लोकहो,
नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेला एक लेख सापडला : https://www.forbes.com/sites/chuckdevore/2020/09/25/election-fraud-in-am...
सांगायचा मुद्दा असा की ट्रंप भरगोस मतांनी विजयी झालेले असूनही बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. असा प्रकार पूर्वी २००० साली लहान प्रमाणावर घडला होता. त्यावेळेस बावळट बुश विरुद्ध अल गोर अशी लढाई होती. अल गोर याच्याकडे अधिक मतसंख्या होती. मात्र अमेरिकेतल्या नियमानुसार ज्या राज्यात उमेदवाराकडे ५०% हून जास्त मतसंख्या असते त्या राज्याच्या सर्व खासदार जागा विजयी उमेदवारास मिळतात. उदा. : क्यालीफोर्नियाच्या ५५ जागा आहेत. तर तिथे विजयी होणाऱ्या उमेदवारास सर्व ५५ जागा मिळतात. तशाच इतर ४९ राज्यांतल्या जागा त्या त्या विजयी उमेदवारास मिळतात. अशा रीतीने जो उमेदवार जास्त खासदार पैदा करेल तो विजयी धरला जातो. जनतेकडून मिळालेल्या प्रत्यक्ष मतांची संख्या पराभूत उमेदवारापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. साधारणत: ज्या उमेदवारास जनतेकडून जास्त मतं मिळतात त्याचे खासदारही जास्त निवडून येतात.
पण २००० साली परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस झाम्या बुशला अल गोर पेक्षा कमी जनतामतं मिळाली होती. पण दोघांच्या खासदार जागा तुल्यबळ होत्या. फक्त फ्लोरिडाचा निकाल यायचा बाकी होता. तिथल्या जागा ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्ष होणार होता. तेव्हा फेरमोजणी झाली होती. तिच्यात घोटाळे करून झाम्याला विजयी घोषित करण्यात आलं. अल गोर ने जास्त खळखळ न करता निमूटपणे पराभव स्वीकारला. मात्र ट्रंप असा सहजासहजी ऐकणारा नाही.
ट्रंपतात्यांना हा निवडणुका चोरण्याचा प्रकार ठाऊक होता. त्यांनी २०१८ साली १३८४८ क्रमांकाचा एक वटहुकूम ( = अध्यादेश = executive order ) पारित करून घेतला. त्यानुसार जर अमेरिकी निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला असेल तर त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची मालमत्ता व पैसे जप्त करता येतात. हा हस्तक्षेपाच अहवाल निकाल लागल्यापासून ४५ दिवसांत गुप्तचरखात्याच्या प्रमुखाने तत्कालीन अध्यक्षास ( = ट्रंप ) सादर करायचा असतो. याचे संयुक्त सादरकर्ते अटर्नी जनरल ( विलियम बार ) व राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख (जॉन रॅटक्लिफ) हे आहेत. हे दोघेही ट्रंपने नेमलेले आहेत. या वटहुकूमाची (कंटाळवाणी व लांबलचक ) प्रत इथे आहे : https://www.presidency.ucsb.edu/documents/executive-order-13848-imposing...
हा अहवाल सदर करायची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे. यांत परकीय हस्तक्षेपाचे पुरावे असणार. त्यानुसार ट्रंप सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. ट्रंपतात्यांच्या चमूने खटला दाखल केलेला आहेच (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Post-election_lawsuits_related_to_the_2020... ). अशा वेळेस निवडणुकीत परकीय हस्तक्षेप उघड झाला तर तिचे निकाल रद्दबातल ठरणार आहेत. असं झाल्यास मग सद्य प्रतिनिधीगृहाचे ( = House of Representatives ) सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडतात आणि सिनेटचे सदस्य उपराष्ट्राध्यक्ष निवडतात. प्रतिनिधीगृह सिनेटपेक्षा वरच्या दर्जाचं मानलं जातं. आता प्रतिनिधीगृहाची रचना अशी आहे की प्रत्येक राज्यास एक सदस्य म्हणजे एक मत उपलब्ध आहे. या गृहात ट्रंप यांचं प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे रद्द निवडणुकीद्वारे ट्रंप घटनादत्त मार्गाने परत राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.
