लैंगिक वाङ्मय : स्वानुभव आणि स्थित्यंतरे
वरील छोट्या पुस्तकांबरोबरच अन्य एका मासिकाचा उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे Debonair. आमच्या कोणाच्याच बाबतीत हे मासिक घरात येण्याची शक्यता बिलकुल नव्हती आणि घरी न सांगता त्याची रीतसर मासिक वर्गणी भरण्याइतपत आम्हा मित्रात कोणी सधन नव्हते. त्यामुळे जुन्या बाजारातून त्याचे काही अंक कोणीतरी घेई आणि मग ते खोल्यांमधून फिरत. त्या मासिकातल्या ‘मधल्या’ पानावरील (centerspread) मुक्त अंगप्रदर्शन केलेल्या स्त्रीचा फोटो हे तरुणांचे मुख्य आकर्षण असे. ते मधले पान बर्याच मोठ्या आकाराचे असे व ते घडी घातलेल्या स्वरूपात मासिकात समाविष्ट असे. ते काढून कोणाच्यातरी खोलीतील भिंतीवर यथावकाश स्थानापन्न होई. असे एखादे नवे चित्र एखाद्या खोलीत लागले की त्या खोलीचा भाव एकदम वधारत असे. तरुणांमध्ये या मासिकाचे आकर्षण त्या फोटोपुरतेच असले तरी हीच त्याची मर्यादा नव्हती. त्यात काही माहितीपूर्ण लेख, राजकीय टिप्पणी आणि खुशवंतसिंग (आणि तत्सम मंडळी) यांचे लैंगिक विनोद असेही साहित्य असे. एकूण ते मासिक तसा आब राखून होते. लैंगिक शिक्षणाच्या रोखाने असलेला त्यातला एक लेख आजही आठवतो. त्यात लेखकाने पुरुषाच्या हस्तमैथुनाची अटळता व उपयुक्तता छान मांडली होती. या क्रियेने अविवाहित अवस्थेत पुरुषाच्या लैंगिक सुखाचा प्रारंभ होतो. पण तितकेच त्याचे महत्त्व नसून ती क्रिया प्रत्येक पुरूषाची आयुष्यभराची सोबत असते, हा मुद्दा मनावर अगदी ठसला. विवाहित पुरुषाच्या आयुष्यातसुद्धा अनेक कारणांनी कधी ना कधी एकटेपणाचे प्रसंग येतातच. तेव्हा या क्रियेचे महत्त्व समजून येते.
.
प्रत्यक्ष संभोग आणि कल्पनारंजनातून केलेले हस्तमैथुन ही दोन वेगळ्या पातळ्यांवरील सुखे आहेत हे अनुभवांती लक्षात येते. कालांतराने डेबोनेरला स्पर्धक म्हणून ‘फॅन्टसी’ नावाचे तसेच एक मासिक निघाले होते. त्यांचे फोटो अधिक गुळगुळीत कागदावर छापलेले असायचे. त्याकाळी पाश्चात्त्य जगातले ‘प्लेबॉय’ फक्त ऐकून माहिती होते. आमच्यातील एका बढाईखोराने, ‘कधीतरी मी सर्वांसाठी एक अंक मिळून दाखवेनच’ असे जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात काही ते घडले नाही. थोडक्यात, डेबोनेर म्हणजे गरिबांचे प्लेबॉय असे समजून आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घेतली होती !
याखेरीज निरोधची रिकामी पाकिटे जमवणे हा त्या काळातील सामायिक छंद असायचा. त्या पाकिटांवरील विविध प्रकारचे स्त्रियांचे फोटो पाहणे हीसुद्धा तारुण्यातील रंजनाची एक महत्त्वाची गरज ठरते. शाळेत असताना काडेपेट्यांवरील चित्रे साठवणारे आपण आता ही पाकिटे साठवायला लागल्याचे स्थित्यंतर स्वतःलाच रंजक वाटले !
