भारताच्या तुलनेत

उपयोजक's picture
उपयोजक in काथ्याकूट
29 Dec 2022 - 9:03 pm
गाभा: 

मित्रहो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही एक गोष्ट वाचली , पाहिली असेल की भारतातून बरेचसे लोक अमेरिका , ब्रिटन , ऑस्ट्रेलिया या आणि अशाच भारताच्या तुलनेत श्रीमंत किंवा अधिक चांगल्या सुविधा असणार्‍या देशांमधे स्थलांतरीत होत आहेत. ही संख्या कमी न होता दरवर्षी वाढतच आहे. शक्यतो या देशांमधे कायमचं कसं राहता येईल यासाठी केली जाणारी धडपड लक्षणीय आहे.
हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का? हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का? गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे? केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का? ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून? अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?

मला परदेशाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. केवळ , वाचन , ऐकीव , इंटरनेट , टिव्ही यातून समजलं तितकंच. त्यामुळे या देशांमधे दीर्घकाळ राहणार्‍या , कामानिमित्त काही काळ राहिलेल्या लोकांकडून प्रतिसादाच्या अपेक्षेत. _/\_

प्रतिक्रिया

श्रीराम बिडीकर's picture

3 Jan 2023 - 1:50 am | श्रीराम बिडीकर

तुम्ही हाच प्रश्न Quora.com वर विचारा.. ढिगाने उत्तरं मिळतील.

१)भारतातील सुस्तपणा. एखादी गोष्ट चोख व्हावी याचा आग्रह नसतो. कोणत्याही चांगल्या गोष्टीला एक गुप्तपणे/उघड राजकीय विरोध असतो.

२)गुंतवणूकदार आणि तज्ज्ञ यांची सांगड घातली जात नाही. विद्यालये, महाविद्यालये इथे तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ तयार होतात. पण त्याची गती मंद आहे किंवा आव्हानं स्विकारण्यात वेळ घालवतात. मग तज्ज्ञ लोक ठामपणे उद्योगांना आपल्या इथे बनवलेले शोधलेले तंत्रज्ञान देण्यात मागे पडतात.

३)वचनाला जागणे याचा अभाव.

या तीन गोष्टी प्रगतीला मारक आहेत.

३)वचनाला जागणे याचा अभाव.
>> +१

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2023 - 8:23 am | श्रीगुरुजी

इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2023 - 8:23 am | श्रीगुरुजी

इतर राज्यांची फारशी माहिती नाही. परंतु ज्या राज्यात अजूनही जनतेसाठी काही करण्याऐवजी कोणाचा तरी अपमान, कोणाची तरी बदनामी, शेकडोंची जयंती/पुण्यतिथी, जातीयवाद याचा अतिरेक झाला आहे, त्या राज्यातील शहाणे जन अन्यत्र स्थलांतरित होणारच.

नेत्रेश's picture

3 Jan 2023 - 10:33 am | नेत्रेश

भारतात १४०० कोटी लोक रहातात. त्यातले १ - २ कोटी लोक बाहेरच्या देशांत गेले तर असा काय फरक पडणार आहे? झाला तर थोडाफार देशाला व बाहेर जाउ ईच्छीणार्‍या पुढच्या पीढीला फायदाच होईल.

बरेचसे दुसर्‍या देशांत गेलेले लोक जास्त पैसे कमवायलाच गेलेले असतात. तीथे बहुतेकवेळा भारतापेक्षा कितीतरी जास्त संधी आणी कमी स्पर्धा असते. परदेशातील चांगल्या सुखसोईंची व आरामशीर जीवनाची सवय होउन त्याची परीणीती तीथेच स्थायिक होण्यात होते.

Trump's picture

3 Jan 2023 - 11:10 am | Trump

१४०० कोटी ?

आग्या१९९०'s picture

3 Jan 2023 - 12:42 pm | आग्या१९९०

असू शकेल. ६०० कोटी मतदारांनी भाजपला मत देऊन सत्ता हातात दिली असे पंतप्रधान म्हणाले होते.

नेत्रेश's picture

3 Jan 2023 - 2:02 pm | नेत्रेश

तरीपण एखाद कोटी, किंवा २५ - ५० लाख बाहेर गेले तर काय बिघडते. बाकीच्यांना संधी उपलब्ध होतील.

साहना's picture

6 Jan 2023 - 6:07 am | साहना

Quality ओव्हर Quantity !

कुठल्याही समाजांत बहुतेक प्रगती हि फक्त १०-२०% लोकपासूनच होते. ह्याला Pareto तत्व म्हणतात. त्यामुळे हे लोक गेल्यास समाजाचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे देशांत खूप लोक आहेत १-२ कोटी गेल्यास फरक पडत नाही हे नेहमीच बरोबर नाही. युगांडा मधील शेती व्यवस्था आपले गुज्जू लोक सांभाळत होते आणि ते चांगले श्रीमंत होते. ईडी अमीन सत्तेवर आल्यानंतर त्याने रातोरात ह्यांना हाकलून लावले. युगांडा ची शेती व्यवस्था युगांडा मधील कृष्णवर्णीय लोक चालवू शकले नाहीत आणि अर्थव्यवस्था कोलमडली. गुज्जू मंडळी लंडन मध्ये निर्वासित म्हणून गेली आणि काही दशकांत ती मंडळी आता लंडन मधील सर्वांत श्रीमंत लोकांपैकी एक आहेत.

पण भारताच्या बाबतीत आपले म्हणणे बरोबर आहे. भारत बऱ्यापैकी मागासलेला असल्याने भारतातील उच्चशिक्षित मंडळीच नाही तर अगदी साधारण शिक्षित मंडळी सुद्धा विकसित देशांत जाऊन कैक पटीने पैसे कमावू शकते. आणि ह्या पैश्यांतील १०% जरी त्यांनी भारतात पाठवले तर भारतात राहून त्यांनी जितका पैसा कमावला असता त्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त पैसे असतात. साधा ट्रक ड्राइवर वर्षाला भारतांत फार तर २ लाख कमावू शकतो. तोच माणूस कॅनडात गाडी धुण्याचे काम करत २ लाख रुपये सेविंग्स म्हणून भारतात पाठवू शकतो.

त्यामुळे मागासलेल्या देशांतील लोक विकसित देशांत गेल्यास मागासलेल्या देशाला जास्त फायदा होतो. हळू हळू मागासलेला देश प्रगत होत जातो आणि हा फरक कमी होत जातो. चीन आणि कोरिया ह्याचे उत्तम उदाहरण आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jan 2023 - 12:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

काही मुद्दे

१. भारतातील बेशिस्त-- कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे, जागा बळकावणे, बेकायदा बांधकामे आणि त्याला असलेले राजकीय पाठबळ, रस्त्यात हिंडणारे प्राणी, भिकारी, सिग्नल न पाळणारे, राँग साईडने गाड्या चालवणारे लोक
२.प्रदूषण,घाण आणि कचरा- कुठेही कचरा टाकणे,थुंकणे,विधी उरकणे,पाळीव प्राण्यांची जिन्यात्,रस्त्यात घाण, हायवेच्या बाजुला कचरा जाळणे
३. बेकारी- तुलनेने महाग होत चाललेले शिक्षण आणि नंतर मिळणार्‍या संधीचा/नोकर्‍यांचा अभाव, सगळीकडे वाढत चाललेली स्पर्धा आणि त्यामुळे कमी पैशात जास्त श्रम करायला भाग पडणे
४. कौटुंबिक कलह,हेवेदावे- कुटंबापासुन दूर राहुन कोणाची ढवळा ढवळ सहन न करता शांतपणे जगण्याची इच्छा, फॉरेन स्टाईल जीवनशैलीचे आकर्षण

दुसर्‍या बाजुने बघितल्यास

१.रशिया युक्रेन युद्ध, कोव्हिड, ब्रेक्झिट, वाढती महागाई यामुळे कुठल्यही देशात नवरा बायको दोघांना नोकरी केल्याशिवाय पर्याय नाही. भारतात निदान आपल्याला दरवर्षी ७ टक्के माहागाई वाढण्याची सवय आहे, पण सध्या परदेशात ईंधनाचे दर दुप्पट झाल्याने भयंकर परीस्थिती आहे. माझे कॅनडातील मित्र जे महिना ४०-५० डॉलरचे पेट्रोल आणि ७००-८०० मध्ये महिन्याचा किराणा घेत होते ते आता त्यासाठी २०० डॉलर आणि १५०० डॉलर पर्यंंत खर्च करत आहेत. अमेरिकेत आणि ईंग्लंड्मध्येही फारशी वेगळी स्थिती नाही.
२. भारतात अजुनही काही प्रमाणात सपोर्ट सिस्टीम टिकुन आहे. नातेवाईक, शेजारी पाजारी मदत करतात. वेळ पडल्यास पैसे टाकुन कामवाल्या बायका,ड्राय्व्हर, पाळणाघरे, नर्सेस, स्विगी,झोमॅटो,ओला/उबेर्,बिग बास्केट सगळे घरपोच मिळते.
३. वर्ण द्वेष- काही दिवसांपुर्वी कायप्पावर एक व्हिडिओ बघितला. फ्रान्समधील कुठल्याशा शहरात स्थलांतरीत मुस्लिम लोक रस्त्यात नमाज पढत आहेत आणि वैतागलेले खोळंबलेले कार वाले लोक त्यांना शेवटी ओढुन रस्त्यातुन हटवत आहेत. ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होणारे हल्लेही काही नवीन नाहीत. थोड्याफार फरकाने सर्वच देशात ही अवस्था आहे कारण बाहेरचे लोक येउन आपली नोकरी घालवत आहेत हे कोणालाच आवडणार नाही. त्यात ते स्थानिक कायदे पाळत नसतील तर अजुनच.

परदेशात स्थायिक झालेले मिपाकर सध्याच्या परीस्थितीवर जास्त चांगला प्रकाश टाकु शकतील.

नेत्रेश's picture

3 Jan 2023 - 2:00 pm | नेत्रेश

कुठेही टपर्‍या टाकणे/अतिक्रमणे करणे - अमेरीकेत तरी सर्वत्र बेघर लोक कुठेही तंबु ठोकुन खुशाल राहु शकतात. कायद्याचे संपुर्ण संरक्षण त्यांना आहे. लॉस एंजलिस व सॅन फ्रांसिस्को सारखी शहरे या बेकायदा झोपडयांनी बकाल केली आहेत. काही ठिकाणी तर भर दिवसा जायला भीती वाटते. ते लोक रस्त्यावरच सर्व वीधी उरकतात व दीवसभर नशेत पडुन असतात. पालिकेचे कचरेवाले तीथे साफसफाई करायला जात नाहीत. लै बेकार परिथिती आहे.

पेट्रोलचे दर जरी डबल झाले तरी फारसा फरक पडत नाही. काही काळाने कमी होतात. १५०० डॉलर किराणाव कुणी खर्च करत नाहीत. ५०० डॉलर्सच्या आसपास महीन्याचा किराणा आरामात भागतो. पगार मजबुत असतो. नवीन कॉलेज ग्रॅज्युएट मुलांना आरामात दीड ते दोन लाख डॉलर्स पर्यंत पगार मिळतो. तेव्हा लोकांना फारसा फरक पडत नाही. आपल्या भारतीय लोकांनातर अजीबातच नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

3 Jan 2023 - 2:40 pm | राजेंद्र मेहेंदळे

फ्रेशर पास आउट मुलांना १.५-२ लाख डॉलर पगार? तोही आरामात? आणि महिन्याचा कुटुंबाचा किराणा ५०० डॉलर्समध्ये?

डिटेल्स द्या की राव, लगेच माझ्या मुलाला तिकडेच पाठवतो पुढे शिकायला. जमल्यास फॅमिली रि युनियन वगैरे करुन मी पण येतो की तिकडेच, हा का ना का.

जरुर पाठवा. हल्ली बरेच भारतीय आपल्या मुलांना १२ वे नंतर अमेरीकेतल्या स्टेट कॉलेजेसमध्ये पाठवतात. फी थोडी कमी असते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2023 - 9:24 am | राजेंद्र मेहेंदळे

या निमित्ताने-- अंडर ग्रॅड साठी परदेशात जावे की पोस्ट ग्रॅड साठी अशीही एक चर्चा ईथे करता येईल.

उपयोजक's picture

9 Jan 2023 - 7:26 pm | उपयोजक

बेघर लोकांनी 'अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान देशात' ही अशी बकाल परिस्थिती निर्माण करुनही त्यांना कायद्याचे इतके संरक्षण का? अमेरिका धनाढ्य नि प्रगत देश असूनही या लोकांना साधी मोफत घरे बांधून देण्यात अमेरिकेला अडचण काय असावी?

@ राजेन्द्र मेहेंदळे: सगळे मुद्दे यथोचित मांडलेले आहेत. सहमत आहे. अमेरिकेत मी मुलाबरोबर दर शनिवारी बाजाराला जायचो. गेल्या वर्षीपर्यंत दरमहा भाजीपाला, फळे आणि दूध यालाच ५०० डॉलर्स लागत होते. हल्लीचे माहीत नाही. पॅरिसमधे महागाई खूपच वाढलेली आहे आणि आणखीही वाढतच आहे.
१९९१ पासून आम्ही रहात असलेले दिल्लीजवळचे फरिदाबाद शहर आता इतके घाणेरडे झालेले आहे की घराबाहेर पडणेही नकोसे वाटू लागले होते, त्यामुळे तिथे बांधलेले घर विकून इंदौरला स्थानांतरित झालो.

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2023 - 5:52 pm | श्रीगुरुजी

सध्या महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे, जनतेच्या हिताचे प्रश्न व समस्या खालीलप्रमाणे -

१) संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक
२) महाराष्ट्र धर्म की हिंदू धर्म
३) औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला की हत्या केली
४) औरंगजेब हिंदूद्वेष्टा होता की नव्हता?
५) महापुरूषांचा अपमान राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष करताहेत की सत्ताधारी भाजप?
६) महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांचे पुतळे जाळायचे की त्यांच्या तोंडावर शाई फेकायची?
७) शिवाजी महाराजांचे खरे समर्थक राष्ट्रवादी, शिल्लक सेना वगैरे विरोधी पक्ष की सत्ताधारी भाजप?
८) खरे कडवे हिंदुत्ववादी शिल्लक सेनावाले की मनसेवाले की भाजप?
९) सावरकर माफीवीर की स्वातंत्र्यवीर?
१०) बाळ ठाकरेंच्या धगधगत्या हिंदुत्ववादी विचारांचे (!) खरे वारसदार बा. शिवसेना की शिवसेना (उबाठा)?
११) उर्फी जावेद असभ्य वेशभूषा करते की सभ्य वेशभूषा करते?
१२) नागपुरातील संघ कार्यालयात एकनाथ शिंदेंनी गुलाल लावलेली लिंबे ठेवली की उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थानी गुलाल लावलेली लिंबे ठेवली?
१३) उठांच्या सभेला जास्त गर्दी होती की एकनाथ शिंदें
च्या सभेला?
१४) भगव्या बिकिनीमुळे हिंदू धर्माचा अपमान झाला की नाही झाला?
१७) महापुरूषांच्या तथाकथित अपमानाविरूद्ध आवाहन केलेला महाराष्ट्र बंद यशस्वी की अयशस्वी?
१८) मुंबईतील महामोर्चा यशस्वी की अयशस्वी?
१९) जात्याधारीत जनगणना हवी की नको?
२०) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांना राखीव मतदारसंघ न ठेवता निवडणूक घ्यावी की न घ्यावी?

या अत्यंत गंभीर समस्या व प्रश्नांवर विचार करून योग्य उत्तर शोधण्याऐवजी महाराष्ट्रातील उच्चशिक्षित युवक-युवती परदेशी जाण्याचा पलायनवादी मार्ग स्वीकारत आहेत, यासाठी त्यांचा जाहीर निषेध करतो.

आनन्दा's picture

3 Jan 2023 - 6:25 pm | आनन्दा

मार्मिक

कर्नलतपस्वी's picture

3 Jan 2023 - 6:40 pm | कर्नलतपस्वी

@श्रीगुरूजी एक महत्वाचा मुद्दा विसरलात,आरक्षण.

बाकी अमरिकेत थोडे दिवस राहीलो आहे. आमच्या सारख्या वरीष्ठ नागरिकांना वैद्यकीय सुखसोई नाहीत.

महागाई जरी वाटत आसली तरी पगार सुद्धा तसेच आहेत. पेट्रोल चे भाव सारखेच वाटले. १०० डालरात बर्‍यापैकी सामान येते.

गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे.

खोबरं तीकडे चांगभल नाहीतर काय उपाशी मरायचं.

बरेच काही लिहीता येईल. १४० कोटीतली काही बाहेर गेल्याने फरक पडतो हे जोपर्यंत सरकारला कळत नाही तोपर्यंत असेच रहाणार.

कुसुमाग्रज यांची पाच पुतळ्याची कवीता आजही तेवढीच लागू पडते. प्रत्येकजण आपापले पुतळे पकडून बसलेत. इतीहासचा उपयोग तुंबडी भरण्या साठीच होताना दिसतोय. दर एक जानेवारीला मन उदास होते.

श्रीगुरुजी's picture

3 Jan 2023 - 8:48 pm | श्रीगुरुजी

गुणवान,अनारक्षित विद्यार्थ्यांवर बाहेर जाण्याची पाळी सरकारनेच आणली आहे.

२००% सहमत.

मागील काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत किळसवाणे व रसातळाला पोहोचले आहे व यासाठी महाराष्ट्रातील सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष समान प्रमाणात कारणीभूत आहेत. अर्वाच्य बोलणे, शिवीगाळ, दुसऱ्याच्या बोलण्यातून एखाद्या वाक्याचा सोयिस्कर अर्धवट भाग उचलून त्यामुळे महापुरूषांचा अपमान झालाय अशी बोंब मारणे, आपल्याविरूद्ध कोणी टीका केली तर लगेच त्याच्या/तिच्या विरूद्ध ३०-४० पोलिस ठाण्यात तक्रार करून त्याला/तिला आत टाकणे, पराकोटीचा जातीयवाद, टीकाकारांना बेदम मारहाण, प्रचंड भ्रष्टाचार, मुख्य प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष, अत्यंत नालायक लोकांना आपल्या गटात ओढून सत्ता मिळविणे व त्याचे निर्लज्जपणे समर्थन करणे . . . या सर्व प्रकाराचा किळसवाणा अतिरेक झालाय. दुर्दैवाने बहुतेक सर्व माध्यमे केवळ सुपारीबाज बनली असून खोट्या कहाण्या बनवून आगीत तेल ओतून आग भडकविण्यात व्यग्र आहेत.

अश्या भीषण परिस्थितीत आपल्याला काहीही भवितव्य नाही व देशाबाहेर जाणे हाच युवक-युवतींना एकमेव योग्य मार्ग वाटल्यास अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

महाराष्ट्राचे राजकारण शिसारी येण्याएवढे घाण झाले आहे. गेल्या २० वर्षातील घसरण बघुन लाज वाटते.

श्रीगुरुजी's picture

13 Jan 2023 - 9:52 pm | श्रीगुरुजी

दुर्दैवाने खरे आहे. यासाठी सर्व लहानमोठे, प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष व त्यांचे नेते समप्रमाणात कारणीभूत आहेत.

Nitin Palkar's picture

3 Jan 2023 - 6:23 pm | Nitin Palkar

जिथे अधिक संधी तिथे स्थलांतर हे नैसर्गिकच आहे. भारतातून अनेकजण वैध मार्गाने आणि काहीजण अवैध मार्गाने अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशा देशांत जातात तसेच त्याच्या कित्येकपटीने अधिक बांगलादेशी अवैधपणे भारतात येतात, राहतात.
जो पर्यंत "वसुधैव कुटुंबकम" ही वृत्ती 'विश्वमान्य' होणार नाही तो पर्यंत हे चालूच राहणार.

भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे. फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही. कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे. इतर देश का चांगले आहेत हे मिपा वर लिहून काही साध्य नाही. भारत देश खूप म्हणजे खूपच गरीब आहे. आम्ही तुम्ही सहज पणे भारतातील टॉप १०% लोकां पैकी आहोत. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही. भ्रष्टाचार हि मोठी गोष्ट नाही. पोर्तुगाल आणि स्पेन मध्ये असंख्य भारतीय जातात. ह्या दोन्ही देशांत भरपूर भ्रष्टाचार आहे. युक्रेन, पोलंड इत्यादी देश जास्त श्रीमंत नसले आणि बऱ्यापैकी भ्रष्ट असले तरी भारत पेक्षा कित्येक पटींनी जास्त राहण्या योग्य आहेत.

भारत सरकार हे ब्रिटिश सरकार २.० आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याच नागरिकांना चोरा प्रमाणे वागवणे, प्रत्येक गोष्टीसाठी भीक मागण्यास लावणे आणि आपल्या जवळच्या काही लोकांच्या हाती देशाची संपत्ती सोपवणे हे काम ज्या पद्धतीने ब्रिटिश सरकार आणि त्यांचे हस्तक करत होते त्याच प्रमाणे भारत सरकार आणि इतर राज्य सरकारे करत आहेत. हिंदूंच्या देवळांवर डल्ला, शिक्षण क्षेत्रावर आपला लोखंडी पंजा आणि इतर प्रत्त्येक ठिकाणी सरकारी बाबुंचे तळवे चाटल्याशिवाय काहीही देशांत घडू नये ह्याची खबरदारी. हे काम भारत सरकार करत आहे आणि त्याच साठी विविध लोक शेवटी कंटाळून देश सोडून इतर ठिकाणी जातात.

जिला शक्य आहे आणि आवड आहे तिने नक्कीच जावे. कुठल्या देशांत आपला जन्म व्हावा हा निर्णय आम्ही घेत नाही पण कुठे आपण राहू शकतो हा निर्णय आम्ही नक्कीच घेऊ शकतो.

HNW

हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती :

pajeet

कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2023 - 3:32 pm | कर्नलतपस्वी

भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे.

इतर देशात बेघर,बेकार लोकांची काय परीस्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? त्यांचे रहाणीमान पंचतारांकित आहे का?.
क्रिमिनल, काॅमप्रमाइज्ड एरीया का काय म्हणतात तो नाही का?.

इतर देशात सर्वांची संपत्ती एकसारखी आहे काय?

बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत. बहुतेक लोकांची क्षमता स्वीग्गी डिलिव्हरी बॉय ची सुद्धा नाही.

इतर देशात काय सगळेच आईनस्टाईन चे वंशज आहेत का?

State of mental illness मधे कुठले देश अग्रणी आहेत व तुलनात्मक भारतातली परिस्थीती लक्षात घेता कुठला देशात बेकार व कुठला चांगला आहे हे वेगळे सांगायची गरज नाही.

कतार सारख्या कट्टर इस्लामिक राष्ट्रांत भारतीय लोक जाऊन अक्षरशः गुरा प्रमाणे आनंदाने राबतात कारण भारतातील त्यांची परिस्थिती आणखीन भयावह आहे.

कतार सारख्या देशात काय फक्त भारतीयच आहेत काय?

आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे. सर्व चमकदार गोष्टी सोन्याच्या नसतात. भारत व भारतीय लोकांबद्दल आपले मत पूर्वग्रहदूषित आहे असे वाटते. किंवा आपण फुल्स पॅरडाईज मधे राहातायं.

उघडा डोळे बघा निट. कितीतरी गोष्टीत भारत अत्मनिर्भर आहे.

आपण या देशात रहात नाहीत असे वाटते नाहीतर असे अपशब्द लिहीले नसते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Jan 2023 - 5:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

कै च्या कै!!
परदेशात बसुन भारतावर थुंकायचे ते पण कुठल्यातरी वेबसाईटवरचा डेटा गुगलुन. त्या डेटाची सत्यता पडताळुन पाहिली आहे का? किती ऑथेंटिक आहे? काही पत्ता नाही.

कॅनडामध्ये अबोरिजिनल लोकांना सरकार भत्ता देते, दिवसभर ते लोक नशा करुन ते पैसे उडवतात आणि मग रस्त्यात भीक मागत फिरतात.
अमेरिकेत न्युयॉर्क आणि एल ए मध्ये तंबु टाकुन रस्त्याकडेला राहणार्‍यांचा उल्लेख वर आलाच आहे. युरोपमध्ये स्थलांतरीत लोकांचीही स्थिती वेगळी नाही.

भारतात निदान शेती भरपुर टिकुन असल्याने गरीबातील गरीब माणुसही थोडेफार अन्न मिळवु शकतोच. शिवाय उन्हाळा/पावसाळा/हिवाळ्यातील हवामानात प्रचंड फरक (हे मी +३० ते -३० च्या तुलनेत म्हणतोय) नसल्याने कपडे वगैरे फारसे न बदलता माणुस बाहेर हिंडु शकतो. ठिकठिकाणी कट्ट्यावर्,देवळात्,बागेत चकटफु हिंडु शकतो,सामाजिक जीवन्,शेजार पाजार अजुन टिकुन आहे. परदेशात माणुस आजारी पडला तर शेजारी नाही मदत करणार. दारात मेडिकल सर्विस बोलावण्याशिवाय पर्याय नाही. आणि वयस्क एकट्या माण्सांना वृद्धाश्रमात (मग नाव कितीही गोंडस द्या) रहाण्याला पर्याय नाही.

वयाच्या सोळाव्या वर्षापासुन बॉयफ्रेंड्/गर्लफ्रेंड बरोबर राहण्यासाठी घर सोडण्याची पद्धत असल्याने शिक्षण थांबते आणि पैसे कमवायला लहान मोठे जॉब करावे लागतात. यामुळेच परदेशाचे गोडवे गाणारे भारतीय बाप , मुलगी वयात आली की अचानक आपली संस्कृती वगैरे आठवुन गळे काढु लागतात आणि भारतात परत यायला बघतात.

अजुन बरेच लिहिता येईल पण इत्यलम.

कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2023 - 6:34 pm | कर्नलतपस्वी

राजूभौ एकदम सहमत आहे.

आजही मुलं आईबापाचे पाय शिवतात. तीकडे मुलांना वाचायला यायला लागले की ९११ ची धमकी देतात. नाॅर्वे कर तर मुलाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून आई बापाला हाकलून देऊन तान्ह्या बाळाला सुद्धा ठेवून घेतात.

एक L S CS झाले तर बहात्तर लाखाचे बिल बनवले. दात दुखतोय तीन महिन्यानंतर आपाइन्टमेन्ट. असे ऐकण्यात आले की अमरिकेत जर अर्थिक इमर्जन्सी आली तर कमरेचे सोडून द्यावे लागते कारण विकांताला खिसा खाली होतो.

तसे सुद्धा हुच्च शिक्षण परवडत नाही त्यामुळे ड्रापआऊट भरपुर एखादाच बिल गेट्स बनतो बाकीच्यांना स्वीगी झोमॅटोने घेतले तर घेतले. उच्च शिक्षित कुठून आणणार?

होय, भारतात गरीबी आहे बरोबर माणूसकीपण आहे. आता लोक संख्याच भरपुर म्हणून त्याच प्रमाणात त्याचे साईड इफेक्ट पण आहेत.

स्वराज्य मिळून फक्त पंच्याहत्तर वर्ष झालीयं. थोडा वेळ लागेल पण विश्वगुरू नक्कीच होणार.

माझ्या देशात घर जमीन जरी नसली तरी आधार आहे, हाकलून देणार नाही एवढा विश्वास जरूर आहे.

जे परदेशी गेले त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत.

> आपण म्हणता तशी परीस्थीती सर्वच देशात आहे. गरीब श्रीमंत, सज्जन दुर्जन ,लहान मोठे.

गरीब श्रीमंत सर्व देशांत आहेत हा मुद्धा बरोबर असला तरी भारतीय गरिबी हि अतुलनीय आहे. भारतांत बहुसंख्य लोक गरीब आहेत आणि इतर देशांतील तुलने खूपच म्हणजे अकल्पनीय गरीब आहेत. मेक्सिको, ब्राझील सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आहेत.

भारताची परिस्थिती सुधारायची असेल तर, हि गोष्ट मान्य करणे स्टेप १ आहे.

उपयोजक's picture

9 Jan 2023 - 11:05 pm | उपयोजक
कॉमी's picture

7 Jan 2023 - 9:38 am | कॉमी

पुरेपूर सहमत.
साहना बाई कोलोनियल मनोवृत्ती वैगरे टाईप बाता मारणाऱ्या पैकी आहेत. पण खरा inferiority complex दाखवतात.

बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत.

स्वतच्या लोकांबद्दल इतका वंशव्देश्टा विश्वास कसा आहे समजत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

7 Jan 2023 - 4:53 pm | अप्पा जोगळेकर


बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो.

हे त्यांच्याच एका प्रतिसादातले वाक्य आहे. त्यावरून अंदाज घ्या.
हे वाक्य वाचून मी तर माघार घेतली

कॉमी's picture

7 Jan 2023 - 9:34 am | कॉमी

भिकार ऑप इंडिया. आजपर्यंत पूर्णपणे खरी अशी बातमी ह्यांनी कधी दिलीये का अशी शंका येते. तुम्ही दिलेली पंत बद्दलची बातमी सुध्दा शुद्ध असत्य आहे. कोणीही पंतच्या वस्तू चोरल्या नाहीत.

@ साहना: तुमच्या प्रतिसादातील 'फॅमिली, प्रिय व्यक्ती आणि धर्म ह्या गोष्टी सोडल्यास भारतांत राहायला एकही चांगले कारण नाही'. हे वाक्य माझ्या यापूर्वीच्या वाचनातून सूटून गेले होते. आज पुन्हा वाचताना हे वाक्य वाचून मी अंतर्मुख झालो, आणि माझ्यापुरते तरी ते मला पूर्णपणे पटले. का आणि कसे, हे थोडेसे स्पष्ट करतो:
माझी जन्मापासूनची पहिली सव्वीस वर्षे इन्दौरमधे गेली, तेंव्हा तिथे मला आवडायचे. बाहेरचे जग तोपर्यंत बघितले नव्हते. अधून मधून मुंबई पुणे वगैरेला जाणे व्हायचे, परंतु मला त्यापेक्षा इन्दौरच चांगले वाटायचे. दिल्लीला एकदोनदा गेलो, तेंव्हा नव्या दिल्लीतले प्रशस्त रस्ते, हिरवळी आणि मोठमोठी झाडे, लोदी गार्डन वगैरे सुंदर आणि विस्तीर्ण उद्याने, जुन्या इमारती, संग्रहालये, उतम पुस्तकालये, कला विथिका वगैरे मला आवडले आणि आपण तिथे स्थानांतरित व्हावे असे वाटू लागले. योगायोग आणि थोडे प्रयत्न यातून ती इच्छा पूर्ण झाली आणि इ.स. १९७७ ते २०२२ आम्ही दिल्ली परिसरात राहिलो. मात्र या ४५ वर्षात दिल्लीत खूप बदल घडून आले आणि नंतरच्या काळात तिथे रहाणे नकोसे वाटून अलिकडे पुन्हा इन्दौरला स्थानांतरित झालो. (गेल्या सहा वर्षांपासून इंदौर हे भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडले गेलेले आहे)
गेल्या काही वर्षांपासून वर्षातले अनेक महिने आम्ही उभयता परदेशात स्थायिक झालेल्या मुलांबरोबर रहातो. त्यामुळे भारतात 'कुटुंब' असे नाही. समवयस्क नातेवाईकांपैकी काही परलोकवासी झाले, काही परदेशी गेले, काही खूपच वृद्ध झालेले आहेत आणि त्यांच्या मुला-नातवंडांना आमच्यात स्वारस्थ्य न वाटणे स्वाभाविकच आहे. 'प्रिय व्यक्ती' म्हणजे लहानपणापासूनचे थोडेसे जे मित्र भारतात आहेत, ते आपापली कौटुंबिक कामे, आरोग्यविषयक समस्या वगैरेत गुंतलेले असल्याने भेट झाली तर काही तास गप्पा करणे, यापलिकडे फारसे काही नाही, आणि त्यांचेशी फोनवर बोलणे भारतातून काय वा परदेशातून काय, सारखेच आहे, ते मी पुष्कळदा करत असतो.
तथाकथित 'धर्म' या गोष्टीशी मला लहानपणापासूनच काही सोयरेसुतक नसल्याने तोही प्रश्न नाही. अर्थात भटकंतीत आढळणारी मंदिरे, लेणी, वा चर्च वगैरेंमधे मी जरूर जातो ते तिथली वास्तुकला, मूर्तीकला वगैरे बघण्यासाठी.
इथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो. मला सर्वप्रकारच्या प्राचीन गोष्टींबद्दल उत्सुकता असल्याने 'प्राचीन शिव मंदिर' वा तत्सम पाटी दिसली, तर मी आवर्जून तिथे जातो. परंतु तिथे (अद्याप टिकून असलेच तर) एकादे मोठे जुने झाड वा दूर कोपर्‍यातली एकादी पडकी भिंत, याव्यतिरिक्त 'प्राचीन' असे काहीही दिसत नाही. उलट म्युन्सीपाल्टीच्या मुतारीत लावतात तसल्या ओंगळ टाईल्स, भडक रंगरंगोटी आणि ठिकठिकाणी लोंबत असलेल्या चुन्न्या (हे कशासाठी असते कुणास ठाऊक) खरकट्या पत्रावळी आणि अन्य घाण वगैरेच बहुतेक जागी आढळते. याउलट युरोपमधील आठशे-हजार वर्ष जुन्या एकाद्या चर्चमधील लाकडी जमीन वा छत दुरुस्त करताना लावली जाणारी नवीन लाकडे भवतालच्या जुन्या लाकडांमधे बेमालूम मिसळून जातील, असे त्यांना पॉलिश वगैरे केले जाते. (सुतारकामाची आवड असल्याने असे काम मी बघत उभा रहातो).
उदाहरणार्थ नुक्तेच मी फ्रान्समधील एक प्राचीन स्थळ बघून आलो. अकराव्या शतकातील फ्रेंच 'क्रुसेडर्स' जेरुसेलमला धर्मयुद्धासाठी जाण्यापूर्वी जिथे काही काळ राहून आवश्यक प्रशिक्षण घेणे, सामानाची जुळवाजुळव वगैरे करायचे, ते हे ठिकाण. इथल्या प्राचीन इमारती आवश्यक ती डागडुजी करून अजून उभ्या आहेत आणि तिथे त्यांची साद्यंत माहिती देणारे एक संग्रहालय अल्प तिकीट दर लावून चालवले जात आहे. या संपूर्ण परिसरात तिथले प्राचीन वातावरण भंग होईल असे काही दिसत नाही. मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे:

.

.

.

.

.

.

तात्पर्य, माझ्या युरोप- अमेरिकेतील मुक्कामात भरपूर भटकंती, मोठमोठी संग्रहालये आणि कला-प्रदर्शने बघणे, प्रदूषणमुक्त स्वच्छ वातावरण, शेकडो वर्षांपासून जपलेल्या, खरोखरच्या 'प्राचीन' वास्तु, उत्तम साहित्य आणि अवजारे घेऊन कलानिर्मिती- सुतारकाम, लेखन - वाचन, वाद्ये वाजवणे वगैरे करणे तिथे जसे शक्य होते, तसे माझे भारतात होत नाही.
अर्थात हे सगळे माझ्यापुरते सांगितले आहे. इतरांचे अनुभव अर्थातच अगदी वेगळे असू शकतात.

होय. विविध विकसित देशांत आपल्या इतिहासासह रक्षण त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केले आहे. भारतांत अनेक प्रचिंन वास्तु असल्या तरी तुलनेने त्याची देखभाल करण्यात आम्ही मागे पडलो आहोत.

कला, संस्कृती इतिहास ह्या गोष्टी आणि समाजाची समृद्धी ह्यांचा फार खोल संबंध आहे. समृद्ध समाजांत अनेक व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य कला किंवा इतिहासाच्या अभ्यासांत घालवू शकतात. त्या अभ्यासातुन थेट वित्त निर्मिती होत नसली तरी इतर श्रीमंत लोक त्यांना मदत करतात. त्याच मुळे पाश्चात्य देशांत किंवा जपान मध्ये तुम्हाला हर प्रकारचं विषयावर आयुष्य वेचलेले लोक पाहायला मिळतील. भारतांत अश्या लोकांचे फार हाल होतात. तरी सुद्धा बाबासाहेब पुरंदरे, राम स्वरूप, सीताराम गोयल, विविध शास्त्रीय संगीतातील पंडित आणि विदुषी ह्या देशांत निर्माण होतात हि आपली पूर्वपुण्याई आहे.

आमच्या इथे गड किल्यांची अवस्था दयनीय आहे. हेच किल्ले जर फ्रांस मध्ये असते तर तेथील सर्वांत महत्वाची आकर्षणे झाले असते आणि जागतिक पर्यटक स्थानांपैकी एक झाले असते. अमेरिकेत तर विविध ठिकाणी गरज नसताना किल्ले सदृश्य इमारती बांधून त्यांना पर्यटन स्थळे बनवली गेली आहेत.

> मुख्य म्हणजे हे सगळे 'सरकार' ने केलेले नसून तिथल्या रहिवासींच्या पुढाकारातून केले गेलेले आहे. खाली तिथले काही फोटो देतो आहे:

हा सर्वांत महत्वाचा मुद्दा आहे. न्यू यॉर्क मधील सार्वजनिक वाचनालय हि एक महत्वाची अमेरिकन संस्था आहे. पण प्रत्यक्षांत हि संस्था सरकारी नाही आणि नव्हती. पाश्चात्य देशांत अनेक वस्तू संग्रहालये, आर्ट गॅलरी इत्यादी आहेत त्या बहुतांशी लोकांचं पुढाकाराने निर्माण झालेल्या आहेत. अमेरिकेत एकूणच शासन व्यवस्था हि शहरांना केंद्र बिंदू मानून निर्माण झालेली असल्याने न्यू यॉर्क मधील सेंट्रल पार्क इत्यादी कागदो पत्री सरकारी मालकीचे असले तरी जेंव्हा त्याची निर्मिती होत होत तेंव्हा स्थानिक रहिवाश्यानीच त्याचे नियोजन केले होते आणि मालकी हक्क स्थानिक संस्थेकडे दिला होता.

भारतीय शासन व्यवस्था सुद्धा एके काळी ह्याच तत्वावर चालत होती. पण ब्रिटिश व्यवस्था हि ब्रिटिश सरकारच्या फायद्यासाठी असल्याने त्यानी त्याचे केंद्री करण केले आणि तथाकथित स्वातंत्र्यानंतर तीच पद्धती भारतीय सरकारने राबवली आहे. त्यामुळे शहरे, पंचायती ह्यांची स्वायत्तता कमी आहे आणि कुठल्याही नागरिकांनी पुढाकार घेऊन निर्माण केलेल्या संस्थेला हर प्रकारे अडथळा निर्माण करणे हि भारत सरकारची पॉलिसी आहे.

मी माझ्या लेखांत मंदिरावरील सरकारी नियंत्रण हे भारतीय समाजाच्या निकृष्टपणाचे उदाहरण म्हणून दिले होते. ह्याचे कारण सुद्धा तेच आहे. एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती. ह्यांत सरकारी लुडबुड निर्माण झाली आणि हे निर्भेळ दूध नासवले गेलॆ.

महाराष्ट्रातील गांवा गांवात आपण जातो तेंव्हा कुणी तरी अवलिया मास्तराने आपला संसार उध्वस्त करून गांवात शाळा निर्माण केली अशी कथा ऐकायला मिळते. हि शाळा मागील ५० वर्षे चालत असून हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला असे ऐकू येते. समाज गरीब असल्याने फक्त शाळा निर्माण करणे ह्या सारखी ध्येये ह्यांनी ठेवली. हीच मंडळी जर एखाद्या समृद्ध समाजांत जन्माला अली असती तरी त्यांनी युरोपच्या तोंडात मारतील अश्या संस्था उभ्या केल्या असत्या.

भारतीय विद्या भवन, बनारस हिंदू विशवविद्यालय, भांडारकर इन्स्टिटयूट, गीता प्रेस सारख्या संस्थांना पाहावे. TIFR, IISC इत्यादी संस्थांना पाहावे (ज्यांना सरकारने शेवटी बळजबरीने ताब्यांत घेतले), ह्या संस्था बहुतांशी ब्रिटिश कालीन आहेत. एअर इंडिया हि १९३२ साली सुरु झाली होती. युरोपियन संस्थांशी टक्कर देतील अश्या प्रकारच्या संस्था भारतीय आणि हिंदू लोक ब्रिटिश काळांत निर्माण करत होते. बँकिंग किंवा विमा क्षेत्रांत असंख्य खाजगी संस्था ब्रिटिश काळांत अस्तित्वांत होत्या. स्वतंयंत्रानंतर एन केन कारणाने त्या सर्व कोलमडल्या. हल्ली काही लोक नेहरू नि IIT निर्माण केली असल्या बतावण्या करतात पण सोयीस्कर पणे विसरतात कि त्याच भारतात नेहरूंच्या आधी किती तरी चांगल्या संस्था भारतीयांनी विना सरकारी मदत निर्माण केल्या होत्या ह्या शेवटी सरकारी हस्तक्षेपाने खराब झाल्या.

दुर्दैवाने हि अधोगती लोक पाहत नाहीत. व्यक्तीपूजा आणि अंध राजकीय निष्ठा ह्यांच्या नादी लागून लोकांनी भारत विश्वगुरू आहे वगैरे थापा आत्मसात केल्या आहेत. जो पर्यंत आपली कमजोरी आम्ही ओळखत नाहीत तो पर्यंत त्यांत बदल घडवून आणणे शक्य नाही.

सर टोबी's picture

8 Jan 2023 - 1:06 pm | सर टोबी

२०१४ ला मिळालेले स्वातंत्र्यदेखिल तथाकथितच आहे का?

२०१४ ला स्वातंत्र्य नाही तर मुक्ती मिळाली. तर्क, वस्तुस्थिती, न्याय, विवेक बुद्धी ह्या सर्वापासून देशाला मुक्ती मिळाली. निष्काम भक्ती म्हणजे काय हे आता रॅली नंतर सतरंज्या उचलताना सर्वाना मिळते.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

10 Jan 2023 - 4:18 am | हणमंतअण्णा शंकर...

एके काळी मंदिर हि संस्था केंद्र बिंदू असायची आणि त्याच्या भोवताली व्यापार, कला इत्यादींना समाज आश्रय द्यायचा. मठ परंपरा, विविध संत परंपरा ह्यांना धाग्याप्रमाणे विणून भारतीय समाजाची घडी निर्माण झाली होती.

आपणास खालील गोष्टींमधला सहसंबंध आठवतो का?

१. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर, पंढरपूर
२. साने गुरुजी

कोणत्या भारतीय युटोपियाबद्दल आपण बोलत असता? कधी होता हा अस्तित्त्वात?

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jan 2023 - 4:53 am | चंद्रसूर्यकुमार

हि आहे भारतीय विश्वगुरू संस्कृती :

२००५ मध्ये न्यू ऑरलींस मध्ये कतरीना वादळाने धुमाकूळ घातला होता. कतरीना वादळानंतर शहरात काही दिवस अंधाधुंदीची स्थिती होती. तेव्हा त्या शहरात डिपार्टमेंटल स्टोअर्स फोडणे, जाळपोळ वगैरे प्रकार झालेच होते. इतकेच नाही तर स्त्रियांवर बलात्कारही झाले होते. त्या शहरातील परिस्थितीमुळे काही लोक मिसिसिपी नदीवरील पूल चालत ओलांडत ग्रेटना या शहरात जात होते तिथे त्या शहरातील पोलिसांनी त्यांना बंदुकांचा धाक दाखवून हाकलून दिले होते. या अमेरिकेतील महान संस्कृतीला नक्की काय म्हणावे?

अमेरिकेत कतरीना वादळ आले त्याच्या एक महिना आधीच मुंबईत २६ जुलैचा महापूर आला होता. दोन्ही शहरांवर आलेले पुराचे संकट मोठे होते - कारणे वेगळी असतील कदाचित पण संकट मोठेच आले होते. त्यावेळी कधी आयुष्यात परत तोंड बघायची सुतराम शक्यता नसलेल्या लोकांनी एकमेकांना मदत केली होती. इतर वेळेस स्त्रियांवर अचकट विचकट कमेंट्स करणाऱ्या लोकांनीही अडकलेल्या स्त्रिया आणि मुलींनाही मदतीचा हात दिला होता. मुंबईत त्यावेळी जाळपोळ, लुटालूट, बलात्कार याच्या किती घटना घडल्या होत्या? आश्चर्य वाटेल पण २६ जुलै नंतर दोन तीन दिवस मुंबईत गुन्ह्यांचे प्रमाण खूप कमी होते. या संस्कृतीला काय म्हणावे?

भारत देश वाईटच आणि इतर देश चांगलेच अशी sweeping statements करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या हाच अनाहुत सल्ला.

प्रॉपर्टी अधिकारांच्या बाबतीत आम्ही भारतीयांनी गप्प राहिलेलेच बरे. वर्षाला अनेकवेळा गुंड मंडळी भारत बंद, मुंबई बंद इत्यादी करत असतात. मुस्लिम बहुल भागांतून हिंदूंची हकालपट्टी हि नेहमीची बाब आहे. शेतीविषयक कायद्यांच्या आंदोलनात अनेक रस्ते महिनाभर बंद ठेवले, त्यांत बलात्कार, खून इत्यादी अनेक गुन्हे सुद्धा घडले. आणि हे नेहमीच घडत आले आहे, त्यासाठी वादळ वगैरे येण्याची गरज नाही. जिथे ह्या गोष्टी अपेक्षित नसतील तिथे अचानक काही मोठ्या आपत्तीने ह्या गोष्टी घडाव्यांत ह्यांत आश्चर्य नाही (विशेषतः जिथे कृष्णवर्णीय लोक मोठ्या संख्येने आहेत तिथे) पण लूटमार आणि बलात्कार हि नेहमीची बाब इथे आहे. बहुतेक दुकाने, घरें इथे खाजगी सिक्योरिटी ठेवतात कारण पोलीस व्यवस्था योग्यवेळी पोचेल ह्याची शाश्वती नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

18 Jan 2023 - 10:00 am | चंद्रसूर्यकुमार

म्हणजेच काय तर अमेरिकेतही अनेक वाईट गोष्टी आहेत हे तुम्हीही मान्य करत आहात. मुद्दा तोच आहे. भारत म्हणजे सर्वकाही वाईट आणि अमेरिका म्हटले की सर्वकाही चांगले असे अजिबात नाही.

