बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत

गामा पैलवान's picture
गामा पैलवान in राजकारण
14 Dec 2020 - 3:16 am

लोकहो,

नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेला एक लेख सापडला : https://www.forbes.com/sites/chuckdevore/2020/09/25/election-fraud-in-am...

सांगायचा मुद्दा असा की ट्रंप भरगोस मतांनी विजयी झालेले असूनही बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. असा प्रकार पूर्वी २००० साली लहान प्रमाणावर घडला होता. त्यावेळेस बावळट बुश विरुद्ध अल गोर अशी लढाई होती. अल गोर याच्याकडे अधिक मतसंख्या होती. मात्र अमेरिकेतल्या नियमानुसार ज्या राज्यात उमेदवाराकडे ५०% हून जास्त मतसंख्या असते त्या राज्याच्या सर्व खासदार जागा विजयी उमेदवारास मिळतात. उदा. : क्यालीफोर्नियाच्या ५५ जागा आहेत. तर तिथे विजयी होणाऱ्या उमेदवारास सर्व ५५ जागा मिळतात. तशाच इतर ४९ राज्यांतल्या जागा त्या त्या विजयी उमेदवारास मिळतात. अशा रीतीने जो उमेदवार जास्त खासदार पैदा करेल तो विजयी धरला जातो. जनतेकडून मिळालेल्या प्रत्यक्ष मतांची संख्या पराभूत उमेदवारापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. साधारणत: ज्या उमेदवारास जनतेकडून जास्त मतं मिळतात त्याचे खासदारही जास्त निवडून येतात.

पण २००० साली परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस झाम्या बुशला अल गोर पेक्षा कमी जनतामतं मिळाली होती. पण दोघांच्या खासदार जागा तुल्यबळ होत्या. फक्त फ्लोरिडाचा निकाल यायचा बाकी होता. तिथल्या जागा ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्ष होणार होता. तेव्हा फेरमोजणी झाली होती. तिच्यात घोटाळे करून झाम्याला विजयी घोषित करण्यात आलं. अल गोर ने जास्त खळखळ न करता निमूटपणे पराभव स्वीकारला. मात्र ट्रंप असा सहजासहजी ऐकणारा नाही.

ट्रंपतात्यांना हा निवडणुका चोरण्याचा प्रकार ठाऊक होता. त्यांनी २०१८ साली १३८४८ क्रमांकाचा एक वटहुकूम ( = अध्यादेश = executive order ) पारित करून घेतला. त्यानुसार जर अमेरिकी निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला असेल तर त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची मालमत्ता व पैसे जप्त करता येतात. हा हस्तक्षेपाच अहवाल निकाल लागल्यापासून ४५ दिवसांत गुप्तचरखात्याच्या प्रमुखाने तत्कालीन अध्यक्षास ( = ट्रंप ) सादर करायचा असतो. याचे संयुक्त सादरकर्ते अटर्नी जनरल ( विलियम बार ) व राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख (जॉन रॅटक्लिफ) हे आहेत. हे दोघेही ट्रंपने नेमलेले आहेत. या वटहुकूमाची (कंटाळवाणी व लांबलचक ) प्रत इथे आहे : https://www.presidency.ucsb.edu/documents/executive-order-13848-imposing...

हा अहवाल सदर करायची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे. यांत परकीय हस्तक्षेपाचे पुरावे असणार. त्यानुसार ट्रंप सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. ट्रंपतात्यांच्या चमूने खटला दाखल केलेला आहेच (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Post-election_lawsuits_related_to_the_2020... ). अशा वेळेस निवडणुकीत परकीय हस्तक्षेप उघड झाला तर तिचे निकाल रद्दबातल ठरणार आहेत. असं झाल्यास मग सद्य प्रतिनिधीगृहाचे ( = House of Representatives ) सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडतात आणि सिनेटचे सदस्य उपराष्ट्राध्यक्ष निवडतात. प्रतिनिधीगृह सिनेटपेक्षा वरच्या दर्जाचं मानलं जातं. आता प्रतिनिधीगृहाची रचना अशी आहे की प्रत्येक राज्यास एक सदस्य म्हणजे एक मत उपलब्ध आहे. या गृहात ट्रंप यांचं प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे रद्द निवडणुकीद्वारे ट्रंप घटनादत्त मार्गाने परत राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.

x----------x----------x

लेख त्रोटक व विस्कळीत आहे, हे मान्य. एक गोष्ट लक्षात आली म्हणून जरा घाईघाईत लिहिलंय. लिहिण्यामागे कारण काय ते सांगतो. भारतीयांनी ट्रंप यांना पाठींबा द्यावा हा मुख्य हेतू आहे. ट्रंप परत अध्यक्षपदी बसले तर बोल्शेविकांना चांगलाच दणका बसेल. रशियात १९१८ साली झारची हत्या करून सर्वत्र अराजक माजवून बोल्शेविक सत्तेत आले. तोच प्रकार त्यांना अमेरिकेत करायचा आहे. सोव्हियेत क्रांती हे थोतांड आहे हे वेगळे सांगणे नलगे. बोल्शेविक जर अमेरिकेत जनतेला फाट्यावर मारून सत्तेत आले तर त्यांचं धार्ष्ट्य वाढेल. मग भारतातही ते उचल खातील. नक्षली हे भारतीय बोल्शेविक आहेत. ते फुकटचे माजतील. त्यांची भारतातली मस्ती आटोक्यात आणायची असेल तर अमेरिकेतच त्यांना बांबू लागलेला बरा, नाहीका? वेळच्या वेळी भारतीय जनतेच्या ऐक्याची चुणूक दाखवायला हवी.

चर्चा सुरू करूया.