हस्तमैथुनासंबंधी गैरसमज पसरवणाऱ्या जाहिराती हाही या साहित्याचा एक भागच म्हटला पाहिजे. या जाहिराती विविध सार्वजनिक भिंती, पत्रके आणि नियतकालिकातून फिरत असायच्या; आजही असतात. असे गैरसमज पसरविणारी मंडळी त्यातून तरुणांमध्ये भयगंड निर्माण करतात आणि त्या बळावर आपली दुकाने थाटतात. आम्ही जरी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तरीसुद्धा अशा सार्वजनिक अपप्रचाराचा मनावर कळत-नकळत परिणाम व्हायचा. एकदा असेच आम्ही चौघे बसलो असता हा विषय चर्चेस आला आणि त्यावर तब्बल दोन दिवस साधक-बाधक चर्चा घडली. त्यातून गैरसमज दूर व्हायला चांगली मदत झाली. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षी गुप्तरोगशास्त्राच्या प्राध्यापकांनी त्यांच्या पहिल्याच व्याख्यानात वर्गात खणखणीत आवाजात सांगितले, की हस्तमैथुन ही पूर्णपणे नैसर्गिक व अपायविरहित क्रिया आहे. ते ऐकल्यावर खऱ्या अर्थाने आम्ही मैथुनसाक्षर आणि निर्भीड झालो.
पदवीचे शिक्षण संपताना अजून एका साहित्याचा शोध लागला. “प्रत्येक नवविवाहिताने वाचावेच” असे पुस्तक आपल्या मायमराठीतच उपलब्ध होते- अगदी दर्जेदार प्रकाशनाने काढलेले. कोणीतरी ते मिळवले आणि मग त्याचे सामूहिक वाचन झाले. त्यामध्ये प्रणयाराधन ते संभोग या सगळ्याचे तपशीलवार शिस्तीत वर्णन आणि संबंधित सल्ले होते. “आमचे हे पुस्तक वाचा आणि मग आयुष्यभर या सुखाचा मनमुराद आनंद लुटा”, अशी त्याची पुस्तकाच्या मलपृष्ठावर रास्त जाहिरात केलेली होती. पुढील आयुष्यात माझे काही नातेवाईक त्यांच्या लग्नापूर्वी माझ्याशी मोकळी चर्चा करायला आले होते तेव्हा मी त्यांना ते पुस्तक वाचण्याची जोरदार शिफारस केली. त्यातील एकाला तर मी ते त्याच्या लग्नात भेट म्हणून दिले.
अशा तऱ्हेने पदवीची परीक्षा पूर्ण होईपर्यंत वरील प्रकारच्या लैंगिक साहित्याचा परिचय झाला. त्यातील महत्त्वाचा वाटा लिखित साहित्याचाच होता हे लक्षात येईल. लैंगिक दृश्य माध्यमांशी संपर्क इथून पुढच्या आयुष्यात आला.
एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यावर एक वर्ष इंटर्नशिपचा कार्यक्रम असतो. त्यातील पहिले सहा महिने ग्रामीण भागात काम करायचे होते. त्याकाळी घरोघरी टीव्ही संच स्थिरावले होते. परंतु टीव्हीला व्हीसीआर जोडून पाहण्याचे तंत्र थोड्याच लोकांकडे असायचे. बरेच लोक एखादा वेगळा चित्रपट पाहण्यासाठी व्हीसीआर यंत्रणा (कॅसेटसह) भाड्याने आणत. अशा कॅसेट लायब्ररीजची तेव्हा चलती होती. अनेक नव्या जुन्या चित्रपटांच्या कॅसेटस हळूहळू उपलब्ध झाल्या. उघड संभोगक्रिया दाखवणारे चित्रपट सर्रास दाखवण्यास भारतात तरी तेव्हा परवानगी नव्हती. त्यातून मग या प्रांतातील चोरटेपणा सुरू झाला. लैंगिक दृश्यपटांना तेव्हा ब्लू फिल्म असे म्हणत. मूळ परदेशी शब्द ब्लू पिक्चर (BP) असा होता. या दृश्यपटांचे विविध स्तर होते आणि त्यांना X गुणांकन दिलेले असायचे ( X, 2X, 3X इत्यादी). त्यातले X म्हणजे काहीतरी गुळमुळीत असायचे- स्त्री-पुरुष मैत्री इतपतच. 2X म्हणजे थेटरातल्या एखाद्या प्रौढांच्या इंग्लिश चित्रपटाइतके. 3X म्हणजे उघड शरीरसंबंधाची दृश्ये. अशा प्रकारच्या कॅसेट्स काही लायब्ररीजमध्ये दडवून ठेवलेल्या असत. त्या दुकानांचे चालक त्या फक्त ओळखीच्या लोकांना देत. अशा गिऱ्हाईकांची दुकानात ‘ते’ मागण्याची एक सांकेतिक पद्धत असायची.
