डॉ गजानन कागलकर यांचे निधन

Primary tabs

हेमंत सुरेश वाघे's picture
हेमंत सुरेश वाघे in काथ्याकूट
5 Sep 2022 - 4:38 pm
गाभा: 

मिपावरील एक अतिशय वादग्रस्त व्यक्ती डॉ गजानन कागलकर यांचे आज किंवा काल दुःखद निधन झाले .
ते दुसर्यांदा करोना ने आजारी होते असे वाटते आणि बहुदा आजारात गुणगुणत झाली

त्यांच्या फेसबुक पेज वरून
दुःखद बातमी
गजानन कगलकर
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए आर टी केंद्र
पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय,
गोवंडी मुंबई महाराष्ट्र ४०००४३
यांचे एड्स नियंत्रण कार्यक्रमात मोलाचे योगदान होते.
त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

त्यांचा आताचा आयडी माहीत नाही
त्यांचा अनेकांबरोबर वाद झाला त्यात मी पण होतो

आता ते नाहीत तर त्यांना शांती लाभो हि इच्छा

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 4:51 pm | जेम्स वांड

ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

वामन देशमुख's picture

5 Sep 2022 - 4:55 pm | वामन देशमुख

श्रद्धांजली

कुमार१'s picture

5 Sep 2022 - 5:05 pm | कुमार१

भावपूर्ण श्रद्धांजली !
......
खूप वर्षांपूर्वी (मिपाच्या जन्मापूर्वी) लोकसत्ताच्या हास्यरंगमध्ये विडंबन कविता स्पर्धा झाल्या होत्या. त्यातील बक्षीसपात्र कविता प्रसिद्ध केल्या जात.
त्यामध्ये “सायंकाळ होता होता पुन्हा वीज गेली” ( उषकाल होता होता चे विडंबन) ही कविता छापलेली होती. त्याखाली डॉ. गजानन कागलकर, कुरुंदवाड, जिल्हा कोल्हापूर असे लिहिलेले होते. मला ती खूप आवडल्याने मी ते कात्रण कापून ठेवलेले आहे.

ही बहुदा यांचीच असणार…. सुंदर आहे !

चौथा कोनाडा's picture

5 Sep 2022 - 5:13 pm | चौथा कोनाडा

भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏

त्यांची फेबू भिंत चाळली. एड्स नियंत्रण कार्यक्रमातले सक्रीय डॉ होते असे दिसले.
जुन्या जाणत्या मिपाकरांना माहित असावेत कदाचित !
त्यांचा एखादा मिपा धागा गवसल्यास इथे चिटकवावा ही विनंती !

कुमार१'s picture

5 Sep 2022 - 5:36 pm | कुमार१
चौथा कोनाडा's picture

5 Sep 2022 - 10:39 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद कुमार जी !

त्यांच्या सामाजिक, शिक्षणिक कार्यास अभिवादन !

कंजूस's picture

5 Sep 2022 - 5:40 pm | कंजूस

शिवाय ते एका वैद्यकीय केंद्रात शेवटपर्यंत कार्यरत होते. आताच्या घातकी संसर्गजन्य रोगांच्या साथीच्या काळात सेवा देत राहाणे हे कठीणच काम होते. त्या रुग्णांच्यात वावरतानाच स्वत:ला सुरक्षित ठेवणे अवघडच काम. ते नेटाने करत राहिले.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 5:53 pm | जेम्स वांड

वरिष्ठ अधिकारी, एड्स नियंत्रण कक्ष, पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी हॉस्पिटल, गोवंडी, मुंबई येथे कार्यरत होते, ट्युशन पण घेत ८, ९, १० वर्गाच्या बायोलॉजी विषयाच्या (गूगल नुसार), फॅमिली लाइफ पण बहुतेक डिस्टर्ब होते, हल्लीच नीट सेटल झाले असावेत.

पण लोकांना आठवतो माणूस फक्त भाजप अन् संघाला अन् हिंदू देवादिकांना शिव्या घालणारा म्हणून, कित्येक एड्सग्रस्त रुग्णांना सुश्रुषा दिली असेल त्याने त्या पुण्याची चाड चित्रगुप्त ठेवो ही प्रार्थना.