आपला नम्र,
-गामा पैलवान

प्रतिक्रिया

लोकहो,

जॉर्जिया सिनेटने निवडणुकीत झालेले गैरप्रकार शोधण्यासाठी समिती नेमली होती. तिने या निवडणुकीतनं निवडल्या गेलेल्या सदस्यांना अप्रमाणित करायची शिफारस केली आहे. बातमी : https://creativedestructionmedia.com/news/politics/2020/12/22/ga-senate-...

आ.न.,
-गा.पै.

उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी आपण ट्रंपच्या बाजूने उभं असल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे : https://newspunch.com/it-begins-vp-pence-officially-supports-challenging...

आज दिनांक ०६ जानेवारी २०२१ रोजी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब ( = certification) होणार आहे. हे शिक्कामोर्तब रद्द व्हावे म्हणून निवडणुकीतल्या घोटाळयाविरुद्ध असंख्य अमेरिकी नागरिक वॉशिंगटन डीसी येथे एकत्र येऊन अभियान ( = रॅली ) काढणार आहेत. त्याला आता सुरुवात झाली असेल. त्यांना यश लाभो.

-गा.पै.

डॅनी ओशन's picture

7 Jan 2021 - 7:46 pm | डॅनी ओशन

हॅहॅहॅ

कपिलमुनी's picture

7 Jan 2021 - 9:16 pm | कपिलमुनी

भलतेच गाजले कि अभियान

पुढच्या वेळी पण रिपब्लिकन्स येतील का नाही शंका आहे

गामा पैलवान's picture

8 Jan 2021 - 1:45 am | गामा पैलवान

पेन्सने ऐन वेळेस शेपूट घातली आणि ट्रंपना पाठींबा दिला नाही. लोकं पिसाळली आहेत. त्यांना बिडेन नकोय. आता प्रत्येक अमेरिकेतील प्रत्येक अधिकारपदस्थाकडे संशयाने पाहिलं जाईल. मी ट्रंपसाठी मतदान केलेलं असतांना माझ्या डोक्यावर बसणारा हा डेमोक्राट वा रिनो ( = Republican In Name Only ) उपटसुंभ कोण, असा सवाल खूपशा नागरिकांच्या मनात असेल.

-गा.पै.

शा वि कु's picture

8 Jan 2021 - 8:28 am | शा वि कु

आता प्रत्येक अमेरिकेतील प्रत्येक अधिकारपदस्थाकडे संशयाने पाहिलं जाईल.

मी ट्रंपसाठी मतदान केलेलं असतांना माझ्या डोक्यावर बसणारा हा डेमोक्राट वा रिनो ( = Republican In Name Only ) उपटसुंभ कोण, असा सवाल खूपशा नागरिकांच्या मनात असेल.

रिपब्लिकन पेक्षा, मी ट्रम्पेट ला मतदान केलेलं, तर ट्रम्पेट नसलेला हा उपटसुंभ कोण ? असा सवाल असेल. काडीची क्रेडिबिलिटी असलेले सगळे रिपब्लिकन ट्रम्प हारला आहे हे मान्यच करतात. जॉर्जिया सिनेट ची सीट कशामुळे गेली ? तात्यांच्या फॅण्टसीला तरंगत ठेवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच. डेमोक्रॅटिक पार्टीला उत्तम शस्त्र मिळवून दिले.

तसही पेन्स कडे निवडणूक अवैध ठरवण्याचा काडीचा हक्क नव्हता. ट्रम्प ची फँटसी आणि स्वतःचे आधीच कमकुवत झालेले राजकीय करियर यात त्याने लॉजिकल पर्याय निवडला.

जे काल डीसी मध्ये झालं ते इतर देशात घडलं असतं तर आत्तापर्यंत अमेरिकन सैन्य तिथे पोहोचले असते, coup थांबवायला म्हणून.

असो.
बोल्शेविकांचे हार्दिक अभिनंदन. :)

गामा पैलवान's picture

9 Jan 2021 - 12:03 am | गामा पैलवान

सैन्य ट्रंपच्या बाजूने आहे. सैन्याला पाचारण करायची बिडेनची हिंमत नाही.
-गा.पै.

अमेरिका सारख्या प्रगत देशात अजुन पण लोकशाही ची मूल्य रुजली नाहीत हे खरोखर दुर्दैव आहे.
व्यक्ती स्वतंत्र,लोकशाही,ह्याचा टेंबा मिरवणारी अमेरिका खरेच प्रगत लोकशाही मूल्यं ची पाठराखण करणारा आहे का?

लोकहो,

ट्रंपनी आवाहन केलंय की २० जानेवारीचं सत्तांतर अलगद करा म्हणून. संदर्भ : https://www.zerohedge.com/markets/trump-calls-urges-no-violence-no-lawbr...

एकंदरीत ट्रंपूतात्यांनी शेपूट घातलेली दिसतेय.

अमेरिकन साम्राज्य का कायसं म्हणतात संपायला आलं आहे. झाम्या बुशनं २००० सालची निवडणूक चोरल्यावर ९ महिन्यांत ९११ घडलं. बिडेनने २०२० ची निवडणूक चोरल्यावर दहशतवादी हल्ला व्हायला किती दिवस लागणार ते पहायचं.

आ.न.,
-गा.पै.

आंद्रे वडापाव's picture

15 Jan 2021 - 6:56 pm | आंद्रे वडापाव

हल्ला दंगली कश्या होणार ??
सरकार बदललंय नं...
भारतात बघा झाली का मोठी दंगल..

शा वि कु's picture

15 Jan 2021 - 7:53 pm | शा वि कु

आजपासून तुम्ही MAGA पैलवान.

:))

आंद्रे वडापाव's picture

15 Jan 2021 - 9:01 pm | आंद्रे वडापाव

MAGA पैलवान...