आमच्या इंटर्नशिप दरम्यान आम्ही चार मित्र एकत्र रहात होतो. पूर्ण वेगळ्या गावात राहात असल्याने आता भरपूर मोकळीक होती. विद्यार्थीदशेतील बंधनांमुळे पूर्वी ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या आता पूर्ण करायच्या होत्या. त्यातली एक म्हणजे 3X चित्रपट पाहणे. मग ते कुठे दाखवले जातात त्या अड्डयाचा पत्ता काढला. एका शनिवारी रात्री तिथे दाखल झालो. माणशी तिकिटाचे काही पैसे मोजले. एका घराच्या खोलीत दाटीवाटीने वीस माणसे मांडी घालून बसलो. त्यांत अनेक वयोगटांतील पुरुष होते. रात्री १० नंतर आजूबाजूला सामसूम झाल्यावर त्यांनी पूर्ण अंधारात अशा कॅसेटवरील दृश्यपट चालू केला. त्याच्या सुरुवातीस जवळपास दहा मिनिटे विविध धार्मिक चित्रे आणि त्यानुरूप काही मजकूर होता ! त्यावर, “हे काय?” असे आम्ही आश्चर्याने विचारले. तिथला माणूस म्हणाला, “अहो, आपण हे दाखवत असताना कधी पण पोलिसांची धाड पडू शकते. म्हणून या फिल्मच्या सुरुवातीस व शेवटी अशी चित्रे मुद्दाम घातलेली असतात. जर पोलिस आले तर आम्ही कॅसेट पटकन रिवाइंड करून त्यांना हे दाखवतो” (जसे काही पोलीस अगदी दुधखुळे होते !).
अशा त्या चोरट्या वातावरणात, पोलिसांची धाड वगैरे न पडता आम्ही आयुष्यातील पहिलीवहिली बीपी पाहिली. त्यानंतर मित्रपरिवारात ‘बीपी’ म्हणजे ‘भक्त प्रल्हाद’ असा सांकेतिक शब्दप्रयोग रूढ झाला होता ! या दृश्यपटांचा दर्जा तसा सुमारच असायचा. पुढे अजून एक दोनदा ते प्रकार पाहिल्यावर त्यातले आकर्षण संपून गेले. तसेच त्यामध्ये दाखवल्या जाणाऱ्या अतिरंजित गोष्टी आणि वास्तव यात बराच फरक असतो याचेही भान आले.
कालांतराने आंतरजाल सुविधेत प्रगती होत गेली आणि असल्या कॅसेट्स मागे पडल्या. सध्या त्या इतिहासजमा झालेल्या दिसतात. लैंगिकपट विषयातली आजची प्रगती आणि परिस्थिती सर्वांसमोर आहेच.
...
असा हा माझा लैंगिक साहित्य अनुभवण्याचा प्रवास. आज याबाबतीत तृप्त स्थितीत असताना असल्या कशाचीच गरज भासत नाही. पण ज्या त्या वयात ती मानसिक भूक भागवण्याचे काम या साहित्याने केले आहे यात शंका नाही. आयुष्यातील विविध टप्प्यांवर आणि विशिष्ट परिस्थितीत अशा साहित्याची गरज निश्चित असते. अर्थात अशा दृश्यपटांमधून दाखवल्या जाणाऱ्या विकृत गोष्टींवर कायदेशीर विचारानुसार नियमन असावे. त्यातील अतिरंजित आणि अतिशयोक्त गोष्टीही त्याज्यच. पण संतुलित प्रौढ स्त्री-पुरुष संबंधांवर आधारित लिखित अथवा दृश्य साहित्याकडे पाहताना मनात छुपेपणाची भावना नसावी. त्याकडे समाजाने खुल्या मनाने पाहायला हरकत नाही.