त्याला शिव्या देणाऱ्यापेक्षा हजारपट जास्त समाजसेवा करून गेला म्हणायचं.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 6:45 pm | जेम्स वांड

लेख दिल्याबद्दल, त्याचा नेमका प्रॉब्लेम तरी कळला.

एखाद्या माणसाला होतं सैरभैर एकदम एकटं पडल्यावर, करतात चूक माणसे अश्या अवस्थेत, तुम्ही त्याचा प्रॉब्लेम अन् त्याच्या मागचे कार्यकारण भाव मांडल्याबद्दल तुमचे पुन्हा आभार मानतो.

उरला प्रश्न हिंदुधर्म निंदण्याचा, तर असे लोक कमी नसतात, त्याने फारच तन से जुदा गुन्हा केला असे मला एक हिंदू म्हणून तर अजिबातच वाटत नाही, आपापली पेशांस लेव्हल समजा वाटल्यास.

गाणगापूर , औदुंबर इत्यादी ठिकाणी "बाधा" झालेली माणसे किंवा आयुष्याने खचलेली माणसे , उद्विग्न माणसे सापडतात की ऐन घाटावर क्षेत्राच्या ठिकाणीच देवाला शिवीगाळ करताना/ देवावर रागवलेली/ देवाला शापवाणी उच्चारणारी, तसला समजला हा मनुष्य तरी अश्या माणसांना सपोर्ट देणे माणुसकी अन् धर्मकार्य का शिव्या देणे ? ? क्षमाशीलता अन् करुणेने व्यापलेला हिंदुधर्म बरा का इशनिंदा अन् जिहाद पुकरणारी मानसिकता हिंदू धर्मात आणणे, हा ज्याचा त्याने विचार करावा.

कागलकरला प्रॉब्लेम असताना इतर धर्मात रेफ्युज शोधावी लागली, अश्या लोकांना धर्माने रिच आऊट व्हायला हवे असे वाटते , अर्थात लोकांना हे अमान्य असू शकेल पण मला तरी वाटते की हिंदू धर्माची व्याख्या चुकलेल्याला कवेत घेणे होय.

||श्रीराम जय राम जय जय राम||

त्यांना मदत करायचा अनेकांनी प्रयत्न केलेला; पण ते डिनायल मध्येच असायचे.

अश्या लोकांना धर्माने रिच आऊट व्हायला हवे असे वाटते

याच्याशी संपूर्ण सहमत!

कर्नलतपस्वी's picture

5 Sep 2022 - 6:23 pm | कर्नलतपस्वी

" जब होवे उमर पुरी
जब छुटे हुकूम हुजूरी"

गेलेला माणूस कसा होता या पेक्षा आपल्यातला होता हे महत्वाचे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 6:46 pm | जेम्स वांड

१०,०००००% सहमत

धर्मराजमुटके's picture

5 Sep 2022 - 7:42 pm | धर्मराजमुटके

श्रद्धांजली !
असेही मरणांती वैर संपवावे असे हिंदू धर्म सांगतो.
असेही जालीय वैर किती जीवाला लावून घ्यावे ? त्यातून काही साध्य होत नाही. माणसे तोडण्यापेक्षा जोडावीत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:47 pm | जेम्स वांड

१०,०००%

मुक्त विहारि's picture

5 Sep 2022 - 7:50 pm | मुक्त विहारि

आदरांजली...

