चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
24 Apr 2021 - 11:34 am
गाभा: 

नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.

हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.

हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.

कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.

प्रतिक्रिया

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 11:00 am | आग्या१९९०

नोटबंदी वेळी ad hoc चे प्रात्यक्षिक विसरले का?
राज्यांना त्यांचा हक्काचा GST वेळेवर देण्यात दिरंगाई कोणी केली. टाळेबंदीत राज्यांनी महसूल कुठून आणायचा? दारूची दुकाने उघडली तरी टीका. मंदिरे उघडायला कोण फडफडत होते?

सॅगी's picture

26 Apr 2021 - 11:06 am | सॅगी

म्हणजे नोटबंदी सर्वांना सांगून करायला पाहीजे होती तर, म्हणजे काळे पैशांवाल्यांनी आधीच आपले पैसे पांढरे केले असते...

बाकी हक्काचे पैसे तर कधीच दिले गेलेत, आता तुमच्या गरजा त्यांनी भागत नाहीत ही पण केंद्राची चुकी का?

टाळेबंदीत राज्यांनी महसूल कुठून आणायचा?

मग केंद्रानेही जसे मुखपत्र छापतात तश्या नोटा छापाव्यात का?

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 11:24 am | आग्या१९९०

मग केंद्रानेही जसे मुखपत्र छापतात तश्या नोटा छापाव्यात का?

असं कोण म्हणतंय? राज्यांचा हक्काचा महसूल वेळेवर देण्यात दिरंगाई का केली?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 12:34 pm | अमरेंद्र बाहुबली

Pm care मध्ये गेलेल्या पैशांचे काय झाले?? ह्याचा हिशेब मिळेल की नाही?? खर्च केला गेलेला दिसत नाहीये.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 3:28 pm | सॅगी

आतापर्यंतचे लसीकरण, ऑक्सीजन एक्सप्रेस, ऑक्सीजन एअरलिफ्टींग या सर्व गोष्टी आभाळातून पडल्या की काय?

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 6:35 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा. पी एम केअर मध्ये नक्की किती जमा झाले. त्यातले किती हिया गोष्टींवर खर्च केले ह्याचे काही डिटेल्स असतील तर दाखवा.एखादा सरकारी कागद वगैरे. ऊगाच दाढीवाल्याचे समर्थन करायच्या नादात हवेत लाथा नको.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 6:39 pm | मुक्त विहारि

निदान, RTI वापरायला तरी पळपुटेपणा, करू नका ...

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 6:48 pm | आग्या१९९०

पी.एम केअर फंड RTI अंतर्गत येत नाही.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 8:12 pm | मुक्त विहारि

मोदींच्या आधीपासूनच की मोदी आल्या नंतर?

यश राज's picture

26 Apr 2021 - 6:45 pm | यश राज

महाराष्ट्रासाठी शीयेम केअर पन व्हता वो मालक.
त्याचा हिशेब मिळतोय का ते वाइच बगता का जरा का त्याची पन वसुली झाली म्हनायची...............

सॅगी's picture

26 Apr 2021 - 6:49 pm | सॅगी

तुम्ही केंद्रावर हव्या तशा लाथा झाडायच्या आणि दुसर्यांना हवेत लाथा नको म्हणून शिकवण द्यायची? चांगले आहे...

एवढंच असेल तर वापरा माहितीचा अधिकार...ऊगाच दाढीवाल्याला विरोध करायच्या नादात हवेत लाथा नको.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 7:06 pm | अमरेंद्र बाहुबली

माहीती अधीकारातून बाहेर ठेवलाय पी एम केअर. का??? हिशेब द्यायला लागू नये म्हणून का? :) नेमकं काय करनार होते पैशांचं?? :)

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 7:14 pm | आग्या१९९०

PM केअर फंड हा प्रायव्हेट डोनेशनही स्वीकारत असल्याने माहितीच्या अधिकारात येत नाही.
हा फंड क्रोनी कॅपिटॅलिझमला प्रोत्साहन देणारा आहे.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 7:16 pm | सॅगी

आता पर्यंत ऑक्सिजन एक्सप्रेस, ऑक्सिजन एअरलिफ्टींग, आतापर्यंतचे लशीकरण ह्या सर्व गोष्टी केंद्राच्या खर्चाने झाल्या आहेत. बाकी ऑक्सिजन प्लँट साठीही पैसे दिले जात आहेत.

माझ्या हिशेबाने एवढे तरी पुरेसे आहे. बाकी माहिती अधिकारात ते यावं असं अगदीच वाटत असेल तर तुम्ही धरणे आंदोलन वगैरे करून आंदोलनजीवी बनु शकता.. :)

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 8:19 pm | श्रीगुरुजी

ऊगाच दाढीवाल्याचे समर्थन करायच्या नादात हवेत लाथा नको.

श्री श्री १८८ च्या पावलांवर मार्गक्रमणा सुरू आहे, हे नमूद करू इच्छितो.

कॉमी's picture

25 Apr 2021 - 11:59 pm | कॉमी

मिसळपाव वर चर्चा झालेले चुकीचे वक्तव्य ट्विटर सम्राज्ञी कंगना मॅडम कडून सुद्धा.

.... करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार घेतले जातात! .....

"corona virus death patient cremation akp 94 | धक्कादायक:- करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार घेतले जातात! | Loksatta" https://www.loksatta.com/pune-news/corona-virus-death-patient-cremation-...
------------

मेलेल्याच्या टाळू वरचे लोणी खाणारे, ह्या शिवसेनेच्या राज्यात, असे धाडस कसे काय करू शकतात?

हे खर आहे माझ्या शेजारी वारला तर त्यांच्याकडूनही घेतलेत पैसे.

https://maharashtratimes.com/us-news/america-decided-to-send-raw-materia...

अर्थात, हे काम काही केंद सरकारने केलेले नाही, असेही काही टक्के जनता म्हणणारच....

कॉमी's picture

26 Apr 2021 - 7:24 am | कॉमी

अमेरिकेने रॉ मटेरियल चे सोर्स आयडेंटिफाय केले आणि ते भारताकडे वळवण्यात येतील असे म्हणले आहे. मग पुनावालांचा मूळ प्रॉब्लेम होता तो सुटला का नाही ?

An issue with companies switching to other suppliers also includes the complex regulatory processes that they have to undergo for seeking approvals for their vaccines in different regions.

माझया समजुतीप्रमाणे पूर्वी सुद्धा दुसरा सप्लायर मिळवणे शक्य होते पन शॉर्ट टर्म मध्ये ते शक्य नव्हते.

The United States has identified sources of specific raw material urgently required for Indian manufacture of the Covishield vaccine that will immediately be made available for India.

https://www.whitehouse.gov/briefing-room/statements-releases/2021/04/25/...

कॉमी's picture

26 Apr 2021 - 9:25 am | कॉमी

तुमचे याबद्दल काय मत आहे ?

कॉमी's picture

26 Apr 2021 - 7:09 am | कॉमी

ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी केंद्राने पैसे दिले आणि 'आता ते कुठे गेले' असे म्हणून पैश्यांची अफरातफर झाल्याचा आरोप जो प्रसाद लाड यांनी केला, ते खोटे बोलत होते. इथे का हे सांगितले आहेच.

महाराष्ट्र काँग्रेसने ह्याचा प्रतिवाद केला. पण त्यांना सुद्धा राज्य सरकारला पैसे मिळण्याचा संबंध नाही हे समजले नाही.

ऑक्सीजनअभावी कोरोनाचे रुग्ण दररोज दगावत असल्याचे भयावह चित्र पाहून हायकोर्ट व सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला अत्यंत कठोर शब्दात फटकारले. ऑक्सिजन प्रकरणात कोर्टात केंद्र सरकार प्रतिवादी होते राज्य सरकार नाही, हे भारतीय जनता पक्षाला माहीत असतानाही स्वतःच्या अब्रुरी लक्तरं वेशीवर टांगल्यानंतर आता यातही ते राजकरण करत आहेत. पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला जानेवारीतच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी निधी दिल्याची आठवण भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना आताच कशी झाली?, एवढे दिवस ते काय झोपा काढत होते का?, असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारले आहेत. (how did the bjp just remember that the center had given funds to the state for the oxygen project asks congress spokesperson atul londhe)
ऑक्सीजन प्रकल्पासाठी केंद्र सरकाने पत्र दिले पण त्यासाठी लागणारे पैसे काही दिले नाहीत. भाजपा सरकार हे घोषणा करा, खोटे बोला पण रेटून बोला, जुमलेबाजी करा असे असून प्रत्यक्षात काहीही करायचे नाही. फक्त जुमलेबाजी करणे हा मोदी सरकारचा स्थायीभाव आहे, अशा शब्दात लोंढे यांनी तोशेरे ओढले आहेत.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 9:31 am | श्रीगुरुजी

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला जानेवारीतच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी निधी दिल्याची आठवण भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना आताच कशी झाली?, एवढे दिवस ते काय झोपा काढत होते का?, असे संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारले आहेत.

