नमस्कार मंडळी,
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवीन भाग काढत आहे. नवीन प्रतिसाद लिहायचे असतील तर ते या भागात लिहावेत आणि आधीच्या भागात लिहिलेल्या प्रतिसादांना उत्तर लिहायचे असेल तरच ते त्या भागात लिहावेत ही विनंती. या महिन्यात पहिल्या दोन भागात मिपा परंपरेला अनुसरून चांगली चर्चा झाली आहे त्याबद्दल सगळ्यांचे आभार.
नितीशकुमार परत राजदबरोबर गेले तेव्हा मी त्यावेळेस चर्चेत मी म्हटले होते की समाजवादी नेते भांडण्यासाठी एकत्र येतात आणि एकत्र येण्यासाठी भांडतात. तसेच समाजवादी विचारांचे पक्ष किती वेळा एकत्र आले आणि किती वेळा तुटले याचा हिशेब ठेवणे कोणाही मर्त्य मानवाला शक्य होईल असे वाटत नाही. ते का हे या भागात इथे टाईमलाईनच्या मदतीने स्पष्ट करतो.
१९३० चे दशक: जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव आणि आचार्य जीवतराम कृपलानी यांनी काँग्रेस अंतर्गत काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९४९: जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी काँग्रेस सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९५१: आचार्य कृपलानींनी काँग्रेस सोडून स्वत:च्या किसान मजदूर प्रजा पक्षाची स्थापना केली.
१९५२: पहिल्या लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर समाजवादी पक्ष आणि किसान मजदूर प्रजा पक्ष एकत्र येऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५: राममनोहर लोहियांनी प्रजा समाजवादी पक्ष सोडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९६४: कर्पुरी ठाकूर यांनी प्रजा समाजवादी पक्षातून बाहेर पडून स्वत:च्या संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस यांचा पण संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश
१९६७ - चरणसिंग यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून भारतीय क्रांती दलाची स्थापना केली.
१९६९ - बिजू पटनाईक यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून उत्कल काँग्रेस पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षात फूट-- इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(आर) आणि मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस(ओ) पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
१९७२ - १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर प्रजा समाजवादी आणि संयुक्त समाजवादी एकत्र येऊन नव्या समाजवादी पक्षाची स्थापना
१९७४ - चरणसिंगांचा भारतीय क्रांतीदल, बिजू पटनाईकांचा उत्कल काँग्रेस, १९७२ मध्ये स्थापन झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला मिनू मसानी-पिलू मोदींचा स्वतंत्र पक्ष आणि १९७३ मध्ये भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला स्वत:चा पक्ष एकत्र येऊन भारतीय लोकदल या पक्षाची स्थापना
१९७७ - जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा आणि नंदिनी सत्पथी काँग्रेसबाहेर पडून त्यांनी स्वत:चा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी हा पक्ष स्थापन केला.१९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हा काँग्रेस फॉर डेमॉक्रसी, भारतीय लोकदल, काँग्रेस(ओ) आणि भारतीय जनसंघ यांनी भारतीय लोकदलाच्या हलधर या चिन्हावर निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर या पक्षांचे जनता पक्ष या नव्या पक्षात विलीनीकरण.
१९७८ - शरद पवार, वायलार रवी, अंबिका सोनी आणि के.पी.उन्नीकृष्णन यांनी काँग्रेस पक्षाबाहेर पडून काँग्रेस(समाजवादी) या पक्षाची स्थापना केली.
१९७९: चरणसिंग, राजनारायण इत्यादी नेत्यांनी जनता पक्ष सोडून जनता पक्ष (सेक्युलर) स्थापन केला आणि जनता पक्षाचे सरकार पाडले. चरणसिंग औटघटकेचे पंतप्रधान झाले.
१९८०- लोकसभा निवडणुकांमध्ये धुव्वा उडल्यानंतर चरणसिंग जनता पक्ष(सेक्युलर) बाहेर पडले आणि स्वत:च्या भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवन राम जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा काँग्रेस(जे) पक्ष स्थापन केला. जनता पक्षातून पूर्वाश्रमीचे जनसंघाचे नेते बाहेर पडून त्यांनी स्वत:च्या भारतीय जनता पक्षाची स्थापना केली.
१९८०/१९८१: चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून देवीलाल यांच्या स्वत:च्या लोकदल(बी) पक्षाची स्थापना केली.
