नमस्कार मंडळी !
पुण्याहून - काश्मीर टूर करायचं ठरत आहे.
प्रवासी : मी,बायको, मुलगी (१३), मुलगा (७)
मार्च शेवटी किंव्हा मे, शक्यतो मार्च
ग्रुप टूर चालेल
वीणा वर्ल्ड फार महाग वाटतं आहे साधारण ५९,०००/- (एकाचे), मुलगा लहान म्हणून ४८,०००
ह्यात विमान - हॉटेल - फिरणे -खाणे सर्व आले. साधारण ६ दिवसाचा टूर
ठिकाणं - श्रीनगर, पेहेलगाम , गुलमर्ग, सोनमर्ग
कृपया मार्गदर्शन करा. बरेच मिपाकर गेले असतील.
काही links, tour operator असतील तर कळवा.
इतरत्र माहिती असेल तर अवश्य कळवा.
भटकंती मध्ये Access Deny येत आहे म्हणून इथे पोस्ट करतोय.
धन्यवाद !
वाचने
25191
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग
स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग करा .... किंवा हिमालयन होम स्टे या फेसबुक ग्रुप वर उत्तम होम स्टे ऑपशन्स आहेत (मी हिमाचल टुर साठी वापरले आहेत.
श्रीनगर पर्यंत फ्लाईटने जाता येते (दिल्ली वरून) .. किंवा जम्मू पर्यंत ट्रेन आणि तिथून पुढे टॅक्सी (जम्मू टॅक्सी स्टॅन्ड वरून सॅन्डर्ड सेवा उपलब्ध)
लोकल ट्रान्सपोर्ट साठी श्रीनगरमधे टॅक्सी सेवा उपलब्ध
श्रीनगर मध्यवर्ती आहे .. सोनमर्ग, गुलमर्ग. पहेलगाम ३ दिशांना आहे ... श्रीनगर मधूनच जावे लागते ...
तुमची आवड / गरज माहित नसल्याने प्रत्यक्ष नावे सांगणे अवघड आहे .. पण शिकारा स्टे मस्त ... तसेच युथ हॉस्टेल हा उत्तम पर्याय आहे
बाकी प्रत्येक ठिकाणी काय पाहायचे हे सर्वांना माहित आहेच
पण काही स्पेकिफिक प्रश्न असतील तर जरूर विचारा
माहिती बद्दल धन्यवाद !
In reply to स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग by अमर विश्वास
माहिती बद्दल धन्यवाद ! हिमालयन होम स्टे या फेसबुक ग्रुप चा उपयोग झाला शिमला/हिमाचल ला गेलो तेव्हा.
नदूर याखनी
In reply to स्वतः ऑनलाईन हॉटेल बुकिंग by अमर विश्वास
नदूर याखनी नावाची कमळ देठाची भाजी
नोंद घेतली आहे.
In reply to नदूर याखनी by चौकस२१२
माहितीसाठी धन्यवाद
केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास
केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास!
ह्या वर काय प्रतिक्रिया
In reply to केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास by टर्मीनेटर
ह्या वर काय प्रतिक्रिया द्यावी ह्याची कल्पना नाही करवत !
त्यामुळे माझा ...पास :)
वर्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे काश्मीर टुरिझम ओफिस आहे
१)त्यांचे पुअर प्लान चेक करा.
२) irctc tour plan rs 21000/-26000
Ex jammu/Srinagar/Chandigarh
https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NCH16
सर धन्यवाद ! IRCTC ची offer
In reply to वर्ड ट्रेड सेंटर मुंबई येथे काश्मीर टुरिझम ओफिस आहे by कंजूस
सर धन्यवाद ! IRCTC ची offer पाहिली विजयवाडा/चंदीगड पासून आहे.
youtube वर review पण आहेत.
बघतोय ..
अएक्सपीडिआ ट्राय करा
एक्सीपीडिआ ट्राय करून बघा. फ्लाईट+ हॅाटेल टाकायचं आणी पुणे ते श्रीनगर .
श्रीनगरवरून डे टूर करायच्या.
कितीचं पॅकेज देतात बघा.
मी नेहमी त्यातूनच बूक करते किंवा ठाण्यात ईशा टूर आहे माझ्या मैत्रीणी त्यांच्याबरोबर जातात.
Expedia आणि ईशा बघतो
In reply to अएक्सपीडिआ ट्राय करा by सरिता बांदेकर
Expedia आणि ईशा बघतो
धन्यवाद !!
अजुन एक पर्याय
मी २०१५ मध्ये गेलो होतो (४ जणांचे कुटुंब)
एक शिकारा बूक केला, त्यानेच तवेरा गाडी ५-६ दिवस फिरायला दिली होती. साधारण ४०,०००/- रुपये (राहणे+रोज चहा/नाश्ता आणि डिनर)
जाताना मुंबई-श्रीनगर थेट विमान आहे(सकाळी ७ वाजता)
येताना दिल्लीहुन कनेक्टिंग विमान घेतले कारण पुण्याला यायचे होते. विमानाचे साधारण १५,०००/- माणशी. पूर्ण खर्च १ लाख. आता वाढला असेल. शॉपिंगचे वेगळे.
शिकारावाल्याचा नंबर आत्ता सापडत नाहीये, मिळाला तर देतो.
धन्यवाद !! राजेंद्र
In reply to अजुन एक पर्याय by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद !! राजेंद्र
काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन
काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन एकटे जाणे जरा रिस्की आहे. परिस्थिती कधीही बदलु शकते त्यामुळे तिथे मदत लागते.