काय हा मूर्खपणा! मुळात प्रसाद लाड किंवा इतर कोणीही राज्य सरकारला आठवण करून द्यायची गरज काय? म्हणजे यांनी वेळेवर आठवण करून दिली नाही म्हणून आम्ही प्राणवायू प्रकल्प उभारले नाही असलं भिकार तर्कशास्त्र लावलं जातंय. जसं काही यांना जानेवारीत आठवण करून दिली असती तर यांनी एव्हाना महाराष्ट्रात हजारो प्राणवायू प्रकल्प उभारले असते. स्वतः अत्यंत नाकर्तेपणा केला, निष्क्रीयपणे घरात बसून राहिले, संपूर्ण वेळ फक्त खंडणी गोळा करण्यासाठी आणि मोदींना शिवीगाळ करण्यासाठी वापरला याची ना लाज ना खंत.

वेळेवर व पुरेसा अभ्यास न केल्याने एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला व मला अभ्यास करायला आधीच का सांगितले नाही असे सांगून त्याने पालकांनाच दोष देणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच हास्यास्पद आपल्या नाकर्तेपणासाठी भाजपला दोष देणे आहे.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 9:46 am | कॉमी

अतुल लोंढे यांचे वक्तव्य अर्धे कोट करून दिशाभूल होत आहे. त्या वक्तव्याचा अर्थ आहे-
१. केंद्राकडून कोणतेही पैसे आले नाहीत.
२. केंद्राकडून प्रकल्प बांधकामात उशीर झाला म्हणून आज ते खोटे बोलून राज्यावर उलटत आहेत.
३. जर हायपोथॅटिकली पैसे दिले असते तर आज हा विषय चव्हाट्यावर आल्यावरच हे स्वप्नातले पैसे लाड रावांना कसे आठवतात ? ह्यातून हि पैश्यांची ष्टोरी लाड ह्यांनी आजच बनवली आहे. त्यांना सुद्धा असे काही पैसे होते हे विषय बाहेर यायच्या आधी माहित नव्हते.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 10:00 am | श्रीगुरुजी

समजा केंद्राकडून पैसे आले नाहीत असं गृहीत धरू. पण यांना राज्य सरकारच्या खर्चाने प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारायला कोणी अडवले होते का? मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या सुशोभीकरणासाठी हे ४०० कोटी रूपये देऊ शकतात. पण प्राणवायू निर्मिती प्रकल्पासाठी केंद्राचेच पैसे हवे ही पळवाट का?

राज्य सरकार व रूग्णालये स्वस्तात व कमी वेळात प्राणवायू निर्मिती प्रकल्प कसे सुरू करू शकतील याविषयी या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते सांगत आहेत. राज्य सरकारने त्यांची मदत का नाही घेतली?

तुम्ही गोलपोस्ट बदलली. प्रसाद लाड खोटे बोलले यावर आपण बोलत होतो. महाराष्ट्र राज्याने बरेच काही करायला हवे होते, हजारो लोकांचे प्राण वाचले असते हे सत्यच आहे. पण ही सिलेक्टिव्ह टीका आहे. एक्सप्रेस मधल्या लेखातले पाहून मात्र सगळ्या जनतेची चूक असे तुम्ही म्हणता. फक्त दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य सरकारे जबाबदार आणि इतर कितीतरी राज्ये आणि केंद्र निर्दोष. इतरत्र मात्र उठा वैयक्तिक रित्या चूक. प्रसाद लाड यांनी असल्या संकटात घाणेरडे गलिच्छ राजकारण करत थापा मॉरल्या त्याकडे तुम्ही सपशेल कानाडोळा केला आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 10:34 am | श्रीगुरुजी

मुळात प्रसाद लाड खोटे बोलत आहेत का हे अजून सिद्ध झालेले नाही. दुसरे म्हणजे प्रसाद लाडांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय चर्चा व्हावी इतके ते व त्या़ंंचे वक्तव्य महत्त्वाचे नाही.

राज्य सरकारकडे मंत्र्यांच्या निवासस्थानांच्या सुशोभीकरणासाठी ४०० कोटी रूपये आहेत, वडीलांच्या स्मारकासाठी ४०० कोटी रूपये आहेत, परंतु प्राणवायू निर्मिती प्रकल्पासाठी पैसे नाहीत व त्यासाठी केंद्राने पैसे दिल्याशिवाय आम्ही प्रकल्प उभारू शकत नाही हे सांगणे हा शुद्ध ढोंगीपणा व नाकर्तेपणावर पांघरूण आहे.

प्रचारसभा घेणे, कुंभमेळ्याला परवानगी, पहिली लाट ओसरल्यानंतर ढिलाई या चुका मोदींनी केल्या आहेत. परंतु सर्व राज्य सरकारे व जनतेने सुद्धा याच गंभीर चुका केल्या आहेत. परंतु फक्त केंद्रालाच दोष दिला जात आहे.

मुळात प्रसाद लाड खोटे बोलत आहेत का हे अजून सिद्ध झालेले नाही.

पैसे दिले हे सुद्धा सिद्ध झाले नव्हते. ते खरे मानायला तुम्ही मागेपुढे बघितले नाही, ते सुद्धा इतके प्रतिसाद हे खरे नाही हे सांगणारे लिहून.

त्यासाठी केंद्राने पैसे दिल्याशिवाय आम्ही प्रकल्प उभारू शकत नाही हे सांगणे हा शुद्ध ढोंगीपणा व नाकर्तेपणावर पांघरूण आहे.

गुरुजी, तर्कांची पातळी पारच सोडून दिली आहे? केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार नाही असे राज्य सरकारचे कोण म्हणल आहे ? मनाच्या कहाण्या तयार करू नका. इथे पैश्यांचा विषय पहिला लाड ने काढला. म्हणजे पहिला पैसे दिले त्याचे काय केलं म्हणायच, आणि पैसे दिले नाहीत म्हणल्यावर म्हणायच, मग स्वतःच्या पैशाने का बांधलं नाही ? माफ करा तुम्ही पूर्ण पणे चुकीचे बोल्ट आहात. राज्य सरकारने ऑक्सिजन प्लांट चालू केले नाहीत हा तुमचा गैरसमज आहे. मागच्या धाग्यावर मी बातम्या दिल्या आहेत त्या वाचा.
प्रचारसभा घेणे, कुंभमेळ्याला परवानगी, पहिली लाट ओसरल्यानंतर ढिलाई या चुका मोदींनी केल्या आहेत. परंतु सर्व राज्य सरकारे व जनतेने सुद्धा याच गंभीर चुका केल्या आहेत. परंतु फक्त केंद्रालाच दोष दिला जात आहे.

आजिबात नाही. दोष देणारी काय सेंट्रल ऑथोरिटी असते काय, हे दोषी म्हणणारी ? आजच एक्सप्रेस मधला लेख वाचला आहे ना ? मिसळपाव वर केंद्रवीसरद्ध लिहिणाऱ्या मूठभर आयड्या आहेत, राज्यविरुद्ध कल रव तुम्ही ऐकला नाही की काय माहित नाही.

परंतु सर्व राज्य सरकारे व जनतेने सुद्धा याच गंभीर चुका केल्या आहेत. परंतु फक्त केंद्रालाच दोष दिला जात आहे.

राज्यावरची टीका ऐकल्यावर नाही, तर केंद्रावर फार टीका झाल्यावर तुम्हाला हे म्हणावे वाटले. तो पर्यंत ठाकरेंचे वाभाडे काढण्यात आणि वाव्हण्यात तुम्ही खुश होता.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 2:37 pm | श्रीगुरुजी

केंद्राच्या पैशाशिवाय बांधणार नाही असे राज्य सरकारचे कोण म्हणल आहे ?

मग बांधायला कोणी अडविले होते?

खालील ट्विट पुरेसं बोलकं आहे.

हे महाराष्ट्राने का केले नाही? केंद्राने २१ ऑक्टोबर २०२० ला याविषयी राज्यांकडून निविदा मागविल्या होत्या. आसामने त्याचा फायदा घेतला. ६ महिने उलटल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र हे का करू शकला नाही?

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Apr 2021 - 2:43 pm | चंद्रसूर्यकुमार

आसामने त्याचा फायदा घेतला. ६ महिने उलटल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र हे का करू शकला नाही?

याचे कारण आसामात सरबानंद सोनोवाल हा एक चांगला, न बोलता काम करणारा माणूस मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राविषयी काही लिहायलाच नको.

निविदा प्रक्रिया झाल्यावर काय काय अडचणी आल्यात ते स्क्रोल लेखात दिले आहे. काही कंपन्या ब्लॅकलिस्ट झाल्या, काही ठिकाणी निविदा मिळालेल्या कंपनी कडून उत्तर नाही.