श्री मयु, तुम्ही दिलेला दुव्याचा प्रतिसाद आता मला दिसत नाही. तो दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

तो मायबोलीवरील धागा वाचला आणि त्यातील प्रामाणिकपणा आवडला. श्री कागलकरांची ही बाजु माहिती नव्हती. त्यांचा त्रागा समजला आणि सहानुभुती वाटली. मराठी संकेतस्थळांचे मालक आणि चालक यांचे आभार. असल्या गोष्टी समोरासमोर बोलायला धेर्य लागते, ते जर नसेल किंवा तशी समजुतदार व्यक्ती मिळत नसेल तर साठलेल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आंतरजाल बरेच उपयोगी पडते.
--
श्रीकृष्णाची प्रार्थना करुन मुलगा होत नाही किंवा माउंट मेरीची प्रार्थना करुन मुलगी होत नाही, याचे ज्ञान त्यांना त्यांच्या वैदकीय पेशामुळे असेलच. त्यांचा हिंदुधर्मावरील राग बहुतेक त्यांच्या बायकोने आणि त्यांच्या माहेरच्या लोकांनी हिंदु धर्माचा चुकीचा अर्थ काढुन त्यांना मानसिक त्रास दिला त्याचा बदला म्हणुन हिंदु धर्माची जाहीर अवहेलना सुरु केली असे दिसते. त्यांची तशी प्रतिमा तयार झाली आणि शेवटी त्यात ते अडकले. किंवा कदाचित ती प्रतिमा त्यांनी आवडु लागली.
--
एक (कट्टर) हिंदु म्हणुन मला त्यांच्या टिकेत काही वावगे वाटत नाही. हिंदु धर्मात राहुन हिंदु देवदेवता यांचे कठोर परिक्षण आणि हिंदु धर्मातील भाकड गोष्टींवर टिका करते येते ह्याचे मला खुप अप्रुप आहे. त्यामुळेच हिंदु धर्म इतके दिवस टिकला आणि कालसुसंगत होत राहीला. फक्त (ढोंगी) पुरोगामी हिंदु धर्मावर टिका करतात आणि इतर ठिकाणी शेपुट घालतात ते पाहुन डोक्यात तिडीक जाते. पण माझ्या मते ती बाब श्री कागलकर यांची नव्हती.

(ढोंगी) पुरोगामी हिंदु धर्मावर टिका करतात आणि इतर ठिकाणी शेपुट घालतात ते पाहुन डोक्यात तिडीक जाते. पण माझ्या मते ती बाब श्री कागलकर यांची नव्हती.

तुम्हाला (आणि इथं प्रतिसाद दिलेल्या अनेकांना) बऱ्याच गोष्टी माहीत नसाव्यात असं वाटतंय.

इति लेखनसीमा!

तुम्हाला (आणि इथं प्रतिसाद दिलेल्या अनेकांना) बऱ्याच गोष्टी माहीत नसाव्यात असं वाटतंय.

तसेही असु शकते. मला श्री कागलकर यांच्या लेखनाचा परीचय ब्लॅककॅट उपभोक्तानावानंतर आहे. वैयक्तिक परीचय नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2022 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉ.कागलकरांचा मिपाकर उल्लेख यायचा. असेच कधीतरी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेष्ट आलेली. इतकीच जुजबी ओळख. फोटोवरुन हा व्यक्ती इतके लिहित असेल असे वाटायचे नाही. तो चश्मा, ते दिसणे, सगलं वेगळंच. पण, तल्लख बुद्धीमत्ता, वाद, विचार, थेट स्पष्ट. वेगवेगळे आयडी बॅन व्हायचे. पण, नव्या आयडीने आले की ते हेच असणार हे मात्र कळायचे. प्रतिसाद वेगळे, माहितीपूर्ण असायचे. कोणत्यातरी धाग्यात- वादात अनेकदा भिडलेले दिसायचे. चिकाटीने लिहिणारे, त्यांचं लेखन कायम आवडलं. डॉ.कागलकरांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. काही मिपाकर प्रतिसादाने कायम लक्षात राहतात. आठवण राहीलच. भावपूर्ण श्रद्धांजली. _/\_

-दिलीप बिरुटे

कागलकर साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली, नानांच्या कायप्पा समुहावर होते बहुतेक हे. कायप्पा समुहांमधुन बाहेर पडल्यानंतर फारसा संबंध आला नाही.

निनाद's picture

6 Sep 2022 - 4:07 am | निनाद

डॉ.कागलकरांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला.