गेल्या वर्षी आम्ही कस्टमाईज टुर बुक केली होती त्याचे डीटेल्स खाली देते.
https://www.facebook.com/khabtravels/
आम्रपाली तापळे(पुणे) - ७०३०४५५८८६
शाहिद वानी(श्रीनगर) -७००६०८७२५०
ही एक लहान कंपनी आहे.त्यांचे ऑफिस काश्मिर मधेच आहे आणि पुण्यातुन सर्व बुकिंग चे काम आम्रपाली बघतात.
आम्हाला हवी तशी आयटेनेरेरी त्यांनी बनवुन दिली. प्रत्येक ठीकाण बघत वणवण फिरायचे नव्हते ते साध्य झाले.
श्रीनगर एअरपोर्ट वर उतरल्यापासुन संपुर्ण काश्मिर फिरवुन परत एअरपोर्ट पर पोचवणे - या काळात एक गाडी आणि ड्रायव्हर्/गाईड आपल्या सोबत सतत असतो.
त्यांचे पेहेलगाम हॉटेल्स, हाउसबोट स्टे सुंदर होते. श्रीनगर मधे लोकल हॉटेल ठीकठाक होते एवढा मुद्दा सोडला तर ट्रीप मस्त ( आणी स्वस्त ) झाली.
विमानासकट गेल्या वर्षी साधारण ४० हजार खर्च आला.
अनुभवातुन आलेल्या काही टिप्स -
-हाउसबोट मधे एक रात्रच रहा. २ दिवस कंटाळा येतो. शिकारा मधुन सतत ये-जा करण्यात वेळ जातो.
-पेहेलगाम ला २ दिवस नक्की रहा. अत्यंत सुंदर ठीकाण.
-श्रीनगर मधे दल रोड वर हॉटेल मिळाले तर चांगले. दल रोड एकदम हॅपनिंग आहे. संध्याकाळी फुटपाथ वर निवांत रमत गमत फिरायला मस्त वाटते.
-शॉपिंग साठी पेहेलगाम सर्वात स्वस्त. सर्व कंपन्या आधी पेहेलगाम ला नेतात आणि पहिल्याच दिवशी कशाला शॉपिंग करायची म्हणुन आपण टाळतो. पण श्रीनगर मधे त्याच वस्तु दुप्पट तिप्पट दरात मिळतात.
-गुलमर्ग ला शक्य असेल तर आदल्या दिवशी रहायला जा आणि गंडोला ची सकाळची पहिली राईड घ्या. जितकं लवकर वर पोचाल तितकं चांगलं. १२ नंतर हवा कधीही बदलते आणि मग गंडोला बंद करतात आणि बर्फ बघायचा चान्स हुकतो.( आमच्या बाबतीत असं झालं ).रहायला जाणं शक्य नसेल तर श्रीनगर हुन लवकरात लवकर पहाटे निघुन ७-७:३० पर्यंत गुलमर्ग ला पोचा. आदला दिवस थोडा निवांत ठेवुन हे जमु शकते.
शुभेच्छा. तुम्हाला चांगले पॅकेज मिळो.
केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास! >> टर्निनेटर दादा, ही कमेंट आवडली नाही. सगळ्यांनाच भरपुर वेळ काढुन फिरणे शक्य नसते. नोकरी किंवा आर्थिक बरीच कारणे असु शकतात. उगीच चिडवल्यासारखी/हिणवल्यासारखी कमेंट लिहायचे काहीच कारण नव्हते.तुमचे प्रवासवर्णन आवर्जुन वाचतो आम्ही आणि अवाडतं पण. तुम्हाला भरपूर वेळ असु शकेल पण हे सगळ्यानांच नाही ना जमत. असो. रहावलं नाही म्हणुन बोलले.
स्मिताजी नमस्कार !उत्तम
In reply to काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन by स्मिता श्रीपाद
स्मिताजी नमस्कार !उत्तम प्रतिसाद !!
ही माहिती खरोखर उपयोगात येणार. दिलेल्या नम्बर वर फोन करतो.
@ स्मिता श्रीपाद
In reply to काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन by स्मिता श्रीपाद
@ स्मिता श्रीपाद
अर्रर्रर्र, आपला काहीतरी गैरसमज होतोय...
मुळात कोणाला चिडवणे/हिणवणे हा माझा स्वभाव नाही, आणि तो प्रतिसाद देण्यामागे तसा काही हेतू वा उद्देशही नव्हता. धागाकर्त्याने दिलेल्या माहिती वरून त्यांचे बजेट व्यवस्थित असल्याचे लक्षात आले होते पण इतके पैसे खर्चून धावत-पळत भोज्या केल्यासारखे हे पृथ्वीवरील नंदनवन पाहणे हि गोष्ट खरंच खटकली होती त्यामुळे तेव्हा घाईत तसा प्रतिसाद दिला गेला होता (आज सवडीने सविस्तर प्रतिसाद दिला आहे 😀).
अहो पण बरं झालं बोललात ते, त्यामुळे त्रोटक पद्धतीने दिलेल्या प्रतिसादातून असे गैरसमज निर्माण होऊ शकतात हे माझ्या लक्षात आले आणि त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ टर्मीनेटर दादा,
In reply to @ स्मिता श्रीपाद by टर्मीनेटर
@ टर्मीनेटर दादा,
माझी कमेंट इतकी मस्त पॉझिटिव्हली घेतली आणि न रागवता रीप्लाय केलात त्याबद्दल धन्यवाद.
तुमचा सविस्तर प्रतिसाद वाचला आणि त्या वाक्यामागची सगळी थॉट प्रोसेस कळली.