निविदा प्रक्रिया झाल्यावर स्टेट गव्हरमेन्ट ने पाठलाग करून काम करून घ्यायला हवं ह्यात शंका नाहीच. त्यात दिल्ली आणि महाराष्ट्र नक्की दोषी आहे.

पण, गोष्ट फीरवुन त्यात पैशाच्या अफरातफरीचा मुद्दा घुसाडणे चूक आहे.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 3:31 pm | श्रीगुरुजी

आसामला सुद्धा या समस्या आल्या असतील की. परंतु त्यांनी त्यातून मार्ग काढलेला दिसतोय. केंद्राने मदत द्यावी, केंद्राने निविदा काढाव्या अशी कारणे पुढे करण्याऐवजी राज्यांनी यावर स्वत:हून पुढाकार घेऊन काम सुरू केले असते तर केंद्राने अडविले असते का? साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करावे असे पत्र पवारांनी ४-५ दिवसांपूर्वी अनेक साखर कारखान्यांना पाठविले. हेच पत्र ५-६ महिने आधी पाठवून प्रकल्पांचे काम सुरू करता आले कसते. त्यासाठी केंद्राची वाट बघण्याची, केंद्राच्या संमतीची अजिबात गरज नव्हती. तसेही केंद्र सरकार प्रत्येक प्रकल्पासाठी जेमतेम १.२५ कोटी रूपये देणार होते. महाराष्ट्रातील कित्येक नेत्यांचे दैनिक उत्पन्न यापेक्षा जास्त असेल. पाहिजे तर एका महिन्याच्या मासिक खंडणीतून अशा ८० प्रकल्पांंना अर्थसहाय्य मिळेल.

ज्याला काही करायचे आहे तो दुसऱ्याची वाट न पाहता स्वतः काम सुरू करतो. ६ महिने उलटून गेले तरी महाराष्ट्रासहीत बहुसंख्य राज्यांनी प्राणवायू प्रकल्प निर्मितीचे कोणतेही प्रस्ताव आजतागायत दिले नसावे. अन्यथा इतकी वाईट परिस्थिती झाली नसती.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 3:47 pm | कॉमी

सहमत आहे.

राज्यांमध्ये अगदीच काही झाले नाही असे नसणार. त्याखेरीज ३३०० मेट्रिक टन प्रतिदिन उत्पादन वाढत नाही.

पुण्यात २ दिवसात १२ प्लॅन्ट लावलेले.

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 4:00 pm | आग्या१९९०

3 महिन्यांपूर्वी आपले पंतप्रधान काय म्हणाले
https://www.wionews.com/india-news/india-beat-all-odds-in-fight-against-...
त्यांना तरी देशापुढील संकट दिसले होते का? ऑक्सिजनचा उल्लेखही नाही. गाजावाजा करून लसीकरण महोत्सव केला परंतू त्यातही नियोजनाचा अभाव. पुरेशा लसींचा साठा ना करता पोकळ घोषणा केल्या. तेव्हाच लसीकरण योग्यप्रकारे केले असते तर इतकी जीवितहानी झाली नसती. आताही केंद्रासाठी लसीचा एक दर राज्यांसाठी दुसरा. हा भेदभाव का?

प्रदीप's picture

26 Apr 2021 - 4:37 pm | प्रदीप

पुरेशा लसींचा साठा ना करता पोकळ घोषणा केल्या

लसी खूप अगोदर तयार करून स्टॉक करता येत नाहीत असे वाचल्याचे आठवते. कुणी जाणकार ह्याविषयी अधिक माहिती देऊ शकतील.

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 6:41 pm | आग्या१९९०

अमेरिकेने अस्ट्राझेनेका च्या दोन कोटी लसी साठवल्या आहेत. आपल्यालाही लस साठवून व्यवस्थित नियोजन करून लसीकरण करता आले असते.

दादा मगाशी तुमचा सूर वेगळा होता. मगाशी तुम्ही केंद्राने पैसे दिलेच नाही असे म्हणालात. आता आसाम ने बांधले म्हटल्यावर तुमचा सूर बदलला.

Oxygen मध्ये महाराष्ट्राने पैसे खाल्ले असे आमचे म्हणणेच नाही.. किंबहुना पैसे खायची संधी नव्हती, कारण केंद्रीय संस्थांचा अंकुश होता, म्हणून महाराष्ट्राने यात पुढाकार घेतला नाही, असे म्हणता येईल का मग?

अवांतर,
तुमचे इथले मुद्देसून प्रतिसाद वाचल्यावर विरुद्ध बाजू तथ्यांच्या आधारावर मांडणारा एक चांगला आयडी अशी माझी समजूत होऊ लागली होती, इतक्या लवकर त्याला सुरुंग लावू नका.

साहेब, केंद्राने राज्य सरकार कडे पैसे दिले असा दावा होत होता. तसे नाही आहे. ह्याचे कारण मी बऱ्याच वेळेस दाखवले आहे. केंद्राने राज्याला पैसे दिले आणि ते कुठे गेले या प्रशनाचे उत्तर केंद्राने पैसे दिले नाहीयेत. ना राज्यांना ना सप्लायर ना. राज्यांना नाही कारण राज्यांना पैसे देण्याचा प्रश्न उदभवत नाही. सप्लायरला नाही कारण काम पूर्ण झाले नाही. ह्यात केंद्राचा काही दोष नाही. माझा रोख लाड यांच्यावर होता.

महाराष्ट्राने का पुढाकार घेतला नाही हे मला माहित नाही. प्रोकुरमेन्ट केंद्र करत आहे, आणि एक्च्युअल काम सप्लायर करत आहेत. काही ठिकाणी राज्यांनी प्लॅन्ट साठी जरुरी इन्फ्रा तयारच केले नाही. तिथं अर्थातच त्यांचा दोष आहे. काही ठिकाणी सप्लायर उत्तरच देत नाही. काही सप्लायर ब्लॅकलिस्ट झालेत. यात सप्लायर सोडून कुणाचाच दोष नाही, मात्र लगेच फॉलो अप घेऊन पुन्हा निविदा निघायला हव्यात. ते पुन्हा cmss करणार. पण महाराष्ट्राने पाठपुरावा करायला पाहिजे यात शंका नाही.

(माझया कडून चुका होऊ शकतात. सगळ्यांकडून होऊ शकतात.)

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 5:29 pm | श्रीगुरुजी

गंमत अशी आहे की केंद्राच्या योजनेनुसार देशात एकूण १६२ प्राणवायू निर्मिती प्रकल्पांसाठी केंद्र एकूण २०१ कोटी रूपये देणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रकल्पासाठी जेमतेम १.२५ कोटी रुपये. इतक्या कमी किंमतीत असा एखादा प्रकल्प उभारून चालविणे शक्य वाटत नाही. म्हणजे राज्य सरकारला सुद्धा यात स्वत:चे पैसे गुंतवावे लागणार. इतके कमी पैसे केंद्र देणार असेल तर त्यासाठी केंद्र पैसे देण्याची वाट न पाहता राज्यांनी स्वत:च पैसे गुंतवून हे प्रकल्प सुरू करायला हवे होते.

“…तर आज करोनाच्या त्सुनामीत देशाला गटांगळ्या खाण्याची वेळ आली नसती”

https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsena-saamana-editorial-on-...
-----------

बियर बार उघडायची घाई आणि फेरीवाल्यांवर कुठलाही कंट्रोल केला नाही ....

नेहमी प्रमाणेच, आलं अंगावर तर ढकल केंद्रावर....

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Apr 2021 - 9:55 am | चंद्रसूर्यकुमार

या क्षणी संजय राऊत अबप माझा वगैरे वाहिन्यांवर येऊन 'कोरोनाकाळात राजकारण करू नका' असे म्हणत आहेत. म्हणजे सामनातून दररोज जी गटारगंगा वाहात असते ते राजकारण नसते वाटते? आता केंद्राने पैसे देऊनही यांच्या सरकारने ऑक्सिजन प्लॅन्ट्स का उभारले नाहीत वगैरे अडचणीचे प्रश्न पुढे आल्यावर अशा काळात राजकारण करणे योग्य नाही ही उपरती यांना झालेली दिसते.

सौ चुहे खाके बिल्ली चली हाज असे काही म्हणतात ते यालाच का?

कॉमी's picture

26 Apr 2021 - 10:19 am | कॉमी

Pm केअर आणि ऑक्सिजन प्लांटच्या पैश्यांची खोटारडी आणि घाणेरडी थाप केंद्रविरोधी बातमीला गलिच्छ ट्विस्ट देऊन प्रसाद लाड यांनी सुरु केले आहे. त्याबद्दल प्रतिसाद दिला आहे.

https://www.misalpav.com/comment/1104799#comment-1104799

सॅगी's picture

26 Apr 2021 - 10:46 am | सॅगी

राजकारण करण्याचा जन्मसिध्द अधिकार फक्त त्यांना, त्यांच्या पक्षाला आणि त्यांच्या पक्षाच्या (सत्तेसाठी वेळोवेळी जे कोणी असतील त्या) मित्रांनाच आहे.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 10:25 am | कॉमी

The only good communist is a dead communist असे पराकोटीचे द्वेषमूलक वाक्य चंद्रसूर्यकुमार यांनी मांडले आहे. हे मला व्यक्तिगतरीत्या नसावे पण काहीसा रोख आहेच. त्यांना समज देण्यात यावी अशी विनंती आहे.