तर्कवादी's picture

18 Jan 2023 - 11:02 am | तर्कवादी

आणि धाग्याच्या विषयाला अनुसरुन स्वत: भारत कायमचा सोडण्याचा वा भारतात परतण्याचा वा भारत न सोडण्याचा असा कुठलाही निर्णय नेमका का घेतला याबद्दल प्रतिसादकर्त्यांनी लिहिल्यास चर्चा नेमकेपणाने होवू शकेल.. पण त्यापेक्षा काही सदस्य फक्त भारतात सगळेच कसे वाईट आहे एवढा एकच सूर फक्त लावून बसलेत

साहना's picture

5 Jan 2023 - 4:39 am | साहना

शेवटी एकाच सत्य, रांगा अमेरिका, कॅनडा, uk, इत्यादी देशांच्या दूतावासापुढे लागलेल्या असतात भारतीय दूतावासा पुढे नाहीत. एकदा विदेशांत जाऊन आले कि समजते कि भारताची दुर्दशा किती खालच्या स्तराची आहे. आणि ह्या साठी फक्त अमेरिका दुबईत जाण्याची गरज नाही तर कतार, स्पेन, पोर्तुगाल सुद्धा चालतील.

आमची शेती आहे, इकडे मुलांना संस्कार असतात असल्या हास्यास्पद गोष्टींत सुद्धा काही तथ्य नाही. भारतीय शेतकरी जगांत सर्वांत मागे आहे, जवळ जवळ प्रत्येक पिकाच्या बाबतीत जगांतील सर्वांत कामचुकार आणि अकार्यक्षम शेतकरी आहे. ह्यावर मी आधी लिहिले आहे. देशांत हिंदू लोकांची मंदिरे सरकारने ताब्यांत घेतली आहेत आणि त्याच्यावर ख्रिस्ती अधिकारी नेमले आहेत.

मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे. शहरांत सुद्धा ज्यांच्या मुली तरुण आहेत त्यांच्या जीवाची घालमेल दररोज पाहावी.

आपण पूर्णपणे अपयशी ठरलो कि नंतर मग आपल्यात माणुसकी आहे, अध्यात्म आहे, असल्या थातुर मातुर गोष्टी बोलून आपल्या मनाची समजूत काढायची. धर्मादायी खर्च, माणुसकी ह्या बाबतीत सुद्धा देश खूपच मागे आहे. अपघात होतांच जखमीला आधार देण्याऐवजी त्याचिया खिशातील पैसे चोरण्यात आपण पुढे. अपघात झालेल्या मैत्रिणीला सोडून पळ काढण्यात पुढेच. श्रीमंत मंदिरांचे पैसे सरकार चोरून नेते. सरकारी जमिनीवर गुंड लोक बळजबरीने कब्जा करतात. नवीन शाळा सुरु करणे कायद्याने गुन्हा आणि चुकून कोणी केलीच तर त्याच्या मागे सरकारी हापिसरांचा ससेमिरा.

आज भारतीय तत्वज्ञानाचे व्हिडीओ पाहायचे असतील तर नंबर १ न्यूयॉर्क मधील स्वामी सर्वप्रियानंद आहेत. आपले अध्यात्म परमबिंदू शंकराचार्य हे "निगेटिव्ह नंबर्स खोटे आहेत" असली पुस्तके लिहीत आहेत.

शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2023 - 8:15 am | श्रीगुरुजी

बऱ्याच मुद्द्यांशी सहमत आहे.

मुलांचे संस्कार पाहायचे असतील बिहार, up मधील तरुणाई टिकटॉक वर आणि youtube वर काय व्हिडीओ टाकत आहेत ते पाहावे.

त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारी तरूण पाहण्याची आवश्यकता नाही. ट्विटर, फेसबुक इ. समाजमाध्यमातील अनेक मराठी तरूणांच्या प्रतिक्रिया वाचले की यांच्यावरील संस्कार लक्षात येतात.

कर्नलतपस्वी's picture

5 Jan 2023 - 10:19 am | कर्नलतपस्वी

@श्रीगुरूजी,

व्यक्ती तीतक्या प्रकृती हा नियम सर्वत्र एक सारखाच.
चांगले वाईट संस्कार सगळीकडेच पहायला मिळतील.
मुद्दा हा आहे भारत खुपच मागासलेला, गरीब, घाणेरडा देश आहे असे दाखवून परदेश किती सर्वगुणसंपन्न आहे हे दाखवण्याची एतद्देशीय परदेश धार्जीणी मनोवृत्ती यावर आक्षेप आहे.

परदेशातील असलेले आवगुण, शार्टकमिंग्ज झाकून ठेवून आपल्याच देशाचे वाभाडे काढायचे हे पटत नाही.

नशेडी,गंजेडी,चोर,बलात्कार, डोमेस्टिक व्हायलन्स काय फक्त भारतातच आहेत का?

परदेशात जाणारी मुलं पोटासाठी नोकरीच करतात फार काही वेगळे करत नाहीत. सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात.

कोव्हीड वर उपाय व सुयोग्य व्यवस्थापन हे एक चांगले उदाहरण नाही काय. कितीतरी गरीब देशांना भारताने लस दिली याबद्दल काय म्हणायचे आहे? इतर देशांच्या तुलनेत भारतातील परीस्थीती काय होती हे जगजाहीर नाही काय?

माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही.

ज्या गोष्टी भारतात घडतात त्याच प्रकारच्या गोष्टी परदेशात ही घडतात हे विसरून चालणार नाही.

> सर्व सामान्य आयुष्य जगतात व मरून जातात.

बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही.

पावसांत भिजत दुचाकी घेऊन कामाला जायचे. मृत्यूचे सापळे असलेल्या रस्त्यावर दिव्य करत पोटाची खळगी भरण्यासाठी कसला तरी उद्योग व्यवसाय करायचा, मग बहुतेक पैसे GST वर घालवायचे, राहिलेले आरोग्य, मुलांचे शिक्षण, आणि विविध कारणासाठी लाँच देत घालवायचे. काही वाचलेच तर मग कुठल्या तरी कंपनीत गुंतवायचे ज्याचा CEO मग तुमच्याच पैश्यांची चालविलेल्या सरकारी बँक ला गंडा घालून जातो आणि ते पैसे मग पेट्रोल वरील करणे तुम्हीच पुन्हा भरता. दुर्दैवाने तुमचा जन्म तथाकथित सवर्ण जातीत झाला तर विचारूच नका. साधी प्राथमिक शाळा पासून नंतर नोकरी मिळवण्यापर्यंत तुम्ही सर्वांत शेवटी राहाल.

अपार कष्ट करून म्हाताऱ्या आईवडिलांना गावी ठेवून शहरांत यायचे. २० वर्षे लोन भरत छोटासा फ्लॅट घ्यायचा जयंत साधा सेंट्रल ac सुद्धा नसतो. शनिवारी रविवारी फारतर मॉल मध्ये अवाजवी पैसे भरून चित्रपट पाहायचा आणि आणखीन पैसे देऊन तो थंडगार सामोसा आणि गरम गरम कोक प्यायचा. वर्षातून काही वेळा गावी जायचे तीच काय ती सुट्टी. आणि हे आयुष्य फक्त तुम्ही शिकले असाल तरच तुमच्या नशिबी. तुम्ही अडाणी असाल तर कुठे तरी गुरा ढोरा प्रमाणे कुणी तरी तुम्हाला वागवून फार तर दोन दिवस जिवंत राहण्यापुरता पगार देईल.

माझी कॅलिफोर्निया मधील कुक पंजाबी स्त्री आहे. वयाच्या ५५ वर्षी ती इथे आली. घरी तिला डोळे वर काढून पाहायची सोय नव्हती. पंचक्रोशीत म्हणे ती एकटीच ८वि पास होती. इथे येऊन तो गाडी चालवायला शिकली (कॅलिफोर्निआ मध्ये ड्रायविंग टेस्ट पंजाबी भाषेतून उपलब्ध आहे). सध्या ती निव्वळ जेवण बनवून साधारण ४००० डॉलर्स कमवते. मी म्हटले तुला पैसे केश देऊ का ? तर म्हणते नाही दीदी, इथे टॅक्स भरावासा वाटतो. मागील दोन वर्षांत तिने पंजाबी ड्रेस सोडून पंत शर्ट घालायला सुरुवात केली. आपले सेविंग मग ती पंजाबात जमीन घेण्यावर खर्च करते. तिची मुलगी पंजाब मध्ये होती, ती गरोदर होताच तिने धडपड करून तिला कानडा मध्ये विद्यार्थी म्हणून आणले आणि नातवाला कॅनेडियन सिटीझन बनवले. काही महिन्यात तिची इतर मुले आणि बहीण सुद्धा इथे येईल.

हिचे आयुष्य सर्व सामान्य म्हणून जरी जात असले तरी ते सामान्य आयुष्य तिच्या नशिबी पंजाब मध्ये नव्हते. तिथे शेणी थापत आणि सासूचे पाय दाबत तिचे आयुष्य गेले असते. इथे ती जास्त खुश आहे.

> माझे म्हणणे एवढेच आहे परदेशाचे गोडवे गाताना भारताला,भिकार,घाणेरडा आशी विशेषणे लावण्याची गरज नाही.

भिकार आणि घाणेरडा हि दोन्ही विशेषणे भारताला १००% लागू आहेत आणि त्या तुलनेत जवळ जवळ प्रत्येक देश भारता पेक्षा खूप पटीने चांगला आहे. हे शब्द कटू वाटले तरी सत्य आहेत. मी भारताला शिवी देत आहे किंवा अशी शिवी देऊन मला आनंद वाटत आहे असे अजिबात नाही. जी गोष्ट वाईट आहे ती मान्य केल्याशिवाय आपण त्यांत सुधारणा घडवून आणू शकत नाही.

"स्वच्छ भारत" स्कीम ची गरज का भासली ? कारण सार्वजनिक ठिकाणी आम्ही प्रचंड कचरा निर्माण करतो. आपले सार्वजनिक प्रसाधनगृहे सामान्य स्त्री ने वापरण्यासारखी नाहीत. शहरच नाही तर ग्रामीण भाग सुद्धा खरोखर प्रचंड घाणेरडा आहे. हगंदारी मुळे अनेक गांवांत सकाळी नाक बंद ठेवावे लागते. मी मेक्सिको, ब्राझील, स्पेन आणि इंडोनेशिया मध्ये प्रवास केला आहे. येथील ग्रामीण भाग सुद्धा भारतापेक्षा कैक पटीने चांगले आणि जास्त स्वच्छ आहेत.

IIT मुंबई हि तथाकथित मोठी शिक्षण संस्था आहे. त्यांना पैश्यांची कमी नाही. तेथील हे प्रसाधनगृह पहा . हा लेख एका प्राध्यापकाने लीहिला आहे.

https://www.cse.iitb.ac.in/~soumen/APKGKAH/flaky-products/maintain.html

टीप: माझ्या कोकणातील शेतजमिनीवरील पम्प चा फ्यूस वारंवार उडत होता म्हणून मी गांवातील एका इलेक्ट्रिसिटी वाल्याला पाहायला सांगितले. जमिनीची जो देखभाल करतो त्याला ह्या विषयातील काहीच समजत नाही त्यामुळे मलाच फोन वरून बोलावे लागले. तर हा इलेक्ट्रिसिटी वाला मला सांगतो. काही नाही मॅडम सोप्प आहे, थोडा जास्त अँपिअर चा फ्यूस घालायचा, तो मग उडत नाही !

दुसरी टीप : भारतात उणिवा आहेत ह्याचा अर्थ इतर देश १००% चांगले आहेत असे नाही. पण सर्वसामान्य शिकलेल्या मध्यमवर्गीय भारतीयाला जी अवहेलना भारतात सहन करावी लागते तशी अवहेलना अगदी मजूर म्हणून काम करताना सुद्धा इतर देशांत भोगावी लागत नाही. रस्ते तुम्हाला ठार मारत नाहीत, वाहन परवडते, पिण्याचे पाणी पण्यासारखे असते, हवा फुफुफ्सांत घेतली असता दोन सिगारेटी पिल्या प्रमाणे वाटत नाही, शाळेत जाताना रस्ता क्रॉस करताना आपल्या मुलांना कुठली तरी बस किंवा ट्रक चिरडून जाणार नाही हि खात्री, कधी कधी फिरायला चांगले पार्क, विविध प्रकारचे अन्न, रात्री फिरताना कुणी तरी आपला बलात्कार करणार नाही हि खात्री, अश्या छोट्या छोट्या गोष्टीच आपले जीवन जगण्यासारखे बनवतात. आणि ह्याच अत्यंत सध्या गोष्टीसाठी लोक भारत सोडून इतरत्र जातात.

इतर देशांत समस्या अनेक आहेत पण त्या भारतीय समस्यांच्या मानाने कमी आहेत.

सर्वसाधारण भारतीयाला विनाकारण देशांत अवहेलना सहन करावी लागते हे १००% सत्य आहे.

साहना's picture

5 Jan 2023 - 2:46 pm | साहना

The society which scorns excellence in plumbing as a humble activity and tolerates shoddiness in philosophy because it is an exalted activity will have neither good plumbing nor good philosophy: neither its pipes nor its theories will hold water
---John W. Gardner.

बहुतांशी लोक सर्व सामान्य आयुष्य जगण्यासाठीचा विदेशांत जातात. सर्वसामान्य आयुष्य हेच लोकांना इथे मिळत नाही.

श्री साहना, तुमचे म्हणणे पुर्णपणे बरोबर आहे.
परदेशात गेलेले सगळे भारतीय सीईओ आणि तत्सम पदावर जात नाहीत. बहुतेकांचे जीवन सर्वसामान्यपणेच जाते.
---
सर्वसामान्य लोकांना जास्त काही नको असते, शाश्वत उत्पन्न (याचा अर्थ नोकरीच्या, व्यवसायाच्या, शिक्षणाच्या संधी असा होता), आणिबाणीच्या परिस्थितीमध्ये (नोकरी जाणे, आजारी पडणे, कोणी त्रास दिला इ.इ) न्याय्य मदत, डोक्याला त्रास न होता सरकारी कामे होणे, तोंड बघुन नियम न बदलणे, दिलेया वचनाला जागणे अश्याच गोष्टी हव्या असतात.
आणि त्याच सहजपणे मिळत नाहीत.

सर टोबी's picture

5 Jan 2023 - 9:14 am | सर टोबी

तुमची अतिरेकी ऊजवी विचारसरणी, जी वारंवार भात खातांना गारेच्या खड्यासारखी मध्ये मध्ये येते, ती सोडली तर प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे.

कर्नलतपस्वी's picture

5 Jan 2023 - 10:57 am | कर्नलतपस्वी

@सर टोबी जी,

आमच्या भातातले खडे दिसले पण @सहाना जींची भाषा नाही दिसली.

प्रतिसादातील भावनेशी सहमत आहे. यातच सर्व आले नाही का?
अतिरेकी उजवी वगैरे काही नाही,देशातील घडामोडींवर लक्ष असते सर्वांचेच समर्थन करत नाही. असभ्य भाषा प्रयोग, तो सुद्धा देशाबद्दल आणी पोटार्थी,देशोधडीला लागलेल्या कडून, ना मंजूर.

लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम

मला जास्त माहीती नाही पण त्यांचा जन्म याच देशातला आयुष्यातली आठरा विस वर्ष याच देशाच्या अन्नावर वाढल्या असतील. या देशात काहीच चांगले दिसले नाही!
देशाला भिकार,घाणेरडा,मागासलेला, आशी विषेशणे लावतात याबद्दल काहीच म्हणायचे नाही!

आम्ही तर मागासलेले पण तुम्ही तर शिकलेले,सुसंस्कृत ना?भाषा उपरोधिक पण सभ्य, संयमित नको? एक गोष्ट चांगली म्हणताना दुसरी घाणेरडी,भिकार म्हणले म्हणजे ते खरे ठरत नसते.

त्यांचा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचून बघा.
किती खोटारडी विधाने आहेत. कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय, सरकार देवळात हस्तक्षेप करत आहे याचा व परदेशी जाण्याचा काय संबध?

इतकापण काही वाईट नाहीये भारत. आजही कित्येक विदेशी इथली संस्कृती,शिल्प,नृत्य कला,साहित्य हे शिकण्यास भारतात येतात तुलनात्मक कमी पण येतात हे सत्य आहे.

बरोबरच आहे म्हणा, ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे.
शेवटी एक स्पष्ट करावेसे वाटते,
प्रतिसाद देणे म्हणजे फटकावणे वगैरे काही नाही. भाषेवर आक्षेप म्हणून खटाटोप एवढेच.

लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम

श्री कर्नलतपस्वी, तुम्ही सैन्यात होता. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात किती संघर्ष करायला लागला आहे त्याबद्दल शंका आहे. (सैन्यातील नोकरीतील काम म्हणजे संघर्ष होत नाही.)
सैनिकांना कामादरम्यान आणि निवृत्तीनंतर मिळण्यार्‍या सुविधांचा हेवा वाटतो. ही कथा सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचार्यांची असते.
माझ्या व्यक्तीगत अनुभवानुसार भारतातील बहुतांशी सरकारी कर्मचारी मुजोर, कामचोर आणि सरकारी पदाचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करायला पुढे मागे बघत नाहीत. त्यांना कायद्याचा कोणताही धाक नसतो. लोकांना चकरा मारायला लावणे, कोणतीही गोष्ट लिखित न देणे, जबाबदारी न स्वीकारणे, आज उद्या करत काम टाळणे. अश्या किती तरी उदाहरणे देता येतील.

(आणि कृपया सैन्याचा अपमान झाला अशी ओरड करु नका. तुम्ही पुर्वी सैन्यात होता म्हणुन जास्त अधिकार मागु नका येथे.)

लाख कमी आहेत पण माझा देश आहे. प्रथम

असली वक्तव्य म्हणजे राणा भीमदेवी थाटात केलेली वक्तव्ये आहे. जर तुम्ही सैन्यात नसता आणि सर्वसामान्य माणसांचा संघर्ष केला असता तर असली आंधळी विधाने केली नसती. भारत आमच्यासाठी सुध्दा प्रथम आहे, पण काही ठराविक वर्गासाठी इतर लोक राबत आहेत आणि आपले आयुष्य घालवत आहेत असे दिसते.
--

ज्याचे खावे दाणे त्याचेच गावे गाणे.

पुर्णपणे चुकीचे विधान. परदेशात राहिलेले (अनिवासी आणि पुर्व) भारतीय, भारत आणि भारता विषयी आत्ममियता आणि देशप्रेम बाळगुन असतात.

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 5:46 am | चौकस२१२

Trump सहमत

परदेशी भारतीयांनी पाठवलेले पैसे: $१०० billion
भारतीय माहीती तंत्रज्ञान क्षेत्राने कमावलेले पैसे: $१७८ billion
भारताच्या संरक्षण खर्चः $७३.८६ billion

संदर्भ:
https://www.meity.gov.in/it-export
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/us-replaces-...
https://en.wikipedia.org/wiki/Military_budget_of_India#2022-23

उपयोजक's picture

9 Jan 2023 - 7:57 pm | उपयोजक

कुठल्या हिन्दू मंदिरावर ख्रिस्ती अधिकारी नेमला या बद्दल उलगडा करतील काय

तिरुपतीच्या बालाजी मंदिरसंस्थेवर एक ट्रस्टी हे आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांचे मामा आहेत. जगनमोहन हे ख्रिश्चन आहेत. मामा कागदोपत्री हिंदू आहेत. याच मंदिरात अनेक ख्रिश्चन धर्मोपासक शिरु पाहत असतात.

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिेराच्या ट्रस्टींपैकी एकजण मुस्लिम आहे म्हणे. खखोदेजा!

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2023 - 9:48 pm | श्रीगुरुजी

अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2023 - 9:59 pm | श्रीगुरुजी

अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2023 - 10:13 pm | श्रीगुरुजी

अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

श्रीगुरुजी's picture

9 Jan 2023 - 10:18 pm | श्रीगुरुजी

अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री असताना सिद्धिविनायक विश्वस्त मंडळावर एका मुस्लिमाची नेमणूक केली होती.

एक भारतून परदेशात जाणारी व स्थानिक होण्यासाठी धडपडणारी मुलं

आणी दुसरा

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

काही लोकांना परदेशी गेल्यावर स्वर्ग दोन बोटे उरल्या सारखे वाटते,आपण काहीतरी इतरांपासून वेगळे आहोत आसा स्वतःबद्दल गोड गैरसमज होतो व सर्वज्ञ असल्याप्रमाणे अकलेचे तारे तोडू लागतात.

भारत गरीब आहे विकसनशील देश आहे याची पुरेपूर जाणीव भारतीयांना आहे तेव्हा त्यांच्या गरिबीची काळजी न करता स्वतःचे दारिद्र्य कमी कसे होईल या कडे वरील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या लोकांनी करावी.

लेखनाचा मुळ उद्देश प्रतिसादा मुळे भरकटू नये या करता भारतद्वेषी , पूर्वग्रहदूषित प्रतिसादाला प्रती-प्रतिसाद देणे बंद करत आहे.

उपाशी बोका's picture

5 Jan 2023 - 10:34 am | उपाशी बोका

या विषयावर पूर्वी पण खूप चर्चा झाली आहे. माझा आधीचा प्रतिसाद इथे वाचता येईल.

कर्नलतपस्वी's picture

5 Jan 2023 - 11:15 am | कर्नलतपस्वी

वाचला. बरेच प्रतिसाद सभ्य,संयमित व समर्पक,पटले.

परदेशी जा,जीथे अर्थिक,वैचारीक उन्नती होईल तीकडे जा तुलना करा पण सुसंस्कृत झालात तर सुसंस्कृत पणेच वागा,बोला.

संदीप डांगे याच्या प्रतिसादातला काही भाग,

>> मग होऊ देत की तुलना. तुलना करतांना तटस्थ भाव असेल तर पटते, झुकलेली भावना असेल तर ती तुलना नव्हे तर भलामण होते... भलामणही मान्य पण भारताबद्दल तुच्छ भाव ठेवणे पटत नाही. जसे वर 'बडगा दिसतो' वरुन 'आमच्यावर आरोप झाले' असे म्हटले आहे तसेच आता आमच्या भारतवासी लोकांवर तुच्छपणे केलेली विधाने आम्ही ऐकून तर घेणार नाहीच. स्पष्टच बोलतो.

१००%सहमत

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

5 Jan 2023 - 11:12 am | हणमंतअण्णा शंकर...

भारत का सोडावासा वाटतो?