मस्त प्रतिसाद दिला आहे.
गेल्या वर्षी ७ दिवस काश्मिर फिरुन आलो. वेळेअभावी काही गोष्टी सुटल्या. पण तुमचा प्रतिसाद डोळ्यासमोर ठेवुन परत नक्कीच जाणार :-)
काश्मिर मधे ९-१० दिवस पण कमीच.
खरतर काश्मिर चे जे तीन सिझन समजले जातात, हिरवा ( मे जुन मधे उन्हाळ्यात ), लाल-केशरी ( सप्टेंबर-ऑक्टोबर मधे जेव्हा सफरचंद सिझन असतो आणि झाडांची पानगळ असते) आणि पांढरा ( डीसेंबर-जान बर्फ ) या तीनही सिझन मधे ८-९ दिवस निवांत काश्मिर बघायला जायला हवे.
हा हा हा...
In reply to @ टर्मीनेटर दादा, by स्मिता श्रीपाद
माझा ब्लड ग्रुप तेवढा b rh negative आहे, बाकि negativity ला माझ्या विचारांत आणि व्यवहारांत कुठेही स्थान नाही 😀
जरूर जाऊन या... सुदैवाने चार काश्मीर भेटींत माझे तीनही सिझन पाहून झाले आहेत. काश्मीरचा निसर्ग खरोखर अद्भुत आहे!
काश्मिरी गुलाब हवे आहेत.
In reply to हा हा हा... by टर्मीनेटर
त्यांचे कटिंग आणून लावणे ही इच्छा आहे.
काश्मीर परिस्थिती
काश्मिर मधे स्वतः बुकिंग करुन एकटे जाणे जरा रिस्की आहे. परिस्थिती कधीही बदलु शकते त्यामुळे तिथे मदत लागते.
मग irctc tourवर भरवसा ठेवावा लागेल.
( रीफंड/cancellation नियम जाणून घ्या.)
अगदी सहमत !
In reply to काश्मीर परिस्थिती by कंजूस
अगदी सहमत !
Refund चे नियम बघतो
कश्मीर टूर आम्ही एका प्रसिद्ध
कश्मीर टूर आम्ही एका प्रसिद्ध टूर कंपनी तर्फे धावाधावा पळापळा अशी केली ज्यची आम्हाला आवडसवड व माहिती नव्हती मला तरी. यपूर्वी आम्ही स्वतंत्र रित्या सर्व भारतभर स्वतःच्या रिस्क टूर्स केलेल्या होत्या त्यामुळे मला हा अनुभव अजिबात आवडला नही पण कश्मीरला एकटे जाणेही तेव्हढेच risky आहे. टूर कंपनी तर्फे स्वतःचा प्रोग्ॅम आखून कुणी escort कम माहितगार गाईड घेऊन जावे .अरथात तुम्हाला घाईघाईचा प्रवास पळापळ चालतअसेल तर कंपनी तर्फेजाणे छान डोक्याला कसलाही सामान वहाणे , संभाळणे साईटसिईंगला शोधाशोध , स्वतःची जबाबदारी घेणे transefers स्वताः शोधत करणे, हेसर्व वाचते वकश्मीर रिस्की वाटते, संपूरण मुसलमान राज्य व पाकिस्तान जवळ, कधीही दंगली होऊ शकतात
कंपनी तर्फे जेवणावळी,
कंपनी तर्फे जेवणावळी, नाश्त्यालाही मेजवानीचा थाट व यानेच impression छान करणे ( त्यांच्यामते) या गोष्टी प्रत्येकाच्या आवडी सवयींवर अवलंबून आहेत आम्हाला असले अजिबात चालत नाही . सकाळी भरपेट नाश्ता , जेवणात दुपारी वेळ न घालवता जवळचे लाडू, चिवडा बिस्कीटे खात भरपूर म्हणजे माझ्यामते फिरणे धावपळ न करता (कारण आमच्या मुंबईच्या लांब प्रवासात नोकरीसाठी करताना पळापळ , धावणे नाॅनस्टाॅप काम ११/११ तास करणे(घरकाम व आॅफिसकाम , लहान मुलीचे सर्वच करणे , ती मोठी झाल्यावर कमी झाले.)मुळे आम्ही टूर्स घाईच्या न ठेवता सावकाश , थोडे कमी साईटसिईंग विस्रांती वआवडेल तेथे परत जाणे ,( म्हैसूर राजवाडा व म्युुुुझियम दोनदा पाहिले कारण आम्ही तरूण व पहिली टूर होती ) पहिल्याची नवलाई भारीच.
धन्यवाद !! सहमत !
In reply to कंपनी तर्फे जेवणावळी, by nutanm
धन्यवाद !! सहमत !
अ
आपण पुण्यालाकायम रहात असल्यामुळे थंडीची सवय व गरम कपडे असतीलच पण जास्त गरम शक्यतो थर्मल वेअर व हातमोजे पायमोजे 2/3 जोड कंपल्सरी वआतंरवस्तंरांचे डबल दिवसांचे 12/13 जोड कंपलसरी नेणे. म्हणजे धूत बसणे नको सकाळी व संध्याकाळी वेळ वाचून सकाळी लौकर तयार होऊन जास्त साईटसिइंग करता येते व लौकर परतता येते कुठेही अनोळखी ठिकाणी व कश्मीर सारख्या तर आवर्जून लौकर येणे चांगले. बाहेरगावी उशीरापर्यत फिरूच नये. हाॅटेलच्या जवळपास गर्दी सेफ शहर मुंबई,, पुणे बेगलोर थोडीच ऊशीरा येण्यास बरी. कश्मीर
तर रिस्कीच. खूप थंडी आम्हाला मुुंबईच्यांना अजिबात सवय नाही मला तर दुसर्या दिवसापासून ताप येणे अती गारव्यामुळे भयंकर थंडी वाजून शौचाला आखडून व मेजवान्यांमुळे bloodsugar वाढली व मी गोळ्या थंडीताप व शुगरच्या गोळ्या नेल्या असून विसरल्यामुळे न घेऊन शुगर वाढून जास्तच सर्दी व बारीक तापाला तोंड द्यावे लागले. सर्व औषधे वेळेवर वरोज घेण्याची पथ्ये व खाण्याची बर्यापैकी पाळणे वयानुसार अत्यावश्यक.