अमर विश्वास's picture

26 Apr 2021 - 11:06 am | अमर विश्वास

अहो हे १९५९ साली एका निदर्शनात दाखवलेले पोस्टर आहे ...

तिरंग्यातला हत्ती चालतो ... पण पण ६० वर्षपूर्वीचे वाक्य चालत नाही

.

जुने पोस्टर आहे ते मला कळत नाही काय ? काहीतरी लंगडे समर्थन करू नका.

पिनाक's picture

26 Apr 2021 - 10:55 pm | पिनाक

""A good communist is a dead communist " is a universal proven truth.

एक कन्सर्व्हेटिव्ह वाद विवाद ष्टएल वापरतो. देशभक्ती, देशभक्त वैगेरे गुंफवून

"मग भगतसिंग यांचा मृत्यू चांगलाच होता असे म्हणणे आहे काय ?"

बाकी प्रतिसाद अमान्य. ह्यात ट्रूथ वैगेरे काही नाही, आतातायी आरडाओरडा आहे, पृव्हन वैगेरे फार लांब.

अगदी असाच प्रतिवाद अतिरेकी सुद्धा करतात :)
पण त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचं ते सर्वांना ठाऊक आहेच.

कसं काय ? कोणते अतिरेकी, काय प्रतिवाद ?

श्रीगुरुजी's picture

27 Apr 2021 - 9:28 am | श्रीगुरुजी

चिनी सैन्याला मुक्तीसेना म्हणणारे, चीनने भारतावर केलेला हल्ला हे आक्रमण आहे का अतिक्रमण यावरच निर्रथक काथ्याकूट करणारे, चीनचा निषेध न करणारे साम्यवादी आणि देशासाठी प्राणार्पण करणारे हुतात्मा भगतसिंग यांच्यात काहीच फरक नाही का? मुळात ९० वर्षांपूर्वी साम्यवाद व साम्यवादी यांचा जगात कितपत प्रभाव होता? आपल्या २३ वर्षांच्या अल्प आयुष्यात भगतसिंगांनी साम्यवाद कितपत अंगिकारला होता?

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Apr 2021 - 9:46 am | चंद्रसूर्यकुमार

असे म्हणतात की वयाच्या विसाव्या वर्षी तुम्ही साम्यवादी नसाल तर तुम्हाला हृदय नाही आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी पण साम्यवादीच असाल तर तुम्हाला डोकं नाही. भगतसिंग फासावर गेले तेव्हा त्यांचे वय होते २३. म्हणजे ते त्या स्वप्नाळू वयातले होते. त्यामुळे साम्यवादी विचारसरणी त्यांना आणि अनेक क्रांतिकारकांना आकर्षित करत होती हे काही अंशी समजता येते.

दुसरे म्हणजे भगतसिंग फाशी गेले १९३१ मध्ये. रशियात साम्यवादी राजवट येऊन तेव्हा १०-१२ वर्षेच झाली होती. साम्यवादाचा नक्की दुष्परिणाम किती आणि कसा होतो हे त्यावेळी माहित नव्हते. रशियातून बातम्या बाहेर येणे तितके सोपे नव्हते आणि अर्थातच तेव्हा गुगल नव्हते. नंतरच्या काळात याच साम्यवादी राजवटीने रशियात तर कत्तली केल्याच पण त्यानंतर चीन, पूर्व युरोप, क्युबा वगैरे अनेक ठिकाणी तेच केले. अशा परिस्थितीत भगतसिंग हयात असते तर त्यांनी त्याच विचारसरणीला समर्थन दिले असते असे वाटत नाही. अर्थातच या सगळ्या जर-तरच्या गोष्टी. नक्की काय झाले असते या सगळ्या आपल्या कल्पना. पण ही सगळी पार्श्वभूमी माहित झाल्यावरही त्याच विचारसरणीला पाठिंबा देणे भगतसिंगांनी चालूच ठेवले असते तर माझ्यासारख्यांनी त्यांनाही विरोधच केला असता. इंग्रजांचे राज्य जाऊन त्यापेक्षा कितीतरी अधिक खुनशी कम्युनिस्टांची राजवट येणे व्यक्तिशः मला तरी कधीच आवडले नसते.

तेव्हा भगतसिंगांच्या हौतात्म्याविषयी आदर ठेऊन म्हणतो की त्यांची विचारसरणी मला तरी कधीच आवडली नाही आणि आवडणारही नाही.

साम्यवादी लोकांना, नाॅर्थ कोरिया मध्ये, दोन चार वर्षे ट्रेनिंगला पाठवावे ...

चंद्रसूर्यकुमार's picture

27 Apr 2021 - 10:17 am | चंद्रसूर्यकुमार

कम्युनिस्ट सरकारचा नागरिकांच्या प्रत्येक- अगदी लहानसहान गोष्टीतही कसा आणि किती हस्तक्षेप असतो त्याचे एक उदाहरण म्हणजे उत्तर कोरियातील केसांविषयीचे नियम. एखाद्याला समजा वाटले की हिप्पी हेअरकट करू, व्हिनस विल्यम्सप्रमाणे केसांचे मणी करू, साळींदरासारखे टोकदार केस ठेऊ, बाबा रामरहिमसारखी मोठी दाढी ठेऊ तर ते उत्तर कोरियात चालत नाही. केसांना रंग लावलेला चालत नाही. सरकारने काही प्रकारच्या 'अधिकृत हेअरस्टाईल्स' ठरवून दिल्या आहेत. त्याप्रमाणेच सगळ्यांना त्यांचे केस ठेवायला लागतात.

north korea

(संदर्भः http://newsfeed.time.com/wp-content/uploads/sites/9/2013/02/ap9958922362...)

north korea

(संदर्भः https://newsfeed.time.com/wp-content/uploads/sites/9/2013/02/ap107251477...)

त्यापेक्षा वेगळी 'हेअरस्टाईल' ठेवलेल्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करायलाही सुरवात केली. https://www.telegraph.co.uk/news/2018/08/17/north-korean-fashion-police-...

उत्तर कोरियात नक्की कायकाय चालत नाही याविषयी अधिक https://brightside.me/wonder-curiosities/16-things-that-are-prohibited-i... वर. उत्तर कोरियातील लोकांना परदेशी जायची परवानगी नाही. इतकेच नाही तर सॅनिटरी पॅड्स सुध्दा अमुक एका प्रकारचेच असावेत हे सरकारचे बंधन. असे असतानाही एकीकडे स्त्रियांचे हक्क, स्त्रियांचे अधिकार वगैरे गोष्टींवर उच्चरवाने बोलणार्‍या अनेकांना तीच कम्युनिस्ट विचारसरणी आपली वाटते.

असे काही निदर्शनास आणून दिले की 'but it was not real communism' हे नेहमीचे पालुपद असतेच. सत्य परिस्थिती अशी आहे की कम्युनिझम ही विचारसरणी मुळापासून फांद्यांपर्यंत पूर्ण गंडलेली आहे. प्रॉब्लेम हा अंमलबजावणीत नसून मुळातल्या विचारातच आहे. आपल्याच नागरिकांवर इतकी बंधने घालणारे सरकार लष्करशाहीच्या वरवंट्यामुळेच स्थिर राहू शकते. त्यामुळे जिथेजिथे कम्युनिस्ट राजवट असते तिथेतिथे हुकुमशाही आणि लष्करशाहीच दिसेल.

त्यामुळेच म्हणतो की कम्युनिझम ही विचारसरणी दोन प्रकारच्या लोकांनाच आकर्षित करू शकते. अमेरिकेतील हार्वर्ड आणि इंग्लंडमधील केंब्रिज, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स वगैरे मोठ्या विद्यापीठांमधील ढुढ्ढाचार्य प्रोफेसर आणि कम्युनिझम ही नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक- जे समता वगैरे मोठेमोठे शब्द ऐकून वहावत जातात.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2021 - 1:02 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
आवडले.

कम्युनिझम ही नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक- जे समता वगैरे मोठेमोठे शब्द ऐकून वहावत जातात.>>>>>

हे फक्त कम्युनिझमलाच लागू होत नाही. हेच आज भारतात ही पहायला मिळतेय. राष्ट्रहीत, अच्छेदिन ला भूलून अनेक भाबडे लोक लोक वहावत गेले आणी आज भारताची वाताहत झालेली पहायला मिळतेय.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 1:13 pm | मुक्त विहारि

सामान्य माणसाला घरी बोलावून मारहाण करणे.