१. साध्या साध्या गोष्टीसुद्धा टोकाच्या करून सोडणारी प्रत्यक्षातली संस्कृती- संस्कृतीचे कितीही गोडवे गायले तरी वैचारिकदृष्ट्या भारतीय लोक प्रचंड प्रतिगामी, मागास आहेत. सासुरवासासारख्या गोष्टी घराघरांत चालतात. प्रत्येक साध्या गोष्टीला उगीचच काहीतर संस्कृतीचा मुलामा द्यायचा आणि पुरुषी/सामाजिक अहंकार जपायचा. उदा. बायकांनी पुरुषांची ताटं उचलणे. अमुक एक हजार वर्षांपूर्वी युनिवर्सल विचार मांडणे वेगळे आणि ते समाजाच्या अंगाअंगात मुरलेले असणे वेगळे.
२. सामान्य भ्रष्टाचार - जगभरात सगळीकडे चालतोच, परंतु भारतात तो प्रत्येकपातळीवर आहे. केवळ सरकारीच नव्हे तर सगळीकडे. मला तलाठ्याला साहेब म्हणून गयावया करून आणि लाच देऊनच पुढे जावे लागते नाहीतर माझी जिरवली जाते. इतकेच नव्हे, खाजगीतही हा बोकाळलेला आहे. मी सीईटीसाठी चाटे कोचिंग क्लासमध्ये होतो तेव्हा माझी मेस बदलण्यासाठी तिथल्या एका क्लार्कने मला ९०० रुपये मागितले होते.
३. छुप्या हुकुमशाहीकडे वाटचाल - गेल्या दशकभरात भारताच्या सार्वजनिक आणि सरकारी, राजकारणी डिस्कोर्समध्ये जर 'हिंदुत्व' वगैरे शब्द तपासले तर भारताची वाटचाल हिंदू तालिबान होण्याकडे होत आहे हे मला तरी स्पष्ट दिसते. माझे वय फार नाही परंतु माझ्या लहानपणी, पौगंडात हे विषय इतके ऐरणीवर कधीच आले नाहीत. हे म्हण्जे पूर्णपणे भुरटे न्युसेन्स विषय. आता मात्र अत्यंत फालतू गोष्टींवरूनसुद्धा टोकाचे राजकारण केले जाते. सगळीकडून मूलतत्त्ववाद्यांना डोक्यावर घेण्याचे प्रकार सुरु झालेत. उदा. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरसारख्या ठिकाणी महिलांनी भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे वगैरे म्हणून मोर्चे काढलेत, घरांवर "इथे हिंदू राहतात" वगैरे स्टीकर्स लावणे, बिर्याणी हॉटेलांची तोडफोड केली. कुठल्याही गोष्टीमध्ये 'ही आपली संस्कृती नाही' अशी दमदाटी करणे वगैरे प्रकार इतके वाढत आहेत की उद्या परत सकच्छ की विकच्छ, स्त्रियांनी अमुकच कपडे घातले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची फारशी गरज नाही, चूल मूल असे विचार हळू हळू पुढे येतील आणि त्या कल्पनेनेसुद्धा थरकाप उडतो. "स्त्रीला पायातली चप्पल मानावे, तिला जाता येता कानफाडली पाहिजे" इत्यादी मुक्ताफळे उधळणार्‍या इंदुरीकरासारख्या कीर्तनकारांना डोक्यावर घेतले जाते आणि त्यांच्या कार्यक्रमांना अफाट गर्दी होते. स्त्रियाही एका बाजूला बसून या गोष्टींना मान डोलवत असतात हे दृष्य जर कुणाला आशादायक वाटत असेल तर वाटो. मला मात्र वाटत नाही.
इन्क्रिमेंटल, छोटे छोटे बदल केले की ते नजरेत अजिबात येत नाहीत पण काही वर्षांनी आपण कुठवर आलो हे पाहिले की भस्कन मागासपणाची आणि आपल्या चुकांची जाणीव होईल, अर्थात तोवर वेळ निघून गेलेली असेल. उदाहरण द्यायचे तर - मागच्या वर्षी अनेक व्हीपीएन कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. कारण नव्या सरकारी नियमांनुसार सर्वर लॉग्ज साठवून ठेवणे, सरकारला ते विनाशर्त विनाअट पुरव्णे बंधनकारक केले गेले आहे. यावर कुणीही जनजागॄती केली नाही की विरोध केलेला नाही. गोष्ट छोटी, पण लांबून डोंगराएवढी. असं हुकुमशाही राजवटीत होतं.
४. अकार्यक्षमता - मला लोक अकार्यक्षम वाटत नाहीत पण व्यवस्था वाटते. विखंडित शेतीचा प्रश्न धोरणीपणाने सोडवला नाही तर हवामानबदलाच्या पडत्या काळात भारताचे प्रचंड नुकसान होणार. प्रचंड कमी सूर्यप्रकाश असूनही जर्मनीसारखी राष्ट्रे सोलार पॉवर इत्यादी गोष्टींमध्ये भारताहून अनेक दशके पुढे आहेत.
५. अर्धवट इन्फ्रा - एखादी गोष्ट 'का' करायची याचा साधा कॉमन सेन्ससुद्धा नसतो. उदाहरण, मेट्रो सारख्या गोष्टींवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. परंतु जगातील प्रत्येक पुढारलेल्या शहरात मेट्रो हे एका मोठ्या पब्लिक ट्रानस्पोर्ट सिस्टिमचा केवळ एक भाग असतो. बसेस, इतर मोठ्या पल्ल्याची रेल्वे सिस्टिम एकात एक गुंतवून प्रचंड कार्यक्षण यंत्रणा उभी केलेली असते. ती कार्यक्षम असतेच शिवाय रोबस्टही असते आणि समाजातल्या सर्व स्तरांना जास्तीत जास्त फायदा मिळावा अशा या योजना आखलेल्या अस्तात. बी आर टी नावाचा हास्यास्पद प्रकार खेळून झाल्यावर आपले मूर्ख लोक लगेच मेट्रोच्या नादी लागले. विकासाची ही अर्धवट कल्पना झाली.
६. इनोव्हेशन/सृजन आणि जुगाड यांच्यातली गल्लत - भारतीय लोक जुगाडालाच सृजन समजात. तसे करायला हरकत नाही पण सृजन करण्याची आपली क्षमता तरी आपण विकसित करतोय का हे ही महत्त्वाचं आहे. भारतीय शिक्षणव्यवस्था नावाचा एक मोठा विनोद याला कारणीभूत आहे. ती धड रोजगाराला सक्षम करणारीही नाही किंवा लोकांना शहाणी समजूतदार करणारीही नाही.
८. नैसर्गिक स्त्रोतांची हेळसांड - इतक्या वेळा बोंबलूनही भारतीय लोकांना सुका कचरा आणि ओला कचरा यांच्यातला फरक कळत नाही. भारतातल्या सर्वच नद्या टोकाच्या प्रदूषित आहेत आणि त्या त्यांच्या ७० वर्षांपूर्वीच्या स्थितीत जरी आणायच्या म्हंटल्या तर सगळा देश उल्टा पालटा करावा लागेल. एसटी मधून नदीला पाया पडून प्लास्टिकच्या बाटल्या फेकणारे महाभाग मी पाहिले आहेत.

प्रचंड लोक आहेत त्यामुळे उडदामाजी काळे-गोरे या न्यायाने चांगली माणसेही भरपूर आहेत म्हणून इथवर वाटचाल झाली.

भारत का सोडावासा वाटत नाही?
१. हवामान - रोज सूर्य दिसणे ही खूप मोठी बाब आहे.
२. कुटुंब - बहुतेक कुटुंब हे भारतातच आहे.
३. नैसर्गिक आरोग्य - शरीराला इतर प्रदेश मानवतीलच असे नाही. शेवटी फिजिकल मर्यादा असतातच.
४. वैविध्य - खूप मोठी अ‍ॅसेट आहे. ( जरी हिंदूराष्ट्राच्या नावाखाली वैविध्य नाकारण्याचा एककलमी कार्यक्रम होत असला तरी भारतीय पुरुन उरतील ही आशा कुठेतरी वाटते.)
५. जुळवून घेणे - एका बाबतीत भारतीय पुढे आहेत. (नाईलाजाने ) परिस्थितीशरणता आहे की जुळवून घेणे आहे यातला फरक लगेच कळत नाही, पण ही एक गोष्ट आवडते.

एकंदरीत भारत सोडावा वाटणे याला सांस्कृतिक कारणे आहेत, आणि न सोडावा वाटणे याला नैसर्गिक (फिजिकल) कारणे आहेत.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2023 - 11:24 am | श्रीगुरुजी

मुद्दा क्रमांक ३ वगळता इतर मुद्द्यांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे.

श्रीगुरुजी's picture

5 Jan 2023 - 11:25 am | श्रीगुरुजी

मुद्दा क्रमांक ३ वगळता इतर मुद्द्यांशी बऱ्याच प्रमाणात सहमत आहे.

अप्पा जोगळेकर's picture

5 Jan 2023 - 6:28 pm | अप्पा जोगळेकर

बरेच काही बदलले आहे, बदलत आहे. काही काही घरांमध्ये कटकट करणारे म्हातारे लोक असतात त्यांना स्वतः:च्या आयुष्यात काही करता आलेले नसते मग ते आजूबाजूच्या लोकांवर राग काढत राहतात. इथेही तसेच आहे काही जणांना स्वतः:च्या आयुष्यात अपयश येते, लायकी नसते किंवा आळशीपणा असतो अंगात मग ते आजूबाजूच्या लोकांवर, सरकारवर, देशातल्या व्यवस्थेवर राग काढत राहतात.
भारतात २२ कोटीच्या आसपास दुचाकी आहेत, ७ कोटी चारचाकी आहेत म्हणजे अंदाजे प्रत्येक घरात एक वाहन आहे. उगाच एखाद्या आदिवासी वस्तीचे उदाहरण देऊ नये अपवाद सगळीकडे असतो. तसाच हा नियम सरसकट लागू होणार नाही.
याशिवाय आयुष्मान भारत सारख्या योजना मुले अति गरीब माणसे सुद्धा आरोग्य विमाचा लाभ घेतात. सिक्युरिटी गार्ड वगैरे लोकसुद्धा अति गरीब कॅटेगरीत येत नाहीत त्यांना सुद्धा १५ हजार किंवा जास्तच पगार असतो. म्हण्जे जिवन्मान किती उण्चावले आहे बघा.
खेड्यांमध्ये मजुरीसाठी लोक मिळत नाहीत कारण गहू २ रुपये किलो आणि तांदूळ ४ रुपये किलो ने मिळत होता रेषन वर. आता हे बंद झाले आहे बहुधा कारण आता धान्य फुकट मिळते रेशन कार्ड पांढरे वर. बरेच जण फक्त फक्त क्वार्टरचे पैसे मिळेपर्यंत मजुरी करतात. ह्याला गरिबी म्हणायचे का? नोव्हेंबर महिन्यात चार चाकी गाड्यांची विक्रमी विक्री झाली, सुट्ट्या आल्या कि पर्यटन स्थळे फुल्ल असतात , कामवाल्या बायका त्यांच्या नवऱ्याला, मुलांना घेऊन हॉटेलात जेवतात बऱ्याचदा काही जण पार्सलहि मागवतात हे मी कनिष्ठमध्यमवर्गाबद्दल सांगत आहे.
India's air traffic touches 1.29 crore passengers in Dec 2022, crosses pre-COVID levels हि बातमी वाचली का कोणी. हे सगळे जण नक्कीच अतिशय गरीब असणार ना? २७ डिसेंबर ला ४ लाख एअर तिकीटे बुक झाली हि विक्रमि विक्रि होती.
प्रचंड प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे, वैनगंगा ते नळगंगा सिंचन , समृद्धी महामार्ग, ऍक्सेस controlled एक्क्सस्प्रेस वे, बुलेट ट्रेन सारखे अति महत्वाकांक्षी प्रोजेक्त होत आहेत, ह्यातून प्रवास करणारे गरीब आहेत का?
मुळात ब्रेन ड्रेन या शब्दाला काही अर्थच नाहीये. काही ठराविक शिक्षणसंस्था यातले पास औट परदेशात जातत. त्यात काही चूक नाही. प्रत्येक जण अधिक चांगले प्रोस्पेक्ट्स पाहतो पण त्याला ब्रेन ड्रेन म्हणायचे म्हणजे फक्त त्यांनाच बुद्धी आहे इतरांना नाही असा अर्थ होतो. ह्यात काहीच चुकीचे नाहीये का?
याशिवाय डिजिलॉकर, UIDAI, online सातबारा, डायरेक्ट बेनिफिट to अकाउंट अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे बाबूशाही थोडीतरी कमी झाली.
स्वतः ला काही चांगले, भरीव करता येत नाही म्हणून सगळा देश वाईट हा तर्क मात्र अजब आहे.

सर टोबी's picture

6 Jan 2023 - 9:26 am | सर टोबी

भारतात कुटुंबांची एकूण संख्या आहे २९ कोटी आणि सरासरी ४.८ एवढी कुटुंबागणिक सदस्यांची संख्या आहे. २२ कोटी वाहनं असतांना देखील ७ कोटी घरांमध्ये वाहन नाही. म्हणजे सुमारे ३४ कोटी लोकांकडे वाहतुकीचे साधन नाही. २२ कोटी दुचाक्यांपैकी पाच टक्के दुचाक्या या माणशी एक याप्रमाणे ऐपत असणाऱ्या कुटुंबात असतील तर अजून पाच कोटी लोकसंख्या वाहतुकीच्या साधनांपासून वंचित असते. आता या ३९ कोटी लोकांमध्ये किमान १४ कोटी लोक मिळवते असतील तर ते सर्वस्वी वडाप, बसेस यांचा वापर करीत असतील. आणि लोकसंख्येच्या १० टक्के लोकांची “एवढी तफावत तर कुठेही असतेच” अशी आपण संभावना करणार असाल तर अशी देशभक्ती तुम्हालाच लाभो.

हि फक्त एका आकडेवारीची चिरफाड आहे.

अप्पा जोगळेकर's picture

6 Jan 2023 - 12:10 pm | अप्पा जोगळेकर

एका आकडेवारीची चिरफाड करतानासुद्धा इतक्या चुका आहेत आता आणखीन चुका टाळाव्यात. माणशी एक दुचाकी वाली 5 टक्के कुटुंब हे assume केले आहे. मग माणशी 0 दुचाकी असणारी पण गरीब नसणारी कुटुंब सुद्धा धरली का? अशी खूप माणसे आहेत. शिवाय वृद्ध माणसे सुद्धा सहसा वाहन चालवणे टाळतात. एखादा मेट्रोने किंवा बसने किंवा वडाप ने प्रवास करत असेल तर तो अतिशय गरीबच असेल असे गृहीत धरले आहे. आणि 22 कोटी दुचाकी आहेत फक्त. 7 कोटी चारचाकी आहेत त्या वेगळ्या. यामध्ये रिक्षा, टमटम वगैरे धरलेल्या नाहीत. तसा युक्तिवाद करायला काहीही करता येईल. फक्त 100 लोकांकडे मिळून 7 कोटी चारचाकी असतील असेही assume करता येईल. त्याला काही अर्थ नाही

शिकागो १९०० असे गुगल इमेजीस मध्ये टाकून पहा. भारतीतील कुठलेही शहर आज सुद्धा त्याची बरोबरी करू शकत नाही. वाहनांची गोष्ट सांगायची झाली तर दुचाकी आणि ४ चाकी माध्यम वर्गीयांना परवडायला साधारण २००० साल उजाडावे लागले. त्याआधी भारत सरकारने जवळ जवळ सर्व वाहन उद्योगावर बंदी घातली होती. काँग्रेसी मित्र बजाज हे अत्यंत भिकार दर्जाची स्कुटर लोकांच्या माथी मारत असत.

आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ?

९०% भारतीय जनता $३०० सुद्धा महिन्याला कमवत नाही ह्या लोकांना दुचाकी कशी परवडेल? हे आकडे पहा बिहार सारख्या गरीब राज्यांत फक्त ३०% घरांत दुचाकी आहे. चार चाकीची परिस्थिती आणखीन खराब आहे. महाराष्ट्रांत फक्त ८% घरांत तर बिहार मध्ये फक्त २% घरांत चारचाकी आहे.

हे आकडे पाकिस्तान किंवा व्हिएतनाम च्या तुलनेत खराब नसले तरी जागतिक स्तराचं दृष्टीने अत्यंत खराब आहेत.

आज सुद्धा सरकार मृत्यूचे सापळे रस्ते बनवते आणि ४ चाकी वाहनावर भरपूर कर लावून लोकांना धोकादायक अशी दुचाकी चालवायला भाग पडते. अक्षरशः हजारो तरुण आणि तरुणी दार वर्षी ह्या मृत्यूच्या सापळ्यात पडून विनाकारण मरतात. आणि म्हणे "डेटा सिक्योरिटी" वर सरकारचा नवीन कायदा येणार आहे. ह्या पोरांना कोण सिक्योरिटी देणार ?

श्री साहना, हे तुमचे म्हणणे बरोबर असले तरी पुर्ण दोष सरकारला देता येणार नाही.
लोकांना कितीही सांगितले तरी ते कायदे पाळायला तयार नसतात. तुम्हाला येथे झालेल्या काही चर्चांचे दुवे देतो.

हेल्मेटसक्ती - प्रकाश घाटपांडे https://www.misalpav.com/node/29420
चला हेल्मेट घाला रेऽऽऽ........ - मनिषशिल्पाअनुसे https://www.misalpav.com/node/36728
नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा - उगा काहितरीच https://www.misalpav.com/node/50575

ही काही साधी उदाहरणे आहेत, अशी बरीच देता येतील.
भारतातील किती प्रवासी उपलब्ध असलेली खुर्ची पट्टी वापरतात ? श्री सायरस मिस्त्री अश्याच एका अपघात मरण पावले. ते गरीब, अज्ञानी होते असे कोणी म्हणु शकत नाही.

Trump's picture

6 Jan 2023 - 1:12 pm | Trump

मग माणशी 0 दुचाकी असणारी पण गरीब नसणारी कुटुंब सुद्धा धरली का? अशी खूप माणसे आहेत.

+१

साहना's picture

6 Jan 2023 - 12:55 pm | साहना

cars per capita

निरागस लोकांच्या मते भारतात सर्वसाधारण ५०.३ टक्के सधन लोक आहेत ज्यांना दुचाकीची गरज नाहीय.

मस्त चर्चा चालु आहे. (की धुरळा उडतो आहे.)
---
एक गोष्ट् कोणी लिहीली नाही, भारतामध्ये गेल्या काही वर्षात आंतरजाल खुप वेगवान झाले आहे.

+१ इंटरनेट आणि स्मार्टफोन चा प्रसार हि मागील काही वर्षातील भारतातील जमेची बाजू आहे. सुदैवाने भारत सरकारने लुडबुड करायच्या आधीच हा प्रसार वेगाने झाल्याने लोकांच्या नशिबी जागतिक दर्जाच्या सेवा आल्या नाहीतर इथे सुद्धा अवस्था सरकार निर्मित रस्त्याप्रमाणे झाली असती.

दुसरी जमेची बाजू म्हणजे भारतात एकूण विमानतळाची संख्या वाढत आहे. मागील १० वर्षांत साधारण १०० नवीन विमान तळ पूर्ण तरी झाले आहेत किंवा बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत.

१. भारतातील राहणीमानाचा स्तर अत्यंत भिकार आहे.
याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते.
२. बहुसंख्य भारतीय व्यक्ती अत्यंत अडाणी, गरीब आणि अकार्यक्षम आहेत.
तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता
३. याच शिकलेलया,सुसंस्कृत लोकांनी होमी भाभा यांचा विमान अपघात घडऊन आणला. कारगील हल्लाच्यावेळी भारताला जि. पी. एस. चे इनपुट द्यायला नकार दिला. इराक देशाला बर्बाद केले. लिबियाचा गडाफीला मारले.
४. करोनाच्या काळात भारताने इतर देशांना केलेली मदतही आपण विसरलात का? इतर देशांचा नागरिकांची अफगाण, कुवेत, युक्रेनमधुन सुखरुप सुटका केली. तरीही भारतीय असंस्कृत?
तूम्ही मिसळपाव वर लिहिण्यापेक्षा लोकसत्ता महाराष्ट टाइम्समधे लिहा. जास्त समर्थक मिळतील.

> याला कारणीभुत तुमच्या मते सदगुणी पाश्चात देशच आहेत. आजची युरोपीयन देशांची संपन्नता भारतासारख्या देशांना लूटूनच आलेली आहे. कदाचीत तुम्हाला इतिहासाचा सोयिस्कररीत्या विसर पडलेला दिसतो. हेच शिकलेले,सुसंस्कृत भारतात लोक दुष्काळाने लोक मरत असतांना आपला खजिना भरत होते.

पाश्चात्य देशांना सद्गुणी मी म्हटले नाही. तेथील राहणीमानाचा दर्जा भारताच्या कैक पटीने चांगला आहे हे निर्विवाद सत्य मी मांडले आहे. तुम्ही सुद्धा ते मान्य करत आहात. पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. ज्या प्रमाणे भारतातील मागासलेले लोक आपल्या खराब स्थितीसाठी मनुस्मुर्ती किंवा सवर्णांना आयुष्यभर दोष देत असतात त्याच प्रकारे मागासलेले देश आपल्या नालायक पणा साठी इतिहासाला दोष देत असतात. इतर देशांची समृद्धता भारताला लुटून आली नाही. नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ? आणि अली असली तरी मागील ७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल.

>तरीही पाश्चात देश कंपनीचे अध्यक्ष भारतीयच नेमतात. त्यांना तूम्ही जरा समजाऊन सांगा. ह्याच अडानी लोकांनी देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली जी फक्त २० वर्षापूर्वी पहिल्या दहा अर्थव्यवस्थांमधे पण नव्हती. आणि तेही कोणत्याही देशाला न लुटता

भारतीय लोक भारत सोडल्यानंतरच इतके यशस्वी बनतात. ७०% भारतीयांना अजून सुद्धा ठीक पणे लिहिता वाचता येत नाही. हे सत्य आहे.

भारताची अर्थ व्यवस्था ५व्या क्रमांकावर आली आहे ह्यांत छाती बडविण्यासारखे काहीही नाही. १४० कोटी लोकसंख्या असलेला हा देश पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे होता. दर माणसी दुर्ष्टीने पाहिल्यास भारत अजून जगांतील सर्वांत दरिद्री लोकांपैकी आहे आहे.

भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि संपत्ती जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे.

पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे.
ब्रिटिशांनी भारतातून नेलेली संपत्ती ४५ ट्रीलीयन डालर्स इतकी आहे. भारताची अर्थव्यवस्था १९४७ मधे ३.४७ ट्रीलीयन डालर्स इतकी होती. आता जर तरीही तुम्ही पाश्चात्य देशांची समृद्धता भारताला लुटून आली आहे अशी निरागस समजूत भारतीयांनी आपले षंढत्व लपविण्यासाठी केली आहे. असे म्हणत असाल तर तुम्ही मुद्दाम गैरसमज पसरवत आहात असे नाईलाजाने म्हणावे लागेल.
नंगा नाहायेगा क्या और निचोडेंगा क्या ?
आपले विचार ईंग्रजांना माहित नव्हते, म्हणून ते १५० वर्ष भारतात निचोडत होते.
७० वर्षांत भारतांत जे दारिद्र्य पसरलं त्याच खापर भारतीय लोकांच्या डोक्यावरच फोडावे लागेल.
७० वर्षांत भारतांत दारिद्र्य पसरलं, हे तुम्हाला कोणी सांगितले? स्वातंत्राचावेळी भारतात ८०% जनता गरीब व १९६६ मधे दारिद्र्य रेषेखाली होते, ते २०२२ मधे १६.४% आहेत [ संदर्भ :Global Multidimensional Poverty Index 202] भारताब द्द्ल जर खरी माहीती नसेल तर विचारा, इथे नक्कीच मिळेल. पण कॄपया चूकीची पसरऊ नका आणि तोपर्यत भारतीयांनी काय करायला हवे? हा आपला बहु मोल सल्ला आपल्या जवळच ठेवावा.
भारत सरकार बहुतांशी आपल्याच लोकांना लुटत असल्याने इतरांना लुटायला जायची त्यांना गरज नाही. विविध काँग्रेसी मंडळींनी गरीब भारतीयांना इतके लुटले आहे त्याची सर अगदी ब्रिटिश राजसत्तेला सुद्धा नाही. सोनिआ गांधी ह्यांच्या कडे ब्रिटिश राणी पेक्षा जास्त संपत्ती आणि पावर आहे. बारामती फवार साहेबांकडे कुठल्याही ब्रिटिश लॉर्ड किंवा ड्यूक पेक्षा कैक पटीने जास्त संपत्ती आहे आणि हि बारामती फवार जगांतील सर्वांत गरीब अश्या भारतीयांचे रक्त शोषून आली आहे.
तसेच आपण सोनिआ गांधी, बारामती फवार यांच्याप्र माणेच ट्रंप तात्यांच्या उत्पन्नाचे शोध घ्यावेत.

पुन्हा तोच मुद्दा. आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे.

जर भारत सामर्थ्यशाली आणि श्रीमंत विश्वगुरू होता तर मग इतक्या दूरवरून बोटीने येऊन गरीब, असुंस्कृत आणि असामर्थ्यशाली इंग्रजांनी २०० वर्षे देशाला गुलाम विश्वगू कसे बरे बनवले ? उद्या आम्ही आणि तुम्ही मिळून अंबानी आणि अडाणीला गुलाम बनविण्याचा प्रयत्न केला तर तो यशस्वी ठरेल का ?

आणि हे मुद्दे मान्य केले तरी मागील ७० वर्षांतील भारताची अधोगती इंग्रजांवर लादली जाऊ शकत नाही. १९४८ साली भारत विश्वगुरू नसला तरी आशियागुरु होता, भरतीय लोकांच्या नेतृत्वाखाली काही दशकांतच भारत आशियागुरु वरून आशियागु वर जाऊन पोचला. हाच दरम्यान जर्मनी, जपान, दक्षिण कोरिया, पोलंड, चीन इत्यादी देश युद्धांत उध्वस्त होऊन सुद्धा बऱ्यापैकी श्रीमंत झाले. २०२२ भारतांत सर्वांत मोठे डेव्हलोपमेंट चे मुद्दे आहेत रस्ते जे छोट्या पावसांत वाहून जात नाहीत, पूल जे उद्धघाटनाच्या वेळीच पडत नाहीत, संडास, वेळेवर धावणाऱ्या (संथ गतीने का असेना) ट्रेन्स, प्राथमिक शाळेंत ऍडमिशन, हे बहुतेक विषय इतर जगाने १००-१५० वर्षे आधीच सोडवले होते.

भारतीय समाज माणसात साधारण १९९० च्या दशकांत आला. ह्याला मुख्य कारण होते जागतिक बँकेने भारत सरकारची मग्रुरी तोडून त्यांना जबरदस्तीने आर्थिक सुधारणा करण्यास भाग पाडले. श्रेय नरसिम्ह राव किंवा मौन सिंग घेत असले तरी ह्याचे प्रमुख कारण जागतिक बँक आणि पाश्चात्य राष्ट्रे होती. ह्या सुधारणांना आता लोक चांगले म्हणत असले तरी त्या काळी संपूर्ण समाज "देश विकायला काढला आहे" असे म्हणून शिव्या देत होता. कारण समाज आणि त्याची मानसिकताच मुळांत मागासलेली होती. मोदी सरकार कडून रिफॉर्म्स ३.० ची अपेक्षा होती पण तिथे सुद्धा तीच मागासलेली विचारसरणी नडत आहे आणि कदाचित त्याच मुळे मोदी ह्यांनी आर्थिक सुधारणांचा नाद सोडून आपली सत्ता कशी मजबूत होत राहील ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. ९० मधील सुधारणा झाल्या नसत्या तर भारताची स्थिती आणखीन खराब झाली असती.

आपल्या समाजाची अधोगती आणि षंढत्व लपविण्यासाठी हवेतून निर्माण केलेले आणि पूर्णतया निरर्थक आकडे.
हे आकडे माझे नाही आहेत. हे आंतरराष्टीय आकडेवारीतून घेतले आहेत. आता ती आकडेवारी निरर्थक वाटत असेल तर तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे. ईस्रो, रेल्वे , आय टी. मधे भारताने केलेली प्रगती व भारताच्या प्रगतीमधे पाश्चमाश्त देशांनी आणलेली विघ्न(उदा. क्रायोजेनिक ईंजिन मिळू न देणे, पाकिस्तानला शस्त्र देणे, शास्त्रन्यांचा हत्या, देशविरोधी आंदोलनाना आर्थिक व नैतिक पाठींबा ईत्यादी) दिसत नाहीत.

श्री साहना यांनी अतिशय सरसटीकरण चालु केले आहे. :(

तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते.

बर्‍याच अंशी नक्कीच

कर्नलतपस्वी's picture

9 Jan 2023 - 3:02 pm | कर्नलतपस्वी

तूमच्याशी बोलण्यातच अर्थ नाही. तूमची विचारसरणी पहाता पूर्णत ब्रेनवाश झाला आहे,असे वाटते. तुम्हाला ७० वर्षातलया फक्त वाईट गोष्टीच दिसत आहे.

डिजीटायझेशन.

भाजी विकणारा,गाडी धुणारा,पान विकणारा असे छोटे व्यवसायीक सुद्धा गुगल पे अथवा अन्य कॅशलेस ट्रॅजेक्शन करता आहेत.

सारथी सारख्या संकेतस्थळावर जाऊन आर टी ओ ची कित्येक, किंबहुना सर्वच कामे दलाला शिवाय व भ्रष्टाचारा शिवाय करू शकतो.

पत्ता.

झोमॅटो,स्वीगी,आमेझाॅन सारख्या होम डिलीव्हरी देणाऱ्या, कमी शिक्षण घेतलेल्या मुलांना बरोबर घरचे पत्ते कसे सापडतात हो याचा कुणी विचार केलाय का!

अशी एक ना अनेक चांगली उदाहरणे देऊ शकतो.
डिजीटायझेशन प्रगतीपथावर आहे, विकासातले अडथळे दुर होतायतं. समाज बदलतोय यात शंकाच नाही. कितीही प्रगतीपथावर समाज असला तरी तो परिपूर्ण कधीच होत नसतो.

या देशात काय चांगले काय वाईट,काय कमी काय जास्त,काय चुक काय बरोबर याची माहीती इथल्या जनतेला आहे व त्यावर विचार करण्यास इथले लोक समर्थ आहेत.

हे कसं,

आकाबाईच्या म्हशी अन बोकाबाईला उठाबशी !

धाग्याचा मूळ विषय हा लोक देश का सोडून जात आहेत हा होता. त्यामुळे देशांतील कमतरता ह्या स्वाभाविक पणे चर्चिल्या जाणे आवश्यक आहे. इतकेच नाही तर देश सोडून जाण्यांत भारतीय लोक नंबर एक आहेत. भारताचे जवळ जवळ १% लोक देशाच्या बाहेर आहेत. लोकसंख्येच्या मानाने हा आकडा अत्यंत अवाढव्य आहे. त्याशिवाय देश सोडून जाणे हि गोष्ट फक्त श्रीमंतांची मक्तेदारी नाही. बहुतेक श्रीमंत लोकांनी इतर देशांचे नागरिकत्व घेतले आहेच (अंबानी परिवाराचा नातू अमेरिकेत जन्माला येऊन तिथला नागरिक झाला आहे) पण मध्यमवर्गीय आणि गरीब लोक सुद्धा विविध देशांत वेगाने स्थलांतर करत आहेत.

त्यामुळे देशांतील कमतरता हि छोटी नसून खूप मोठी आहे आहे संपूर्ण समाजाला भेडसावणारी आहे हे लक्षांत येते. कमतरता मान्य केल्याशिवाय त्यांत सुधारणा शक्य नाही.

देशांत काहीच चांगल्या गोष्टी नाहीत असे म्हटले नाही. असतील, अनेक असतील पण त्या पुरेश्या नाहीत लोक लोकांचा जो लोंढा बाहेर जात आहे त्यावरून सिद्ध होते. अजून सुद्धा साधारण माध्यम उत्पन देशांचा राहणीमानाचा स्तर भारतीय राहणीमानाच्या स्तरापेक्षा चांगला आहे.

रानरेडा's picture

7 Jan 2023 - 12:29 am | रानरेडा

बाकी सर्वांचे जे ओळखीचे  लोक अमेरिकेत/  विदेशात जातात ते सर्व देशप्रेमी / सरळ साधे / गोड गोड / संसारी  सतत देशाच्या नावे उमाळे काढणारे कसे असतात?

भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ?
 
माझे कोण ना कोणी ओळखीचे  अमेरिकेत गेली 30-32 वर्षे जातोय 
यातले काही थोडे जण अमेरिकन अय्याश झाले आहेत म्हंजे सुपर बाईक , बोटी , गाड्या , बंदूक , जुगार , गांजा ( मारणे आणि उगवणे), फिरणे, लिव्ह इन असले भारतात न परवडणारे किंवा मान्यता नसलेले छंद असलेले आहेत . बहुतेक मराठी आहेत
खास करून सुपर बाईक / हाय परफॉर्मन्स गाड्या तिकडे थोड्या चांगल्या पगारात परवडतात. आणि त्या चालवायला चांगले रस्ते पण आहेत . डूकाटी  आणि हार्ले ठेवणारे लोक आहेत . मस्टँग अमेरिकेत किती ला आहे ? भारतात ती एखाद करोड ला होती 
पिस्तूल / बंदूक भारतात छंद  म्हणून ठेवणे अशक्य आहे. आणि त्याचा दारुगोळा सहज मिळत नाही . भारतात  ३-४ गन  / पिस्तूल लायसन्स वर ठेवणे  अशक्य आहे . आणि त्याची किंमत पण फार होईल . 
अमेरिकेत जॅक डॅनिअल किंवा जिम बीम ची बाटली किती ला मिळते ? तेथील पगाराच्या मानाने ? भारतात किती सहजपणे त्या लेव्हल ची बाटली परवडते ? नेहमी चांगल्या पब मध्ये जाणे कितीसे परवडते ?
जुगार हा भारतात accepted छंद आहे का ?
गांजा भारतात बंदी घातली आहे . अमेरिकेत काही स्टेट मध्ये कायदेशीर रित्या मर्यादेत गांजा उगवू हि शकतो .
बाकी भारतात सामान्य executive  पगारात घड्याळे , लक्झरी  किती परवडते ? म्हणजे मी भारतात काय लाखांची घड्याळे असतात त्या बद्दल विचारतोय 
बहुतेक सर्व व्यवस्थित पैसा कमावणारे बरेचसे संसारी , मुले बाळे असलेले आहेत,काहींनी मुले न होण्याचा कॉल घेतला आहे.  

विदेशात व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे 
आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात - 
घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही 
तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही. ओळखीच्या मुली घटस्फोट होऊन परत लग्न केलेल्या आहेत. एकीचे दोन होऊन, बराच काळ लिव्ह इन मध्ये राहून ती त्या बरोबर संसारात आहे - किती जणांसाठी हे सहज शक्य आहे ?

याची पण तरुण पिढीला भुरळ पडत नसेल ?

साहना's picture

7 Jan 2023 - 1:36 am | साहना

> भलते सलते छंद असलेले , भारतात सहज न करता येणारे छंद असलेले ( उदा. बंदुका, जुगार, गांजा ) असे कोणी नाहीत का ?

भरपूर आहेत. ज्यांना छंदासाठी वेळ सुद्धा भारतात मिळाला नसता अश्या लोकांना इतर देशांत छंदासाठी वेळ मिळतो. बंदुका आणि जुगार ह्यांत मला विशेष रुची आहे. दोन्ही गोष्टी भारतांत सुद्धा उपलब्ध असल्या तरी सहज पाने मिळत नाहीत आणि quality खराब असते. गांजा कधी कधी ओढला जातो. त्याशिवाय मी इथे शिकार आणि मासे पकडायला सुद्धा जाते. धनुष्यबाणाने नि बंदुकीने आम्ही इथे शिकार करू शकतो.

पण ह्या शिवाय असंख्य छंद जोपासले जाऊ शकतात. वाईन टेस्टिंग हा एक छान छंद आहे $३ पासून $३००० पर्यंत च्या अनेक आंतराष्ट्रीय वाईन्स आपण इथे पिऊ शकतो. ज्यांना इतर दारूची आवड आहेत त्यांना सुद्धा हजारो प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

इथे लोव किंवा होम डीपोट मध्ये प्रत्येक प्रकारचे घर निर्मितीचे सामान मिळते. त्यामुळे अनेक लोक लाकूड काम, लेसर कटिंग, इपॉक्सी , ३D प्रिंटिंग हे छंद जोपासतात. जगांतील कुठल्याही प्रकारची कुसिन्स इथे मिळतात. बलोच, चिनी उईघुर, नेपाळी, इथिओपियन इत्यादी देशांची रेस्टोरंटस मध्ये विविध प्रकारच्या गोष्टी खायला मिळतात.

काही लोकांना भटकंती हवी असते. गाडीच्या फक्त एक टॅंक पेट्रोल वर तुम्ही खूप काही पाहू शकतात, ५० पेक्षा महा मोठे नॅशनल पार्क्स, लक्षावधी छोटे पार्क्स किमान अमेरिकेत उपलब्ध आहेत. इथे विविध प्रकारच्या संधी उपलबध आहेत.

हे सर्व छंद इथे साध्या पगारावर सहज जोपासले जाऊ शकतात. तुम्हाला एखादा छंद असला कि ताबतोब तुम्ही समविचारी लोकांशी मैत्री सुद्धा करू शकता. त्यामुळे आपोआप आपले नेटवर्क सुद्धा बनते.

ह्याच व्यक्ती देशांत असत्या तर संपूर्ण दिवस ट्राफिक मध्ये आणि सुट्ट्या नको त्या चिंता काढण्यात गेल्या असतंया. छंदाशी निगडित कुठलीही गोष्ट १००% टॅक्स भरल्याशिवाय मिळाली नसती.

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

असे होते का ? कि हे मूळ लेखकाचे तर्कट ?

असे कितीसे लोक आहेत जे रिटायर झाल्यावर भारतात आलेत ?
साधारण ६० -६५ वय पकडले तर ते लोक १९६३ - १९५८ साली जन्मले असतील . साधारण पंचविशीत १९८८ - १९८३ ला असतील
त्या काळात कितीसे भारतीय विदेशात जात होते ?
त्यातले किती परत आलेत ? का आलेत ?

काही माहिती नसताना मूळ धागाकर्त्याने पुडी सोडली आहे असे मला वाटते

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

ते जेव्हा भारतात येतात तेव्हा भरपुर पैसे घेउन येतात. शिवाय तिकडे कमवत असताना पैसे पाठवतात ते वरती दिलेलेच आहे.

रानरेडा's picture

7 Jan 2023 - 2:35 pm | रानरेडा

म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?

म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?

आखाती देशात गेलेले बहुतांशी सगळे परत आलेत.
पाशात्य देशातील साधारतः २० टक्के लोक परत आलेत. (अनुभवावरुन, कृपया विदा मागु नये.)

रानरेडा's picture

7 Jan 2023 - 2:35 pm | रानरेडा

म्हातारपणी परत आलेली किती ओळखीची उदाहरणे आहेत ? ते का आले ?

अप्पा जोगळेकर's picture

7 Jan 2023 - 4:43 pm | अप्पा जोगळेकर

असे म्हातारपणी परत येणारे लोक 5 टक्के तरी असतील का याबद्दल शंका आहे. यात चुकीचे काही आहे असे वाटत नाही.

माझ्या माहितीची एक श्रीमंत अमेरिकन व्यक्ती डिमेन्शिया झाल्याने भारतांत परत आली. दोन्ही मुले अमेरिकेत स्थायिक होती आणि त्यांनी वडिलांची जबाबदारी घ्यायची पूर्ण इच्छा दाखवली होती पण वडिलांचा इगो मोठा होता. त्यामुळे ते साधारण ५० वर्षे अमेरिकेत घालविल्या नंतर भारतांत परत आले. हल्लीच त्यांच्या बँकेने मुलांना पात्र पाठवले कि ह्यांचे चेक्स बाऊन्स होत आहेत, काही तरी करा. तेंव्हा मुलांनी बँक स्टेटमेंट पहिले तर बहुतेक पैसा गायब. तर काय स्थानिक काही संस्था आणि बँक मॅनेजर ह्यांनी साटेलोटे करून व्यक्तीच्या कमकुवत मनाचा फायदा घेऊन त्यांच्याकडून भरपूर पैसे विविध संघटनांना डोनेशन म्हणून उकळले.

असे प्रकार मी परदेशातही पाहीलेले आहेत.

अप्पा जोगळेकर's picture

7 Jan 2023 - 4:31 pm | अप्पा जोगळेकर

आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत.
अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते?
भारतातले राहणीमान दरिद्री आहे, भारतात दरिद्री लोक राहतात, भारतातल्या लोकांची लायकी नाही वगैरे विधानांबद्दल वाद होता. शिवाय आपण कुठे जन्माला आलो यावर आपले नियंत्रण नसते वगैरे विधानांमध्ये उगाचच अहंकाराचा दर्प दिसला. म्हणून माझा आक्षेप होता पण आता वरचे प्रतिसाद वाचल्यानंतर माझे काहीच म्हणणे नाही.

संपादित.  व्यक्तिगत टीका टाळावी.-व्यवस्थापन

आता ही नवीनच तुलना सुरू झाली आहे अमेरिका आणि भारत.
अमेरिका जगातले अव्वल दर्जाचे राष्ट्र आहे हे सर्वज्ञात आहे. शिवाय1947 मध्ये स्वतंत्र झालेला भारत आणि 1789 मध्ये स्वतंत्र झालेली अमेरिका यांची तुलना कशी काय होऊ शकते?

अगदी बरोबर. पाशात्य लोक कितीही एकमेकांबरोबर भाडले तरी ते नेहमी अपाशात्याविरोधात एकमेकांना मदत करतात.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

8 Jan 2023 - 4:59 am | हणमंतअण्णा शंकर...

लेखाच्या उद्देशापासून चर्चा भरमसाठ भरकटली आहे आणि काही लोकांचे प्रतिसाद पाहून मी परत ट्रॅकवर आणू इच्छितो.

या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे.

१. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण

बर्‍याच लोकांना हे काहीतर क्षुल्लक आणि फुटकळ फॅड वाटू शकते. परंतु हा प्रॉब्लेम भारताने सोडवल्यास तो हजारो/लाखो कोटी रुपये वाचवू शकतो. काही तज्ञांच्या मते हा प्रॉब्लेम बिलियन डॉलर्सच्याही पेक्षा मोठा आहे.

युरोपियनराष्ट्रांनी हा प्रश्न केव्हास धसास लावला आहे. आणि त्याचे फायदे प्रगत युरोपात प्रत्यक्ष राहिलेल्या लोकांना सहज लक्षात येऊ शकतील. कोणत्याही घराचा/वास्तूचा पत्ता हा तीन गोष्टींनी अचूक सांगता येतो. प्रशासनाच्या कोणत्याही पातळीवर हा पत्ता बदलत नाही. म्हणजे गावपातळीवर, जिल्हापातळीवर, राज्यपातळीवर किंवा देशपातळीवर.
१. रस्त्याचे नाव २. घराचा नंबर ३. पिन कोड

भारतात पत्ता हा प्रकार केवळ मूर्खपणा आहे इतके आपण मागास आहोत. उदाहरणार्थ - मला जर एखाद्या कंपनीचा पत्ता सांगायचा असेल तर जवळच्या चौकाचे नाव, कॉलनीचे नाव, अमुक झाड, तमुक ओढा, पेट्रोलपंप, हागणदार्‍या मुतार्‍या, समोर, उभे, आडवे, सेक्टर, गल्ल्या, ब्लॉक, टेकड्या, चतुर्थीचा चंद्र अगदी वाट्टेल ते सांगावे किंवा लिहावे लागते. ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले. नाहीतर आपली मजाच होती.

काही लोक महसूलविभागांचे सर्वे नंबर्स सुद्धा पत्त्यात टाकतात. शिवाय बेंगलोर मध्ये क्रॉस आणि लेन्स अस्तात, पुण्यात रोड आणि रस्ते नाहीतर संकल्पना असे लिहिलेले चु*या नगरसेवकांचे बोर्ड, रोज बदलणारी चौकांची नावे म्हणजे काहीही प्रमाणीकरण नाही. विशेषम्हणजे हे सिस्टीममध्ये मोजमापात नाही असे नाही. सर्वे नंबर, गावाच्या हद्दी, जमिनींचे प्रकार आणि झोन्स हे सगळे ठरलेले आणि व्यवस्थित रुजलेले आहे. महसूलीरचना मला वाटते राज्य आणि राष्ट्र या दोन्ही सूचींत येते. तरीही आपण याचा गांभीर्याने विचार करत नाही. आता प्रत्येक नगरपालिकांनी घरांना नंबर्स दिलेले आहेत, घरपट्टीचा नंबरही रंगवलेला असतो. तरीही आपल्याला ही व्यवस्था बसवता आली नाही हे आपले खूप मोठे अपयश आहे. याचे फायदे अनेक आणि काहीवेळा तर मुलभूत आहेत.

उदा. युरोपियन राष्ट्रांत प्रत्येक घरकुलाला टीव्ही/रेडिओ टॅक्स द्यावा(च) लागतो. तो थोडा थोडका नसतो. काही राष्ट्रांत यातून फारशी सुटका नसते. घरपट्ट्या, पाणीपट्ट्या, खाजगी खर्च, युटीलिटी, सगळे सगळे काही पत्त्याशी गुंतलेले असते.

आप्ल्या आधारकार्डावर एक पत्ता, मतदानकार्डावर तिसराच, पॅनकार्डावर चौथाच, आणि बँकेत आठवाच असला गाढवपणा सर्रास दिसतो. यातून सार्वजनिक पैशाचा किती अपव्यय होतो हे कुणीतरी शोधायला पाहिजे. (सर्व आजीमाजी नगरसेवकांनी, ग्रामपंचायत सदस्यांनी, 'इथे हे या चु*याचे घर आहे' असे सार्वजनिक पैशातून चांगले लोखंडी बोर्डस लावलेले आहेत. प्रत्येक सरकारी गोष्टीच्या नावाखाली 'संकल्पना - अमुक चु*या' असे सार्वजनिक म्हणजे जनतेच्या पैशातून लिहिले जाते. याचा हिशोब काढला तर तोच कोट्यवधी रुपयांचा असेल. याचा फायदा शून्य.)

