लोकहो,
नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेला एक लेख सापडला : https://www.forbes.com/sites/chuckdevore/2020/09/25/election-fraud-in-am...
सांगायचा मुद्दा असा की ट्रंप भरगोस मतांनी विजयी झालेले असूनही बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. असा प्रकार पूर्वी २००० साली लहान प्रमाणावर घडला होता. त्यावेळेस बावळट बुश विरुद्ध अल गोर अशी लढाई होती. अल गोर याच्याकडे अधिक मतसंख्या होती. मात्र अमेरिकेतल्या नियमानुसार ज्या राज्यात उमेदवाराकडे ५०% हून जास्त मतसंख्या असते त्या राज्याच्या सर्व खासदार जागा विजयी उमेदवारास मिळतात. उदा. : क्यालीफोर्नियाच्या ५५ जागा आहेत. तर तिथे विजयी होणाऱ्या उमेदवारास सर्व ५५ जागा मिळतात. तशाच इतर ४९ राज्यांतल्या जागा त्या त्या विजयी उमेदवारास मिळतात. अशा रीतीने जो उमेदवार जास्त खासदार पैदा करेल तो विजयी धरला जातो. जनतेकडून मिळालेल्या प्रत्यक्ष मतांची संख्या पराभूत उमेदवारापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. साधारणत: ज्या उमेदवारास जनतेकडून जास्त मतं मिळतात त्याचे खासदारही जास्त निवडून येतात.
पण २००० साली परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस झाम्या बुशला अल गोर पेक्षा कमी जनतामतं मिळाली होती. पण दोघांच्या खासदार जागा तुल्यबळ होत्या. फक्त फ्लोरिडाचा निकाल यायचा बाकी होता. तिथल्या जागा ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्ष होणार होता. तेव्हा फेरमोजणी झाली होती. तिच्यात घोटाळे करून झाम्याला विजयी घोषित करण्यात आलं. अल गोर ने जास्त खळखळ न करता निमूटपणे पराभव स्वीकारला. मात्र ट्रंप असा सहजासहजी ऐकणारा नाही.
ट्रंपतात्यांना हा निवडणुका चोरण्याचा प्रकार ठाऊक होता. त्यांनी २०१८ साली १३८४८ क्रमांकाचा एक वटहुकूम ( = अध्यादेश = executive order ) पारित करून घेतला. त्यानुसार जर अमेरिकी निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला असेल तर त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची मालमत्ता व पैसे जप्त करता येतात. हा हस्तक्षेपाच अहवाल निकाल लागल्यापासून ४५ दिवसांत गुप्तचरखात्याच्या प्रमुखाने तत्कालीन अध्यक्षास ( = ट्रंप ) सादर करायचा असतो. याचे संयुक्त सादरकर्ते अटर्नी जनरल ( विलियम बार ) व राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख (जॉन रॅटक्लिफ) हे आहेत. हे दोघेही ट्रंपने नेमलेले आहेत. या वटहुकूमाची (कंटाळवाणी व लांबलचक ) प्रत इथे आहे : https://www.presidency.ucsb.edu/documents/executive-order-13848-imposing...
हा अहवाल सदर करायची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे. यांत परकीय हस्तक्षेपाचे पुरावे असणार. त्यानुसार ट्रंप सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. ट्रंपतात्यांच्या चमूने खटला दाखल केलेला आहेच (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Post-election_lawsuits_related_to_the_2020... ). अशा वेळेस निवडणुकीत परकीय हस्तक्षेप उघड झाला तर तिचे निकाल रद्दबातल ठरणार आहेत. असं झाल्यास मग सद्य प्रतिनिधीगृहाचे ( = House of Representatives ) सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडतात आणि सिनेटचे सदस्य उपराष्ट्राध्यक्ष निवडतात. प्रतिनिधीगृह सिनेटपेक्षा वरच्या दर्जाचं मानलं जातं. आता प्रतिनिधीगृहाची रचना अशी आहे की प्रत्येक राज्यास एक सदस्य म्हणजे एक मत उपलब्ध आहे. या गृहात ट्रंप यांचं प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे रद्द निवडणुकीद्वारे ट्रंप घटनादत्त मार्गाने परत राष्ट्राध्यक्ष बनू शकतात.
