Skip to main content

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 24/04/2021 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय. हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत. हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.

वाचने 68535
प्रतिक्रिया 276

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे फक्त कम्युनिझमलाच लागू होत नाही. हेच आज भारतात ही पहायला मिळतेय. कम्युनिझम बद्दल वाचन वाढवा. उगाच हत्ती आणि चिचुंद्री ची तुलना करू नका

In reply to by श्रीगुरुजी

भगतसिंघांनी साम्यवाद कितपत अंगिकारला होता ? दोन पातळींवर सांगतो. १. वरवरची- ते सहकार्यांना कॉम्रेड म्हणायचे आणि पत्राखाली लॉंग लिव्ह रिव्हॉल्युशन अशी सही करायचे. २. खोलात- लाहोर कटाच्या सूनवाईमध्ये आरोपी लाल स्कर्फ घालून आले होते. आल्यावर त्यांनी "Long live socialist revolution, long live communist international, long live people, Lenin's name will never die, down with imperialism" अश्या आरोळ्या दिल्या. त्यानंतर शाहीद भगत सिंघांनी एक तार वाचून दाखबली आणि मॅजिस्ट्रेटला ती थर्ड इंटरनॅशनल, बोल्शेविकांची संस्था, हिला पाठवण्यास सांगितले. ते टेक्स्ट खाली देईन. भगत सिंग पक्के रिव्हॅल्युशनरी होते हे त्यांचे जवळपास कुठलेही साहित्य वाचले तरी कळेल. त्यांनी जेलमध्ये सोशलिझमचे आयडियल्स असा ग्रंथ लिहिला होता, त्यांच्या कॉम्रेड्सना पोलिसांच्या भीतीने जाळून टाकावा लागला.
On Lenin day we send hearty greetings to all who are doing something for carrying forward the ideas of the great Lenin. We wish success to the great experiment Russia is carrying out. We join our voice to that of the international working class movement. The proletariat will win. Capitalism will be defeated. Death to Imperialism. (Taken from Selected Writings of Shaheed Bhagat Singh, edited by Shiv Verma.)
श्री गुरुजी, भगत सिंघांची सगळी मते तुम्हाला मान्य असावी असा नक्कीच आग्रह नाही. पण उगाचच ते रिव्हॉल्युशनरी होते याकडे मान वळवू नये. जे आहे ते मान्य करावे. हा प्रतिसाद भगतसिंग कॉम्युनिस्ट होते मग तुम्हीबी व्हा असा नाही. तो कॉन्सर्व्हेटिव्ह तर्क आहे, आपल्याला नाही पटत. हे डेड communist वाल्यांसाठी लिहिले आहे.

In reply to by कॉमी

वयाच्या २३ व्या वर्षी असलेली मते व आवडणारी विचारसरणी उत्तर आयुष्यात टिकेलच असे नाही. मी शिकत असताना मला हुकुमशाही, हिटलर, बाळ ठाकरे वगैरे बदल एक प्रकारचे फॅसिनेशन होते. भारतात फक्त हुकुमशाहीच हवी, लष्करी राजवट हवी असे माझे मत होते. परंतु कालांतराने हे सर्व आकर्षण ओसरले. १९६२ मधील चीन युद्धाच्या काळात भगतसिंग असते तर त्यांनी नक्कीच चीनला विरोध केला असता. भगतसिंग शालेय, महाविद्यालयीन वयात असताना जगात सर्वप्रथम साम्यवादी राजवट रशियात आली. तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या भगतसिंगांना त्याचे आकर्षण वाटले असेल. परंतु कालांतराने साम्यवाद्यांनी क्रांती, तळागाळातील जनतेसाठी लढणे, जमीनदारी नष्ट करणे वगैरे विसरून जनतेकडे संपूर्ण दुर्लक्ष करून फक्त सत्ता टिकविणे व त्यासाठी हुकुमशाही, अत्याचार, गळचेपी इ. चा वापर करणे एवढेच केल्याने भगतसिंग नक्कीच साम्यवाद विरोधी झाले असते.

