दे दवांचे प्याले

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2022 - 2:43 pm

कितीदा ओठांवरती अव्यक्त राहिलेले
शब्द ते तुझ्या मी, डोळ्यांत वाचलेले

जायचे कुठेशी, मी चाललोय कोठे?
तुझ्या रूपाने, रूपाली, मला भारलेले

माळून दे म्हणालीस, माला तारकांची
केशी तुझ्या टपोरे, चंद्रफूल माळलेले

भेटता तुला उराशी, श्वासात आग येते
क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले

घनगर्द भावनांचा कल्लोळ माजतो ग
दे दवांचे प्याले, पाकळ्यांत साठलेले

- संदीप चांदणे

कविता माझीकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

14 Dec 2022 - 11:39 pm | तुषार काळभोर

क्षण तप्त, दग्ध, तरीही, भान गोठलेले
भावनांचं जबरदस्त शब्दांकन!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Dec 2022 - 12:03 am | ज्ञानोबाचे पैजार

मग? इतकी सुरेख कविता लिहिली म्हणून रुपाली ने काय बक्षीस दिले?

ता.क. :-चारचौघात न सांगता येण्यासारखे बक्षीस मिळाले असेल तर व्यनी किंवा कायाप्पा वर संदेश पाठवा

पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

15 Dec 2022 - 10:54 am | कर्नलतपस्वी

इतक्या छान कवीतेनंतर "रूपाली",मधे रूपाली बरोबर एक डेट तो बनती है भाई.

@सं.चा. कवीता आवडली यात शंकाच नाही. कवीतेचा अकृतीबंध सुरेश भट यांच्या गझले सारखा तर रूप पैठणी नेसून नखशिखांत सोन्याने मढलेल्या घरंदाज स्त्री सारखा वाटतो.

प्रचेतस's picture

15 Dec 2022 - 5:46 am | प्रचेतस

एकदम जबरदस्त संदीपशेठ.

आवडलीये कविता संदीपशेठ! बढिया है!! :-)

कुमार१'s picture

29 Dec 2022 - 8:44 am | कुमार१

आवडलीच !

चित्रगुप्त's picture

29 Dec 2022 - 12:01 pm | चित्रगुप्त

कविता आवडली.
अवांतरः मला नेहमी प्रश्न पडतो, की अलिकडल्या काही वर्षांपासून मराठीत 'राहिलेले' 'वाचलेले' साठलेले' 'माळलेले' 'गोठलेले' ..... असे 'ले'कारांत शब्द अनुक्रमे ' राहिले होते' 'वाचले होते' 'साठले होते' ... या अर्थाने सुद्धा वापरले जात आहेत. वस्तुतः 'वाचले होते' आणि 'वाचलेले' अशा दोन्ही शब्दरुपात फरक आहे. उदाहरणार्थ :

"हे पुस्तक मी पूर्वी बरेचदा वाचले होते, पण आता पूर्वी वाचलेले काहीच आठवत नाही"
"तिथे बरेच पाणी साचले होते, पण असे साचलेले पाणी प्यायला वापरावे की नाही, हा प्रश्नच होता"
असो. या सुंदर कवितेबद्दल अनेक आभार.

श्वेता२४'s picture

29 Dec 2022 - 12:09 pm | श्वेता२४

वरती लिहील्याप्रमाणे मलाही कवीवर्य सुरेश भट यांची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Jan 2023 - 11:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदीप शेठ, कविता आवडली.

-दिलीप बिरुटे