उत्तराखंड आणि हिमाचलला
In reply to अ by nutanm
उत्तराखंड आणि हिमाचलला पहाडांवर बरेचदा गेलो आहे.
माहितीसाठी ..धन्यवाद !!
मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर
मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर आहे.
पवईहुन्/कांजुरहुन जाता येईल
In reply to मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर by शानबा५१२
https://mumbaitourism.travel/chhota-kashmir-mumbai
Permanently closed
In reply to पवईहुन्/कांजुरहुन जाता येईल by राजेंद्र मेहेंदळे
गुगल बाबा Permanently closed असे सान्गत आहे
पण गोरेगावचा मित्र सांगतो चालू आहे.
In reply to Permanently closed by कपिलमुनी
गोरेगाव स्टे पूर्व येथून ३४१,३४२,४५१,४५२ चार बसेस तिथून ( आरे पोलीस स्टे./छोटा काश्मीर स्टॉपचे नाव सातवा स्टॉप)जातात.
तिथे मेट्रो कार शेड बांधत नाहीत.
मुंबईतले गोरेगाव मधले छोटा
In reply to मुंबईला कुठेतरी छोटा काश्मिर by शानबा५१२
मुंबईतले गोरेगाव मधले छोटा काश्मिर छान आहे
छोटा काश्मीर माहिती बद्दल
छोटा काश्मीर माहिती बद्दल धन्यवाद !
रिस्की काश्मीर टुर...
आता परिस्थिती बदलली आहे. संसाधने व इन्फ्रास्ट्रक्चर खुपच बदलले आहे. स्वतः प्लॅन करून जाउ शकतो. नैसर्गिक सौंदर्य एवढे आहे की दिल्ली बारामुल्ला रेल्वेने गेलात तरी डोळ्याचे पारणे फिटले.
प्रवासी कंपनी बरोबर पण ठिक आहे कारण फक्त मौजमजा एवढाच उद्देश असतो. तसेही संपुर्ण काश्मीर सहा दिवसात बघणे शक्य नसल्याने नेमक्या,प्रसिद्ध ठिकाणे बघून येणे सोईस्कर वाटते.
ट्रिप साठी शुभेच्छा.
स्वतः प्लॅन करून जाउ शकतो
In reply to रिस्की काश्मीर टुर... by कर्नलतपस्वी
मी कधी गेलोच तर स्वतःच जाईन. मला ग्रूप नकोच असतो. प्रायव्हसी राहातं नाही आणि फुकटच्या चर्चा होतात. जे घडत जाईल त्यास सामोरे जाणे आवडते. काश्मिरातल्या तीन सीजन्सपैकी ( १मार्च फुलांचा,२सप्टेंबर फळांचा,३ डिसेंबर बर्फाचा) क्र २ आवडेल. फुलं आणि बागा नंतर विचार करेन. बर्फ कुठेच नको.
१
आपण पुण्याहुन काश्मीर टुर करत आहात, आपलाल्या शुभेच्छा, पण एक सुचवू इच्छीतो, आपण प्रवासाची ठरवलेली वेळ ( मार्च महिना ) व प्रवास नियोजनाची वेळ यामध्ये फार कमी कालावधी आहे. हे थोडे पटत नाहि.
प्रवासासाठी शुभेच्छा टुर केल्यावर प्रवास अनुभव येथे नोंदवावा
वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते <strong>"केवळ ६ दिवसांची
वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते "केवळ ६ दिवसांची काश्मिर टूर ही कल्पनाच सहन होत नसल्याने माझा पास!" ते उपहास, उपरोध किंवा खोचकपणे लिहिलेले नसून मनापासून लिहिले आहे.
पृथ्वीवरचा स्वर्ग/नंदनवन म्हंटलया जाणाऱ्या काश्मीर मधील काही निवडक आणि प्रसिद्ध अशी ठिकाणे धावत-पळत सहा दिवसांत पाहून होतील पण 'काश्मीर' अनुभवता येणार नाही असे माझे व्यक्तिगत मत!
सर्वप्रथम मी तुम्हाला एक_वात्रट साहेबांनी मिपावर लिहिलेली (वाचली नसल्यास) 'ये कश्मीर है' हि नऊ भागांची लेखमालिका अवश्य वाचावी असे सुचविन.
त्यांनी श्रीनगर - सोनमर्ग - गुलमर्ग - पेहेलगाम - श्रीनगर अशी सहल केली होती. (त्यांची हि मालिका सुरु होती त्या वेळी अनेक वर्षांनी मी चौदा दिवसांच्या जम्मू-काश्मीर सहलीवर होतो, त्यामुळे हि मालिका माझ्या खूप उशिराने वाचनात आली होती. आणि सदर सचित्र मालिका त्यांनी अतिशय छान प्रकारे लिहिलेली असल्याने पुन्हा काश्मीरवर लिहिण्याचा मोह मी टाळला होता 😀)
असो, तुम्हाला एक विनंती करावीशी वाटते कि सहलीचे किमान तीन दिवस तरी वाढवता आले तर बघा, तुमची हि कौटुंबिक काश्मीर सहल अविस्मरणीय अशी होईल.
