सिर्फ त्रिवेदी बचेगा।

Primary tabs

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
5 Feb 2022 - 6:45 pm

पहिली,दुसरीला बसवलं
होतं फाट्यावर
तीसरीने केली कुरघोडी
आणून बसवलं खाटेवर

कधी आली,कशी आली
माहीत नाही कुठं गाठ पडली
अतीरेक्या सारखी घुसली
पहिल्या फळीची दाणादाण उडली

लढवत होती पंजा
आजमावत होती जोर
पण मजबूत ज्याचा माजां
तोच कापणार होता दोर

लढवत होती पेच
टाकत होती डाव
घालत होती सह्याद्रीच्या उरावर
टिकावा चा घाव

तीन दिवस तीन रात्री
घमासान लढाई केली
खूप काढला घाम
आणी खूप दमणूक झाली

शिजत नाही डाळ बघून
मागे परत फिरली
टिबं टिबं च्या.................. प्रेमा पुढे
ती बिचारी हारली
ती बिचारी हारली.......

सात दिवस अडां सेल मधे काढल्यानंतर आज ठीक वाटत आहे. "सिर्फ त्रिवेदी बचेगा "। याचाअर्थ आज कळतोय. ज्याने आहार विहार आणी निद्रा हे तीन वेद समजुन घेतले तो नक्कीच वाचणार हे या तीन लाटा मधे स्पष्ट झाले आहे. टिबं टिबं मधे बरेच जण आहेत त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

अव्यक्तआशादायककरोनाजाणिवजीवनकवितामुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

6 Feb 2022 - 6:39 am | चांदणे संदीप

वो सात दिन...!
मस्त रचना. आवडली.

सं - दी - प

Bhakti's picture

6 Feb 2022 - 7:49 am | Bhakti

छान!

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

6 Feb 2022 - 10:35 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान.

विजुभाऊ's picture

7 Feb 2022 - 12:01 pm | विजुभाऊ

काही रेफरन्स लागले नाहीत.
कविता म्हणूनही काही समजलं नाही

कर्नलतपस्वी's picture

7 Feb 2022 - 3:19 pm | कर्नलतपस्वी

पहिल्या कडव्यातच रेफरन्स आहे. लाट आणी करोना जवळपास समानार्थी शब्द झालाय. दोन लाटा गेल्या पण तीसरीने पकडले. सात दिवस झाले घरातच बंद आहे. तोच संघर्ष लीहीला आहे़ आता मस्त.
धन्यवाद.

कुमार१'s picture

10 Feb 2022 - 3:26 pm | कुमार१

मस्त रचना. आवडली.