:=}}}
बाऊंडरी बाहेर षटकार...
लैच आवल्डला, शाविकु शॉट

लोकहो,

काही तासांनी बिडेन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनेल. निदान तशी तयारी सुरू आहे. आज दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी पहाटे ०५०० (वॉशिंगटन डीसी वेळ) बिडेनने नेमकी किती मतं मिळवली याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्रीय अधिकृत यंत्रणेने काहीही आकडा दिलेला नाही. जो आकडा आहे तो राज्यनिहाय मतदारांची बेरीज करोन मिळवलेला आहे.

साहजिकंच हा दिवसाढवळ्या टाकलेला नेत्रदीपक दरोडा आहे. ट्रंप या घोटाळ्याविरुद्ध कठोर पाऊल सहज उचलू शकला असता. पण त्याने शेपूट घालून माघार घेतली. अमेरिकेच्या नागरिकांना उत्स्फूर्त जनांदोलन उभारावं लागणार.

त्यांना यश लाभो.

आ.न.,
-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jan 2021 - 7:34 pm | श्रीरंग_जोशी

Biden चा उच्चार बायडन असा केला जातो. उच्चाराबाबत साशंकता असल्यास देवनागरीऐवजी थेट रोमन लिपीत नाव लिहावे ही सुचवणी.

बादवे माझ्या माहितीप्रमाणे फेडरल इलेक्शन कमिशन कधीच मतमोजणीची राष्ट्रीय स्तरावरची एकुण आकडेवारी अध्यक्षीय निवडणुकांनंतर जाहीर करत नसते. या खेपेपासून करणार अशी काही घोषणाही नव्हती.

श्रीरंग_जोशी,

फेडरल इलेक्शन कमिशन कधीच मतमोजणीची राष्ट्रीय स्तरावरची एकुण आकडेवारी अध्यक्षीय निवडणुकांनंतर जाहीर करत नसते, याचाच अर्थ निवडणूक प्रक्रिया घोटाळाप्रवण आहे.

बिडेन जिंकलाय हे नक्की कोण सांगतं? जे कोणी सांगंत असेल त्याने आकडेवारी द्यायला नको का? विकीवर एकून मतदानाचे आकडे जे दिलेत त्यांची विश्वासार्हता काय?

सत्य प्रस्थापित करण्यासाठी फेडरल कोर्टाने हस्तक्षेप करायला हवा ना? सुप्रीम कोर्ट म्हणतंय की आधी बिडेनचं उद्घाटन होऊद्या, मगंच खटला चालवू : https://www.foxnews.com/politics/supreme-court-trump-campaign-case-no-hurry

याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक प्रक्रियेचं गांभीर्य नाही. काय म्हणायचं या चालढकलीस? ठाण्याला जांभळी नाक्यावर उघड्यावर हजामत करायला न्हावी बसायचे. त्यांना धूपछाव म्हणायचे. ते गिऱ्हाईकांची अर्धीच हजामत करून ठेवायचे. गिऱ्हाईक पळून जाणार कुठे मग. याच धर्तीवर अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या खटल्यांची अर्धीच हजामत करून ठेवलीये. पूर्वी गांधींनी म्हंटलं की वकिलाचं आणि हजामाचं काम एकंच आहे. अमेरिकी न्यायालयाने त्यापुढे जाऊन स्वत:स अर्धी दाढी करणाऱ्या हजामाच्या पातळीवर आणून ठेवलंय. फेडरल कोर्ट आहे की हजामखाना ?

बाकी, अमेरिकेत बिडेन चा उच्चार बायडन असेल, नाही असं नाही. पण मी इंग्लंडमध्ये असल्याने मी बिडेन असाच सुटसुटीत उच्चार करतो. तसंही पाहता एक राष्ट्र म्हणून अमेरिका संपलाय किंवा संपत आलाय.

आ.न.,
-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

20 Jan 2021 - 9:45 pm | श्रीरंग_जोशी

राज्यनिहाय मतमोजण्यांपासून युएस काँग्रेसद्वारे निकालांबाबतच्या शिक्कामोर्तबापर्यंत सर्व प्रक्रिया नेहमीप्रमाणेच पार पडली आहे.

माझ्या प्रत्यक्ष निरिक्षणानुसार अनेक अमेरिकन लोक (सरकारी नोकर्‍यांमध्ये असणारे समाविष्ट) स्वतःचा पक्षीय कल कुठलाही असला तरी स्थानिक स्तरापासून सर्वोच्च स्तरावर गैरप्रकार खपवून घेत नाहीत. तुम्ही म्हणताय तसा काही घोटाळा होण्यासाठी त्यात हजारो लोकांचा थेट सहभाग असला पाहिजे अन त्याहीपेक्षा अधिक लोकांनी त्याकडे डोळेझाक केली पाहिजे. अमेरिकेत असे काही होणे अशक्य आहे.

मी अगोदरच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे एकाही मिपाकर अमेरिकन नागरिकाने या धाग्यावर तुमच्या दाव्यांना पाठिंबा दर्शविलेला नाही.

गामा पैलवान's picture

21 Jan 2021 - 3:32 pm | गामा पैलवान

श्रीरंग_जोशी,

१.

एकाही मिपाकर अमेरिकन नागरिकाने या धाग्यावर तुमच्या दाव्यांना पाठिंबा दर्शविलेला नाही.

सध्या प्रश्न फक्त ६ झोपाळा राज्यांपुरातच सीमित आहे. या राज्यांत कितीसे मिपाकर आहेत? त्यापैकी किती अमेरिकी नागरिक आहेत? ही आकडेवारी मिळाल्यास प्रस्तुत विधानाची योजनव्याप्ती ( = युजर बेस ) काढता येईल.

२.