………………………………………………………………………………………………..
In reply to व्वा...! भारी लेख. by प्रचेतस
In reply to सहमत. तसली क्यासेट by गवि
तसली क्यासेट व्हिसीआरमधे अडकून बसली तर विविध प्रकारची गुंतागुंत.तोबा तोबा.... अशा प्रसंगी भलतीच त्रेधातिरपीट उडायची... विशेषतः घरचे परतण्याची वेळ झाली असेल तेव्हा असा प्रसंग उद्भवल्यास ज्याच्या कोणाच्या घरी असू त्याची अवस्था तर फारच दयनीय होऊन जायची 😀
In reply to तोबा तोबा.... by टर्मीनेटर
In reply to तोबा तोबा.... by टर्मीनेटर
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
In reply to क्यासेटीचा काही भाग (दृष्ये) by गवि
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धन्यवाद सर एका अवघड विषयाला संयत पणे वाचा फोडल्या बद्दल.. by ज्ञानोबाचे पैजार
लग्नाच्या आधी एका मित्राने विठ्ठ्ल प्रभुंचे "निरामय कामजीवन" हे पुस्तक वाचायला दिले होते, त्यातुन बरेचसे गैरसमज दुर होण्यास मदत झाली>>>> अगदी ! ही आवश्यक गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा लैंगिक शिक्षण या विषयावरून आपल्याकडे गदारोळ माजला होता तेव्हा एका वाचकाने मटा मध्ये लिहिलेले पत्र मला अजून आठवते. त्यांनी लिहिले होते, की लैंगिक शिक्षण किंवा समुपदेशन प्रत्येकासाठी विवाहपूर्व असावेच.
In reply to व्वा...! भारी लेख. by प्रचेतस
आम्ही कॅसेटच्या जमान्यातले त्यामुळे ते अनुभव वेगळे. :)+१ 🙂
In reply to +१ by टर्मीनेटर
In reply to व्वा...! भारी लेख. by प्रचेतस
In reply to छान लेख. by कॉमी
असे लेख आणखी यावेत.>>>> तुमच्या या प्रतिसादाने खऱ्या अर्थाने मुक्त झालो ! किंचित बिचकतच हा लेख प्रकाशित केला होता. अनेकांनी असे लेख लिहावेत •
'डेबोनेर' आणि 'प्लेबॉय' शी आमची ओळख आठवीत असतानाच झाली होती.>>>>> अरे वा ! म्हणजे तुम्ही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक समजायला हरकत नाही; वयाने लहान असलात तरी ! •
कोणत्या तरी 'काम'सू कार्यकर्त्याकडून इंटरनेटवरच्या खजिन्याचे वितरण होत असे.>>>> खरंय , असे कामसू कार्यकर्ते खरे मोलाचे…..
In reply to वा ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्रा.डॉ. आपल्या सूचनेला मान देऊन २ चित्रे अॅडवली आहेत :) by टर्मीनेटर
In reply to प्रा.डॉ. आपल्या सूचनेला मान देऊन २ चित्रे अॅडवली आहेत :) by टर्मीनेटर
In reply to प्रा.डॉ. आपल्या सूचनेला मान देऊन २ चित्रे अॅडवली आहेत :) by टर्मीनेटर
In reply to अरे? by ज्ञानोबाचे पैजार
In reply to हैदोस? by कपिलमुनी
In reply to हैदोस? by कपिलमुनी
In reply to अगदी अगदी by असा मी असामी
हाय दोस्तबरोबर. हैदोसची व्युत्पत्ती : "हैदोस" या शब्दाविषयी : मुहम्मदाचे नातू हसन आणि हुसैन यांना अनुक्रमे "दोस्त" आणि "दुल्हा" अशी टोपण नावे होती. लढाईतल्या त्यांच्या मृत्यूचा शोक मुहर्रम मध्ये "हाय दोस्त दुल्हा " असे ओरडत नाचत केला जातो. त्यावरून "गल्लीत हैदोस-धुल्ला चालू होता" अशी संज्ञा आली , आणि त्याचे संक्षिप्त रूप "हैदोस". हा शब्द भारतीय संसदेबाबत विशेषत्वाने वापरला जातो!