निवृत्त नौसैनिकाला मारहाण करणे.

ह्या बाबतीत, ही काही टक्के जनता मौनच बाळगून असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

27 Apr 2021 - 1:22 pm | अमरेंद्र बाहुबली

बंगालातील सभा.

योगाच्या राज्यातील गुंडगीरी

पी एम केअर चा हिशेब

ह्यावर काही टक्के जनता मौनच बाळगून असते.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 6:51 pm | मुक्त विहारि

बंगालातील सभा.... कॉंग्रेसने पण घेतल्या

योगाच्या राज्यातील गुंडगीरी .... मुख्तार अन्सारी बद्दल वाचले असेलच

पी एम केअर चा हिशेब ... हा तर कॉंग्रेसनेच तयार केला आहे ....

अशा वेळी, काही टक्के जनता मौन पाळणारच...

आग्या१९९०'s picture

27 Apr 2021 - 7:06 pm | आग्या१९९०

PM Care ची स्थापना तर बिजेपीने केली आहे. त्यात काँग्रेसचा काय संबंध?

हे फक्त कम्युनिझमलाच लागू होत नाही. हेच आज भारतात ही पहायला मिळतेय.

कम्युनिझम बद्दल वाचन वाढवा.

उगाच हत्ती आणि चिचुंद्री ची तुलना करू नका

भगतसिंघांनी साम्यवाद कितपत अंगिकारला होता ?

दोन पातळींवर सांगतो.

१. वरवरची- ते सहकार्यांना कॉम्रेड म्हणायचे आणि पत्राखाली लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन अशी सही करायचे.

२. खोलात- लाहोर कटाच्या सूनवाईमध्ये आरोपी लाल स्कर्फ घालून आले होते. आल्यावर त्यांनी "Long live socialist revolution, long live communist international, long live people, Lenin's name will never die, down with imperialism" अश्या आरोळ्या दिल्या. त्यानंतर शाहीद भगत सिंघांनी एक तार वाचून दाखबली आणि मॅजिस्ट्रेटला ती थर्ड इंटरनॅशनल, बोल्शेविकांची संस्था, हिला पाठवण्यास सांगितले. ते टेक्स्ट खाली देईन. भगत सिंग पक्के रिव्हॅल्युशनरी होते हे त्यांचे जवळपास कुठलेही साहित्य वाचले तरी कळेल. त्यांनी जेलमध्ये सोशलिझमचे आयडियल्स असा ग्रंथ लिहिला होता, त्यांच्या कॉम्रेड्सना पोलिसांच्या भीतीने जाळून टाकावा लागला.

On Lenin day we send hearty greetings to all who are doing something for carrying forward the ideas of the great Lenin. We wish success to the great experiment Russia is carrying out. We join our voice to that of the international working class movement. The proletariat will win. Capitalism will be defeated. Death to Imperialism.
(Taken from Selected Writings of Shaheed Bhagat Singh, edited by Shiv Verma.)

श्री गुरुजी, भगत सिंघांची सगळी मते तुम्हाला मान्य असावी असा नक्कीच आग्रह नाही. पण उगाचच ते रिव्हॉल्युशनरी होते याकडे मान वळवू नये. जे आहे ते मान्य करावे.

हा प्रतिसाद भगतसिंग कॉम्युनिस्ट होते मग तुम्हीबी व्हा असा नाही. तो कॉन्सर्व्हेटिव्ह तर्क आहे, आपल्याला नाही पटत. हे डेड communist वाल्यांसाठी लिहिले आहे.

श्रीगुरुजी's picture

27 Apr 2021 - 1:24 pm | श्रीगुरुजी

वयाच्या २३ व्या वर्षी असलेली मते व आवडणारी विचारसरणी उत्तर आयुष्यात टिकेलच असे नाही. मी शिकत असताना मला हुकुमशाही, हिटलर, बाळ ठाकरे वगैरे बदल एक प्रकारचे फॅसिनेशन होते. भारतात फक्त हुकुमशाहीच हवी, लष्करी राजवट हवी असे माझे मत होते. परंतु कालांतराने हे सर्व आकर्षण ओसरले.

१९६२ मधील चीन युद्धाच्या काळात भगतसिंग असते तर त्यांनी नक्कीच चीनला विरोध केला असता. भगतसिंग शालेय, महाविद्यालयीन वयात असताना जगात सर्वप्रथम साम्यवादी राजवट रशियात आली. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भगतसिंगांना त्याचे आकर्षण वाटले असेल. परंतु कालांतराने साम्यवाद्यांनी क्रांती, तळागाळातील जनतेसाठी लढणे, जमीनदारी नष्ट करणे वगैरे विसरून जनतेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून फक्त सत्ता टिकविणे व त्यासाठी हुकुमशाही, अत्याचार, गळचेपी इ. चा वापर करणे एवढेच केल्याने भगतसिंग नक्कीच साम्यवाद विरोधी झाले असते.

चीनला विरोध केला असता हे नक्की.

अमर विश्वास's picture

26 Apr 2021 - 11:21 am | अमर विश्वास

लंगडे समर्थन नाही ... मार्मिक पोस्टर आहे..

आणि त्यातला संदेश मला मान्य आहे..

संदेश म्हणजे शब्दशः अर्थ नव्हे .. हे तुमच्या सारख्या हत्तीच्या व्यंगचित्राचे रसग्रहण करणाऱ्यांना वेगळे सांगायला नकोच

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 11:29 am | आग्या१९९०

मग केरळ मधील ऑक्सिजनवर बहिष्कार घाला. चीनचे एकही उत्पादन वापरू नका, आपोआप मरतील ते.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 11:36 am | सॅगी

(हत्तीच्या व्यंगचित्राला समर्थन असल्यास) भारतातील कोणतीच वस्तु/सेवा/सुविधा वापरू नका. काय म्हणता?

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 11:41 am | आग्या१९९०

त्यापेक्षा माहूत बदलू शकतो की?

सॅगी's picture

26 Apr 2021 - 11:45 am | सॅगी

?

सॅगी's picture

26 Apr 2021 - 11:49 am | सॅगी

मेलेला हत्ती, त्यावरील भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र जमीनीला लागलेले, याबद्दल काही बोलला नाहीत हे इंटरेस्टिंग आहे. :)

नावातकायआहे's picture

26 Apr 2021 - 1:03 pm | नावातकायआहे

निवडुन दिलेत दादा, जनतेने आणि पक्षाने!

विरोधी पक्ष व्हावा येवढे पण एक पक्षाचे निवडुन नाही आले.

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2021 - 2:16 pm | श्रीगुरुजी

बदला की.

नावातकायआहे's picture

26 Apr 2021 - 11:36 am | नावातकायआहे

उत्तर कोरीया पासुन सुरवात करु या का? :-)

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Apr 2021 - 11:43 am | चंद्रसूर्यकुमार

आणि त्यातला संदेश मला मान्य आहे..

ज्या विचारसरणीने पूर्ण जगात लाखो लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले, सामान्य माणसाचे जीणे मुश्किल करून टाकले असल्या कुजलेल्या विचारसरणीला मोठ्या विद्यापीठांमधले ढुढ्ढाचार्य प्रोफेसर आणि कम्युनिझम म्हणजे नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक सोडले तर डोके ठिकाणावर असलेला कोणीही समर्थन देणार नाही. हिटलरपेक्षा जास्त लोकांचे बळी या हलकटांनी जगभरात घेतले आहेत. मागे एकदा एका फेसबुक ग्रुपवर कोणीतरी प्रश्न विचारला होता- कोणत्या साथीने जगात सर्वात जास्त बळी घेतले आहेत? त्यावर कोणी उत्तर दिले प्लेग, कोणी म्हटले कॉलरा तर कोणी आणखी काही म्हटले. या प्रश्नाला माझे उत्तर होते कम्युनिझम. याचे कारण इतर सगळे रोग शरीराचे असतात. औषध वापरून ते जंतू मारता येऊ शकतात. पण कम्युनिझम हा व्हायरस एकदा डोक्यात घुसला की तो बाहेर निघणे महाकर्मकठीण. आणि त्यातूनच लाखो लोकांना ठार मारायचे समर्थन होते किंवा असला व्हायरस घुसलेले लोक नेते झाले की ते स्वतः लाखो लोकांना ठार मारतात. आणि एकदा हे दुष्परिणाम पुढे आले की मग परत हे सगळे मोठे मोठे विचारवंत but it was not real communism असे परत परत समर्थन करत राहतात आणि काही वर्षांनी कुठेतरी असे रक्ताचे पाट परत वाहतात.