राज्यनिहाय मतमोजण्यांपासून युएस काँग्रेसद्वारे निकालांबाबतच्या शिक्कामोर्तबापर्यंत सर्व प्रक्रिया नेहमीप्रमाणेच पार पडली आहे.

तीव्रपणे असहमत. ही प्रक्रिया कायद्यांना धाब्यावर बसवून पार पाडली आहे.

श्री. पीटर नावारो यांनी The Immaculate Deception नावाचा ३६ पानी रिपोर्ट प्रकाशित केला आहे : https://www.docdroid.net/file/download/QhVNwFw/the-immaculate-deception-...

हा वाचणार कोण इतकाच प्रश्न आहे.

३.

माझ्या प्रत्यक्ष निरिक्षणानुसार अनेक अमेरिकन लोक (सरकारी नोकर्‍यांमध्ये असणारे समाविष्ट) स्वतःचा पक्षीय कल कुठलाही असला तरी स्थानिक स्तरापासून सर्वोच्च स्तरावर गैरप्रकार खपवून घेत नाहीत

करेक्ट. पण फेडरल सुप्रीम कोर्ट खपवून घेतंय.

आ.न.,
-गा.पै.

निनाद's picture

21 Jan 2021 - 6:28 am | निनाद

बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत? ती तर कधीच हातातून गेली आहे.
बोल्शेविक तर ओबामा आला तेव्हाच विजयी झाले होते.
त्या दहा वर्षात चीन चा वरचष्मा जेव्हढा वाढला तेव्हढा कधीच वाढला नव्हता.
याचा अर्थ सीसीपी आणि डेमोक्रॅटिक पार्टी हे एकच झाले आहेत असा असू शकेल का?

तसेच भारतात पण झाले.
चीनी निर्यात भारतात युपिए च्या काळात भयंकर वाढली आणि काँग्रेस च सीसीपीचे करार होते एकमेकांशी. म्हणजे लोकशाही देशात सीसीपी ही स्वतः एक पार्टी म्हणून काम करू लागली आहे. जी चीनी हितसंबंध जपते.

कोणत्याही कम्युनिस्ट पार्टीला किंवा देशाला मात्र सलग सत्ता मिळाल्याने त्यांना अनेक धोरणे राबवणे सोपे आहे.
तेच लोकशाही देशांना मात्र शक्य नाही. कारण पार्टी बदलली की धोरणे बदलतात.
मग आता या परिस्थितीत दीर्घ कालात विजयी चीनच होणार कारण त्याला देशांतर्गत राजकारणाचा धोका नाही.
तोच धोका सर्व लोकशाही देशांना मात्र आहे.

गामा पैलवान's picture

22 Jan 2021 - 8:22 pm | गामा पैलवान

निनाद,

तुमचं म्हणणं खरंय. 'बोल्शेविक अमेरिका उघडपणे बळकावताहेत' असं शीर्षक पाहिजे. सोव्हियेत महासंघ कोलमडला तेव्हा साम्यवाद संपला नसून तो अमेरिकेच्या रूपाने परत अवतीर्ण झाला आहे. किंबहुना अमेरिकेत प्रशासनात खोलवर घुसखोरी केल्यावरंच नंतर सोव्हियेत महासंघ 'कोलमडवण्यात' आला असा माझा अंदाज आहे.

अमेरिकी सेनातळ बंद करायचा आदेश गोर्बाचेव्हने क्रेमलिनवरनं दिला असता तर कोण गहजब माजला असता. पण हाच आदेश त्याने सानफ्रान्सिस्को मध्ये बसून अमेरिकी नौदलाकडून मिळवला. तेव्हा काहीच विरोध झाला नाही. संदर्भ (इंग्रजी दुवा) : https://www.latimes.com/archives/la-xpm-1993-04-17-mn-24046-story.html

हा आदेश मिळवतांना त्याला नान्सी पेलोसी नामे इस्टेट एजंटिणीची मदत झाली. हीच पेलोसी आज ट्रंपच्या विरुद्ध महाभियोग चालवायची महत्वाकांक्षा बाळगून आहे.

वाचकांनी जे काही समजायचंय ते समजून घ्यावं !

आ.न.,
-गा.पै.

निनाद's picture

25 Jan 2021 - 10:33 am | निनाद

अमेरिकेत प्रशासनात खोलवर घुसखोरी केल्यावरंच नंतर सोव्हियेत महासंघ 'कोलमडवण्यात' आला असा माझा अंदाज आहे.

या मध्ये तथ्य असू शकते.
नान्सी पेलोसी??? बाप रे! म्हणजे ही तर सरळ सरळ देशाशी गद्दारी करणारी आज सभापति होऊन बसली!??

लोकशाहीच्या यु एस गेले आहे जगावर साम्यवादी सत्ता प्रस्थापित झाली आहे असेच वाटू लागले आहे आता.

लोकहो,

हे शासकीय सत्ताहरण अर्थात coup de etas [ उच्चार : कू(व) द एता(ह) ] आहे हे वेगळे सांगणे नलगे.

याची परिणती म्हणून ट्रंपवर २६ जानेवारीस (२०२१) हल्ला झाला म्हणे : https://realrawnews.com/2021/01/trump-assasination-foiled-deep-state-in-...

तात्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा (बायको, मुलं, जावई, इत्यादि ) जीव धोक्यात आहे. कदाचित माजी पत्न्यांचा जीवही धोक्यात असू शकतो. रशियाच्या झारला जसा एकता गाठून संपवला तसंच ट्रंप यांना संपवायचा बेत दिसतो आहे.

ट्रंपना हे कळंत नाही का? माझ्या मते ट्रंपतात्यांनी सत्ता सोडावयास नको होती. घटना फार वेगाने घडताहेत.

आ.न.,
-गा.पै.