लंगडे समर्थन नाही ... मार्मिक पोस्टर आहे.. आणि त्यातला संदेश मला मान्य आहे.. संदेश म्हणजे शब्दशः अर्थ नव्हे .. हे तुमच्या सारख्या हत्तीच्या व्यंगचित्राचे रसग्रहण करणाऱ्यांना वेगळे सांगायला नकोच

In reply to by अमर विश्वास

मग केरळ मधील ऑक्सिजनवर बहिष्कार घाला. चीनचे एकही उत्पादन वापरू नका, आपोआप मरतील ते.

In reply to by आग्या१९९०

मेलेला हत्ती, त्यावरील भारतीय राष्ट्रध्वजाचे चित्र जमीनीला लागलेले, याबद्दल काही बोलला नाहीत हे इंटरेस्टिंग आहे. :)

In reply to by आग्या१९९०

निवडुन दिलेत दादा, जनतेने आणि पक्षाने! विरोधी पक्ष व्हावा येवढे पण एक पक्षाचे निवडुन नाही आले.

In reply to by अमर विश्वास

आणि त्यातला संदेश मला मान्य आहे..
ज्या विचारसरणीने पूर्ण जगात लाखो लोकांचे बळी घेतले, रक्ताचे पाट वाहिले, सामान्य माणसाचे जीणे मुश्किल करून टाकले असल्या कुजलेल्या विचारसरणीला मोठ्या विद्यापीठांमधले ढुढ्ढाचार्य प्रोफेसर आणि कम्युनिझम म्हणजे नक्की काय चीज आहे याची पुसटशीही कल्पना नसलेले भाबडे लोक सोडले तर डोके ठिकाणावर असलेला कोणीही समर्थन देणार नाही. हिटलरपेक्षा जास्त लोकांचे बळी या हलकटांनी जगभरात घेतले आहेत. मागे एकदा एका फेसबुक ग्रुपवर कोणीतरी प्रश्न विचारला होता- कोणत्या साथीने जगात सर्वात जास्त बळी घेतले आहेत? त्यावर कोणी उत्तर दिले प्लेग, कोणी म्हटले कॉलरा तर कोणी आणखी काही म्हटले. या प्रश्नाला माझे उत्तर होते कम्युनिझम. याचे कारण इतर सगळे रोग शरीराचे असतात. औषध वापरून ते जंतू मारता येऊ शकतात. पण कम्युनिझम हा व्हायरस एकदा डोक्यात घुसला की तो बाहेर निघणे महाकर्मकठीण. आणि त्यातूनच लाखो लोकांना ठार मारायचे समर्थन होते किंवा असला व्हायरस घुसलेले लोक नेते झाले की ते स्वतः लाखो लोकांना ठार मारतात. आणि एकदा हे दुष्परिणाम पुढे आले की मग परत हे सगळे मोठे मोठे विचारवंत but it was not real communism असे परत परत समर्थन करत राहतात आणि काही वर्षांनी कुठेतरी असे रक्ताचे पाट परत वाहतात. प्रोपोगांडा करण्यात या कम्युनिच लोकांचा हात कोणी धरू शकणार नाही. म्हणे क्युबात आरोग्यव्यवस्था उच्च दर्जाची होती. मग स्वतः फिडेल कॅस्ट्रोवर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर का बोलावून घ्यायला लागला?https://www.nbcnews.com/id/wbna16346039 आणि क्युबा इतका स्वर्ग असेल तर त्या देशात जन्मलेले १०-१२% लोक अमेरिकेत का पळाले? हे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍या देशात एक अवैध घुसखोर म्हणून पण राहायला तयार झाले/होतात पण कम्युनिस्ट राजवट असलेला आपलाच देश त्यांना नकोसा झाला. आणि दरवेळी हा पलायन करणार्‍या सामान्यांचा (हेर वगैरे सोडून द्या) ओघ एकाच दिशेने असे- क्युबातून अमेरिकेत, पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत, उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात वगैरे. हे का हा साधा प्रश्न यांना पडत नाही आणि परत एकदा but it was not real communism असले गुडघ्यातले समर्थन हे फुकाचे विचारवंत करत असतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांना एकदा असाच एक क्युबन शरणार्थी म्हणाला की तुम्ही एका स्वतंत्र देशात जन्माला आलात म्हणून मला तुमचा हेवा वाटतो. त्यावर रेगन त्याला म्हणाले की तुला पळून जायला कुठलेतरी ठिकाण तरी होते म्हणून मला तुझा हेवा वाटतो. माझ्या देशात जर अशी दडपशाही करणारी राजवट सत्तेत आली तर मला पळून जायला दुसरे ठिकाणही राहणार नाही. कम्युनिझम ही कुजलेली विचारसरणी म्हणजे मानवजातीला कलंक आहे हे माझे स्पष्ट मत आहे. जितक्या लवकर या विचारसरणीचे समूळ उच्चाटन होईल तितके चांगले. आणि माझे हे मत स्पष्ट आहे. त्यात कोणताही- अगदी कानामात्रावेलांटीचाही बदल करायची गरज मला वाटत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

