा.
मी नेहमी त्यातूनच बूक करते किंवा ठाण्यात ईशा टूर आहे माझ्या मैत्रीणी त्यांच्याबरोबर जातात.

नजदीककुमार जवळकर's picture

9 Mar 2023 - 12:39 pm | नजदीककुमार जवळकर

Expedia आणि ईशा बघतो
धन्यवाद !!

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Mar 2023 - 7:51 pm | राजेंद्र मेहेंदळे

मी २०१५ मध्ये गेलो होतो (४ जणांचे कुटुंब)

एक शिकारा बूक केला, त्यानेच तवेरा गाडी ५-६ दिवस फिरायला दिली होती. साधारण ४०,०००/- रुपये (राहणे+रोज चहा/नाश्ता आणि डिनर)
जाताना मुंबई-श्रीनगर थेट विमान आहे(सकाळी ७ वाजता)
येताना दिल्लीहुन कनेक्टिंग विमान घेतले कारण पुण्याला यायचे होते. विमानाचे साधारण १५,०००/- माणशी. पूर्ण खर्च १ लाख. आता वाढला असेल. शॉपिंगचे वेगळे.

  • एक दिवस गुलमर्ग आणि परत.
  • दुसरा दिवस सोनमर्ग आणि परत.
  • एक दिवस पेहेल्गाम आणि मुक्काम व दुसरे दिवशी परत.
  • एक दिवस लोकल साईट सीईंग.
  • वैष्णोदेवी किवा अमरनाथ करायचे नव्हते कारण दिवस आणि खर्च वाढला असता.

  शिकारावाल्याचा नंबर आत्ता सापडत नाहीये, मिळाला तर देतो.

  नजदीककुमार जवळकर's picture

  9 Mar 2023 - 12:43 pm | नजदीककुमार जवळकर

  धन्यवाद !! राजेंद्र

  स्मिता श्रीपाद's picture

  7 Mar 2023 - 12:43 pm | स्मिता श्रीपाद

  काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन एकटे जाणे जरा रिस्की आहे. परिस्थिती कधीही बदलु शकते त्यामुळे तिथे मदत लागते.
  गेल्या वर्षी आम्ही कस्टमाईज टुर बुक केली होती त्याचे डीटेल्स खाली देते.
  https://www.facebook.com/khabtravels/
  आम्रपाली तापळे(पुणे) - ७०३०४५५८८६
  शाहिद वानी(श्रीनगर) -७००६०८७२५०
  ही एक लहान कंपनी आहे.त्यांचे ऑफिस काश्मिर मधेच आहे आणि पुण्यातुन सर्व बुकिंग चे काम आम्रपाली बघतात.
  आम्हाला हवी तशी आयटेनेरेरी त्यांनी बनवुन दिली. प्रत्येक ठीकाण बघत वणवण फिरायचे नव्हते ते साध्य झाले.
  श्रीनगर एअरपोर्ट वर उतरल्यापासुन संपुर्ण काश्मिर फिरवुन परत एअरपोर्ट पर पोचवणे - या काळात एक गाडी आणि ड्रायव्हर्/गाईड आपल्या सोबत सतत असतो.
  त्यांचे पेहेलगाम हॉटेल्स, हाउसबोट स्टे सुंदर होते. श्रीनगर मधे लोकल हॉटेल ठीकठाक होते एवढा मुद्दा सोडला तर ट्रीप मस्त ( आणी स्वस्त ) झाली.
  विमानासकट गेल्या वर्षी साधारण ४० हजार खर्च आला.
  अनुभवातुन आलेल्या काही टिप्स -
  -हाउसबोट मधे एक रात्रच रहा. २ दिवस कंटाळा येतो. शिकारा मधुन सतत ये-जा करण्यात वेळ जातो.
  -पेहेलगाम ला २ दिवस नक्की रहा. अत्यंत सुंदर ठीकाण.
  -श्रीनगर मधे दल रोड वर हॉटेल मिळाले तर चांगले. दल रोड एकदम हॅपनिंग आहे. संध्याकाळी फुटपाथ वर निवांत रमत गमत फिरायला मस्त वाटते.
  -शॉपिंग साठी पेहेलगाम सर्वात स्वस्त. सर्व कंपन्या आधी पेहेलगाम ला नेतात आणि पहिल्याच दिवशी कशाला शॉपिंग करायची म्हणुन आपण टाळतो. पण श्रीनगर मधे त्याच वस्तु दुप्पट तिप्पट दरात मिळतात.
  -गुलमर्ग ला शक्य असेल तर आदल्या दिवशी रहायला जा आणि गंडोला ची सकाळची पहिली राईड घ्या. जितकं लवकर वर पोचाल तितकं चांगलं. १२ नंतर हवा कधीही बदलते आणि मग गंडोला बंद करतात आणि बर्फ बघायचा चान्स हुकतो.( आमच्या बाबतीत असं झालं ).रहायला जाणं शक्य नसेल तर श्रीनगर हुन लवकरात लवकर पहाटे निघुन ७-७:३० पर्यंत गुलमर्ग ला पोचा. आदला दिवस थोडा निवांत ठेवुन हे जमु शकते.