बाकी वरती काहींनी म्हंटल्या प्रमाणे स्वतःच ट्रिपचे नियोजन करा. विमानाची तिकिटे (आधी स्कायस्कॅनर वर तुलना करून) 'मेक माय ट्रिप', 'गोआयबीबो' किंवा तुमच्या पसंतीच्या कुठल्याही तत्सम वेब साईट/ ऍप वरून बुक करा.
विमानप्रवासा प्रमाणेच हॉटेलचे बुकिंगही वरील प्रमाणे स्वतःच करा. त्यासाठी मी तुम्हाला श्रीनगर मधले 'वलिसन्स हॉटेल' (Walisons Hotel) आणि पेहेलगाम मध्ये त्यांचेच ' द पीस रिसॉर्ट - वलिसन्स' (The Peace Resort - Walisons) ह्या दोन ठिकाणांची शिफारस करतो.
(हाऊसबोटमधले वास्तव्य एखाद दिवस एक वेगळा अनुभव म्हणून ठिक, पण त्यात सलग तीन-चार दिवस राहायला सगळ्यांनाच आवडत नसल्याने त्याचाही विचार नक्की करा. )
भटकंती साठी संपूर्ण सहल कालावधीत एक चार चाकी वाहन आपल्याबरोबर बाळगणे कधीही श्रेयस्कर! ते हि आधीच ठरवून घेतलेले चांगले. योग्य व्यक्तीच्या संपर्कात आल्यास अगदी वाजवी दारात एखादी कार तुम्हाला भाड्याने मिळू शकेल. (आम्हाला वलिसन्स हॉटेलचे व्यवस्थापक असलेल्या सज्जाद भाईंनी त्यांची खाजगी कार आणि ड्रायव्हर दिला होता त्यामुळे ती अविश्वसनीयरित्या स्वस्त पडली होती.)
बाकी श्रीनगरमध्ये मुक्काम करून तुम्ही निवडलेले सोनमर्ग-गुलमर्ग पहाता येतात पण 'गंडोला' सफर करायची असल्यास गुलमर्ग मध्ये आदल्या रात्री मुक्काम करणे श्रेयस्कर. काश्मीरमध्ये इतरत्र तुम्हाला भेटणाऱ्या लोकांपेक्षा सोनमर्ग आणि गुलमर्ग मधले स्थानिक लोक मात्र पक्के बदमाश असतात. ह्या दोनही ठिकाणचे बहुतांश लोकं जुगार खेळतात आणि दारू पितात, इस्लाममध्ये ह्या दोन्ही गोष्टी 'हराम' मानल्या जात असल्याने उर्वरित काश्मिर मधली लोकं त्यांना सरळ 'हरामी' किंवा 'हरामखोर' म्हणत असल्याचा अनुभव तुम्हाला येईलच 😀
पेहेलगाम मधील निवासासाठी मी सुचवलेले ठिकाण मुख्य वस्तीपासून चार-पाच किलोमीटर लांब असल्याने वाहन सोबत ठेवल्यास उत्तम. अतिशय निसर्गरम्य परिसरात हिमालयाच्या कुशीत वसलेले हे रिसॉर्ट, त्याला लागूनच खळखळ वाहणारी 'लॅडर' नदी, चहू-बाजूंना दिसणारी उत्तुंग पर्वत शिखरे... क्या बात. इथून पाय निघत नसल्याने किमान चार ते पाच दिवस ह्या ठिकाणी मुक्काम करावाच! (बजरंगी भाईजान चित्रपटाचे थोडे शूटिंग ह्याठिकाणी झाले होते). पेहेलगामच्या बाजारपेठेत मिळणारे 'लेंटिल सूप' (Lentil soup) आणि काश्मिरची खासियत'कावा' नक्की प्या!
वरती उल्लेख केलेल्या एक_वात्रट ह्यांच्या मालिकेत आलेली 'बेताब व्हॅली', 'चंदनवारी' 'मिनी स्वित्झर्लंड' वगैरे ठिकाणे प्रेक्षणीय आहेत ती तर बघाच पण पेहेलगाम पासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावरचे त्याच अनंतनाग जिल्ह्यातील (वर्षातील बाराही महिने बर्फ बघायला मिळणारे) 'सिंथन टॉप' (Sinthan Top) हे एक न चुकवण्याजोगे ठिकाण पण आवर्जुन बघाच! पेहेलगाम पासुन थोडे लांबवर असल्याने कुठलीही प्रवासी कंपनी त्या ठिकाणी घेऊन जात नाही त्यामुळे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असे हे ठिकाण बरेच अप्रिसद्ध राहिले आहे. गाडी रस्त्याने हिमालयातील भरपूर उंची वर असलेल्या ह्या ठिकाणी आपण जात असताना जेव्हा ढग आपल्या खाली दिसू लागतात तेव्हा काश्मीरला पृथीवरचा स्वर्ग का म्हणतात ह्याची प्रचिती येते.
एकंदरीत धाग्यात दिलेल्या माहिती वरून तुमचे बजेट किमान सव्वा दोन लाख असल्याचे लक्षात येतंय, तेव्हा ह्याच रकमेत स्वतःच नियोजन केल्यास तुमची आठ-नऊ दिवसांची काश्मीर सहल अतिशय सुरेख आणि अविस्मरणीय होऊ शकते ह्याची खात्री बाळगा.