गुलामीची मानसिकता असलेली जनता नसत्या आवहानाना भुलते आणि कायमच दुखी होते.. सम्पत्तिचे समान वाटप असे आमिष दाखवणारे कायमस्वरुपी सत्तास्थानी रहातात आणि ऐशोआराम उपभोगतात तरुण पिढी तर अश्या आमिषामागे लवकर जाते...

In reply to by चंद्रसूर्यकुमार

perhaps 100 million persons have been destroyed by the Communists; the imperviousness of the Iron and Bamboo curtains prevents a more definitive figure." https://en.wikipedia.org/wiki/Mass_killings_under_communist_regimes केवळ वैचारिक मतभेदांसाठी १० कोटी स्वतःच्या देशातीलच लोक (स्वकीय) गेल्या १०० वर्षात कम्युनिस्टांनी ठार मारले आहेत. त्या विचारसरणीचे कौतुक सोडाच, साधे समर्थन तरी कसे करणार

In reply to by सुबोध खरे

एका आयडियोलॉजी खाली तुम्ही हजारो लोक गुंडाळताय. कम्युनिसम/सोशलिझम या नावाखाली लोकशाही समर्थक, प्रायव्हेट बिझनेस आणि फ्री मार्केट असावे अश्या विचारधारा सुद्धा उपलब्ध आहेत. इतकेच या विषयावर मी सांगू शकतो.

In reply to by कॉमी

अहं, काहींना समाजवाद ह्या शब्दाचीही ॲलर्जी असते. खाजगीकरण आणि भांडवलशाही हेच सगळ्या समस्यांवर इलाज आहे असे ह्या लोकांना वाटते. कोरोनाने अशा विचारसरणीच्या लोकांची तोंडे बंद केली.

In reply to by आग्या१९९०

काहींना भांडवलशाहीची अ‍ॅलर्जी असते, तर काहींना संघ, भाजपची, तर काहींना अजुन कशाची... याच धाग्यावर बघा, किती जणांना मोदींची अ‍ॅलर्जी झालीय. नाही का?

In reply to by सॅगी

बरं ही मोदींची अ‍ॅलर्जी इतकी भयंकर झालीय की त्यासमोर त्यांना स्वतःच्या राष्ट्रध्वजाचीही विटंबना चालून गेलीय. हे त्याहुनही भयंकर..

In reply to by सॅगी

मोदी, त्यांचा पक्ष आणि त्यांचे काम कितीही घाण असले तरी ज्यांना लोकशाही आणि राष्ट्रध्वजाची किंमत नाही अश्या लोकांकडुन काय अपेक्षा ठेवावी?