  शुभेच्छा. तुम्हाला चांगले पॅकेज मिळो.

  केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास! >> टर्निनेटर दादा, ही कमेंट आवडली नाही. सगळ्यांनाच भरपुर वेळ काढुन फिरणे शक्य नसते. नोकरी किंवा आर्थिक बरीच कारणे असु शकतात. उगीच चिडवल्यासारखी/हिणवल्यासारखी कमेंट लिहायचे काहीच कारण नव्हते.तुमचे प्रवासवर्णन आवर्जुन वाचतो आम्ही आणि अवाडतं पण. तुम्हाला भरपूर वेळ असु शकेल पण हे सगळ्यानांच नाही ना जमत. असो. रहावलं नाही म्हणुन बोलले.

  नजदीककुमार जवळकर's picture

  9 Mar 2023 - 12:46 pm | नजदीककुमार जवळकर

  स्मिताजी नमस्कार !उत्तम प्रतिसाद !! 
  ही माहिती खरोखर उपयोगात येणार. दिलेल्या नम्बर वर फोन करतो.

  टर्मीनेटर's picture

  11 Mar 2023 - 8:24 pm | टर्मीनेटर

  @ स्मिता श्रीपाद

  "टर्निनेटर दादा, ही कमेंट आवडली नाही. सगळ्यांनाच भरपुर वेळ काढुन फिरणे शक्य नसते. नोकरी किंवा आर्थिक बरीच कारणे असु शकतात. उगीच चिडवल्यासारखी/हिणवल्यासारखी कमेंट लिहायचे काहीच कारण नव्हते."

  अर्रर्रर्र, आपला काहीतरी गैरसमज होतोय...
  मुळात कोणाला चिडवणे/हिणवणे हा माझा स्वभाव नाही, आणि तो प्रतिसाद देण्यामागे तसा काही हेतू वा उद्देशही नव्हता. धागाकर्त्याने दिलेल्या माहिती वरून त्यांचे बजेट व्यवस्थित असल्याचे लक्षात आले होते पण इतके पैसे खर्चून धावत-पळत भोज्या केल्यासारखे हे पृथ्वीवरील नंदनवन पाहणे हि गोष्ट खरंच खटकली होती त्यामुळे तेव्हा घाईत तसा प्रतिसाद दिला गेला होता (आज सवडीने सविस्तर प्रतिसाद दिला आहे 😀).

  "रहावलं नाही म्हणुन बोलले."