जगावर साम्यवादी सत्ता प्रस्थापित झालेली आहे.
यात आता संशय उरलेला नाही.
युझफुल इडियट्स चा वापर करून त्यांनी अमेरिकेत व्यवस्थित बस्तान बसवले आहे. कॅनडा पण साम्यवादी आहे. द. अमेरिकेत बहुतेक देश अमेरिकेची रि ओढतील तेव्हा तेथे ही खोटी लोकशाही असणार आहे.
साम्यवादी देशांना सदैव एकच आणि फक्त त्यांचीच सत्ता असल्याचा संपूर्ण फायदा मिळतो. आणि आता लोकशाही देशातील अनेक पक्षांशी त्यांनी करार केल्यामुळे त्यांना आपल्या फायद्याच्या पोलिसिज चालवणे सोपे जाते. एखादा ट्रंप आला तरी त्याला टोलवता येते. मोदी आला तरी त्याला सतत राजकारणात गुंतवून खेळवता येते.
त्यांना सतत सत्तेवर राहणे सहज जमू शकते. कारण मदरशिप नेशन म्हणजे मुळ साम्यवादी देश अत्यंत बलिष्ठ होऊन बसला आहे. तेथून हवा तेव्हढा पैसा पुरवता येतो. आणि मग ट्रंप किंवा मोदी यांना काढले गेले की परत तोच पैसा साम्यवादी देशात वळवता येतो.

माध्यम खेळ
आता ट्रंप गेला आणि अमेरिकन कोव्हिडच्या बातम्या माध्यमातून नाहीश्या झाल्या आहेत. आता अमेरिका अचानक हेल्दी झाली का? आता संसर्ग अचानक गेला का? तर नाही. पण त्याची उग्रता माध्यमे दाखवत होते ती नाही. म्हणजे हा एक मायावी खेळ होता - असे असू शकेल का?
अमेरिकेतून ट्रंप गेला. तेथे आता साम्यवादी सरकार आले आहे. त्यामुळे आता अमेरिका कशी आक्रमक आणि युद्धखोर आहे वगैरे रंगवणे बंद झाले आहे.

पुढील योजना काय असेल?
या साम्यवाद्यांची आता पुढील निशाणे आहेत - भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान. येथे साम्यवादाला अनुकूल सरकारे नाहीत.
त्यामुळे तेथे - तुमचे सरकार कसे वाईट चालले आहे - हे माध्यमातून सांगणे रंगवणे सुरू राहील.

गामा पैलवान's picture

5 Feb 2021 - 11:36 pm | गामा पैलवान

निनाद,

तुमच्या वरील संदेशाशी सहमत आहे. साम्यवाद्यांचे अमेरिकेत बऱ्यापैकी बस्तान बसले आहे. पण आजून नागरिकांकडे हत्यारे आहेतंच. सध्या अमेरिकी नागरिक अधिकाधिक हत्यारे खरेदी करताहेत ( संदर्भ : https://www.reuters.com/article/usa-guns-insight-idUSKBN2701HP ). त्यामुळे अमेरिकी साम्यवाद्यांसाठी सगळं काही आलबेल नाही.

मात्र असं असलं तरीही ट्रंप गेल्यावर पुतीन व मोदी पुढील मोठी लक्ष्ये आहेत हे नक्की. सध्याचं 'शेतकरी' आंदोलन हे मोदींना हटवायलाच चालू आहे.

पण मोदीही काही कच्च्या गुरूंचे चेले नाहीत. त्यांनी शशी थरूर यांच्यावर गुन्हा दाखल करून आपणही कडक धोरण स्वीकारू शकतो हे दाखवून दिलं. थरूर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात उच्चपद भूषवलं आहे. अशा लोकांवर त्यांच्या मायदेशात सहसा गुन्हे वगैरे दाखल होत नसतात. किंवा झाले तरी किरकोळात दाखल होतात. नेमका हाच नेम साधून मोदींनी आपण युनोची फारशी पत्रास बाळगंत नाही हे दाखवून दिलंय.

आ.न.,
-गा.पै.

निनाद's picture

9 Feb 2021 - 4:36 am | निनाद

मात्र असं असलं तरीही ट्रंप गेल्यावर पुतीन व मोदी पुढील मोठी लक्ष्ये आहेत हे नक्की. पुतिन यांच्या विषयी असहमत! पुतिन यांना चीन लेखी काही किंमत नसावी. त्यांच्या कडे तेव्हढा पैसा ही नाही आणि सत्ता पण तशी नाही / नसावी. रशिया हा अता फक्य चीन चा एक कुत्रा म्हणून शिल्लक उरला असावा. साम्यवादी चळवळीचे संपुर्ण निर्णय चीन मधून होत आहेत.

बिदेनच्या रूपाने ओबामाच्या वेळी होती तशी आता अमेरिकेवर साम्यवादी सत्ता काबीज होत असेल, झाली असेल तर चीनचे राजकारणी महत्त्व कमी होऊ शकेल. पन आर्थिक राखले जाईल.
पण ऑस्ट्रेलिया, ब्रिटनच्या पंतप्रधानांसह मोदी हे मात्र साम्यवाद्यांना अतिशय खुपत आहेत या संशय नाही. आणि मोदी कोणत्याही चीनी करातात अडकत नाहीत, तसेच बोलणी पण करत नाहीत. त्यामुळे त्यांचा त्रास अधिक आहे.

पण मोदींनी अजून आक्रामक भूमिका घेणे आवश्यक आहे असे वाटते. उदा. ट्रंप असे पर्यंत

  1. बलुचिस्थान वेगळा व्हायला हवा होता.
  2. सिंधुदेश भारताशी जोडला जायला हवा होता.
  3. पाकचे संपूर्ण विघटन करणे हे अत्यंत आवश्यक कार्य मोदी करतांना दिसत नाहीत.

त्यामुळे ते नक्की काय खेळी करत आहेत हे समजत नाही. तसेच भारतातून साम्यवाद्यांचे संपूर्ण उच्चाटन त्यांच्या इकोसिस्टिम सहीत अत्यंत आवश्यक आहे.
त्यांची मुळे कापून त्यांना संपवणे - हे ही करतांना मोदी दिसत नाहीत.
या सर्वाचा मला अचंबा वाटतो.

गामा पैलवान's picture

12 Feb 2021 - 11:27 pm | गामा पैलवान

निनाद,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

मला रशिया हा चीनचा अंकित वाटंत नाही. कारण की चीनची ऊर्जाभूक प्रचंड आहे, तर रशिया ऊर्जा व तेल मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. पुतीन अगदी देवदूत नसला तरी त्याने युक्रेनात माजली तशी अनागोंदी टाळली. आजच्या घडीला ही मोठी जमेची बाजू आहे.

बाकी, पाकिस्तानाविषयी तुम्ही काढलेले मुद्दे योग्य आहेत. सराईत फलंदाज ताबडतोब धुलाई न करता गोलंदाज दमेस्तोवर धीर धरतो. त्याप्रमाणे चीन दमला की मोदी फटकेबाजीस सुरुवात करतील असा माझा अंदाज आहे.

आ.न.,
-गा.पै.

sunil kachure's picture

10 Jun 2022 - 1:51 pm | sunil kachure

रशिया च दबदबा आज पण जगात आहे मोदी आणि पुतीन ची तुलना पण होवू शकत नाही.
काही लाख लोकसंख्या असलेल्या कतार पण मोदी la पूर्ण शरणागती पत्करायला लावली.
आणि मोदी म्हणजे भारत नव्हे मोदी पंत प्रधान असतील पण ते भारताचे प्रतिनिधी नाहीत..
भारताचे स्वतःचे वेगळे सामर्थ आहे त्याच्या शी मोदी चा काही संबंध नाही.

सुबोध खरे's picture

14 Jun 2022 - 12:21 pm | सुबोध खरे

कचरे बुवा

श्री मोदी आपल्याबरोबर गोट्या खेळत नसत

तेंव्हा देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून त्यांना आपण अरे तुरे करावे अशी आपली लायकी नाही.

किमान सभ्यतेचे
संकेत तरी पाळा

गामा पैलवान's picture

1 Mar 2021 - 3:15 am | गामा पैलवान

लोकहो,

या अमेरिकी अपघातातनं भारतासाठी एक गोष्ट चांगली झाली. अमेरिकेची वट उणावल्यामुळे एक प्रकारची सत्तापोकळी उत्पन्न झाली आहे. अनेक देश भारताकडे डोळे लावून बसले आहेत. मोदी सोंगट्या हलवण्यात मग्न आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अचानकपणे भारताच्या दौऱ्यावर यायचं म्हणताहेत. बातमी : https://navbharattimes.indiatimes.com/india/xi-jinping-may-attend-brics-...

भूदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणताहेत की आम्ही जसे ठेवू, तसे चीनशी संबंध असतील. बातमी : https://hindi.news18.com/news/nation/our-relations-with-china-would-deve...

अमेरिकेची पत खालावाल्याची ही चिन्हे आहेत.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

2 Mar 2021 - 9:08 pm | गामा पैलवान

लोकहो,

धूपछाव हजामखाना म्हणजे अमेरिकी सुप्रीम कोर्टाने सिडनी पॉवेल यांचा अर्ज काहीही भाष्य न करता व कसलंही कारण न देता फेटाळला आहे. अर्जामध्ये पेनसिल्व्हेनिया येथे घडलेल्या निवडणूक गैरप्रकारांच्या विरोधात दाद मागितली होती.

हजामखान्याने अर्ज विचारात घेतलाच नाही. आता परिस्थिती अशी आहे की पेनसिल्व्हेनियात टपाली मतं नोंदवण्याचा कायदा पारित केला होता खरा, पण तो विधिमंडळाने नसून राज्य न्यायालयाने केलेला होता. या बदललेल्या कायद्याच्या आधारे बोगस मतदान घडवून बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं. याला कोर्टाची मनमानी का म्हणू नये?

अमेरिकी जनतेला विचारतो कोण !

आ.न.,
-गा.पै.

शा वि कु's picture

28 Mar 2021 - 7:46 pm | शा वि कु

डॉमिनियन (मतदान यंत्र निर्माती कंपनी) मशिन्सने सिडनी पॉवेल वर मानहानीचा खटला भरला. तर ह्यावर उत्तरादाखल सिडनी पॉवेल म्हणते, "कोणताही विचार करणारा माणूस मी म्हणत होते ते तथ्याचे दावे होते असे मानणार नाही."
(No reasonable person would conclude those were truly statements of fact.)

ऐकणारे लोकं रिजनेबल नव्हते वाटतं ! ते बिचारे फॅक्ट मानून बसले.
Stop the steal conspiracy theorists take COWARDS way out

गामा पैलवान's picture

14 Apr 2021 - 2:18 pm | गामा पैलवान

शा वि कु,

उपरोक्त विधान सिडनी पॉवेल यांचं नसून त्यांच्या वकीलाचं आहे. संदर्भ : https://www.theguardian.com/us-news/2021/mar/23/sidney-powell-trump-elec...

तसंही पाहता अमेरिकी न्यायालय यंत्रणेने स्वत:हून कायदे निर्माण करून लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर आक्रमण केलंय. तर मग या मोकाट यंत्रणेस सिडनी पॉवेल वर खटला चालवायचा काय अधिकार आहे ?

आ.न.,
-गा.पै.