प्रोपोगांडा करण्यात या कम्युनिच लोकांचा हात कोणी धरू शकणार नाही. म्हणे क्युबात आरोग्यव्यवस्था उच्च दर्जाची होती. मग स्वतः फिडेल कॅस्ट्रोवर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर का बोलावून घ्यायला लागला?https://www.nbcnews.com/id/wbna16346039 आणि क्युबा इतका स्वर्ग असेल तर त्या देशात जन्मलेले १०-१२% लोक अमेरिकेत का पळाले? हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍या देशात एक अवैध घुसखोर म्हणून पण राहायला तयार झाले/होतात पण कम्युनिस्ट राजवट असलेला आपलाच देश त्यांना नकोसा झाला. आणि दरवेळी हा पलायन करणार्‍या सामान्यांचा (हेर वगैरे सोडून द्या) ओघ एकाच दिशेने असे- क्युबातून अमेरिकेत, पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत, उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात वगैरे. हे का हा साधा प्रश्न यांना पडत नाही आणि परत एकदा but it was not real communism असले गुडघ्यातले समर्थन हे फुकाचे विचारवंत करत असतात.

अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांना एकदा असाच एक क्युबन शरणार्थी म्हणाला की तुम्ही एका स्वतंत्र देशात जन्माला आलात म्हणून मला तुमचा हेवा वाटतो. त्यावर रेगन त्याला म्हणाले की तुला पळून जायला कुठलेतरी ठिकाण तरी होते म्हणून मला तुझा हेवा वाटतो. माझ्या देशात जर अशी दडपशाही करणारी राजवट सत्तेत आली तर मला पळून जायला दुसरे ठिकाणही राहणार नाही.

कम्युनिझम ही कुजलेली विचारसरणी म्हणजे मानवजातीला कलंक आहे हे माझे स्पष्ट मत आहे. जितक्या लवकर या विचारसरणीचे समूळ उच्चाटन होईल तितके चांगले. आणि माझे हे मत स्पष्ट आहे. त्यात कोणताही- अगदी कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज मला वाटत नाही.

गुलामीची मानसिकता असलेली जनता नसत्या आवहानाना भुलते आणि कायमच दुखी होते..
सम्पत्तिचे समान वाटप असे आमिष दाखवणारे कायमस्वरुपी सत्तास्थानी रहातात आणि ऐशोआराम उपभोगतात
तरुण पिढी तर अश्या आमिषामागे लवकर जाते...

सुबोध खरे's picture

26 Apr 2021 - 12:54 pm | सुबोध खरे

perhaps 100 million persons have been destroyed by the Communists;

the imperviousness of the Iron and Bamboo curtains prevents a more definitive figure."

https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes

केवळ वैचारिक मतभेदांसाठी १० कोटी स्वतःच्या देशातीलच लोक (स्वकीय) गेल्या १०० वर्षात कम्युनिस्टांनी ठार मारले आहेत.

त्या विचारसरणीचे कौतुक सोडाच, साधे समर्थन तरी कसे करणार

कॉमी's picture

26 Apr 2021 - 1:02 pm | कॉमी

एका आयडियोलॉजी खाली तुम्ही हजारो लोक गुंडाळताय. कम्युनिसम/सोशलिझम या नावाखाली लोकशाही समर्थक, प्रायव्हेट बिझनेस आणि फ्री मार्केट असावे अश्या विचारधारा सुद्धा उपलब्ध आहेत. इतकेच या विषयावर मी सांगू शकतो.

आग्या१९९०'s picture

26 Apr 2021 - 1:09 pm | आग्या१९९०

अहं, काहींना समाजवाद ह्या शब्दाचीही ॲलर्जी असते. खाजगीकरण आणि भांडवलशाही हेच सगळ्या समस्यांवर इलाज आहे असे ह्या लोकांना वाटते. कोरोनाने अशा विचारसरणीच्या लोकांची तोंडे बंद केली.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 1:23 pm | कॉमी

अत्यंत सहमत.

सॅगी's picture

26 Apr 2021 - 1:34 pm | सॅगी

काहींना भांडवलशाहीची अ‍ॅलर्जी असते, तर काहींना संघ, भाजपची, तर काहींना अजुन कशाची...

याच धाग्यावर बघा, किती जणांना मोदींची अ‍ॅलर्जी झालीय. नाही का?

सॅगी's picture

26 Apr 2021 - 1:38 pm | सॅगी

बरं ही मोदींची अ‍ॅलर्जी इतकी भयंकर झालीय की त्यासमोर त्यांना स्वतःच्या राष्ट्रध्वजाचीही विटंबना चालून गेलीय. हे त्याहुनही भयंकर..

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 1:43 pm | मुक्त विहारि

परमपूज्य राहुल गांधी यांना, डाॅलर आणि रुपया पण एकच वाटतो ....

नावातकायआहे's picture

26 Apr 2021 - 2:07 pm | नावातकायआहे

मोदी, त्यांचा पक्ष आणि त्यांचे काम कितीही घाण असले तरी ज्यांना लोकशाही आणि राष्ट्रध्वजाची किंमत नाही अश्या लोकांकडुन काय अपेक्षा ठेवावी?

यश राज's picture

26 Apr 2021 - 2:37 pm | यश राज

मोदींद्वेषात आंधळे झालेल्यांना आपण नकळत आपल्या देशाशी प्रतारणा करतोय हेच कळत नाहीये. मोदी भले ही आवडत नसतील तरी आनंद व्यक्त करताना त्याबरोबर आपल्या देशाच्या प्रतिकांचा पण अपमान होतोय याबद्द्ल तरी खेद व्यक्त करावा. पण ही भलतीच अपेक्शा आहे मोदीज्वर झालेल्यांकडुन.

बाकी परदेशात काही काळ वास्तव्य असल्यामुळे अनुभवावरुन सांगतो, परदेशी मिडिया डाव्या विचारसरणी कडे झुकलेला असतो(त्यातल्या त्यात बरेचदा पाहुणे संपादक म्हणुन राणा आय्युब सारखे लोक). त्यामुळे भले त्या देशाचे पंतप्रधान असो वा आपल्या देशाचे पंतप्रधान , दोघांबद्द्ल नेहमीच नकारार्थी लेख वाचायला मिळायचे

गॉडजिला's picture

26 Apr 2021 - 1:30 pm | गॉडजिला

दहा कोटी ? माई गुडनस.

त्या विचारसरणीचे कौतुक सोडाच, साधे समर्थन तरी कसे करणार

का ? एखादा धर्म जो पक्शपात करत आसेल आपल्याच लोकांमधे तो जर काळाच्यासोबत सुधारत असेल मुलभुत तत्वज्ञान न बदलता... तर हे ही का शक्य होनार नाही भविश्यात ?

कॉमी's picture

26 Apr 2021 - 1:55 pm | कॉमी

एकदम चपखल प्रश्न आहे.
आत्ता पोर्तुगाल या युरोपियन देशात सलग दुसऱ्यांदा -
१. Partido Socialista (सोशलिस्ट.)
२. Bloco de Esquerda (कम्युनिस्ट)
३. सोशल डेमोकॅर्टिक पक्ष (डावे नाहीत.)

ह्यांचे एकत्रित सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आले. (२०१९) हे सरकार लोकशाही, बाजार अर्थव्यवस्था ह्याचातच काम करते. सोशलिस्ट पक्षाचा प्रधानमंत्री आहे. मागच्या वेळेस पेक्षा २२ शिटा सोशलिस्ट लोकांना जास्त मिळाल्या.

ह्यांची विचारधारा USSR मधल्या कम्युनिस्टांचीच आहे म्हणजे अगदी हास्यास्पद आहे.

कॉमी's picture

26 Apr 2021 - 11:58 am | कॉमी

कोल्हापुरात सात नवीन प्लांट बांधण्याचा निर्णय. अत्ता कोल्हापुरात गरज भागवण्याइतक ऑक्सिजन तयार होत असला तरी पुढे गरज वाटेल म्हणून निर्णय घेण्यात आला.
https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/pune/mahar...

तामिळनाडू मध्ये ७०%+ केसेस चेन्नई मध्ये असून कॉर्पोरेशनने लोकांची काळजी घेतली आहे. सिरीयस केसेस ना ताबडतोब ऍडमिट केले जाते, आणि माईल्ड पेशंट्स ना त्यानंतर प्रेफरन्स. हे प्रत्येक जिल्ह्यात केले आहे.

केरळ- काही मोजके लोक सोडले ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलात भरती व्हावे लागले/ स्वतःहून झाले, केरळ मध्ये कोव्हिड उपचार सरकारी इस्पितळात विनामूल्य दिले गेले आहेत. आणि आत्ता पेशंट संख्या सहजपणे अकोमॉडेट होत असली तरी आरोग्य व्यवस्थेचे एक्सपान्शन चालू आहे, जर लोड वाढला तर असावे म्हणून.

तामिळनाडू आणि कॉम्रेड्स, सलाम.

https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/tamil-nadu-and-ker...

अमर विश्वास's picture

26 Apr 2021 - 12:52 pm | अमर विश्वास

तामिळनाडू आणि कॉम्रेड्स ????

तामिळनाडू आणि कॉम्रेड्स.