  अहो पण बरं झालं बोललात ते, त्यामुळे त्रोटक पद्धतीने दिलेल्या प्रतिसादातून असे गैरसमज निर्माण होऊ शकतात हे माझ्या लक्षात आले आणि त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  स्मिता श्रीपाद's picture

  21 Mar 2023 - 11:24 am | स्मिता श्रीपाद

  @ टर्मीनेटर दादा,

  माझी कमेंट इतकी मस्त पॉझिटिव्हली घेतली आणि न रागवता रीप्लाय केलात त्याबद्दल धन्यवाद.
  तुमचा सविस्तर प्रतिसाद वाचला आणि त्या वाक्यामागची सगळी थॉट प्रोसेस कळली.
  मस्त प्रतिसाद दिला आहे.
  गेल्या वर्षी ७ दिवस काश्मिर फिरुन आलो. वेळेअभावी काही गोष्टी सुटल्या. पण तुमचा प्रतिसाद डोळ्यासमोर ठेवुन परत नक्कीच जाणार :-)
  काश्मिर मधे ९-१० दिवस पण कमीच.
  खरतर काश्मिर चे जे तीन सिझन समजले जातात, हिरवा ( मे जुन मधे उन्हाळ्यात ), लाल-केशरी ( सप्टेंबर-ऑक्टोबर मधे जेव्हा सफरचंद सिझन असतो आणि झाडांची पानगळ असते) आणि पांढरा ( डीसेंबर-जान बर्फ ) या तीनही सिझन मधे ८-९ दिवस निवांत काश्मिर बघायला जायला हवे.

  टर्मीनेटर's picture

  22 Mar 2023 - 12:12 pm | टर्मीनेटर

  माझी कमेंट इतकी मस्त पॉझिटिव्हली घेतली

  माझा ब्लड ग्रुप तेवढा b rh negative आहे, बाकि negativity ला माझ्या विचारांत आणि व्यवहारांत कुठेही स्थान नाही 😀

  या तीनही सिझन मधे ८-९ दिवस निवांत काश्मिर बघायला जायला हवे.

  जरूर जाऊन या... सुदैवाने चार काश्मीर भेटींत माझे तीनही सिझन पाहून झाले आहेत. काश्मीरचा निसर्ग खरोखर अद्भुत आहे!

  त्यांचे कटिंग आणून लावणे ही इच्छा आहे.

  कंजूस's picture

  7 Mar 2023 - 5:58 pm | कंजूस

  काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन एकटे जाणे जरा रिस्की आहे. परिस्थिती कधीही बदलु शकते त्यामुळे तिथे मदत लागते.

  मग irctc tourवर भरवसा ठेवावा लागेल.
  ( रीफंड/cancellation नियम जाणून घ्या.)

  नजदीककुमार जवळकर's picture

  9 Mar 2023 - 12:48 pm | नजदीककुमार जवळकर

  अगदी सहमत !
  Refund चे नियम बघतो

  कश्मीर टूर आम्ही एका प्रसिद्ध टूर कंपनी तर्फे धावाधावा पळापळा अशी केली ज्यची आम्हाला आवडसवड व माहिती नव्हती मला तरी. यपूर्वी आम्ही स्वतंत्र रित्या सर्व भारतभर स्वतःच्या रिस्क टूर्स केलेल्या होत्या त्यामुळे मला हा अनुभव अजिबात आवडला नही पण कश्मीरला एकटे जाणेही तेव्हढेच risky आहे. टूर कंपनी तर्फे स्वतःचा प्रोग्ॅम आखून कुणी escort कम माहितगार गाईड घेऊन जावे .अरथात तुम्हाला घाईघाईचा प्रवास पळापळ चालतअसेल तर कंपनी तर्फेजाणे छान डोक्याला कसलाही सामान वहाणे , संभाळणे साईटसिईंगला शोधाशोध , स्वतःची जबाबदारी घेणे transefers स्वताः शोधत करणे, हेसर्व वाचते वकश्मीर रिस्की वाटते, संपूरण मुसलमान राज्य व पाकिस्तान जवळ, कधीही दंगली होऊ शकतात