असो.

२. फ्लेक्सबंदी - भारतातून सक्तीची फ्लेक्सबंदी करायला हवी. कुठल्याही संस्थेला यातून मिळणार्‍या उत्त्पन्नाची गरज नाहीए. त्याऐवजी उत्पन्नाचे दुसरे चांगले मार्ग शोधावेत. बिलबोर्डासाठी मोठ्या रस्त्यांशिवाय कुठेही परवानगी मिळायला नको.

३. भाषाविषयक धोरणे - भारताने त्रिभाषा सूत्र नावाचा जो अडाणीपणा चालवला आहे तो ताबडतोब बंद करायला हवा. राज्यभाषा आणि इंग्रजी सक्तीच्या भाषा. इतर राज्यभाषा, परदेशी भाषा या ऐच्छिक विषय म्हणून असायला पाहिजेत. ज्या राज्यांची राज्यभाषा प्रमाण हिंदी असेल ते शिकवतील हिंदी तिथल्या मुलांना. बाकीच्या मुलांना, त्यांच्या पालकांना इच्छा असेल तर हिंदी/इंडोनेशियन/थाई ऐच्छिक म्हणून शिकतील. शिवाय आजकाल बोलीभाषांना एक उगीचच अवास्तव महत्त्व आले आहे त्याचे कौतुक तेवढ्यापुरते तेव्हढे ठेवावे. राज्यभाषांचे तर प्रचंड नुकसान झालेलेच आहे. मुलांवर भाषांचा मारा जितका कमी करता येईल तितका तो केला पाहिजे. प्रत्येक महत्वाचा सरकारी कागद उदा. जन्म दाखला हे कमीतकमी दोन भाषांत (राज्यभाषा आणि इंग्रजी) दिला गेलाच पाहिजे. भाषाशिक्षणाचे प्रमाणीकरण केले पाहिजे.

४. कागदपत्रांचे प्रमाणीकरण - वेगवेगळ्या सरकारी कागदपत्रांचे देशपातळीवर प्रमाणीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. उदा. जन्मदाखला, रहिवासी दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्रे, लग्नाची नोंद, प्रॉपर्टीची कागदपत्रे इत्यादी इत्यादी.. आधी प्रमाणीकरण, मग आपसूक येते ते डिजीट्लीकरण.. ती कमीतकमी दोन भाषांमध्ये एकाचवेळी देणे बंधनकारक केले पाहिजे.

५. भारतीय पर्यटनस्थळे : भारत पर्यटनात खूप मोठी मजल मारू शकतो आणि भरपूर कमवूदेखील शकतो. काही पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची असावित. म्हणजे तिथली पायाभूत सुविधांची कलाकुसर, सोयी, ट्रान्स्पोर्ट हे परदेशी नागरिकांना मानवेल असे ठेवावे. उदा. अजिंठा वेरुळ लेणी, बदामीचा परिसर. काही पर्यटनस्थळे ही देशी-परदेशी दोन्ही लोकांच्या दृष्टीने विकसित करावीत. उदा. रायगड. दुसर्‍या प्रकारची भारतीय पर्यटनस्थळे भारतीय पुरातत्व विभाग नावाच्या तुरुंगातून ताबडतोब मोकळी करून राज्यांना विकसित करायला द्यायला हवीत. तिथे नाममात्र फी न ठेवता भरपूर फी ठेवावी. उदा. बदामी लेणी आणि किल्यांसाठी किमान ५०० रुपये आणि १० डॉलर्स प्रतिमाणशी इतका तरी दर पाहिजे. पन्नास भंगार लोक तिथे जाण्याऐवजी दहा शहाणी माणसे पैसे मोजून जातील. सर्वसामान्यांना परवडत नाही वगैरे गळे काढू नयेत. सर्वसामान्य माणूस खंडोबाला जाऊन हजारेक रुपये सहज उधळून येतो.

६. आधार सगळीकडे - सर्व ठिकाणी आधार सक्तीचे करावे. लग्नाच्या नोंदी, कुटुंबाच्या नोंदी, इत्यादी इत्यादी सगळीकडे. सरकारने कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाला न जुमानता आधार लिंकिंग राबवले पाहिजे. स्वस्त धान्य वगैरे आधार शिवाय अजिबात मिळाले नाही पाहिजे. त्यासाठी दर किमान ५००० लोकसंख्येमागे एक या हिशोबाने सरकारी आधार केंद्रे सुरु करायला पाहिजेत. मतदान, बँक, इतर सरकारी आस्थापने, दवाखाने इथे सगळीकडे आधार सक्तीचेच पाहिजे. भ्रष्टाचाराची खूप मोठी कुरणे आधारसक्तीने बंद होतील.

७. महत्त्वाच्या संस्थांचे 'आयआय'करण/ नवीन क्षेत्रांमध्ये अशा संस्था स्थापणे - सरकारने काही महत्त्वाच्या संस्थांना 'इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स' चा दर्जा दिला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक तर अशा दर्जाची संस्था हवी आहे. काही उत्तम संस्थांचे सरकारने आय. आय. करण करून त्यांचा दर्जा किमान एखाद्या आयायटी इतका केला पाहिजे. शिवाय त्यांची स्वायत्तता अबाधित ठेवून किमान दर्जा राखण्यासाठी काहीतरी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवून दिला पाहिजे. सगळ्या क्षेत्रांमध्ये सरकारने अशा संस्था काढून भरपूर आर्थिक अनुदान आणि सवलती दिल्या पाहिजेत. उदा. प्रत्येक राज्यात एकतरी एफटीआयआय च्या दर्जाची संस्था हवी. प्रत्येक दहा जिल्ह्यांमागे एक आय आय टी, प्रत्येक जिल्ह्यात एक एन आय टी, प्रत्येक राज्यात किमान तीन स्कूल ऑफ प्लॅनिंग आणि आर्किटेक्चर सारखी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अशा प्रकारची काहीतरी योजना करावी. मला खालील प्रकारच्या संस्था/संस्थांचे प्रमाणीकरण पाहायला खूप म्हणजे खूप आवडेल -

१. इंडियन इन्टिट्यूट्स ऑफ परफॉर्मिंग आर्टस/म्युझिक/फिल्म/मेडिया
२. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लॉ
३. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिसिन
४. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ कॉमर्स/इकॉनॉमिक्स/ट्रेड
५. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ फॅशन
६. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सोशल सायन्सेस/हुमॅनिटिज
७. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ अ‍ॅग्रीकल्चर
८. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ लँग्वेजेस/आर्ट्स/लिटरेचर
९. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ स्पोर्ट्स
१०. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ पॉलिसी/गव्हर्नन्स
११. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ डिफेन्स
१२. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ बेसिक अँड नॅचरल सायन्सेस

इत्यादी इत्यादी व इतर विवक्षित संस्था उदा. बँकिंग व इन्शुरन्स

८. रेल्वे सामायिक सूचीत - रेल्वे ही केंद्रीय सूचीतून काढून ती सामायिक करावी. प्रत्येक राज्याला रेल्वेमार्ग बांधण्याचा, रेल्वेसेवा चालवण्याचा पुरेपूर हक्क पाहिजे.

१०. पब्लिक हेल्थ इन्शुरन्स - ना नफा ना तोटा तत्वावर एल आय सी सारख्या पब्लिक हेल्थ इन्शुरन्सच्या कंपन्या सरकारने काढाव्यात. प्रत्येक व्यक्तीला हेल्थ इन्शुरन्स सक्तीचा केला पाहिजे. तो सावर्जनिक असो वा खाजगी. कदाचित हे अवघड जाईल सुरुवातीला, पण या अंगाने कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे.

११. धार्मिक स्थळांवर कर - सगळ्या सार्वजनिक आणि खाजगी धार्मिक स्थळांवर वेगळी कर आकारणी झाली पाहिजे. ट्रस्ट शिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाला मंजूरी मिळाली नाही पाहिजे. प्रत्येक ट्रस्टचे वार्षिक ऑडिट करणे बंधनकारक केले पाहिजे. मग ते मंदीर असो, नाहीतर गुरुद्वारा, नाहीतर एखादा मठ, नाहीतर चर्च असो वा मशीद/मदरसा.

नेहमीप्रमाणे मुद्देसूद प्रतिसाद आणि मांडणी. धन्यवाद.

एक बारीकसे मत.

ब्रिटीशांनी नशीब पिनकोडतरी घालून दिले.

काहीशी असहमती. पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत (सहा आकडी पिन कोड नव्हे)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2023 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पिन कोड व्यवस्था आपण खुद्द सत्तरच्या दशकात प्रस्थापित केली आहे. ब्रिटिश काळात फक्त काही मुख्य शहरांत काही मर्यादित विभागांना काही एकेक अंक दिलेले असत

संदर्भ...?

-दिलीप बिरुटे

तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे..

घ्या

https://en.m.wikipedia.org/wiki/Postal_Index_Number

The PIN system was introduced on 15 August 1972 by Shriram Bhikaji Velankar, an additional secretary in the Government of India's Ministry of Communications.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2023 - 1:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुमच्या पायी फार वेळ वाया जातो इकडे..

तसदीबद्दल क्षमस्व सर. आणि माहितीबद्दल आभारी आहे. आपलं मत गुगलल्याशिवाय मान्य करणार होतो. पण, दोन हजार चौदापासून 'विश्वासराव' खपले आहेत. पडताळणी करायची आणि मग मान्य करायचं. असं धोरण आहे.

-दिलीप बिरुटे

mayu4u's picture

13 Jan 2023 - 4:03 pm | mayu4u

प्रा डॉ असण्याविषयी विश्वास्राव काय म्हणतात?

श्रीगुरुजी's picture

8 Jan 2023 - 8:59 am | श्रीगुरुजी

उत्तम प्रतिसाद. सर्व मुद्द्यांशी सहमत.

साहना's picture

8 Jan 2023 - 10:27 am | साहना

मोदी सरकारने attested प्रतींचा हट्ट सोडल्याने कितीतरी व्यवहार सोपे झाले आहेत .

हा मनमोहन सिंग यांच्या काळापासूनच आहे. तसेच थेट लाभार्थ बँकेत जमा होण्याची सुविधा यांचेदेखील श्रेय मनमोहन सरकारला आहे. माझ्या मनमोहन सिंग यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आदरापेक्षा ज्याचे श्रेय त्याला मिळावे या आग्रहाखातर हा प्रतिसाद.

तुषार काळभोर's picture

8 Jan 2023 - 10:38 am | तुषार काळभोर

खरंय.
माझ्या प्रत्येक कागदावर पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे. आधार, वाहन परवाना, बँक खाते१, बँक खाते२ प्रत्येक ठिकाणी एकच पत्ता वेगळ्या प्रकारे लिहिला आहे.
+ डिलीव्हरीसाठी कितीही व्यवस्थित पत्ता लिहिला, तरी प्रत्येक वेळी त्याला सांगावं लागतं. शेवटी तो चुकीच्या जागी पोचतो, मग तिथे जाऊन घ्यावं लागतं.

याचा उपमुद्दा - पत्ता बदलल्यास तो एका कागदावर (उदा. आधार) बदलल्यास सगळीकडे आपोआप जायला हवा. आधारवर बदला, मग निवडणूक पत्र बदला, मग दोन तीन बँकांत आणि इतर दोन खात्यात बदला, मग गॅस कंपनीत बदला.

मी IIT मुंबईत होते तेंव्हा कुणालाही पत्ता द्यायचा म्हणजे दिव्य होते. अगदी फ्लिपकार्ट सुद्दा "लँडमार्क" सांगा म्हणायचे. वोडाफोन ने "लँडमार्क" नाही म्हणून दोन वेळा माझे पोस्टपेड कनेक्शन कापले. मग कुणीतरी लँडमार्क मध्ये JVLR असे लिहा असे सांगितले. (IIT बाहेरच्या रोड चे नाव आदी शंकराचार्य मार्ग आहे पण बहुतेक लोकांना ह्याची माहिती अजिबात नाही), JVLR ह्या चा अर्थ मला आजतागायत ठाऊक नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2023 - 12:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या गोष्टी भारताला करणे सहजशक्य आहे. अर्थात इच्छाशक्ती असेल तर! नोटबंदीसारखा निरर्थक आणि घातक तुघलकी निर्णय जर भारतीय सरकार राबवू शकते तर काही सकारात्मक गोष्टी भारताला करणे अवघड नसावे

अरे देवा, वरील काही ओळी वाचून हर्ट झालो. बाकी विचार मुद्दे महत्वाचे आहेत. सहमती आहेच.

-दिलीप बिरुटे

Trump's picture

8 Jan 2023 - 1:17 pm | Trump

धन्यवाद.

१. पत्तासुधारणा/पत्ताप्रमाणीकरण

घरात राहणार्‍या लोकांना ज्या ठिकाणी राहतो त्यांची नोंद त्या ठिकाणी करण्याची सक्ती असावी. सध्या कोण कोठे रहातो त्याची पडताळणी कशी करावी ह्यासाठी कंपनीचे पत्र पासुन आधार कार्ड काहीही चालते. खोटा पत्ता देणे सहज शक्य आहे, त्यामुळे दिलेल्या पत्यावर विश्वास ठेवणे मुश्कील आहे.

अजुन काही माझ्यातर्फे

  1. कंत्राट, दायित्व (liability): जेव्हा कोणी व्यवसायिक सल्ला देतो तेव्हा त्या व्यवसायिकाला सल्ल्याचे दायित्व असावे. त्यामुळे गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
  2. सरकारी कामे वेळेत व्हावीत, दिलेल्या अर्जाची पोच मिळावी, कायदे सर्वासाठी समान असावेत. लाचखोरी बंद व्हावी. सर्वसामान्य माणासांना त्याबद्दल तक्रार करायची सोय असावी, आणि त्यांचे निवारण व्हावे.
  3. छोट्या छोट्या कंत्राटांसाठी महसुल खात्याच्या मुंद्राकाची गरज नसावी.
  4. कोणाला दिलेले पैसे सहज वसुल करता यावेत. छोट्या छोट्या कामासाठी वकील, न्यायालयाची गरज नसावी.
  5. मुलांना लहान पणापासुन शिस्त पालन महत्व असावे.
  6. छोटे कायदेभंग करणार्‍या आणि अट्टल न झालेल्या लोकासाठी आर्थिक दंडाबरोबर, सक्तीची समाजसेवा (उ. मंदीरापुढे चपला साफ करणे, संडास साफ करणे, रस्ते साफ करणे इ.) असावी.
  7. मोठे तुरुंग बांधावेत. बरेचदा रस्त्यावर मुले, माणसे कायद्याचे पालन करत नाहीत. जेव्हा त्यांना योग्य त्या संधी देऊन त्यात सुधारणा होत नसेल तर त्यांना तुरुंगात ठेवावे. त्यांच्या कडुन शारिरीक श्रम करुन ठेऊन रस्ते तयार करणे, तलाव बांधणे अशी समाजउपयोगी कामे करुन घ्यावीत (मला माहिती आहे की हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो.)
  8. समाज, छपाई, दुरचित्रवाणी माध्यमावर दायित्व कायदा असावा. विनाकारण चरित्रहनन करणार्‍याविरोधात कडक कायदे असावेत.
  9. कोणत्याही कामासाठी राज्याच्या राजधानीत जायची गरज पडु नये, कामे तालुक्यात, कमीत कमी जिल्ह्यातच व्हावीत.
  10. ग्रामिण भागातील कचरा व्यवस्थापन सुधारावे. काच, धातु, प्लॅस्टीक, ओला कचरा, इतर कचरा वेगवेगळा व्हावा.
  11. ध्वनीप्रदुषण थांबावे. धर्म, जात, पंथ, जयंत्या, पुण्यतिथ्या इ. खाजगी गोष्टी व्हाव्यात. सार्वजनिक ठिकाणी, रस्ते अडवणुक बंद व्हावी
  12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.
  13. बास आता. :)
वामन देशमुख's picture

8 Jan 2023 - 1:55 pm | वामन देशमुख

12. ईशनिंदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली यावे.

100% agreement

भारतातील प्रदुषणाबद्दल अजुन कोणी लिहीले नाही.
-उत्तर भारतातील बहुतेक भुभागावर आणि इतर भारतातील मोठ्या शहरामध्ये वायुप्रदुषण भयंकर आहे.

ऑस्टेलियात पंतप्रधानाला घरच्या हिरवळीवरुन बाजुला जायला सांगितले. असे कधी भारतात दिसु शकेल का?
साधा नगरसेवक झाला की लोकांना इतका रुबाब वाटतो की बघायला नको.
तसेही भारतातील मंत्री, अधिकारी जनतेचे सेवक कमी आणि मालक जास्तच वाटतात.

पत्त्यासंबंधी थोडी जाहिरात धागा.

आता तर हे पद्धत वापरणे खूप सोपे झाले आहे. गुगल मॅप वर पण प्लस कोड दिसतो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2023 - 12:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुरु ठेवा. अधुन मधुन वाचत आहे.

-दिलीप बिरुटे

सर्वसामान्य लोकांना अजुन एक भेडसवणारी अडचण
--
रस्तोरस्ती असलेले भटकी कुत्री, गुरे, पक्षी इत्यादी.
रात्रीच्या वेळी बाहेर पडणे मुश्कील होऊन जाते.

देशांतील लोकांवर प्रेम नसते तर विषयावर लिहून मी वेळ वाया घालविला नसता. मी भारत देशाला घाणेरडा, भिकार आणि मागासलेला असे जे म्हटले आहे ते देशाचा किंवा तेथील लोकांचा अपमान करायच्या हेतून म्हटले नाही. फक्त वस्तुस्थिती विशद केली आहे. लठ्ठ महिलेला तुम्ही सडपातळ म्हटले म्हणून तिचे ४ पौंड वजन कमी होत नाही.

देशांत कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे ह्यांत अजिबात शंका नाही आणि त्याला जोड म्हणजे लोकांत स्वच्छते विषयी नसलेले प्रेम. सर्व भारतीय सार्वजनिक ठिकाणे अत्यंत घाण आहेत ह्यांत शंका नाही. विविध समुद्र किनारे, चित्रपट गृहे, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी कचरा आहेच पण गांवात सुद्धा कचरा उघड्यावर फेकला जातो, ऐपत असलेले लोक सुद्धा मुद्दाम उघड्यावर शौच करतात आणि सर्व ठिकाणी पण खाऊन थुंकून ठेवतात. देशावर प्रचंड प्रेम असलेला माणूस सुद्धा ह्या गोष्ट नाकारू शकत नाही. ह्याला घाणेरडा म्हटले तर त्यांत चुकले काय ?

भिकार शब्द प्रयोग सुद्धा वस्तुस्थिती विशद करण्यासाठीच वापरला आहे. देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते. हि भीक नाही तर काय आहे ? आणि मागासलेला हे विशेषण तर जवळजवळ ऑफिशिअल आहे. ह्यासाठी वेगळे पुरावे देण्याची सुद्धा गरज नाही. विकसित देशांत आपण ज्या गोष्टी गृहीत धरतो त्या इथे आम्हाला धडपडून सुद्धा मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे.

मूळ मुद्दा म्हणजे जो पर्यंत देशांत काय कमी आहे ह्या गोष्टी लोक प्रांजळ पणे मान्य करत नाहीत तो पर्यंत त्यांत सुधारणा होणे शक्य नाही. मोदी ह्यांनी संडास ह्या विषयवार इतकी भाषणे दिली कि त्याच्यावर टीका झाली होती कि पंतप्रधानांनी अश्या विषयवार बोलणे योग्य आहे का ? पण ते बोलले म्हणून थोडाफार तरी बदल आला कि नाही ? स्वच्छ भारत स्कीम बहुतांशी फोटो=ओप म्हणू न वापरली गेली तरी थोडा बदल तरी समाजांत दिसून येतो कि नाही ?

देशांतील ८०% जनता कर भरत नाही पण सरकारतर्फे फुकट शिधा घेते.

कुठ्ल्या काळातले सांगताय तुम्ही? आज भारतातली १००% जनता GST च्या रुपाने कर भरत आहे. ह्याला रस्त्यावरचा भिकारीही अपवाद नाहीये! हा पण सर्वसामान्य जनतेकडुन गोळा होणारा कराचा पैसा जेव्हा सरकार नको त्या ठिकाणी खर्च करते ते मात्र नक्कीच खटकते, जसे कि युक्रेन युद्धामुळे तिथे स्वार्थासाठी गेलेल्या लोकांना फुकटात देशात परत आणणे वगैरे वगैरे...

श्वेता२४'s picture

9 Jan 2023 - 4:58 pm | श्वेता२४

बुद्धिमान लोकांना अमेरिकेत किंवा तत्सम देशांमधे भरपूर संधी आहेत हे तर सगळ्यांनाच मान्य आहे. पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी. विशेषत: भारताबद्दल बोलताना भारतात 'काय नाही' याची चर्चा बरीच होते पण अमेरिकेत काय नाही किंवा भारत आणि अमेरिका यांची तुलना करता अमेरिका भारताच्या तुलनेत कुठे कमी पडते याची चर्चा फारशी होत नाही. ती व्हावी हा या लेखाचा दुसरा उद्देश आहे. अमेरिकेतल्या भारतीयांबाबत वर्णद्वेषाचं प्रमाण वाढतंय का?

भारतात काय कमी आहे यावर जीतकी आग्रही मते या धाग्यावर मला दिसत आहेत तितकी उपरोक्त ठळक गोष्टींवर येताना दिसत नाहीत.
याचा अर्थ एकतर तिकडे सगळे आलबेल व १०० टक्के चांगल्याच गोष्टी आहेत असा घ्यायचा का? की परदेशातील वाईट गोष्टी कबूल करण्यात परदेशस्थ भारतीयांना कमीपणा वाटतो?

गेल्या काही महिन्यात एका तूनळीवर ऑस्ट्रेलियातील विद्यार्थ्यांची मुलाखत पाहण्यात आली. त्यामध्ये तेथील विद्यार्थ्यांनी परदेशात शिकायला गेल्यामुळे किती आर्थिक ताण येतो, तेथे कसं जूळवून घ्यावं लागतं याबाबत माहिती दिली. त्यामधल्या बऱ्याच जणांनी शैक्षणिक कर्ज घेऊन तो देश गाठला होता व तिथंच राहून पैसे मिळवून कर्ज फेडलयाशिवाय भारतात परत येता येणं शक्य नव्हतं. एका मुलीचा स्पेशलायजेशन विषय तेथे कायमचे वास्तव्य करण्यासाठीच्या अटीमध्ये बसत नव्हता. हे तीला खूप उशीरा कळाले. तीला आता भरतात परत यायचंय परंतू तीच्या आईवडीलांनी तीला कर्ज फेडल्याशिवाय भारतात परत यायचं नाही असं स्पष्ट सांगतीलं. कारण तिथलं महागडं शिक्षण घेऊन इथे कमी पगारावर नोकरी करुन हप्ते फेडता येणे शक्य नव्हते. एकाही विद्यार्थ्यांला भारतात परत यायचंच नाही असं दिसत नव्हतं. परंतू त्यांना एकूण अर्थकारणामुळे (शैक्षणिक कर्ज फेडणे+नंतरचे स्थैर्य मिळण्याकरीता) तिथेच राहणं भाग होतं असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून वाटलं. तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे. परंतू आपणच आपल्या अपेक्षा वाढवल्या आहेत. असो. अशा प्रकारच्या काही बाजूंवर परदेशस्थ भारतीय प्रामाणिकपणे व्यक्त झाले तर बऱ्याच पालकांना आपल्या मुलांना त्यानुसार मार्गदर्शन करता येईल. अन्यथा धागा भरकटलेला आहेच.