सहलीचे दिवस वाढवता येणे शक्य असल्यास किंवा वर सुचवलेल्या ठिकाणी बुकिंग केल्यास दोन्ही ठिकाणीचे उपयुक्त फोन नंबर्स शेअर करिन!
तुमच्या सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍
ता.क. - काश्मीरमध्ये तुम्हाला तीन विचारसरणीचे लोकं पावलो पावली भेटतील; एक 'भारत' समर्थक, दुसरे 'पाकिस्तान' समर्थक आणि तिसरे 'आजाद काश्मीर' समर्थक. तुमची धारणा कुठलीही असली तरी तिच्या विरोधी मत असणाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालणे टाळा 😀 तसेच जम्मूमध्ये शे-दोनशे पावलांवर मिळतील पण श्रीनगर मधल्या एका कॉम्प्लेक्स मधली दोन-तीन सरकारी दुकाने सोडली तर संपूर्ण काश्मीरमध्ये कुठेही वाईनशॉप्स नाहीत (शौकीन असल्यास) ह्याची नोंद घ्यावी 😂
प्रतिसाद ला वाचनखुण ठेवता येत नाहि किती दुर्भाग्य
In reply to वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते <strong>"केवळ ६ दिवसांची by टर्मीनेटर
प्रतिसाद ला वाचनखुण ठेवता येत नाहि किती दुर्भाग्य.
प्रतिसादाला वाचनखूण कशी ठेवायची. सोपी पद्धत
In reply to प्रतिसाद ला वाचनखुण ठेवता येत नाहि किती दुर्भाग्य by असा मी असामी
वेगळ्या मार्गाने शक्य आहे.
उदाहरणार्थ वरचा टर्मिनेटर यांचा प्रतिसाद साठवून ठेवायचा आहे तर
१)त्याखाली असणाऱ्या 'प्रतिसाद द्या' बटणावरून एक लिंक मिळते ती कॉपी करायची.
२) आपल्या खात्यात 'व्यक्तिगत संदेश ' उघडून
'नवीन संदेश लिहा' क्लिक करून आपलेच नाव आइडी निवडा.
३)विषय 'काश्मिर सहल टर्मिनेटर यांची माहिती 'वाचनखूण १
असं लिहून संदेशात ही लिंक टाका आणि संदेश स्वत:लाच पाठवा.
४) कधीही वरील 'व्यक्तिगत संदेश ' उघडून
वाचनखुणा शोधा.
धन्यवाद
In reply to प्रतिसादाला वाचनखूण कशी ठेवायची. सोपी पद्धत by कंजूस
धन्यवाद, नक्की प्रयन्त करतो
एक नंबर!!! तुमचा प्रतिसाद
In reply to प्रतिसादाला वाचनखूण कशी ठेवायची. सोपी पद्धत by कंजूस
एक नंबर!!! तुमचा प्रतिसाद वाचनखूण म्हणून साठवून बघितला. धन्यवाद माहिती बद्दल :)
टर्मिनेटरपंत ,
In reply to वरच्या प्रतिसादात मी लिहिले होते <strong>"केवळ ६ दिवसांची by टर्मीनेटर
टर्मिनेटरपंत ,
तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
डिट्टेलवार मार्गदर्शन केले आहे. धागालिंक अ ति श य उपयोगी आहेत.
चला, आता या सहलीसाठी बजेट बाजूला काढून ठेवणे आले !
धन्यू वन्स अगेन !
टर्मीनेटर ! नमस्कार !! अगदी
टर्मीनेटर ! नमस्कार !! अगदी मनापासून धन्यवाद. तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला प्लॅन अगदी अनोखा आहे. सर्व ठिकाणांची नोंद घेतली आहे. तुमची प्रतिक्रिया वाचून घरी चर्चा केली आणि खरोखर किमान ९ दिवसांचा प्लॅन करून जायचे असं ठरवतो आहे पण हे सगळे पुढच्या वर्षी करायचा निर्णय घेतला आहे. एक_वात्रट साहेबांची सफर नक्कीच वाचेन !
एक_वात्रट साहेबांचेपण धन्यवाद !!
सर्व मिपाकरांचे धन्यवाद !! तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रिया खूपच माहितीपूर्ण आहेत आणि ते मलाच नव्हे तर बरेच जणांना कामी पडतील.
स्तुत्य निर्णय!
In reply to टर्मीनेटर ! नमस्कार !! अगदी by नजदीककुमार जवळकर
स्तुत्य निर्णय!
"Top 5 places to visit before you die..." च्या यादीत अग्रभागी ठेवण्यासारख्या काश्मीरला न्याय देणाऱ्या ह्या निर्णयाचे मनापासून स्वागत 👍
कुठेतरी जायचे म्हणून किंवा घाई-गडबडीत उरकण्यासारखे हे ठिकाण निश्चितच नाही! त्यामुळे पुढच्या वर्षी गेलात तरी काही हरकत नाही पण काश्मीर नुसते पाहू नका तर ते 'अनुभवा' एवढेच म्हणतो 🙏
M.YOUSUF KHARI
M.YOUSUF KHARI
KASHMIR KING
TOUR & TRAVEL
BATKOOT PAHALGAM192129KASHMIR INDIA
kashmirkingtourandtravels@yahoo.co.in
CONTACTS:01936-200036
09419045637/09797133275
M.YOUSUF KHARI
M.YOUSUF KHARI
KASHMIR KING
TOUR & TRAVEL
BATKOOT PAHALGAM192129KASHMIR INDIA
kashmirkingtourandtravels@yahoo.co.in
CONTACTS:01936-200036
09419045637/09797133275
धन्यवाद उमेश ! माहितीची नोंद
In reply to M.YOUSUF KHARI by शित्रेउमेश
धन्यवाद उमेश ! माहितीची नोंद घेतली आहे.