१९८७-- काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर त्यांनी जनमोर्चा या अराजकीय गटाची स्थापना केली. शरद पवार, अंबिका सोनी आणि वायलार रवी काँग्रेसमध्ये परतले. के.पी.उन्नीकृष्णन काँग्रेस(एस) बरोबर राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (त्यांच्या मृत्यूनंतर अजितसिंगांचा) लोकदल, देवीलालांचा लोकदल, काँग्रेस(एस), वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा एकत्र येऊन जनता दलाची स्थापना.
१९८९- लोकसभा निवडणुकांनंतर जनता दलाचा गटनेता (म्हणजेच होणारा नवा पंतप्रधान) निवडायच्या वेळेस चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग हे दोन दावेदार होते. अरूण नेहरू आणि पत्रकार कुलदीप नय्यर यांना हाताशी धरून वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखर यांना मात द्यायचा डाव खेळला. बैठक सुरू होताच ताबडतोब इतरांना कोणालाही बोलायची संधी न देता वि.प्र.सिंगांनी देवीलालांचे नाव नेतेपदावर सुचविले. काही क्षणातच पुढील पंतप्रधान देवीलाल असतील अशा तारा वर्तमानपत्रांच्या ऑफिसात गेल्याही होत्या. पण देवीलालांनी आपले वय ७५ उलटून गेले असल्याने इतकी मोठी जबाबदारी आपल्याला नको असे म्हटले आणि नेतेपदासाठी वि.प्र.सिंगांचे नाव सुचविले. हे सगळे चंद्रशेखरांना अंधारात ठेऊन ठरवून केले गेले होते. त्यातून चंद्रशेखर दुखावले गेले आणि ते वि.प्र.सिंगांच्या शपथविधीलाही हजर नव्हते.
१९९०- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलाबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दल या पक्षाची स्थापना केली. चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले. राजस्थानात दिग्विजयसिंग (मध्यप्रदेशातील वाचाळवीर दिग्विजियसिंग वेगळे) या स्थानिक नेत्याने जनता दल सोडून स्वत:चा गट स्थापन करून भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि भैरोसिंग शेखावतांचे अल्पमतातले सरकार तारले.
१९९१-- चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या जनता दल(गुजरात) पक्षाची स्थापना केली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने आपले सरकार तारले.
१९९२- अजितसिंग जनता दलाबाहेर आणि त्यांनी स्वत:चा जनता दल(अजित) हा पक्ष स्थापन केला. मुलायमसिंग यादव समाजवादी जनता दलाबाहेर पडून त्यांनी स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली. चिमणभाई पटेल यांचा जनता द्ला(गुजरात) हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन.
१९९३-- जनता दल, समाजवादी जनता दल आणि जनता दल (अजित) यांची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका एकत्र लढवायची घोषणा. पण उत्तर प्रदेशात जोरदार पराभव झाल्यानंतर अजित सिंगांनी त्यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९० मध्ये राजस्थानात भैरोसिंग शेखावतांचे सरकार तारणारे दिग्विजयसिंग काँग्रेसमध्ये गेले.
१९९४- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. नंतर देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी पण समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर यांनी पण समता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुक लढवली. पण निवडणुकांनंतर त्यांनी आपला समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) ची स्थापना केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजितसिंग काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी स्वत:चा भारतीय किसान कामगार पक्ष स्थापन केला. निवडणुकांनंतर रामकृष्ण हेगडेंची जनता दलातून हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोकदल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव १९९९ मध्ये बदलून इंडिअन नॅशनल लोकदल हे झाले. नवीन पटनाईक यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल हा पक्ष स्थापन केला.
१९९९--- उरल्यासुरल्या जनता दलात जनता दल(धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल(संयुक्त) हे दोन तुकडे पडले. देवेगौडा आणि कुमारस्वामी जनता दल(धर्मनिरपेक्ष) मध्ये तर रामविलास पासवान जनता दल(संयुक्त) मध्ये सामील. समता पक्ष आणि लोकशक्ती हे दोन पक्षही जनता दल (संयुक्त) मध्ये विलीन. १९९९ मध्ये कर्नाटकात जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि जनता दल (संयुक्त) हे दोन्ही गट होते. २००५-०६ च्या दरम्यान कर्नाटकातील जनता दल (संयुक्त) पक्ष अस्तंगत झाला.