In reply to by नावातकायआहे

मोदींद्वेषात आंधळे झालेल्यांना आपण नकळत आपल्या देशाशी प्रतारणा करतोय हेच कळत नाहीये. मोदी भले ही आवडत नसतील तरी आनंद व्यक्त करताना त्याबरोबर आपल्या देशाच्या प्रतिकांचा पण अपमान होतोय याबद्द्ल तरी खेद व्यक्त करावा. पण ही भलतीच अपेक्शा आहे मोदीज्वर झालेल्यांकडुन. बाकी परदेशात काही काळ वास्तव्य असल्यामुळे अनुभवावरुन सांगतो, परदेशी मिडिया डाव्या विचारसरणी कडे झुकलेला असतो(त्यातल्या त्यात बरेचदा पाहुणे संपादक म्हणुन राणा आय्युब सारखे लोक). त्यामुळे भले त्या देशाचे पंतप्रधान असो वा आपल्या देशाचे पंतप्रधान , दोघांबद्द्ल नेहमीच नकारार्थी लेख वाचायला मिळायचे

In reply to by सुबोध खरे

दहा कोटी ? माई गुडनस.
त्या विचारसरणीचे कौतुक सोडाच, साधे समर्थन तरी कसे करणार
का ? एखादा धर्म जो पक्शपात करत आसेल आपल्याच लोकांमधे तो जर काळाच्यासोबत सुधारत असेल मुलभुत तत्वज्ञान न बदलता... तर हे ही का शक्य होनार नाही भविश्यात ?

In reply to by गॉडजिला

एकदम चपखल प्रश्न आहे. आत्ता पोर्तुगाल या युरोपियन देशात सलग दुसऱ्यांदा - १. Partido Socialista (सोशलिस्ट.) २. Bloco de Esquerda (कम्युनिस्ट) ३. सोशल डेमोकॅर्टिक पक्ष (डावे नाहीत.) ह्यांचे एकत्रित सरकार सलग दुसऱ्यांदा निवडून आले. (२०१९) हे सरकार लोकशाही, बाजार अर्थव्यवस्था ह्याचातच काम करते. सोशलिस्ट पक्षाचा प्रधानमंत्री आहे. मागच्या वेळेस पेक्षा २२ शिटा सोशलिस्ट लोकांना जास्त मिळाल्या. ह्यांची विचारधारा USSR मधल्या कम्युनिस्टांचीच आहे म्हणजे अगदी हास्यास्पद आहे.

कोल्हापुरात सात नवीन प्लांट बांधण्याचा निर्णय. अत्ता कोल्हापुरात गरज भागवण्याइतक ऑक्सिजन तयार होत असला तरी पुढे गरज वाटेल म्हणून निर्णय घेण्यात आला. https://www.google.com/amp/s/timesofindia.indiatimes.com/city/pune/maha…

तामिळनाडू मध्ये ७०%+ केसेस चेन्नई मध्ये असून कॉर्पोरेशनने लोकांची काळजी घेतली आहे. सिरीयस केसेस ना ताबडतोब ऍडमिट केले जाते, आणि माईल्ड पेशंट्स ना त्यानंतर प्रेफरन्स. हे प्रत्येक जिल्ह्यात केले आहे. केरळ- काही मोजके लोक सोडले ज्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलात भरती व्हावे लागले/ स्वतःहून झाले, केरळ मध्ये कोव्हिड उपचार सरकारी इस्पितळात विनामूल्य दिले गेले आहेत. आणि आत्ता पेशंट संख्या सहजपणे अकोमॉडेट होत असली तरी आरोग्य व्यवस्थेचे एक्सपान्शन चालू आहे, जर लोड वाढला तर असावे म्हणून. तामिळनाडू आणि कॉम्रेड्स, सलाम. https://www.google.com/amp/s/m.timesofindia.com/india/tamil-nadu-and-ke…