M.YOUSUF KHARI
M.YOUSUF KHARI
KASHMIR KING
TOUR & TRAVEL
BATKOOT PAHALGAM192129KASHMIR INDIA
kashmirkingtourandtravels@yahoo.co.in
CONTACTS:01936-200036
09419045637/09797133275
पुन्हा कश्मिर ला जावे ....
प्रतिसाद वाचुन पुन्हा एकदा सहल करावी असे मनात आले आहे
अगदी. मला ही
In reply to पुन्हा कश्मिर ला जावे .... by अपश्चिम
अगदी. मला ही
चला, निघू या ... होऊ दे खर्च !
माहिती हवी आहे
येत्या सात सप्टेंबर ते 15 सप्टेंबर असा आठ रात्री नऊ दिवसांचा कार्यक्रम ठरवून काश्मीरला सहकुटुंब जात आहोत. श्रीनगरला राहणार आहोत व पहलगामला दोन दिवस मुक्काम असणार आहे.श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, कोकरनाग, दक्सुम ,सिंथन टॉप ही ठिकाणे कव्हर करणार आहे. आम्ही शुद्ध शाकाहारी असल्यामुळे काश्मीरमध्ये आवर्जून काय खावे याबद्दल कोणाचे काही अनुभव,विशिष्ट पदार्थ आणि ती मिळणारी ठिकाणे याबाबतीत काही माहिती असल्यास जरूर शेअर करा. तसेच खरेदी करण्याबाबत काही सूचना असेल तर जरूर करा.
शुद्ध शाकाहारी जेवण
In reply to माहिती हवी आहे by श्वेता२४
आम्ही २०१२ मधे काश्मिरची सहल केली होती. तेव्हा श्रीनगर, सोनमर्ग व गुलमर्गला भेट दिली होती. जागोजाग आम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण सहजपणे मिळाले.
दल सरोवराच्या हाऊसबोट्स असणार्या किनार्यावरची बरीच उपहारगृहे शुद्ध शाकाहारी आहेत. बहुधा अनेक लोक वैष्णव देवी व काश्मिर सहल एकत्र करतात अन त्या दरम्यान ते शाकाहार पाळतात. या कारणाने शुद्ध शाकाहारी उपहारगृहांची व वैष्णव ढाब्यांची संख्या काश्मिरमधे भरपूर आहे.
सोनमर्ग - गुलमर्ग - पेहेलगाम
सोनमर्ग - गुलमर्ग - पेहेलगाम -ही हिम पाहण्याची ठिकाणे गाळून पुढे कधी सहल करण्याचा विचार आहे. बर्फ आवडत नाही.
दाल लेक फार सुंदर आहे वगैरे मला काही पटलेले नाही. ( राजा पाटील यांच्या पुस्तकातून आणि इतर विडिओ पाहून बनलेले मत.)
जम्मू ते श्रीनगर रेल्वे सुरू झाल्यावर एक प्रवास रेल्वेने करेन. (कोरोना काळातील तीन वर्षे वाया गेल्याने रेल्वेचाचे आयोजन बारगळले.)
आम्हालाही थंडी सहन होत नाही
त्यामुळे अगदी थंडीचा काळ सोडून साधारण उन्हाळ्याचा गणला जाणारा ,भरपूर सफरचंद असणारा सप्टेंबर महिना सहलीसाठी निवडला . या काळात सगळ्यांनाच सुट्टी असते. एरवी बर्फाच्या चादरी मध्ये लपवून गेलेले सृष्टी सौंदर्य या काळात ठळकपणे समोर येते अशी माहिती घेतली आहे. त्यामुळे भरभरून निसर्ग सौंदर्य दिसेल अशी अपेक्षा आहे. सोनमर्ग येथे झोझीरला पास, झिरो पॉईंट, वाॅर मेमोरियल बघण्याचे नियोजित आहे . गुलमर्ग येथे गंडोला ची सफर हेच एक मोठे आकर्षण आहे. त्यामुळे तिथे जाणे होईलच .मुलासाठी आणि आम्हा सर्वांसाठी एक मोठे आकर्षण आहे .त्यामुळे गुलमार्गचा समावेश केला आहे .शिवाय गुलमर्ग येथे राजा हरिसिंग यांचा राजवाडा देखील आहे तो देखील पाहणार आहोत .स्थलादर्शनाबद्दल थोडीशी माहिती घेऊन झाली आहे. परंतु काश्मीर येथे प्राधान्याने मांसाहार केला जात असल्यामुळे तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थ जसे की कमळाच्या देठाचे नदृ भाजी, वॉलनट केक ,दम आलू असे काही पदार्थ कळले आहेत. अजून काही पदार्थ असतील तर कृपया जाणकारांनी माहिती द्यावी
आम्ही याच वर्षी मार्च एन्ण्ड
आम्ही याच वर्षी मार्च एन्ण्ड ते अप्रिल पैला आठवडा आम्ही उभयतां असे ग्रुप सहली बरोबर गेलो होतो. वयोगट ४५+
पैल्यांदाच काश्मिर पाहिले.. बर्फांची सोनमर्ग - गुलमर्ग ही स्थळे आणि निसर्गरम्य पेहेलगाम सहल डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली
(पेहेलगाम आम्ही या हॉटेल मध्ये राहिलो होतो : https://www.facebook.com/reel/769934328251977 या हॉटेलची सर्व माहिती आंजावर आहे... आम्ही टुर कंपनी तर्फे गेल्याने कुठे दरांची चौकशी करत बसलो नाही .. कारण तेवढा वेळच नव्हता) जेवण सगळी कडे व्हेजच.. नॉनव्हेज पर्याय सुद्धा होता अर्थात हे सर्व पॅकेज समाविष्ट असल्याने कुठेही मेनु कार्ड आणि दर बघत बसलो नाही... कुठल्या वेगळ्या काश्मिरी डिशचा आस्वाद घेतल्याचे आठवत नाही) एकंदरीत जेवण आणि इ त र सोयी चांगल्या वाटल्या)
बाकी हाउसबोट मधील मुक्काम फारसा पसंत पडला नाही .. पण तिथेच रहायला असल्यामुळे सकाळी सकाळी लवकर गर्दी व्ह्यायच्या आत लेक मध्ये शिकार्यातुन फेरफटका मारताना मजा आली)
लिहिताना 3 वेळा प्रतिसाद
लिहिताना 3 वेळा प्रतिसाद उडालयामुळे आता कंटाळा आलाय लिहायचा मोबाईलवर हलतो वप्रतिसाद ऊडतो किंवा हलला नाही तरी उडतोय आता बास करतेय
अर्र .. सो सॅड !