२००२-- रामविलास पासवान यांनी जनता दल(संयुक्त) सोडून आपला लोकजनशक्ती हा पक्ष स्थापन केला.
२००६-- कर्नाटकात सिध्दरामय्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) मधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले. पुढे २०१३ मध्ये ते काँग्रेसकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले.
२०१४-- मोदीलाटेत सगळे पक्ष वाहून गेल्यानंतर परत एकदा जनता दलाचे पुनरूज्जिवन करायची घोषणा. पण ती प्रत्यक्षात आली नाही.
२०१७-- नितीशकुमारांनी परत एकदा भाजपबरोबर हातमिळवणी केल्यानंतर नाराज शरद यादवांचा अनामिक एक व्यक्ती असलेला स्वतंत्र गट.
२०२२-- नितीशकुमार यांनी परत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली.
या सगळ्या ब्रम्हघोटाळ्यात कितीतरी मधल्या पायऱ्या मी विसरलो आहे हे नक्की. १९८०/८१ मध्ये कधीतरी देवीलालांनी चरणसिंगांच्या भारतीय लोकदल पक्षातून बाहेर पडून आपला लोकदल (बी) पक्ष स्थापन केला हे वर लिहिलेच आहे. १९८७ मध्ये चरणसिंगांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र अजितसिंग चरणसिंगांच्या लोकदल पक्षाचे अध्यक्ष झाले आणि तो गट लोकदल(ए) नावाने ओळखला जाऊ लागला. मुलायमसिंग यादवही त्याच पक्षात होते. चरणसिंगांनंतर पक्षाचे अध्यक्षपद आपल्याकडे येईल असे मुलायमसिंगांना वाटत होते पण अजितसिंग हे चरणसिंगांचे पुत्र असल्याने ते अनेक वर्षे अमेरिकेतले आपले वास्तव्य आणि ग्रीनकार्ड सोडून आले आणि ते अध्यक्ष बनले. अजितसिंग आणि मुलायमसिंग यादव यांचे जमायचे नाही. त्यामुळे अजितसिंगांनी मुलायमसिंगांना पक्षातून बाहेर काढले होते. हे १९८७/८८ मध्ये कधीतरी झाले. ते नक्की कधी झाले हे मला माहित नाही. हेच सगळे लोक १९८८ मध्ये जनता दलात परत एकत्र आले होते.
१९८९ च्या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानपदासाठी वि.प्र.सिंगांनी चंद्रशेखरांना धोबीपछाड दिला हे वर लिहिलेच आहे. त्याचा सूड मग चंद्रशेखरांनी लगेच उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री नेमताना उगवला. अजितसिंग मुख्यमंत्री व्हावेत असे वि.प्र.सिंगांना वाटत होते तर चंद्रशेखरांचे उमेदवार होते मुलायमसिंग यादव. चंद्रशेखरांचा गट भारी पडला आणि उत्तर प्रदेशात मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. पुढे मार्च १९९० मध्ये बिहारमध्ये मुख्यमंत्री निवडायच्या वेळेस वि.प्र.सिंगांचे उमेदवार होते रामसुंदर दास तर त्यांना आव्हान दिले होते लालू यादवांनी. लालूंनी चंद्रशेखरांकडे मुख्यमंत्री व्हायला मदत मागितली तेव्हा चंद्रशेखरांनी स्वतःचा रघुनाथ झा हा उमेदवार उभा केला. तेव्हा नेतेपदासाठी आमदारांमध्ये निवडणुक झाली होती. त्या निवडणुकीत रघुनाथ झांनी रामसुंदर दासांची मते फोडून लालूंचा विजय निश्चित केला. भारतीय राजकारणातील दोन सगळ्यात घाणेरडे लोक- लालू आणि मुलायमसिंग यादव या राजकारणातून पुढे आले आहेत.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या पार्श्वभूमीवर परत नितीश आणि तेजस्वी/लालू फुटले तर अजिबात आश्चर्य वाटू नये.