रिपब्लिकन पक्षाने नेमलेल्या चौकशी समितीसमोर विस्कॉन्सिनात ५०००० खोटी मतं नोंदीत झाल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल झालं आहे. दाखलकर्ता विदासंश्लेषक असून त्याचं नाव पीटर बर्नेगर आहे. अधिक माहितीसाठी इंग्रजी दुवा : https://sputniknews.com/20220213/wisconsin-50000-phantom-votes-cast-in-s...

विस्कॉन्सिनात बिडेन फक्त २०००० मतांनी विजयी झाला आहे. या घोटाळयाचं विशाल रूप हळूहळू बाहेर येत आहे.

-गा.पै.

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2022 - 4:14 am | श्रीरंग_जोशी

सहज शोधलं तर हा दावा अमेरिकेतल्या एकाही नावाजलेल्या वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर आढळला नाही.
याची विश्वसनीयता संशयास्पद आहे.

मी या धाग्यावर पूर्वीही लिहिलंय की भारतीय नागरिकांनंतर मिपावर सर्वाधिक संख्येने अमेरिकन नागरिक आहेत. ते अमेरिकेच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. आजवर एकानेही या धाग्यातल्या दाव्यांचे समर्थन केलेले नाही.

धागा वर आलाच आहे तर अ‍ॅरिझोनात गेल्या वर्षी झालेल्या मते पूनर्मोजणी संबंधी बातमीचे दुवे देतो.

जेम्स वांड's picture

15 Feb 2022 - 8:37 am | जेम्स वांड

पैलवानांनी दिलेल्या धाग्याचे नाव पण

"स्फुटनिक न्यूज" आहे

काय हो श्रीरंग दादा तुम्ही अमेरिकन अन रशियन मिळून आमच्या भोळ्याभाबड्या पैलवान दादांचा मामु करताय का काय म्हणे मी ;)

श्रीरंग_जोशी's picture

15 Feb 2022 - 9:31 am | श्रीरंग_जोशी

स्पुतनिक न्युज बाबत शोधले असता खालील माहिती मिळाली. स्रोत: मिडीया बायस फॅक्ट चेक.

  • Reasoning: Russian Propaganda, Conspiracy, Lack of Transparency, Some Fake News
  • Bias Rating: RIGHT-CENTER
  • Factual Reporting: VERY LOW
  • Country: Russia (149/180 Press Freedom)
  • Media Type: News Agency
  • Traffic/Popularity: High Traffic
  • MBFC Credibility Rating: LOW CREDIBILITY

Funded by/Ownership
Sputnik is owned and funded by the Russian Government to promote Russia’s image abroad. The Sputnik news service produces over 1,500 news items daily and around the clock.

काय हो श्रीरंग दादा तुम्ही अमेरिकन अन रशियन मिळून आमच्या भोळ्याभाबड्या पैलवान दादांचा मामु करताय का काय म्हणे मी ;)

मी अमेरिकेत राहणारा भारतीयच आहे :-). बाकी मामु हा उल्लेख वाचला की माझ्या नजरेसमोर आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊच येतात ;-).

कॉमी's picture

15 Feb 2022 - 3:05 pm | कॉमी

ऑ, चक्क बोल्शेविकांच्या घरातला न्यूज सोर्स आहे की.

गामा पैलवान's picture

15 Feb 2022 - 4:21 pm | गामा पैलवान

श्रीरंग_जोशी,


Sputnik is owned and funded by the Russian Government to promote Russia’s image abroad.

तुम्ही म्हणता की कुठल्याही नावाजलेल्या अमेरिकी वृत्तपत्राने काहीही लिहिलं नाही. हीच तर समस्या आहे. नेमक्या याच कारणासाठी मला रशियाच्या मुखपत्राचा आधार घ्यावा लागतो. अमेरिकी वृत्तपत्रांची का दातखिळी बसलीये?

बाकी, राष्ट्रीय स्तरावर बिडेन व ट्रंप यांना एकूण किती मतं मिळाली हा आकडा आजूनही प्रकाशित झालेला नाहीये. तो का होत नाहीये?

अरिझोना परीक्षणानंतर सखोल तपासणीची गरज असल्याचं हे निरीक्षण नोंदवलं गेलं : On October 8, the county Elections Department and Recorder's office released a preliminary "top line" analysis of the auditor's report, finding it repeatedly made faulty claims. The preliminary analysis was to be followed by a deeper analysis.

याचा अर्थ कुठेतरी घोटाळा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

9 Jun 2022 - 2:16 am | गामा पैलवान

लोकहो,

श्री. पीटर नावारो यांना हातकड्या घालून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कुठल्याशा उपस्थिती आज्ञा डावलल्याचा आरोप आहे. या अज्ञ न्यायालयाच्या नसून काँग्रेसच्या होत्या. त्या असंसदीय असल्याचं श्री. नावारो यांचं म्हणणं आहे.

खरं कारण नावारोंनी प्रकाशित केलेला २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या घोटाळ्यावरचा अहवाल हे आहे. त्या अहवालाचं शीर्षक The Immaculate Deception असून तो इथे वाचता येईल : https://www.docdroid.net/QhVNwFw/the-immaculate-deception-121520-1-pdf

चोर सोडून संन्याशास सुळी! ४० खटल्यांची गाढवं भादरीत बसलेल्या न्यायपालिकेकडून न्यायाची अपेक्षा शून्य.

आ.न.,
-गा.पै.

श्री ट्रंप यांच्यावर खुप अन्याय झाला आहे. माहितीसाठी धन्यवाद. मराठी संकेतस्थळावर हि चर्चा पाहुन मानुसकी अजुन जागी आहे असे वाटते.

निनाद's picture

10 Jun 2022 - 5:04 am | निनाद

बिचारे ट्रंप!