होय पण धाग्याचा मूळ विषय लोक सोडून का जात आहेत हा आहे. सोडून जाण्यात काय धोके असतील हा नाही.

तिथं ती मुलं वाट्टेल ते काम करत होती. मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे
वाट्टेल ते ???
हा तुमचा ( कदाचित भारतातील रहिवासी आणि तेथील या संदर्भात ) विचार
पाश्चिमात्य देशात बरीच कामे हलकी समजली जात नाहीत ... त्यामुळे वाट्टेल ते वैगरे फक्त तुमच्या पुरते
उलट मी अ रे म्हणेन कि भारतातात हि "वाट्टेल ती कामे " लोक करायला लागली तर बरेच, विशेष करून विद्यार्थी असताना कमवणे / बचत करणे ,,, इत्यादी असो

मग असं वाटलं की इथंच शिकून थोड्या कमी पगारात आपल्या माणसात राहूनही चांगलं आयुष्य जगता येणे शक्य आहे

हो करू शकतात ना नाही कोण म्हणतंय ?
पण "चांगलं" म्हणजे नक्की काय .. कार्यालयात भारतात काय आणि पाश्चिमात्य देशात काय संख्याच दर्जाचे काम कराल हो पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"?
मग हे तत्व वापरलं तर शहरातून खेड्यातच राह्यला पाहिजे ! जमेल ???

सुक्या's picture

10 Jan 2023 - 11:32 pm | सुक्या

पण रोज जर प्रचंड गर्दी तुन १-२ तास प्रवास करण्यात श्रम जाणार असतील तर काय राहील "चांगल"?
मला ह्या प्रवासाचा भारतात इतका बाउ का केला जातो तेच समजत नाही. मी अगदी कोरोना चे लॉकडाउन सुरू होइ पर्यंत रोज १ - १.२५ तास कार / बस किंवा कार / मेट्रो रैल असा प्रवास जवळपास १० -१२ वर्षे नियमीत केला आहे. तेही उन्हाळा हिवाळा पावसाळा ह्या तीन्ही ॠतु मधे. यात रोज जवळ्पास अर्धा मैल पायी पण चालावे लागे. भारतात लोकांना डोर टु डोर सर्वीस लागते.

माझ्या ऑफीस मधे माझ्या पेक्षा जास्त प्रवास करुन अगदी सायकल वरुन येणारे पण अनेक लोक होते. मी कधीही कुणालाही ह्या प्रवासाचा त्रास होतो. मी थकुन जातो वगेरे वगेरे बोलताना पाहिले नाही. तसेही भारतात मी होतो तेव्हा ऑफीस म्हणजे १० - ५ (वर मधे १ तास लंच ब्रेक) असला प्रकार होता. इथे ऑफीस ८ - ५ असते. तरीही कुणी फार काम करतो मला त्रास होतो अशा तक्रारी करत नाही. भारतीय पण नाही. मग ह्या तक्रारी भारतातच का केल्या जातात?

रात्रीचे चांदणे's picture

9 Jan 2023 - 7:58 pm | रात्रीचे चांदणे

मुळात भारताची तुलना लगेच अमेरिकेशी किंवा युरोपियन राष्ट्रांशी करणे चुकीचे आहे. हा आपले ध्येय मात्र त्यांच्यासारखे पुढारलेले बनणे असले पाहिजे. फार फारतर आपण दहा वर्षां पूर्वीचा भारत आणि आजचा भारत ह्यांची तुलना करायला पाहिजे.खरतरं एखाद्या देशासाठी १० वर्षं हा काळ सुद्धा अतिशय कमी आहे. पण एका दशकात आपली दिशातरी योग्य आहे का याचे निपक्ष विश्लेषण तज्ज्ञांकडून व्हायला पाहिजे.

ज्याप्रमाणे भारतीय लोक भारताबाहेर दीर्घ मुदतीच्या वास्तव्यास सर्रास जातात तसे भारतात दीर्घ मुदतीकरिता वास्तव्यास लोक येत असतील का ? असल्यास कोणत्या देशातून (नेपाळ व बांग्लादेशातून येतात, पण त्या खेरीज ) ? त्यांचे भारतात स्थायिक होण्याचे कारण / प्रेरणा काय असाव्यात ?

बांगलादेशी, नेपाळ, भूतान, श्री लंका, नायजेरिया काही अरब राष्ट्रे इत्यादी देशांतून लोक कायदेशीर किंवा बेकायदेशीर पणे भारतांत वास्तव्य करतात. अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत.

स्पेन, पोर्तुगाल आणि व्हिएतनाम हि तीन राष्ट्रे सध्या पाश्चात्य देशांत देश सोडून जाण्यासाठी महत्वाची आहेत. व्हिएतनाम मध्ये तुम्हाला खूप कमी पैश्यांच्या गेटेड अमेरिकन कम्युनिटी मिळते. पोर्तुगाल अँड स्पेन चे हवामान खूप चांगले आहे आणि राहणीमान उच्च असल्याने अनेक लोक तिथे निवृत्त होऊन जातात.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2023 - 8:22 am | श्रीगुरुजी

नायजेरियन, अफगाणी, बांगडे, पाकडे वास्तव्य संपल्यानंतरही परत जात नाहीत व भारत सरकार काहीही करत नाही. अनेक नायजेरियन, अफगाणी अंमली पदार्थ विकतात. वास्तव्य किंवा अंमली पदार्थ व्यापारावरून त्यांना पोलिस पकडायला गेले की ते झुंडीने हल्ला करून पोलिसांना पळवून लावतात.

२०१० च्या दशकात अदनान सामीने बराच आयकर भरला नव्हता व वास्तव्य परवाना संपल्यानंतरही आरामात मुंबईत रहात होता. इतर देशात अश्या व्यक्तीला तुरुंगात टाकून नंतर हाकलून दिले असते व नंतर भारताबाहेर हाकलून परत कधीही भारतात येण्यासाठी आयुष्यभराची बंदी घातली असती. परंतु भारत सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई न करता तश्या परिस्थितीतही त्याच्या वास्तव्य परवान्याची मुदत वाढवून दिली व नंतर या गुन्हेगाराला काहीही शिक्षा न करता चक्क नागरिकत्व देऊन टाकले.

Nigerian mob attack cops

बनाना रिपब्लिक ही संज्ञा भारतावरूनच निर्माण झाली असावी.

सुरिया's picture

10 Jan 2023 - 1:54 pm | सुरिया

चक्क नागरिकत्व

नुसते नागरिकत्व नाही. २०१६ ला त्याला नागरिकत्व दिले गेले आणि २०२० ला तर चक्क पदमश्री बहाल करण्यात आली. हे खरे बनाना(और लोगोंको बनाना भी) रिपब्लिक.
त्याचे वडील अर्शद सामीखान जे मुळचे काश्मीरी आणि पख्तू सांगतात ते पाकिस्तानी एअरफोर्समध्ये पायलट आणि नंतर राजदूत वगौइरे असले तरी अदनान चा जन्म, शिक्शण ब्रिटिश होते. नंतर तो कॅनडा स्थायीक होता.

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2023 - 2:13 pm | श्रीगुरुजी

भारत २०१४ पूर्वी बनाना रिपब्लिक होता व २०१४ नंतरही बऱ्याच प्रमाणात तसाच आहे. मुख्य फरक पडलाय तो परराष्ट्र संबंध आणि लष्करी प्रतिसादात. पाकिस्तान किंवा चीनने आगळीक केली तर भारत फक्त तोंडी निषेध करायचा. आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो. तसेच मलेशिया, टर्की वगैरेंनी भारताविरुद्ध काहीही केले तरी भारत लगेच त्यांच्या नाड्या आवळतो. परंतु इतर विषयात अजूनही सुधारणा नाही.

शाम भागवत's picture

15 Jan 2023 - 10:52 am | शाम भागवत

२०१४ नंतर आणखी एक फरक पडलाय.
२०१४ पूर्वी कल्याणकारी योजनांवर सरकारने खर्च केलेल्या प्रत्येक रुपयातील फक्त १४ पैसे लाभार्थींपर्यंत पोहचायचे.
२०१४ नंतर लाभार्थींपर्यंत जास्त पैसे पोहोचायला लागले आहेत आणि हे प्रमाण वाढत चाललेले आहे.
त्यामुळे मी भारताच्या भविष्याबाबत आशावादी आहे.

> आता तोडीस तोड प्रत्युत्तर देतो.

हे सुद्धा फक्त प्रसिद्धी मिळवण्याची थोतांड असू शकते. लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे. भारताने कतार पुढे जे लोटांगण घातले आणि एका तथाकथित गुअस्वलाने हिंदू महिला नुपूर शर्मा हिचे आयुष्य सरेआम उध्वस्त केले त्यावरून परराष्ट्र धोरण ह्यांत सुद्धा बोलबच्चन पणा जास्त आहे असे वाटते.

सत्य कळायला अजून अवकाश आहे.

लष्करी कारवाई आणि परराष्ट्र धोरण दोन्ही ठिकाणी खोटे बोलणे इत्यादी सर्वमान्य असल्याने कुठल्याही विषयावर ठोस मत बनवणे कठीण आहे.
तुमचा भारतातील लष्करा वर विश्वास नसेल आणि परराष्ट्र धोरणा विषयी संशय वाटत असेल तर तूम्ही भारत आणि भारतीयांना दोष देण्यासाठीच मिपावर येता असे वाटते. क्रुपया आम्हाला आपला बहुमोल सल्ला देण्यात [नावे ठेवण्या त ] आपण आपला[व आमचा] बहूमुल्य वेळ वाया घालवू नये ही मनापासुन विनंती.

अध्यात्मिक प्रवृत्तीचे अनेक लोक विविध देशांतून भारतांत स्थायिक झाले आहेत पण हा आकडा अतिशय नगण्य आहे. गोव्यांत रशिया, इंग्लंड, जर्मनी, पोर्तुगाल आणि रोमानिआ मधील काही लोक आहेत.

धन्यवाद.
पण नोकरी/व्यवसायाच्यानिमित्ताने परदेशी नागरिक भारतात किती प्रमाणात वास्तव्यास असतील ? जसे अमेरिकेतील गुगल, मायक्रोसॉफ्ट , नासा ई मोठ्या आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय वा इतर देशांतले परदेशी (अमेरिकन नसलेले) नागरिक नोकरीस आहेत त्याप्रमाणे भारतात अशी कुठली आस्थापने आहेत का जिथे परदेशी लोकांना नोकर्‍या दिलेल्या आहेत ?
भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ?
म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ?

भारताची शिक्षणव्यवस्था फारशी चांगली नाही असा सूर अनेक प्रतिसादांत आहे पण मग याच शिक्षणव्यवस्थांमधून शिकलेले अनेक विद्द्यार्थी बाहेरील देशात मध्यम वा उच्च पदाच्या नोकर्‍या मिळवून यशस्वी होतात ते कसे ? यातील काही जणांनी पुढे पाश्चात्या देशात उच्चशिक्षण घेतले असेलही त्यांचा अपवाद पण इतरांचे काय ?

शिक्षणव्यवस्थेपेक्षा यशस्वी व्हायला कायदे व्यवस्था सक्षम लागते. उदा. कोणत्याही गोष्टीसाठी अनुत्पादक वेळ/खर्च आणि उत्पादक खर्च्/वेळ अश्या दोन गोष्टी लागतात. अनुत्पादक वेळ/खर्च वाढल्याने उत्पादन वाढत नाही, पण तो न केल्यास उत्पादन करतायेत नाही, उदा. सरकारी परवानग्या, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, मालवाहतुकीला केलेला खर्च, व्याजाचा दर, कर्जाची सहज उपलब्धता, मनुष्यबळ, निकोप स्पर्धा इ.इ.
भारतामध्ये ह्या कामाचा खर्च खुप आहे.
शिक्षण घेताना ह्या गोष्टी फार आड येत नाहीत, आणि भारतातुन परदेशात गेलेल्या लोकांना कष्ट करण्याशिवाय कोणताय पर्याय नसतो, आणि परत जाउन भारतात करायचे काय हा प्रश्न असतो.

ह्याचे उत्तर जास्त खोलांत जाऊन द्यावे लागेल पण सध्या थोडक्यांत सांगते.

लोकांचे यशस्वी होणे शिक्षण व्यवस्थेपेक्षा समाजावर अवलंबून आहे. इतरांनी नोंद केल्या प्रमाणे कायद्याचे राज्य, योग्य प्रकारे काम करणारी कोर्ट व्यवस्था, सुधृढ फायनान्स व्यवस्था, आपल्या मालमत्तेचे रक्षण व्यवस्थित होणे, सरकार दरबारी कामे व्यवस्थित आणि वेळेत होणे इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मागासलेल्या देशांत ह्या मूलभूत कमतरता असल्याने सर्वच लोकांना संधी कमी उपलब्ध असतात.

शिक्षण (आणि व्यवसाय अनुभव, स्किल इत्यादी) एखाद्या multiplier प्रमाणे काम करतात. आता एखादी मुलगी समाजा काहीही ट्रेनिंग नसतात भारतात सलून मध्ये थ्रेडींग चे काम करते तर कदाचित ती महिन्याला ५००० कमावते तीच मुलगी प्रगत देशांत घेतल्यास साधारण $३००० डॉलर्स कमावेल. त्याच मुलीने समजा ब्युटिशियन कोर्स वगैरे केला तर भारतातील सलून मध्ये ती २०,००० कमावेल तर इतर देशांत कदाचित $५०००.

भारत देशांत राहून जर पत उंचावण्याची असेल तर तुम्हाला उच्च दर्जाचे शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. पण उच्च शिक्षण शक्य नसेल तर तुम्ही विदेशांत जाऊन जास्त कमावू शकता (शिक्षण नसले तरी).

हे वाचा https://deeshaa.org/2016/04/05/a-misplaced-sense-of-pride/

साहना's picture

11 Jan 2023 - 12:48 pm | साहना

> म्हणजेच भारताची शिक्षण पद्धती फारशी आदर्श नसेलही पण ती भारतातील उद्दोगांची जवळपास पुर्ण गरज भागवून इतर देशांतील उद्द्योगव्यवस्थांना बर्‍यापैकी शिक्षित मनुष्यबळ पुरविण्याइतकी सक्षम आहे असे म्हणता येईल का ? तर पाश्चात्य देशातील शिक्षण संस्था आपल्याच देशातील उद्योगांची गरज भागेल इतक्या प्रमाणातही प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यास कमी पडत आहेत का ?

पाश्चात्य जगाची प्रमुख समस्या म्हणजे एकूण सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे. अमेरिकेत सध्या दर वर्षी १० - २५ लाख लोक कायदेशीर मार्गाने येतात तर १०-३० लाख लोक बेकायदेशीर मार्गाने येतात आणि इतके असून सुद्धा देशांत प्रचंड प्रमाणात नोकर्या खाली आहेत. कानडा, फ्रांस आणि जर्मनी ह्यांची परिस्थिती सुद्धा तीच आहे. कॅनडा ने तर मागील वर्षी रिकॉर्ड नंबरच्या विदेशी लोकांना आपले नागरिकत्व दिले.

अमेरिकन शिक्षण व्यवस्थेने कितीही सुशिक्षित लोक निर्माण केले तरी अर्थव्यवस्था वाढून त्या सर्व लोकांना कवेंत घेते. ह्यांत आश्चर्य नाही आणि ह्या विषयावर मी मिसळ पाव वर खूप विस्ताराने लिहिले होते असे आठवते.

लोक आणि अर्थव्यवस्था ह्यांचे फीडबॅक लूप असते. जगांत जितके जास्त लोक तितक्याच वेगाने समाज प्रगती करतो आणि जितक्या वेगाने समाज प्रगती करतो तितक्याच वेगाने आणखीन लोकांची गरज भासू लागते. पण त्या लेव्हल ला पोचायला समाजाच्या काही मूलभूत समस्या सोडवाव्या लागतात. भारत अजून त्या स्तराला पोचला नाही. पण काही क्षेत्रांत उदाहरणार्थ IT मध्ये हा इफेक्त्त तुम्ही पाहू शकता.

वामन देशमुख's picture

10 Jan 2023 - 7:18 am | वामन देशमुख

एखादे मूल अमेरिकन भूमीवर जन्माला आले तर त्याला अमेरिकन नागरिकत्व मिळते का? म्हणजे, एक भारतीय गरोदर स्त्री आठव्या महिन्यात अमेरिकेला गेली आणि तिथे महिना-दोन महिने राहून तिने आपल्या बाळाला जन्म दिला तर त्या नवजात अर्भकाला आपोआप अमेरिकन नागरिकत्व मिळते का?

श्रीगुरुजी's picture

10 Jan 2023 - 8:07 am | श्रीगुरुजी

हो. पण भारताबाहेर गर्भधारणा झाल्याने व ती महिला अमेरिकन नागरिक नसल्याने विमा कंपन्या बाळंतपणाचा, औषधांचा, उपचारांचा, बाळंतपणानंतर लागणाऱ्या उपचार व औषधांचा खर्च देणार नाही. तो संपूर्ण खर्च स्वतःलाच करावा लागेल व तो खर्च प्रचंड असेल.

फारएन्ड's picture

11 Jan 2023 - 12:30 am | फारएन्ड

श्रीगुरुजी - विमा कंपन्यांनी कव्हर करण्याचा संबंध नागरिकत्वाशी नाही. व्हिसावर आले असतील आणि अशा स्त्रीचा किंवा तिच्या नवर्‍याच्या नोकरीतून विमा असेल (सहसा असतोच) तर त्यातून कव्हरेज मिळेल. एखादी स्त्री फिरायला म्हणून आली, विमा नाही आणि परतही गेली नाही तर तुम्ही म्हणता तसे स्वखर्चाने करावे लागेल. पण त्यातही "ड्यू" असलेल्या स्त्रीला कोणी इमरजन्सी सर्व्हिस नाकारेल असे वाटत नाही. एरव्ही रीतसर डिलीव्हरीकरता कोणत्या रूग्णालयात नाव नोंदवायला गेली तर तेथे हा खर्च कोण करणार हे नक्की विचारतील. त्याशिवाय बहुधा नोंद करू देणार नाही. इमर्जन्सी वगळता.

हे विमा करारावर अवलंबून आहे. बर्थ पर्यटन हि एक गोष्ट असून साधारण १५,००० मध्ये C सेक्शन करून दिले जाते.

सुक्या's picture

10 Jan 2023 - 8:09 am | सुक्या

कायदेशीर किचकट कीती आहे ते माहीत नाही. परंतु अमेरिकन भुमी वर जन्म झाला तर आपोआप नागरीकत्व भेटते.

अमेरिकेत जन्म झाला तर अमेरिकन पासपोर्ट बनतो. पूर्ण नागरिकत्व.

इतकेच नव्हे तर नाममात्र तिकडे जन्म झालेल्या आणि लहानपणापासून भारतात परत येऊन इथेच वाढलेल्या लोकांना मोठे झाल्यावरही अमेरिकन एम्बसीचे फोन येताना पाहिले आहेत. म्हणजे भारतात काहीतरी unrest किंवा तंग परिस्थिती झाली होती, तेव्हा तुम्ही ताबडतोब सुखरूप अमेरिकेत परत या,. आणि अमेरिकन नागरिकांसाठी खबरदारीच्या गाईडलाईन्स वगैरे.

माझ्या मते १८ वर्षे वय झाल्यावर मनुष्य याबाबत फायनल ठरवू शकतो. पण कोणीही ते नागरिकत्व रद्द केल्याचे ऐकिवात नाही, अपेक्षित देखील नाही.

टर्मीनेटर's picture

10 Jan 2023 - 10:09 am | टर्मीनेटर

पूर्वीच्या अनुभवांवरून त्यासंदर्भातले बरेच नियम आता बदलण्यात आल्याचे मागे वाचले होते. गरोदर स्त्रीचा गर्भधारणाकाळ आणि अंदाजित प्रसूतीची वेळ (EDD) विषयक प्रसूतीतज्ज्ञाने दिलेले प्रमाणपत्र व्हिसा आणि विमानप्रवास अशा दोन्ही गोष्टींसाठी अनिवार्य आहे (त्या आधारे व्हिसा आणि विमानप्रवास पैकि एक किंवा दोन्ही नाकरले जाउ शकते) तसेच आणखिनही काही तरतुदी केल्या आहेत त्यामुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.

साहना's picture

11 Jan 2023 - 12:41 pm | साहना

> मुळे आता अशा प्रकारे अमेरिकेत किंवा अन्य काही पाश्चिमात्य देशात केवळ मूल तिथे जन्माला आले म्हणून त्याला/तिला त्या देशाचे नागरिकत्व मिळाले असे होण्याची शक्यता जवळ जवळ संपुष्टात आली आहे.

किमान अमेरिकेच्या बाबतीत हे पूर्णतः खोटे आहे असे सांगू शकते. birth सिटिझनशिप हा अमेरिकेत घटनात्मक अधिकार आहे आणि सुप्रीम कोर्ट्स च्याखूप जुन्या निवाड्याप्रमाणे आई देशांत कशी आली ह्यावर अवलंबून नाही.

माझ्या माहिती प्रमाणे कुठल्याही विजा किंवा विमान तिकीटा साठी आपण गरोदर आहोत किंवा नाहीत हे सांगण्याची गरज नाही. विमान कंपन्या बहुतेक करून ८+ महिन्याच्या गरोदर स्त्रियांना विमानांत प्रवेश देत नाहीत पण ते सुद्धा स्टाफ वर अवलंबून आहे.

कॅनडा मध्ये तर भारतीय विद्यार्थी मुलींना गरोदर असल्यास भत्ता सुद्धा मिळतो त्यामुळे अनेक पंजाबी मुली गरोदर होतंच कॅनडात विद्यार्थी म्हणून जातात.

साहना's picture

11 Jan 2023 - 4:06 am | साहना

हो. आई अमेरिकेत का होती, कायद्याने अली होती कि नाही इत्यादी गोष्टींचा फरक पडत नाही. म्हणूनच तर चिनी आणि रशियन लोकांनी बर्थ टुरिझम हा प्रकार आणला.

चौकस२१२'s picture

10 Jan 2023 - 9:21 am | चौकस२१२

हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत?
सध्याचे माहित नाही पूर्वीची काही करणे = १) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे २) जिन्यासा/ क्षेत्रातील पुढील शिक्षण ३) बचत ( ती होतेच असे नाही कारण खर्च हि त्ववढेच असतात + शिवाय आयकर )
साधय यातील काही करणे बाद असतील परंतु साधय सुद्धा बाहेर कायमचे का लोकांना जावे वटतटे हे स्थानिक भारतीय जास्त चांगले सांगू शकतील
हि करणे असू शकतात १) स्पर्धा २) तेवढ्याच श्रमात जास्त भौतिक सुखे

या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय?
काहींना तसे वाटत असेल पण म्हणून ते लगेच देशद्रोही वगैरे ठरत नाहीत... एवढेच नमूद करू इच्छितो

भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?
म्हणजे स्पर्धा या दृष्टीने हो असावे
किंवा अजूनही भारतातील वेगवेगळ्या ष्ट्रातील अर्थाजनाची तफावत
या शिवाय महागाई

हे असेच ब्रेनड्रेन चालू राहिले तर आधीच बनाना कंट्री असलेल्या आपल्याच देशाची अवस्था अजून बिघडणार नाही का?
भारतात भरपूर हुशार लोक आहेत त्यामुळे हि चिंता नसावी

गोर्‍यांच्या या देशांमधे भ्रष्टाचार कमी असेल तर तो कमी का आहे?
पदोपदी भ्रष्टचार फारसा नाहीये...
करणे काहीही असोत पण जगभरचे तत्व हे कि "पोट भरलेले असले" कि मग भ्रष्टचाराची गरज पडत नाही
पाश्चिमात्य देशात हे त्यांनी बऱयापैकी जुळवले आहे म्हणून

केवळ लोकसंख्या कमी आहे म्हणून या गोर्‍या लोकांच्या देशात समस्या कमी आहेत का?
कमी लोकसंख्येचं उपयोग होतो नक्की ,, अर्थवयवस्थेवरील ताण कमी होतो

अजून एक म्हणजे म्हातारपणी भारतात रहायला यावं अशीही एक बाजू आहे. हातीपायी हिंडता येतं तोवर अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया सारखे समृद्ध देश आणि शरीर थकू लागलं की भारत गाठायचा. हा प्रकार म्हणजे "खोबरं तिकडं चांगभलं" असा नाही का?

हे फार थोड्यानं जमते ...
कारण तो पर्यंत नातवंडे तिकडे आणि आपण इकडे असे होते...

पण कधीतरी अमेरिकेच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी.

हो मान्य
देशादेशाप्रमाणे होऊ शकते ( वेगळे लिहीन वेळ मिळाला कि )
साधारण कानडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड हे एका समूहात
अमेरिका जरा वेगळी असावी

पाश्चात्य लोक आपल्या पॅशनला खूप महत्व देतात हे खरं आहे का?
बर्यापैकी .. कारण परत तेच खाऊन पिऊन सुखी मग बाकी गोष्टींकडे वेळ देत येतो
अर्थात " सुखी " हा वेगळा विषय आहे

ज्या छंदाचा पैसे मिळवायला फारसा उपयोग नाही असे छंदीफंदी जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा हे पाश्चात्य लोक आणतात कुठून?
एकतर स्वतः बचत करून मग किंवा सरकारी मदत ( प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ) यात आयकर भरणे हे गृहीत आहे

अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?

कोणते कर्ज ?
भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा

अमेरिका किंवा तत्सम देशांमधे कर्जे काय पाहून दिली जातात?
कोणते कर्ज ?
भारतप्रमाने " पत " शिक्षण थोडेफार ,इत्यादी फार फरक नसावा

कर्ज परत देण्याची क्षमता, शिक्षण, इतरांना ज्याप्रकारे कर्ज मिळते त्याच प्रकारे सगळ्यांना मिळते.
--
भारतामध्ये बरेचदा आज या, उद्या या करत करत जी मेटाकुटीला आणतात. जर कोणत्या अ वर्गाच्या भारतीय नागरीकाकडुन फोन आला (सरकारी नोकर, मोठे अधिकारी, राजकारणी) तर कामे लगेच होतात. मागासवर्गीय, अल्पसंख्याक असेल मग मज्जाच मजा.

उपयोजक's picture

10 Jan 2023 - 7:09 pm | उपयोजक

एक म्हणजे तिकडे व्यवस्थित पैसा मिळतो हे महत्वाचे
आणि अनेक लोकावर जबाबदारी नसते , आई वडील पासून वेगळे झालेले असतात ,लग्न करायचे नसते किंवा खूप खूप उशिरा करतात -
घटस्फोट ही काही फार मोठी गोष्ट नाही
तुम्हाला पार्टनर तुलनेने सहज मिळतो , तो समलिंगी असेल , त्या बरोबर लग्न केले नसेल तरी बाकीच्या समाजात काही प्रतिक्रिया येत नाही

अनेक अमेरिकन / विदेशी लोकांचा बचत ( saving ) , कर्ज , assets building / holding या बद्दल फार वेगळा विचार असतो
बेसुमार कर्ज मिळते आणि घेण्याकडे प्रवृत्ती असते
बरे मागील economic crisis वेळी एक चमत्कारिक गोष्ट कळली - जरी लायकी नसेल तरी कर्ज दिले जाते - अगदी घराचे पण ! ( भारतात घर / गाडी घेणाऱ्या ना माहीत असेल की क्रेडिट लायकी ( worthiness) साठी किती scrutiny केली जाते )

हे जर अशक्य वाटले तर मी Ninja loans बद्दल लिंक टाकतोय ती पाहा ( A NINJA Loan (No Income, No Job, and No Assets Loan)

आणि त्या crisis वेळी / बहुदा आता पण अनेक लोकांनी घरे / गाड्या surrender केली / जप्त केली गेली - लोक मजेत अजून थोडी खालची लाईफस्टाईल जगत राहिले

भारतात हप्ते न भरल्या मुळे घर जप्त होत असेल तर ते फार वाईट मानले जाते , लोक आटा पिटा करतात , काहींना depression / attack आले आहे.

https://corporatefinanceinstitute.com/resources/knowledge/credit/ninja-l...

हे लोक परदेशात जात आहेत त्यामागे नक्की कारणे काय आहेत? या लोकांना भारत इतका नकोसा का झालाय? भारतात संधी मिळत नाही म्हणून हे लोक जात आहेत का?

भारतातील परिस्थिती चांगली, की वाईट यावर वाद करण्यापेक्षा या मुख्य प्रश्नाच्या अनुषंगाने प्रत्येक सदस्याने स्वतःच्या बाबतीत किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत (ज्याचे जीवन तुम्ही जवळून पाहिले आहे वा त्याचे अनुभव वा विचार त्याने तुम्हाला तपशीलाने सांगितले आहेत) उत्तर द्यावे असे मला वाटते
सर्व सदस्यांनी या प्रकारे उत्तर दिल्यास चर्चा आपसूकच पुर्ण होईल. उगाच कुणातरी "क्ष" व्यक्तीची अर्धवट माहित असलेली जीवन गाथा लिहून त्या अनुषंगाने काहितरी निष्कर्ष काढण्यात फारसा अर्थ नाही असे मला वाटते.

म्हणजे तुम्ही यापैकी कोणत्या वर्गात मोडता ते नमूद करुन तुमचे विचार विस्ताराने लिहा असे मी सुचवेन
१) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे- आणि मला दीर्घकाळ (अगदी निवृत्तीनंतरही) भारताबाहेरच रहावेसे वाटते अ) या निर्णयामागचे माझे कारण असे आहे - ब) तसेच भारतातल्या "या" गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या इथे मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते
२) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- पण मला काही काळाने - (खास करुन निवृत्तीनंतर) भारतात परत जायचे आहे (किंवा परत आलेलो आहे) - अ) भारत सोडण्यामागचे माझे कारण ब) भारतात परत जाण्यामागचे कारण ? क) परदेशातील या गोष्टींना मी मुकत आहे किंवा त्या भारतात मिळाव्यात असे मला आवर्जुन वाटते
३) मी भारताबाहेर अमूक देशात स्थायिक झालो आहे (किंवा झालो होतो)- आणि भारतात परत जायचे की नाही याबाबत मी अजून ठरवू शकलेलो नाहीये
४) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही आणि तशी फारशी इच्छाही नाही- याकरिता माझी कारणे भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते. तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे
५) मी कधीच भारताबाहेर स्थायिक झालो नाही पण "या अमुक" काही देशांत मला जायला आवडेल पण तशी संधी न मिळाल्यासही मला खंत नाही. भारतातही रहायला मला आवडतेच त्याची ही कारणे पण भारतातील या गोष्टी आवर्जुन बदलल्या जाव्यात असे मला वाटते.तसेच भारताबाहेर न जाण्याने माझे हे नुकसान झाले याचीही मला जाणिव आहे

-
आता माझ्या पुरतं
मी ४ वा ५ या प्रकारात मोडतो. म्हणजे मी कधीच भारताबाहेर गेलो नाही. यापुर्वी भारताबाहेर जावे असे प्रकर्षाने वाटले नाही. फार प्रतिभावान नसलो तरी अगदीच मठठ प्रकारतला मी नक्कीच नाही त्यामुळे संधी मिळाल्याही असत्या पण मी अशा संधींच्या शोधात फारसा नव्हतोच. आता वाटते न्युझीलंड या देशात जायला आवडेल - पण माझ्या क्षेत्रात तिकडे संधी फारशा नाहीत त्यामुळे संधी नाही मिळाली तरी खंत नाही.

परदेशात न जाण्यामागची कारणे -
दुसर्‍या देशात जावून तिथल्या चालिरीती, तिथले कायदे, नियम समजून घेणे त्याप्रमाणे जगायला शिकणे, तिथल्या हवामानाशी जुळवून घेणे ई ई मला बरेच आव्हानात्मक आहे असे मला नेहमीच वाटले. झालेच तर परदेशात अनेक कामे स्वतःच करावी लागतात घरगुती कामांना नोकर मिळत नाही किंवा तिथल्या पगारात ते परवडत नाहीत. त्याउलट भारतात दरमहा लाखभर पगार असणारी व्यक्ती देखील नोकरांंच्या पगारावर फारतर दहा ते पंधरा हजार रुपये खर्च करुन जवळपास अजिबात घरकाम न करता आरामात जगू शकते.
दुसरे असे की मला भारतात - ते ही पुण्यात म्हणजे ज्या शहरात मी मोठा झालो त्याच ठिकाणी चांगल्या नोकरीच्या संधी मिळत गेल्या मग मला बाहेर जायची गरज पडली नाही. मला वाटते की परदेशी जाण्याचे कारण म्हणजे तिथल्या चलनात मिळणार्‍या पगारातुन चांगल्यापैकी बचत कमी कालावधीत होते पण मला तशी गरज वाटली नाही. तिशीच्या आत मी स्वतःचा फ्लॅट घेतला, चाळीशी ओलांडताना पुर्ण कर्जही फेडले.

माझ्या भारतातील आवर्जुन बदलल्या जाव्यात या गोष्टी - वाहतुक कोंडी, खराब रस्ते (खासकरुन शहरातले - महामार्ग आता सुधारलेत बहुधा), बेशिस्त वाहतुक , भटके कुत्रे , रस्ते अडवून होणारे उत्सव, मिरवणूका, कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी (अचानक रात्री १२ वाजता फटाके वाजू लागले की डोकं फिरतं) , ध्वनी प्रदूषण ई

भारताबाहेर न जाण्याने झालेले नुकसान - आय टी क्षेत्रात करिअरमध्ये ऑनसाईट जाण्याने पुढेही अधिल चांगल्या संधी मिळतात. अर्थात मी फार जास्त महत्वाकांक्षी नाही, आहे त्या करिअर मध्ये समाधानी आहे.

तर्कवादी's picture

12 Jan 2023 - 12:55 pm | तर्कवादी

आता माझ्या एका जवळच्या मित्राबद्दल लिहितो.
बी ई मेकॅनिकल असलेला हा माझा पुण्यातला मित्र - २००१ पासून आमची मैत्री आहे. २००४ ला तो "रोबोटीक्स , ऑटोमेशन" या विषयातले एम एस करण्यासाठी जर्मनीला गेला. शिक्षण पुर्ण झाल्यावर तिथे त्याला नोकरी मिळाली.
काही वर्षानंतर पुण्यातीलच एका मुलीशी त्याने लग्न केले व पत्नीलाही जर्मनीला घेवून गेला. पुढे त्याच्या पत्नीनेही कधी पुर्ण वेळ तर कधी अर्धवेळ व्वगैरे नोकर्या केल्यात. एक मुलगा व एक मुलगी अशी त्यांना दोन अपत्ये झालीत. या काळात तो दरवर्षी एकदा तरी पुण्याला येत असे. पण आता साधारण वर्ष-दीडवर्षापुर्वी तो पुण्यात कायमचा स्थायिक झाला.. अलीकडे माझी त्याच्याशी भेट होवू शकली नाही परंतु फोनवर बोलणे झाले तेव्हा मी त्याला भारतात परतण्याचा निर्णय घेण्यामागचे कारण विचारले तेव्हा त्याने जी कारणे सांगितले ती साधारण अशी
१) त्याला भारतातले कौटुंबिक आयुष्य आणि अनुषंगाने मुलांवर होणारे कौटुंबिक संस्कार हवेसे वाटत आहेत. पुण्यात आता त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडीलही आहेत. त्याच्या पत्नीचे माहेरही पुण्यातच आहे
२) जर्मनीतील तरुण पिढीतील मुले फारशी महत्वाकांक्षी नाहीत. माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही. साधारण शिक्षण घेवून कोणतीही नोकरी केली तरी चांगल्यापैकी पगार मिळत असल्याने इंजिनिअरिंग वा तत्सम व्यावसायिक शिक्षण मेहनतीने घ्यावे अशी इच्छाशक्ती मुलांमध्ये कमी होत आहे. त्यामुळे माझ्या मित्राला त्याच्या मुलांच्याबाबतीत असा धोका पत्करायचा नाहीये.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

15 Jan 2023 - 7:15 pm | हणमंतअण्णा शंकर...

माझ्या मित्राचेही असेच आहे. अनेक वर्षे जर्मनीला राहून तो परत आला. तथापि, मुलांच्या शिक्षणासाठी तो पुन्हा जर्मनी गाठायचा विचार करतोय. हा वेगळाच प्रकार आहे.

त्याचे प्रमुख कारण अर्थातच कुटुंब हे होते. जर्मनीत किंवा युरोपियन देशांत गेलेल्या पहिल्या पिढीचा सर्वात मोठा पुल हा पालकांचाच असतो.. कारण शक्यतो ही पिढी मध्यमवर्गीय सधन लहान कुटुंबांतून आलेली असते आणि आई-वडिलांशी खूप गुंतलेली असते. परदेशात गेलेल्या पिढीला त्यामुळे एकटेपणा खायला उठतो. त्यांच्या पुढच्या पिढीला कुटुंबात रमवण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. काही मंडळी पुन्हा मायदेशी परततात. आता या परतीच्या वेळेस मात्र पूर्वीचे मध्यमवर्गीय उच्चमध्यमवर्गीय झालेले असते. काही पैसा गाठीशी असतो.. इतर भारतीय समाजापासून त्यांची मुले मात्र पूर्णपणे तुटलेली असतात. श्रीमंत शाळांमध्ये शिकतात. ती मातृभाषा क्रियापदापुरती वापरतात. त्यांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून आय आय एम चे क्लासेस घेतले जातात.. ते इयत्ता बालवाडीलाच फ्रेंच, जर्मन नाहीतर जपानी शिकू लागतात कारण त्या मुलांची मुख्य भाषा भारतीय इंग्रजी झालेली असते. मिंग्लीशसारखी क्रियोल भाषा ते घरी वापरतात आणि ती जगण्यासाठी अगदीच निरुपयोगी आहे हे त्यांना न सांगताच उमजेले असते. हे लोक गेटेड कम्युनिटिज मध्ये राहतात. त्यांच्याकडे ल्यूसी, जॉन किंवा तत्सम नावांची अर्धवट परदेशी कुत्री असतात. त्यांचे म्हातारे आई आजोबा सुद्धा जमेल त्या इंग्रजीत त्यांच्याशी संवाद साधतात. गणपतीला वगैरे उकडीचे मोदक खाऊन, कधीतरी कृषिपर्यटन करून संस्कृती जपतात. बरं त्यांचे वर्तन वैज्ञानिक असते का तर तेही नाही. त्याची सुरवात तर ते अगदी सुवर्णप्राशन वगैरे असल्या गोष्टींपासूनच होते.

तुम्ही दिलेले दुसरे कारण अगदी इथेच आकाराला येते. पहिली पिढी एसबीआय बँकेतून क्लार्क म्हणून निवृत्त झाली. दुसरी पिढी समजा डॉएच्च बँकेत आयटी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. तर या दुसर्‍या पिढीला आपल्या मुलांनी किमान दोन स्टार्टप काढाव्यात असे वाटू लागते. काही लोकांच्या यशाच्या आणि कौटुंबिक आनंदाच्या व्याख्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना बेस्ट ऑफ बोथ हवे वाटू लागते.

जर्मनीसारखे देश शिक्षणामध्ये रॅट रेसला प्राधान्य देत नाहीत. सगळ्या राहणार्‍या व्यक्तींना हेल्थ इन्शुरन्स हा अनिवार्य असतो. जवळ्पास ८५ टक्के हेल्थ इन्शुरन्स हा पब्लिक कंपन्यांचा असतो ज्या ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवलेल्या असतात. आर्थिक उत्त्पन्न जितके जास्त तितका प्रिमियम जास्त. कमी उत्पन्न असेल तर प्रिमियमही कमी असतो आणि उपचार मात्र त्याच दर्जाचे मिळणार ही हमी असते. हा थोडक्यात समाजवादी प्रकार आहे. सर्वच लोक ठराविक रक्कम भरून सर्व लोकांना त्याच दर्जाची आरोग्यव्यवस्था मिळेल अशी तजवीज करतात. जर्मनीतल्या प्रत्येक मुलाला वयाच्या अठरा वर्षांपर्यंत/काहींना पंचवीस वर्षांपर्यंत एक रक्कम मिळते. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्चशिक्षण पूर्णपणे फुकट आहे. वरखर्च उचलावा लागतो पण त्या वरखर्चातली अर्धी रक्कम तर सरकारच देते. खाण्यापिण्यात कन्सेशन असते. विद्यार्थ्यांना संपूर्ण राज्यभर सार्वजनिक वाहतूक फु़कट वापरता येते. त्यामुळे सगळीकडे सारख्याच दर्जाचे शिक्षण मिळते. शिक्षणाचा दर्जा समान राखण्यात या समाजवादी बाबी कारणीभूत आहेत. संधींची त्यातल्या त्यात समानता, रोजगाराला असलेले सरकारी कवच, व्यवस्थेमध्ये रुजलेला प्रामाणिकपणा आणि शिस्त या सगळ्या बाबींमुळे व्यक्ती ही आनंदी राहण्यासाठी धडपड करते, दोन वेळच्या अन्नाची चिंता तितकीशी करत नाही. जिथे सुबत्तेने या बाबी सोडवेल्या आहेत. आपल्या ध्यानीमनीही नसणारे विषय त्यांच्या ऐरणीवर असतात. स्पर्धा असते पण बर्‍याचदा ती स्वतःशी असते. म्हणजे बॉडी बिल्डिंग करणे, सर्फिंग, वेकबोर्डिंग, पॅराग्लाईडींगसारखे धाडसी खेळ खेळून त्यांच्यात प्रावीण्य मिळवणे, इत्यादी इत्यादी..कुठल्याही अडचणीला जवळचे पोलिस स्टेशन गाठायला त्यांची भारतीयांसारखी प्रचंड फाटत नाही. काही जर्मन म्हातार्‍या पोलिसांना दरडावताना मी पाहिल्या आहेत.

कधीकधी प्रत्येक गोष्ट झगडून आणि नाका तोंडावर आपटून मिळवलेल्या पहिल्या दुसर्‍या पिढीला हे कळले तरी पचनी पडत नाही असे वाटते. खूप भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे. कदाचित काही दशकांची सामाजिक सुरक्षितता जशी परदेशस्थांना आंदण म्हणून मिळाली आहे तशी भारतीयांना मिळाली नाही आणि दुसर्‍या पिढीने प्रचंड स्पर्धात्मक राहून, भारतात बोर्डाबिर्डात येऊन झगडून मिळव्ली आहे ती सामुहिक असुरक्षिता सतत कुठेतरी पार्श्वभागाला असावी असे वाटते.

तर्कवादी's picture

15 Jan 2023 - 8:01 pm | तर्कवादी

हणमंतअण्णाजी
विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद,

तुमचा मुद्दा समजला.

भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे

शक्य आहे. कारण त्यांची आताची सुस्थिती त्यांनी भरपूर परिश्रम करुन , अतिशय महत्वाकांक्षेने मिळवली आहे. ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. झालेच तर ते स्वतः उच्चपदांवर काम करत असल्याने श्रमप्रतिष्ठाही मनात रुजलेली नाही. माझा रोबोटीक्स -ऑटोमेशन क्षेत्रात काम करणारा मित्र आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही.
पण मी वर म्हंटले तसे - माझ्या मित्राच्या सांगण्यानुसार त्याच्या ज्येष्ठ -जर्मन सहकार्‍यांची अशी खंत आहे की मुले फार काही चांगलं शिक्षण /उच्च शिक्षण घेण्यात रस दाखवत नाही .. फार काय तर , माझ्या मित्राच्या म्हणण्यानुसार या ज्येष्ठ जर्मन लोकांची तक्रार अगदी टिपीकल भारतीय पालकांसारखीच आहे म्हणजे "आम्ही आमच्या आई-वडीलांच ऐकलं, चांगलं शिक्षण घेतलं, मेहनत घेतली आणि करिअर घडवलं.. पण पुढच्या पिढीतली मुलं आमचं ऐकत नाहीत, मिळालेल्या स्वातंत्र्याचा नाहक फायदा घेतात.. वगैरे"

चौकस२१२'s picture

20 Jan 2023 - 9:11 am | चौकस२१२

भारतीय परदेशस्थ त्यांच्या मुलांना अतिशय स्पर्धात्मक करायचा (नाहक) प्रयत्न करतात असे माझे निरिक्षण आहे
".....ती महत्वाकांक्षा आपल्या मुलांत नसली तर ही कल्पनाही त्यांना करवत नाही. "

तर्कवादी, आपल्या या उप प्रतिसादाशी सहमत विशेष करून पहिल्या पिढीचे स्थलांतरित असे का वागतात या बद्दल २ पैसे माझे पण ..... पहिली पिढी हि बहुतेक फक्त शिक्षण बळावर येथे आलेली असते त्यामुळे आपण म्हणता तसे " आपला मुलगा मॅक डोनाल्ड वा तत्सम ठिकाणि वेटर म्हणून काम करेल अशी कल्पनाही कदाचित सहन करु शकणार नाही." असे घडते जरी येथे आल्यावर पाश्चिमात्य देशात "सर्व कामांना प्रतिष्ठां असते " हे माहिती असून सुद्धा आणि असे भांडी घासण्याची श्रम स्वतः विद्यार्थी दशेत केलेले असले तरी
२-३ ऱ्या पिढीत मग बदल होत जातो .. साहजिक आहे ..
तेव्हा हे "नाहक" असते असे मी पण १००% म्हणणार नाही ...