  कंपनी तर्फे जेवणावळी, नाश्त्यालाही मेजवानीचा थाट व यानेच impression छान करणे ( त्यांच्यामते) या गोष्टी प्रत्येकाच्या आवडी सवयींवर अवलंबून आहेत आम्हाला असले अजिबात चालत नाही . सकाळी भरपेट नाश्ता , जेवणात दुपारी वेळ न घालवता जवळचे लाडू, चिवडा बिस्कीटे खात भरपूर म्हणजे माझ्यामते फिरणे धावपळ न करता (कारण आमच्या मुंबईच्या लांब प्रवासात नोकरीसाठी करताना पळापळ , धावणे नाॅनस्टाॅप काम ११/११ तास करणे(घरकाम व आॅफिसकाम , लहान मुलीचे सर्वच करणे , ती मोठी झाल्यावर कमी झाले.)मुळे आम्ही टूर्स घाईच्या न ठेवता सावकाश , थोडे कमी साईटसिईंग विस्रांती वआवडेल तेथे परत जाणे ,( म्हैसूर राजवाडा व म्युुुुझियम दोनदा पाहिले कारण आम्ही तरूण व पहिली टूर होती ) पहिल्याची नवलाई भारीच.

  नजदीककुमार जवळकर's picture

  9 Mar 2023 - 12:49 pm | नजदीककुमार जवळकर

  धन्यवाद !! सहमत !

  nutanm's picture

  8 Mar 2023 - 1:11 am | nutanm

  आपण पुण्यालाकायम रहात असल्यामुळे थंडीची सवय व गरम कपडे असतीलच पण जास्त गरम शक्यतो थर्मल वेअर व हातमोजे पायमोजे 2/3 जोड कंपल्सरी वआतंरवस्तंरांचे डबल दिवसांचे 12/13 जोड कंपलसरी नेणे. म्हणजे धूत बसणे नको सकाळी व संध्याकाळी वेळ वाचून सकाळी लौकर तयार होऊन जास्त साईटसिइंग करता येते व लौकर परतता येते कुठेही अनोळखी ठिकाणी व कश्मीर सारख्या तर आवर्जून लौकर येणे चांगले. बाहेरगावी उशीरापर्यत फिरूच नये. हाॅटेलच्या जवळपास गर्दी सेफ शहर मुंबई,, पुणे बेगलोर थोडीच ऊशीरा येण्यास बरी. कश्मीर
  तर रिस्कीच. खूप थंडी आम्हाला मुुंबईच्यांना अजिबात सवय नाही मला तर दुसर्या दिवसापासून ताप येणे अती गारव्यामुळे भयंकर थंडी वाजून शौचाला आखडून व मेजवान्यांमुळे bloodsugar वाढली व मी गोळ्या थंडीताप व शुगरच्या गोळ्या नेल्या असून विसरल्यामुळे न घेऊन शुगर वाढून जास्तच सर्दी व बारीक तापाला तोंड द्यावे लागले. सर्व औषधे वेळेवर वरोज घेण्याची पथ्ये व खाण्याची बर्यापैकी पाळणे वयानुसार अत्यावश्यक.

  नजदीककुमार जवळकर's picture

  9 Mar 2023 - 12:53 pm | नजदीककुमार जवळकर

  उत्तराखंड आणि हिमाचलला पहाडांवर बरेचदा गेलो आहे.
  माहितीसाठी ..धन्यवाद !!

  मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर आहे.

  कपिलमुनी's picture

  8 Mar 2023 - 6:09 pm | कपिलमुनी

  गुगल बाबा Permanently closed असे सान्गत आहे

  गोरेगाव स्टे पूर्व येथून ३४१,३४२,४५१,४५२ चार बसेस तिथून ( आरे पोलीस स्टे./छोटा काश्मीर स्टॉपचे नाव सातवा स्टॉप)जातात.
  तिथे मेट्रो कार शेड बांधत नाहीत.

  चौथा कोनाडा's picture

  11 Mar 2023 - 12:42 pm | चौथा कोनाडा

  मुंबईतले गोरेगाव मधले छोटा काश्मिर छान आहे

  नजदीककुमार जवळकर's picture

  9 Mar 2023 - 12:55 pm | नजदीककुमार जवळकर

  छोटा काश्मीर माहिती बद्दल धन्यवाद !

  कर्नलतपस्वी's picture

  11 Mar 2023 - 11:50 am | कर्नलतपस्वी

  आता परिस्थिती बदलली आहे. संसाधने व इन्फ्रास्ट्रक्चर खुपच बदलले आहे. स्वतः प्लॅन करून जाउ शकतो. नैसर्गिक सौंदर्य एवढे आहे की दिल्ली बारामुल्ला रेल्वेने गेलात तरी डोळ्याचे पारणे फिटले.

  प्रवासी कंपनी बरोबर पण ठिक आहे कारण फक्त मौजमजा एवढाच उद्देश असतो. तसेही संपुर्ण काश्मीर सहा दिवसात बघणे शक्य नसल्याने नेमक्या,प्रसिद्ध ठिकाणे बघून येणे सोईस्कर वाटते.

  ट्रिप साठी शुभेच्छा.

  मी कधी गेलोच तर स्वतःच जाईन. मला ग्रूप नकोच असतो. प्रायव्हसी राहातं नाही आणि फुकटच्या चर्चा होतात. जे घडत जाईल त्यास सामोरे जाणे आवडते. काश्मिरातल्या तीन सीजन्सपैकी ( १मार्च फुलांचा,२सप्टेंबर फळांचा,३ डिसेंबर बर्फाचा) क्र २ आवडेल. फुलं आणि बागा नंतर विचार करेन. बर्फ कुठेच नको.

  लिओ's picture

  11 Mar 2023 - 2:35 pm | लिओ

  आपण पुण्याहुन काश्मीर टुर करत आहात, आपलाल्या शुभेच्छा, पण एक सुचवू इच्छीतो, आपण प्रवासाची ठरवलेली वेळ ( मार्च महिना ) व प्रवास नियोजनाची वेळ यामध्ये फार कमी कालावधी आहे. हे थोडे पटत नाहि.

  प्रवासासाठी शुभेच्छा टुर केल्यावर प्रवास अनुभव येथे नोंदवावा

  वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते "केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास!" ते उपहास, उपरोध किंवा खोचकपणे लिहिलेले नसून मनापासून लिहिले आहे.
  पृथ्वीवरचा स्वर्ग/नंदनवन म्हंटलया जाणाऱ्या काश्मीर मधील काही निवडक आणि प्रसिद्ध अशी ठिकाणे धावत-पळत सहा दिवसांत पाहून होतील पण 'काश्मीर' अनुभवता येणार नाही असे माझे व्यक्तिगत मत!

  सर्वप्रथम मी तुम्हाला एक_वात्रट साहेबांनी मिपावर लिहिलेली (वाचली नसल्यास) 'ये कश्मीर है' हि नऊ भागांची लेखमालिका अवश्य वाचावी असे सुचविन.
  त्यांनी श्रीनगर - सोनमर्ग - गुलमर्ग - पेहेलगाम - श्रीनगर अशी सहल केली होती. (त्यांची हि मालिका सुरु होती त्या वेळी अनेक वर्षांनी मी चौदा दिवसांच्या जम्मू-काश्मीर सहलीवर होतो, त्यामुळे हि मालिका माझ्या खूप उशिराने वाचनात आली होती. आणि सदर सचित्र मालिका त्यांनी अतिशय छान प्रकारे लिहिलेली असल्याने पुन्हा काश्मीरवर लिहिण्याचा मोह मी टाळला होता 😀)

  1. ये कश्मीर है - दिवस पहिला - ९ मे
  2. ये कश्मीर है - दिवस दुसरा - १० मे
  3. ये कश्मीर है - दिवस तिसरा - ११ मे
  4. ये कश्मीर है - दिवस चौथा - १२ मे
  5. ये कश्मीर है - दिवस पाचवा - १३ मे
  6. ये कश्मीर है - दिवस सहावा - १४ मे
  7. ये कश्मीर है - दिवस सातवा - १५ मे
  8. ये कश्मीर है - दिवस आठवा - १६ मे
  9. ये कश्मीर है - दिवस नववा - १७ मे (अंतिम भाग)

  असो, तुम्हाला एक विनंती करावीशी वाटते कि सहलीचे किमान तीन दिवस तरी वाढवता आले तर बघा, तुमची हि कौटुंबिक काश्मीर सहल अविस्मरणीय अशी होईल.

  बाकी वरती काहींनी म्हंटल्या प्रमाणे स्वतःच ट्रिपचे नियोजन करा. विमानाची तिकिटे (आधी स्कायस्कॅनर वर तुलना करून) 'मेक माय ट्रिप', 'गोआयबीबो' किंवा तुमच्या पसंतीच्या कुठल्याही तत्सम वेब साईट/ ऍप वरून बुक करा.

  विमानप्रवासा प्रमाणेच हॉटेलचे बुकिंगही वरील प्रमाणे स्वतःच करा. त्यासाठी मी तुम्हाला श्रीनगर मधले 'वलिसन्स हॉटेल' (Walisons Hotel) आणि पेहेलगाम मध्ये त्यांचेच ' द पीस रिसॉर्ट - वलिसन्स' (The Peace Resort - Walisons) ह्या दोन ठिकाणांची शिफारस करतो.
  (हाऊसबोटमधले वास्तव्य एखाद दिवस एक वेगळा अनुभव म्हणून ठिक, पण त्यात सलग तीन-चार दिवस राहायला सगळ्यांनाच आवडत नसल्याने त्याचाही विचार नक्की करा. )

  भटकंती साठी संपूर्ण सहल कालावधीत एक चार चाकी वाहन आपल्याबरोबर बाळगणे कधीही श्रेयस्कर! ते हि आधीच ठरवून घेतलेले चांगले. योग्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास अगदी वाजवी दारात एखादी कार तुम्हाला भाड्याने मिळू शकेल. (आम्हाला वलिसन्स हॉटेलचे व्यवस्थापक असलेल्या सज्जाद भाईंनी त्यांची खाजगी कार आणि ड्रायव्हर दिला होता त्यामुळे ती अविश्वसनीयरित्या स्वस्त पडली होती.)

  बाकी श्रीनगरमध्ये मुक्काम करून तुम्ही निवडलेले सोनमर्ग-गुलमर्ग पहाता येतात पण 'गंडोला' सफर करायची असल्यास गुलमर्ग मध्ये आदल्या रात्री मुक्काम करणे श्रेयस्कर. काश्मीरमध्ये इतरत्र तुम्हाला भेटणाऱ्या लोकांपेक्षा सोनमर्ग आणि गुलमर्ग मधले स्थानिक लोक मात्र पक्के बदमाश असतात. ह्या दोनही ठिकाणचे बहुतांश लोकं जुगार खेळतात आणि दारू पितात, इस्लाममध्ये ह्या दोन्ही गोष्टी 'हराम' मानल्या जात असल्याने उर्वरित काश्मिर मधली लोकं त्यांना सरळ 'हरामी' किंवा 'हरामखोर' म्हणत असल्याचा अनुभव तुम्हाला येईलच 😀

  पेहेलगाम मधील निवासासाठी मी सुचवलेले ठिकाण मुख्य वस्तीपासून चार-पाच किलोमीटर लांब असल्याने वाहन सोबत ठेवल्यास उत्तम. अतिशय निसर्गरम्य परिसरात हिमालयाच्या कुशीत वसलेले हे रिसॉर्ट, त्याला लागूनच खळखळ वाहणारी 'लॅडर' नदी, चहू-बाजूंना दिसणारी उत्तुंग पर्वत शिखरे... क्या बात. इथून पाय निघत नसल्याने किमान चार ते पाच दिवस ह्या ठिकाणी मुक्काम करावाच! (बजरंगी भाईजान चित्रपटाचे थोडे शूटिंग ह्याठिकाणी झाले होते). पेहेलगामच्या बाजारपेठेत मिळणारे 'लेंटिल सूप' (Lentil soup) आणि काश्मिरची खासियत'कावा' नक्की प्या!

  वरती उल्लेख केलेल्या एक_वात्रट ह्यांच्या मालिकेत आलेली 'बेताब व्हॅली', 'चंदनवारी' 'मिनी स्वित्झर्लंड' वगैरे ठिकाणे प्रेक्षणीय आहेत ती तर बघाच पण पेहेलगाम पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरचे त्याच अनंतनाग जिल्ह्यातील (वर्षातील बाराही महिने बर्फ बघायला मिळणारे) 'सिंथन टॉप' (Sinthan Top) हे एक न चुकवण्याजोगे ठिकाण पण आवर्जुन बघाच! पेहेलगाम पासुन थोडे लांबवर असल्याने कुठलीही प्रवासी कंपनी त्या ठिकाणी घेऊन जात नाही त्यामुळे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे हे ठिकाण बरेच अप्रिसद्ध राहिले आहे. गाडी रस्त्याने हिमालयातील भरपूर उंची वर असलेल्या ह्या ठिकाणी आपण जात असताना जेव्हा ढग आपल्या खाली दिसू लागतात तेव्हा काश्मीरला पृथीवरचा स्वर्ग का म्हणतात ह्याची प्रचिती येते.

  एकंदरीत धाग्यात दिलेल्या माहिती वरून तुमचे बजेट किमान सव्वा दोन लाख असल्याचे लक्षात येतंय, तेव्हा ह्याच रकमेत स्वतःच नियोजन केल्यास तुमची आठ-नऊ दिवसांची काश्मीर सहल अतिशय सुरेख आणि अविस्मरणीय होऊ शकते ह्याची खात्री बाळगा.
  सहलीचे दिवस वाढवता येणे शक्य असल्यास किंवा वर सुचवलेल्या ठिकाणी बुकिंग केल्यास दोन्ही ठिकाणीचे उपयुक्त फोन नंबर्स शेअर करिन!

  तुमच्या सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍

  ता.क. - काश्मीरमध्ये तुम्हाला तीन विचारसरणीचे लोकं पावलो पावली भेटतील; एक 'भारत' समर्थक, दुसरे 'पाकिस्तान' समर्थक आणि तिसरे 'आजाद काश्मीर' समर्थक. तुमची धारणा कुठलीही असली तरी तिच्या विरोधी मत असणाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालणे टाळा &#128512 तसेच जम्मूमध्ये शे-दोनशे पावलांवर मिळतील पण श्रीनगर मधल्या एका कॉम्प्लेक्स मधली दोन-तीन सरकारी दुकाने सोडली तर संपूर्ण काश्मीरमध्ये कुठेही वाईनशॉप्स नाहीत (शौकीन असल्यास) ह्याची नोंद घ्यावी 😂

  प्रतिसाद ला वाचनखुण ठेवता येत नाहि किती दुर्भाग्य.

  वेगळ्या मार्गाने शक्य आहे.
  उदाहरणार्थ वरचा टर्मिनेटर यांचा प्रतिसाद साठवून ठेवायचा आहे तर
  १)त्याखाली असणाऱ्या 'प्रतिसाद द्या' बटणावरून एक लिंक मिळते ती कॉपी करायची.
  २) आपल्या खात्यात 'व्यक्तिगत संदेश ' उघडून
  'नवीन संदेश लिहा' क्लिक करून आपलेच नाव आइडी निवडा.
  ३)विषय 'काश्मिर सहल टर्मिनेटर यांची माहिती 'वाचनखूण १
  असं लिहून संदेशात ही लिंक टाका आणि संदेश स्वत:लाच पाठवा.
  ४) कधीही वरील 'व्यक्तिगत संदेश ' उघडून
  वाचनखुणा शोधा.

  असा मी असामी's picture

  22 Mar 2023 - 12:15 am | असा मी असामी

  धन्यवाद, नक्की प्रयन्त करतो

  नचिकेत जवखेडकर's picture

  23 Mar 2023 - 7:31 am | नचिकेत जवखेडकर

  एक नंबर!!! तुमचा प्रतिसाद वाचनखूण म्हणून साठवून बघितला. धन्यवाद माहिती बद्दल :)

  चौथा कोनाडा's picture

  22 Mar 2023 - 1:32 pm | चौथा कोनाडा

  टर्मिनेटरपंत ,
  तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
  डिट्टेलवार मार्गदर्शन केले आहे. धागालिंक अ ति श य उपयोगी आहेत.

  चला, आता या सहलीसाठी बजेट बाजूला काढून ठेवणे आले !

  धन्यू वन्स अगेन !

  नजदीककुमार जवळकर's picture

  14 Mar 2023 - 10:23 am | नजदीककुमार जवळकर

  टर्मीनेटर ! नमस्कार !! अगदी मनापासून धन्यवाद. तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला प्लॅन अगदी अनोखा आहे. सर्व ठिकाणांची नोंद घेतली आहे. तुमची प्रतिक्रिया वाचून घरी चर्चा केली आणि खरोखर किमान ९ दिवसांचा प्लॅन करून जायचे असं ठरवतो आहे पण हे सगळे पुढच्या वर्षी करायचा निर्णय घेतला आहे. एक_वात्रट साहेबांची सफर नक्कीच वाचेन !

  एक_वात्रट  साहेबांचेपण  धन्यवाद !!

  सर्व मिपाकरांचे धन्यवाद !! तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया खूपच माहितीपूर्ण आहेत आणि ते मलाच नव्हे तर बरेच जणांना कामी पडतील.

  टर्मीनेटर's picture

  15 Mar 2023 - 12:39 pm | टर्मीनेटर

  स्तुत्य निर्णय!

  घरी चर्चा केली आणि खरोखर किमान ९ दिवसांचा प्लॅन करून जायचे असं ठरवतो आहे पण हे सगळे पुढच्या वर्षी करायचा निर्णय घेतला आहे.

  "Top 5 places to visit before you die..." च्या यादीत अग्रभागी ठेवण्यासारख्या काश्मीरला न्याय देणाऱ्या ह्या निर्णयाचे मनापासून स्वागत 👍

  कुठेतरी जायचे म्हणून किंवा घाई-गडबडीत उरकण्यासारखे हे ठिकाण निश्चितच नाही! त्यामुळे पुढच्या वर्षी गेलात तरी काही हरकत नाही पण काश्मीर नुसते पाहू नका तर ते 'अनुभवा' एवढेच म्हणतो 🙏

  शित्रेउमेश's picture

  15 Mar 2023 - 8:52 am | शित्रेउमेश

  M.YOUSUF KHARI
  KASHMIR KING
  TOUR & TRAVEL
  BATKOOT PAHALGAM192129KASHMIR INDIA
  kashmirkingtourandtravels@yahoo.co.in
  CONTACTS:01936-200036
  09419045637/09797133275

  शित्रेउमेश's picture

  15 Mar 2023 - 8:52 am | शित्रेउमेश

  M.YOUSUF KHARI
  KASHMIR KING
  TOUR & TRAVEL
  BATKOOT PAHALGAM192129KASHMIR INDIA
  kashmirkingtourandtravels@yahoo.co.in
  CONTACTS:01936-200036
  09419045637/09797133275

  नजदीककुमार जवळकर's picture

  20 Mar 2023 - 10:05 am | नजदीककुमार जवळकर

  धन्यवाद उमेश ! माहितीची नोंद घेतली आहे.

  शित्रेउमेश's picture

  15 Mar 2023 - 8:52 am | शित्रेउमेश

  M.YOUSUF KHARI
  KASHMIR KING
  TOUR & TRAVEL
  BATKOOT PAHALGAM192129KASHMIR INDIA
  kashmirkingtourandtravels@yahoo.co.in
  CONTACTS:01936-200036
  09419045637/09797133275

  अपश्चिम's picture

  15 Mar 2023 - 11:34 am | अपश्चिम

  प्रतिसाद वाचुन पुन्हा एकदा सहल करावी असे मनात आले आहे

  चौथा कोनाडा's picture

  22 Mar 2023 - 1:23 pm | चौथा कोनाडा

  अगदी. मला ही

  चला, निघू या ... होऊ दे खर्च !