लेखनधाग्यात काही पुरक चित्र असायला पाहिजे होती>>>> एकदम कबूल ! मी पडलो आपला साधा लेखक. चित्रकार मित्रांनी पुढे यावे असे आमंत्रण देतो… ......
हैदोस चा उल्लेख नसल्याने>>> क्षमा असावी ! हे माझ्या पाहण्यात कधी नव्हते आले. कोणी तरी लिहा त्याच्याबद्दल.
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
क्षमा असावी ! हे माझ्या पाहण्यात कधी नव्हते आले. कोणी तरी लिहा त्याच्याबद्दल.हेच म्हणतो.
In reply to पोपट झाला by चौकस२१२
अर्ध नग्नता जशी पूर्ण नग्नतेपेक्षा जास्त मादक वाटते .. तसेच काहीसे>>> +11111. महत्वाचा मुद्दा. ती अधिक चेतवते. ....
टिपीकल मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे वाटणारी भिती असेल कदाचित.>>> अ ग दी ! यासाठीच मी माझ्या शहरातले कॉलेज असूनही वसतिगृह घेऊन ठेवलेले होते. त्या काळात मोकळीक मिळणे महत्त्वाचे व गरजेचे असते.
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
"खास इंग्रजी शिनेमा " बाहेर मराठीत पाटी " जॉन ची रंगिली रात्र" वैगरे दाखवतात>>> भारीच. तेव्हा मित्रांत ‘BP’ ला गमतीने भक्त प्रल्हाद म्हणत ! किंबहुना त्या कॅसेटच्या बाह्य भागावर असंच काहीतरी सांकेतिक लिहिलेले असायचे. ....
पाळणा आपोआपच लांब जात असेल तर तो मुद्दामहून का लांबवायचा आणि कसा लांबवायचा?>>> धमाल. हा हा हा !
साहित्यात 'इरॉटिका' मात्र भारतीय भाषांनी दुर्लक्षिलेला विषय आहे असे मत नोंदवतो >>>> सहमत.
* शेवटी टीव्ही च पूर्ण खोलयाचा आणि कॅसेट बाहेर ओढून काढायचे असे ठरले. >>> भारीच !
* आम्ही(ही) कॅसेट-डेबोनेर-हैदोस अश्या महाआघाडी पंथाचे >>>> वा वा ! छानच.कामसूत्र ह्याचा अभ्यासक कोणी येथे आहे का?>>> असल्यास स्वागत आहे. हा ग्रंथपरिचय कोणीतरी करून दिल्यास वाचायला आवडेल. …
कोणाच्या घरचे गावाला जाणार आहेत वगैरे माहिती काढुन>>> +11 नियोजन महत्वाचे !
In reply to ह्या धाग्याची कमीतकमी by अनन्त्_यात्री
In reply to सर्वांना धन्यवाद ! by हेमंतकुमार
In reply to 61, 62 यासंबंधी ज्ञानात मौलिक by सुरिया
In reply to होय ! by हेमंतकुमार
In reply to दादा कोंडके ! by अनिंद्य
In reply to कुठल पुस्तक? by टुकुल
कुठ्ल्या पुस्तकाबद्दल आहे हे? निरामय कामजीवन ??>>> नाही. आता त्या पुस्तकाचे नाव विसरलो. पण बहुदा रम्यकथा प्रकाशनचे असावे असे अंधुकसे आठवत आहे. लेखक आठवत नाही. बहुतेक ते लेखक नामांकित नव्हते
In reply to लैंगिक शिक्षण by भागो
In reply to वाह मस्त by मित्रहो
In reply to सहमत by शेर भाई
या पुस्तकातील कथांमध्ये नेहमी अतिरंजित अतिशयोक्ती असते>>> बरोबर. त्यासंदर्भात लैंगिक शिक्षण /समुपदेशनाचे महत्त्व आहेच. समाजात काही तज्ञ लोक गेल्या अनेक वर्षांपासून 'लैंगिक शिक्षण' असे बिरुद न लावता यासंदर्भात चांगले काम करत आहेत. त्यामध्ये पुस्तक लिहिणे, व्याख्याने देणे, चर्चासत्र अशांचा समावेश आहे. त्यातून तरुणांमधले गैरसमज दूर केले जातात
In reply to सहमत by शेर भाई
In reply to सहमत by शेर भाई
प्रत्येक स्त्री हि कामातुर असते असे मत बनवले तर काय करावे??असे चित्र रंगवणे पुरुषी मानसिक कामुकतेचा भाग आहे. नीळपटांत देखिल असे खोटे चित्र चित्रित केलेले दिसते
In reply to आमच्या कॉलेज होस्टेलला माझा by प्रकाश घाटपांडे
लैंगिकतेच्या तारुण्यसुलभ सहज आविष्कारातून कधी अहंगंड कधी न्य़ुनगंड तर कधी अपराधगंड तयार होतात.>>> अतिशय चांगला आणि मननीय मुद्दा . आवडलाच !