लोकहो,

कदाचित ( ट्रंपतात्यांच्या ) माजी पत्न्यांचा जीवही धोक्यात असू शकतो ही यापूर्वी वर्तवलेली भीती खरी ठरली ! :-(

दिनांक १४ जुलै २०२२ रोजी ट्रंपतात्यांच्या द्वितीय पत्नी व इव्हांका ट्रंप यांच्या मातोश्री इव्हाना ट्रंप या त्यांच्या न्यूयोर्कच्या घरी जिन्यावरनं गडगडत खाली पडून मृत झाल्या. धडास झालेल्या बोथट आघातापायी मृत्यू असं अमेरिकी माध्यमांनी वर्णन केलं आहे. त्यांची एकंदर प्रकृती पाहता त्या अशा रीतीने पडून मृत होणाऱ्यांतल्या वाटंत नाहीत. हा खरोखरीच अपघात आहे का?

आ.न.,
-गा.पै.

धर्मराजमुटके's picture

20 Jul 2022 - 7:37 pm | धर्मराजमुटके

आई गं !

कॉमी's picture

20 Jul 2022 - 8:53 pm | कॉमी

"प्रकृती पाहता अपघात होणाऱ्या वाटत नाहीत "

हे कसे बुवा ?

गामा पैलवान's picture

21 Jul 2022 - 5:58 pm | गामा पैलवान

कॉमी,

बाई प्रकृतीने ठणठणीत व तुडतुड्या होत्या. त्यांना जिन्याच्या वरच्या टोकावर वा जवळपास उभ्या असतांना नेमकी भोवळ यावी हे कितपत खरं मानावं? की जिन्यावरनं पडण्यआधीच त्यांचा जीव गेला होता ....? पण घरात तर त्या एकट्याच होत्या. आणि भोवळ कशाने आली? कुठल्या अवयवात काहीबाही रक्तस्राव वगैरे, काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या अचानक मृत्यूबाबत असे अनेक प्रश्न उद्भवतात.

इथे इंग्लंडात वयस्कर माणसं सहसा वरखाली जिनेवाल्या घरांत रहात नाहीत. ते फ्लॅट वा बंगलो येथे राहतात. या दोन्ही वास्तू एकतल ( सिंगल फ्लोअर ) आहेत. अमेरिकेत अशी काही काळजी बहुधा घेत नसावेत. जे आहे ते असं आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

21 Jul 2022 - 11:52 am | सुबोध खरे

इव्हाना ट्रम्प यांची एकंदर चार लग्ने झाली होती आणि त्यापैकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच लग्न दुसरे होते.

त्यांच्या बरोबर झालेल्या घटस्फोटा नंतर (१९९२) त्यांचे इतर मित्र होते तसेच त्यांनी दोन वेळेस परत लग्न हि केले होते ज्यातून त्यांचे परत घटस्फोट झाले होते आणि परत प्रेम संबंध हि होते.

आता अशा स्थितीत केवळ ट्रम्प यांची माजी पत्नी म्हणून घातपात करून त्यांना मारले हे जरा अतिरंजित वाटते आहे.

बाकी कोणत्याही गोष्टीत षडयंत्र असते असे मानणारे लोक जगात काही कमी नाहीत.

गामा पैलवान's picture

21 Jul 2022 - 6:01 pm | गामा पैलवान

आवो खरेसायेब,

त्ये समदं ट्रंपूतात्यांना अन तेंच्या लेकीला बरीक वायलं ( वेगळं ) दिसत आसनार बगा. तुमीआमी मस्त राहू निवांत.

आ.न.,
-गा.पै.

कोणत्याही गोष्टीत षडयंत्र असते असे मानणारे लोक जगात काही कमी नाहीत.
+१ / बाडीस / बुल्ल्स आय

कॉमी's picture

22 Jul 2022 - 9:18 am | कॉमी

तेच कि. खुद्द ट्रम्पला सोडून त्याच्या एक्स वाईफला कशाला कोण मारायला जाईल ? उगाच काहीही फुसक्या सोडायच्या.

ट्रम्पचे एक भारी आहे. त्याला तोंडाने काहीही बोलावे लागत नाही. त्याचे लॉयल फॉलोवर्स स्वतःच मनाने ट्रम्पबद्दल भव्यदिव्य गोष्टी/त्याच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय,शैतानी, बोल्शेविक कटकारस्थान झाल्याच्या ष्टोऱ्या बनवतात.

गामा पैलवान's picture

22 Jul 2022 - 7:12 pm | गामा पैलवान

कॉमी,

कॉम्रेड स्टालिन चार दिवस कोमात जाऊन न तडफडता मेला. त्याला मरतांना बघणारे दशको ( शेकडो नसले तरी ) लोकं होते. तरीपण त्याच्या मृत्यूनंतर शंकाकुशंका उठल्याच. विषबाधेसंबंधी इथे एक आहे ( इंग्रजी दुवा ) : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4524003/

तर मग इव्हानाबाईंना मरतांना बघणारं कुणीही नसतांना लोकांनी शवचिकीत्सकावर विश्वास ठेवावा का? लोकांनी ठेवावा इतपत ठीके. पण खुद्द तात्या आणि इव्हांका ठेवतील का? ते दोघं या मृत्यूकडे वेगळ्या नजरेनेच पाहणार. यालाच खबरदारी घेणं असं म्हणतात.

पटलं तर घ्या नायतर द्या सोडून. हा.का.ना.का.

आ.न.,
-गा.पै.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 Jul 2022 - 6:08 pm | अमरेंद्र बाहुबली

गामाजी तुम्ही किंग्समन ३ पाहीला का? त्यात रासपुतीनला ठार कसं मारण्यात आलं ते दाखवलंय (सिनेमा फिक्शन आहे पण ऐताहासीक घटना जश्याच्या तश्या ऊचलल्यात.) त्यातील संस्थेसारख्याच एखाद्या संस्थेने सदर कांड केले असावे.