सुबोध खरे's picture

26 Apr 2021 - 12:58 pm | सुबोध खरे

केरळ मधील स्थिती भयानक आहे असे माझा डॉक्टर वर्गमित्र ( जो कम्युनिस्ट आहे) तो सांगतो आहे. ( अर्थात त्याच्या विचारसरणी प्रमाणे तो श्री मोदी यांनाच जवाबाबदार ठरवतो आहे ते ओघानेच आले)

तेंव्हा माध्यमात काय आले आहे ते माहिती नाही आणि त्यावर मी तरी विश्वास ठेवण्यास तयार नाही.

भयानक म्हणजे काय स्थिती आहे ? थोडं विस्तृत करून सांगावे.

अमरेंद्र बाहुबली's picture

26 Apr 2021 - 1:12 pm | अमरेंद्र बाहुबली

आॅक्सीजनची कमतरता आहे असे सोशल मिडीयावर दाखवले तर संपत्ती जप्त करा असे केरळ च्या मामुनी सांगीतले असावे. :)
युपीसारख्या पंचतारांकीत सेवा आहेत का केरळात?

कॉमी's picture

26 Apr 2021 - 1:26 pm | कॉमी

सांख्यकी बाजूला सारून anecdotal evidence वर खुश दिसतायत खरे सर. हि कितपत योग्य हे माहीत असण्याऐवढे ते नक्की हुशार आहेत.

anecdotal
/ˌanɪkˈdəʊtl/

adjective
(of an account) not necessarily true or reliable, because based on personal accounts rather than facts or research.

सुबोध खरे's picture

26 Apr 2021 - 8:31 pm | सुबोध खरे

आपण आपल्या कोशात आनंदात रहा.

कम्युनिस्ट देशात सर्व कसं छान असतंय.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 8:52 pm | मुक्त विहारि

तिथे तिथे कारखानदारी बंद होते...

पश्र्चिम बंगाल हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहेच आणि केरळ हे दुसरे...

साम्यवादी विचारसरणी, भारतात 100% कधीच रुजणार नाही, पण निव्वळ उपद्रवमुल्य ह्या पलीकडे, साम्यवादाला किंमत नाही...

कॉमी's picture

26 Apr 2021 - 9:00 pm | कॉमी

कम्युनिस्ट देशात सगळं छान असतं असं मी कधीही म्हणले नाही आहे. तुम्हीसुद्धा मुद्द्याला बगल द्यावी वाईट वाटलं. असो.

शलभ's picture

26 Apr 2021 - 11:22 pm | शलभ

केरळ चा एक अनुभव आहे. कन्याकुमारी सायकल राईड करतानाचा. कर्नाटक मधे सहा लेन रस्ता आणि सीमा पार केली की केरळ मधे 2 लेन रस्ता विना divider चा. सकाळी 7 वाजता toddy आणि लॉटरी ची दुकाने उघडी पण खाण्याची दुकाने नाहीत. हा फक्त हायवे चा अनुभव आहे.

सुबोध खरे's picture

27 Apr 2021 - 10:12 am | सुबोध खरे

Volcano that can erupt anytime: Pinarayi on Kerala’s Covid situation.

https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/apr/25/volcano-that-...

https://www.livemint.com/news/india/kerala-reports-record-28-469-new-cov...
महाराष्ट्राच्या एक चतुर्थांश लोकसंख्या असलेल्या राज्यात रुग्णसंख्येचा स्फोट होतो आहे. त्यातून तेथे हाताने काम करणारी माणसे सहज उपलब्ध होत नाहीत. शिक्षणाची पातळी उंच आहे आणि कम्युनिस्ट राज्यकर्ते असल्यामुळे युनियन बाजी मुळे त्यांच्या कडून काम करून घेणे फार कठीण आहे.

टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २२ % आहे.

अखाती देशात एकतरी नातेवाईक असलयामुळे खिशात पैसे आहेत पण त्यामुळे येणारी मग्रुरी सुद्धा आहे.

पण सध्या पर्यटन व्यवसाय ठप्प आहे आणि आखातातून येणार पैसा पण आटला आहे. मुळात कम्युनिझम मुळे उद्योगधंदे नाहीतच. त्यामुळे साठवलेल्या पैशावर चालू आहे.

मुसलमान व ख्रिश्चन लोकसंख्या जास्त असल्याने पार्थिव पुरण्यासाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी माणसे मिळत नाहीत, स्मशानभूमीत जागा मिळत नाहीत

येणार काळ अधिक कठीण असणार आहे.

बाकी चालू द्या

केसेस वाढतायत खरंच आहे. मुख्यमंत्री स्वतःच परिस्थिती बिघडणार असा अंदाज लावतायत, ह्यात चांगले वाईट म्हणजे त्याबद्दल ते करणार काय हे आहे. आत्तापर्यंत तरी समाधानकारक वाटले आहे, आने वाला कल क्या लायेगा..?

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 10:38 am | मुक्त विहारि

केरळ मध्ये जाण्याचे टाळतात....

केरळ मधले कुणीही, आखाती देशांत, उच्च पदावर पण जात नाहीत ...असेही काही टक्के जनता म्हणणारच की....

सुखीमाणूस's picture

26 Apr 2021 - 12:45 pm | सुखीमाणूस

उजव्या आणी डाव्या विचारसरणीमधल्या लोकान्चे सत्तेसाठीचे..
आता सरळ सरळ युद्ध करता येत नाही म्हणुन जैविक युद्ध

शेतकरि आन्दोलन चालु असताना डाव्या विचारसरणिच्या लोकाना जराही वाटले नाही की अजुन कोरोना गेला नाही तरी असे लोक मोठ्या प्रमाणात आन्दोलना करता एकत्र कसे येतात? याना लोकान्च्या जीवाची काळजी नाही तर फक्त मोदी तोन्ड्घशी पडण्याची गरज आहे. शेतकर्याना जीव धोक्यात घालायला न लावता यानी शेतमाल फक्त दलालाना विका खासगी उद्योगाना नको असे आवाहन केले असत. यान्च्याकडे सर्व यन्त्रणा होती जी त्यानी शेतकर्यान्चे जीव धोक्यात घालायला वापरली..
कुम्भ्मेळा ही चुक आहेच.. तसेच इतर सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी जमणेपण...

आता असा प्रश्न पडतो की निवडणुका नन्तर अचानक कोरोना परिस्थीती कशी सुधारली अमेरिकेतली? जेव्हा सुरुवातीला अमेरिका सैर्भैर होते तेव्हा भारत कसा काय कोरोना नियन्त्रणात ठेउ शकला?
भारतातल्या पुढल्या निवडणुका होइपर्यन्त असे हल्ले चालुच रहाणार. एका पक्शाच्या बाजुला भान्डवलदारी व्यवस्था आहे तर दुसर्या पक्शासाठी जागतिक स्तरावरुन डावी विचार्सरणी...

गेल्या वर्शी विषाणु ला वुहान विषाणु किवा चीनी विषाणु म्हणायला खुप विरोध झाला तर आत्ता मात्र या विषाणुला अमेरिकी माध्यम सरळ सरळ इन्डिया विषाणु असे सम्बोधतात...
हे युद्ध असेच सुरु रहाणार ...
आत्ता केन्द्रात असलेल्या सरकारने कायम्स्वरुपी युद्ध्जन्य परिस्थिती असल्यासारखा हा आजार हाताळला पाहीजे..दल उभारुन कायम स्वरुपी परिस्थिती नियन्त्रणात ठेवली पाहीजे...

२०२४ पर्यन्त कोरोना परत परत डोक वर काढणारच आहे... तर औषध साठा, प्रतिबन्धक उपाय इत्यादी बाबतीत सतर्क राहीले पाहिजे...

नावातकायआहे's picture

26 Apr 2021 - 12:51 pm | नावातकायआहे

आय पि एल बंद करा - अख्तरचे मत!

https://www.lokmat.com/cricket/ipl-and-psl-should-be-postponed-amidst-co...

चालू रहाणार. बि सि सि आय

https://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/ipl/top-stories/ipl-2...

चंद्रसूर्यकुमार's picture

26 Apr 2021 - 1:27 pm | चंद्रसूर्यकुमार

बंगालमध्ये १९७७ ते २०११ पर्यंत मंदिरे, पुतळे न बांधणार्‍या तर आरोग्यसेवेवर १००% लक्ष केंद्रीत करणार्‍या पक्षाचे सरकार होते ना? मग तिथली आरोग्यसेवा अगदी उच्च दर्जाची असेल ना?

सहजच सुचला म्हणून प्रश्न विचारला.

यश राज's picture

26 Apr 2021 - 1:33 pm | यश राज

असले अडचणीत आणणारे प्रश्न विचारयचे नसतात...
आजच्या घडीला बंगालची अवस्था काय आहे आणि कोणी केली हे शेंबडे पोरगं ही सांगु शकतं.

