नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा
काल नगर ते पुणे असा प्रवास झाला. अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागेल अशी परिस्थिती आहे. या आधी पण बरेच वेळा हा प्रवास केलेला आहे, प्रत्येक वेळी परिस्थिति अजूनच गंभीर होत आहे असं वाटत आहे. प्रत्येक वेळी १-२ नुकतेच झालेले अपघात दिसतातच. यावेळी पण अपवाद नव्हताच. जेमतेम ११०-१२० किमी अंतर असलेला हा रस्ता पण इतका असुरक्षित का असावा? माझ्या थोड्याशा अनुभवातून मला काही कारणं दिसली.
१. खूप जास्त रहदारी : पुण्यापासून इतर ठिकाणी जाण्यासाठी जितके रस्ते आहेत त्यात निदान मलातरी नगर - पुणे इथेच सगळ्यात जास्त वाहतूक वाटली. पुणे - सोलापूर, पुणे - बेंगलोर ,पुणे - ताम्हिणी अशी तुलना केली तर हे प्रकर्षाने जाणवेल. पुणे - मुंबई कदाचित जास्त वाहतूक असेल पण जुना महामार्ग व एक्स्प्रेस हायवे असे पर्यायी मार्ग आहेत. मला तरी या मार्गाचा जास्त अनुभव नाही आहे.
२. खूप जास्त फाटे : नगर वरून पुण्याला येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला खूप जास्त फाटे लागतात. कोण कुठून कसं येईल किंवा कोण कुठून कसं जाईल याचा अंदाज लावणे जवळजवळ अशक्य आहे. समोरच्या वाहनाने इंडिकेटर मारला तरी आपली लेन बदलता येणे शक्य होईल का नाही हे नशिबावरच अवलंबून आहे.
३. पूल नसणे : सगळी वाहतूक एकच मुख्य रस्त्यावरून जाते कुणाला कुठेही जायचं असो पूल अजिबातच नाही आहेत. सर्व्हिस रोड वगैरे तर आनंदच आहे. U टर्न मारायचा तरी मुख्य रस्त्यावरूनच पुलाच्या खालून / वरून असा काहीच प्रकार नाहीये.
४. बाईक/ ऑटो : या रोड वर बाईक वाल्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि ८० % बाईक वाले हेल्मेट वापरत नाहीत. (माझा observation आहे विदा नाहीये माझ्याकडे) हेल्मेट शिवाय बॅग/ लहान मूल घेऊन २-३ जण एकाच बाईक वर जण्याइतका कॉन्फिडन्स असा येतो हे निदान मला तरी उमगले नाही. पुणे जवळ जवळ आले की ६ सिटर / ऑटो यांचे प्रमाण खूप जास्त वाढते. एक तर हे कुठेही थांबणार त्यात कुठूनही घुसू पाहणार आणि वर कुठंही वळणार.
५. जड वाहतूक : जड वाहतूक रात्री १० नंतर वगैरे नियम या रस्त्या साठी आहेत का नाहीत अशी शंका यावी एवढी जास्त जड वाहतूक या रस्त्यावर असते. २०-३० चाकी लांब लांब ट्रक बाईक वाल्यांमुळे उजव्या मर्गिकेतून जात असतात. ओव्हरटेक करायचं तर १०-१५ मिनिटं तर लागणारच लागणार.
६. पाऊस : पावसाचे पाणी कधी उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला साचलेले असते. उजव्या मार्गिकेतून जाताना समोरून येणाऱ्या वाहनांमुळे कधी पाणी उडून आपल्या गाडीचा अभिषेक होईल काही सांगता येत नाही. असे पाणी उडाले की १-२ मिनिटांसाठी तरी काहीच दिसू शकत नाही.
७. डीव्हायडर : रस्त्याच्या मधोमध जे डीव्हायडर आहेत ते कधी संपतात आणि कधी चालू होतात ते कळणे खूप अवघड आहे. मी स्वतः ३-४ अपघात बघितले त्यात वाहन या डीव्हायडरला धडकले होते.
अजूनही बरेच करणे असतील. माझ्या मर्यादित अनुभवावरून मला हे कारणे सुचले. लवकरात लवकर हा रस्ता मोठा व सुरक्षित व्हावा हीच अशा करून आवरते घेतो.
वाचने
5992
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
नगर हे पुण्याचे उपनगर आहे यात
In reply to नगर हे पुण्याचे उपनगर आहे यात by चौथा कोनाडा
अ. नगर हे जिल्ह्याचे ठिकाण
In reply to अ. नगर हे जिल्ह्याचे ठिकाण by विजुभाऊ
गंमतीने असे ....
सहमत. माझ्या मते मुद्दा २ आणि
In reply to सहमत. माझ्या मते मुद्दा २ आणि by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बरोबर मु क्र ७.
नगर रस्ता
+१ हेच लिहायला आलो होतो
In reply to +१ हेच लिहायला आलो होतो by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to +१ by तुषार काळभोर
मी एक दीड वर्षे मोशी, आळंदी,
क्रमांक दोनशी सहमत.
नगर - पुणे रस्ता : मृत्यूचा सापळा
आजचीच बातमी, नगर रस्त्यावर
आजची या रस्त्यावरील अ़जून एक दुर्दैवी घटना
In reply to आजची या रस्त्यावरील अ़जून एक दुर्दैवी घटना by सतिश गावडे
हो, वाचली होती ती बातमी आधी.
आता हा रस्ताच वाघोली पासून
पर्यायी रस्ते हवेत
In reply to पर्यायी रस्ते हवेत by चेतन सुभाष गुगळे
फक्त ६ च किमी जास्त अंतर
In reply to फक्त ६ च किमी जास्त अंतर by चेतन सुभाष गुगळे
उत्तम पर्याय !
सातारा रस्त्याशी तुलना करता
जवळपास दोन महिने बंद असलेला