In reply to आमच्या कॉलेज होस्टेलला माझा by प्रकाश घाटपांडे
sex is more psychological than physical.+१००० माझेही असेच विचार होते आणि आहेत 👍
तरीही बीपी पेक्षा कामुक साहित्य (कथा, कादंबऱ्या) अधिक भावत असे हे मात्र खरे... >>> +११११ . कल्पनारंजन भारीच. २.
इतक वय झाल पण अजून त्यांना मुल कशी होतात हे माहित नाही." >>> छानच ! ३.
अशा चित्रपटांनी किंवा साहित्यांनी तरुणांच्या मनावर उलट परिणाम होतो का>>> विचार करण्याजोगा चांगला मुद्दा धन्यवाद !
In reply to निसर्गाने वंश सातत्यासाठी by चामुंडराय
In reply to निसर्गाने वंश सातत्यासाठी by चामुंडराय
माझ्यासारखे बरेच मैथुनपदवीधर झालेत>>> शुभेच्छा ! असेच मैथुन पदव्युत्तर व्हा. २.
गुपचूप सिगारेट पिणारा मुलगा, तुम्ही बोललात तर तुमच्या समोरच सिगारेट ओढील.'>>>> +111 अगदी मार्मिक ! ३.
ह्या लेखनात समाज जीवनाचा केवळ अर्धा आरसा दिसतो आहे. उरलेला अर्धा आरसा दाखवण्याचे काम कोणी अनाहिता करेल काय?>>> +111. अगदी माझ्या मनातले बोललात. या विषयावर मोकळेपणाने चर्चा आतापर्यंत मी जगातील एकमेव स्त्रीबरोबर केली आहे – ती म्हणजे माझी पत्नी ! भारतात ही चर्चा बहुतेकदा एकलिंगी गटातच का होते ?
In reply to निसर्गाने वंश सातत्यासाठी by चामुंडराय
लैंगिक क्रियेबरोबर आनंदाची अनुभूती जोडून दिली आहे म्हणजे केवळ आनंद प्राप्तीसाठी तरी लैंगिक क्रिया व्हावी आणि त्यातून पुढे वंश चालू रहावा.बरोबर आहे. हाच तर्क अन्नग्रहणालाही लागू आहे. जडत्व नैसर्गिक आहे. प्रजोत्पादन आणि उदरभरण यांत आनंदानुभूती / सुखानुभूती नसती तर कदाचित प्राणिमात्र टिकू-जगू-वाढू शकले नसते.
In reply to निसर्गाने वंश सातत्यासाठी by चामुंडराय
पूर्वी म्हणजे उत्क्रांतीपूर्व काळात मानवात देखील हंगामी लैंगिकता असेल काय?>>>> याचे उत्तर एखादा मानववंश शास्त्रज्ञ देऊ शकेल. सहज म्हणून दोन प्राण्यांमधली एक रोचक तुलना पाहू. मी ती व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘चरित्ररंग’ मध्ये वाचली होती. कोंबडी आणि गरुडी यांची तुलना कशी आहे पहा : कोंबडी रोज एक अंडे घालते आणि गरुडी वर्षातून एकदाच (१-३ ) अंडी घालते (क्वचित दुसऱ्यांदा). हा फरक का असावा ते व्यंमांच्या भाषेत : “निसर्गाला कोंबड्या पुष्कळ लागतात कारण त्या अनेकांचे खाद्य आहेत. गरुड संहारक आहे. म्हणून निसर्गानुसार त्यांची संख्या मर्यादित ठेवली आहे” या धर्तीवर निव्वळ एक विचार : माणसांची संख्या खूप वाढावी असे काही निसर्गानुसार अपेक्षित होते ??? पण माणूस तर अतिसंहारक आहे ! :))
वाचून बालक पालक चित्रपट आठवला >> अ ग दी सहमत. ..................................... पूर्वी डॉ. शशांक सामक कामजीवनावर चांगली सचित्र व्याख्याने घेत. ‘चाळीशीनंतरचे कामजीवन’ या त्यांच्या कार्यक्रमात एक छान मुद्दा त्यांनी सांगितला होता. स्त्रीच्या २ स्तनांच्यामधील घळीच्या दर्शनाने (विशेषतः ती इंचभरच दिसत असताना) पुरुष उत्तेजित होतो हे सर्वज्ञात आहे. या विशिष्ट उत्तेजनाची चेतासंरचना पुरुषाच्या मेंदूमध्ये त्याच्या स्वतःच्या गर्भावस्थेच्या अगदी सुरवातीच्या टप्प्यातच नोंदविली जाते. इतकी ही आदिम प्रेरणा आहे. त्यांनी सांगितलेली ही माहिती रोचक वाटली.
In reply to अभ्यासपूर्ण लेख! by Bhakti
In reply to भक्ती, by हेमंतकुमार
In reply to अभ्यासपूर्ण लेख! by Bhakti
एकंदरीत समाज-निषिद्ध टॅबू विषयावर चांगले लेखन>> हा जो निषिद्धतेचा मुद्दा आला आहे त्यावरून एक किस्सा सांगतो. समाजाचे राहू दे, पण खुद्द वैद्यकीय महाविद्यालयातली निषिद्धता सांगतो. लेखात म्हटल्याप्रमाणे वैद्यकीयच्या पहिल्या वर्षाला शरीरक्रियाशास्त्र हा विषय असतो. त्यातील जननेंद्रिय विभाग शिकवायला आम्हाला एक प्राध्यापिका होत्या. नेहमीप्रमाणे जननेंद्रियांची माहिती, मासिक पाळी इत्यादी गोष्टी व्यवस्थित शिकवून झाल्या. मग त्यांनी वर्गात रुक्ष चेहऱ्याने सांगितले, “यानंतरचे संभोगाचे प्रकरण मी काही वर्गात शिकवणार नाही, तुम्ही ते पुस्तकात वाचा.” त्यानंतर पुढच्या व्याख्यानात त्यांनी थेट गरोदरपणाचा पहिला महिना इथपासून पुढे शिकवायला. सुरुवात केली. गमतीचा भाग पुढे आहे. या बाईंचे यजमान आमच्याच कॉलेजात दुसरा विषय शिकवायचे. ते दरवर्षी त्या बाईंना टोकायचे, “तुम्ही संभोगाचे प्रकरण वर्गात शिकवायला एवढे का लाजता ? निव्वळ पुरुष व स्त्री बीजांड यांचे मिलन गर्भाशयात होते या एका वाक्यात तुम्ही या महत्त्वाच्या विषयाची बोळवण करून टाकता ! तुम्हाला जर बोलून शिकवायला ते अवघड वाटत असेल तर रेखाचित्रे किंवा चित्रफितीच्या माध्यमातून तुम्ही ते वर्गात विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे”. मला त्यांचा दृष्टिकोन आवडला. सध्या त्या शिक्षणात काय परिस्थिती आहे मला कल्पना नाही.
In reply to विनोद by मित्रहो
In reply to लावण्यांमधे स्त्रीपुरुष by प्रकाश घाटपांडे
व्वा...! भारी लेख.