In reply to by कॉमी

केरळ मधील स्थिती भयानक आहे असे माझा डॉक्टर वर्गमित्र ( जो कम्युनिस्ट आहे) तो सांगतो आहे. ( अर्थात त्याच्या विचारसरणी प्रमाणे तो श्री मोदी यांनाच जवाबाबदार ठरवतो आहे ते ओघानेच आले) तेंव्हा माध्यमात काय आले आहे ते माहिती नाही आणि त्यावर मी तरी विश्वास ठेवण्यास तयार नाही.

In reply to by कॉमी

आॅक्सीजनची कमतरता आहे असे सोशल मिडीयावर दाखवले तर संपत्ती जप्त करा असे केरळ च्या मामुनी सांगीतले असावे. :) युपीसारख्या पंचतारांकीत सेवा आहेत का केरळात?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सांख्यकी बाजूला सारून anecdotal evidence वर खुश दिसतायत खरे सर. हि कितपत योग्य हे माहीत असण्याऐवढे ते नक्की हुशार आहेत.
anecdotal /ˌanɪkˈdəʊtl/ adjective (of an account) not necessarily true or reliable, because based on personal accounts rather than facts or research.

In reply to by सुबोध खरे

तिथे तिथे कारखानदारी बंद होते... पश्र्चिम बंगाल हे एक उदाहरण डोळ्यासमोर आहेच आणि केरळ हे दुसरे... साम्यवादी विचारसरणी, भारतात 100% कधीच रुजणार नाही, पण निव्वळ उपद्रवमुल्य ह्या पलीकडे, साम्यवादाला किंमत नाही...

In reply to by सुबोध खरे

कम्युनिस्ट देशात सगळं छान असतं असं मी कधीही म्हणले नाही आहे. तुम्हीसुद्धा मुद्द्याला बगल द्यावी वाईट वाटलं. असो.

In reply to by कॉमी

केरळ चा एक अनुभव आहे. कन्याकुमारी सायकल राईड करतानाचा. कर्नाटक मधे सहा लेन रस्ता आणि सीमा पार केली की केरळ मधे 2 लेन रस्ता विना divider चा. सकाळी 7 वाजता toddy आणि लॉटरी ची दुकाने उघडी पण खाण्याची दुकाने नाहीत. हा फक्त हायवे चा अनुभव आहे.

In reply to by कॉमी

Volcano that can erupt anytime: Pinarayi on Kerala’s Covid situation. https://www.newindianexpress.com/states/kerala/2021/apr/25/volcano-that… https://www.livemint.com/news/india/kerala-reports-record-28-469-new-co… महाराष्ट्राच्या एक चतुर्थांश लोकसंख्या असलेल्या राज्यात रुग्णसंख्येचा स्फोट होतो आहे. त्यातून तेथे हाताने काम करणारी माणसे सहज उपलब्ध होत नाहीत. शिक्षणाची पातळी उंच आहे आणि कम्युनिस्ट राज्यकर्ते असल्यामुळे युनियन बाजी मुळे त्यांच्या कडून काम करून घेणे फार कठीण आहे. टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट २२ % आहे. अखाती देशात एकतरी नातेवाईक असलयामुळे खिशात पैसे आहेत पण त्यामुळे येणारी मग्रुरी सुद्धा आहे. पण सध्या पर्यटन व्यवसाय ठप्प आहे आणि आखातातून येणार पैसा पण आटला आहे. मुळात कम्युनिझम मुळे उद्योगधंदे नाहीतच. त्यामुळे साठवलेल्या पैशावर चालू आहे. मुसलमान व ख्रिश्चन लोकसंख्या जास्त असल्याने पार्थिव पुरण्यासाठी स्मशानभूमीत नेण्यासाठी माणसे मिळत नाहीत, स्मशानभूमीत जागा मिळत नाहीत येणार काळ अधिक कठीण असणार आहे. बाकी चालू द्या

In reply to by सुबोध खरे

केसेस वाढतायत खरंच आहे. मुख्यमंत्री स्वतःच परिस्थिती बिघडणार असा अंदाज लावतायत, ह्यात चांगले वाईट म्हणजे त्याबद्दल ते करणार काय हे आहे. आत्तापर्यंत तरी समाधानकारक वाटले आहे, आने वाला कल क्या लायेगा..?