In reply to लिहिताना 3 वेळा प्रतिसाद by nutanm
अर्र .. सो सॅड !
नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली
सप्टेंबर महिन्यात गणपतीच्या सुट्टीमध्ये आम्ही काश्मीर टूर ला गेलो होतो. सहलीचे नियोजन जरी दरवेळी मी स्वतः करत असले तरी अनेक ट्रॅव्हल कंपन्यांच्या कडून कोटेशन घेतले होते. तसेच स्वतः नियोजन केले तर काय होईल हेही पाहत होते. मला त्यावेळी क्वेरा या साइटवरून ट्रॅव्हलिंग फॉक्स या ट्रॅव्हल एजन्सीचा संदर्भ मिळाला. या कंपनीचे इमाद भाई यांनी मला तेवढ्याच कमी बजेटमध्ये थ्री स्टार दर्जाचे हॉटेल व गाडी दिली व माझ्या गरजेप्रमाणे ट्रॅव्हलिंग प्लान आखून दिला. त्यांनी दिलेले कोटेशन हे अन्य कोणत्याही एजन्सी पेक्षा सर्वात कमी होते. एकंदरीतच सर्व सोय उत्तम झाली. त्यांनी दिलेले पहलगाम चे हॉटेल निर्वाणा रिसॉर्ट हे लीडर नदीकाठीच होते. इमाद भाई प्रत्येक संध्याकाळी आजचा दिवस कसा गेला व उद्या काय काय करायचे आहे या संदर्भात रोज फोन करून फॉलोअप घेत होते हे विशेष! त्यांचा फोन नंबर देत आहे-
+91 96826 20640 - इमाद भाई
https://www.travellingfolks.com/
https://www.travellingfolks.in/
आणि वाट पाहत आहे
In reply to नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली by श्वेता२४
तुमच्या केरळ टूर प्रमाणेच, ही टूर पण छानच झाली असणार ... प्रवासवर्णनची वाट पाहत आहे
या लेखाची वाट पाहात आहे.
In reply to नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली by श्वेता२४
या लेखाची वाट पाहात आहे.
सात ते १४ सप्टेंबर (२०२४) तमिळनाडू ट्रीपवरून आल्यावर सहजच विमान तिकिटे बुकिंगची माहिती देणारे काही विडीओ पाहिले. कसे केव्हा करावे इत्यादी. धृव राठीच्या सूचनेप्रमाणे शेवटी शेवटी जागा रिकाम्या राहिल्यास तिकीटे स्वस्त करतात हे पटले. २० ते २५ सप्टेंबरमध्ये तपासले तर २५ ते ३० सप्टेंबरची मुंबई श्रीनगर डायरेक्ट फ्लाइट्स रु आठ हजार रिटर्न दाखवत होती. वन वेळ चार हजार.निवडणुक मतदानामुळेही असेल.
मी पण तेच म्हणतो...
In reply to नुकतीच काश्मीर टूर संपन्न झाली by श्वेता२४
खरंतर जेव्हापासून हा धागा वाचतोय तेव्हापासून काश्मीर ला जाण्याची ईच्छा अजून प्रबळ झाली.
तुम्ही दिलेल्या माहितीवरून travelling folks ला सपंर्क केला आणि ईमादभाईंनी खूप चांगला Package दिलं त्यात गुरेझ व्हॅली पण होती.
सहल उत्तम झाली. आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद..
अरे वाह....
In reply to मी पण तेच म्हणतो... by नपा
आपली सहल उत्तम झाली हे वाचून आनंद झाला. गुरेझ व्हॅलीचा अनुभव कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल.
@संग्राम व @ कंजूसजी
टूर अप्रतिम झाली. भरपूर स्थलदर्शन झाले. कारण उन्हाळा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणापर्यंत पोहोचता आले. जे एरवी बर्फात शक्य नसते. तसेच सर्व ट्रीप अगदी बजेटमध्ये पार पडली ज्यांना बर्फ आवडत नाही त्यांच्याकरता या मोसमात जावे किंवा न जावे याबाबत निर्णय घेता यावा म्हणून लेखमाला लिहावी असा विचार करत आहे. थोडा वेळ लागेल. परंतु लेखमाला लिहावी असा विचार करत आहे.