x----------x----------x
लेख त्रोटक व विस्कळीत आहे, हे मान्य. एक गोष्ट लक्षात आली म्हणून जरा घाईघाईत लिहिलंय. लिहिण्यामागे कारण काय ते सांगतो. भारतीयांनी ट्रंप यांना पाठींबा द्यावा हा मुख्य हेतू आहे. ट्रंप परत अध्यक्षपदी बसले तर बोल्शेविकांना चांगलाच दणका बसेल. रशियात १९१८ साली झारची हत्या करून सर्वत्र अराजक माजवून बोल्शेविक सत्तेत आले. तोच प्रकार त्यांना अमेरिकेत करायचा आहे. सोव्हियेत क्रांती हे थोतांड आहे हे वेगळे सांगणे नलगे. बोल्शेविक जर अमेरिकेत जनतेला फाट्यावर मारून सत्तेत आले तर त्यांचं धार्ष्ट्य वाढेल. मग भारतातही ते उचल खातील. नक्षली हे भारतीय बोल्शेविक आहेत. ते फुकटचे माजतील. त्यांची भारतातली मस्ती आटोक्यात आणायची असेल तर अमेरिकेतच त्यांना बांबू लागलेला बरा, नाहीका? वेळच्या वेळी भारतीय जनतेच्या ऐक्याची चुणूक दाखवायला हवी.
चर्चा सुरू करूया.
आपला नम्र,
-गामा पैलवान
प्रतिक्रिया
13 Nov 2024 - 12:20 am | नठ्यारा
कॉमी,
archive.org हे नाव ऐकलं असेल तुम्ही. या ठिकाणी अनेक संकेतस्थळांची जुनी पाने मिळतात. इथे दुवा दिलेलं २०२० चं पान आता दिसंत नाही. त्याचं २०२४ च्या विद्यात अद्यतन झालेलं आहे. म्हणून archive.org वरचा जुना दुवा दिलेला आहे. ते पान २०२० नंतर २०२३ साली अद्यतन झालेलं आहे. त्यामुळे २०२० सालच्या वेळेच्या निवडणुकांचा विदा तसाच आहे. फक्त तत्कालीन ( म्हणजे २०२३ सालच्या ) लोकसंख्येचे आकडे बदलले आहेत. हे बदललेले आकडे माझ्या कामाचे नाहीत. माझे २०२० चे आकडे तसेच आहेत.
तर मग २०२० साली नोंदणीकृत मतदार किती? २१.४६ कोटी की २४ कोटी ?
आ.न.,
-ना.न.
13 Nov 2024 - 12:53 am | कॉमी
हे तुम्ही शोधा. व्होटर टरनौट किती टक्के होता हा वादाचा विषय नाहीये. तुमचा नोंदणीकृत मतदारांपेक्षा मते जास्त पडली हा दावा निखालस खोटा ठरला आहे आणि आता उगाच इतर मुद्द्यावार काथ्याकूट करत आहात. इतका मोठा दावा खोटा ठरला ह्यावर एकही वाक्य नाही!
12 Nov 2024 - 7:00 pm | नठ्यारा
२०२० निवडणुकीच्या निकालपत्राचा दुवा असा आहे : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections2020...
वर चुकून चुकीचा दिला होता.
-नाठाळ नठ्या
14 Nov 2024 - 2:26 am | नठ्यारा
कॉमी,
हे तुम्ही शोधा. व्होटर टरनौट किती टक्के होता हा वादाचा विषय नाहीये. तुमचा नोंदणीकृत मतदारांपेक्षा मते जास्त पडली हा दावा निखालस खोटा ठरला आहे आणि आता उगाच इतर मुद्द्यावार काथ्याकूट करत आहात. इतका मोठा दावा खोटा ठरला ह्यावर एकही वाक्य नाही!
नोंदणीकृत मतदारांपेक्षा मते जास्त पडली हा दावा मी कुठेही केलेला नाहीये.
याचं कारण असं की हा दावा करण्यासाठी नोंदणीकृत मतदारांचा अचूक आकडा उपलब्ध असणं जरुरीचं आहे. नेमका तोच तर आकडा गायब आहे. दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी हाच प्रश्न मी केला होता. आज तब्बल ४ वर्षांनंतर तोच प्रश्न परत करतोय. अमेरिकेत २०२० साली नोंदलेले मतदार किती होते?
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
14 Nov 2024 - 8:51 am | कॉमी
नोंदणीकृत मतदारांपेक्षा मते जास्त पडली हा दावा मी कुठेही केलेला नाहीये.
14 Nov 2024 - 2:35 pm | नठ्यारा
ती नजरचूक आहे. एकूण मतदारांची संख्या किती, असा प्रश्न हवा होता. चुकीबद्दल क्षमा असावी. माझा आजचा प्रश्न परत सांगतो :
२०२० च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत किती मतदार नोंदणी झाली? साडेएकवीस कोटी की चोवीस कोटी?
-नाठाळ नठ्या
14 Nov 2024 - 2:55 pm | कॉमी
नजरचूक :)
गोलपोस्ट बदलली म्हणा की सरळ
14 Nov 2024 - 2:59 pm | कॉमी
वाळूप्रमाणे गोलपोस्ट बदलत, चूक सिद्ध झाली तरी माझा mudda वेगळाच होता असे म्हणून निरर्थक काथ्याकूट करणार असाल तर मला रस नाही. चर्चा प्रामाणिक माणसाशी करण्यात अर्थ. तुम्ही जर तुम्ही आधी मांडलेले मुद्दे खोटे पडल्यावर ते मान्य न करता इतर मुद्द्यावार उडी मारणार असाल तर माझ्याकडून विराम.
14 Nov 2024 - 3:04 pm | कॉमी
त्या मुद्द्यावर फारेंड ह्यांनी उत्तर दिलेच आहे तरी अजून तेच चऱ्हाट वळायचे चालू आहे.
14 Nov 2024 - 8:08 pm | नठ्यारा
कॉमी,
मतदारयादीत किती मतदार आहेत ते अगोदर धडपणे कळायला हवं ना? त्याशिवाय कुठलाही दावा केला तर तो अधांतरीच राहणार. ती उजाडती बातमी ( emerging news ) होती. परिस्थिती भराभर बदलंत असते. दर खेपेस नव्याने प्रश्न विचारावे लागतात. माझ्याकडून प्रश्न रचण्यात चूक झाली. याचा अर्थ माझं बोट वाकडं आहे. वक्रांगुलीनिर्दिष्ट चंद्र बघायचा कोणी ?
तर, माझा २०२० च्या अखेरीस आणि चार वर्षानंतर आजही एकंच प्रश्न आहे. २०२० साली अमेरिकेत मतदार किती होते. साडेएकवीस कोटी की चोवीस कोटी ?
वॉशिंगटन पोस्ट म्हणंत होते ६६ % लोकांनी मतदान केलं. एकूण मतसंख्या १६ कोटी आहे. तर मग मतदारयादीत नोंदलेले मतदार किती ? त्रैराशिक मांडतो :
१६ कोटी : ६६ % :: किती कोटी : १०० %
किती कोटी = २४ कोटी येतात.
हा २४ कोटींचा आकडा राज्यनिहाय बेरजेशी जुळंत नाही. राज्यनिहाय बेरीज अवघी २१.५ कोटी आहे. नोंदणी नसलेले मतदार लोकशाही प्रक्रियेच्या बाहेरचे आहेत. त्यांचा इथे विचार करायची गरज नाही.
वॉशिंगटन पोस्टने ६६ % हा आकडा कुठून पैदा केला ? त्यांना कोणीही काहीही विचारीत नाही.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या
14 Nov 2024 - 10:38 pm | कॉमी
तिथे स्पष्टपणे voting eligible असे लिहिले आहे. अवघड आहे राव. इतके तरी वाचा! सगळे एलीजीबल व्होटर रजिस्टर्ड नसतात.
14 Nov 2024 - 10:52 pm | कॉमी
भारतात १८ वरील लोकं मतदानासाठी पात्र आहेत. पण सगळे रजिस्टर्ड नसतात. त्यामुळे तुम्ही मांडलेल्या त्रयराशीकाची तुलना रजिस्टर्ड मतदार नाही तर एलीजीबल मतदारांशी करायला हवी.
तसेच इथेही टक्केवारी एलीजीबल व्होटर (पात्र मतदारांच्या) अकड्यावर दिली आहे. तिथे स्पष्ट तसे लिहिले ही आहे. तरी तुम्ही तुमचा पोकळ डोलारा उभा केला.
म्हणून म्हणतो नीट वाचत जावा. निम्मे प्रश्न तिथेच सुटतील.
14 Nov 2024 - 11:06 pm | कॉमी
आणि मुळात वॉशिंगटन पोस्टने दिलेल्या टक्केवारीमुळे इलेक्शन खोटी म्हणणे म्हणजे अतारकिक पणाचा कळस आहे. तुम्ही जश्या चुका करता तश्या पेपर वाल्यांच्या पण होऊ शकतात. म्हणूनच ऑफिशियल रिझल्ट येईपर्यंत दम धरायचा. आधीच किंचाळायला सुरु करायचे नाही.
18 Nov 2024 - 11:43 pm | नठ्यारा
कॉमी,
१.
voting eligible चा २४ कोटींचा आकडा कुठनं काढला वॉपोने ? त्यांच्याकडे काही स्पेशल यंत्रणा आहे का? जो २४ कोटींचा आकडा आहे तो अंदाज आहे : https://en.wikipedia.org/wiki/Voter_turnout_in_United_States_presidentia...
२.
अधिकृत आकडेवारी येईस्तोवर २ वर्षे जातात. तोवर नवा राष्ट्राध्यक्ष रुजू होऊन नवी राजवट भक्कम झालेली असते.
३. मतदारांचे संशयास्पद आकडे हे घोटाळ्यांचे केवळ एक अंग आहे. सिडनी पॉवेलचं बाड वाचलं की इतर अंगेही दिसून येतात. पीटर नावारो यांचा immaculate deception नामे अहवाल वाचला की अजून मुद्दे समोर येतात. ते वाचणार कोण इतकाच प्रश्न आहे.
आ.न.,
-ना.न.
19 Nov 2024 - 8:58 am | कॉमी
त्यांची काय यंत्रणा नसेल. ते आर्टिकल पूर्ण वाचा त्यात सोर्स असण्याची शक्यता आहे. जनरली पेपरवाले आपले सोर्स देतात.
सिडणी पोवेल वैगेरे विनोद तर करूच नका. खुद्द ट्रम्प कॅम्पेन तिला खुळी समजतं.
तुम्ही वाचा आणि सोर्स सकट लिहा. आपण करू चिरफाड. किंवा थोडी शोधाशोध करून तुम्हीच क्रिटिकली बघा.
20 Nov 2024 - 10:39 pm | नठ्यारा
कॉमी,
सिडनी पॉवेल विदूषक असेल. पण आपण तिनं संकलित केलेल्या बाडाविषयी बोलंत आहोत. तिच्याविषयी नाही.
आ.न.,
-ना.न.
20 Nov 2024 - 11:37 am | चंद्रसूर्यकुमार
आ.न नठ्यारा,
आता २०२४ चा निकाल आला आहे ना? ट्रम्पतात्या जिंकले आहेत ना- अगदी पॉप्युलर व्होटही जिंकले आहेत ना? मग द्या ना सोडून भूतकाळात काय झाले ते. २०२० मध्ये तात्या जिंकले असते तर आताची निवडणुक लढवूही शकले नसते. त्यापेक्षा ते जानेवारी २०२९ पर्यंत अध्यक्ष राहणार आहेत ना हे बरे आहे ना? द्या की सोडून मग.
आ.न चंसूकु
20 Nov 2024 - 10:38 pm | नठ्यारा
चंद्रसूर्यकुमार,
अहो काय सांगायचं आता. माझी आस्था भारतीय निवडणुकांपुरतीच मर्यादित आहे. हे लेखातंच स्पष्ट केलंय. अमेरिकेशी काही सोयरसुतक नाही. पण काये की अमेरिकन एक्सेप्शन जे आहे ना त्याच्या चिंधड्या उडवायला मजा येते.
आपला नम्र,
-नाठाळ नठ्या