वाचने
35122
प्रतिक्रिया
212
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलमाडी, अजित पवार, धनंजय
In reply to आता एक अत्यंत कार्यक्षम नेता by श्रीगुरुजी
कलमाडी, अजित पवार, धनंजय मुंडे, भुजबळ अश्यांचे पायघड्या घालून भाजपत स्वागत केले जाईल.कलमाडी गंगेत डुबकी मारणार?भाजपची हळु हळु शिसारी यायला
In reply to कलमाडी, अजित पवार, धनंजय by श्रीगुरुजी
इतर राज्यात हा घाणेरडा प्रकार
In reply to भाजपची हळु हळु शिसारी यायला by Trump
फडणवीस वाईट्टच. :)
In reply to इतर राज्यात हा घाणेरडा प्रकार by श्रीगुरुजी
फारच सौम्य शब्द आहे.
In reply to फडणवीस वाईट्टच. :) by शाम भागवत
:)
In reply to फारच सौम्य शब्द आहे. by श्रीगुरुजी
शामराव
In reply to :) by शाम भागवत
माझा पास.
In reply to शामराव by जेम्स वांड
कलमाडी यांची राजकीय किंमत किती आहे?
In reply to कलमाडी, अजित पवार, धनंजय by श्रीगुरुजी
कोणी कितीही निंदा
In reply to कलमाडी यांची राजकीय किंमत किती आहे? by तुषार काळभोर
पण पुण्याची आयटी हब ही ओळख
In reply to कोणी कितीही निंदा by जेम्स वांड
पण पुण्याची आयटी हब ही ओळख बनविण्यात कलमाडींच्या प्रयत्नांचा हातभार लागलेला आहेच, एकार्थाने आज असलेली पुण्याची सुबत्ता तशी घडविण्यात त्यांचा हात आहेच.काहीतरीच काय.बरं!
In reply to पण पुण्याची आयटी हब ही ओळख by श्रीगुरुजी
१) मुळात हिंजवडी हा पुण्याचा
In reply to बरं! by जेम्स वांड
कलमाडी पवारांचे जुने मित्र.
In reply to कलमाडी यांची राजकीय किंमत किती आहे? by तुषार काळभोर
कलमाडी आणि पवार एकमेकांच्या
In reply to कलमाडी पवारांचे जुने मित्र. by शाम भागवत
मोदी शहा कोणत्याही छोटासा
In reply to कलमाडी आणि पवार एकमेकांच्या by श्रीगुरुजी
पण पवार हा त्यांना कोणत्याही
In reply to मोदी शहा कोणत्याही छोटासा by शाम भागवत
मी काही वर्षे, निदान अडीच
In reply to पण पवार हा त्यांना कोणत्याही by श्रीगुरुजी
पण पवार हा त्यांना कोणत्याही परिस्थितीत धोका नसल्याने
In reply to पण पवार हा त्यांना कोणत्याही by श्रीगुरुजी
पवार कायमच अश्या स्वरूपात
In reply to पण पवार हा त्यांना कोणत्याही परिस्थितीत धोका नसल्याने by धर्मराजमुटके
पवारांच्या गोष्टी माहिती
In reply to पण पवार हा त्यांना कोणत्याही by श्रीगुरुजी
मुळात पवार हे कधीच मोदींचा
In reply to पवारांच्या गोष्टी माहिती by सुबोध खरे
अन्यथा त्यांनी मागील ८ वर्षात
In reply to कलमाडी आणि पवार एकमेकांच्या by श्रीगुरुजी
पण सुरेश कलमाडी या राजकीय
In reply to कलमाडी यांची राजकीय किंमत किती आहे? by तुषार काळभोर
पण सुरेश कलमाडी या राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी काँग्रेस नेत्याला घेण्याने भाजपला फायदा होणार नाहीच.बरोबर आहे. पण पाचपुते, हर्षवर्धन पाटील, कालिदास कोळंबकर, भीमराव केराम, किसन कथोरे, मधुकर पिचड अश्यांना घेऊन तरी काय फायदा होता?पण सुरेश कलमाडी या राजकीय अस्तित्व संपलेल्या माजी काँग्रेस नेत्य
In reply to पण सुरेश कलमाडी या राजकीय by श्रीगुरुजी
वैयक्तिक कॅराव्हॅन पर्यटनाला परवानगी.