x----------x----------x
लेख त्रोटक व विस्कळीत आहे, हे मान्य. एक गोष्ट लक्षात आली म्हणून जरा घाईघाईत लिहिलंय. लिहिण्यामागे कारण काय ते सांगतो. भारतीयांनी ट्रंप यांना पाठींबा द्यावा हा मुख्य हेतू आहे. ट्रंप परत अध्यक्षपदी बसले तर बोल्शेविकांना चांगलाच दणका बसेल. रशियात १९१८ साली झारची हत्या करून सर्वत्र अराजक माजवून बोल्शेविक सत्तेत आले. तोच प्रकार त्यांना अमेरिकेत करायचा आहे. सोव्हियेत क्रांती हे थोतांड आहे हे वेगळे सांगणे नलगे. बोल्शेविक जर अमेरिकेत जनतेला फाट्यावर मारून सत्तेत आले तर त्यांचं धार्ष्ट्य वाढेल. मग भारतातही ते उचल खातील. नक्षली हे भारतीय बोल्शेविक आहेत. ते फुकटचे माजतील. त्यांची भारतातली मस्ती आटोक्यात आणायची असेल तर अमेरिकेतच त्यांना बांबू लागलेला बरा, नाहीका? वेळच्या वेळी भारतीय जनतेच्या ऐक्याची चुणूक दाखवायला हवी.
चर्चा सुरू करूया.
आपला नम्र,
-गामा पैलवान
प्रतिक्रिया
10 Aug 2022 - 7:24 pm | गामा पैलवान
अमरेंद्र बाहुबली,
मी हा चित्रपट बघितलेला नाही.
आ.न.,
-गा.पै.
16 Aug 2022 - 12:18 pm | चित्रगुप्त
@ अमरेंद्रः किंग्समन ३ कुठे उपलब्ध आहे ?
लहानपणी रासपुतीनबद्दल वाचलेले असल्याने मला त्या व्यक्तीबद्दल अजूनही कुतुहल आहे.
18 Aug 2022 - 7:42 am | जेम्स वांड
कुठं सिनेमे पाहून Rasputin कळतो!
हे वाचा त्यापेक्षा राव तुम्ही , अगदीच संक्षिप्त Rasputin लीलामृत हवे असल्यास हे गाणे ऐकणे
10 Aug 2022 - 7:22 pm | गामा पैलवान
लोकहो,
ट्रंपूतात्यांच्या फ्लोरिडातल्या मार-ए-लागो येथल्या निवासस्थानी संघराज्य अन्वेशक यंत्रणेने ( FBI ने ) धाड टाकली आहे. ही अल्पवेळ चालली. संबंधित बातमी : https://www.bbc.com/marathi/international-62473843
या धडीत काहीही हाती लागलं नाही अशी खबर आहे. त्यामुळेच की काय धवलगृहाने ( व्हाईट हाऊस ने ) स्वत:स धाडीपासनं अलिप्त असल्याचं घोषित केलं आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे, ते ओळखा पाहू !
न्यूयॉर्कचे माजी पोलीस आयुक्त बर्नार्ड केरिक यांनी उघडपणे ट्रंप यांच्या हत्येची भीती वर्तवली आहे. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.dailymail.co.uk/news/article-11095219/Former-NYPD-Commission...
दिवसेंदिवस अमेरिका खिळखिळी होत आहे.
आ.न.,
-गा.पै.
जाताजाता : इव्हानाबाईंचा मृत्यू अपघात होता की हत्या?
10 Aug 2022 - 9:45 pm | कॉमी
10 Aug 2022 - 11:12 pm | गामा पैलवान
कॉमी,
रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याच्या मते हा मर्यादाभंग आहे.
तुम्ही दिलेल्या लेखातून हे वाक्य उद्धृत करतो :
आ.न.,
-गा.पै.
10 Aug 2022 - 11:32 pm | कॉमी
रिपब्लिकन नेत्याच्या मते, हा कायदेभंग आहे की नाही हे ते अजून पाहणार आहेत.
तुम्ही आजिबात काँटेक्स्ट दिला नव्हता. ट्रम्पच्या घरावर धाड पडली कारण त्याच्याकडे (आणखी) गुप्त कागदपत्रे आहेत असा संशय आहे. संशय घेण्यास कारण राष्ट्रीय माहितीगार (आरकाईव्ह) ने आधीच १५ बॉक्स गुप्त कागदपत्रे ट्राम्पच्या घरातून मिळवली आहेत. मुळात क्लासिफाईड कागदपत्रे बापाचा माल असल्यासारखं स्वतःच्या घरात घेऊन जाण्याचा आगाऊपणा ट्रम्पने केला हे तुम्ही अजिबातच उल्लेखल नाही. सदर धाड आणखी क्लसिफाईफड कागद घरात आहेत अश्या संशयावर मारली होती.
केवळ इतकेच नव्हे, तर डिपार्टमेंट ऑफ जस्टीस चे अधिकारी ट्रम्पच्या घरी सुद्धा आधी गेले होते, आणि तिथे हे झाले- जून-जुलै मध्ये.
म्हणजे, गुप्त कागद हा बाब्या घरी घेऊन जाणार. अर्धवट कागद परत करणार. घरी कागद घ्यायला लोक आले की त्यांना हा मदत नाही करणार. मग घरी रेड पडली कि त्याचे समर्थक त्याच्या जीवाला धोका असल्याच्या ष्टोऱ्या बनवणार. वा वा, मज्जाणी लाईफ.
सदर रेड मध्ये कागद सापडले आहेत असे दिसते.
10 Aug 2022 - 11:57 pm | गामा पैलवान
कॉमी,
गोपनीय कागदपत्रं घरी ठेवायला ट्रंप मूर्ख आहे का ! असले कागद जर कोणी धवलगृहाच्या बाहेर घेऊन गेला तर ते नष्ट करण्यासाठीच असतात. घरी ठेऊन काय लोणचं घालायचंय !
बाकी, ट्रंपना लावला तोच न्याय हंटर बिडेनला लावलेला दिसंत नाही. तो जो बिडेनचा मुलगा आहे म्हणून. युक्रेनी आस्थापानांशी त्याने केलेले भ्रष्ट व्यवहार उघड्यावर पडलेत. पण लक्ष कोण देणार !
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2022 - 12:08 am | कॉमी
ट्रम्प कडे मार ए लागो मध्ये पंधरा बॉक्स भरून गोपनीय कागदपत्रं होतीच कि, जी आरकाईव्ह ने पुन्हा मिळवली. तो घरी कागदपत्रे घेऊन गेला होता हे तर शंभर टक्के माहीत झालेली गोष्ट आहे आता. आता तो तुमच्या निकषाने मूर्ख का स्वार्थी का पाताळयंत्री हे तुम्हीच ठरवा बुवा.
जरूर लावावा बुवा. जी काय ड्यु प्रोसेस आहे ती करावीच कि. त्याबाबत सहमत आहे.
ट्रम्पने सुद्धा यापूर्वी, बायडन बद्दल वाईट साईट माहिती काढण्यासाठी युक्रेनसाठी कायद्याने पास झालेला मदतनिधी त्याला तसं करण्याचा अधिकार नसताना अडवून ठेवला होता, त्याचा सुद्धा तपास व्हावा आणि योग्य ती शिक्षा ट्रम्पला व्हावी. हे तुम्ही मान्य करालच.
11 Aug 2022 - 1:56 am | अनन्त अवधुत
म्हणजे ट्रंप तात्यांनीच कायद्यात बदल करून गोपनीय कागदपत्र अधिकार नसताना बाळगणे किंवा नष्ट करणे ह्याची शिक्षा एक वर्षावरून पाच वर्षे केली होती.
11 Aug 2022 - 7:57 am | कॉमी
हॅहॅहॅ
11 Aug 2022 - 11:58 am | सुक्या
ट्रंप ह्या अत्यंत बेदरकार माणसाने व्हाईट हाउस च्या रेकॉर्ड कीपींग टीम ला अक्षरशः वात आणला होता. खरे तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो पेपर वापरतात, मग तो भले बे दुने चार असली आकडेमोड जरी असेल तरी तो पेपर कायद्यानुसार नॅशनल अर्काईव्ह च्या ताब्यात जायला हवा हा नियम असताना ते पेपर फाडुन फेकने, कचरा कुंडीत टाकणे अगदी टॉयलेट मधे फ्लश करणे असले उध्योग ह्या माणसाने केले.
मुळात क्लासिफाईड कागदपत्रे त्याच्या ताब्यात आता नसायला हवीत. तो काही राष्ट्राध्यक्ष नाही. असे असताना ती कादग्पत्रे सापडणे हाच गुन्हा आहे.
आता ट्रंप भाउ व्हिक्टीम कार्ड खेळतील .. नेहेमीसारखे ..
11 Aug 2022 - 5:46 pm | गामा पैलवान
धवलगृहाची भूमिका धाडीपासनं इतकी अलिप्त का, इतकाच माझा प्रश्न आहे.
-गा.पै.
11 Aug 2022 - 6:59 pm | कॉमी
का बरं ? ते अलिप्त भूमिकाच घेणार कि. ईडीची धाड पडल्यावर मोदी काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीच धाड घालायला सांगितली असं म्हणतात काय ?
11 Aug 2022 - 7:09 pm | गामा पैलवान
कॉमी,
अहो, तेच तर म्हणतोय मी. बलाग्रहकांची ( ED ची ) धाड पडल्यावर पंतप्रधान कार्यालय कसलीच प्रतिक्रिया देत नाही. पण धवलगृह मात्र तत्परतेने स्वत:स अलिप्त ठरवून घेतंय.
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2022 - 7:43 pm | कॉमी
अलिप्त असणे अपेक्षितच आहे. त्यात नवल कसले ?
11 Aug 2022 - 9:13 pm | सुक्या
धवलगृहाचे जरा वेळ बाजुला ठेवा? जरावेळ. ओके?
आता मला सांगा "ट्रंप कडे क्लासिफाईड कागद पत्रे सापडली की नाही?" ती त्याने का नेली? तुम्ही म्हणता की डीस्ट्रोय करायला नेली होती. मग कायदा काय सांगतो? ती कागद्पत्रे ट्रंप आपल्या कडे ठेउ शकतो का?"
या प्रश्नांची उत्तरे द्या. मग एफ्बीआय ने धाड का टाकली ते बघा.
15 Aug 2022 - 10:53 pm | कॉमी
कुठवर आले बोल्शेविक ? काही अपडेट्स ?
16 Aug 2022 - 1:20 am | गामा पैलवान
कॉमी,
झाली बळकावून अमेरिका.
जाताजाता : बिडेनला नेमकी किती मतं पडली? घोषणा झाली का?
आ.न.,
-गा.पै.
16 Aug 2022 - 8:50 am | कॉमी
हत्तीच्या, असे आहे होय, बोल्शेविकांचे पुनःश्च अभिनंदन.
काय काय केलं मग बोल्शेविकांनी सत्ता मिळवून ? का जैसे थे ?
बिडेनची मतं तेव्हा सांगितलेली तितकीच आहेत.
16 Aug 2022 - 4:55 pm | धर्मराजमुटके
चला हे तरी एक काम चांगलं झालं. (म्हणजे पुर्ण झालं). नाहितर जगात असे कितीतरी प्रश्न लटकत पडलेत.
16 Aug 2022 - 5:20 pm | सुरिया
मग नायतर काय?
एकदाचं ते करोना आणि त्यावरची लस हे दोन्ही थोतांड असल्याचे सिध्द व्हावे. ते पण लै लटकत ठेवलंय.
होलसेल मधी २०२०, २१ डीलीट मारले तरी चालेल. सगळे थोतांडच होते असे ठरले तरी चालेल.
16 Aug 2022 - 5:41 pm | धर्मराजमुटके
ते काम पण कॉमीं मुळे लटकत पडलयं. त्यांना काही च्या पाणी देऊन तो ही प्रश्न सुटतो का ते बघायला पाहिजे. :)
16 Aug 2022 - 10:13 pm | गामा पैलवान
कॉमी,
१.
तुमचं नावंच मुळी कॉमी आहे. तुम्हांसच अधिक चांगलं ठाऊक असणार. पण त्याचं काये की झोपेचं सोंग घेतलेल्याला उठविता येत नसतं.
२.
राज्यनिहाय मतांची बेरीज मलाही करता येते.
पण संघाराज्याची अधिकृत घोषणा कुठाय? ( Where is the Federal Agency's official declaration ? ) नोव्हेंबर २०२० पासून आजतागायत झालेली नाही. पुढे कधी होईल याची शाश्वती नाही. आणि म्हणे बिडेन जिंकलाय.
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2022 - 11:06 am | कॉमी
म्हणजे तुम्हाला माहिती नाही म्हणा कि.
आणि मी भारतात राहतो हो, तुम्ही किमान यूकेत तर राहता, तेव्हढे माहित असावे असे वाटले. आणि इतके प्रतिसाद हिरीरीने देता म्हणून काहीतरी कल्पना आहे असे वाटलेले.
हायला हे कसले बोल्शेविक म्हणायचे. सत्ता आली तरी काही म्हणजे काही सुद्धा केलं नाही. नुसते बसलेत भांडवलशाही कुरवाळत. आणि गंमत म्हणजे ह्या बोल्शेविक (डेमोक्रॅटीक) पक्षाला सगळे पैसे पण ह्या भांडवली कंपन्या पुरवतात. अतिश्रीमंत लोक पुरवतात.
हा काय प्रकार ? ट्रम्प आणि ओबामा ची दाखवा बघू, मग तशी बिडेनची आहे का बघूया.
20 Aug 2022 - 2:02 pm | गामा पैलवान
कॉमी,
१.
ह्यांत गंमत ती कसली? हे तर ऐतिहासिक तथ्य आहे.
२.
२०१६ ( ट्रंप ) : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections2016...
२०१२ ( ओबामा ) : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections2012...
एव्हाना इथे २०२० ( बिडेन ) चे निकाल दिसायला हवे होते. पण ते दिसंत नाहीत : https://www.fec.gov/introduction-campaign-finance/election-and-voting-in...
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2022 - 7:12 pm | कॉमी
इथे बघा-
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.fec.gov...
20 Aug 2022 - 8:30 pm | कॉमी
आणि भांडवलशाहीचा पुरस्कारच करणारी आणि भांडवली कंपन्यांनी फंड केलेली पार्टी बोल्शेविक म्हणजे प्रचंड मोठा विनोद आहे. बोल्शेविक म्हणे, उगाच काहीही शब्द फेकणे आहे हे म्हणजे.