In reply to by सुबोध खरे

केरळ मधले कुणीही, आखाती देशांत, उच्च पदावर पण जात नाहीत ...असेही काही टक्के जनता म्हणणारच की....

उजव्या आणी डाव्या विचारसरणीमधल्या लोकान्चे सत्तेसाठीचे.. आता सरळ सरळ युद्ध करता येत नाही म्हणुन जैविक युद्ध शेतकरि आन्दोलन चालु असताना डाव्या विचारसरणिच्या लोकाना जराही वाटले नाही की अजुन कोरोना गेला नाही तरी असे लोक मोठ्या प्रमाणात आन्दोलना करता एकत्र कसे येतात? याना लोकान्च्या जीवाची काळजी नाही तर फक्त मोदी तोन्ड्घशी पडण्याची गरज आहे. शेतकर्याना जीव धोक्यात घालायला न लावता यानी शेतमाल फक्त दलालाना विका खासगी उद्योगाना नको असे आवाहन केले असत. यान्च्याकडे सर्व यन्त्रणा होती जी त्यानी शेतकर्यान्चे जीव धोक्यात घालायला वापरली.. कुम्भ्मेळा ही चुक आहेच.. तसेच इतर सर्व धार्मिक कार्यक्रमासाठी जमणेपण... आता असा प्रश्न पडतो की निवडणुका नन्तर अचानक कोरोना परिस्थीती कशी सुधारली अमेरिकेतली? जेव्हा सुरुवातीला अमेरिका सैर्भैर होते तेव्हा भारत कसा काय कोरोना नियन्त्रणात ठेउ शकला? भारतातल्या पुढल्या निवडणुका होइपर्यन्त असे हल्ले चालुच रहाणार. एका पक्शाच्या बाजुला भान्डवलदारी व्यवस्था आहे तर दुसर्या पक्शासाठी जागतिक स्तरावरुन डावी विचार्सरणी... गेल्या वर्शी विषाणु ला वुहान विषाणु किवा चीनी विषाणु म्हणायला खुप विरोध झाला तर आत्ता मात्र या विषाणुला अमेरिकी माध्यम सरळ सरळ इन्डिया विषाणु असे सम्बोधतात... हे युद्ध असेच सुरु रहाणार ... आत्ता केन्द्रात असलेल्या सरकारने कायम्स्वरुपी युद्ध्जन्य परिस्थिती असल्यासारखा हा आजार हाताळला पाहीजे..दल उभारुन कायम स्वरुपी परिस्थिती नियन्त्रणात ठेवली पाहीजे... २०२४ पर्यन्त कोरोना परत परत डोक वर काढणारच आहे... तर औषध साठा, प्रतिबन्धक उपाय इत्यादी बाबतीत सतर्क राहीले पाहिजे...

बंगालमध्ये १९७७ ते २०११ पर्यंत मंदिरे, पुतळे न बांधणार्‍या तर आरोग्यसेवेवर १००% लक्ष केंद्रीत करणार्‍या पक्षाचे सरकार होते ना? मग तिथली आरोग्यसेवा अगदी उच्च दर्जाची असेल ना? सहजच सुचला म्हणून प्रश्न विचारला.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

असले अडचणीत आणणारे प्रश्न विचारयचे नसतात... आजच्या घडीला बंगालची अवस्था काय आहे आणि कोणी केली हे शेंबडे पोरगं ही सांगु शकतं.

“देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे”; राहुल गांधींचं केंद्र सरकारवर टीकास्त्र https://www.loksatta.com/desh-videsh-news/congress-leader-rahul-gandhi-… ---------- पण महाराष्ट्र राज्यात मात्र ..... “हे आम्हाला आवडलं नाही,” मोफत लसीकरणावरुन बाळासाहेब थोरांताची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका https://www.loksatta.com/maharashtra-news/congress-balasaheb-thorat-on-… ------------- डब्बल ढोलकी .....

In reply to by नावातकायआहे

अवांतर नावात काहीही असू शकतं आणि ते कधीही आठवू शकते.

"माठ"

या शब्दावरून मला ही मराठी शॉर्ट फिल्म आठवली. खर तर या शॉर्टफिल्मचा राजकारणाशी थोडासा सुध्दा संबंध नाहीये. 😀

In reply to by नावातकायआहे

हाच प्रतिसाद / उदाहरण कित्येक दिवस झाले डोक्यात फिरत होतें.. तीपाई वर फक्तं "माठ" च ठेवता येतो. BTW, लॉकडाऊन संपायला अवघे ३-४ दिवस राहिलेत. इथे कोनाला १५०० रुपये मिळाले का?? ते तीन किलो तांदूळ तीन किलो गहू कोणाला मिळाले का?? लॉकडाऊन जाहीर करण्याआधी आपले आदरणीय कुटुंबप्रमुख मामु यांनी १५०० रुपये आणि अन्नधान्य देणार अस वचन दिलं होत.. कोणाला हेसर्व मिळाले असल्यास सांगा.. त्या व्यक्तीचा शनिवार वाड्यात सत्कार करावा म्हणतो.. !! आगाऊ warning - १५०० रुपयाचे नाव ऐकल कि काही लोकांना पुन्हा एकदा १५ लाखाचा पोटशूळ उठेल. कित्येकदा त्यांना समजवून सांगितलेलं आहे तरीही फरक पडत नाही.. या निमित्ताने पुन्हा सांगतो की मोदींचा व्हिडीओ पुन्हा पाहा,. Bjp cha manifesto परत वाचा आणि मग आपली ( नसलेली) अक्कल पाजळा.

In reply to by कॉमी

माझ्या माहितीत जे कोणी गरीब आहेत त्यांना कोणालाही मिळालेले नाहीयेत. काही नातेवाईक आहेत जे रिक्षा चालवतात त्यापैकी कोणालाही १५०० काय १५ रुपये पण मिळाले नाहीयेत. एक नातेवाईक टेम्पो चालवतात त्यांनाही काहीच मदत मिळाली नाही. त्यामुळेच म्हणालो की कोणाला मिळाले असतील तर सांगा.. !!!

In reply to by बापूसाहेब

नसेल मिळाले तर साथ आटोक्यात आल्यावर करतील खुलासा. " कोविड जुमला " ऐकायची तयारी ठेवा.

In reply to by आग्या१९९०

नसेल मिळाले तर साथ आटोक्यात आल्यावर करतील खुलासा. " कोविड जुमला " ऐकायची तयारी ठेवा.
किती तो चाटुपणा?? केंद्राच्या एक एक रुपयाचा हिशोब पाहिजे.. पण इथे जाहीर टिव्हीवर येऊन प्रवचन आणि आणि मदत करण्याचे वचन देऊनदेखील आम्हीं त्याचे पुढे नेमके काय झाले ते विचारायचे नाही.. फक्तं बापाला दिलेलं वचन लक्षात राहत का?? जनतेला दिलेल्या वचनाचे काय??

In reply to by आग्या१९९०

कसला खुलासा करणार हे?? लॉक डाऊन संपत आले तरी जाहीर केलेली मदत मिळाली नाही.. गरीब जनता मेल्यावर त्यांच्या श्रद्धामध्ये तो खुलासा शिजवा आणि प्रसाद म्हणून वाटा.. कारण १५०० रुपये आणि अन्न धान्य तर मिळणार नाहीये. वेळ निघून गेल्यावर तो खुलासा काय कामाचा???