हायला.....तरीच
In reply to वैयक्तिक कॅराव्हॅन पर्यटनाला परवानगी. by टर्मीनेटर
हो. आता कॅराव्हॅन्सची अधिकृतपणे नोंदणी सुरु
In reply to हायला.....तरीच by सुरिया
बॉलिवूड मधले हिरो हिरविनी
In reply to हो. आता कॅराव्हॅन्सची अधिकृतपणे नोंदणी सुरु by टर्मीनेटर
Bilkis Bano case: “दोषींची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2बिल्कीस बानोवर बलात्कार
In reply to Bilkis Bano case: “दोषींची by मदनबाण
सहमत
In reply to Bilkis Bano case: “दोषींची by मदनबाण
त्याशिवाय
In reply to सहमत by जेम्स वांड
बीबीसी ची गीता पांडे कशी
बरेचदा तशी गोध्रा घटना झाल्याचे बरेच जण लपवतात.
In reply to बीबीसी ची गीता पांडे कशी by डँबिस००७
बिल्किस बानो वरच्या
तुमचा
In reply to बिल्किस बानो वरच्या by डँबिस००७
श्री जेम्स वांड, तुमचा प्रतिसाद रोचक आहे.
In reply to तुमचा by जेम्स वांड
ओके मग आपण आता legal terms वर बोलूया
In reply to श्री जेम्स वांड, तुमचा प्रतिसाद रोचक आहे. by Trump
ओके मग आपण आता legal terms वर
In reply to ओके मग आपण आता legal terms वर बोलूया by जेम्स वांड
हम्म
In reply to ओके मग आपण आता legal terms वर by Trump
धन्यवाद श्री वांड
In reply to हम्म by जेम्स वांड
मला नाही वाटत कोर्ट कोणाच्या
In reply to हम्म by जेम्स वांड
जन्मठेप = १४ वर्ष)|>>>>हे चूक
In reply to श्री जेम्स वांड, तुमचा प्रतिसाद रोचक आहे. by Trump
कृपया मुळ निकालाची प्रत द्या.
In reply to जन्मठेप = १४ वर्ष)|>>>>हे चूक by Vichar Manus
सुशीलकुमार शिंदे ऑक्टोबर २००४
वाह गुरुजी
In reply to सुशीलकुमार शिंदे ऑक्टोबर २००४ by श्रीगुरुजी
तो निर्णय न्यायालयाने रद्द
In reply to सुशीलकुमार शिंदे ऑक्टोबर २००४ by श्रीगुरुजी
Bilkis Bano: The pain of
गीता पांडे
In reply to Bilkis Bano: The pain of by डँबिस००७
"ती उत्तम संस्कार असलेली
In reply to गीता पांडे by जेम्स वांड
रावण देखील दशग्रंथी ब्राह्मणच
In reply to "ती उत्तम संस्कार असलेली by Trump
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हृदयी वसंत फुलताना-Hridayi Vasant Phultana Full Song :- Takatak 2रावण आणि हे गुन्हेगार जन्माने
In reply to रावण देखील दशग्रंथी ब्राह्मणच by मदनबाण
मला सांगा
In reply to रावण आणि हे गुन्हेगार जन्माने by Trump
सध्यातरी जन्माप्रमाणे लिहीले
In reply to मला सांगा by जेम्स वांड
पुर्ववैमनस्य
In reply to Bilkis Bano: The pain of by डँबिस००७
ह्याला वरतीच उत्तर दिले आहे
In reply to पुर्ववैमनस्य by Trump
गिरिजा टिक्कू
खरंय
In reply to गिरिजा टिक्कू by वामन देशमुख
दिल्लीच्या उप मुख्यमंत्री
मोदी समर्थक
In reply to दिल्लीच्या उप मुख्यमंत्री by डँबिस००७
मी जे ऐकलेय वा वाचतोय
In reply to दिल्लीच्या उप मुख्यमंत्री by डँबिस००७
येणार्या गुजरात निवडणुकीत
In reply to मी जे ऐकलेय वा वाचतोय by कानडाऊ योगेशु
सहमत, अति तेथे माती.
In reply to येणार्या गुजरात निवडणुकीत by तर्कवादी
फुकट वीज वगैरे देण्याच्या
In reply to येणार्या गुजरात निवडणुकीत by तर्कवादी
सहमत
In reply to फुकट वीज वगैरे देण्याच्या by श्रीगुरुजी
सध्या तीच योजना असावी. २०१७
In reply to सहमत by जेम्स वांड
हिंदुत्त्ववादीही भाजपपासून
In reply to येणार्या गुजरात निवडणुकीत by तर्कवादी
मुंबई वर हल्ल्याची धमकी, संशयितास अटक...
गोलपारातून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक,