Skip to main content

बोल्शेविक अमेरिका बळकावताहेत

लेखक गामा पैलवान यांनी सोमवार, 14/12/2020 03:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, नुकत्याच नोव्हेंबर २०२० मध्ये पार पडलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रंप भरघोस मतांनी निवडून आले आहेत. मात्र जो बिडेन यांच्या नावावर खोटी मतं मोजली गेल्याने त्यांना विजय मिळाल्याचं मानलं जातंय. ही मतमोजणी इलेक्ट्रॉनिक होती. डॉमिनियन नामक कंपनीने ही मतदान यंत्रे बनवली. ही यंत्रे विश्वासार्ह नाहीत असं बरेच जण म्हणतात. भरीस भर म्हणून टपालमतांचा घोटाळा आहेच. निवडणुकीत घोटाळे झाल्याचे असंख्य पुरावे आहेत. निवडणुकीपूर्वी प्रकाशित झालेला एक लेख सापडला : https://www.forbes.com/sites/chuckdevore/2020/09/25/election-fraud-in-a… सांगायचा मुद्दा असा की ट्रंप भरगोस मतांनी विजयी झालेले असूनही बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. असा प्रकार पूर्वी २००० साली लहान प्रमाणावर घडला होता. त्यावेळेस बावळट बुश विरुद्ध अल गोर अशी लढाई होती. अल गोर याच्याकडे अधिक मतसंख्या होती. मात्र अमेरिकेतल्या नियमानुसार ज्या राज्यात उमेदवाराकडे ५०% हून जास्त मतसंख्या असते त्या राज्याच्या सर्व खासदार जागा विजयी उमेदवारास मिळतात. उदा. : क्यालीफोर्नियाच्या ५५ जागा आहेत. तर तिथे विजयी होणाऱ्या उमेदवारास सर्व ५५ जागा मिळतात. तशाच इतर ४९ राज्यांतल्या जागा त्या त्या विजयी उमेदवारास मिळतात. अशा रीतीने जो उमेदवार जास्त खासदार पैदा करेल तो विजयी धरला जातो. जनतेकडून मिळालेल्या प्रत्यक्ष मतांची संख्या पराभूत उमेदवारापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. साधारणत: ज्या उमेदवारास जनतेकडून जास्त मतं मिळतात त्याचे खासदारही जास्त निवडून येतात. पण २००० साली परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस झाम्या बुशला अल गोर पेक्षा कमी जनतामतं मिळाली होती. पण दोघांच्या खासदार जागा तुल्यबळ होत्या. फक्त फ्लोरिडाचा निकाल यायचा बाकी होता. तिथल्या जागा ज्याला मिळतील तो राष्ट्राध्यक्ष होणार होता. तेव्हा फेरमोजणी झाली होती. तिच्यात घोटाळे करून झाम्याला विजयी घोषित करण्यात आलं. अल गोर ने जास्त खळखळ न करता निमूटपणे पराभव स्वीकारला. मात्र ट्रंप असा सहजासहजी ऐकणारा नाही. ट्रंपतात्यांना हा निवडणुका चोरण्याचा प्रकार ठाऊक होता. त्यांनी २०१८ साली १३८४८ क्रमांकाचा एक वटहुकूम ( = अध्यादेश = executive order ) पारित करून घेतला. त्यानुसार जर अमेरिकी निवडणुकीत परकीय हस्तक्षेप झाला असेल तर त्यास मदत करणाऱ्या व्यक्तींची व संस्थांची मालमत्ता व पैसे जप्त करता येतात. हा हस्तक्षेपाच अहवाल निकाल लागल्यापासून ४५ दिवसांत गुप्तचरखात्याच्या प्रमुखाने तत्कालीन अध्यक्षास ( = ट्रंप ) सादर करायचा असतो. याचे संयुक्त सादरकर्ते अटर्नी जनरल ( विलियम बार ) व राष्ट्रीय गुप्तचर प्रमुख (जॉन रॅटक्लिफ) हे आहेत. हे दोघेही ट्रंपने नेमलेले आहेत. या वटहुकूमाची (कंटाळवाणी व लांबलचक ) प्रत इथे आहे : https://www.presidency.ucsb.edu/documents/executive-order-13848-imposin… हा अहवाल सदर करायची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे. यांत परकीय हस्तक्षेपाचे पुरावे असणार. त्यानुसार ट्रंप सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात. ट्रंपतात्यांच्या चमूने खटला दाखल केलेला आहेच (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Post-election_lawsuits_related_to_the_202… ). अशा वेळेस निवडणुकीत परकीय हस्तक्षेप उघड झाला तर तिचे निकाल रद्दबातल ठरणार आहेत. असं झाल्यास मग सद्य प्रतिनिधीगृहाचे ( = House of Representatives ) सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडतात आणि सिनेटचे सदस्य उपराष्ट्राध्यक्ष निवडतात. प्रतिनिधीगृह सिनेटपेक्षा वरच्या दर्जाचं मानलं जातं. आता प्रतिनिधीगृहाची रचना अशी आहे की प्रत्येक राज्यास एक सदस्य म्हणजे एक मत उपलब्ध आहे. या गृहात ट्रंप यांचं प्रचंड बहुमत आहे. त्यामुळे रद्द निवडणुकीद्वारे ट्रंप घटनादत्त मार्गाने परत राष्ट्राध्यक्ष बनू शकतात. x----------x----------x लेख त्रोटक व विस्कळीत आहे, हे मान्य. एक गोष्ट लक्षात आली म्हणून जरा घाईघाईत लिहिलंय. लिहिण्यामागे कारण काय ते सांगतो. भारतीयांनी ट्रंप यांना पाठींबा द्यावा हा मुख्य हेतू आहे. ट्रंप परत अध्यक्षपदी बसले तर बोल्शेविकांना चांगलाच दणका बसेल. रशियात १९१८ साली झारची हत्या करून सर्वत्र अराजक माजवून बोल्शेविक सत्तेत आले. तोच प्रकार त्यांना अमेरिकेत करायचा आहे. सोव्हियेत क्रांती हे थोतांड आहे हे वेगळे सांगणे नलगे. बोल्शेविक जर अमेरिकेत जनतेला फाट्यावर मारून सत्तेत आले तर त्यांचं धार्ष्ट्य वाढेल. मग भारतातही ते उचल खातील. नक्षली हे भारतीय बोल्शेविक आहेत. ते फुकटचे माजतील. त्यांची भारतातली मस्ती आटोक्यात आणायची असेल तर अमेरिकेतच त्यांना बांबू लागलेला बरा, नाहीका? वेळच्या वेळी भारतीय जनतेच्या ऐक्याची चुणूक दाखवायला हवी. चर्चा सुरू करूया. आपला नम्र, -गामा पैलवान

वाचने 83600
प्रतिक्रिया 168

प्रतिक्रिया

लोकहो, हे शासकीय सत्ताहरण अर्थात coup de etas [ उच्चार : कू(व) द एता(ह) ] आहे हे वेगळे सांगणे नलगे. याची परिणती म्हणून ट्रंपवर २६ जानेवारीस (२०२१) हल्ला झाला म्हणे : https://realrawnews.com/2021/01/trump-assasination-foiled-deep-state-in… तात्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा (बायको, मुलं, जावई, इत्यादि ) जीव धोक्यात आहे. कदाचित माजी पत्न्यांचा जीवही धोक्यात असू शकतो. रशियाच्या झारला जसा एकता गाठून संपवला तसंच ट्रंप यांना संपवायचा बेत दिसतो आहे. ट्रंपना हे कळंत नाही का? माझ्या मते ट्रंपतात्यांनी सत्ता सोडावयास नको होती. घटना फार वेगाने घडताहेत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जगावर साम्यवादी सत्ता प्रस्थापित झालेली आहे. यात आता संशय उरलेला नाही. युझफुल इडियट्स चा वापर करून त्यांनी अमेरिकेत व्यवस्थित बस्तान बसवले आहे. कॅनडा पण साम्यवादी आहे. द. अमेरिकेत बहुतेक देश अमेरिकेची रि ओढतील तेव्हा तेथे ही खोटी लोकशाही असणार आहे. साम्यवादी देशांना सदैव एकच आणि फक्त त्यांचीच सत्ता असल्याचा संपूर्ण फायदा मिळतो. आणि आता लोकशाही देशातील अनेक पक्षांशी त्यांनी करार केल्यामुळे त्यांना आपल्या फायद्याच्या पोलिसिज चालवणे सोपे जाते. एखादा ट्रंप आला तरी त्याला टोलवता येते. मोदी आला तरी त्याला सतत राजकारणात गुंतवून खेळवता येते. त्यांना सतत सत्तेवर राहणे सहज जमू शकते. कारण मदरशिप नेशन म्हणजे मुळ साम्यवादी देश अत्यंत बलिष्ठ होऊन बसला आहे. तेथून हवा तेव्हढा पैसा पुरवता येतो. आणि मग ट्रंप किंवा मोदी यांना काढले गेले की परत तोच पैसा साम्यवादी देशात वळवता येतो. माध्यम खेळ आता ट्रंप गेला आणि अमेरिकन कोव्हिडच्या बातम्या माध्यमातून नाहीश्या झाल्या आहेत. आता अमेरिका अचानक हेल्दी झाली का? आता संसर्ग अचानक गेला का? तर नाही. पण त्याची उग्रता माध्यमे दाखवत होते ती नाही. म्हणजे हा एक मायावी खेळ होता - असे असू शकेल का? अमेरिकेतून ट्रंप गेला. तेथे आता साम्यवादी सरकार आले आहे. त्यामुळे आता अमेरिका कशी आक्रमक आणि युद्धखोर आहे वगैरे रंगवणे बंद झाले आहे. पुढील योजना काय असेल? या साम्यवाद्यांची आता पुढील निशाणे आहेत - भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान. येथे साम्यवादाला अनुकूल सरकारे नाहीत. त्यामुळे तेथे - तुमचे सरकार कसे वाईट चालले आहे - हे माध्यमातून सांगणे रंगवणे सुरू राहील.

In reply to by निनाद

निनाद, तुमच्या वरील संदेशाशी सहमत आहे. साम्यवाद्यांचे अमेरिकेत बऱ्यापैकी बस्तान बसले आहे. पण आजून नागरिकांकडे हत्यारे आहेतंच. सध्या अमेरिकी नागरिक अधिकाधिक हत्यारे खरेदी करताहेत ( संदर्भ : https://www.reuters.com/article/usa-guns-insight-idUSKBN2701HP ). त्यामुळे अमेरिकी साम्यवाद्यांसाठी सगळं काही आलबेल नाही. मात्र असं असलं तरीही ट्रंप गेल्यावर पुतीन व मोदी पुढील मोठी लक्ष्ये आहेत हे नक्की. सध्याचं 'शेतकरी' आंदोलन हे मोदींना हटवायलाच चालू आहे. पण मोदीही काही कच्च्या गुरूंचे चेले नाहीत. त्यांनी शशी थरूर यांच्यावर गुन्हा दाखल करून आपणही कडक धोरण स्वीकारू शकतो हे दाखवून दिलं. थरूर यांनी संयुक्त राष्ट्रसंघात उच्चपद भूषवलं आहे. अशा लोकांवर त्यांच्या मायदेशात सहसा गुन्हे वगैरे दाखल होत नसतात. किंवा झाले तरी किरकोळात दाखल होतात. नेमका हाच नेम साधून मोदींनी आपण युनोची फारशी पत्रास बाळगंत नाही हे दाखवून दिलंय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मात्र असं असलं तरीही ट्रंप गेल्यावर पुतीन व मोदी पुढील मोठी लक्ष्ये आहेत हे नक्की. पुतिन यांच्या विषयी असहमत! पुतिन यांना चीन लेखी काही किंमत नसावी. त्यांच्या कडे तेव्हढा पैसा ही नाही आणि सत्ता पण तशी नाही / नसावी. रशिया हा अता फक्य चीन चा एक कुत्रा म्हणून शिल्लक उरला असावा. साम्यवादी चळवळीचे संपुर्ण निर्णय चीन मधून होत आहेत. बिदेनच्या रूपाने ओबामाच्या वेळी होती तशी आता अमेरिकेवर साम्यवादी सत्ता काबीज होत असेल, झाली असेल तर चीनचे राजकारणी महत्त्व कमी होऊ शकेल. पन आर्थिक राखले जाईल. पण ऑस्ट्रेलिया, ब्रिटनच्या पंतप्रधानांसह मोदी हे मात्र साम्यवाद्यांना अतिशय खुपत आहेत या संशय नाही. आणि मोदी कोणत्याही चीनी करातात अडकत नाहीत, तसेच बोलणी पण करत नाहीत. त्यामुळे त्यांचा त्रास अधिक आहे. पण मोदींनी अजून आक्रामक भूमिका घेणे आवश्यक आहे असे वाटते. उदा. ट्रंप असे पर्यंत
  1. बलुचिस्थान वेगळा व्हायला हवा होता.
  2. सिंधुदेश भारताशी जोडला जायला हवा होता.
  3. पाकचे संपूर्ण विघटन करणे हे अत्यंत आवश्यक कार्य मोदी करतांना दिसत नाहीत.
त्यामुळे ते नक्की काय खेळी करत आहेत हे समजत नाही. तसेच भारतातून साम्यवाद्यांचे संपूर्ण उच्चाटन त्यांच्या इकोसिस्टिम सहीत अत्यंत आवश्यक आहे. त्यांची मुळे कापून त्यांना संपवणे - हे ही करतांना मोदी दिसत नाहीत. या सर्वाचा मला अचंबा वाटतो.

In reply to by निनाद

निनाद, प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! मला रशिया हा चीनचा अंकित वाटंत नाही. कारण की चीनची ऊर्जाभूक प्रचंड आहे, तर रशिया ऊर्जा व तेल मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. पुतीन अगदी देवदूत नसला तरी त्याने युक्रेनात माजली तशी अनागोंदी टाळली. आजच्या घडीला ही मोठी जमेची बाजू आहे. बाकी, पाकिस्तानाविषयी तुम्ही काढलेले मुद्दे योग्य आहेत. सराईत फलंदाज ताबडतोब धुलाई न करता गोलंदाज दमेस्तोवर धीर धरतो. त्याप्रमाणे चीन दमला की मोदी फटकेबाजीस सुरुवात करतील असा माझा अंदाज आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by निनाद

रशिया च दबदबा आज पण जगात आहे मोदी आणि पुतीन ची तुलना पण होवू शकत नाही. काही लाख लोकसंख्या असलेल्या कतार पण मोदी la पूर्ण शरणागती पत्करायला लावली. आणि मोदी म्हणजे भारत नव्हे मोदी पंत प्रधान असतील पण ते भारताचे प्रतिनिधी नाहीत.. भारताचे स्वतःचे वेगळे सामर्थ आहे त्याच्या शी मोदी चा काही संबंध नाही.

In reply to by sunil kachure

कचरे बुवा श्री मोदी आपल्याबरोबर गोट्या खेळत नसत तेंव्हा देशाचे लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून त्यांना आपण अरे तुरे करावे अशी आपली लायकी नाही. किमान सभ्यतेचे संकेत तरी पाळा

लोकहो, या अमेरिकी अपघातातनं भारतासाठी एक गोष्ट चांगली झाली. अमेरिकेची वट उणावल्यामुळे एक प्रकारची सत्तापोकळी उत्पन्न झाली आहे. अनेक देश भारताकडे डोळे लावून बसले आहेत. मोदी सोंगट्या हलवण्यात मग्न आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अचानकपणे भारताच्या दौऱ्यावर यायचं म्हणताहेत. बातमी : https://navbharattimes.indiatimes.com/india/xi-jinping-may-attend-brics… भूदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे म्हणताहेत की आम्ही जसे ठेवू, तसे चीनशी संबंध असतील. बातमी : https://hindi.news18.com/news/nation/our-relations-with-china-would-dev… अमेरिकेची पत खालावाल्याची ही चिन्हे आहेत. आ.न., -गा.पै.

लोकहो, धूपछाव हजामखाना म्हणजे अमेरिकी सुप्रीम कोर्टाने सिडनी पॉवेल यांचा अर्ज काहीही भाष्य न करता व कसलंही कारण न देता फेटाळला आहे. अर्जामध्ये पेनसिल्व्हेनिया येथे घडलेल्या निवडणूक गैरप्रकारांच्या विरोधात दाद मागितली होती. हजामखान्याने अर्ज विचारात घेतलाच नाही. आता परिस्थिती अशी आहे की पेनसिल्व्हेनियात टपाली मतं नोंदवण्याचा कायदा पारित केला होता खरा, पण तो विधिमंडळाने नसून राज्य न्यायालयाने केलेला होता. या बदललेल्या कायद्याच्या आधारे बोगस मतदान घडवून बिडेन यांना विजयी घोषित करण्यात आलं. याला कोर्टाची मनमानी का म्हणू नये? अमेरिकी जनतेला विचारतो कोण ! आ.न., -गा.पै.

डॉमिनियन (मतदान यंत्र निर्माती कंपनी) मशिन्सने सिडनी पॉवेल वर मानहानीचा खटला भरला. तर ह्यावर उत्तरादाखल सिडनी पॉवेल म्हणते, "कोणताही विचार करणारा माणूस मी म्हणत होते ते तथ्याचे दावे होते असे मानणार नाही." (No reasonable person would conclude those were truly statements of fact.) ऐकणारे लोकं रिजनेबल नव्हते वाटतं ! ते बिचारे फॅक्ट मानून बसले. Stop the steal conspiracy theorists take COWARDS way out

In reply to by शा वि कु

शा वि कु, उपरोक्त विधान सिडनी पॉवेल यांचं नसून त्यांच्या वकीलाचं आहे. संदर्भ : https://www.theguardian.com/us-news/2021/mar/23/sidney-powell-trump-ele… तसंही पाहता अमेरिकी न्यायालय यंत्रणेने स्वत:हून कायदे निर्माण करून लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर आक्रमण केलंय. तर मग या मोकाट यंत्रणेस सिडनी पॉवेल वर खटला चालवायचा काय अधिकार आहे ? आ.न., -गा.पै.

रिपब्लिकन पक्षाने नेमलेल्या चौकशी समितीसमोर विस्कॉन्सिनात ५०००० खोटी मतं नोंदीत झाल्याचं प्रतिज्ञापत्र दाखल झालं आहे. दाखलकर्ता विदासंश्लेषक असून त्याचं नाव पीटर बर्नेगर आहे. अधिक माहितीसाठी इंग्रजी दुवा : https://sputniknews.com/20220213/wisconsin-50000-phantom-votes-cast-in-… विस्कॉन्सिनात बिडेन फक्त २०००० मतांनी विजयी झाला आहे. या घोटाळयाचं विशाल रूप हळूहळू बाहेर येत आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

सहज शोधलं तर हा दावा अमेरिकेतल्या एकाही नावाजलेल्या वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर आढळला नाही. याची विश्वसनीयता संशयास्पद आहे. मी या धाग्यावर पूर्वीही लिहिलंय की भारतीय नागरिकांनंतर मिपावर सर्वाधिक संख्येने अमेरिकन नागरिक आहेत. ते अमेरिकेच्या विविध भागांत विखुरलेले आहेत. आजवर एकानेही या धाग्यातल्या दाव्यांचे समर्थन केलेले नाही. धागा वर आलाच आहे तर अ‍ॅरिझोनात गेल्या वर्षी झालेल्या मते पूनर्मोजणी संबंधी बातमीचे दुवे देतो.

In reply to by श्रीरंग_जोशी

पैलवानांनी दिलेल्या धाग्याचे नाव पण

"स्फुटनिक न्यूज"

आहे काय हो श्रीरंग दादा तुम्ही अमेरिकन अन रशियन मिळून आमच्या भोळ्याभाबड्या पैलवान दादांचा मामु करताय का काय म्हणे मी ;)

In reply to by जेम्स वांड

स्पुतनिक न्युज बाबत शोधले असता खालील माहिती मिळाली. स्रोत: मिडीया बायस फॅक्ट चेक.
  • Reasoning: Russian Propaganda, Conspiracy, Lack of Transparency, Some Fake News
  • Bias Rating: RIGHT-CENTER
  • Factual Reporting: VERY LOW
  • Country: Russia (149/180 Press Freedom)
  • Media Type: News Agency
  • Traffic/Popularity: High Traffic
  • MBFC Credibility Rating: LOW CREDIBILITY
Funded by/Ownership Sputnik is owned and funded by the Russian Government to promote Russia’s image abroad. The Sputnik news service produces over 1,500 news items daily and around the clock.
काय हो श्रीरंग दादा तुम्ही अमेरिकन अन रशियन मिळून आमच्या भोळ्याभाबड्या पैलवान दादांचा मामु करताय का काय म्हणे मी ;)
मी अमेरिकेत राहणारा भारतीयच आहे :-). बाकी मामु हा उल्लेख वाचला की माझ्या नजरेसमोर आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रभाऊच येतात ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

ऑ, चक्क बोल्शेविकांच्या घरातला न्यूज सोर्स आहे की.

श्रीरंग_जोशी,
Sputnik is owned and funded by the Russian Government to promote Russia’s image abroad.
तुम्ही म्हणता की कुठल्याही नावाजलेल्या अमेरिकी वृत्तपत्राने काहीही लिहिलं नाही. हीच तर समस्या आहे. नेमक्या याच कारणासाठी मला रशियाच्या मुखपत्राचा आधार घ्यावा लागतो. अमेरिकी वृत्तपत्रांची का दातखिळी बसलीये? बाकी, राष्ट्रीय स्तरावर बिडेन व ट्रंप यांना एकूण किती मतं मिळाली हा आकडा आजूनही प्रकाशित झालेला नाहीये. तो का होत नाहीये? अरिझोना परीक्षणानंतर सखोल तपासणीची गरज असल्याचं हे निरीक्षण नोंदवलं गेलं : On October 8, the county Elections Department and Recorder's office released a preliminary "top line" analysis of the auditor's report, finding it repeatedly made faulty claims. The preliminary analysis was to be followed by a deeper analysis. याचा अर्थ कुठेतरी घोटाळा आहे. आ.न., -गा.पै.

लोकहो, श्री. पीटर नावारो यांना हातकड्या घालून अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कुठल्याशा उपस्थिती आज्ञा डावलल्याचा आरोप आहे. या अज्ञ न्यायालयाच्या नसून काँग्रेसच्या होत्या. त्या असंसदीय असल्याचं श्री. नावारो यांचं म्हणणं आहे. खरं कारण नावारोंनी प्रकाशित केलेला २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीतल्या घोटाळ्यावरचा अहवाल हे आहे. त्या अहवालाचं शीर्षक The Immaculate Deception असून तो इथे वाचता येईल : https://www.docdroid.net/QhVNwFw/the-immaculate-deception-121520-1-pdf चोर सोडून संन्याशास सुळी! ४० खटल्यांची गाढवं भादरीत बसलेल्या न्यायपालिकेकडून न्यायाची अपेक्षा शून्य. आ.न., -गा.पै.

श्री ट्रंप यांच्यावर खुप अन्याय झाला आहे. माहितीसाठी धन्यवाद. मराठी संकेतस्थळावर हि चर्चा पाहुन मानुसकी अजुन जागी आहे असे वाटते.

लोकहो, कदाचित ( ट्रंपतात्यांच्या ) माजी पत्न्यांचा जीवही धोक्यात असू शकतो ही यापूर्वी वर्तवलेली भीती खरी ठरली ! :-( दिनांक १४ जुलै २०२२ रोजी ट्रंपतात्यांच्या द्वितीय पत्नी व इव्हांका ट्रंप यांच्या मातोश्री इव्हाना ट्रंप या त्यांच्या न्यूयोर्कच्या घरी जिन्यावरनं गडगडत खाली पडून मृत झाल्या. धडास झालेल्या बोथट आघातापायी मृत्यू असं अमेरिकी माध्यमांनी वर्णन केलं आहे. त्यांची एकंदर प्रकृती पाहता त्या अशा रीतीने पडून मृत होणाऱ्यांतल्या वाटंत नाहीत. हा खरोखरीच अपघात आहे का? आ.न., -गा.पै.

In reply to by कॉमी

कॉमी, बाई प्रकृतीने ठणठणीत व तुडतुड्या होत्या. त्यांना जिन्याच्या वरच्या टोकावर वा जवळपास उभ्या असतांना नेमकी भोवळ यावी हे कितपत खरं मानावं? की जिन्यावरनं पडण्यआधीच त्यांचा जीव गेला होता ....? पण घरात तर त्या एकट्याच होत्या. आणि भोवळ कशाने आली? कुठल्या अवयवात काहीबाही रक्तस्राव वगैरे, काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या अचानक मृत्यूबाबत असे अनेक प्रश्न उद्भवतात. इथे इंग्लंडात वयस्कर माणसं सहसा वरखाली जिनेवाल्या घरांत रहात नाहीत. ते फ्लॅट वा बंगलो येथे राहतात. या दोन्ही वास्तू एकतल ( सिंगल फ्लोअर ) आहेत. अमेरिकेत अशी काही काळजी बहुधा घेत नसावेत. जे आहे ते असं आहे. आ.न., -गा.पै.

इव्हाना ट्रम्प यांची एकंदर चार लग्ने झाली होती आणि त्यापैकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच लग्न दुसरे होते. त्यांच्या बरोबर झालेल्या घटस्फोटा नंतर (१९९२) त्यांचे इतर मित्र होते तसेच त्यांनी दोन वेळेस परत लग्न हि केले होते ज्यातून त्यांचे परत घटस्फोट झाले होते आणि परत प्रेम संबंध हि होते. आता अशा स्थितीत केवळ ट्रम्प यांची माजी पत्नी म्हणून घातपात करून त्यांना मारले हे जरा अतिरंजित वाटते आहे. बाकी कोणत्याही गोष्टीत षडयंत्र असते असे मानणारे लोक जगात काही कमी नाहीत.

In reply to by सुबोध खरे

आवो खरेसायेब, त्ये समदं ट्रंपूतात्यांना अन तेंच्या लेकीला बरीक वायलं ( वेगळं ) दिसत आसनार बगा. तुमीआमी मस्त राहू निवांत. आ.न., -गा.पै.

In reply to by सुबोध खरे

कोणत्याही गोष्टीत षडयंत्र असते असे मानणारे लोक जगात काही कमी नाहीत. +१ / बाडीस / बुल्ल्स आय

In reply to by सुबोध खरे

तेच कि. खुद्द ट्रम्पला सोडून त्याच्या एक्स वाईफला कशाला कोण मारायला जाईल ? उगाच काहीही फुसक्या सोडायच्या. ट्रम्पचे एक भारी आहे. त्याला तोंडाने काहीही बोलावे लागत नाही. त्याचे लॉयल फॉलोवर्स स्वतःच मनाने ट्रम्पबद्दल भव्यदिव्य गोष्टी/त्याच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय,शैतानी, बोल्शेविक कटकारस्थान झाल्याच्या ष्टोऱ्या बनवतात.

In reply to by कॉमी

कॉमी, कॉम्रेड स्टालिन चार दिवस कोमात जाऊन न तडफडता मेला. त्याला मरतांना बघणारे दशको ( शेकडो नसले तरी ) लोकं होते. तरीपण त्याच्या मृत्यूनंतर शंकाकुशंका उठल्याच. विषबाधेसंबंधी इथे एक आहे ( इंग्रजी दुवा ) : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4524003/ तर मग इव्हानाबाईंना मरतांना बघणारं कुणीही नसतांना लोकांनी शवचिकीत्सकावर विश्वास ठेवावा का? लोकांनी ठेवावा इतपत ठीके. पण खुद्द तात्या आणि इव्हांका ठेवतील का? ते दोघं या मृत्यूकडे वेगळ्या नजरेनेच पाहणार. यालाच खबरदारी घेणं असं म्हणतात. पटलं तर घ्या नायतर द्या सोडून. हा.का.ना.का. आ.न., -गा.पै.

गामाजी तुम्ही किंग्समन ३ पाहीला का? त्यात रासपुतीनला ठार कसं मारण्यात आलं ते दाखवलंय (सिनेमा फिक्शन आहे पण ऐताहासीक घटना जश्याच्या तश्या ऊचलल्यात.) त्यातील संस्थेसारख्याच एखाद्या संस्थेने सदर कांड केले असावे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

@ अमरेंद्रः किंग्समन ३ कुठे उपलब्ध आहे ? लहानपणी रासपुतीनबद्दल वाचलेले असल्याने मला त्या व्यक्तीबद्दल अजूनही कुतुहल आहे.

In reply to by चित्रगुप्त

कुठं सिनेमे पाहून Rasputin कळतो! . हे वाचा त्यापेक्षा राव तुम्ही , अगदीच संक्षिप्त Rasputin लीलामृत हवे असल्यास हे गाणे ऐकणे

लोकहो, ट्रंपूतात्यांच्या फ्लोरिडातल्या मार-ए-लागो येथल्या निवासस्थानी संघराज्य अन्वेशक यंत्रणेने ( FBI ने ) धाड टाकली आहे. ही अल्पवेळ चालली. संबंधित बातमी : https://www.bbc.com/marathi/international-62473843 या धडीत काहीही हाती लागलं नाही अशी खबर आहे. त्यामुळेच की काय धवलगृहाने ( व्हाईट हाऊस ने ) स्वत:स धाडीपासनं अलिप्त असल्याचं घोषित केलं आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात आहे, ते ओळखा पाहू ! न्यूयॉर्कचे माजी पोलीस आयुक्त बर्नार्ड केरिक यांनी उघडपणे ट्रंप यांच्या हत्येची भीती वर्तवली आहे. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.dailymail.co.uk/news/article-11095219/Former-NYPD-Commissio… दिवसेंदिवस अमेरिका खिळखिळी होत आहे. आ.न., -गा.पै. जाताजाता : इव्हानाबाईंचा मृत्यू अपघात होता की हत्या?

In reply to by कॉमी

कॉमी, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्याच्या मते हा मर्यादाभंग आहे. तुम्ही दिलेल्या लेखातून हे वाक्य उद्धृत करतो :
Republicans blasted the search, with House Minority Leader Kevin McCarthy vowing that if the party takes back the House, "we will conduct immediate oversight of this department, follow the facts and leave no stone unturned." He warned, "Attorney General Garland: preserve your documents and clear your calendar."
आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

रिपब्लिकन नेत्याच्या मते, हा कायदेभंग आहे की नाही हे ते अजून पाहणार आहेत. तुम्ही आजिबात काँटेक्स्ट दिला नव्हता. ट्रम्पच्या घरावर धाड पडली कारण त्याच्याकडे (आणखी) गुप्त कागदपत्रे आहेत असा संशय आहे. संशय घेण्यास कारण राष्ट्रीय माहितीगार (आरकाईव्ह) ने आधीच १५ बॉक्स गुप्त कागदपत्रे ट्राम्पच्या घरातून मिळवली आहेत. मुळात क्लासिफाईड कागदपत्रे बापाचा माल असल्यासारखं स्वतःच्या घरात घेऊन जाण्याचा आगाऊपणा ट्रम्पने केला हे तुम्ही अजिबातच उल्लेखल नाही. सदर धाड आणखी क्लसिफाईफड कागद घरात आहेत अश्या संशयावर मारली होती. केवळ इतकेच नव्हे, तर डिपार्टमेंट ऑफ जस्टीस चे अधिकारी ट्रम्पच्या घरी सुद्धा आधी गेले होते, आणि तिथे हे झाले- जून-जुलै मध्ये.
Senior DOJ officials travel to Mar-a-Lago to meet with lawyers representing Trump regarding additional missing documents. Jay Bratt, the chief of DOJ's counterintelligence and export control section is in attendance. ... Negotiations between DOJ investigators and Trump's representatives break down due to apparent lack of cooperation from Trump.
म्हणजे, गुप्त कागद हा बाब्या घरी घेऊन जाणार. अर्धवट कागद परत करणार. घरी कागद घ्यायला लोक आले की त्यांना हा मदत नाही करणार. मग घरी रेड पडली कि त्याचे समर्थक त्याच्या जीवाला धोका असल्याच्या ष्टोऱ्या बनवणार. वा वा, मज्जाणी लाईफ. सदर रेड मध्ये कागद सापडले आहेत असे दिसते.

In reply to by कॉमी

कॉमी, गोपनीय कागदपत्रं घरी ठेवायला ट्रंप मूर्ख आहे का ! असले कागद जर कोणी धवलगृहाच्या बाहेर घेऊन गेला तर ते नष्ट करण्यासाठीच असतात. घरी ठेऊन काय लोणचं घालायचंय ! बाकी, ट्रंपना लावला तोच न्याय हंटर बिडेनला लावलेला दिसंत नाही. तो जो बिडेनचा मुलगा आहे म्हणून. युक्रेनी आस्थापानांशी त्याने केलेले भ्रष्ट व्यवहार उघड्यावर पडलेत. पण लक्ष कोण देणार ! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गोपनीय कागदपत्रं घरी ठेवायला ट्रंप मूर्ख आहे का ! असले कागद जर कोणी धवलगृहाच्या बाहेर घेऊन गेला तर ते नष्ट करण्यासाठीच असतात. घरी ठेऊन काय लोणचं घालायचंय !
ट्रम्प कडे मार ए लागो मध्ये पंधरा बॉक्स भरून गोपनीय कागदपत्रं होतीच कि, जी आरकाईव्ह ने पुन्हा मिळवली. तो घरी कागदपत्रे घेऊन गेला होता हे तर शंभर टक्के माहीत झालेली गोष्ट आहे आता. आता तो तुमच्या निकषाने मूर्ख का स्वार्थी का पाताळयंत्री हे तुम्हीच ठरवा बुवा.
ट्रंपना लावला तोच न्याय हंटर बिडेनला लावलेला दिसंत नाही. तो जो बिडेनचा मुलगा आहे म्हणून.
जरूर लावावा बुवा. जी काय ड्यु प्रोसेस आहे ती करावीच कि. त्याबाबत सहमत आहे. ट्रम्पने सुद्धा यापूर्वी, बायडन बद्दल वाईट साईट माहिती काढण्यासाठी युक्रेनसाठी कायद्याने पास झालेला मदतनिधी त्याला तसं करण्याचा अधिकार नसताना अडवून ठेवला होता, त्याचा सुद्धा तपास व्हावा आणि योग्य ती शिक्षा ट्रम्पला व्हावी. हे तुम्ही मान्य करालच.

In reply to by कॉमी

म्हणजे ट्रंप तात्यांनीच कायद्यात बदल करून गोपनीय कागदपत्र अधिकार नसताना बाळगणे किंवा नष्ट करणे ह्याची शिक्षा एक वर्षावरून पाच वर्षे केली होती. Public Law

In reply to by कॉमी

ट्रंप ह्या अत्यंत बेदरकार माणसाने व्हाईट हाउस च्या रेकॉर्ड कीपींग टीम ला अक्षरशः वात आणला होता. खरे तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो पेपर वापरतात, मग तो भले बे दुने चार असली आकडेमोड जरी असेल तरी तो पेपर कायद्यानुसार नॅशनल अर्काईव्ह च्या ताब्यात जायला हवा हा नियम असताना ते पेपर फाडुन फेकने, कचरा कुंडीत टाकणे अगदी टॉयलेट मधे फ्लश करणे असले उध्योग ह्या माणसाने केले. मुळात क्लासिफाईड कागदपत्रे त्याच्या ताब्यात आता नसायला हवीत. तो काही राष्ट्राध्यक्ष नाही. असे असताना ती कादग्पत्रे सापडणे हाच गुन्हा आहे. आता ट्रंप भाउ व्हिक्टीम कार्ड खेळतील .. नेहेमीसारखे ..

In reply to by गामा पैलवान

का बरं ? ते अलिप्त भूमिकाच घेणार कि. ईडीची धाड पडल्यावर मोदी काय प्रेस कॉन्फरन्स घेऊन मीच धाड घालायला सांगितली असं म्हणतात काय ?

In reply to by कॉमी

कॉमी, अहो, तेच तर म्हणतोय मी. बलाग्रहकांची ( ED ची ) धाड पडल्यावर पंतप्रधान कार्यालय कसलीच प्रतिक्रिया देत नाही. पण धवलगृह मात्र तत्परतेने स्वत:स अलिप्त ठरवून घेतंय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

धवलगृहाचे जरा वेळ बाजुला ठेवा? जरावेळ. ओके? आता मला सांगा "ट्रंप कडे क्लासिफाईड कागद पत्रे सापडली की नाही?" ती त्याने का नेली? तुम्ही म्हणता की डीस्ट्रोय करायला नेली होती. मग कायदा काय सांगतो? ती कागद्पत्रे ट्रंप आपल्या कडे ठेउ शकतो का?" या प्रश्नांची उत्तरे द्या. मग एफ्बीआय ने धाड का टाकली ते बघा.

In reply to by गामा पैलवान

हत्तीच्या, असे आहे होय, बोल्शेविकांचे पुनःश्च अभिनंदन. काय काय केलं मग बोल्शेविकांनी सत्ता मिळवून ? का जैसे थे ? बिडेनची मतं तेव्हा सांगितलेली तितकीच आहेत.

झाली बळकावून अमेरिका.
चला हे तरी एक काम चांगलं झालं. (म्हणजे पुर्ण झालं). नाहितर जगात असे कितीतरी प्रश्न लटकत पडलेत.

In reply to by धर्मराजमुटके

चला हे तरी एक काम चांगलं झालं. (म्हणजे पुर्ण झालं). नाहितर जगात असे कितीतरी प्रश्न लटकत पडलेत.
मग नायतर काय? एकदाचं ते करोना आणि त्यावरची लस हे दोन्ही थोतांड असल्याचे सिध्द व्हावे. ते पण लै लटकत ठेवलंय. होलसेल मधी २०२०, २१ डीलीट मारले तरी चालेल. सगळे थोतांडच होते असे ठरले तरी चालेल.

एकदाचं ते करोना आणि त्यावरची लस हे दोन्ही थोतांड असल्याचे सिध्द व्हावे.
ते काम पण कॉमीं मुळे लटकत पडलयं. त्यांना काही च्या पाणी देऊन तो ही प्रश्न सुटतो का ते बघायला पाहिजे. :)

कॉमी, १.
काय काय केलं मग बोल्शेविकांनी सत्ता मिळवून ? का जैसे थे ?
तुमचं नावंच मुळी कॉमी आहे. तुम्हांसच अधिक चांगलं ठाऊक असणार. पण त्याचं काये की झोपेचं सोंग घेतलेल्याला उठविता येत नसतं. २.
बिडेनची मतं तेव्हा सांगितलेली तितकीच आहेत.
राज्यनिहाय मतांची बेरीज मलाही करता येते. पण संघाराज्याची अधिकृत घोषणा कुठाय? ( Where is the Federal Agency's official declaration ? ) नोव्हेंबर २०२० पासून आजतागायत झालेली नाही. पुढे कधी होईल याची शाश्वती नाही. आणि म्हणे बिडेन जिंकलाय. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तुमचं नावंच मुळी कॉमी आहे. तुम्हांसच अधिक चांगलं ठाऊक असणार. पण त्याचं काये की झोपेचं सोंग घेतलेल्याला उठविता येत नसतं.
म्हणजे तुम्हाला माहिती नाही म्हणा कि. आणि मी भारतात राहतो हो, तुम्ही किमान यूकेत तर राहता, तेव्हढे माहित असावे असे वाटले. आणि इतके प्रतिसाद हिरीरीने देता म्हणून काहीतरी कल्पना आहे असे वाटलेले. हायला हे कसले बोल्शेविक म्हणायचे. सत्ता आली तरी काही म्हणजे काही सुद्धा केलं नाही. नुसते बसलेत भांडवलशाही कुरवाळत. आणि गंमत म्हणजे ह्या बोल्शेविक (डेमोक्रॅटीक) पक्षाला सगळे पैसे पण ह्या भांडवली कंपन्या पुरवतात. अतिश्रीमंत लोक पुरवतात.
पण संघाराज्याची अधिकृत घोषणा कुठाय? ( Where is the Federal Agency's official declaration ? ) नोव्हेंबर २०२० पासून आजतागायत झालेली नाही
हा काय प्रकार ? ट्रम्प आणि ओबामा ची दाखवा बघू, मग तशी बिडेनची आहे का बघूया.

In reply to by कॉमी

कॉमी, १.
आणि गंमत म्हणजे ह्या बोल्शेविक (डेमोक्रॅटीक) पक्षाला सगळे पैसे पण ह्या भांडवली कंपन्या पुरवतात. अतिश्रीमंत लोक पुरवतात.
ह्यांत गंमत ती कसली? हे तर ऐतिहासिक तथ्य आहे. २.
ट्रम्प आणि ओबामा ची दाखवा बघू, मग तशी बिडेनची आहे का बघूया.
२०१६ ( ट्रंप ) : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections201… २०१२ ( ओबामा ) : https://www.fec.gov/resources/cms-content/documents/federalelections201… एव्हाना इथे २०२० ( बिडेन ) चे निकाल दिसायला हवे होते. पण ते दिसंत नाहीत : https://www.fec.gov/introduction-campaign-finance/election-and-voting-i… आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आणि भांडवलशाहीचा पुरस्कारच करणारी आणि भांडवली कंपन्यांनी फंड केलेली पार्टी बोल्शेविक म्हणजे प्रचंड मोठा विनोद आहे. बोल्शेविक म्हणे, उगाच काहीही शब्द फेकणे आहे हे म्हणजे.

घ्या, आता पाकिस्तानातली निवडणूकही करण्यात आली आहे. काही ठिकाणी मतमोजणीत इमरानखानाची माणसं पुढे होती तिथे रात्रभरात पराजित म्हणून घोषित झालीत. बातमी : https://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/pakistani-courts-flo…
.... The petitioners argue that their opponents were declared winners based on Form 45, which is the primary source of election results at the lowest level. However, they claim that their victories were turned into defeats in Form 47, which summarizes the results from each polling station. The candidates allege collusion in the alteration of election results and demand that Form 47 be prepared according to Form 45s. .... Political analyst Amir Zia stated that in 80 percent of the seats, the election results were as expected, but disputes arose in 20 percent of the seats. The focus of the debate is on the seats won by the PML-N, with questions being raised about several of their candidates who were initially losing but were declared winners overnight. ....
अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकीत पाकिस्तानची गृहयुद्धाच्या दिशेने दिमाखदार वाटचाल ! लगे राहो भाई !! -नाठाळ नठ्या

दैनिक सनातन प्रभात वृत्तपत्राने 'यापैकी नाही' अर्थात None of the Above या पर्यायास पडलेल्या मतांची बेरीज जुळंत नसल्याची माहिती उघड केली आहे. संबंधित बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://x.com/SanatanPrabhat/status/1804883928941298157 हा निवडणूक गैरप्रकार आहे का? की मतमोजणीत अजाणता राहिलेली त्रुटी आहे? जे काही असेल ते लवकरात लवकर दुरुस्त व्हायला हवं. निवडणूक आयोगाकडून सत्वर खुलासा अपेक्षित आहे. स.प्र. ची बातमी : https://sanatanprabhat.org/hindi/101157.html -नाठाळ नठ्या

In reply to by पॅट्रीक जेड

परत एकांगी. अहो काँग्रेस, सपा आणि तत्सम पक्ष अनेक वर्ष बूथ capturing करूनच जिंकत होते, त्या बदल तुम्ही कधी बोलला नाहीत. त्या वेळी पण निवडणूक आयोग काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधला होता ना? शेषन यांनी ती परिस्थिती सुधारली ना? तुम्हीच सांगितले ना की 2009 मधे बिजेपी evm ला विरोध करत होती आणि काँग्रेस पुरस्कार, मग त्या वेळी आज पेक्षा वेगळे असे काय होते?

In reply to by टीपीके

अहो काँग्रेस, सपा आणि तत्सम पक्ष अनेक वर्ष बूथ capturing करूनच जिंकत होते फेका आणखी मोठ्या फेका. अगदी आपले शेठ फेकतात त्यापेक्षा मोठ्या फेका. काँग्रेसने अस केलं असतं तर आज भाजप नावाचा पक्षच अस्तित्वात नसता. काँग्रेसने लोकशाही जपली म्हणूनच आज भाजपला ती पायदळी तुडवता येतेय.

In reply to by पॅट्रीक जेड

फालतू प्रतिवाद करू नका, याच तर्काने मग आत्ता काँग्रेस किंवा इतर पक्षांना ह्या २३६ जागा मिळाल्या नसत्या. आम्ही नाही तुम्हीच मोठ्या मोठ्या फेकता. अर्थात रेटून सतत खोटे बोलणे तुमच्या नोकरीचाच भाग आहे म्हणा. या वेळी पगारवाढही चांगली मिळाली असेल ना?

अरे, आजून २०२० च्या निवडणुकीचे अधिकृत निकाल प्रसिद्ध झालेले नाहीयेत. २०२४ ची निवडणूक कसली घेताहेत अमेरिकेत ! हीस खरंतर चिवडणूक म्हणा. २०२० चे निकाल इथे मिळंत नाहीत : https://www.fec.gov/introduction-campaign-finance/election-results-and-… पूर्वीच्या निवडणुकांचे मात्र मिळतात. अमेरिकी निवडणुका हा एक भला थोरला घोटाळा आहे. -नाठाळ नठ्या