In reply to by बापूसाहेब

.कारण १५०० रुपये आणि अन्न धान्य तर मिळणार नाहीये. अन्न धान्य कदाचित मिळेल कारण ते केंद्रा कडून मिळणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या योजनेबाबतही काही वेगळे नाही. त्यांनी जाहीर केलेल्या अन्नसुरक्षा योजनेतील धान्य केंद्राकडून येणार आणि निराधार/ वृद्ध/ विधवा साहाय्यदेखील केंद्राच्या योजनेतून मिळवले जाणार. नोंदणीकृत रिक्षावाले, बांधकाम आणि आदिवासींसाठीचा मदत खर्च काय तो राज्य सरकारचा. हे लोकसत्ता च्या अग्रलेखात छापून आलेलं आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

अन्न धान्य कदाचित मिळेल कारण ते केंद्रा कडून मिळणार आहे.
छगन भुजबळ सारखी व्यक्ती अन्न धान्य पुरवठा करणार असेल तर केंद्रानेच काय प्रत्यक्ष देवाने जरी अन्न धान्य पाठवले तरी ते सामान्य गरजु व्यक्तीपर्यंत पोहचेल असे वाटत नाही. भ्रष्टाचार केल्यामुळे इतके वर्ष तुरंगवास भोगुन परत आलेल्या व्यक्तीस पुन्हा तीच जबाबदारी देणे म्हणजे दरोडेखोर व्यक्तीला बँकेचा सुरक्षारक्षक म्हणून नेमल्यासारखे आहे.

In reply to by बापूसाहेब

भ्रष्टाचार केल्यामुळे इतके वर्ष तुरंगवास भोगुन मि भुजबळांचा किंवा राष्ट्रवादी चा पाठीराखा नाही पण भुजबळ हे खरंच न्यायालयात दोषी सिद्ध होऊन तुरंगात गेलं होते कि नुसते न्यायालयीन कोठडीत होते? कोणी खुलासा करेल काय ? कारण जर फक्त न्यायालयीन कोठडीत असतील तर आरोप सिद्ध होतो असे नाही ? तसेच डीएस के सारख्यांचे त्यांच्यावर आर्थिक फसवणूक/ घोटाळा केल्याचा आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली आहे कि सरकार फिर्याद दाखल करे पर्यंत न्यायालयीन कोठडी? पोलिसांनी ताब्यात घेतले म्हणजे आरोपी लगेच दोषी असलाच पाहिजे असे लोक आणि प्रचार माध्यमे का गृहीत धरतात ? "गुन्हा सिद्ध होई पर्यंत आरोपीला निर्दोष समजले जाते ना? कि भारतीय न्याय व्यवस्थेत वेगळे नियम आहेत?

In reply to by चौकस२१२

जर आरोपी भाजपचा असेल तर तो आरोपी असतो पण ईतर पक्शाचा असेल तर तो (भाजपेयींच्या मते) गुन्हेगार असतो. तोच आरोपी जर भाजपात प्रवेश करनार असेल तर तो सन्माननीय होतो आणी विविध पदेही मिळवतो.

In reply to by रात्रीचे चांदणे

थोडी कळ काढा. केंद्राने मदत केली नाही म्हाणुन राज्य सरकार काही करु शकले नाही अशी बातमी येईल. केंद्राला "खडे बोल" किंवा "सणसणीत चपराक" वगेरे असलेला एक अ/(ह)ग्रलेख येईल.

In reply to by सुक्या

"शिवसेनेचा केंद्रावर जोरदार हल्ला" "सामनातून केंद्राला टोला" "महाराष्ट्राचा अपमान" "मेलेल्या आईचे दूध" "अफझलखान" "कोथळा" "किंबहुना" इत्यादी..