कपिलमुनी's picture

6 Sep 2022 - 9:48 am | कपिलमुनी

भावपूर्ण श्रद्धांजली

कागलकर अल्पशा आजाराने गेले हे पटत नाही. कारण त्यांचे वय पन्नाशीच्या आत असावे. असं असताना अल्पशा आजाराने गेले?

असो!

त्यांच्याशी अनेक वेळेस वैचारिक मतभेद झाले. टोकाचा हिंदुत्वद्वेष आणि त्यातून निर्माण झालेले टोकाचे इस्लामचे समर्थन यामुळे बऱ्याच वेळेस त्यांनी अतिशय चुकीच्या तर्हेने लोकांशी वैचारिक वाद करवून घेतलेले होते.

गत आयुष्यात आलेल्या कटु अनुभवांमुळे आणि कौटुंबिक अस्वास्थ्यामुळे विचारात विसंगती( inconsistency) होती आणि माणूस नकारात्मक वृत्तीचा झाला होता. ( कदाचित नकारात्मक वृत्ती मुळे असे कौटुंबिक अस्वास्थ्य झाले असावे).

माणूस हुशार होता पण आत्यंतिक द्वेशामुळे वैचारिक सुसंगती सोडली होती

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो

कुमार१'s picture

6 Sep 2022 - 11:36 am | कुमार१

कागलकर अल्पशा आजाराने गेले हे पटत नाही.

त्यांचे स्वतःचे माबोवरील प्रतिसाद :

चित्रविचित्र रिपोर्ट आहे
डेंगू एन एस 1 पॉझिटिव्ह आला आहे
Cardiac एंझाइम्स वाढले आहेत
कोविड स्वब अजून रिपोर्ट बाकी आहेत
आज 2 डी करतील
Submitted by BLACKCAT on 1 September, 2022 -

माझी लक्षणे ब्रेठलेसनेस ऑन एक्झर्शन होती
दुसरे ताप , अंगदुखी तेंव्हा नव्हते
तीन दिवसांपासून हार्ट रेट 130 इ असतो
म्हणून केली
जे होतंय ते कोविड डेंग्यू की कार्डिअक असे लक्षात घेऊन ते काम करत आहेत
Submitted by BLACKCAT on 1 September, 2022

.....
नंतर अधिक काही समजले नाही.
पण जो काही आजार झाला असेल त्याचा हृदयावर परिणाम झालेला दिसतोय.

कंजूस's picture

6 Sep 2022 - 2:26 pm | कंजूस

जिथे काम करत होते ते एडसचे होते. काही संसर्ग झाला असू शकतो. आणि त्यांनी गुप्तपणे परीक्षाही करवून खात्री करून घेतली असेल. एडस असा विचित्र रोग आहे की साधा सर्दी खोकलाही बरा होत नाही.

Cardiac एंझाइम्स वाढले आहेत

हृदयविकाराचा झटका आला होता का?

कुमार१'s picture

8 Sep 2022 - 7:49 pm | कुमार१

आपल्याला त्यांचा तब्येतीचा पूर्वीचा इतिहास माहित नाही. वर त्यांनी लिहिलेल्या थोड्या माहितीच्या आधारे अनुमान काढणे अवघड आहे.

निरनिराळ्या विषाणू संसर्गांमध्येही हृदयस्नायूदाह होतो आणि त्यात एंजाइम्स वाढू शकतात.

चौथा कोनाडा's picture

6 Sep 2022 - 2:33 pm | चौथा कोनाडा

वाचनीय असा वाद-विवाद !
वाचला होता त्या वेळी .....
जालीय हाणामारीचे ते संस्मरीणीय दिवस.
नंतर असली भांडणं फेसबुक वर होत होती ... आता त्याचं प्रमाण कमी आलंय !
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी !

अभिजीत अवलिया's picture

9 Sep 2022 - 5:02 pm | अभिजीत अवलिया

!!! भावपूर्ण श्रद्धांजली !!!

रुस्तम's picture

10 Sep 2022 - 12:22 am | रुस्तम

भावपूर्ण श्रद्धांजली __/\__