मुक्त विहारि's picture

26 Apr 2021 - 2:20 pm | मुक्त विहारि

केरळची आर्थिक गणिते, आखाती देशांत काम करणार्या माणसांवर आधारित आहेत....

“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-c...
----------

पण महाराष्ट्र राज्यात मात्र .....

“हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका
https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-n...
-------------

डब्बल ढोलकी .....

नावातकायआहे's picture

26 Apr 2021 - 2:29 pm | नावातकायआहे

तिपाईवर फक्त "माठ" ठेवता येतो :-)

शाम भागवत's picture

27 Apr 2021 - 3:08 pm | शाम भागवत

अवांतर
नावात काहीही असू शकतं आणि ते कधीही आठवू शकते.
"माठ" या शब्दावरून मला ही
मराठी शॉर्ट फिल्म आठवली.

खर तर या शॉर्टफिल्मचा राजकारणाशी थोडासा सुध्दा संबंध नाहीये.
😀

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 5:16 pm | बापूसाहेब

हाच प्रतिसाद / उदाहरण कित्येक दिवस झाले डोक्यात फिरत होतें..
तीपाई वर फक्तं "माठ" च ठेवता येतो.

BTW, लॉकडाऊन संपायला अवघे ३-४ दिवस राहिलेत. इथे कोनाला १५०० रुपये मिळाले का?? ते तीन किलो तांदूळ तीन किलो गहू कोणाला मिळाले का??

लॉकडाऊन जाहीर करण्याआधी आपले आदरणीय कुटुंबप्रमुख मामु यांनी १५०० रुपये आणि अन्नधान्य देणार अस वचन दिलं होत..
कोणाला हेसर्व मिळाले असल्यास सांगा.. त्या व्यक्तीचा शनिवार वाड्यात सत्कार करावा म्हणतो.. !!

आगाऊ warning - १५०० रुपयाचे नाव ऐकल कि काही लोकांना पुन्हा एकदा १५ लाखाचा पोटशूळ उठेल. कित्येकदा त्यांना समजवून सांगितलेलं आहे तरीही फरक पडत नाही.. या निमित्ताने पुन्हा सांगतो की मोदींचा व्हिडीओ पुन्हा पाहा,. Bjp cha manifesto परत वाचा आणि मग आपली ( नसलेली) अक्कल पाजळा.

कॉमी's picture

27 Apr 2021 - 5:53 pm | कॉमी

गरिबांना मिळणार होते.
धान्य मिळावं असे तुम्ही गरजू आहात का ? शक्यता कमी वाटते.

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 6:00 pm | बापूसाहेब

माझ्या माहितीत जे कोणी गरीब आहेत त्यांना कोणालाही मिळालेले नाहीयेत.

काही नातेवाईक आहेत जे रिक्षा चालवतात त्यापैकी कोणालाही १५०० काय १५ रुपये पण मिळाले नाहीयेत.

एक नातेवाईक टेम्पो चालवतात त्यांनाही काहीच मदत मिळाली नाही.

त्यामुळेच म्हणालो की कोणाला मिळाले असतील तर सांगा.. !!!

रात्रीचे चांदणे's picture

27 Apr 2021 - 6:10 pm | रात्रीचे चांदणे

माझा एक मित्र आहे जो रिक्षा चालवतोय, त्याला अजून मिळाले नाहीत.

आग्या१९९०'s picture

27 Apr 2021 - 6:28 pm | आग्या१९९०

नसेल मिळाले तर साथ आटोक्यात आल्यावर करतील खुलासा. " कोविड जुमला " ऐकायची तयारी ठेवा.

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 6:40 pm | बापूसाहेब

नसेल मिळाले तर साथ आटोक्यात आल्यावर करतील खुलासा. " कोविड जुमला " ऐकायची तयारी ठेवा.

किती तो चाटुपणा?? केंद्राच्या एक एक रुपयाचा हिशोब पाहिजे.. पण इथे जाहीर टिव्हीवर येऊन प्रवचन आणि आणि मदत करण्याचे वचन देऊनदेखील आम्हीं त्याचे पुढे नेमके काय झाले ते विचारायचे नाही..

फक्तं बापाला दिलेलं वचन लक्षात राहत का?? जनतेला दिलेल्या वचनाचे काय??

आग्या१९९०'s picture

27 Apr 2021 - 6:47 pm | आग्या१९९०

खुलासा होईपर्यंत थांबा की, किती तो थयथयाट? थोडी ऊर्जा ठेवा की, नौटंकी करायला.

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 6:50 pm | बापूसाहेब

कसला खुलासा करणार हे?? लॉक डाऊन संपत आले तरी जाहीर केलेली मदत मिळाली नाही..

गरीब जनता मेल्यावर त्यांच्या श्रद्धामध्ये तो खुलासा शिजवा आणि प्रसाद म्हणून वाटा.. कारण १५०० रुपये आणि अन्न धान्य तर मिळणार नाहीये. वेळ निघून गेल्यावर तो खुलासा काय कामाचा???

रात्रीचे चांदणे's picture

27 Apr 2021 - 7:08 pm | रात्रीचे चांदणे

.कारण १५०० रुपये आणि अन्न धान्य तर मिळणार नाहीये.
अन्न धान्य कदाचित मिळेल कारण ते केंद्रा कडून मिळणार आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या योजनेबाबतही काही वेगळे नाही. त्यांनी जाहीर केलेल्या अन्नसुरक्षा योजनेतील धान्य केंद्राकडून येणार आणि निराधार/ वृद्ध/ विधवा साहाय्यदेखील केंद्राच्या योजनेतून मिळवले जाणार. नोंदणीकृत रिक्षावाले, बांधकाम आणि आदिवासींसाठीचा मदत खर्च काय तो राज्य सरकारचा.

हे लोकसत्ता च्या अग्रलेखात छापून आलेलं आहे.

बापूसाहेब's picture

27 Apr 2021 - 7:17 pm | बापूसाहेब

अन्न धान्य कदाचित मिळेल कारण ते केंद्रा कडून मिळणार आहे.

छगन भुजबळ सारखी व्यक्ती अन्न धान्य पुरवठा करणार असेल तर केंद्रानेच काय प्रत्यक्ष देवाने जरी अन्न धान्य पाठवले तरी ते सामान्य गरजु व्यक्तीपर्यंत पोहचेल असे वाटत नाही.

भ्रष्टाचार केल्यामुळे इतके वर्ष तुरंगवास भोगुन परत आलेल्या व्यक्तीस पुन्हा तीच जबाबदारी देणे म्हणजे दरोडेखोर व्यक्तीला बँकेचा सुरक्षारक्षक म्हणून नेमल्यासारखे आहे.

मुक्त विहारि's picture

27 Apr 2021 - 7:24 pm | मुक्त विहारि

त्या खात्याचे मंत्री कोण आहेत?

भ्रष्टाचार केल्यामुळे इतके वर्ष तुरंगवास भोगुन
मि भुजबळांचा किंवा राष्ट्रवादी चा पाठीराखा नाही पण भुजबळ हे खरंच न्यायालयात दोषी सिद्ध होऊन तुरंगात गेलं होते कि नुसते न्यायालयीन कोठडीत होते? कोणी खुलासा करेल काय ?
कारण जर फक्त न्यायालयीन कोठडीत असतील तर आरोप सिद्ध होतो असे नाही ?
तसेच डीएस के सारख्यांचे त्यांच्यावर आर्थिक फसवणूक/ घोटाळा केल्याचा आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे कि सरकार फिर्याद दाखल करे पर्यंत न्यायालयीन कोठडी?

पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणजे आरोपी लगेच दोषी असलाच पाहिजे असे लोक आणि प्रचार माध्यमे का गृहीत धरतात ?
"गुन्हा सिद्ध होई पर्यंत आरोपीला निर्दोष समजले जाते ना?
कि भारतीय न्याय व्यवस्थेत वेगळे नियम आहेत?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Apr 2021 - 11:38 am | अमरेंद्र बाहुबली

जर आरोपी भाजपचा असेल तर तो आरोपी असतो पण ईतर पक्शाचा असेल तर तो (भाजपेयींच्या मते) गुन्हेगार असतो. तोच आरोपी जर भाजपात प्रवेश करनार असेल तर तो सन्माननीय होतो आणी विविध पदेही मिळवतो.

मुक्त विहारि's picture

28 Apr 2021 - 12:48 pm | मुक्त विहारि

सांगणार होतात ना...

थोडी कळ काढा. केंद्राने मदत केली नाही म्हाणुन राज्य सरकार काही करु शकले नाही अशी बातमी येईल.
केंद्राला "खडे बोल" किंवा "सणसणीत चपराक" वगेरे असलेला एक अ/(ह)ग्रलेख येईल.

"शिवसेनेचा केंद्रावर जोरदार हल्ला"
"सामनातून केंद्राला टोला"
"महाराष्ट्राचा अपमान"
"मेलेल्या आईचे दूध"
"अफझलखान"
"कोथळा"
"किंबहुना"
इत्यादी..